प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

वनस्पतिशास्त्र भाग १२

कलिकान्तर्गत पर्णव्यवस्था : वर वर्णन केल्याप्रमाणें पूर्ण वाढलेल्या पानासंबंधीं सर्व दृष्टीनीं विचार केल्यावर कळ्यामध्यें न उमललल्या स्थितींत पानांची जी व्यवस्था असते त्या संबंधानें चर्चा करूं. कळ्यांतील पानांचा दोन दृष्टीनीं विचार केला पाहिजे: (१) प्रत्येक पानाची व्यक्तिविषयक स्थिति व (२) जवळजवळच्या पानांची अन्योन्य स्थिति. पहिल्या स्थितीस कलिकाघटक व्यक्तिरचना असें म्हणतात. व दुसर्‍या स्थितीस कलिकाघटक अन्योन्यरचना म्हणतात कलिकाघटक व्यक्तिरचनेंत दोन प्रकार आढळतातL१) कळींतील प्रत्येक पान विशिष्ट तर्‍हेनें गुंडाळलेलें असतें. व (२) प्रत्येक पानाची विशिष्ट रीतीनें घडी केलेली असते. पहिल्या प्रकारांत पुढें दिलेल्या तर्‍हा सांपडतात: (१) मंडलाकार अथवा गुंडीदार:- कळींतील प्रत्येक पान अग्रापासून बुडापर्यंत सापाच्या वेटोळ्याप्रमाणें गुंडाळलेलें असतें जसजसें पान वाढीस लागून उकलावयास लागतें तसतसें तें वेटोळें बुडाकडून षेंड्याकडे उकलावायास लागतें (उदा. हंसराज). (२) संलुठित अथवा सुरळीदार:- या पानाच्या एका कडेपासून दुसरीपर्यंत सुरळी झालेली असते (कर्दळ, केळ). (३) अंतर्लुठित:- पानाच्या दोन्ही कडा स्वतंत्र रीतीनें पानाच्या वरच्या पृष्ठभागावर मध्यशिरेकडे उभ्या गुंडाळलेल्या असतात (ट्रडेस्कॅन्शिया). (४) बहिर्लुठित- ह्या तर्‍हेंत पानाच्या दोन्ही कडा स्वतंत्ररीतीनेंच मध्यशिरेकडे उभ्या गुंडाळलेल्या असतात. परंतु अंतर्लुठिताप्रमाणें त्या वळ्या वरच्या पृष्ठबाजूवर झालेल्या नसून खालच्या म्हणजे पानाच्या पाठीच्या बाजूवर झालेल्या असतात (पांढरा कण्हेर).

घडी झालेल्या प्रकारांत ३ तर्‍हा सांपडतात: (१) नम्राग्र:- पानाचें अग्र आकड्याप्रमाणें बुडाकडे कांहीसें झुकलेलें असतें (क्रोटन). (२) बद्धपक्ष:- मध्यशिरेवर पानाची एक बाजू दुसर्‍या बाजूवर उभ्या रीतीनें घडी झालेली असते (पेरू). (३) चूणमय, (चुण्यादार):- या तर्‍हेंत पानांच्या कित्येक उभ्या घड्या जपानी पंख्याप्रमाणें झालेल्या असतात (नारळ, पोफळ, द्राक्ष).

कळींतील पानांच्या अन्योन्यरचनेंत कांहीं प्रकार आढळतात ते असे: (१) अतिर्लुठित :- यांत संर्लुठित पानांच्या कित्येक वळ्या एकांत एक अशा रीतीनें रचलेल्या असतात (२) अंतर्द्विगुणित अथवा अन्तर्लुठित धारास्पर्शी:- यांतील कळीचीं पानें अन्तर्लुठित असून एका पातळींत चक्राकार रीतीनें लागलेलीं असतात. कळीचा आडवा छेद घेऊन पाहिलें तर एका वर्तुलाच्या परीघावर पानांच्या कमानी व्यवस्थित रीतीनें एकाजवळ एक अशा चिकटून रचलेल्या आढळतात. (३) पक्षारूढ:- ह्या प्रकारांत पानें बद्धपक्ष असून त्यांच्या एकावर एक अशा घड्या झालेल्या असतात. त्यामुळें कळीच्या आडव्या छेदांत पानांचे कित्येक चिमटे जणूं काय एकांत एक असे ठेवलेले आढळतात. (४) अर्धपक्षारूढ:- ह्या प्रकारांत जवळजवळची दोन बद्धपक्ष पानें पूर्ण रीतींनें एकांत एक अशीं रचलेली नसून प्रत्येक बद्धपक्ष पानाचा अर्धा भाग जवळच्या पानाच्या अर्ध्या भागांत अडकलेला आहे असें कळीच्या आडव्या छेदांत दिसतें.

अनोन्य रचनेच्या कांहीं प्रकारांत पानें गुंडाळलेलीं किंवा घड्या झालेलीं नसतात, ते प्रकार असे: (१) धारास्पर्शी अथवा कपाटमयी:- कित्यके पानें वर्तुळाकार रीतीनें लागलेलीं असून जवळजवळ असलेल्या पानांच्या कडा एकावर एक चढलेल्या नसून फक्त त्या एकमेकांस स्पर्श करतात. (२) विषमानुक्रमी अथवा पटलमयी-यांत कांहीं पानें पूर्ण रीतीनें दुसर्‍या पानाच्या आंत व कांहींचा अर्धा भाग बाहेर व अर्धां भाग दुसर्‍या पानांच्या आंत अशा रीतीची पानांची रचना आढळते. (३) पर्यानुक्रमी अथवा वक्र:- या प्रकारांत प्रत्येक पानाची एक कड दुसर्‍या पानाच्या आंत व दुसरी कड बाहेर अशा रीतीनें पानें रचलेलीं असल्यामुळें कळीचा आकार सुताच्या लडीप्रमाणें वक्र असा दिसतो. नमुनेदार पानांत कार्यभेदामुळें कमजास्त रूपभेदहि झालेला असतो. अशा रीतीनें कांहीं वनस्पतींत पानांचें बाह्यरूप पूर्णत: तर कांहींत अंशत: बदललेले आढळतें. अशा रीतीच्या सर्व पानांचा समावेश रूपान्तर पावलेल्या पानांच्या सदरांत केला जातो. पानांचे रूपान्तर एकाच दिशेनें झालेलें नसतें, तर तें रूपांतर कार्यविशेषत्वानुरूप निरनिराळ्या प्रकारें झालेले असतें. पानांच्या रूपान्तरांपैकीं मुख्य भेद असे: (१) सूत्र प्रतान पर्ण (प्रतानिलपर्ण):- (अ) ''चपता'' नांवाच्या लाखेच्या जातींत प्रत्येक पान अग्रापासून बुडापर्यंत पूर्ण रीतीनें सूत्रप्रतानरूप झालेलें असतें. या वनस्पतींत सन्मुख पानाप्रमाणें खोडावर उगवलेले जे भाग दिसतात ते पानांचे नसून प्रत्येक पानाच्या डाव्या उजव्या बाजूंस तळाशीं उगवलेले कणें असतात. ह्यांच्या कक्षांत (कैचींत) कळ्या किंवा फांद्या उगवलेल्या नसतात, तर जवळच्या प्रतानांच्या सूत्रांच्या कैचींतच त्या आढळतात. यावरून प्रतानांचें खरें स्वरूप सिद्ध होतें. (आ) वाटाणा, लाख, बिग्नोनिया इत्यादि वनस्पतींची पानें संयुक्त असून पत्रकापैकीं वरचीं कांहीं प्रतानरूप झालेलीं आढळतात. (इ) ''ग्लोरिओझा'' नांवाच्या वेलाचीं पानें साधीं असून त्याचीं अग्रेंच तेवढी लांब दोर्‍या प्रमाणें प्रतानरूप अथवा सूत्ररूप अशीं असतात. (२) शल्यपर्ण:- निवडुंगाच्या पडीवर जे कांटें असतात त्यांचें मूळ स्वरूप पानांचें असून कालगतीनें परिस्थितीचा परिणाम होऊन त्यांचें रूपान्तर होऊन ते शल्यरूप झालेले आहेत. ''बरबेरिस' नांवाच्या वनस्पतींत पानांचें हें रूपान्तर पूर्णपणें झालेलें नसून कांहीं पानेंच शल्यरूप झालेलीं असतात. (३) कलशपर्ण:- ''निपेन्थिस'' या वनस्पतीचीं पानें विशेषत: दलें सुरईच्या आकाराचीं झालेलीं असल्यामुळें ती प्रेक्षणीय वनस्पति आहे. या पानाचें सर्वच रूप मोठे चमत्कारिक रीतिनें रूपान्तर पावलेलें असतें. देंठ प्रतानरूप (सूत्ररूप) झालेलें, दल कलशरूप झालेलें व अग्रभाग एका स्वतंत्र पत्रकांप्रमाणें पसरट वाढून सुरईच्या तोंडावर झांकणाप्रमाणें वाकलेला किंवा प्रत्यक्ष तोंडावर पडलेला असतो. (४) ऊर्णपर्ण:- हीं पानें अगदी झिरझिरीत अशीं असतात, म्हणून त्यांमध्यें हिरवा रंग, शिरा इत्यादि पानांचे साधारण भागहि वाढलेले नसतात. भूमिगत स्कंधावरचीं पानें अशा प्रकारचीं असतात. कांद्याच्या पाती ह्यासुद्धां ऊर्णारूप (वल्करूप) पर्णेच होत. तसेंच थंडीच्या दिवसांत कांहीं झाडांच्या कळ्यांवर अशा प्रकारची ऊर्णरूप (वल्करूप) पानें, थंडीपासून कळीच्या आंतील मृदु व कोमल भागाचा बचाव करण्याकरितां उगवलेलीं असतात. हीं संरक्षक वल्करूप पानें सामान्य पानांप्रमाणें नसून त्यापेक्षां तीं लहान असतात व आकारानेंहि निराळी असतात. कळीच्या बाहेरच्या अंगाची बरींच पानें अशा प्रकारचीं असून नंतर सामान्य पानें आंत लागलेलीं असतात. अगदीं बाहेरच्या पानापासून आरंभ करून सामान्य प्रकारच्या पहिल्या पानापर्यंत सर्व पानें क्रमश: तोडून पाहिलीं तर असें दिसून येईल कीं, बाहेरच्या पानापासून आंतील पहिल्या सामान्य पानापर्यत हें रूपान्तर कमी होत जाऊन अखेर त्यास सामान्य पानाचें स्वरूप येतें.

(५) सुमनपर्णे:- फुलांच्या रंगीत व हिरव्या पाकळ्या, तसेंच मंजरीवर फुलांच्या खालीं व मंजरीदंडावर तळाशीं लागलेले हिरवे किंवा इतर रंगाचे चपटे भाग हे सुद्धां एक प्रकारें रूपान्तर झालेलीं पर्णेच असतात. ह्यांचा विचार ह्या जागीं विस्तारानें न करतां ''मंजरी'' व ''पुष्प'' या भागांत त्याविषयीं चर्चा करणें बरें.

(४) मंजरी- मूल, स्कंध व पर्ण या ३ मुख्यत: पोषण व तदनुषंगित शरीरवाढीस उपयोगी पडणार्‍या अवयवांचें वर्णन बाह्यरूपाच्या दृष्टीनें झाल्यावर अवयवोत्पत्तीच्या अनुक्रमावरून सपुष्पवनस्पतींत पुनर्जननक्रियेत उपयोगी पडणार्‍या पुष्पमय भागाचें वर्णन करणें आवश्यक आहे. सर्व सजीव वस्तू जातिविशेषत्वानुरूप कमजास्त आयुर्मानानंतर मृत्यूवश होत असल्यामुळें शरीराची पूर्ण वाढ झाल्यानंतर कुलपरंपरा कायम राहण्याकरितां त्यांमध्यें लिंगभेदानुरूप स्त्रीपुरूषभेद दाखविणार्‍या अवयवांचा विकास होऊन त्यांच्या ठायीं पुनर्जननाची शक्ति उत्पन्न होते. वरील नियमास अनुसरून सपुष्पवनस्पतींत पुष्परूपानें हे अवयव उत्पन्न होतात. ज्या भागास शास्त्रीय दृष्टीनें पुष्प म्हणतात तो विशिष्ट रचनेचा असतो. अशा विशिष्ट रचनेचे व पुनर्जननक्रियेस उपयोगी पडणारे भाग सर्ववर्गी वनस्पतींत उत्पन्न होत नाहींत. पुनर्जननक्रिया सर्ववर्गीय वनस्पतीत योग्य कालीं होते परंतु ज्या अवयवांच्या द्वारें ती क्रिया केली जाते त्यांच्या रचनेंत व फुलांच्या रचनेंत सादृश्य नसल्यामुळें त्यांच्या द्वारें होणार्‍या कार्यांत जरी साम्य असलें तरी त्यांस पुष्पांच्या कोटींत अन्तर्भूत करतां येत नाहीं. ''पाणकेश,'' ''किण्व'' ''शैवल'' व ''हंसराज'' वर्गांत पुनर्जननाकरितां पुष्पोत्पत्ति होत नाहीं. सपुष्पोत्पत्ति होत नाहीं. सपुष्पवर्गांतील वनस्पतींतच तेवढी पुनर्जननक्रियेकरितां पुष्पें उत्पन्न होतात. पुनर्जननक्रिया तीन तर्‍हांनीं शकते. पैकीं पहिल्या प्रकारास प्रारोहक पुनर्जनन, दुसर्‍यास असंभोगजन्य व तिसर्‍यास संभोगजन्य पुनर्जननक्रिया अशीं नांवें आहेत. पहिल्या तर्‍हेनें पुनर्जननक्रिया होण्याकरितां ज्यामध्यें एक किंवा एकापेक्षां जास्त कळ्या आहेत असा किंवा कोणताहि एक सामान्य रचनेचा भाग वनस्पतीच्या शरीरापासून विभक्त होऊन स्वतंत्र रीतीनें वाढूं लागून त्यायोगें एक स्वतंत्र नवी वनस्पति उत्पन्न होते. उदाहरणार्थ घायपाताच्या सोटावर फुलाबरोबर अनेक कळ्या अथवा 'कदंक' उत्पन्न होऊन त्या सोटापासून जमिनीवर पडल्या म्हणजे अनुकूल परिस्थितींत त्या प्रत्येक मुगार्‍यासारख्या ''कंदका'' पासून एक एक नवीन घायपाताचें झाड उत्पन्न होऊं शकतें. केळीच्या किंवा कर्दळीच्या भूमिगत स्कंधापासून अनेक सामान्य कळ्या उत्पन्न होऊन त्यापासून स्वतंत्र रीतीनें जगणारीं अनेक रोपटीं तयार होतात. तसेंच कलमें लावून जे नवे रोपे तयार करतात ती पद्धत सुद्धां प्रारोहक पुनर्जननक्रियेंतच अन्तर्भूत होते. ही पुनर्जननाची तर्‍हा वनस्पतींच्या सर्व वर्गांत कमजास्त प्रमाणांत सांपडते.

असंभोगजननक्रियेमध्यें वनस्पतीच्या शरीरापासून एक अथवा जास्तीत जास्त दोन पेशींनीं बनलेला असा एक विशेष भाग ''आद्यजीवरसा'' पासून उत्पन्न होऊन त्या पासून स्वतंत्र रीतीनें त्या जातीची नवीन वनस्पति जन्म पावूं शकते. अशा एकपेशी अथवा द्विपेशीमय भागस ''स्वयंभव'' असें म्हणतात. स्वयंभवांच्या द्वारें सजातीय नवीन वनस्पतींची उत्पत्ति पाणवनस्पतींत व किण्ववनस्पतीत सामान्येंकरून जास्त प्रमाणांत आढळते. शैवल, हंसराज व सपुष्पवर्गांतहि स्वयंभवें उत्पन्न होतात परंतु त्यांपासून ज्या नवीन वनस्पती उत्पन्न होतात त्या मूळ वनस्पतीप्रमाणें रूप व अवयवानें नसतात. म्हणून ''असंभोगजन्य'' पुनर्जननाच्या पद्धतीनें त्या वर्गांत कुलपरंपरा प्रत्यक्ष रीतीनें कायम ठेवली जात नाहीं.

आतां ज्यांस ''संभोगजन्य'' पुनर्जननक्रिया असें नांव दिलें जातें त्या पद्धतीनें पुनर्जनन होण्यासहि असंभोगजन्य पुनर्जननपद्धतीप्रमाणें विशेष प्रकारच्या पेशी आद्यजीवरसापासून उत्पन्न होण्याची आवश्यकता असते. परंतु अशा प्रकारें उत्पन्न झालेल्या पेशी स्वतंत्र रीतीनें एकएकटया नवीन स्वतंत्र वनस्पतीस जन्म देऊं शकत नाहींत. तर अशा दोन पेशींचा संयोग प्रथम होऊन जी एक संयुक्त पेशी बनते तिच्या वाढीनेंहि नवीन वनस्पति उत्पन्न होंऊं शकते. अशा रीतीनें नवीन वनस्पति जन्मास येण्यास दोन पेशींचा संयोग होणें अवश्य असल्यामुळें या पद्धतीस ''संभोगजन्य'' पुनर्जननक्रिया म्हणतात.

पुनर्जननाची ही तर्‍हा ''शैवल, हंसराज आणि सपुष्प'' वर्गांत सर्रास आढळते. पाणवनस्पति आणि किण्ववर्गांतहि पुनर्जननाची ही तर्‍हा आढळते परंतु ती सर्व सामान्यत्वानें प्रधान नसून त्यापैकीं कांहीं कुलांत व तीहि कांहीं विशिष्ट परिस्थितींत तेवढी घडून येते. ''संभागेजन्य'' पुनर्जननक्रियेंत ज्या दोन पेशींच्या संयोगानें नवीन वनस्पति उत्पन्न होते त्यांत कुलवैशिष्टयानुरूप लिंगभेददर्शक (स्त्रीपुरूष) चिन्हेंहि विकास पावलेलीं असतात. पाण व किण्ववर्गांत हीं चिन्हे इतक्या स्पष्ट रीतीनें दृग्गोचर होत नाहींत. कित्येक कुलांत तर ह्या संयोग पावणार्‍या दोन पेशी अगदीं सारख्या असतात. त्यांत लिंगभेद करणें सर्वस्वी अशक्य असतें. अशा रीतीनें परस्पर संयोग पावून त्यायोंगें बनलेल्या पेशींच्या वाढीनें एक नवीन सजातीयं वनस्पति उत्पन्न करणार्‍या प्रत्येक पेशीस संभोगपिंड असें म्हणतात व या संभोगपिंडामध्यें लिंगभेद झाला असल्यास त्यांपैकीं जास्त चलाख असणार्‍या संभोगपिडांस रेतपिंड व सामान्यत्वें स्थिर असणार्‍या पिंडास रज:पिंड असें म्हणतात.

सपुष्पवनस्पतींत फुलांच्या विशिष्ट भागांस हे रेतरज:पिंड उत्पन्न होऊन त्यांचा यथाकाल संयोग होऊन नवीन वनस्पतीच्या गर्भाचे बीजारोपण होत असल्यामुळें पुष्पांच्या द्वारें जी पुनर्जननक्रिया होत असतें ती तिसर्‍या म्हणजे संभोगजन्य पुनर्जननाच्या प्रकारांत अंतर्भूत होते. अशा रीतीनें ''संभोगजन्य'' पुनर्जननक्रियेस मदत करणार्‍या पुष्पमय भागांचें वर्णन आतां करूं. कार्यभेदास अनुसरून वनस्पतींच्या अवयवांचे दोन वर्ग होऊं शकतात. पहिल्या वर्गांत पोषण व वाढीस प्रत्यक्ष साहाय्य करणार्‍या मूल, स्कंध व पर्ण या तीन मुख्य अवयवांचा समावेश केला जातो व दुसर्‍या वर्गांत ''संभोगजन्य'' पुनर्जननक्रियेस साहाय्य करणार्‍या पुष्प, फल व जीव या अवयवांचा समावेश होतो. पहिल्या वर्गांतील अवयवांचें जें संक्रमण दुसर्‍या वर्गांतील अवयवांत होतें तें बहुतकरून एकदम न होतां क्रमाक्रमानें होत जातें. म्हणजे प्रथम पानांचा आकार लहान लहान होत जातो व पुढें या लहान पानांच्या कक्षेंत (कैचीत) फुलांच्या किंवा फुलें देणार्‍या फांद्यांच्या कळ्या उगवतात. या फूलदार फांद्यांवरहि प्रथम पानासारखे अगदीं लहान लहान भाग उगवतात. व सरशेवटीं अशा प्रत्येक भागाच्या कैचींत एक एक फूल उगवतें. फुलांची रचना पाहिली तरी देखील संक्रमणाचा हा क्रम त्या रचनेंतहि दिसून येतो. कारण फुलाचे बाहेरील भाग चक्ररचित हिरव्या किंवा हिरवट लहान पानाप्रमाणेंच असतात. नंतर रंगीत पाकळ्यांचें वर्तुळ लागतें. या पाकळ्या देखील पानाप्रमाणें पसरट असतात व त्यांच्या आंत असलेल्या तंतुमय भागांत मात्र हे संक्रमण इतकें जास्त झालेलें असते कीं त्या तंतुमय भागांत व पानांत फारच थोडें साम्य असतें किंवा अशा साम्याचा अभावच असतो असें म्हटलें तरी चालेल. उदाहरणार्थ कर्दळ व पांढरा अथवा गुलाबी किंवा लाल कण्हेराच्या फुलें आलेल्या फांद्यांची तपासणी करून पाहिली असतां वरील विधानाची सत्यता कळून येईल. सामान्य पर्णमय भागास आपण प्ररोहणाचा भाग असें नांव देऊं. याप्रमाणें दोन विशिष्ट कार्यांकरितां उत्पन्न झालेलें हें प्ररोहण व पुनर्जननाचे भाग सामान्यत: एकमेकापासून स्वतंत्र असेच असतात. म्हणजे पुष्पमय भागांत सामान्य पानांची खिचडी झालेली नसते. तर मुख्य खोडाच्या किंवा त्याच्या शाखांच्या षेंड्यावर फुलें व खालच्या भागावर पानें अशा रीतीची त्यांची मांडणी असते. यामुळें शेडयांचा हा पुष्पमय भाग खुडून टाकला असतां पर्णमय प्ररोहणाचें कार्य करणारा भाग तेवढा बाकी रहातो.

सपुष्पवनस्पतींच्या शरीराची वरील प्रकारची विभागणी कापशी, भेंडी, जास्वंद, अंबाडी इत्यादि झाडांच्या कुलांत व त्याचप्रमाणें इतर कांहीं वनस्पतींत मात्र होऊं शकत नाहीं. या झाडांचीं फुलें एका फांदीवर किंवा किंत्येक फांद्यांच्या षेंड्यावर स्वतंत्र रीतीनें एकत्रित झालेलीं नसून एक एक स्वतंत्र फूल सामान्य आकाराच्या पानाच्या कैचींत उगवलेले आढळतें, व त्यामुळें प्ररोहण व पुनर्जननाचे भाग कोणत्या जागीं एकमेकापासून स्वतंत्र होतात हें ठरविणें अवश्य होतें. अशा प्रकारें फुलें एकएकटीं किंवा संघानें झाडावर उगवतात. सामान्य पानांच्या कैचींत एक एक स्वतंत्र अशा रीतीनें उगवणार्‍या फुलांस ''एकाकी'' फुलें म्हणतात. व अनेक फुलांनीं झालेल्या पुष्पसंघास ''मंजरी'' असें म्हणतात. प्रत्येक मंजरीचे सामान्यत: तीन भाग करतां येतात: (१) फलक, (२) मंजरीचा अक्ष, व (३) पुष्प. ज्या पानासारख्या भागाच्या कैचींत एकाकी फूल किंवा पुष्पमंजरी उगवलेली असते तीस “फलक” असें म्हणतात. तळाच्या या फलकाशिवाय मंजरीचें प्रत्येक फूल एकएक स्वतंत्र ''फलका''- सारख्या भागाच्या कक्षेंत उगवलेलें असतें. अशा सर्व भागास सामान्य: फलक याच नांवानें संबोधितात. परंतु मूळ तळाच्या ''फलका'' शिवाय बाकी इतर तत्सद्दश भागांस फलकिल असेंहि म्हणण्याची चाल आहे.

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .