प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

वनस्पतिशास्त्र भाग ८

वनस्पतींचे मुख्य वर्ग

मूळ.- वनस्पतिशास्त्राचे जे अनेक भाग आहेत त्यांत वनस्पतींच्या स्वरूपवर्णनाचा एक भाग अंतर्भूत केला जातो. ह्या ठिकाणीं वनस्पति या शब्दाचा उपयोग वनस्पतिकोटींत येणार्‍या सर्व लहानमोठया, सूक्ष्म अतिसूक्ष्म, सजीव व सेंद्रिय वस्तूंस उद्देशून केला आहे. अर्थात या बाह्यरूपवर्णनाच्या भागांत या सर्व वनस्पतींच्या अंगोपांगांचें वर्णन त्रोटक संकलित करणें अवश्य आहे.

बाह्य रूपवर्णनाच्या भागांत वनस्पतींच्या अवयवांचें ते पूर्ण वाढले म्हणजे जसे दिसतात तदनुरूप वर्णन दिल्यानें तो भाग पूर्ण होत नाहीं. तर ह्या अवयवांचा विकास त्यांच्या मूळ उत्पत्तीपासून पूर्ण वाढीपर्यंत कसकशा होत जातो यासंबंधीं वर्णनहि या विषयांत अंतर्भूत होतें व तसेंच वनस्पतींचे निरनिराळे भाग मूळ कांहीं विवक्षित अवयवांत बाह्य रूप व अंतर्रचनेंत थोडाफार बदल होऊन कसे बनतात आणि परस्परभिन्न अशा रूपरचनेचे भाग उत्पत्तीविषयीच्या ऐक्यामुळें एकाच अवयवकोटींत कसे अंतर्भूत होऊं शकतात यासंबंधाचाहि विचार या बाह्य रूपवर्णनाच्या भागांत करणें जरूर असतें. म्हणून स्वाभाविक रीतीनें या विषयाचे तीन भाग करतां येतात :- (१) वनस्पतींच्या निरनिराळ्या भागांचे अवयव या दृष्टीनें त्यांच्या कार्याचा विचार न करतां केवळ शुद्धस्वरूपाचें बाह्य रूपवर्णन. (२) प्रत्येक अवयवाचा अर्थांत प्रत्येक भागाचा त्याच्या मूळ उत्पत्तीपासून पूर्ण वाढीपर्यंतचा वृतांत. व (३) कांहीं मुख्य भागांत कमजास्त रूपान्तर होऊनच वनस्पतींचे निरनिराळे अवयव अथवा भाग बनले जातात याविषयीं तुलनात्मक चर्चा व तत्सबंधीं (उपपत्तीविषयीं) उहापोह वरील तिन्ही भागांचा सर्वस्वीं स्वतंत्र रीतीनें विचार करणें बरेंच असंभाव्य होऊन जातें. म्हणून वरील तिन्ही दृष्टींनीं विचार करून प्रत्येक भागाचें वर्णन करणें जरूर असतें व तीच पद्धति अंगीकारून वनस्पतींच्या भागांचें बाह्य रूपवर्णन केलें आहे. प्रत्येक अवयवाच्या स्थूलरूपाचे माहिती देतांना त्याबरोबर त्याच्या अविकासित अवस्थेपासून पूर्ण विकसनापर्यंतच्या उत्क्रांतीचेंहि वर्णन शक्य त्या रीतीनें त्याच ठिकाणीं दिलें जाईल व तसेच इतर भागांच्या रूपभेदाशीं तुलना करून त्या भागाची रूपान्तर होण्यापूर्वीची स्थिति लक्षांत घेतां तो कोणच्या मूळ कोटींत खर्‍या रीतीनें जातो हेंहि शक्य त्या ठिकाणीं दाखविलें जाईल. म्हणून वाचकांनींहि हीच दृष्टी ठेवली तर या विषयाची खालीं दिलेली माहिती त्यांस समजणें मुळींच कठिण जाणार नाहीं.

उत्क्रांतीच्या क्रमानुरूप वनस्पतींच्या बाह्य रूपवर्णनास नीचेकोटींतील वनस्पतीपासून आरंभ करून उच्चकोटींतील वनस्पतींच्या भागाचें वर्णन सरतेशेवटी दिलें पाहिजे. परंतु वनस्पतींच्या उत्क्रांतीबरोबर त्यांच्या भागांची विविधता व स्पष्टता वाढत जात असल्यामुळें नीचकोटींतील सूक्ष्म व अति सूक्ष्म वनस्पतींच्या भागांचें बाह्य रूपवर्णन प्रथम न देतां ज्यांचे निरनिराळे भाग विशेष प्रयास न करतां सहज स्पष्ट रीतीनें दृष्टीस पडतात अशा उच्चकोटींतील वनस्पतींचें वर्णन प्रथम करून नंतर उत्क्रांतिसोपानाच्या खालच्या पायरीवर असलेल्या नीचकोटींतील वनस्पतींच्या भागांचें बाह्य रूपवर्णन व तुलना केली असतां विषय सहज सुलभरीतीनें समजू शकतो. म्हणून तीच पद्धति स्वीकारली आहे.

वनस्पतींचे मुख्य दोन वर्ग केले जातात-: (१) सपुष्पवर्ग- ह्मांतील सर्व वनस्पतीपासून त्यांच्या आयुष्यांत केव्हांना केव्हां तरी फुलें उत्पन्न होऊन फळें व बीं तयार होतें (२)अपुष्पवर्ग- ह्या वर्गांतील वनस्पतींपासून फुलें, फळें आणि बीं कधींहि उत्पन्न होत नाहींत. वनस्पतींमध्यें उत्क्रांतीच्या शिखरास ज्या वनस्पती पाहोंचल्या आहेत त्या सर्व सपुष्पवर्गांत मोडतात आणि म्हणूनच त्या वर्गांतील वनस्पतींच्या अवयवांची संकीर्णता त्यांच्या वसतिस्थानानुरूप व विविध कार्यानुरूप इतर सर्व वनस्पतींपेक्षां जास्त झालेली आढळते. ह्या वर्गांतील भूमिस्थ वनस्पतींमध्यें बहुतकरून त्यांच्या प्रत्येक कार्याकरितां स्वतंत्र अवयवाची योजना केलेली आढळते. व अशा प्रत्येक अवयवाचें बाह्य रूप जें कार्य त्यास करावयाचें असतें. ज्या परिस्थितींत त्याची वाढ व विस्तार होत असतो, व ज्या जातीच्या वनस्पतीपासून तो उत्पन्न झालेला असतो त्या जातीची आनुवंशिक बाह्य रूपाचीं चिन्हें इत्यादि गुणधर्माप्रमाणें निराळीं बनलेलीं आढळतात. परंतु अपुष्पवर्गांतील सर्व वनस्पतींमध्यें अशा प्रकारची स्थिति आढळत नाहीं. कांहींमध्यें अवयवांची संकीर्णता झालेली आढळते परंतु ह्या वर्गांतील दुसर्‍या कांहीं वनस्पतींमध्यें अशा प्रकारच्या संकीर्णतेचा पूर्ण अभाव असतो. त्यांची शरीररचना अगदीं साधी असते.

अपुष्पवर्गांत तीन उपवर्ग अंतर्भूत होतात; पैकीं पहिल्या म्हणजे उत्क्रांतीच्या दृष्टीने सर्वांहून कनिष्ट दर्जाच्या उपवर्गांत ज्यांची शरीररचना स्पष्टावयवयुक्त अशी दृष्टीगोचर होत नाहीं-ज्यांचें शरीर बहुतकरून एकसारख्या पेशींनी बनलेल्या तंतूचें अथवा केवळ एक पेशियुक्त असतें व ज्यांच्या जीवनक्रमाचा व्यापार अव्याहतरीतीने जन्मापासून मृत्यूपर्यंत चालू ठेवण्याकरितां निरनिराळ्या स्वतंत्र अवयवांची योजना केलेली सामान्यत: आढळत नाहीं- अशा वनस्पती समाविष्ट होतात. ह्या उपवर्गास अंगविहीन अथवा इन्द्रियहीन वर्ग म्हणतात. ह्या उपवर्गांत समाविष्ट होणार्‍या कांहीं वनस्पती हिरव्या, पिंवळ्या किंवा लाल रंगाच्या असून त्या वाहत्या अथवा संथ पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत असलेल्या अथवा पाण्यांत पृष्ठभागाखालीं आढळतात. तसेंच ओलसर जमिनीच्या दगडाच्या किंवा लांकडाच्या पृष्ठभागावरहि त्यांपैकीं कांहीं वाढतात. ह्मांस पाणवनस्पती म्हणतात.

अंगविहीन (इन्द्रियहीन) वनस्पतींमध्यें ज्या वनस्पती मोडतात त्यांपैकीं दुसर्‍या कांहीं सर्वथा रंगहीन म्हणजे फिक्कया रंगाच्या असतात. ह्मांचा आकार सामान्यतः अतिसूक्ष्म असून त्या जिवंत वनस्पती अथवा प्राण्यांच्या शरीरांत अथवा शरीरावर वाढतात किंवा सडत असलेल्या प्राणिजन्य अथवा वनस्पतिजन्य पदार्थांवर उगवतात. ह्या वनस्पतींस किण्व-वनस्पती म्हणतात.

पाण व किण्व वनस्पतींमध्यें सामान्यत: श्रमविभागाच्या तत्त्वानुरूप स्वतंत्र इन्द्रियोत्पत्ति झालेली आढळत नाहीं. ह्या वनस्पतींचीं शरीरें विशिष्ट आकाराच्या एक एक पेशीचीं बनलेलीं असतात अथवा तीं सरळ किंवा शाखामय तंतूंची झालेलीं आढळतात. शरीर एकसारख्या पेशींचें झालेलें असल्यामुळें त्यामध्यें निरनिराळे विभाग सामान्यतः दृष्टिगोचर होत नाहींत. म्हणून बाह्य रूपवर्णनासंबंधानें या इंद्रियहीन (अंगविहीन) वनस्पतींचा विचार प्रथम करणें अवश्य नाही.

अपुष्पवर्गांतील दुसर्‍या उपवर्गास शैवलवर्ग म्हणतात. ह्मांतील वनस्पती दलदलीच्या जागीं, ओलसर दगड अथवा जमिनीचे पृष्ठभाग किंवा अरण्यामध्यें जुनाट वृक्षांच्या छायेखालीं उगवतात. तसेंच ह्या उपवर्गापैकी कांही थोड्या जातींच्या वनस्पती पाणवनस्पतींप्रमाणें पाण्यांतहि उगवलेल्या आढळतात.

ह्या उपवर्गांतील वनस्पतीमध्यें शरीररचना पाण आणि किण्व-वनस्पतींपेक्षां थोडी जास्त संकीर्णतेची असलेली आढळते. यांपैकीं कांहीं वनस्पतींमध्यें निदान कांहीं अवस्थांमध्यें उच्च वनस्पतीप्रमाणें कांहीं शरीरांचे भाग जमिनींत घुसलेले व कांही जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा हवेंत वाढत असलेले दृष्टीस पडतात. ह्या भागांच्या रंगांतहि उच्च वनस्पतींप्रमाणें फरक झालेला आढळतो. जमिनींत घुसलेले भाग वर्णहीन फिक्क्या रंगाचे असतात व जमिनीवर येऊन सूर्यप्रकाशांत वाढणार्‍या भागांमध्यें हिरवा रंग स्पष्टतेनें उत्पन्न झालेला आढळतो. अशा रीतीनें उच्चवर्गांतील वनस्पतीशीं या उपवर्गांतील कांहीं वनस्पतीचें कांहीं बाबतींत जरी साम्य दिसतें तरी त्यांच्या अवयवांची वाढ, विस्तार व विविधता उच्च वनस्पतीप्रमाणें झालेली कधींहि आढळत नाहीं. ते भाग नेहमीं काष्टरहीत असल्यामुळें मृदु पेशिमय असतात व तसेंच त्यांची उत्पत्तीहि उच्चवर्णांतील तत्सदृश भागापेक्षां निराळ्या रीतीनें होते. ह्मांसंबधानें तुलनात्मक चर्चा प्रथम उच्चवर्गांतील वनस्पतींच्या भागाचें वर्णन विस्तारपूर्वक केल्यावर केली असतां समजण्यास जास्त सुलभ जाणार असल्यामुळें ती पुढें करूं

अपुष्पवर्गांतील तिसर्‍या उपवर्गास हंसराजवर्ग म्हणतात. ह्या उपवर्गांतील बर्‍याच वनस्पतींची बाह्य शरीररचना जननक्रियेस उपयोगी पडणार्‍या अवयवाखेरीजकरून सपुष्पवर्गांतील वनस्पतीप्रमाणें असलेली आढळते. निदान त्यांचे कांहीं भाग जमिनींत वाढत असलेले व कांहीं जमिनीबाहेर हवेंत वाढणारे असे स्पष्ट रीतीनें दृष्टीस पडतात. तसेंच सपुष्पवनस्पतीप्रमाणें त्यांच्या अवयवांत काष्टमय कठिण भागहि बराच वाढलेला असतो. परंतु अशा रीतीने सपुष्पवर्गांतील वनस्पतींशीं बर्‍याच बाबतींत साम्य असलें तरी पुष्पमय भाग उपवर्गापैकीं कोणत्याहि वनस्पतींमध्ये आढळत नसल्यामुळें सपुष्पवर्गापेक्षां उत्क्रान्तीच्या दृष्टीने ह्या उपवर्गास कनिष्ट समजणें भाग पडतें. कारण जे भाग प्रथम केवळ शरीरपोषणाच्या कार्यास लागणार्‍या अन्नाची तरतूद करण्यांत गुंतलेले असतात तेच पुढें पुनर्जननक्रियेसहि आपलें मूळ काम संभाळून मदत करतात. अशा रीतीनें क्रियावैशिष्टयानुरूप पुनर्जननाच्या बाबतींत निदान तरी अगदीं सर्वस्वीं स्वतंत्र अवयवांची योजना या वर्गांत आढळून येत नसल्यामुळें सपुष्पवर्गापेक्षां ह्या उपवर्गाचा दर्जा कनिष्ट ठरतो. म्हणून ह्या उपवर्गांतील वनस्पतींचेहि बाह्य रूपवर्णन प्रथम करणें सुलभतेच्या दृष्टीने योग्य होणार नाहीं. म्हणून आतां सपुष्पवर्गांतील वनस्पतींच्या बाह्य रूपवर्णनास आरंभ करूं.

सपुष्पवर्गांतील वनस्पतीचें दोन उपवर्ग केले जातात :- (१) अयोनिज अथवा नग्नबीज व (२) योनिज (अनग्नबीज); पैकीं अनग्नबीज उपवर्गांतील वनस्पतींपासून संकीर्ण रचना असलेलीं फुलें उत्पन्न होतात व नग्नबीज उपवर्गांतील वनस्पतींची फुले अशा रीतींनें संकीर्ण रचनेची व भपकेदार नसून साध्या रचनेची असतात व ती चटकदार रंगाचीहि नसतात. नग्नबीज (अयोनिज) वर्गांत देवदारू, सुरू, मोरपंखी इत्यादि वनस्पती अंतर्भूत होतात व अनग्नबीज (योनिज) वनस्पतीमध्यें अंबा, वड, पिंपळ, बाभूळ वगैरे वृक्ष, तूर, कापूस, करबंद, गुलाब वगैरेंसारखीं झुडपें, मुळा, गाजर, चाकवत, धोळ इत्यादि मृदु व लवचिक वनस्पती व तसेंच घेवडा, दाक्ष, काकडी, कारलें वगैरेंसारखे वेल समाविष्ट होतात. किंबहुना साधारणतः सामान्य जनतेस माहीत असलेल्या व नित्य दृष्टीस पडणार्‍या फुले व फळें देणार्‍या सर्व वनस्पती अनग्नबीज (योनिज) उपवर्गांत मोडतात. अशा रीतीनें ह्या उपवर्गांतील वनस्पतींचा परिचय प्रत्येक व्यक्तीस थोडाफार असल्यामुळें त्यांचेंच बाह्य रूपवर्णन प्रथम करून तुलनात्मक दृष्टीने दुसर्‍या वर्गांतील वनस्पतींचा विचार व तत्संबंधी थोडीबहून चर्चा योग्य स्थळीं करूं.

योनिज (अनग्नबीज) वनस्पती :- ह्या उपवर्गांतील कोणतीहि एखादी वनस्पति (जवस, मुळा, तिळवण किंवा गुलाब) जमिनींतून मुळासकट खणून काढून पाहिली असतां असें दिसतें कीं तिच्या शरीराचे दोन स्पष्ट भाग निरनिराळ्या परिस्थितींत वाढत असल्यामुळें अगदीं भिन्न स्वरूपाचे दृष्टीस पडतात. (१) जमिनींत वाढणारा व सूर्यप्रकाश पसंत न करणारा फिक्या किंवा पांढर्‍या रंगाचा भाग व (२) जमिनीबाहेर खुल्या हवेमध्यें वाढणारा हिरव्या किंवा इतर मनोहर रंगाचे भाग धारण करणारा व सूर्यप्रकाश पसंत करणारा दुसरा भाग. जमिनींत वाढणारा फिक्या रंगाचा भाग बहुतकरून वनस्पतीच्या मुळांचा असतो. बहुतकरून म्हणण्याचें कारण असें कीं बटाटे, केळी, कांदे, सुरण, अळू, आलें, हळद, भुईमूग इत्यादि वनस्पतींप्रमाणें कांहीं वनस्पतींचे जमिनींत वाढणारे भाग केवळ मुळांचेच बनलेले नसतात. मुळांच्या बरोबर ह्या वनस्पतींचे दुसरे इतर भागहि जमिनींत वाढतात. परंतु अशा प्रकारची अपवादात्मक उदाहरणें सोडून दिलीं असतां वर दिलेल्या नियमाप्रमाणें सामान्यतः हा भूमिगत भाग मुख्य मूळ व त्याच्या शाखा किंवा वरील बुंध्यापासून उत्पन्न झालेलीं मुळें ह्मांचाच झालेला असतो. जमिनीबाहेर खुल्या हवेमध्यें वाढणारा भाग वनस्पतीच्या पल्लवाचा असतो. वड-पिंपळ-केवडा, ऊस, ऑरकिड इत्यादि कांहीं वनस्पतींमध्यें फांद्यांपासून फुटलेली मुळें हवेंत लोंबत असलेली किंवा खांबाप्रमाणें फांद्यांनां टेकू देऊन जमिनीवर उभी असलेलीं दृष्टी पडतात. परंतु ह्या अपवादात्मक उदाहरणांनी वरील सामान्य नियमास बाध येत नाहीं. उलट पुष्टीच मिळते. अशा प्रकारें प्रत्येक वनस्पतीच्या अवयवांचे दोन मुख्य संघ होतातः (१) जमिनींत वाढणा रा मूलसंघ आणि (२) हवेंत वाढणारा पल्लवसंघ. कोणतीहि वनस्पति मुळासकट उपटून पाहिली तर तिचा मूलसंघ लहानमोठया परंतु सारख्या स्वरूपाच्या व रंगाच्या भागांनीं झालेला दिसतो. मुळें लहानमोठीं असलीं तरी तीं सर्व फिक्या किंवा पांढर्‍या रंगाची असून आकारानें निमुळतीं असतात. त्यांचा रूंद भाग जमिनीच्या पृष्ठभागाकडे असतो व टोंकदार बारीक भाग उलट दिशेस पृथ्वीच्या मध्यभागाकडे किंवा कमजास्त प्रमाणानें तिरपा किंवा आडवा वाढत असलेला दिसतो. मुळे, रताळीं, गाजर, सलगम वगैरे कांही थोड्या वनस्पतींची मुळें मात्र विशिष्ट आकाराचीं असतात व त्यापैकी कांहीचा रंगहि तांबडा, डाळिंबी, नारिंगी इत्यादि प्रकारचा असतो. अशा प्रकारें मूलसंघातील स्वतंत्र भागामध्यें रूप व रंग यामध्यें बरेंच साम्य असतें. पल्लवसंघांतील भागांची स्थिति मात्र तशी नसते.

पल्लवसंघांत खोड, फांद्या व या दोहोंवरचीं पानें, फुलें व फळें इत्यादि मुख्य भागांचा समावेश होतो. फांद्या, पानें, फुलें व फळें या भागांचें रूप, रंग व रचना इत्यादि बाबतींत एकमेकांशी साम्य नसून बरेंच वैचित्र्य असतें. प्रत्येक वनस्पतीच्या पल्लवसंघाच्या घटकाभागामध्यें वैचित्र्य असतें इतकेंच नव्हे तर निरनिराळ्या वनस्पतींच्या एकाच प्रकारच्या घटकभागंतहि साम्य नसतें. उदाहरणार्थ दोन भिन्न जातींच्या झाडांचीं पानें, फुलें, फळें रंगरूपाने व तशींच आकारानें सारखीं नसतात. अशा प्रकारें बाह्य रूप व आकारामध्यें जी विविधता आढळते तत्संबंधी सविस्तर वर्णन आतां देण्यास आरंभ करूं.

सपुष्पवर्गांतील प्रत्येक वनस्पतींचीं वाढ बियांपासून होते. तेव्हां सपुष्पवनस्पतीच्या बाह्य रूपाच्या साद्यंत वर्णनास वस्तुत: बीपासून आरंभ झाला पाहिजे. परंतु बी ज्या घटक भागांची बनलेली असते ते सामान्यत: कोणत्या मूळ भागापासून कसे व कोठें उत्पन्न होतात हेंहि कळणें जरूर पडत असल्यामुळें व त्याविषयींचें वर्णन पुष्पविभागरचनेसंबंधानें माहिती असल्याशिवाय समजणें कठिण असतें. म्हणून ज्या रीतीनें वरील प्रकारची माहिती आधीं मिळेल व नंतर बीसंबंधीं वर्णन वाचण्याचा प्रसंग येईल अशाच पद्धतीचा स्वीकार केला पाहिजे. यासाठीं नमुन्याकरितां एखाद्या विशिष्ट वनस्पतीच्या भागांचे वर्णन करण्यास आरंभ करून त्या आदर्शभूत वनस्पतींच्या भागांच्या बाह्य रूपाशीं असमान असे जे रूपभेद इतर वनस्पतींत सांपडतात त्यांचें वर्णन त्या त्या भागाच्या वर्णनाबरोबर तुलनात्मक रीतीनें करणें जास्त सोयीस्कर असल्यामुळें तीच पद्धत आम्हीं स्वीकारली आहे.

मोहरीचें किंवा पांढर्‍या तिळवणीचें नुकतेंच जमिनीवर उगवून आलेलें लहान रोपडें मुळासकट जमिनींतून कोणत्याहि भागास इजा न करतां उपटून काढिलें तर असें दिसेल कीं, त्याच्या शरीराच्या मध्यभागी सरळ वाढलेला समईंतील वातीसारखा भाग आहे. या मध्यभागास अक्ष असें म्हणतात. मध्यअक्षापासून त्या रोपड्याच्या दुसर्‍या बाजूचे भाग फुटलेले असतात. जनावरांच्या कण्यास ज्याप्रमाणें त्याच्या शरीराचे सर्व भाग प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीनें जोडलेले असतात तशीच कांहीशी स्थिति सपुष्पवर्गांतील वनस्पतींची असते. फरक इतकाच कीं, जनावरांच्या शरीराचे भाग कण्याच्या दोहों बांजूस सारख्या आकाराचे व समान असे जोडलेले असतात पण अशी समान अवयवरचना वनस्पतीच्या मध्यअक्षाच्या दोहों बाजूंस सर्व स्थितींत आढळत नाहीं. ज्या रोपडयांत फक्त पहिलीं दोनच पानें उगवलीं आहेत त्यांत मात्र मध्यअक्षाच्या दोहों बाजूंच्या भागांत बराच सारखेपणा दिसतो. परंतु असें साम्य पूर्ण वाढीच्या वनस्पतींत आढळत नाहीं. मोहरीच्या लहान रोपड्याकडे पुन्हां दृष्टी फेंकली असतांना असें दिसेल कीं मध्यअक्षाचा खालचा फिक्या रंगाचा भाग खालीं जमिनीकडे वाढत जातो व वरील रंगीत भाग आकाशाकडे वाढत जातो. याप्रमाणें मध्यअक्षाच्या या दोन भागांत वाढीची दिशा एक दुसर्‍याच्या उलट असल्यामुळें जमिनींखाली वाढत जाणार्‍या उतरत्या भागास उतरता अक्ष व वर वाढत जाणार्‍या भागास चढता अक्ष असें म्हणतात. कोणत्याहि वनस्पतीचीं खरीं मुळें या मूळ उतरत्या अक्षाच्याच वाढीपासून झालेलीं असतात व खोड, फांद्या, पानें, कळ्या वगैरे भाग चढत्या अक्षाच्या वाढीपासून उत्पन्न होता. मोहरीच्या मुळांची जरा बारकाईनें परीक्षा केली असतां असें दिसून येईल कीं प्रथम एकच सरळ टोंकदार मूळ वाढतें व तें खोडापासून सूक्ष्म प्रमाणांत निमूळतें होत जातें. अशा प्रकारें बीजामधील गर्भाच्या आदिमूलाच्या अथवा गर्भमूलाच्या वाढीपासून तयार झालेल्या मूळास शूलाकार मूळ म्हणतात व तें सर्व मुळांच्या आधीं वाढत असल्यामुळें उत्पत्तिविषयक कालमानाच्या दृष्टीनें त्यास मुख्य अथवा प्राथमिक मूळ असेंहि म्हणतात.

प्राथमिक मुळाची वाढ जास्त झाल्यावर त्याच्या जुन्या जाड भागापासून नवीन मुळें बाजूस फुटूं लागतात व तीं जमिनींत तिरपीं वाढत जातात. अशा प्रकारें प्रत्यक्ष प्राथमिक मुळापासून जीं नवीन मुळें फुटतात त्यांनां दुय्यम मुळें म्हणतात. दुय्यम मुळें फक्त डाव्या व उजव्या बाजूपासून फुटत नसून ती त्याच्या सर्व बाजूंकडून अव्यवस्थित रीतीनें फुटतात. दुय्यम मुळाचा उगम अमूक एक जागीं होईल असें आदिमूळावरील कोणत्याहि बाह्य चिन्हांवरून सांगतां येत नाहीं. दुय्यम मुळांपासून जीं नवीन मुळें फुटतात त्यांस तिय्यम मुळें असें म्हणतात. व हीं मुळें जवळ जवळ आडवीं वाढतात. अशा रीतीनें प्राथमिक, दुय्यम, आणि तिय्यम वगैरे दर्जांचा जो एक संघं बनतो त्यास ''मूलसंघ'' असें म्हणतात. मोहरीचें बीं ओल्या फडक्यावर आठवडाभर पसरून तें फडकें ओलें राहील अशी व्यवस्था केली असतां जीं लहान लहान रोपडीं त्या अवधींत तयार होतात त्यांच्या मुळांवर षेंड्याच्या जरा पाठीमागील कांहीं भागावर एक प्रकारची दाट परंतु अति सूक्ष्म तंतूची लव फुटलेली दिसतें. व प्रत्यक्ष टोकं कांहींसें कठिण व पिवळट रंगावर असतें. मुळाच्या ज्या भागावर अशा प्रकारची लव वरील प्रकारें तयार केलेल्या रोपडयांच्या मुळावर सांपडते त्याच ठिकाणीं जमिनींतून उपटून किंवा खणून काढलेल्या रोपडयांत मातीचे कण जास्त प्रमाणांत चिकटलेले आढळतात. ह्या लवेंतील प्रत्येक तंतूस मूलकेश असें म्हणतात. मूलकेशांच्या द्वारें जमिनींतील पाणी शोषण केलें जातें. मूलकेशांची लव प्रत्येक लहानमोठया व कोणत्याहि दर्जाच्या मुळाच्या टोंकापाठीमागील कांही भागावर उगवते.

प्रत्यक्ष टोंकाचा भाग गुळगुळीत असतो व टोंकाचा रंग बाकीच्या भागाच्या रंगापेक्षां कांहीसा निराळा असतो. रंगांत फरक असण्याचें कारण असें कीं टोंकावर एक प्रकारचे शिरस्त्राणाप्रमाणें कवच असतें. ही कवचमय टोपी फक्त टोंकावरच असते, पाठीमागच्या भागावर नसते. मुळाची टोपी सामान्य रातीनें टोंकावरून सहज निराळी करतां येत नाहीं. तिची रचना व स्वरूप टोंकाच्या मध्यभागांतून गेलेल्या लंब छेदांत सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्यानें पाहतां येतें. केवड्याच्या फांद्यापासून फुटलेल्या व हवेंत लोंबत असलेल्या मुळांच्या टोकांवर मात्र ही टोपी स्पष्ट रीतींनें सूक्ष्मदर्शक यंत्रांच्या साहाय्यावाचून दृष्टीस पडते.

अशारीतीनें प्रत्येक मुळाचे तीन भिन्न भाग (प्रांत) पुढीलप्रमाणें दृष्टीस पडतात (१) दुय्यम मुळांचा बुंध्याकडील जाड भाग, (२) केशमय भाग व (३) टोपीनें वेष्टिलेला टोंकाचा भाग अथवा टोपीदार भाग. वरील प्रकारचें बाह्य रूप आणि विभागरचना साधारणतः बहुतेक मुळांमध्यें आढळते. परंतु आकार, उत्पत्ति, मूलसंघांतील घटक मुळांची रचना व पोषणाकरितां पाणी व इतर पौष्टिक पदार्थ शोषून घेण्याची पद्धति इत्यादि बाबतींत बरीच भिन्नता कांहीं वनस्पतींच्या मुळांत आढळते.

उत्पत्तीच्या दृष्टीनें मुळांचे दोन प्रकार केले जातात. (१) खरी मुळें -हीं गर्भाच्या आदिमूळापासून प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीनें उत्पन्न झालेलीं असतात. उदाहरणार्थ मोहरीच्या झाडाचीं दुय्यम व तिय्यम इत्यादि दर्जाचीं सर्व लहानमोठीं मुळें (२) उपरी मुळें- ह्मांचा आदिमुळाशीं आणि त्याच्या वाढीशीं प्रत्यक्ष अथवा दूरचाहि संबंध नसतो. खर्‍या मुळाशिवाय वनस्पतीच्या इतर कोणत्याहि अवयवापासून जीं मुळें फुटतात तीं सर्व उपरी मुळें होत. उदाहरणार्थ उंसाच्या पेर्‍यापासून फुटणारीं मुळें, वडाच्या किंवा पिंपळाच्या फांद्यापासून उत्पन्न झालेल्या पारंब्या, केळीच्या जमिनींतील गड्यापासून किंवा कांदा व लसुणाच्या गांठीच्या बुडापासून फुटणारीं मुळें.

उपर्‍या मुळांचे दोन प्रकार आढळतात- (१) जमिनींतील इतर भागापासून उत्पन्न झालेलीं अथवा भूमिगत. (२) हवेंतील भागापासून उत्पन्न झालेलीं अथवा वायुगत. यांपैकीं उपर्‍या जातींचीं भूमिगत मुळें खर्‍या मुळाप्रमाणेंच जमिनींतून जल शोषणाचें व वनस्पतीचा हवेंतील भाग कोणत्याहि आश्रयाशिवाय उभा रहाण्याकरितां जमिनीस घट्ट पकडण्याचें काम करतात. परंतु वायुगत उपर्‍या मुळांची स्थिति अशी नसते. तीं निरनिराळ्या वनस्पतींत निरनिराळ्या हेतूनें व निरनिराळ्या कार्याकरितां उत्पन्न झालेलीं असतात. उदाहरणार्थ वडाच्या वायुगत उपर्‍या मुळांप्रमाणें त्यापैकीं कांहीं आडव्या वाढणार्‍या फांद्यांस त्या तुटून पडूं नयेत म्हणून खांबाप्रमाणें टेंकण देतात तर कांहीं मका, जोधळा, इत्यादि वनस्पतींच्या मुख्य ताटास तें वार्‍यानें कोलमडून पडूं नये म्हणून एकखांबी तंबूच्या दोर्‍याप्रमाणें जमिनीवर ताटाच्या चौफेर तिरप्या रीतींनें वाढून धीरा देण्याचें काम करतात. अशा मुळांस आश्रयदायीं मुळें म्हणतात.

वायुगत उपरी मुळें.- हीं कांहीं वेलांनां दुसर्‍या झाडावर, खांबावर किंवा भिंतीवर चढावयास मदत करतात. उदाहरणार्थ पोथॉस आयव्ही व बिग्नोनिया हे वेल आपल्या खोडापासून व फांद्यापासून उत्पन्न झालेलीं उपरी मुळें चढावयाच्या वस्तूच्या पृष्ठभागांतील चिरा व खडबडीत भागांत धसवून आपले नवे पल्लवयुक्त लवचिक भाग पुरेसा सूर्यप्रकाश मिळविण्याकरितां व या कामीं दुसर्‍या झाडांच्या सावलीनें अडथळा उत्पन्न होऊं नये म्हणून उंच जागीं वरवर चढवितात; कारण त्याचें मुख्य खोड मजबूत नसल्यामुळें स्वतंत्र रीतीनें केवळ जमिनींतील मुळांच्या साहाय्यानें हवेंत उभें वाढूं शकत नाहीं.

ऑरकिड नांवाच्या पवनोपजीवी (वायुभक्षक) वनस्पतींत वायुगत मुळें त्यांच्या गांठीसारख्या खोडापासून फुटून हवेंमध्यें लोंबत रहातात. हीं मुळें हवेंतील बाष्प शोषण करून आपल्या उपजीविकेस लागणार्‍या पाण्याची तरतूद करूं शकतात. ह्या जातीच्या वनस्पती फक्त सर्द व थंड हवेच्या जागीं वाढतात व त्या बहुतकरून दुसर्‍या झाडांच्या फांद्यांवर आश्रयांकरितां सालीमध्यें आपलीं कांहीं मुळें घुसवून लटकलेल्या असतात. अर्थांतच जमिनीशीं त्यांच्या मुळांचा संबंध येत नसल्यामुळें व तसेंच सालीमध्यें घुसलेली मुळें केवळ सालीच्या मृतभागांत रोवलीं जात असल्यामुळें उपजीविकेस लागणार्‍या पाण्याचा पुरवठा त्यांस वरील रीतीनें हवेंतील बाष्प आपल्या वायुगत मुळांनीं शोषून घेऊन करावा लागतो. ह्या मुळांच्या पृष्ठभागावर एक अर्धवट पारदर्शक पातळ पापुदरा असतो. ह्या पापुदर्‍यांतच ही बाष्पशोषण शक्ति असते. ह्या मुळांत वरील पापुद्रयाच्या आंतील भागांत हिरवा रंग असतो व तो ही मुळें ओलीं केंलीं असतां स्पष्टपणें बाहेरूनहि दिसावायास लागतो. हवा कोरडी असेल त्यावेळीं हीं मुळें पांढरीं दिसतात परंतु तींच मुळें पुढें सर्द हवेमध्यें हिरवट दिसूं लागतात त्याचें कारणहि हवेंतून बाष्प शोषिले जातें हेंच होय. अशा मुळास बाष्पशोधक मुळें म्हणतात. मॅगग्रोव्ह जातीचीं दलदलीच्या जागीं उगवणारी जीं झाडें आहेत त्यांपैकीं कित्येकांत त्यांच्या मुळांस श्वासोच्छ्वासाकरितां जो प्राणवायु लागतो तो अशा दलदलीच्या जमिनींतून पुरेसा मिळणें शक्य नसतें. म्हणून त्यांच्या मुळांचे कांहीं भाग दलदलीच्या पृष्ठभागावर सुळासारखे उभे वाढतात व हीं वर आलेलीं मुळें आपल्या सालीच्या द्वारें किंवा पृष्ठभागावरील विशेष प्रकारच्या खास छिद्रांच्या द्वारें हवेंतून प्राणवायु शोषून घेऊन तो आंतील पेशींमध्यें असणार्‍या मोकळ्या भागांच्या मार्गानें चिखलांत रूतलेल्या मुळापर्यंत पोहोंचवतात. अशा प्रकारच्या मुळांस वायुशोषक किंवा श्वासोच्छ्वास करणारीं मुळें म्हणतात.

आकाशवेल, ब्रुमरेप, रिफ्लेशिया, बांडगूळ, मिसलटो,बलॅनोफोरा व चंदनाच्या जातीचीं कांहीं झाडें आपली उपजीविका आकाशवेलाप्रमाणें सर्वस्वीं अथवा बांडगुळाप्रमाणें अर्धवटरीतीनें दुसर्‍या वनस्पतींच्या शरीरांतून रस शोषून घेऊन करतात. जमिनींतून जलशोषण करणारीं मुळें त्यांच्यामध्यें मुळींच नसतात (आकाशवेल) किंवा तीं असून शिवाय दुसर्‍या वनस्पतींच्या मुळामध्यें घुसवून त्यांतून रस शोषण करणारीं दुसरीं मुळें त्यांच्या जमिनींतील भागापासून फुटलेलीं आढळतात. आकाशवेल आणि ब्रूमरेप यांच्याप्रमाणें पूर्ण पुष्टरसशोषक वनस्पतींचे व तसेंच बांडगूळ आणि मिसलटो यांच्याप्रमाणें अर्धपरोपजीवि वनस्पतींचे रसशोषक भाग ज्या झाडांच्या फांद्यांवर तीं चिकटलेलीं असतात त्यांच्या सालींत किंवा ज्यांच्या जवळ तीं स्वंतत्र रीतीनें उगवलेलीं दिसतात त्यांच्या जमिनींतील मुळांच्या सालींत सूक्ष्म तंतुमय मुळांच्या रूपानें घुसलेले असतात. अशा रीतीनें परोपजीवी वनस्पतींचीं हीं सूक्ष्म मुळें रस शोषण करण्यास समर्थ असल्यामुळें त्यांस पुष्टरसशोषक मुळें म्हणण्यास हरकत दिसत नाहीं.

एपिपोजिअम, मोनोट्रोपा, कोरालोरीझा व निओटिया या वनस्पतींमध्यें जमिनींतील निरींद्रिय क्षार आपल्या मुळांच्या द्वारें शोषून घेण्याचीं शक्ति नसते. त्यांच्या पोषणास जमिनींत किंवा तिच्या पृष्ठभागावर कुजत असलेलें निर्जीव सेंद्रिय पदार्थ तेवढे उपयोगी पडतात. किंबहुना एकपरी असेंहि म्हणतां येईल कीं त्यांची मुळें जमिनींतील निरींद्रिय क्षार शोषूंच शकत नाहींत. ज्याप्रमाणें पूर्ण किंवा अर्ध-परोपजीवी वनस्पतींनां भोजनदात्या वनस्पतींपासून निराळ्या केल्या असतां त्या जमिनींतील क्षारावर आपली उपजीविका चालवूं शकत नाहींत त्याचप्रमाणें याहि वनस्पतींची स्थिति असते. दोहोंमध्यें फरक इतकाच कीं परोपजीवी वनस्पतीप्रमाणें भोजनदात्या अन्य वनस्पतींचा आश्रय यांस करावा लागत नाहीं. त्या सेंद्रिय निर्जीव पदार्थावर आपली उपजीकिा करूं शकतात. म्हणून अशा प्रकारच्या वनस्पतींनां निर्जीव (मृत) सेंद्रिय पदार्थोपजीवी वनस्पतीं असें म्हणतात, व हा त्यांचा विशेष गुण त्यांच्या मुळांच्या विशेष शक्तीवर अवलंबून असल्यामुळें अशा मुळांस दुष्टरसशोषक असें नांव देण्यास हरकत नाहीं.

कांहीं वनस्पतींमध्यें वेळीं अवेळीं व तसेंच आपत् व विश्राम कालीं उपयोगी पडण्याकरितां शरीराच्या भिन्नभिन्न अवयवांत अन्नसंचय करून ठेवलेला असतो. हा अन्नसंग्रह सर्व वनस्पतींमध्यें एकाच प्रकारच्या विशिष्ट भागांत सांठवलेला नसतो. कांहीं वनस्पतीमध्ये तो खोडांत, पानांत तर कांहींत तो मुळांत सांठविलेला आढळतो. ज्या भागांत अशा प्रकारचा अन्नसंग्रह केलेला असतो ते अर्थातच इतर वनस्पतींच्या त्या प्रकारच्या सामान्य अवयवांपेक्षां जास्त पुष्ट झालेले दिसतात, व त्यामुळें सामान्य आकारापेक्षां त्यांचा आकार विशेष प्रकारें निराळा होतो. अशा प्रकारें अन्नसंग्रहानें विशिष्ट आकाराची झालेलीं खरीं व उपरीं मुळें कांहीं वनस्पतींमध्यें सांपडतात. आकारानुरूप त्या मुळांस निरनिराळीं पारिभाषिक नांवें दिलीं जातात; त्यांपैकीं सध्यां माहीत असलेले मुख्य प्रकार खाली दिलेले आहेत.

खर्‍या मुळांचें सामान्य रूप शूलाकार मूलसंघांत आढळतें व उपर्‍या मुळांचें सामान्य रूप जटामय मूलसंघांत आढळतें. मक्याचें किंवा गहूं, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी इत्यादि धान्यांचीं लहान रोपडी मुळासकट उपटून पाहिलीं असतां त्यांचीं बारीक बारीक वातीसारखीं मुळें धाटाच्या बुडापासून गोंड्याच्या धाग्याप्रमाणें पसरलेली दृष्टीस पडतात. अगदीं लहान रोपडयांत मात्र प्राथमिक खरें मूळ ओळखतां येतें परंतु लवकरच उपरीं मुळें उत्पन्न होतात व त्यांची वाढ झपाटयानें होऊन व तसेंच प्राथमिक खर्‍या मुळांची वाढ खुंटून खरीं मुळें व उपरीं मुळें ओळखण्याचें एक साधन नाहींसें होतें व पुढें तर प्राथमिक खरें मूळ मरून जाऊन मूलसंघामध्यें केवळ उपर्‍या मुळांचाच भरणा झालेला आढळतो. सामान्य स्वरूपाच्या वरील दोन्ही प्रकारांत अन्नसंग्रहामुळें रूपभेद झालेला आढळतो. म्हणून ह्या विशेष आकारांच्या मुळांस त्यांच्या आकारानुरूप निरनिराळीं जीं नांवें दिलीं जातात तीं खालीं दिलीं आहेत. अशा प्रकारच्या सर्व मुळांस रूपान्तर झालेली मुळें असें म्हणण्यास हरकत दिसत नाहीं.

रूपान्तरित खर्‍या मुळांचे प्रकारः- (१) शंक्वाकार (शंकूदार)- हें मूळ शंकूप्रमाणें बुडाशीं गोलाकार असून जाड असतें व खालीं हळू हळू निमुळतें होत जातें (गाजर). (२) मल्लिकाकार, किंवा तसरकार (धोटेदार) - हें मूळ मध्यभागीं जाड असून बुडाकडील वरच्या भागाकडे कांहीसें निमुळतें व कमी जाड असून खालील भागहि निमुळता होत जाऊन अखेर टोंकदार होतो (मुळा). (३) भ्रमराकार (भोंवरेदार)- हें मूळ बुडाशीं चेंडूसारखें वाटोळें असून खालच्या मध्यभागीं एकदम टोंकदार होतें म्हणून या मुळाचा आकार भोंवर्‍या सारखा दिसतो (सलगम).

रूपान्तरित उपर्‍या मुळांचे प्रकार:- (१) मालाकार- हीं माळेंतील मणी व दोर्‍या प्रमाणें आलटून पालटून जाड आणि बारीक झालेलीं असतात (पेलारगोनिअम). २) गोपुच्छाकार- ही मुळें बुंडाशीं दोर्‍या प्रमाणें बारीक असून एकदम खालच्या बाजूस टोंकापाशीं गांठी सारखीं जाड होतात (स्पारिआ आणि अकॅन्थस) व मुळांचा आकार गाईच्या षेंपटीसारखा असतों (३) करतलाकार (पंजेदार)- हें मूळ पंजाच्या आकाराचें असतें (ऑरचिस). (४) ग्रांथेल- हीं ओबडधोबड रीतीनें जाड झालेलीं असतात (रताळें, ऑरचिस व जालप). (५) हीं मुळें एकावर एक अंगठ्या रचल्या असता वलयमय जी आकृति होते त्या आकाराचीं असतात (सिफेलिस इपिकॅक्युहॅना). (६) गंडमयगुच्छाकार-ह्या प्रकारांत ग्रंथील प्रकाराप्रमाणें मुळांच्या गांठी झालेल्या असतात व कित्येक गांठी जवळ जवळ एकाच जागेपासून लटकलेल्या असल्यामुळें त्या लोलकांच्या गुच्छाप्रमाणें दिसतात.

अयोनिज अथवा नग्नबीजवर्गांत मूलसंघ खर्‍या शूलाकार मुळांचा झालेला असतो. ह्या उपवर्गांतींल कांही जातींत उदाहरणार्थ साबूदाणा, देवदार, इत्यादिकांच्या मुळांवर जलशोषणाचें काम करण्याकरितां मूलकेश नसतात परंतु तें काम करण्याकरितां मुळांवर व त्यांच्या सभोंवतीं किण्ववर्गांतील सूक्ष्मवनस्पतींचे धागे पसरलेले असतात. ह्या धाग्यांची मदत जलशोषणाच्या कामीं त्या वनस्पतींनां मिळते. हंसराजवर्गांत मूलसंघ उपर्‍या मुळांचा झालेला असतो. हीं मुळें कांहीं जातींत पानांच्या देंठांच्या बुडापासून (ऑस्पिडिअम) आणि कांहीं जातींत भूमिगत खोडापासून उगवतात (टेरिस), गर्भमूळ (आदिमूळ) बारीक नळीच्या आकाराचें असतें व तें फार वेळ टिकत नाहीं; लवकरच मरतें आणि त्यानंतर ह्या वनस्पतींत जीं मुळें सांपडतात तीं सर्व उपरींच असतात. हीं मुळें रूंदीमध्यें सपुष्पवर्गांतील बर्‍याच मुळांप्रमाणें वाढूं शकत नाहींत. एकदल सपुष्पवनस्पतींच्या मुळाप्रमाणें तीं जटादार होतात. ह्या वर्गांतील लायकोपोडिअम (मुद्गलें) जातींत मुळें उपरीं असून तीं खोडापासून उत्पन्न होतात. त्यांच्यावर मूलकेश असतात व वाढता टोंकाचा भागहि टोपीनें आच्छदिलेला असतो. ह्या मुळापासून जेव्हां दुय्यम मुळें फुटतात तेव्हां तीं इतर मुळांप्रमाणें जुन्या मुळाच्या बाजूस फुटत नाहींत. मुळाचें टोंक दुभंगून एकच बिंदूपासून दोन फांद्या फुटून त्रिकोणाच्या दोन बाजूंप्रमाणें ती एकमेकापासून दूर दूर पसरत जाऊन वाढतात. दोन दुय्यम मुळांचा एक प्रकारचा चिमटा बनतो.

हंसराजवर्गांतील सिलाजिनेला नांवाच्या जातींत मुळें मुख्यत्वेकरून खोडापासून किंवा फांद्यापासून फुटत नसून त्यापासून फुटलेल्या मूलवेशी (मूळासारख्या) भागापासून तीं सामान्यतः फुटतात. हे मुळाप्रमाणें दिसणारे भाग यथार्थतः मुळें नसतात कारण त्यांचीं टोंकें मुळांच्या टोंकाप्रमाणें टोपीनें आच्छादिलेलीं नसतात. जमिनीपर्यंत वाढत जाऊन तिच्याशीं संयोग झाल्यावर या मूलवेशी एक प्रकारच्या फांद्याच्या टोंकापासून उपरी मुळें फुटतात. या उपर्‍या मुळांच्या टोंकांवर नेहमींप्रमाणें टोप्या असतात. या मूलवेशी-भागापासून अशा रीतीनें हीं उपरीं मुळें उत्पन्न होतात त्यांस मूलवेशीदंड असे म्हणतात. या उपर्‍या मुळापासून जीं दुय्यम मूळें उत्पन्न होतात तीं नेहमींप्रमाणें जुन्या मुळाच्या आंतील काष्टभागापासून उत्पन्न होत नाहींत. तीं टोकांजवळच्या वाढीच्या जागेपासून फुटतात. व त्यांची मूळ उत्पत्तीहि सामान्य रीतीप्रमाणेंच जुन्या मुळाच्या खोल अंतरभागापासून होत नसून वरील पृष्ठ भागापासून झालेली असते सेलाजिनेला जातीचा हा विशेष त्या जातीच्या सर्व वनस्पतींत त्यांच्या दुय्यम मुळांच्या उत्पत्तीच्या बाबतींत सांपडतो.

हंसराजवर्गांतील अश्वपुच्छ अथवा इक्विसेटम कुलांतील वनस्पतींची मुळें उपरीं असून वातीप्रमाणें किंवा केंसासारखी बारीक असतात. गर्भमूल फार थोउा काल जिवंत रहातें. म्हणून वाढलेल्या वनस्पतींत सर्व मूळें उपरींच असतात. शैवालर्वग आणि पाण व किण्व वनस्पतींच्या वर्गांत ज्यांस यथार्थ रीतीनें मूळ हें नांव देतां येईल असें अवयवच नसतात. शैवलवर्गांत सूक्ष्म तंतुमय भाग वनस्पतीच्या खालच्या भागापासून उत्पन्न होऊन त्यांच्या द्वारें जलशोषणाचें काम केलें जातें. परंतु या भागांत टोपी, मूलकेश इत्यादि बाह्य चिन्हें तसेंच अंतररचना सामान्य मुळाप्रमाणेंच असत नाही. म्हणून या जलशोषण करणार्‍या तंतूस मूळ असें न म्हणतां केशमूल असें म्हणतात. शैवलवर्गांतील वनस्पतींचीं पानें, शाखा, कळ्या व केशमुळें उत्पन्न करणारी जी अवस्था असते तिचे यथार्थतः हंसराज आणि सपुष्पवर्गांतील वनस्पतींच्या तशा प्रकारच्या अवस्थेशीं उत्पत्तीच्या दृष्टीनें साम्य नसतें. हंसराज आणि सपुष्पवर्गांत वनस्पतींची पल्लवयुक्त अवस्था उत्पन्न होण्यास संभोगक्रियाव्हावी लागते व नंतर जी युग्मपेशी उत्पन्न होते तिच्या वाढीपासून ती अवस्था निर्माण होते. परंतु शैवलवर्गांत ही पल्लवयुक्त अवस्था निर्माण होण्यास संभोगक्रिया प्रथम होण्याची आवश्यता नसते. ती संभोगपेशी स्वयंभवाच्या अथवा स्वयंभूपेशीच्या वाढीपासून निर्माण होते.

अशा रीतीनें जे एकपेशीमय भाग स्वतंत्र तर्‍हेनें वाढून वनस्पतींच्या आयुष्यांतील संभोगस्फुटें (संभोगपेशी) उत्पन्न करणारी अवस्था निर्माण करूं शकतात, त्यांस स्वयंस्फुटें (स्वयंभूपेशी) म्हणतात. प्रत्येक वनस्पतींच्या आयुष्यांत याप्रमाणें दोन अवस्था कमजास्त प्रमाणानें विकास पावलेल्या आढळतात: (१) स्वयंस्फुटावस्था (स्वयंभवावस्था) आणि (२) संभोगभवावस्था अथवा संभोगस्फुटावस्था. तसेंच स्वयंस्फुटावस्थेंतील वनस्पतीच्या शरीरास स्वयंस्फुटधारी व संभोगस्फुटावस्थेंतील शरीरास संभोगस्फुटधारी असें म्हणतात. सपुष्प व हंसराजवर्गांत स्वयंस्फुटावस्था प्रधान असते किंबहुना ज्या अवस्थेंत ह्या वर्गांतील वनस्पती आपल्या दृष्टीस पडतात ती त्यांची स्वयंस्फुटावस्था असते व संभोगस्फुटावस्था अति सूक्ष्म असल्यामुळें ती साधारणत: सहज अनायासाने दृष्टीस पडत नाहीं. परंतु शैवलवर्गापासून किण्ववर्गापर्यंतच्या सर्व वर्गांत संभोगस्फुटावस्था प्रधान असून त्यांची सहज दृष्टीस पडणारी अवस्था हीच असते. तेव्हां शैवालवर्गांत जीं केशमुळें वनस्पतीच्या शरीरापासून फुटतात तीं ह्या संभोगस्फुटधारीपासून उत्पन्न होत असल्यामुळें उत्पत्तीच्या दृष्टीनें सुद्धां त्यांच्या केशमुळांत व सामान्य खर्‍या अथवा उपर्‍या मुळांत साम्य नाहीं.

पाणवर्गांतील वनस्पतीमध्यें मुळें तर नसतातच परंतु केशमुळेंहि फार क्वचित प्रसंगी असलेली आढळतात. उदाहरणार्थ व्हौचेरिया, कालरेपां. कांहीं पाणवनस्पतींत बहुतकरून चिखलांत आधाराकरितां जी पेशी रूतलेली असते ती वर्णहीन फिक्या रंगाची असते. परंतु जलशोषणाच्या कामी तिचा उपयोग या वनस्पतींनां नसतो. किण्ववर्गांत मुळें किंवा केशमुळें मुळींच सांपडत नाहींत. ह्यांच्यापैकीं म्युकॉर, भूछत्रें इत्यादि मृतसेंद्रिय-पदार्थोपजीवी किण्वांत दुष्टरस शोषकभाग व परोपजीवी किण्वांत पुष्ठरसशोषक भाग असतात परंतु त्यांस मुळें किंवा केशमुळें म्हणतां येत नाहीं. पुष्टरसशोषक भागास तुंबड्या म्हणण्यास हरकत नाहीं.

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .