प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

वनस्पतिशास्त्र भाग ५

जीवक्रियाविज्ञानाचा इतिहास (१५८३-१८६०) :- वनस्पतींच्या जीवक्रियेविषयीं सोळाव्या शतकांत व सतराव्या शतकाच्या आरंभी जें ज्ञान होतें तें प्राचीन काळच्या तत्संबंधी ज्ञानाहून मुळींच अधिक नव्हतें. प्राचीन कालापासून शेतकी व बागबागाईत या कला मनुष्याला माहीत असल्यामुळें वनस्पतींच्या जीवक्रियेसंबंधानें साहजिकच कांहीं विचार केला जाऊन जीवक्रियेविषयीं कांहीं गोष्टी ठाऊक झाल्या होत्या. उदाहरणार्थ, मुळांचा उपयोग वनस्पतींनां भूमीवर स्थिर राहण्याच्या कामीं व जमिनीतील अन्न शोधण्याच्या कामीं होतो; शेण, कुजट माती, विष्टा व मासळी वगैरे खतांचा उपयोग वनस्पतींच्या वाढीवर व सुफलतेवर परिणामकारक होतो. त्याचप्रमाणें राख आणि क्वचित प्रसंगीं क्षार (मीठ) यांचाहि उपयोग खताप्रमाणें होतो; वनस्पतींच्या डोळ्यांतून अंकुर फुटतात; फळ व बीं तयार होण्यापूर्वी वनस्पतीनां फुले येतात व फुलांपासून फळांची उत्पत्ति होते. या व याखेरीज आणखी कांही वनस्पतींच्या जीवक्रमांतील बारीकसारीक गोष्टीचें सर्वांनां ज्ञान होतें. परंतु वनस्पतींच्या जीवनक्रियेंत पानांचे महत्त्व किती आहे, म्हणजे पानंशी वनस्पतींची पोषणक्रिया किती संलग्न आहे याविषयीं मुळीच माहिती नसून पुंकेसर व त्यांचा बीजाच्या पैदासीशीं संबंद्ध याविषयीं केवळ अत्यंत अंधुक कल्पना मात्र होती.

जीवक्रियाविज्ञानामध्यें वनस्पतींची पुनरूत्पत्ति, पोषण, भूमींतून शोषून, घेतलेल्या जलाची वहातूक, वाढ आणि वनस्पतींच्या इंद्रियांची हालचाल इत्यादि अनेक विषयांचा समावेश होतो. आतां या विषयापैकीं पुनरूत्पत्तीचा लिंगभेदाशीं निकट संबंध आहे; तो इतका कीं, लिंगभेदाचा इतिहास म्हणजेच पुनरूत्पत्तीचा इतिहास होय. परंतु लिंगभेद या विषयाची प्रगति इतर विषयापासून अगदीं स्वतंत्र व भिन्न मार्गांनी झाली असल्यामुळें पुढें लिंगभेदाचा इतिहास मात्र स्वंतत्र दिला असून इतर विषयांचें एकत्र विवेचन केलें आहे.

वनस्पतींतील लिंगभेद:- सतराव्या शतकांत रूडाल्फ याकोब कामेरारियसकडून आणि त्याच्यामागून इतरांकडून जें वनस्पतींतील लिंगभेदासंबंधी शोध झाले त्यांचें महत्त्व कळून येण्यास त्यासंबंधात आरिस्टाटलपासून कामेरारियसच्या काळापर्यंत काय माहिती होती हे समजणें अवश्य आहे; कारण तीपासून प्राचीन तत्त्वज्ञान्यांची वरवर पाहून शोध करण्याची पद्धति, उन्नयनपद्धतीनेंच सोडवितां येण्याजोगे प्रश्न सोडविण्याच्या कामीं किती फोल होती हें दिसून येईल.

आरिस्टॉटलनें व त्याच्या मागून त्याचप्रमाणें पुष्कळांनी वनस्पतींच्या सफलतेचा संबंध पोषणाशीं जोडल्यामुळें, मैथुनामुळे वनस्पतीनां सफलता प्राप्त होते हें त्यांच्या ध्यानांत येणें केवळ अशक्य झालें. आरिस्टॉटलच्या मतानें वनस्पतींच्या आत्म्याची पुनरूत्पत्तीची आणि पोषणाची एकच प्रकारची पात्रता असते. आरिस्टॉटलचा हा सिद्धांत त्याच्या उथळ ज्ञानाचा किंवा अज्ञानाचा परिणाम होय. अशा प्रकारच्या अज्ञानामुळेंच आरिस्टॉटलनें जीवशास्त्रांत स्थलांतरशक्ति आणि लिंगभेद यांचा बादरायण संबंध जोडला होता. [उदाहरणार्थ, यानें वनस्पतीसंबंधी लिहितांना पुढीलप्रमाणें लिहिलें आहे; स्थलांतरक्षम प्राण्यामध्यें नर आणि मादी असा प्रकार आहे परंतु नर आणि मादी हेही, जरी त्यांच्या रचनेमध्यें भेद असला तरी एकाच उपजातीचीं समजावयाची परंतु वनस्पतींमध्यें नर आणि मादी एकच असल्यामुळें रेतोत्पत्ति न होतां एका वनस्पतीपासून दुसरी वनस्पति उत्पन्न होते. याचप्रमाणें शंखामध्यें रहाणारे प्राणी आणि एखाद्या पदार्थाला चिकटून रहाणारे प्राणी म्हणजे स्थल न बदलणारे प्राणी यांमध्येहि वनस्पतीप्रमाणेंच लिंगभेद नसतो. आतां या प्राण्यांच्या संबंधांत नर-मादी म्हणतात ते त्यांच्यांत थोडथोडा भेद आढळतो म्हणून होय. परंतु वनस्पतींमध्येंहि एकाच उपजातींतील कांही झाडांनां फळें येतात व कांहींनां येत नाहींत, व ज्यांनां फळें येत नाहींत तीं, फळें येणार्‍या झाडांनां फळें येण्याच्या कामीं उपयोगी पडतात. उदाहरणार्थ क्याप्रि फिगचे (नर अंजीराच्या झाडाचें) अंजीर माळेंत गोंवून फिगच्या (स्त्रीअंजिराच्या झाडाच्या) फांद्यांवर टांगले असतां, स्त्रीअंजीराच्या झाडावरील अंजीर उत्तम प्रकारें पिकतात.]

वरील संबंधांत आरिस्टॉटलचा शिष्य थिओफ्रास्टस याला अनुभव व ज्ञान हीं दोन्हीं आरिस्टॉटलपेक्षां अधिक होतीं असें दिसतें. कारण तो म्हणतो कीं, 'माली मेडि' केच्या कांहीं फुलांनां फळें येतात व कांहीनां येत नाहींत. यानंतर अशीच स्थिति इतर कांही वनस्पतींत असते किंवा नाही तें पहावें अशी तो सूचना करतो; परंतु ही गोष्ट त्यानें स्वतःच पहावयास पाहिजे होती. परंतु थिओफ्रास्टसला वनस्पतींतील लिंगभेद पहाण्यापेक्षां स्वत:च्या ज्ञानाची तर्कशास्त्राला अनुसरून पद्धतशीर मांडणी करण्याविषयीं अधिक चाड होती. थिओफ्रास्टस असेहि; म्हणतो कीं, वनस्पतीत एकाच उपजातींतील कांही झाडांनां फुलें येतात व कांहींनां येत नाहींत. उदाहरणार्थ ताडांतील नरवृक्षांनां फुलें येतात परंतु मादीवृक्षांनां फळें येतात; म्हणून या नर आणि मादी वृक्षांच्या फुलांमध्यें भेद असला पाहिजे. पुन्हा थिओफ्रास्टस असें म्हणतो:- 'लोक म्हणतात कीं, खारकेच्या मादीवृक्षावरील खारका, त्याजवर नरवृक्षांच्या फुलांतील धुली (पराग) घातल्याशिवाय पिकत नाहीत; ही गोष्ट मोठी चमत्कारिक असून अंजिरासंबंधांतील प्रकाराशीं तिचें साम्य आहे. परंतु असा प्रकार केवळ एकदोन वनस्पतींतच असणे शक्य नसून तो सर्व जातींच्या वनस्पतींत निदान पुष्कळ जातींच्या वनस्पतींत तरी असला पाहिजे. याप्रमाणें स्वतः कांहिंहि न पाहतां थिओफ्रास्टस या मोठया तत्त्ववेत्त्यानें वरील महत्त्वाचा प्रश्न निकालांत काढला. प्लिनीच्या वेळीं वनस्पतींमध्यें लिंगभेद असतो ही कल्पना सृष्टिशास्त्रज्ञांच्या मनांत चांगली बिंबली होती असें दिसतें. कारण प्लिनी आपल्या हिस्टोरिया मंडी (सृष्टीचा इतिहास) या ग्रंथांत नर आणि मादी खारीकवृक्षाविषयीं लिहितांना नरवृक्षांतील परागांत गर्भस्थापना करण्याची शक्ति असते असें म्हणतो; आणि असेंहि म्हणतो कीं, सृष्टिशास्त्रज्ञ आम्हाला सांगतात कीं, सर्व वृक्षांत आणि वनस्पतींत दोन लिंगें असतात.

तत्त्वज्ञान्याकडून जरी वर दर्शविल्याप्रमाणें वनस्पतींतील लिंगभेदासंबंधी खोल विचार झाला नाहीं, तरी त्या विषयानें कवींचें लक्ष आपल्याकडे आकर्षून घेतलें होतें असे दिसतें. डी कँडोलनें या संबंधांत ओव्हिड व क्लॉडियनच्या कवितांचे उतारे आणि १५०५ मधील जोव्हिआनस व पाँटॅनसच्या ब्रिंडिसी आणि ओट्रँटो येथील दोन खारीकवृक्षांवरील उतारे दिले आहेत. पण अर्थांतच अशा कवितांपासून शास्त्रीय प्रगति मुळींच झाली नाहीं. ट्रेव्हिरानसनें आपल्या 'फिजिऑलॉजि डर शेवाशे' (१८३८) या ग्रंथांत सोळाव्या शतकांतील जर्मनींतील आणि नेदर्लंडांतील वनस्पतिशास्त्रज्ञांनचें वनस्पतींच्या लिंगभेदाविषयीं काय ज्ञान होते याचें सुंदर वर्णन दिलें आहे. ट्रेव्हिरानस म्हणतो ''कांही वनस्पतींतील लिंगभेद ओळखिला जात असे. परंतु तो मैथुनिक पुनरुत्पत्तीच्या इंद्रियांतील मेदावरून ओळखिला जात नसून एकंदरींत प्रकृतिभेदावरून ओळखिला जात असे. डीलक्लूझनें मात्र वनस्पतींच्या वर्णनांत पुंकेसरांचा रंग, आकार यांचें वर्णन दिलें असून केव्हां केव्हां त्यांची संख्याहि दिली आहे. पपईच्या संबंधांत डीलेक्लूसनें पुंकेसर असणारीं फुलें येणार्‍या झाडाला नर व न येणार्‍या झाडाला मादी हीं नांवें देऊन त्या वृक्षांचीं लिंगें भिन्न असतात असें स्पष्ट म्हटलें आहे; त्याचप्रमाणे मादीवृक्षावरील पपया पिकत नाहींत असेंहि म्हटलें आहे; परंतु यापेक्षां अधिक मात्र कांहीहि नाही.''

एकंदरींत सोळाव्या शतकांतील वनस्पतीशास्त्रज्ञांचें लिंगभेदाविषयींचें ज्ञान फारसें नव्हतें. आणि डी कँडोल जरी आपल्या 'फिजिऑलॉजी व्हेजेटेबल' या ग्रंथांत सेजाल्पिनोला लिंगभेदाची कल्पना मान्य होती असें म्हणतो तरी खरा प्रकार तसा नाहीं. कारण सेजाल्पिनोनें वनस्पतीविषयी लिहितांना ज्या नर आणि मादी या संज्ञा वापारल्या आहेत, त्या त्याच्या मताच्या दर्शक नसून लोकमताला अनुसरून वापरल्या आहेत. प्रॉस्पर आल्पिनोच्या १५९२ तील खारीकवृक्षाच्या परागाधानाच्या हकीकतींत नवीन असें कांहींच नाही; परंतु त्यानें तसें परागाधान ईजिप्तमध्यें स्वत: डोळ्यानें पाहिलें होतें ही गोष्ट लक्षांत ठेवण्याजोगी आहे. बोहेमियांतील वनस्पतिशास्त्रज्ञ झलुजिअनस्कि यानेंहि लिंगभेदाविषयीं लिहिलें आहे; परंतु तेंं सर्व प्लीनीचेंच घेतलेलें आहे.

जंगली वनस्पतीतींल लिंगभेदाविषयीं समकालांत वनस्पतिशास्त्रज्ञांचे मत काय होतें हें ठाऊक असलें पाहिजे. परंतु त्याच्या लेखनांत त्यासंबंधीं कोठेंच उल्लेख नाहीं. यावरून असें दिसून येतें कीं, सेजाल्पिनो आणि जंगसारखे विद्वान लोक लिंगभेदाची कल्पना भाकड असें मानीत असावेत. यासंबंधांत विशेष काय सांगावें पण माल्पिगीनें गर्भपेशींतील अवस्था पाहिल्या होत्या तरीसुद्धां त्याला असेंच वाटत होते कीं, बीजें हीं डोळ्याप्रमाणेंच वनस्पतीच्या पुनरूत्पत्तीचीं इंद्रियें असून तीं बनण्याच्या मुळांशी मैथुन आणि लिंगभेद नसावा. कारण माल्पिगी एके ठिकाणीं म्हणतो ''फळें न येणार्‍या फुलांनां नरफुलें असें म्हणतात; परंतु हें म्हणणें खरें नसून तो केवळ लौकिक प्रचार आहे.''

सर थॉमस मिलिंगटन या वनस्पतिशास्त्रज्ञांचा उल्लेख वनस्पतिशास्त्राच्या इतिहासांत करण्याचें विशेष कारण नाहीं. परंतु पुंकेसर हीं वनस्पतींचीं इंद्रियें आहेत असें त्यानें ठाम मत दिलें होतें असें म्हणतात. याविषयीं 'ग्र्यू आपल्या ऍनॅटॉमी ऑफ प्लँटस्' (१६८२) या ग्रंथांत म्हणतो ''प्रोफेसर मिलिंगटन एकदां मला म्हणाले कीं, पुंकेसर ही पुरूष इंद्रियें असावीत. यावर मी उत्तर दिलें; होय, माझेंहि मत तुमच्याचप्रमाणें आहे.'' ग्र्यू यानें पुकेसर हें पुनरूत्पत्तीचें पुरूष इंद्रिय असून त्यांमधील परागाचा गर्भधारणा होऊन बीज बनण्याच्या कामीं उपयोग होतो हें ताडिलें होतें. परंतु या त्याच्या तर्काच्या समर्थनार्थ त्यानें पुराव्यादाखल म्हणून जीं विधानें केलीं आहेत तीं मात्र आधुनिक वनस्पतिशास्त्राशीं परिचय असणार्‍यास फार चमत्कारिक वाटतील. ग्र्यूनें प्राचीनांच्या लिंगभेदासंबंधीं कल्पना आणि त्यांचा त्यासंबंधांत अनुभव यांचा कोठें उल्लेखसुद्धां केलेला नाहीं; मग त्याच्या हातून लिंगभेदासंबंधांत योग्य मार्गानें शोध होणें कसें शक्य होते? रेनें मात्र आपल्या 'हिस्टोरिया प्लँट्यारम्' या ग्रंथांत ग्र्यूच्या लिंगभेदाची कल्पना अधिक विशद करून तिचा (दुलिंगी वृक्षाचा वगैरे उल्लेख करून) प्राचीनांच्या त्यासंबधांतील कल्पनेशी मेळ बसवून दिला आहे; परंतु त्यानें स्वत:त्यासंबंधांत प्रयोग करून पहाण्याचें टाळलें. तथापि वनस्पतींतील लिंगभेदाचा खरा शोधक क्यामेरारियस हा 'हिस्टोरिया प्लँट्यारम्' हा ग्रंथ प्रसिद्ध होण्याच्या पूर्वीच दोन वर्षे लिंगभेदाचा प्रश्न प्रयोग करून सोडविण्याच्या कामी गुंतला होता. कांहीं जणांची ग्र्यूला आणि रेला लिंगभेदाचा शोध लाविल्याचें श्रेय देण्याची प्रवृत्ति आहे. परंतु या दोघांनीं त्यासंबंधांत काय केलें हें वर सांगितलेंच आहे. वनस्पतींच्या लिंगभेदाच्या संबंधांत क्यामेरारियसनें कसकशा शोध केला याचा वृतांत पुढें दिला आहे, त्यावरून लिंगभेदाच्या शोधाचें श्रेय सर्वस्वी त्याला दिलें पाहिजे हें दिसून येईल. क्यामेरारियविषयी लिनियसनें म्हटलें आहे की, क्यामेरारियसनें वनस्पतीत लिंगभेद असतो व मैथुनिक पुनरूत्पत्ति होते हें प्रथम स्पष्ट दाखवून दिलें. रूडॉल्फ याकोब क्यामेररिअस (१६६५-१७५१) हा तत्त्वज्ञानी आणि वैद्य होता. यानें यूरोपांत पुष्कळ प्रवास केला. हा टुविन्जेन येथील युनिव्हर्सिटीत अध्यापक होता.

प्राग येथील वनस्पतिशास्त्राचा अध्यापक योहान क्रिस्चेन मायकन यानें क्यामेरारियसचे संकीर्ण लेख एकत्र करून कोर्लेटरच्या एकत्र केलेल्या संकीर्ण लेखासमवेत छापिले असून पुढील वृत्तांत त्याजपासून घेतला आहे :-

कामेरारियसनें एकदां असे पाहिलें कीं, तुतीच्या मादीझाडाला फळें आलीं; पण या फळांतील बीजें शुद्ध आणि बांझ होतीं. या गोष्टमुळें त्यांनें कुतूहलपूर्वक 'मर्क्युरिआलिस अनुआ' नांवाच्या दुसर्‍या एका दुलिंगी वनस्पतीवर एक प्रयोग करून पाहिला. या प्रयोगांत त्यानें या वनस्पतीच्या दोन माद्या इतर (त्याच जातीच्या) वनस्पतींपासून दूर अंतरावर लाविल्या. या माद्यांनां फुलांचा पुष्कळ बहर आला व त्यांची फळें पिकूंहि लागलीं; परंतु फळें अर्धवट पिकल्यानंतर पुढें पिकण्याची क्रिया बंद होऊन ती एकाएकीं दाठरलीं. या फळांत जें बीं बनलें होतें तें तपासतां तें वांझ आणि शुष्क होतें असें आढळून आलें.

लिंगभेदाच्या संबंधांत क्यामेरारियसनें गोसन येथील प्रोफेसर व्हॅलेन्टाइन यास १६९४ आगस्ट २५, ही तारीख असलेलें एक पत्र लिहिलें असून लिंगभेदाच्या विषयावर तें फार महत्त्वाचे आहे. या पत्रावरून क्यामेरारिअसचें लिंगभेदाच्या विषयांत फार लक्ष गेलें असून लिंगभेदाचें अस्तित्त्व सिद्ध करण्याचा त्यानें कृतनिश्चय केला होता असें दिसून येतें. या पत्रांत फुलाच्या निरनिराळ्या भागांचें सविस्तर वर्णन असून त्या सगळ्यांचा अर्थ काय याचें उत्कृष्ट विवेचन केलें आहे. परागकोशांच्या संबंधांत कामेरारिअस या पत्रांत म्हणतो कीं, दुलिंगी फुलें असणार्‍या झाडाच्या फुलांतील परागकोश जर त्यांत पराग बनण्यापूर्वीच तोडून टाकिले तर त्या गोष्टीचा त्या झाडाच्या बीजोत्पत्तीवर वाईट परिणाम होतो. म्हणजे बीज शुष्क आणि वांझ निपजतें. हा प्रयोग त्यानें एरंड आणि मका यांच्या संबंधांत करून पाहून अनुभव घेतला. वरील सर्व गोष्टी लक्षांत घेऊन फुलांतील परागकोश हें पुरूष इंद्रिय आणि अंडाशय हें स्त्रीइंद्रिय असावें असें क्यामेरारियसने अनुमान बांधिलें.

क्यामेरारिअसच्या वेळीं प्राचीन विद्वानांच्या ग्रंथांनां थोडें फार महत्त्व दिलें जात असल्याकारणानें तो असें म्हणतो कीं, आरिस्टॉटल, थिओफ्रास्टस वगैरे प्राचीन विद्वान लोकांनांहि वनस्पतींतील लिंगभेद मान्य होता. वनस्पतींत लिंगे एकत्र असतात ही आरिस्टाटलची कल्पना क्यामेरारियसला बरोबर वाटली. त्यासंबंधांत तो म्हणतो कीं, स्वामरडामनें शोध लावल्याप्रमाणें गोगलगाईसारख्या प्राण्यांत लिंगें एकत्र असतात; परंतु प्राण्यामध्यें ही गोष्ट अपवादात्मक असून वनस्पतींमध्यें मात्र तो प्रकार सर्वत्र दिसून येतो.

क्यामेरारिअसनें लिंगभेदाच्या कल्पनेसंबंधी शंकाहि काढिल्या आहेत; ही गोष्ट त्याला भूषणावह असून तिजवरून त्याला सत्यशोधनाची चाड किती होती व शास्त्रीय शोधासंबंधीं खरी कळकळ कशी होती हें दिसून येतें. इक्वीसीटम आणि लायकोपोड या वनस्पतींच्या पुनरावृत्तीचें गूढ त्याला उकललें नव्हतें; एकदां एका नरपुष्पें तोडून टाकिलेल्या मक्याच्या झाडाच्या कणसांत त्यानें चांगलें बीज तयार झालेले पाहिलें; त्याचप्रमाणें त्यानें हेंपचीं कांहीं मादी-झाडें नरझाडापासून पुष्कळ अंतरावर लाविलीं होतीं, त्यांतहि चांगलें बीज तयार झालें. या सर्व गोष्टी त्याच्या लिंगभेदाच्या कल्पनेविरूद्ध होत्या हें त्यानें कबूल केलें. परंतु यासंबंधांत त्याचें असेंहि म्हणणें होतें कीं, या अपवादात्मक उदाहरणांच्या संबंधांत पराग कसे तरी मादीवृक्षावरील मादीफुलापर्यंत पोहोंचले असले पाहिजेत. क्यामेरारिअसचा एक मात्र गैरसमज झाला होता; तो हा कीं, उभयलिंगी फुलांमध्यें त्याच फुलांतील पराग त्याच फुलांतील स्त्रीकेसराच्या मुदीवर पडून गर्भस्थापना होतें असें त्याला वाटत होतें; परंतु खरा प्रकार असा नसतो हें शंभर वर्षांनंतर कॉन्राड स्प्रेंजेलच्या ध्यानांत आलें.

लिंगभेदाच्या कल्पनेचा प्रसार; त्या कल्पनेचा सत्पक्ष व विरूद्ध पक्ष (१७००-१८६०):- लिंगभेदाच्या कल्पनेच्या विकासाच्या इतिहासाकडे वनस्पतिशास्त्राच्या इतिहासांविषयीं लिहिणार्‍यांचें जितकें लक्ष गेलें आहे तितकें वनस्पतिशास्त्रांतील दुसर्‍या कोणत्याहि विषयाच्या इतिहासाकडे गेलेलें नाहीं. यामुळें लिंगभेदाच्या कल्पनेच्या विकासासंबंधीं पुष्कळच वाङ्मय झालें आहे. परंतु यापैकीं बरेचसें वाङ्मय मुळांत माहिती मिळवून त्याजवर उभारिलेलें नसल्यामुळें लिंगभेद खरोखर शोधून काढणार्‍यांनां त्या शोधाचें श्रेय न मिळतां तें भलत्यासच देण्यांत आलें आहे. यासंबंधांत विशेष काय सांगावें पण जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञांकडून क्यामेरारिससच्या लेखनाशीं ते अपरिचित असल्यामुळें, लिंगभेदाच्या शोधाचें श्रेय त्यांच्या देशबांधवांस न मिळतां लिंगभेदाच्या शोधाच्या संबंधांत ज्यांच्या हातून कांहींहि झालेलें नाहीं अशा इंग्रज व फ्रेंच वनस्पतिशास्त्रज्ञांस दिलें गेलें आहे. या ठिकाणीं क्यामेरारियसनंतर कोयेलरटेरपर्यंतच्या अवधींत लिंगभेदाच्या कल्पनेला बळकटी आणण्याजोग्या त्याचप्रमाणें त्या कल्पनेच्या विरूद्ध काय काय गोष्टी घडून आल्या हें पहावयाचें आहे. इतर महत्त्वाच्या शास्त्रीय शोधांप्रमाणेंच लिंगभेदाच्या शोधांतहि ठराविक प्रकार घडून आला. कांहीं जणांनीं वनस्पतींत लिंगभेद असतो ही गोष्ट साफ नाकारली, व काही जणांनीं त्यासंबंधांत कांहीहि न समजतां ती कल्पना मान्य केली. कांहीं जणांनीं कोत्या विचारांच्या अंमलाखाली लिंगभेदाविषयी भलतीच कल्पना करून घेतली; कांहींनीं लिंगभेद शोधून काढिल्याचें श्रेय स्वत:ला मिळविण्याचा प्रयत्न केला; परंतु ती कल्पना बरोबर समजून तिला बळकटी येण्याजोगे शोध ज्यांच्या हातून झाले असे फार थोडे होते.

लिंगभेदाच्या कल्पनेला बळकटी आणण्याचा प्रयत्न ज्यांच्या हातून झाला त्यांमध्यें दोन प्रकारचे लोक होते; पैकीं ब्राडले, लोगन, मिलर आणि ग्लेडिटस्क यांनीं बीजें बनण्याच्या कामीं परागाची आवश्यकता आहे काय हें प्रयोग करून पाहिलें आणि जॉफ्रे व मोरलंड यांनीं पराग बीं बनण्याच्या कामीं अवश्य असतो असें धरून चालून त्याच्यायोगानें अंडयांमध्यें गर्भोत्पत्ति कशी होते तें ठरविण्याचा प्रयत्न केला. परंतु लायब्मिटी, बर्कहार्ड आणि व्हॅलंट यांनीं त्यासंबंधांत कांहींहि न पहातां दुसर्‍यांच्या प्रयोगावर भिस्त ठेवून लिहिलें. लिनीयस आणि त्याचे शिष्य यांनीं तत्त्वज्ञानाच्या द्वारें लिंगभेद सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु टॉर्नफोर्ट आणि पांटेडेरा यांनीं लिंगभेदाची कल्पना केवळ त्याज्य ठरविली. लिंगभेदाच्या संबंधांत क्यामेरारियसनंतर जे प्रयोग झाले त्यांत कोणकोणत्या गोष्टी दृष्टोत्पत्तीस आल्या हें आतां पहाणें आहे. लिंगभेद असतो किंवा नाहीं हें पहाण्याकरितां उभयलिंगी फुलावर ब्राडलेच्या हातून प्रथम प्रयोग झाला असें दिसतें. ब्राडलेनें 'उपवनकलेंतील नवीन सुधारणा' (न्यू इंप्रुव्हमेंटस् इन गार्डनिंग, १७१७) हें पुस्तक लिहिलें आहे; त्यावरून असें दिसून येतें कीं, त्यानें आपल्या बागेंत एकीकडे टयुलपचीं १२ झाडें लाविलीं; या झाडांनां फुलें येतांक्षणींच त्या फुलांतील पुंकेसर त्यानें तोडून टाकिले. यामुळें त्या फुलांतील बीजोत्पत्ति थांबली. परंतु इतर ठिकाणीं त्यानें जी टयुलपचीं झाडें लाविलीं होतीं त्यांच्या फुलांत मात्र बीं बनलें. ब्राडलेच्या या प्रयोगानंतर २० वर्षांनीं पेन्सिल्व्हेनियाचा गव्हर्नर जेम्स लोजेन यानें लिंगभेदासंबंधांत मक्यावर प्रयोग करून पाहिला. कोयेलरटरनें मिलरच्या १७५१ तील एका प्रयोगाचा उतारा दिला आहे, तो महत्त्वाचा आहे. कारण त्यावरून कीटकांचा परागधानाच्या कामीं उपयोग होतो हें प्रथम दृष्टीत्पत्तीस आलें. मिलरचा प्रयोग टयुलपनांवाच्या वनस्पतीवर झाला होता. बर्लिन येथील वनस्पतिशास्त्रसाहाय्यी उद्यानाचे अध्यक्ष प्रोफेसर ग्लेडिस्टिक यानें बर्लिन येथें. एक खारकेच्या उपजातीचें झाड होतें त्याजवरून पुढील प्रयोग केला. उपरिनिर्दिष्ट झाडाला खारखा लागत पण त्या पिकत नसत. ग्लेडिस्टिकनें त्याच उपजातीच्या नरवृक्षाचा पराग दुसरीकडून आणवून त्या खारखा न पिकणार्‍या झाडावरील फुलांचें परागाधान केलें; याचा चमत्कार असा झाला कीं, त्याजवरील खारका चांगल्या प्रकारें पिकल्या.

सॅम्युएल मोर्लंड आणि फ्रॉइज यांनी लिंगभेद असतो हें गृहीत धरून परागाची गर्भस्थापनेच्या कामीं कशी मदत होतें हें दाखविण्याचा प्रयत्न केला. परंतु या दोघांचीहि शोधकबुद्धि तितपतच असल्यामुळें त्यापासून गर्भस्थापनेच्या चुकीच्या कल्पनांशिवाय दुसरें कांहीहि निष्पन्न झालें नाहीं लाइटब्रिटी, लिनिअस, टर्नफोर्ट इत्यादि गृहस्थांनीं लिंगभेदाच्या कल्पनेच्या समर्थनार्थ किंवा विरूद्ध लिहिलें; परंतु त्यांच्याहि हातून त्यासंबंधांत सप्रयोग असें कांहीहि झालें नाहीं. म्हणून या सर्व गृहस्थांच्या लेखनाचा विचार करण्याचें कारण नसून आतां कोयेलरेटर आणि स्प्रेंजेल यांच्या हातून लिंगभेदाच्या अभ्यासाची प्रगति कशी झाली तें पहावयाचें आहे.

वनस्पतींतील लिंगभेदाच्या अभ्यासाची प्रगति, कोयेलरेटर व स्प्रेंजेल (१७६१-१७९३):- जोसेफ गॉटलिब कोयेलरेटर हा नेकर नदीवरील सली गांवी १७३३ त जन्मला. हा कार्लश्रूह येथें सृष्टिविज्ञानाचा अध्यापक असून येथील वनस्पतिशास्त्रसाहाय्यी उद्यानाचा अध्यक्षहि होता. हा १८०६ त मरण पावला. क्यामेरारिअसनें बीजोत्त्पत्तीच्या कामीं परागाची आवश्यकता असते हें सप्रयोग सिद्ध केलें परंतु परागाचा परिणाम बीजोत्पत्तीवर कशा प्रकारचा होतो यासंबंधांत कोयेलरेटरकडून महत्त्वाचा शोध झाला. बीजोत्पत्तीवर परागाचा विशिष्ट परिणाम काय होतो, त्याचप्रमाणें पुरूष-अंश, स्त्री-अंश अशा दोन अंशांची बीज बनण्याच्या संबंधांत आवश्यकता असते त्यांतील गूढ इत्यादि गोष्टी एकाच वनस्पतीतील पराग आणि अंडी यांजपासून जें बीं तयार होतें त्याचें परीक्षण करून समजणें शक्य नाहीं; तर या गोष्टीचा उलगडा होण्यास एका वनस्पतींतील पराग दुसर्‍या वनस्पतींतील स्त्रीकेंसराच्या मुदीवर घालून बीज उत्पन्न करून त्या बीजापासून कशा प्रकारची प्रजा निर्माण होते हें पहाणें अवश्य होतें. आणि अशा प्रकारचे वनस्पतींतील संकराचे निरनिराळे प्रयोग उत्तम तर्‍हेनें करून कोयेलेरटरनें वनस्पतिशास्त्रांत महत्त्वाच्या शोधांची भर टाकिली. कोयलरटरचे हे प्रयोग इतके परिपूर्ण होते कीं, आधुनिक वनस्पतिशास्त्रज्ञांच्या दृष्टीनें सुद्धां त्यांत दोष काढण्यास जागा नाहीं.

कोएलरेटरचे हे संकरासंबंधीं प्रयोग निर्दोष झाले याचें कारण असें होतें कीं, जरी त्यावेळीं परागनलिका इत्यादि गोष्टींचा शोध लागून गर्भपेशींतील स्त्रीगर्भाशीं पुंकेंद्राचा कसा संयोग होतो हें ठाऊक नव्हतें. कोएलरेटरची गर्भधारणेसंबंधीं जी कल्पना होती तिचा मतितार्थ वरील गोष्टींच्या शोधापासून जो निघतो तसाच होता. म्हणजे गर्भधारणा होण्यास एक स्त्रीअंश व एक पुरूष अंश अशा दोन अंशांचा संयोग होण्याची आवश्यकता असते असें त्याचें मत होतें ही त्याची गर्भधारणेसंबंधीं कल्पना तत्त्वज्ञानी ख्रिश्चन वुल्फ आणि इतर कांहीं गृहस्थ यांच्या गर्भधारणेच्या कल्पनेहून निराळी होती. म्हणजे वुल्फच्या मतानें प्रत्येक वनस्पतींत स्वंयपूर्णच गर्भ असतात आणि जें बीज बनतें तें अशा गर्भांच्या वाढीपासून (विकासापासून) बनतें. कोएलेरटरच्या संकरांतील प्रयोगामुळें वुल्फ वगैरेंच्या वरील बीजोत्पत्तीसंबंधांतील विकासवादाचें वनस्पतिशास्त्रांतून समूळ उच्चाटण झालें.

कोएलरेटरच्या संकरसंबंधीं प्रयोगांत कीटक आणि फुलें यांचा एकमेकांनां उपयोग होतो ही गोष्ट उघडकीस आली, परंतु परागाधानाच्या संबंधांत कोएलरेटर वारा आणि वनस्पतींचें वार्‍यानें हलणें या गोष्टींनां महत्त्व देत असे. कोएलरेटरनें फुलांतील मधुपिंड पाहिले होते; व फुलांच्या रचनेचें परीक्षण करतांना कांही फुलांची रचना कीटकांकडून परागाधान होण्यास कशी सोयीची असते हेंहि त्याच्या ध्यानांत आलें होतें. वरील गोष्टींचा उहापोह केलेला आहे असा एक कोएलरेटरचा ग्रंथ स. १७६१-६६ च्या दरम्यान चार भागांत प्रसिद्ध झाला.

जोसेफ गार्टनरनें लिंगभेदाच्या संबंधांत स्वत:कांहीहि शोध केला नाहीं; परंतु त्यानें कोयेलरेटरच्या प्रयोगांचा आधार घेऊन वुल्फ वगैरेंच्या पुनरूत्पत्तीसंबंधीं विकासवादाविरूद्ध लिहिलें. त्यानें गूढलग्नवनस्पतींत लिंगभेद असतो ही कल्पना त्याज्य ठरविली. जरी गार्टनरचें हें म्हणणें चूक होतें तरी त्यामुळें गर्भाचा विकास होऊन बीज तयार होतें अशा प्रकारचा कोटिक्रम मागें पडला.

ख्रिश्चनकॉन्रॉढ स्प्रेंजेल हा १७५० त जन्मला. हा स्पेंडयू येथें पाद्री होता. तेथें त्यास वनस्पतिशास्त्राच्या अभ्यासाचा इतका नाद लागला कीं, रविवारची नित्य उपासना सुद्धां त्याच्या हातून होईनाशी झाली; त्यामुळें त्याला नोकरीवरून दूर केलें. नंतर तो बर्लिन येथें रहावायास गेला. बर्लिन येथें याचें आयुष्य दारिद्रयावस्थेंत गेलें; तेथें तो आपला निर्वाह शिकवण्या करून कसाबसा करीत असे. याची अवलोकनशक्ति क्यामेरारिअस आणि कोएलरेटर यांच्याप्रमाणेंच सूक्ष्म होती. परंतु कल्पनाशक्तींत तो त्या दोघांपेक्षांहि सरस होता. परंतु त्याचे चहाते मात्र अगदीच थोडे होते. यानें शोध करून जी अनुमानें काढिलीं आहेत तीं इतक्या योग्यतेचीं आहेत कीं, समकालीन लोकांनां तीं मुळींच समजलीं नाहींत. म्हणून डार्विनकडून हींच अनुमानें पुनः जगाच्या दृष्टोत्पत्तीस आणिलीं जाईपर्यंत समवंशाच्या सिद्धांताला तीं किती पुष्टिकारक अतएव महत्तवाचीं आहेत हें कोणासहि ठाऊक नव्हतें. यानें आपल्या शोधांच्या संबंधांत एक ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे दोन भाग आहेत; यांपैकीं पहिल्या भागाच्या फारच थोड्या प्रती खपून जनसमूहाकडून प्रोत्साहन न मिळाल्यामुळें यानें दुसरा भाग प्रसिद्ध केला नाहीं. स्प्रेंजेलच्या पूर्वी कीटकांच्या द्वारें परागाधान होते ही गोष्ट उघडकीस आली होती; कोएलरेटरनें फुलांची रचना त्यांसंबंधांत कशी साहाय्यकारी असते याचेंहि थोडें विवरण केलें होतें; परंतु कीटक व फुलें यांचा परस्पर संबंध याविषयी महत्त्वाचा शोध सर्वस्वी स्प्रेंजेलच्या हातून झाला. प्रत्येक फुलाच्या रचनेचें ध्येय परागाधान असतें. हें ध्येय फुलें निरनिराळ्या प्रकारच्या रचनांच्या योगानें साधतात; ज्या फुलामध्यें कीटकांच्या द्वारें परागाधान होतें त्या फुलांतील प्रत्येक भागाची रचना ज्या कीटकांच्या द्वारें परागाधान व्हावयाचें असतें त्या कीटकाच्या परागाधानाचें काम सुकर व लाभदायक करून देणारी असते इत्यादि शोध स्प्रेंजेलच्या हातून झाले. या शोधावरून त्याची चौकस व सूक्ष्म शोधकबुद्धि दिसून येते. कोएलरेटरनें हें दाखविले होते कीं, एका जातीतील दोन उपजातींमध्यें संकर होऊं शकतो. स्प्रेंजेलनें हें दाखविलें कीं, अनेक फुलांची रचना त्याच फुलांतील पराग त्याच फुलांतील स्त्रीकेंसराच्या मुदीवर पडून परागाधान न होतां त्याच उपजातीच्या अन्य व्यक्तीवर फुलांतील स्त्रीकेंसराच्या मुदीवर पडून परागाधान व्हावें अशी असते. यावरून व पुष्कळ वनस्पती दुलिंगी असतात यावरून स्प्रेंजेलनें असें अनुमान बांधिलें कीं, स्वयंपरागाधान होऊं नये अशी निसर्गांतील व्यवस्था दिसते. डार्विननें अशा प्रकारची व्यवस्था हें ठोसर बीजोत्पत्तीचे कारण होय हें जें पुढें दाखविलें ते स्प्रेंजेलला दाखवितां आलें नाहीं यांत कांहीं नवल नाहीं. कारण स्प्रेंजेलची गृहस्थिति आणि त्याला मिळालेलें प्रोत्साहन यांजवरून कोणीहि त्यानें जें कांही केलें त्यापेक्षां अधिक त्याच्या हातून व्हावयास पाहिजे होतें असें म्हणणार नाहीं.

सूक्ष्मदर्शकयंत्रानें सपुष्पवनस्पतींतील गर्भोत्पत्तीसंबंधी क्रियांचें निरीक्षण (१८३०-५०):- क्यामेरारीयस व कोएलरेटर यांचे ग्रंथ वाचलेल्यांचा, हे ग्रंथ प्रसिद्ध झाल्यानंतर सुद्धां वनस्पतींतील लिंगभेदासंबंधानें शंका घेणारे कांही सुप्रसिद्ध विद्वान लोक होते या गोष्टीवर विश्वास बसणें कठिण आहे, परंतु खरोखरीच तसा प्रकार असून लिंगभेदाच्या कल्पनेविरूद्ध त्या अवधीत अनेक जणांनीं लिहिलें. परंतु त्याविषयीं येथें विचार करण्याचें कारण नसून सूक्ष्मदर्शकयंत्राच्या योगानें सपुष्पवनस्पतींतील मैथुनिक पुनरुत्पत्तीच्या क्रियेंतील सूक्ष्म गोष्टी कसकशा माहीत होत गेल्या एवढेंच पहावयाचें आहे. एमिसी हा १८२३ त एकदां घोळूच्या फुलांतील स्त्रीकंसरावरील बारीक तंतू सूक्ष्मदर्शकांतून पहात होता. त्यावेळीं त्याला परागांतून बाहेर येणारी परागनलिका दिसली; व या नलिकेंत त्याला कांही कणहि दिसले. हे कण त्याला पुंरेतासारखे कांही असावेत असें वाटलें. वरील गोष्ट ब्रोंगनिअर्टला माहीत होऊन त्यानें त्याविषयी १८२६ त अधिक शोध केला. त्यांत त्याला परागनालिका पुष्कळदां पहावयास मिळाल्या; परंतु त्यानें तो शोध तेवढाच करून सोडून दिला. परंतु एमिसीनें पुन्हां तो शोध हातीं घेऊन परागनलिका अंडाशयांत शिरते इतकेंच नव्हे तर तिचा शिरकाव अंडजालद्वारांतहि होतो हें पाहिलें. याप्रमाणें सपुष्पवनस्पतींतील गर्भाधानाच्या प्रश्नाचा माग अखेरपर्यंत बरोबर लागला. पण याच सुमारास ब्राऊन आणि श्लीडेन यांच्या शोंधामुळें तो झुकला. ब्राऊननें आर्किड आणि अर्क यांतील परागग्रंथीपासून परागनलिकेची उत्पत्ति पाहिली. तरी त्याला परागनलिका अंडाशयांत उत्पन्न होत असावी असेंच वाटलें. श्लोडनला यासंबंधांत पुढीलप्रमाणें दिसून आलें:- परागनलिका गर्भपेशींत शिरतें तेथें तिचें टोंक फुगतें; फुगलेल्या भागाच्या दोन बाजूंस दोन दलें उत्पन्न होतात व मध्यें गर्भ (अंकूर) उत्पन्न होतो. श्लीडनला सूक्ष्मदर्शकाखालीं याप्रमाणें प्रकार दिसल्यामुळें त्यानें गर्भोत्पत्तीसंबंधानें जें स्वत:चें मत दिलें त्याजवर अर्थातच पूर्वी उल्लेख केलेल्या गर्भोत्पत्तीच्या विकासवादाची छाया पडली. परंतु एिमिसीनें आर्किडचा अभ्यास करून स. १८४६ त हें सिद्ध केलें कीं, परागनलिकेच्या उत्पत्तीसंबंधाचें ब्राऊनचें म्हणणें खोटें आहे; गर्भपेशींत एक अंडपेशी असते; आणि परागनलिकेच्या योगानें या अंडपेशींत चेतना उत्पन्न होऊन तिच्यापासून गर्भ बनतो. १८४७ त व्हॉन मोल आणि हाफमेइस्टर यांनीं या एमिसीच्या म्हणण्याला पुष्टि दिली. टुलस्नेनेंहि श्लीडेनच्या या संबंधांतील मताचा प्रतिकार केला. यानंतर या प्रश्नाचा समाधानकारक निकाल लागावा म्हणून ऍमस्टरडॅम येथील नेदर्लंडच्या 'इन्स्टिटयूट' नें 'एक निबंध मागवून त्याला बक्षीस लाविलें. स. १८५० त तें बक्षीस स्काच याच्या निबंधाला मिळालें. स्काचनें आपल्या निबंधांत श्लीडेनच्या मताचें समर्थन केलें होतें. म्हणजे चूक मताचें समर्थन करणार्‍या निबंधाला बक्षीस मिळालें. याप्रमाणें बक्षिसाच्या निबंधांच्या संबंधांत वनस्पतिशास्त्रांत हीच गोष्ट पुन्हां पुन्हां घडून आलेली आहे कीं, चूकीच्या मतांचें समर्थन करणार्‍या निबंधांनां बक्षिसें मिळालीं आणि त्यांतील शास्त्राची प्रगति व्हावी हा उद्देश सफल झालेला नाहीं. तथापि कांहीं काल लोटल्यानंतर श्लीडेन आणि स्काच यांनां आपलें म्हणणें चूक असून एमिसीचेंच म्हणणें बरोबर असावें असें वाटूं लागलें. वरील प्रश्नासंबंधांत श्लीडेन, स्कॉच इत्यादींचा मतौघ कसाहि वहात गेला असला तरी हाफमेइस्टरची ही पक्की खात्री होऊन चुकली होती की, परागनलिकेतल्या कोणत्यातरी तत्त्वामुळें अंडपेशीत चेतना उत्पन्न होऊन तिजपासून गर्भ बनतो आणि या दृष्टीनें हाफमेइस्टरनें स. १८६० च्या पूर्वीच परागनलिकेंत गूढलग्नवनस्पतींतील शुक्रजंतूसारखे काहीं असतें कीं काय हें पहाण्यास सुरवात केली होती.

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .