प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

वनस्पतिशास्त्र भाग ६

गूढलग्नवनस्पतींतील लिंगभेद:- या पूर्वी वरील विषयाचा बराचसा उल्लेख होऊन गेला असल्यामुळें त्याविषयीं येथें सविस्तर लिहिण्याचें कारण नाही. १८४५ च्या सुमारास या विषयासंबंधांत ज्यांनां ज्यांनां मत देण्याचा अधिकार त्यांच्या अभ्यासामुळें प्राप्त झाला होता त्यांची ही खात्री होऊन गेली होती कीं, सपुष्पवनस्पतीत लिंगभेद असतो. परंतु गूढलग्नवनस्पतींच्या संबंधांत मात्र तशी गोष्ट नव्हती. कारण गूढलग्नवनस्पतींत लिंगभेदाच्या कल्पनेच्या समर्थनार्थ पद्धतशीर शोध आणि प्रयोग होऊन चांगला पुरावा तयार झाला नसल्याकारणानें, लिंगभेद असतो असें म्हणण्यास जशी सवड होती तशीच तो नसतो असेंहि म्हणण्यास होती, तथापि गूढलग्नवनस्पतींतील लिंगभेदासंबंधानें हळू हळू अनेक गोष्टी उघडकीस आल्या होत्या. उदाहरणार्थ शैवाल आणि गोमयज वनस्पतींतील मैथुनासंबंधानें माहिती झाली होती, मॉसमधील स्त्री आणि पुरूष इंद्रियें माहीत झालीं होतीं, त्याचप्रमाणें मॉस, स्फेगमन, कारा, पिलुलारिया व फर्न इत्यादीतील शुक्रजंतूं पाहिले जाऊन, त्यांची प्राण्यांच्या शुक्रजंतूंशीं तुलना करतां येण्याजोगी असल्यामुळें त्यांचें कार्य काय असावें यासंबंधींहि बरोबर तर्क झाला होता. काऊंट लेझी समिंस्केनें १८४८ त फर्नच्या प्रोथालियम्वरचे पुंपिड आणि स्त्रीपिंड पाहिल्यामुळें गूढलग्नवनस्पतींतील लिंगभेदाच्या गूढावर एकदम बराच प्रकाश पडला. परंतु हाफमिस्टरच्या वाहिन्या असणार्‍या गूढलग्नवनस्पतींतील अमूल्य शोधामुळें लिंगभेदाचें अस्तित्व ठाम सिद्ध होऊन त्या भेदाचें स्वरूप स्पष्ट झालें.

वनस्पतींच्या पोषणक्रियेच्या उपपत्तीचा इतिहास (१५८३-१८६०):- अगदीं प्राचीन कालीं सुद्धां वनस्पती आपल्या पोषणाकरितां आसमंतात प्रदेशांतील कांही पदार्थांचे सेवन करतात व हे सेवन केलेले पदार्थ वनस्पतीच्या शरीरांतून फिरतात, याबद्दल कोणालाहि शंका नव्हती; परंतु कोणत्या प्रकारचे पदार्थ वनस्पती अन्न म्हणून सेवन करतात, हे कोणत्या रीतींनें शरीरांत शिरतात, व कोणत्या शक्तीच्या योगानें ते शरीरपोषणार्थ सर्व शरीरभर फिरतात यासंबंधीं कांहींहि माहिती नव्हती; इतकेंच नव्हे तर बाहेरून शरीरांत शिरणार्‍या पदार्थांमध्यें त्यांचा पोषणाच्या कामीं उपयोग होण्यापूर्वी कांही बदल होतो किंवा नाहीं हेंहि बराच काळपर्यंत ठाऊक नव्हतें. अशा प्रकारच्या प्रश्नाकडे आरिस्टाटलचें लक्ष गेलेलें असून सेजाल्पिनोच्या जीवक्रियाविज्ञानाचे विचारविषयहि हेच प्रश्न होते. परंतु वनस्पतीच्या पोषणक्रियेच्या संबंधांतील निरनिराळे प्रश्न सोडविण्यासंबंधी १७ व्या शतकाच्या उत्तारार्धांस खरी आस्था उत्पन्न झाली. छेदशास्त्राचा जनकं माल्फिगी यानें प्रथमत: वनस्पतींच्या निरनिराळ्या इंद्रियांचा पोषणाच्या कामीं कोणकोणता उपयोग होतो याचें विवरण केलें. वनस्पतींचें अन्न हिरव्या पानांत बनतें, असें बनलेलें अन्न वनस्पतींच्या इतर भागांत जातें, तेथें त्या अन्नाचें सांठून रहाणें किंवा वाढीच्या कामीं त्याचा उपयोग होणें या गोष्टी वनस्पतींच्या त्या वेळच्या आवश्यकतेवर अवलंबून असतात या गोष्टीं माल्फिगीनें प्रमाणपद्धतीच्या सहाय्यानें ताडिल्या परंतु यामुळें वनस्पती अन्न बनविण्याच्या कामीं कोणतें पदार्थ उपयोगांत आणितात हें कांहीं स्पष्ट झालें नाहीं (तथापि मॉरिओटनें या प्रश्नाचा सुगावा, त्यावेळीं रसायनशास्त्राची किती थोडी प्रगति झाली होती हें लक्षांत घेतलें असतां तो जितका काढतां येणें शक्य होतें तितका काढला. एमेमारिआटचा जन्म केव्हां झाला तें बरोबर समजत नाहीं. तो बर्गेंडीचा रहिवाशी असून चर्चसंबंधीं एक अधिकारी होता. तो पॅरिसच्या शास्त्रीय विद्यापीठाचा, त्या संस्थेच्या स्थापनेपासून सभासद असून पदार्थविज्ञानांतील प्रयोगांच्या कामीं गणितविषयाचा उपयोग करणारा पहिला फ्रेंच मनुष्य होता.) मॉरिओटनें, जमिनींतून वनस्पतीनां शोषिलेल्या पदार्थांत रासायनिक बदल होतो व सर्व वनस्पतींनां जमिनींतून आणि पाण्यांतून तींच तींच शोषक द्रव्यें मिळतात हें दाखवून दिलें. परंतु यासंबंधांत आरिस्टाटलचे विचार निराळे होते. सतराव्या शतकांतील जीवक्रियाशास्त्रज्ञांच्या हें ध्यानांत आल्यावांचून राहिलें नाहीं कीं, वनस्पती भूमींतून जें पाणी शोषण करून घेतात त्यांतून विरघळलेले पदार्थ वनस्पतींच्या शरीरांत केवळ अत्यल्प प्रमाणांत शिरतात. आणि हीच गोष्ट जे. बी. व्हॉन हेलमंटनें (१५७७-१६४४ बेल्जममधील सुप्रसिद्ध एक रसायनशास्त्रज्ञ) सतराव्या शतकाच्या पूर्वार्धांत प्रयोगानें सिद्ध केली परंतु यामुळें ज्वलनशील आणि अज्वलनशील असे दोन्ही प्रकारचे वनस्पतींच्या शरीराचे घटक वनस्पती पाण्यापासून बनवूं शकतात असा जीवक्रियाशास्त्रज्ञांचा समज म्हणजे गैरसमज झाला. स्टीफन हेलेसनें (१६७७-१७६१, एक मोठा शास्त्रज्ञ, यानें निरनिराळ्या विषयांत शोध केले; हा रॉयल सोसायटीचा मेंबर होता) असें पाहिलें कीं, वनस्पतींनां आंच लाविली असतां त्यांच्या शरीरांतून निरनिराळे वायू बाहेर येतात. यावरून त्यानें अनुमान काढिलें कीं, वनस्पती वातावरणांतील वायूंचें सेवन करीत असावेत.

माल्फिगी, मारिओट आणि हेलेस यांच्या वर सांगितलेल्या कल्पनांमध्यें वनस्पतींच्या पोषणक्रियेच्या उपपत्तीचें बीज होतें. या कल्पनाचा बरोबर अर्थ समजून त्या एकत्र करतां आल्या असत्या तर हें सहज दृष्टोत्पत्तीस आलें असतें कीं, वनस्पतींच्या अन्नाचा कांहीं भाग भूमींतून व कांहीं हवेंतून मिळतो. या दोन भागांपासून पानामध्यें रासायनिक कार्यानें उद्भिज द्रव्यें बनतात आणि हीं उद्भिज द्रव्यें वाढीच्या कामीं उपयोगांत आणिली जातात. परंतु याप्रमाणें या कल्पनांचा मिलाफ झाला नाहीं. कारण वरील तीन गृहस्थांच्या कल्पना जगापुढें आल्यानंतर बरींच वर्षेपर्यंत वनस्पतिशास्त्रज्ञ त्यावेळी वनस्पतींच्या शरीरांत रस कसा संचार करतो यासंबंधीं शोध करण्यांत गुंतले होते हें होय. परंतु माल्फिगीला ठाऊक असलेली पानांची क्रिया लक्षांत न घेतल्यामुळें वनस्पतिशास्त्रज्ञांनां वनस्पतींच्या शरीरांतील रसाच्या हालचालीसंबंधाच्या शोधांतहि फारसें यश मिळालें नाहीं.

वनस्पतींच्या पोषणामध्यें कोणत्या रासायनिक क्रिया घडून येतात, कोणत्या प्रेरणाशक्तीनें रसाची वनस्पतींच्या शरीरांत हालचाल होते, या व दुसर्‍या पोषणासंबंधीं क्रियांतील मर्म समजण्यास केवळ पेशींतच हरितद्रव्य असतें आणि म्हणून उच्चवनस्पतींतील हरितद्रव्ययुक्तपेशी असणार्‍या पानांत, वातावरणांतील वायुरूपी अन्नापासून भूमींतून शोषिलेल्या पदार्थांच्या साहाय्यानें पोषक द्रव्यें बनविण्याची शक्ति असते ही गोष्ट ठाऊक असणें अत्यंत अवश्य आहे. कारण या गोष्टीचें ज्ञान हें पोषणाच्या उपपत्तीचा केवळ पाया आहे. हें ज्ञान असेल तरच पोषक द्रव्यांच्या हालचालीचा वनस्पतींच्या पोषणाशीं आणि वाढीशीं संबंध, वनस्पतींचें सूर्यप्रकाशावलंबित्व आणि कांहीं अंशी मुळांची क्रिया इत्यादि गोष्टी समजणें शक्य आहे. परंतु लव्हाझिए (सुप्रसिद्ध फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ; रसायनशास्त्राचा जनक) कडून जुन्या रसायनशास्त्रांतील ज्वलनतत्त्वाच्या उपपत्तीचें उच्चाटण होऊन रसायनशास्त्राच्या आधुनिक युगास आरंभ होईपर्यंत वर सांगितलेल्या पोषणक्रियाविज्ञानाच्या प्रगतीस अत्यावश्यक असलेल्या गोष्टींचा शोध लांगू शकला नाहीं. आणि ही गोष्ट ध्यानांत ठेवण्याजोगीं आहे कीं, १७६०-८० मधील ज्या शास्त्रीय शोधामुळें आधुनिक रसायनशास्त्राचा पाया घातला गेला, त्याच शोधांचें त्याच वेळीं वनस्पतींच्या पोषणक्रियेचें आधुनिक तत्त्व , स्थापण्याच्या कामींहि साहाय्य झालें. इंजेन हाऊसनें (१७३०-१७९९) लव्हाझिएचीं हवा, पाणी, खनिज अम्लें इत्यादींच्या रासायनिक घटनेविषयीं जीं मतें होतीं तीं ग्राह्म धरून हें सिद्ध केलें कीं, एकपक्षी वनस्पतींच्या सर्व भागांत हवेंतील ऑक्सिजन शोषण करून त्यापासून कॅर्बानिक ऍसिड ग्यास बनवून तो बाहेर टाकण्याचा क्रम सर्व काल चालू असतो तर दुसर्‍या पक्षीं वनस्पतींचीं हिरवी इंद्रियें (मुखत्वेकरून पानें) हवेंतील कॅर्बानिक ऍसिड ग्यास घेऊन, सूर्यप्रकाशाच्या अंमलाखालीं त्यांचे पृथक्करण करून त्यातील कार्बन तेवढा घेऊन ऑक्सिजन बाहेर (वातावरणांत) सोडतात. १७९६ त इंजेन हाऊसला यांसंबंधांत असें वाटूं लागलें कीं, वनस्पतींनां लागणारा सर्वच कार्बन हवेंतून मिळत असावा. निकोलस थीओडर डी सौसर (१७६७-१८४५, जिनोव्हाचा रहिवासी-कॉरेस्पाँडिंग मेंबर ऑंफ दि फ्रेंच इन्स्टिटयूट) यानें १८०४ त वनस्पती, कार्बांनिक ऍसिडग्यासचें पृथक्करण करून जरी पोषणाच्या कामीं केवळ कार्बन घेतात, तरी त्या जितका कार्बन घेतात त्या मानानें त्यांच्या वजनामध्यें अधिक वाढ होते हें सिद्ध केलें व यावरून असें अनुमान काढिलें कीं, पोषणाच्या कामीं कार्बनबरोबरच वनस्पती पाण्यांतील मूलतत्वांचा उपयोग करीत असाव्यात. डी सौसरनें आणखी हेंहि दाखविलें कीं, वनस्पती जे क्षार जमिनींतून अल्प प्रमाणांत घेतात त्यांची त्यांनां अत्यंत आवश्यकता असते आणि वनस्पतींत नत्रयुक्त द्रव्यें बनण्यांत वातावरणांतील नत्राचा मुळींच अंश नसावा. यापूर्वी जीन सेनेबिअरनें (१७४२-१८०९, एक रसायनशास्त्रज्ञ-जिनिव्हाचा रहिवासी) इंद्रियांतच प्रकाशाच्या अंमलाखालीं कार्बानिक ऍसिडग्यासचे पृथ:क्करण होतें या मुद्दयावर भर दिला होता. याप्रमाणें वनस्पतींच्या पोषणक्रियेंतील महत्त्वाच्या गोष्टींचा शोध इंजेन हाउस, सेनेबिअर आणि डी सौसर यांजकडून लागला होता. परंतु अशा प्रकारच्या महत्त्वाच्या शोधासंबंधी घडून येणारा प्रकार या शोधासंबंधांतहि घडून येऊन तीन गृहस्थांच्या पोषणक्रियेंतील कल्पनांविषयी गैरसमज झाला; तथापि या कल्पनांचा इतर देशांपेक्षां फ्रान्समध्यें थोडाअधिक स्वीकार झाला. हेनरी डट्रोवेट (१७७६-१८४७, फ्रेंचं कॉरेस्पान्डिंग मेंबर ऑफ दि फ्रेंच अकॉडमी) आणि डी कॅन्डोल यांनां हिरव्या इंद्रियांतील वायूंच्या विनियमाचें पोषणक्रियेच्या संबंधांतील महत्त्व कबूल झालें; परंतु विशेषतः जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञांनां, अशा साध्या रासायनिक क्रिया वनस्पतींच्या पोषणक्रियेच्या अतएव अखिल वनस्पतिकोटीच्या जीवाच्या आधारभूत असतील अशी कल्पनासुद्धां करवली नाहीं. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी सृष्टितत्त्व ज्ञानाच्यासंबंधात 'जीवशक्ति' नांवाची कल्पना रंगारूपाला येऊन तिला, तत्त्वज्ञानी, जीवक्रियाशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ इत्यादि सर्व प्रकारच्या विद्वानांकडून मान्यता मिळाली होती या कल्पनेच्या प्रमाणानें वनस्पतीचें अन्न, अगम्य असा एक 'ह्मूमस' या नांवांने संबोधिला जाणारा पदार्थ असून या पदार्थाची उत्पत्ति जीवशक्तीमुळें होत असावी असें मानिलें जात असे. वरवर परंतु विकाररहित चित्तानें विचार केला असतां सुद्धां ही ह्मूमसची कल्पना असंबद्ध होती हें दिसून आलें असतें; परंतु तसें कांहीहि न होता, त्याचप्रमाणें सौसरच्या शोधांसहि न जुमानतां पुन्हा एकदां प्राचीन कालाप्रमाणेंच अन्न, भूमि आणि मुळ्या यांचा वनस्पतींच्या पोषणक्रियेच्या संबंधांत मेळ बसविला जाऊं लागला. ह्मूमसची कल्पना आणि जीवशक्ति या दोहोंचा मिळून एक असा परिणाम झाला कीं, वनस्पती जाळल्यानंतर त्यांच्या राखेंत जीं खनिज द्रव्यें सांपडतात तीं वनस्पतींत चुकून शिरलीं किंवा वनस्पतींनां उत्तेजक म्हणून त्यांचा उपयोग होत असला पाहिजे, किंवा ती प्रत्यक्ष 'जीवनशक्ती' च्या योगानें निर्माण झालीं असलीं पाहिजेत इत्यादि गोष्टी गृहीत धरल्या जाऊं लागल्या आहेत.

इ.स. १८२०-४० या अवधींत निरनिराळ्या बांजूनीं 'जीवशक्ती' च्या कल्पनेविरूद्ध बरेंच काहूर उठलें. सेंद्रिय पदार्थांची उत्पत्ति केवळ जीवशक्तीलाच करतां येते असें मानिलें जात असे. परंतु आतां रसायनशास्त्रज्ञांनी सेद्रिय पदार्थ 'जीवशक्ती' च्या साहाय्यावांचून रसायनशालेंत तयार करून दाखविले. ट्रोचेटनें जलाभिस्त्रवणक्रियेचा शोध लावून अनेक जीवनचमत्कार हे केवळ पदार्थांच्या विशिष्ट गुणधर्मावर अवलंबून असतात हें दाखविलें; डी सौसर इत्यादींनीं वनस्पतींतील उष्णता श्वसनक्रियेमुळे उत्पन्न होते हें दाखविलें. या सर्व गोष्टीमुळें १८४०च्या सुमारास 'जीवशक्ती' कल्पनेचें शास्त्रीय जगतांतून समूळ उच्चाटण झालें. तरी 'जीवशक्ती' च्या कल्पनेच्या अंमलामुळें इंजेन हाउस आणि डी सौसर यांच्या शोधासंबंधी जी गैरसमजूत झाली होती ती दूर होऊन त्या शोधांनां वनस्पतिशास्त्रांत त्यांचें योग्य स्थळ मिळण्याचें मात्र उरलें. लायबिगनें १८४० त 'ह्मूमस' ची कल्पना त्याज्य ठरवून वनस्पतींतील कार्बन वातावरणांतून आलेला असतो व त्यांतील नत्रविशेष द्रव्यें अमोनियापासून बनलेलीं असतात असें प्रातिपादन केलें. याशिवाय त्यानें रसायनशास्त्रांतील सामान्य नियमांचा आधार घेऊन वनस्पतींतील पचनामध्यें आणि एकंदरीत चयापचयामध्यें होणार्‍या बदलांतील मर्म अवनयनपद्धतीनें ओळखिण्याचा प्रयत्न केला. लायबिगनें पोषणासंबंधीं निरनिराळ्या चमत्कारांमध्यें याप्रमाणें मेळ घालून दिल्यामुळे इंजेन-हाऊस, सेनेबिअर आणि सौसर यांनीं शोधून काढिलेल्या गोष्टींचा पोषणक्रियेची उपपत्ति लावण्याच्या कामीं कसा महत्त्वाचा उपयोग करून घेतां येईल हें स्पष्ट दिसूं लागलें. यामुळें पोषणाच्या सिद्धांतामध्यें नवजीवनाचा संचार झाला. वनस्पतीशास्त्रज्ञानां, जीवशक्तीच्या कल्पनेमुळें पोषणक्रियेची उपपत्ति लावण्याच्या संबंधांत ज्या निरनिराळ्या अडचणी उत्पन्न होत त्यांजकडे आतां लक्ष देण्याचें कारण न उरून केवळ शोध करून आपले सिद्धांत रसायनशास्त्र व पदार्थविज्ञान यांच्या आधारावर बसविण्याचा मार्ग मोकळा झाला. लायबिगचें मत वनस्पति ऑक्सिजन बाहेर टाकीत नाहींत असें होतें; परंतु मोल इत्यादींनीं वनस्पती ऑक्सिजन बाहेर टाकतात हें सप्रयोगच सिद्ध केलें. वनस्पतींत नत्र कसा येतो, त्यांच्या राखेंत सांपडणार्‍या खनिज द्रव्यांचा उपयोग त्यांनां काय असतो इत्यादि गोष्टींची उपपत्ति लायबिगनें तर्कानें लाविली होती; परंतु ही उपपत्ति बरोबर होती हें सप्रयोग शोध करून ठरविल्याचें श्रेय बौसिनगॉल्टला दिलें पाहिजे. लायबिगची शोध करण्याची पद्धति अवनयनाची होती तर बौसिनगॉल्टची उन्नयनाची होती. यामुळें बौसिनगॉल्टनें प्रयोगपद्धतींत हळू हळू सुधारण करून मातीपासून अगदीं अलिप्त अशा केवळ निर्भेळ खनिज द्रव्यांनीं बनलेल्या वनस्पती वाढविण्यांत यश मिळविलें. या प्रयोगामुळें वनस्पतींत कार्बन आणि नत्र कोठून येतात या प्रश्नाचा निर्विवाद निकाल लागला.

वनस्पतींच्या रक्षेंतील सोडियम, क्लोरीन इत्यादि मूलतत्त्वांची वनस्पतींनां कां आवश्यकता असते वगैरेंसारख्या गोष्टी वगळल्या असतां स. १८६० पूर्वी वनस्पतींच्या शरीरांतील रसायनक्रियांत भाग घेणारीं बहुतेक द्रव्यें वनस्पतींत कशीं येतात यांजविषयी माहिती होती. परंतु वनस्पतींच्या शरीरांतील चयापचयांत कोणत्या रासायनिक क्रिया कसकशा होऊन सेंद्रिय पदार्थ उत्पन्न होतात यांजविषयीं मात्र केवळ अल्प व अपुरी माहिती होती.

प्राचीन हिंदूंचें वनस्पतिशास्त्रविषयकज्ञान:- जर्मनीतील व नेदर्लडांतील ओटो ब्रुनफेल, फुश, कॅस्पर, बौहिन इत्यादिंच्या वनस्पतींवर वर्णनपर ग्रंथ तयार करण्याच्या परिश्रमांत वनस्पतीशास्त्राचा जन्म सोळाव्या शतकांत झाला हें पूर्वी सांगितलेंच आहे. त्यापूर्वी वनस्पतींच्या शास्त्राचें कोठेंहि अस्तित्व नसून वनस्पतीविषयीं जें कांही ज्ञान होतें त्या ज्ञानाला फार तर वनस्पतिशास्त्रविषयक ज्ञान असें म्हणतां येईल आणि हीच गोष्ट हिंदुस्थानालाहि लागू आहे.

हिंदूच्या वनस्पतिशास्त्रविषयक ज्ञानासंबंधी जें पुढें लिहिलें आहे त्यांत ऐतिहासिक दृष्टी ठेविली नाहीं याचीं दोन कारणें आहेत; तीं अशी की हिंदुसंस्कृति अत्यंत प्राचीन असल्यामुळें निश्चयात्मक इतकेंच नव्हे तर अनुमानात्मक सुद्धां कालनिर्णय करणें ही महा कठिण गोष्ट आहे व वनस्पतिविषयक ज्ञानोपलब्धीचा काळ मोठा म्हणजे कित्येक हजार वर्षांनीं मोजतां येण्याजोगा असून या कालांत त्या ज्ञानाची संतत, पद्धतशीर व प्रगतिकारक वाढ झालेली नसून त्या ज्ञानांत कार्ययोगानें मात्र अहेतुक व अक्रमवार भर पडलेली आहे. या विधानाची सत्यता, महाभारतादि प्राचीन काव्य व इतर ग्रंथ, त्याचप्रमाणें चरकसंहिता व सुश्रुतसंहिता हे दोन महर्षीप्रणीत अत्यंत प्राचीन आयुर्वेदविषयक ग्रंथ यांतील वनस्पतीविषयींच्या कल्पना याहून अधिक आधुनिक वनौषधिचिकित्सक, कृषिकर्मविषयक व अन्यविषयक ग्रंथ यांतील वनस्पतीविषयींच्या कल्पनांहून भिन्न नाहींत या गोष्टीवरून पटण्याजोगी आहे.

फार प्राचीन कालापासून हिंदु लोक वनस्पतिचिकित्सा व कृषिकर्म यांत पारंगत असल्यामुळें आयुर्वेविषयक व कृषिकर्मविषयक प्राचीन ग्रंथांतून व लेखांतून वनस्पतींचा प्रामुख्येकरून उल्लेख असून असे ग्रंथ व लेख हीं हिंदूच्या वनस्पतिशास्त्रविषयक ज्ञानाचीं मुख्येत्वेकरून निदर्शक स्थलें आहेत यांत शंका नाहींच परंतु याशिवाय आणखी दोन स्थलीं हिंदूंच्या वनस्पतिशास्त्रविषयक ज्ञानासंबंधांत शोध करणें लाभदायक आहे. हीं दोन स्थलें म्हणजे भारतभागवतासारखी रमणीय ऐतिहासिक कथाप्रच्छन्न ज्ञानभांडारें व दुसरे सर्व संस्कृत ग्रंथ मग ते काव्य असोत, गद्य असोत किंवा शास्त्र असोत हीं होत. महाभारतांत व श्रीमद्भागवतांत प्रसंगानुसार थोडी स्वतंत्र वनस्पतिविषयक माहिती सांगितलेली आहे; परंतु या दोन ग्रंथांत त्याचप्रमाणें इतर सर्व तर्‍हेच्या संस्कृत ग्रंथांतून विषय अधिक विशद किंवा रम्य करण्याकरितां स्थलोस्थलीं दृष्टांतांचा व उपमांचा उपयोग केलेला असून यांपैकी पुष्कळ दृष्टांत व उपमा वनस्पतिकोटीसंबंधी आहेत; आणि असे वनस्पतिकोटीविषयक दृष्टांत आणि उपमा यांवरून हिंदूंच्या वनस्पतिशास्त्राविषयक कल्पना काय होत्या त्याविषयीं पुष्कळच बोध होतो; इतकेंच नव्हे तर त्यांपासून आमच्या प्राचीनांची निसर्गावलोकनशक्ति किती तीक्ष्ण आणि सूक्ष्म होती याचेंहि दिग्दर्शन होतें.

आतां वर सांगितलेल्या चार स्थळीं शोध करून मिळविलेल्या वनस्पतिविषयक माहितीवरून आमच्या प्राचीनांचें वनस्पतिशास्त्रविषयक ज्ञान काय होतें हें वनस्पतिशास्त्राच्या वर्गीकरण, शारीरविज्ञान आणि जीवक्रियाविज्ञान या मुख्य उपांगांच्या अनुरोधानें पाहूं. परंतु असें करण्यास सुरवात करण्यापूर्वी हें सांगितलें पाहिजे कीं, आमच्या प्राचीनांपैकीं ज्ञाते जन वनस्पतींनां सजीव सृष्टीचा एक अचर किंवा स्थावर प्रकार समजून उच्चनीच या दृष्टीनें केलेल्या सृष्ट पदार्थांच्या वर्गवारींत प्राण्यांपेक्षा नीच मानीत. त्याचप्रमाणें सजीव सृष्टींतील जातीच्या आयुर्मर्यादांविषयीं जी कांहीं माहिती आमच्या पूर्वजांनीं लिहून ठेविलेली आहे तींत वृक्षांची (म्हणजे वृक्ष जातींच्या वनस्पतींची) आयुर्मर्यादा एक हजार वर्षे सांगितलेली आहे.

वर्गीकरण:- कदली, वनकदली म्हणजे केळी, रानकेळी; श्वेतोत्पल, रक्तोत्पल म्हणजे पांढरें कमळ, तांबडे कमळ; किंवा त्याचप्रमाणें वाळूक, कांटेवाळूक; भोपळा, दूध भोपळा इत्यादि संस्कृत, संस्कृवरून प्राकृतांत आलेले किंवा प्राकृतवरून संस्कृतांत गेलेले शब्दप्रयोग यांवरून असें दिसून येतें कीं, आमच्या प्राचीन वनस्पतिनिरीक्षकांनां जरी जाती म्हणजे काय व उपजाती म्हणजे काय याची बरोबर कल्पना नव्हती तरी त्यांच्या हातून कांहीं जाती व उपजातींची स्थापना होऊन वनस्पतिशास्त्राच्या वर्गीकरणांतील लिनिअसनें प्रचारांत आणिलेल्या द्विनामपद्धतीचा क्वचितउपयोग होत होता. त्याचप्रमाणें तृण हा शब्द सर्व प्रकारच्या गवतांचा निदर्शक आहे यावरून व वैदलवनस्पती या शब्दप्रयोगाखालीं ज्या वनस्पतींच्या बीजांनां दोन दलें असून तीं सहज वेगवेगळी होतात अशा सर्व वनस्पतीचा समावेश होतो. यावरून असेंहि दिसून येतें कीं, जाती व उपजातीवरीलहि कांही विभाग ओळखिले गेले होते. हेंच विधान तृणद्रुम, तृणध्वज, तृणवृक्ष, खदिरपत्रिका (किंवा खदिरपत्री), पिंडफल इत्यादि सामासिक शब्दप्रयोगावरूनहि चांगल्या प्रकारें सिद्ध होतें. वर दिलेल्या (खदिरपत्रिका आणि पिंडफल वगळून) सामासिक शब्दप्रयोगांचें नारळीचें झाड, ताडाचे झाड, बांबू, सुपारींचें झाड इत्यादि निरनिराळे अर्थ असून त्या सर्व शब्दप्रयोगांनां तृण हा शब्द समान आहे. यावरून असें अनुमान काढण्यास प्रत्यवाय नाहीं कीं, हे शब्द बनविणारांनां (विशेषतः) तृण आणि बांबू व (सामान्यतः) तृण आणि नारळी, तृण आणि पोफळी, तृण आणि ताड यांजमधील नैसर्गिक साम्य दिसून आल्यामुळेंच त्यांजकडून तसे शब्द बनविले गेले असले पाहिजेत. आतां खदिर म्हणजे खैर व खदिरपत्रिका किंवा पत्री म्हणजे लाजाळू हीं नांवें मात्र त्या दोन वनस्पतींतील नैसर्गिक साम्यामुळेंच पडलीं असलीं पाहिजेत याजविषयी अनुमान सुद्धां काढण्यांचें कारण नसून तीं नांवें त्यांजमधील नैसर्गिक साम्यामुळेंच पडलीं असलीं पाहिजेत ही गोष्ट खरी मानावी लागते; कारण लाजाळूंचीं पानें थेट खदिराच्या पानाप्रमाणें असतात. यानंतर पिंडफल या सामासिक शब्दप्रयोगाविषयीं पाहिलें असतां असें दिसून येतें कीं, आमच्या प्राचीनांनीं वनस्पतींचा, आधुनिक नैसर्गिक वर्गीकरणांत ज्या विभागाला तालविभाग म्हणतात तो इतर वनस्पतीपासून भिन्न बनविला होता; कारण प्राचीन ग्रंथांतून पिंडफल जातीच्या वृक्षांचीं, मोठी व लांब देठाचीं पानें असणें, शाखा मुळीच नसणें व फळांचे घोसच्या घोस येणें इत्यादि लक्षणें सांगितलेली असून या जातींतील वनस्पतींचीं उदाहरणें म्हणून ताड, नारळी, पोफळी इत्यादि झाडें दर्शविलेलीं आढळून येतात. वर विवरण केल्याप्रमाणें आमच्या प्राचीनांच्या वनस्पतीविषयक ज्ञानामध्यें जरी वनस्पतींच्या नैसर्गिक वर्गीकरणाचा अंकुर आढळून येतो तरी प्रतिकूल परिस्थती मूळें तो अंकूर न वाढतां तसाच राहिला.

वनस्पतींच्या नैसर्गिक वर्गीकरणासंबंधानें जरी याप्रमाणें स्थिति असली तरी श्रीमद्भागवताच्या दहाव्या अध्यायांत कालाची उत्पत्ति आणि वनस्पतींचें एक स्थूल वर्गीकरण पुढीलप्रमाणें आहे; हेंच वर्गीकरण महाभारतांतहि आहे:- ''आतां विकृतीपासून जी तीन प्रकारची सृष्टि उत्पन्न झाली, ते सहा प्रकार असे: (१) ज्यांनां पुष्पावांचून फळें येतात, त्या उंबर, वड पिंपळ वगैरे वनस्पती, (२) एकवार फळें येऊन तीं पिकलीं कीं ज्यांचा नाश होतो त्या केळीं, धान्यें वगैरे औषधी. (३) ज्यांनां वृक्षाचा किंवा इतर कशाचा तरी आधार लागतो त्या पान, लता, वेली वगैरे. (४) त्वक्सार म्हणजे ज्यांची साल कठिण असते व त्या सालीचाच विशेषें करून उपयोग होतो त्या वेळू वगैरे. (५) विरूत म्हणजे वेलींच्याच जाती; ज्यांनां आधाराची गरज लागत नाहीं त्या वेत वगैरे. (६) द्रुम म्हणजे ज्यांनां पहिल्यानें फुलें येऊन फळें येतात ते आम्रवृक्ष वगैरे. या सहाहि प्रकारांच्या सृष्टीच्या गती आणि आहार उर्ध्व असतात. त्यांच्यांतील चैतन्यशक्ति स्पष्ट नसते. या सर्वांनां अंतर्यामी स्पर्शज्ञान असतें व प्रत्येकाचे कांही तरी विशेष धर्म असतात. या वर्गीकरणांत अपुष्प वनस्पतींचा एक प्रकार सांगितलेला असून उंबर, वड, पिंपळ वगैरे वनस्पती हे त्या प्रकारांतील उदाहरणें म्हणून सांगितलेले आहेत परंतु खरोखर पाहिलें असतां या वृक्षांनां फुलें येतात ही या वर्गीकरणांतील चूक लक्षांत घेतली नाहीं तरी सुद्धां त्यांत नैसर्गिक वर्गीकरणाचा मुळीच लेश नसून ते अत्यंत कृत्रिम व वरवर आहे हें उघड आहे. तथापि त्यांतील दुसर्‍या प्रकारांत हल्ली ज्यांनां एकवर्षायु वनस्पती म्हणतात त्यांचा समावेश, पुरा अर्थ समजून केला आहे ही ध्यानांत ठेवण्याजोगी गोष्ट आहे.

आमच्या प्राचीनांचें नैसर्गिक आणि त्याचप्रमाणें कृत्रिम वर्गीकरणविषयक ज्ञान हल्लींच्या तत्संबंधीं ज्ञानाशीं तुलना केली असतां जरी वर दिग्दर्शन केल्याप्रमाणें निकृष्टावस्थेंत असल्याचें दिसून येतें तरी त्यांजकडून अनेक वनस्पतिकोश रचिले गेले ही गोष्ट लहानसान नसून त्यांस अत्यंत भूषणावह आहे. या वनस्पतिकोशांनां 'निघंट' असें सामान्य नांव असून सर्व निघंटांत पंडित नरहरिकृत 'राजनिघंट' या नांवाचा वनस्पतिकोश बराचसा अर्वाचीन असला तरी फार प्रसिद्ध व उपयुक्त आहे. सर्व निघंट किंवा वनस्पतिकोश वनस्पतिचिकित्सकांच्या (वैद्यांच्या) उपयोगाकरितांच रचिले असल्यामुळें त्यांतील वनस्पतींची वर्गवारी वनस्पतींच्या औषधि गुणधर्माप्रमाणें केलेली आहे. प्राचीन काळीं निघंट किंवा वनस्पतिकोश निर्माण होण्याचें कारण आमच्या प्राचीनांची वनस्पतिचिकित्सेविषयींची आस्था आणि त्यांतील पारंगतात हें होय. परंतु याच कारणामुळें आमच्या प्राचीनांचें लक्ष केवळ वनस्पतींच्या औषधि गुणधर्माकडेच जाऊन त्यांच्या हातून वनस्पतींच्या शरीररचनेकडे पूर्ण दुर्लक्ष्य झालें व त्याचा परिणाम प्राचीन वनस्पतिविषयक ज्ञानांतील नैसर्गिक वर्गीकरणचा अंकुर न वाढता अंकुरावस्थेतच राहण्यांत झाला असावा असें वाटतें.

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .