प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

वनस्पतिशास्त्र भाग ९

आयुष्यमानाच्या दृष्टीनें मुळांचे तीन भेद केले जातात (१) एकवर्षायु- ही फक्त एक हंगाम टिकणार्‍या हंगामी वनस्पतीमध्यें सांपडतात (मोहरी). (२) द्विवर्षायु- हीं दोन वर्षे किंवा हंगाम जिवंत राहणार्‍या वनस्पतींत दृष्टीस पडतात. हीं बहुतकरून अन्नसंग्रहामुळें पुष्ट झालेलीं असतात. इंग्लंड, अमेरिका वगैरे थंड देशांत गाजर, मुळे, सलगम हीं झाडें द्विवर्षायु वनस्पतीत मोडतात कारण थंडीच्या दिवसांत त्यांचे जमिनीवरील भाग मरून जातात तरी मूळ व त्यावरचा खोडाचा कांहीं भाग जमिनींत जिवंत राहातो. व पुन्हां वसंतकाळ सुरू होऊन थंडी मोडली कीं तो वाढतो. व फुलें, फळें व बी उत्पन्न होऊन त्या वनस्पती मरतात. वसंत काळांतील या वाढीस मुळांत संग्रह केलेल्या अन्नाचाच जास्त उपयोग होतो व अशा रीतीनें बीजोप्तत्तीनंतर तीं भूमिगत भागासकट मरण पावतात. (३) बहुवर्षायु-एकदोन वर्षापेक्षां जास्त वर्षे जिवंत राहणार्‍या वनस्पतींमध्यें ही सांपडतात. उदाहरणार्थ अंबा, बाभूळ इत्यादि वुक्ष.

(२) स्कंध अथवा खोड.- मोहरीच्या दोनपानी लहान रोंपड्याकडे दृष्टी फेंकली तर असें दिसेल कीं त्याचा चढतां अक्षभाग उतरत्या अक्षभागाप्रमाणें फिक्या रंगाचा नाहीं. त्यांत पिवळ्या व हिरव्या रंगांची झांक स्पष्टपणें दृष्टीस पडते व त्यांच्या टोकांवर दोन पानें व त्यांमध्यें एक लहानसा किंचित फुगलेला भाग दृष्टीस पडतो. याप्रमाणे चढत्या अक्षांत तीन भिन्न प्रकारचे भाग स्पष्टपणें दृष्टीस पडतात:- (१) सरळ आकाशाकडे वाढणारा काठीसारखा भाग; या स्कंध अथवा खोड म्हणतात. (२) स्कंधाच्या टोंकावर असलेला फुगलेला भाग, यास कळी अथवा कलिका म्हणता. व (३) पातळ व पसरट हिरवे भाग; यांस पानें किंवा पर्णे म्हणतात. मोहरीच्या बीमधील गर्भाची जर तपासणी केली तर असें दिसेल कीं तिच्यामध्यें आदि अथवा गर्भमूळाचा भाग स्पष्ट दृष्टीस पडतो परंतु सरळ काठीसारखा स्कंध अथवा खोडाचा भाग व तसेंच पसरट पानेंहि दृष्टीस पडत नाहींत. गर्भमुळाच्या दुसर्‍या बाजूच्या टोंकावर एक लहानसा कळीसारखा फुगीर भाग मात्र दृष्टीस पडतो. जरा बारकाईनें या भागाची परीक्षा केली असतां असें आढळतें कीं या कळींत चिमुकल्या पानासारखे भाग आहेत. अशा प्रकारें बीजगर्भांत मुळाच्या उलट दिशेस केवळ एक लहानशी कळी असतांना बीं रूजून त्यापासून उत्पन्न झालेलं लहान रोंपडें जमिनीवर दिसावयास लागलें म्हणजे शिरोभागाच्या कळीखालीं उभा वाढलेला नाजूक खोडाचा भाग स्पष्टपणे दिसावयास लागतो व आणखी वाढ जास्त झाली म्हणजे शिरोभागाच्या कळीखालीं खोडावर लागलेलीं पानें दृष्टीस पडतात. शिरोभागीं कळी पहिल्याप्रमाणें असतेच. वाढीच्या अशा प्रकारच्या शिस्तीवरून व बीजगर्भांत मुळाच्या उलट दिशेस केवळ एक चिमुकली कळीच असते हें पाहून असें स्पष्ट अनुमान निघतें कीं, ह्या कळीमधील वाढीपासूनच खोडाचा व पानांचा भाग उत्पन्न होतो हें अनुमान यथार्थ आहे. हें एखाद्या मोठया कळीची बारकाईनें परीक्षा केली असतां सिद्ध होतें. कळींच्या मध्यभागीं आंत खोडाचा शिरोभाग असतो व त्यावर एकमेकांवर गुरफटलेल्या पानांचें आच्छादन असतें. कोणत्याहि झाडाची कळी मध्यभागीं उभी कापून प्रत्येक अर्धभागाचा आंतील भाग बारकाईनें पाहिला असतां मध्यभागी खोडाचा शिरोभाग व त्यावर विकास न पावलेल्या पानांचें आच्छादन अशा प्रकारची रचना दृष्टीस पडते. तेव्हां खोड व पानें ह्या उभय भागांनां उत्पन्न करणारा मुख्य अवयव कळीच असल्यामुळें कळीचेंच वर्णन आधीं करणें योग्य आहे.

कलिका अथवा कळी:- हिचा सामान्य आकार मंदिराच्या शिखराच्या कळसाप्रमाणें असतो. बुडाशीं कळी बहुधां रूंद असून कळसाप्रमाणें वर निमुळती होत जाते. सामान्य रूप कळसासारखें असलें तरी वाटोळ्या, बसक्या, किंवा अन्य ओबडधोबड रूपाच्या कळ्याहि सांपडतात. आकारानें कळ्या लहान मोठया असतात. पिंपळ, वड, फणस वगैरे वृक्षांच्या मुख्यं कळ्या बर्‍याच मोठ्या असतात. ऊंस, मका, सफरचंद, कापूस, जासवंद वगैरेंमध्यें त्या जरा लहान असतात व आंबा, पांढरा, चाफा, तसेंच गहू, हरभरा वगैरे लहान वनस्पतींमध्यें त्या फार लहान असतात. कोबीचा कांदा ही एक अतिशय मोठी अशी कळीच असते. तेव्हां कळीची रचना समजून घेण्यास अशा प्रकारची राक्षसी कळी फार उपयोगी पडते. कोबीच्या कांद्याचे बरोबर मध्यभागीं उभे दोन भाग केले तर प्रत्येक भागामध्यें कळीची रचना खरोखर कशी असते हें बृहद्दर्शकाच्या साहाय्यावांचूनहि चांगल्या रीतीनें दृष्टीस पडते.

प्रत्येक अर्धकाच्या मध्यभागीं चढत्या अक्षाचा वाढीस न लागलेला भाग दृष्टीस पडतो व त्यापासूनच दोन्ही बाजूंनीं पानें फुटलेली दृष्टीस पडतात. मध्यअक्षाच्या बुडाकडील पानें जास्त मोठीं व वाढलेलीं असतात व टोंकापाशीं शिरोभागीं असलेलीं पानें अगदीं कमी वाढलेलीं असतात. तसेंच खालच्या व मधल्या पानांच्या कैचींत एक एक लहानशी कळीहि उगवलेली दिसते परंतु वरील टोंकाजवळ असलेल्या पानांच्या कैचींत बहुधां कळ्या दिसत नाहींत कारण वरील भागांची वाढ व विकास खालच्या भागापेक्षां फारच कमी झालेला असतो. कोबीच्या कांद्याची जी ही रचना याप्रमाणें दृष्टीस पडते अशाच प्रकारची रचना सर्व लहानमोठया कळ्यांची असते. बृहद्दर्शक कांचेच्या साहाय्यानें लहान कळ्यांचीहि रचनावरील प्रकारचीच असते हें सहज दृष्टीस पडतें. येणेंप्रमाणें कळीची रचना पाहिल्यावर कळी हा एक वनस्पतीच्या वरील षेंड्याचा भाग असून तिच्या मध्यभागीं चढत्या अक्षाचा शिरोभाग असतो व त्यावर कित्येक अविकसित व अर्धविकसित पानांचें एक जाड वेष्टण असल्यामुळें ती फुगीर झालेली दिसते हें समजण्यास कठिण जात नाहीं.

उत्पत्तीच्या जागेच्या दृष्टीनें कळ्याचे तीन प्रकार केले जातात : (१) षेंड्यावरील अथवा ''शिखरस्थ'' (२) पानांच्या कैचीतींल अथवा ''कक्षस्थ'' व (३) वरील दोन जागांशिवाय दुसर्‍या कोणत्याहि जागीं उगवणार्‍या अथवा ''उपर्‍या.'' शिखरस्थ व कक्षस्थ हा भेद केवळ मुख्य खोडाच्या किंवा स्कंधाच्या दृष्टीनें केला जातो. वस्तुतः मुख्य खोडावरील कक्षस्थ कळी तिच्या वाढीपासून तयार होणार्‍या फांदीच्या शेड्यावरच असते म्हणून त्या फांदीच्या दृष्टीनें ती शिखरस्थच असते. उपर्‍या कळ्या मुळापासून (गुलाब, रानशिशवी, जर्दाळू, अळु,) किंवा पानापासून (ब्रायोफायलम-पानफूट) उत्पन्न होतात किंवा वड, पिंपळ, वगैरे मोठे वृक्ष खच्ची केले असतां त्यांच्या खोडाच्या जुन्या भागापासून त्या अनियमित रीतीनें उत्पन्न होतात व तसेंच पानांच्या वरच्या कैचीची जागा सोडून खोडावर इतर जागींहि उत्पन्न होतात.

घटकावयवांच्या दृष्टीनें कळ्यांचे दोन प्रकार केले जातातः (१) आवरणयुक्त अथवा ''आवरित'' व (२) आवरणरहित अथवा अनावरित किंवा ''नग्न.'' उष्णकटिबंधांत वनस्पतींच्या कळ्या बहुत करून आवरणरहित अथवा ''नग्न'' असतात. तसेंच बहुतेक भाजीपाल्यासारख्या मृदु वनस्पतींच्या कळ्याहि ''नग्न'' च असतात. वड, पिंपळ, उंबर, फणस, वगैरे उष्णकटिबंधांतील कांहीं थोड्या वृक्षांच्या कळ्या मात्र आवरणयुक्त अथवा ''आवरित'' प्रकारच्या असतात. वसंतकाळांत जेव्हा ह्या झाडास पुन्हां नवी पालवी फुटूं लागते त्यावेळेस कळ्याच्या पानावर गुरफुटून राहणारीं ही ''आवरणें'' गळून पडूं लागलीं म्हणजे त्यांचा सडा जमिनीवर पडलेला त्या झाडांच्या खालीं दृष्टीस पडतो. ह्या झाडांच्या कळ्यांमधील प्रत्येक पानाच्या बुडापासून दोन स्वतंत्र ऊर्णे उत्पन्न होऊन पानाच्या पसरट भागाची वाढ होऊं लागेपर्यंत प्रत्येक पानावर तीं गुरफटलेलीं असतात. पानाचा हिरवा पातळ भाग विकास पावूं लागला कीं तीं गळून पडतात व पान दृष्टीस पडावयास लागतें.

शीतकटिबंधांतील वृक्षांच्या कळ्या निदान थंडीच्या दिवसांत तरी अशा प्रकारें ''उर्णा'' च्छादित असतात. हीं ''उर्णें'' निरनिराळ्या वनस्पतींत निरनिराळ्या प्रकारें उत्पन्न होतात. कधीं तीं पिंपळाच्या कळीप्रमाणें प्रत्येक पानाच्या देंठापासून जोडीजोडीनें उत्पन्न होतात तर, कधीं ती प्रत्यक्ष खोडापासून कळीच्या तळाशी उत्पन्न होऊन कळीच्या पानाच्या बाहेरील भाग केवळ अशा उर्णांचाच झालेला असतो. त्यांची संख्या निश्चित नसते. भिन्न भिन्न जातीच्या कळ्यावरील ह्या उर्णांची संख्या कमजास्त असते. कांहीं वनस्पतींत पानाच्या देंठाच्या बुडाचा भाग टोपीसारखा पोकळ होऊन त्या टोपीवजा भागांनीं कळ्या आच्छादिलेल्या असतात.

कळ्यावरील हें ''उर्णांचें'' आच्छादन ज्यावेहीं वनस्पतींची वाढ हंगामापुरती खुंटून त्या विश्रांति घेत असतात त्यावेळीं त्यांच्यावर असलेलें विशेष स्पष्टपणें दृष्टीस पडतें. थंडीच्या दिवसांत वाढ अशा रीतीनें कांहीं वेळ खुंटत असल्यामुळें त्या दिवसांतच कळ्या बर्‍याच संकुचित झालेल्या व तसेंच कित्येक ''उर्णांनीं'' आच्छादिलेल्या असतात. वसंतकाळ सुरू झाला कीं वाढ पुन्हां सुरू होते व त्यावेळीं कळ्या आपलें हें उर्णांचें कवच अथवा पांघरूण फेंकून देतात पुन्हां विश्रांतीचा काल येईपर्यंत नव्या उर्णांचा स्वीकार त्या करीत नाहींत. त्या वेळेपर्यंत वाढ अंनिर्बंध रीतीनें सारखी चालू रहाते. अशा रीतीनें दरवर्षी थंडीच्या दिवसांत सामान्यत: हीं उर्णें उत्पन्न होऊन वसंतकालीं त्यांचा त्याग केला जात असल्यामुळें खोडांची किंवा त्याच्या फांद्यांची वाढ किती वर्षांची आहे, मुख्य खोड किती वर्षाचे जुनें आहे व कोणतीहि एखादी फांदी वयानें किती जुनाट आहे हें अंदाजानें ठरवितां येतें; कारण वसंतकाळीं हीं उर्णें जेव्हां गळून पडतात तेव्हां त्यांच्या खुणा खोडाच्या किंवा फांदीच्या पृष्ठभागावर स्पष्टपणें उमटून रहात असल्यामुळें व पानें गळून पडलीं असतां त्यांचें जे व्रण खोडाच्या पृष्ठभागार उमटलेले राहातात ते व ''उर्णोचे'' व्रण निरनिराळ्या आकाराचे असल्यामुळें व तसेंच उर्णें एकमेकांनां चिकटून उगवतं असल्यामुळें त्यांचे व्रणहि पानांच्या व्रणापेक्षां फार जवळजवळ थोड्याशा जागेवर पडत असल्यानें अशा प्रकारें जवळ जवळ गर्दीनें उमटलेल्या व्रणांच्या जागा पाहून त्यांच्या संख्येइतकें त्या फांदीचें किंवा त्या खोडाचें वय ठरवितां येतें. प्रत्येक वर्षी एकदांच अशा प्रकारें हीं उर्णाच्छादनें उत्पन्न होऊन वसंतकाळीं गळून पडत असल्यामुळें उर्णांच्या व्रणांच्या स्थळांची संख्या व फांदीच्या वयोमानाच्या वर्षांची संख्या सामान्यतः सारखीच असते. सामान्यतः म्हणण्याचें कारण इतकेंच कीं अवषर्णासारख्या किंवा आकस्मिक दुसर्‍या एखाद्या अचानक आलेल्या आपत्तीमुळें वाढ खुंटली असतां ती वेळ मारून नेण्याकरितां नवीन ''उर्णें'' अशा वेळींहि उत्पन्न होण्याचा संभव असतो व अशा रीतीनें एकाच वर्षांत दोनदां हीं उर्णें उत्पन्न होऊन दोन वेळां गळून पडत असल्यामुळें एकाच वर्षांत त्या व्रणांचीं दोन स्थळें निर्माण होतात. परंतु हीं अपवादात्मक उदाहरणें सोडून दिलीं असतां प्रत्येक व्रणपुंजामागें एक वर्ष असा हिशेब करून वयोमान ठरविण्यास हरकत नाहीं.

फळझाडांचे ''फाटे'' तपासून पाहिले असतां त्यांपैकीं कित्येकांत वर वर्णन केल्याप्रमाणें दोन प्रकारचे व्रण सांपडतात; पैकीं पानें गळून पडल्याचे व्रण जरा दूरदूर व ''उर्णें'' गळून पडल्याचें व्रण फक्त विशिष्ट जागींच तेवढें गर्दीनें एकमेकांजवळ पडलेले दृष्टीस पडतात. आकारानें सुद्धां ह्या दोन व्रणांत साम्य नसतें.

आंब्याच्या झाडाची नवीन पालवी फुटलेली जुनी फांदी तपासून पाहिली तर गर्दीनें पडलेले व अंतराअंतरावर पडलेले असे दोन प्रकारचे व्रण दृष्टीस पडतील. आकारानें मात्र हे व्रण जवळ जवळ एकसारखे असतात; याचें कारण असें कीं हे सर्व व्रण पानांच्या देंठांचेच असतात; त्यापैकीं कांहीं जवळ जवळ पडण्याचें कारण असें कीं, थंडीमध्यें याची वाढ कांहीं वेळ थांबत असल्यामुळें फांदीच्या 'अग्रा'' जवळ असलेलीं पानें जवळ जवळच रहातात व कांहीं वेळानें गळून पडतात. वसंतकाळीं पुन्हां वाढ सुरु झाली म्हणजे “शीर्ष” अथवा “अग्रकलिका पुन्हा वाढीस लागून तिचीं पानें एकमेकांपासून सुटूं लागतात व अंतराअंतरावर जाऊन पसरतात. फांदीची वाढ अशा प्रकारें दरवर्षी एकदा खुंटून पुन्हां शीर्षकलिका वांढू लागत असल्यामुळें गर्दीने जवळजवळ पडलेल्या व्रणाचीं स्थळें मोजून आंब्याच्या बाबतींतहि फांदीचे वयोमान सांगतां येतें.

पानांच्या कैचींतील ''कक्षस्थ'' कळांच्या वाढीनेंच फांद्या तयार होतात. प्रत्येक पानाच्या कैचींत सामान्यतः एक कळी उत्पन्न होते. परंतु कांहीं वनस्पतींत एकापेक्षां जास्त कळ्या एकाच पानाच्या कैचींत उगवतात. अशा प्रकारें पहिल्या कळीनंतर आजूबाजूस किंवा वर उगवलेल्या ज्या कळ्या असतात त्यांस ''आगांतुक'' कळ्या असें म्हणतात. आगांतूक कळ्या कधीं एकावर एक अशा रांगेनें उगवतात. बोगनवोलिया ग्लेडिटिशया किंवा बांबूच्या कळ्याप्रमाणें आजुबाजूस उगवतात. एकावर एक उगवलेल्या आगांतूक कळ्यापैकीं कांहीं वनस्पतींत सर्वांत खालची अर्थांत जुनी कळी जोरानें वाढून तिची फांदी बनते, परंतु दुसर्‍या कांहीं वनस्पतींत सर्वांत वरची कळी काढून तिची फांदी तयार होते. व कांहींत सर्व कळ्या कमजास्त प्रमाणानें वाढून त्यांच्या लहानमोठया फांद्या बनतात. भाजीपाल्यासारख्या मृदु वनस्पतींत अशा प्रकारें आगांतुक कळ्यांच्या वाढीपासून तयार झालेल्या फांद्या बुडाशीं अंतरापर्यंत जोडलेल्या राहून त्यांपासून एक पसरट बुडाची फांदी तयार होते. अशा प्रकारें एकापेक्षां अधिक कळ्यांच्या संयोगानें जी फांदी बनते तीस ''जोड'' फांदी असें म्हणतात. ''कक्षस्थ'' कळ्यांच्या वाढीनें फाद्या तयार होतात हें वर सांगितलेंच आहे. अशा प्रकारें प्रत्येक पानाच्या कैचींतील कळी वाढून तिची फांदी बनली तर सर्व फांद्या शिस्तिनें मुख्य खोडावर लागलेल्या दृष्टीस पडल्या पाहिजेत; परंतु अशा प्रकारची स्थिति क्वचितच आढळते. मुख्य खोडावरच प्रत्येक पानाच्या कैचींत फांदी उगवलेली दृष्टीस पडत नाहीं. कांहीं पानांच्या कैचींत त्या स्पष्टपणें दृष्टीस पडतात तर कांहींच्या कैचींत फांद्या मुळीच दृष्टीस पडत नाहींत. याशिवाय कित्येक वनस्पतींत फांद्या पानांच्या कैचीच्या बाहेर उगवलेल्या दृष्टीस पडतात तर कित्येकांत एकापेक्षां जास्त फांद्या एकाच कैचींतून उद्भवलेल्या दृष्टीस पडतात. अशा प्रकारें जो बेशिस्तपणा फांद्यांच्या वाढीसंबंधाने दृष्टीस पडतो तो अनेक कारणांनीं उत्पन्न झालेला असतो. पानांच्या कैचींत एक एक स्वतंत्र रीतीनें उगवणार्‍या कळ्यांस व्यवस्थित कळ्या असें म्हणतात. व्यवस्थित कळ्यांपैकीं प्रत्येक कळी वाढून तिची फांदी झाली म्हणजे फांद्याचीहि शिस्त कायम रहाते. परंतु ही शिस्त मोडण्योचं पहिलें कारण असें कीं बर्‍याच पानांच्या कैचींतील कळ्या वाढतच नाहींत. अशा कळ्यांस 'निद्रित' किंवा सुस्त कळ्या असें म्हणतात व फांद्याची शिस्त मोडण्याचें दुसरें कारण असें कीं कधीं कधीं कांहीं कळ्या पानाच्या कैचीत न उगवतां कैचीच्या बाहेर उगवतात व त्यांच्या वाढीपासून फांद्या तयार झाल्या म्हणजे भलत्याच जागीं त्या उगवलेल्या दृष्टीस पडतात. अशा प्रकारच्या कळ्यांस कैचीबाहेरील किंवा कक्षबाह्य कळ्या असें म्हणतात. फांद्याची शिस्त मोडण्याचें तिसरें कारण कैचींतून आगातुक कळ्यांची उत्पत्ति हे होय. तसेंच व्यवस्थित कळ्यांची शिस्त उपर्‍या कळ्या खोडाच्या जुन्या भागावर किंवा मुळें, पानें इत्यादि अवयवांपासून उत्पन्न झाल्यानेंहि मोडते.

शिखरस्थ व कक्षस्थ कळ्या पूर्वनिश्चित जागीं उगवतात. अशा पूर्वनिश्चित जागीं उगवणार्‍या कळ्यांस सामान्य (क्रमिक) कळ्या असें म्हणतातं अग्रभागीं उगवणार्‍या शिखरस्थ कळ्या सोडून फांदीवर अथवा खोडावर उगवणार्‍या बाकी सर्व कळ्यांस-मग त्या कक्षस्थ असोत अथवा कक्षवाह्य व उपर्‍या असोत-त्यांस पाÍर्वीय कळ्या असें म्हणण्यास हरकत नाहीं. परंतु साधारण प्रचारांत कक्षस्थ कळ्यांसच '' पाÍर्वीय '' कळ्या म्हणण्याची चाल आहे. पार्श्र्वीय

क्रमिक अथवा सामान्य कळ्यांची मूळ उत्पत्ति सालीच्या भागापासून होते व नंतर कळीच्या मध्यभागीं असलेल्या अक्षाच्या मध्यवर्ती काष्टमय भागाचा व मुख्य अक्षाच्या काष्टमय भागाचा संयोग होतो. उपर्‍या कळ्यांची उत्पत्ति क्रमिक (सामान्य) कळ्यांप्रमाणें बाह्यभागीं न होतां अंतरभागीं होते म्हणून त्यांस आपला मार्ग आंतून बाहेर पोंखरावा लागतो. दुय्यम, तिय्यम व उपरी मुळें याच पद्धतीनें आंतून वाढत येतात व सरतेशेवटीं ज्या मुळाच्या आंतल्या बाजूस तीं उत्पन्न होतात त्यांचीच साल फाडून तीं बाहेर आल्यावर दृष्टीस पडतात. उपर्‍या मुळांची उत्पत्ति देखील अशीच खोडाच्या आंतील काष्टमय भागापासून होऊन तीं साल फाडून बाहेर येतात. याप्रमाणें आंतील खोल भागापासून उगम पावून साल फाडून बाहेर वाढत येणार्‍या उपर्‍या कळ्यांस व मुळांस आंतरोत्पन्न व क्रमिक (सामान्य) कळ्यांप्रमाणे बाहेरील सालीपासूनच उत्पन्न होणार्‍या भागास बाह्योत्पन्न असें म्हणतात.

योनिजवर्गाप्रमाणें अयोनिजवर्गांतहि कळ्या शिखरस्थ व कक्षस्थ असल्यामुळें क्रमिक प्रकारच्याच असतात. या वर्गांतील वनस्पतींचीं पानें विशेषतः फार कमी वाढीचीं व उर्णांसारखीं असलीं तरी त्यांच्या कैचींत कळ्या उगवतात. व त्यापासून फांद्याहि तयार होतात. हंसराजवर्गांतील हंसराज उपवर्गांत कळ्या पार्श्र्वीय कक्षस्थ नसून उपर्‍या असतात. पानांच्या देंठांच्या बुडाशी परंतु बाहेरच्या बाजूस त्या उत्पन्न होतात. मुख्य खोड भूमिगत असून त्यापासून फांद्याचे फांटे बहुतकरून फुटत नाहींत. मुख्य खोडाची शिखरस्थ कळी खुंटली कीं एखादी उपरी कळी वाढून खोडाची वाढ चालू रहाते. अश्वपुच्छ उपवर्गांत खोडाचा जो जमिनीवर उगवलेला भाग असतो त्यावरच्या पानांच्या कैचींतून क्रमिक कक्षस्थ कळ्या उगवतात, तसेंच भूमिगत भागापासूनहि फांटे फुटतात.

मुग्दलउपवर्गांत कळ्या कक्षस्थ नसतात. यांतील वनस्पतींच्या बारीक काडीसारख्या खोडापासून ज्या फांद्या फुटतात त्या पार्श्र्वीय उपर्‍या कळ्यांपासून तयार होतात व त्या फक्त खोडाच्या षेंड्यापाशींच तेवढया दृष्टीस पडतात. नवीन फांदी व खोडाचा वरचा भाग हे सारख्याच जोरानें वाढतात. म्हणून जणूंकाय शिखरस्थ कळीचेच दोन भाग होऊन ते दोन्ही सारखे वाढून चिमटयासारख्या दोन फांद्या तयार होतात अशा प्रकारचा भास होतो. परंतु वस्तुत: तशी स्थिति नसते. उपरी पाÍर्वीय कळीच जोरानें वाढत जात असल्यामुळें मुख्य खोडाचा अग्रभाग व ही पाÍर्वीय फांदी या दोहोंचा चिमटा झालेला दिसतो. शैवालवर्गांतील ज्या वनस्पतींच्या तंतूसारख्या खोडावर पानें लागतात त्यांच्यांत कळ्या कक्षस्थ नसून कक्षबाह्य असतात. बहुतकरून मुख्य खोडापासून फांद्या फुटत नाहींत. पाण व किण्व वर्गांत ज्यास खर्‍या रीतीनें कळी म्हणतां येईल असे भागच उत्पन्न होत नाहींत. परंतु त्यापैकीं ज्या वनस्पतींत मुख्य अथवा प्राथमिक शरीरापासून फांटे फुटतात ते क्लॅडोफोरा क्लॅडोस्टीफस वगैरे वनस्पतींप्रमाणें कधीं पार्श्र्वीय तर कधीं फ्यूकस, डिक्टिपोटा वगैरे वनस्पतींप्रमाणें शिर्षभेदी स्वरूपाचे असतात. हे पार्श्र्वीय फांटे पाण व किण्व वनस्पतींत अर्थांतच कक्षस्थ नसतात. कारण त्यांत पानेंच उगवत नाहींत. हायड्रोलॅपॅथम, लिक्मोफोरा, एन्टेरोमॉरफा, कॉलेरपा प्रॉलिफेरा, मॅक्रोसिस्टिस, भूछत्रें, चॅरा, फ्यूकस, चॉन्ड्रस, जिगार्टिना वगैरे. पाण व किण्व वनस्पतींत पानासारखे जे चपटे भाग उत्पन्न होतात तीं खरीं पानेंच नसल्यामुळें अर्थातच त्यांच्या कैचींत कळ्या उत्पन्न होत नाहींत.

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .