प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

वनस्पतिशास्त्र भाग १३

फलकांचे प्रकार : ''फलक'' हिरव्या अथवा दुसर्‍या एखद्या चटकदार रंगाचेहि असतात. तसेंच ते रंगहीन झिरझिरीत तलम असेहि असूं शकतात. उदाहरणार्थ भेंडी, कृष्णनीळ, अंबाडी या झाडांचीं फुलें पानाप्रमाणें हिरव्या व मोठया रूंद फलकांच्या कैचींतच उगवलेलीं असतात. अशा फलकांस ''पूर्णफलक'' असें म्हणतात. ''बोगनवीलिया, केंवडा'' या वनस्पतींत चटकदार रंगीत ''फलक'' असतात. व सूर्यकमळाच्या पुष्पगुच्छाच्या प्रत्येक बारीक फुलाच्या तळाशी झिरझिरीत तलम असा एक बारीक ''फलक'' असतो.


फलकप्रकार:- गाजर, धने, सूर्यकमळ, झेंडू, झिनिया, करडई, कारळे इत्यादिकांच्या मंजरीच्या तळाशीं तसेंच कापूस, जास्वंद, स्ट्राबेरी इत्यादि फुलांच्या पाकळ्यांच्या खालच्या बाजूस कित्येक फलकांचीं एक किंवा अनेक वर्तुळं बनलेलीं असतात. अशा प्रकारें मंजरीच्या किंवा एकाकी फुलांच्या तळाशीं फलकांचें जें एक वर्तुळ किंवा अनेक वर्तुळें कौलाप्रमाणें अशंत: एकावर एक चढलेल्या फलकांनीं झालेलीं असतात त्यांस ''फलकप्राकार'' असें म्हणतात. धने, गाजर इत्यादि वनस्पतींत मंजरी अनेक शाखायुक्त असते. या सर्व शाखा ज्या एका जागेपासून उत्पन्न झालेल्या असतात त्या ठिकाणी फलकांचें एक चक्र असून प्रत्येक फांदीच्या षेंड्यास फुलांचा जो एक झुपका लागलेला असतो त्याच्या तळाशीं लहान लहान फलकांचें एक एक स्वतंत्र चक्र बनलेलें असतें. ह्या प्रत्येक स्वतंत्र चक्रास ''फलकिलप्राकार'' असेंहि नांव दिलें जातें.

फणा:- जेव्हां ''फलक'' फार मोठा होऊन मंजरी उमलण्यापूर्वी ती पूर्णपणें त्याच्या आंत झांकून गेलेली असते तेव्हां त्या फलकास ''फणा'' असें म्हणतात. उदाहरणार्थ पोफळ, नारळ, केळ, अळू, कांदा इत्यादिकांच्या मंजरींची न उमललेली, अर्धवट उमललेली व पूर्ण उमललेली स्थिति पाहिली तर फलकांचें आच्छादन त्यावर फणीप्रमाणें पहिल्या स्थितींत कसें वेढलेलें असतें व तें हलके हलकें उकलून मंजरी कशी बाहेर पडत जाते याची खरी कल्पना येईल. ''फणा '' झिरझिरीत पातळ किंवा जाडहि असते तसेच ती निरनिराळ्या रंगाचीहि असते. केळीच्या झाडांत एकच मोठी फणा मंजरीच्या बाहेर नसून मंजरीच्या अक्षावर निरनिराळ्या उंचीवर जे फुलांचे पुंजके लागलेले असतात त्या प्रत्येक पुंजक्यास झांकणारी एक एक स्वतंत्र फणा असते. अशा प्रकारच्या फणांस ''उपफणा'' असें म्हणतात.

तूस :- भात, गहूं, जव, जोंधळा इत्यादि धान्यांच्या व कोणत्याहि प्रकारच्या गवताच्या मंजरीच्या लहान लहान खुरटया शाखांवर पुष्पभागांच्या बाहेर चिवट असे हिरवे किंवा पांढरे झिरझिरीत असे फलक एकमेकावर बरेच घट्ट अशा रीतीनें उगवलेले असतात. धान्याची मळणी करतांना हेच भाग दाण्यापासून सुटे होऊन त्यांचें तूस होतें. अशा प्रकारच्या फलकाच्या या विशेष जातीस ''तूस'' असें म्हणतात. अकॉर्न नांवाच्या झाडाच्या फुलांच्या तळाशीं एक वाटीसारखें वर्तुळ असतें. ही वाटी फलकांच्या संयोगानें झालेली असते व पाकळ्या वगैरे झडून गेल्यावर ती वाटी फळाच्या तळाशीं वाढते व फळाच्या कवटीप्रमाणें तीहि लांकडासारखी टणक होते. अशा ह्या लांकडी फलकांनीं बनलेल्या वाटीस फलकपुट असें म्हणतात.

मंजरीचा अक्ष:- मंजरीचा दुसरा मुख्य भाग तिच्या अक्षांचा आहे. प्रत्यक्ष अक्षावर किंवा त्यापासून फुटलेल्या फांद्यावर फुलें लागलेलीं असतात. मंजरीचा अक्ष कांहीं वनस्पतींत लांब तर कांहींत रूंद व पसरट असा वाढत असल्यामुळें जाड व आंखूड असा असतो. लांब वाढणार्‍या अक्षास ''यूप'' (मंजरी) व आडव्या वाढणार्‍या अक्षास ''पीठ'' मंजरी म्हणतात. ''यूप'' शाखामय किंवा शाखारहित अशा दोन्ही तर्‍हेचा असतो त त्यावर किंवा त्याच्या शाखावर जीं फुलें लागतात तींहि देंठाचीं किंवा बिनदेंठाचीं असतात. खरें म्हटलें असतां फुलांचे हे देंठ अक्षाच्या अंतिम शाखाच असताच व त्यांवर फुलांचे घटकावयव समकेंद्र वर्तुलाकार रीतीनें उगवलेले असतात. अशा रीतीनें शाखामय अक्ष असला म्हणजे त्याच्या मध्यभागास ''आदियूप'' अथवा प्रथम वर्गीय यूप, व त्याच्या शाखांस क्रमानुसार द्वितीय, तृतीय, चतुर्थ इत्यादि वर्गीय ''यूप'' असें म्हणतात. आणि फुलें देंठदार असलीं म्हणजे त्या देंठास ''यूपक'' असे म्हणतात. यूपकाच्या ज्या किंचित जास्त जाड अशा शिरोभागावर फुलांच्या पाकळ्या वगैरे भाग उगवलेले असतात त्यांस ''आधार'' (पुष्प) असें म्हणतात. शाखामय यूपास किंवा “यूपक” रहित बैठी फुलें धारण करणार्‍या यूपास “वंश” असेंहि म्हणतात. सुदर्शन, कांदा इत्यादि कंदमय वनस्पतींत “यूप” जमिनीपासून उगवलेला असल्यामुळें तो जणुं काय मुळापासूनच उगवला आहे असें दिसतें म्हणून त्यास मूलज यूप असें म्हणतात. तेव्हां लांब वाढलेल्यास यूपास “वंश” , पसरट किंवा खुरट्या अशा यूपास “पीठ” व यूपकाच्या पुष्पभाग धारण करणार्‍या अग्रास “आधार” या एकेरी सोप्या शब्दांनीं या पुढें संबोधूं.

पीठ चेंडूसारखें वाटोळें (बाभूळ), खिशांतील घड्याळाच्या कांचेप्रमाणें ''उन्नतपृष्ठ'' (झेंडू), शंकूच्या आकाराचें (झिनिया), तबकडीच्या आकाराचें (सूर्यकमळ), उडुंबराकार (अंजीर, औदुंबर, पिंपळ, वड) इत्यादि भिन्न प्रकारचें असतें.

''आधार'' हा प्यालेदार (गुलाब), गोलकाकार (सोनचाफा), ''मंचकाकार'' किंवा ''मंचाकार'' (कमळ) इत्यादि विशेष प्रकारच्या कित्येक फुलांत सांपडतो. परंतु सामान्यत: त्याचा विशेष असा आकार नसतो. ओवा, धने, गाजर इत्यादिकांच्या फुलांत आधाराचा भाग फळाच्या आंत घुसून बरोबर मध्यें काडीसारखा वाढतो व त्यामुळें त्या ठिकाणीं फळाचीं दोन बरोबर छकलें होतात. अशा आधारास ''फलाधार'' असें म्हणतात. पांढर्‍या तिळवणींच्या फुलांचा ''आधार'' पाकळ्यामधून वर वाढतो व त्यामुळें फुलाच्या पुं व स्त्रीकेकसरांच्या खालीं एकावर एक त्याचीं २ कांडीं होऊन त्यावर ते केसर लागलेले असतात; पैकीं पुंकेसरांनां धारण करणार्‍या कांड्यास ''केसराधार'' असें म्हणतात व स्त्रीकेसरांनां धारण करणार्‍या कांड्यास किंजल्काधार असें म्हणतात. कांहीं वनस्पतींत (मोहरी) आधाराच्या व फुलाच्या मध्यें प्रसवणारे पिंड असतात. हे पिंड अंशत: आधाराचेच भाग असतात व त्यांस ''मधुपिंड'' असें म्हणतात. नारिंग, लिंबू व दुसर्‍या कांहीं वनस्पतींच्या फुलांत ''आधारा'' चा वरचा भाग स्त्रीकेसराच्या तळास प्याल्याप्रमाणें, तबकडीप्रमाणें किंवा गोलकासारखा वाढलेला असतो व त्यावर स्त्रीकेसराचा खालचा फुगीर भाग बसल्यासारखा दिंसतो. आधाराच्या अशा भागास ''बिंब'' असें म्हणतात. धनें, ओवा, बडीशोप इत्यादिकांच्या फुलांत अंडाशयाच्या शिरोभागीं ''ध्वजा'' (परागवाहिनी) तंतूच्या पायाशीं ''बिंबा'' सारखा फुगीर जाड भाग वाढलेला असतो. अशा बिंबास ध्वजापदबिंब असें म्हणतात. व्हेलिस्नेरिया नांवाच्या पाणवनस्पतींत “आधार” लांब बारीक दोर्‍यासारखा वाढतो , व तो स्प्रिंगप्रमाणें परिस्थित्यनुरुप कमजास्त लांब होऊं शकतो. अशा ''आधारास'' ''सर्पिलसूत्राधार'' असें म्हणतात.

पुष्प-व्यवस्था मंजरीचा शेवटाला व महत्त्वाचा भाग पुष्पाचा आहे. पुष्पाचें वर्णन अनेक दृष्टीनीं करतां येतें; पैकीं मंजरीच्या प्रकरणांत मंजरीच्या अक्षावर तीं कोणत्या व्यवस्थेनें उगवतात याविषयींचें वर्णन प्रथम देणें भाग आहे. मंजरीच्या पुष्पांची व्यवस्था यूप किंवा यूपकाच्या वाढीवर अवलंबून असते. कांहीं वनस्पतींत मंजरीच्या प्रधान यूपाची वाढ नवीन फुलांची उत्पत्ति होण्याचें थांबेपर्यंत खुंटत नाहीं व सर्व फुलें या यूपावर किंवा त्यापासून फुटलेल्या शाखांवर अग्र सोडून बाजूंवर उगवलेलीं असतात. पुष्पांच्या या व्यवस्थेस ''अपरिमित'' पुष्पव्यवस्था असें म्हणतात. उदाहरणार्थ अंबा, संकासूर, मुळा इत्यादि झाडांच्या फुलांची व्यवस्था. ''अपरिमित'' पुष्पव्यवस्थेशिवाय मोगली एरंड, दातरंग, बिंतालकडी इत्यादि दुसर्‍या कांहीं वनस्पतींत मंजरीच्या प्रधान यूपाची वाढ त्याच्याबरोबर अग्रावर एक फूल उगवून खुंटून जाते. आणि त्यामुळें यापुढें मंजरीची जी वाढ होऊं शकते ती केवळ या अग्रावरील फुलांच्या खालीं नवीन फांटे फुटून होते परंतु त्यांची वाढ सुद्धां त्यांच्या अग्रावर नवीन फुलें उगवून प्रधान यूपाप्रमाणें खुंटते व तसें झाल्यावर पुन्हां या फुलांच्या खालीं नवीन फांद्या फुटून मंजरीचा विस्तार होत जातो. मंजरीचा विस्तार वरील प्रमाणें थांबत थांबत होत असल्यामुळें व प्रधान यूपाची वाढ सतत सारखी होत नसल्यामुळें अशा प्रकारच्या पुष्पव्यवस्थेस परिमित असें म्हणतात. पुष्पव्यवस्थेचे अपरिमित व परिमित असे दोनच मुख्य भेद असले तरी प्रधानयूपाची कमजास्त वाढ. तो शाखामय किंवा शाखारहित असणें, यूपकांची कमजास्त लांबी, तसेंच त्यांचें अस्तित्व व अभाव इत्यादि गुणांस अनुसरून या प्रत्येक मुख्य भेदाचे कित्येक पोटभेद केले जातातते पुढें देतों:- अपरिमित पुष्पव्यवस्थेंत कांहीं मंजिर्‍या वंशयुक्त असल्यामुळें लांबट अशा वाढतात व कांहीं पीठयुक्त असल्यामुळें पसरट अशा वाढलेल्या असतात. वंशयुक्त लांबट मंजर्‍या पैकीं कांहींत पुष्पें यूपकायित अथवा यूपकयुक्त व कांहींत यूपकहीन असल्यामुळें तदनुरूप त्यांचे निरनिराळे पोटभेद केलें जातात व वर्णनाच्या सोईकरितां त्यांस अनुरूप अशीं नांवें देतात. त्यांपैकीं मुख्य मुख्य पोटभेद पुढें दिले आहेत.

अपरिमित लांबट वंशयुक्त मंजिर्‍यांचे पोटभेद:- (१) वल्लरी:- ह्या मंजरीचा वंश शाखारहित असून पुष्पें यूपकायित असतात व त्यांचे पूर्ण वाढलेले यूपक सारख्या लांबीचे असल्यामुळें फुलें एकावर एक निरनिराळी लागलेलीं दिसतात व त्यांचा विकास अधरोत्तर अनुक्रमानें झालेला असतो. म्हणजे जुनीं प्रथम उगवलेलीं फुलें खालच्या बाजूस व मागाहून उगवलेलीं फुलें वरच्या अग्राकडे लागलेलीं असतात. उदा. द्राक्ष, मुळा, संकासूर इ. (२) गुच्छ अथवा मोर्चल:- या मंजरीची रचना एका बाबीशिवायकरून बाकी सर्व गुणांनी ''वल्लरी'' सारखी असते परंतु हिच्या फुलांचे यूपक कमजास्त लांबीचे असतात व खालच्या फुलांचे यूपक लांब व वरच्या बाजूच्या फुलांचे यूपक कमी लांब अथवा आंखूड असतात व त्यामुळें सर्व फुलें गुच्छाप्रमाणें एका पातळींत लागलेली दिसतात (घाणेरी, कंडीटफ्ट) (३) संयुक्त वल्लरी अथवा चामरी- या प्रकारच्या मंजीरचा ''वेश'' शाखामय असून फुलें प्रधान ''वंशा'' वर न उगवतां त्याच्या शाखांवर उगवलेली असतात व त्यांची रचना वल्लरीप्रमाणें असल्यामुळें मंजरीची प्रत्येक शाखा यथार्थत: एक स्वतंत्र वल्लरीच असते व अशा अनेक शाखांनीं ही मंजरी झाली असल्यामुळें चामरी मंजरीस संयुक्त वल्लरी असेंहि म्हणतात (उदाहरण, आंबा, अमरा). (४) संयुक्त गुच्छ:- ही मंजरी सुद्धां शाखामय असून सर्व शाखांचे षेंडे एका पातळींत येऊन त्या प्रत्येकीवर साध्या गुच्छाप्रमाणें लागलेलीं फुलेहि मोठया गुच्छाप्रमाणें एकत्र जमलेलीं व एका सपाटीवर आलेलीं असतात (उदा.- फुलगोभी, रूई) (५) कणिश- या मंजरीचीं फुलें यूपकहीन असतात व बाकी सर्वरचना वल्लरी प्रमाणे असते (आघाडा) (६) संयुक्त कणिश:- ही मंजरी सुद्धां साध्या कणिशाप्रमाणें दिसते परंतु नीट लक्षपूर्वक बारकाईनें तपासणी केली तर असें आढळतें कीं, मंजरीच्या प्रधान यूपावर जे भाग यूपकहींन पुष्पासारखे लागलेले असतात ते एक पुष्पमय नसून प्रत्येक भागांत एकाहून जास्त यूपकहीन फुलें लहानशा उपयूपावर लागलेलीं असतात. म्हणून यथार्थ रीतीनें ही मंजरी लघुशाखामय असून दिसण्यांत तेवढी सामान्य कणिशाप्रमाणें दिसते. संयुक्त-कणिश मंजरीची प्रत्येक छोटेखानी शाखा वस्तुत: एक लहानगी साधी कणिश-मंजरी असते. आकारानुरूप अशा शाखेस ''कणिशक'' हें नांव दिलें जातें. म्हणून संयुक्त कणिश-मंजरी अनेक कणिशकांची झालेली असते अशी तिची थोडक्यांत व्याख्या करतां येते.

कणिश मंजरीचे पोटभेद, तालीक:- ही कणिशमंजरी फणायुक्त असते म्हणून ती कोंवळी असतांना निदान फणेनें वेष्टिलेली असते (उदा. अळू). संयुक्त तालीक:- ही मंजरी शाखामय असून फुले ''यूपकहीन'' असतात आणि सबंध मंजिरी एका मोठया फणेंत कोंवळी असतांना गुरफटलेली असते (उदा. पोफळ, ताड, माड, खजूर इत्यादि) बिडाल लूमी:- कणिशमंजरीच्या या पोटभेदांत मंजरीचीं फुलें एकलिंगी म्हणजे केवळ केसरित किंवा किंजल्कित असतात व मंजरीचा ''यूप'' लवचिक असल्यामुळें मंजरी स्कंधापासून खालच्या बाजूस लोंबत असते (उदा. भूर्ज, ओक,) दारू:- ह्याहि कणिशमंजरीचीं पुष्पे केवळ स्त्रीलिंगी म्हणजे केवळ ''किंजल्कित'' असून त्यांस पाकळ्या नसतात व तीं झिरझिरीत फलकांच्या कक्षेंत उगवलेलीं असतात (उदा. देवदारू). छत्र:- या मंजरीचा ''अक्ष'' आंखूड असून सर्व फुलें ''यूपक'' युक्त जवळजवळ एकाच जागेपासून उगवलेलीं दिसतात व त्यांच्या विकासाची दिशा केंद्रगामी असते म्हणजे बाहेरील फुलें आधीं उमलतात व मध्यवर्ती फुलें मागाहून उमलतात (उदा. कांदा). मंजरीचा आकार छत्रासारखा दिसतो. संयुक्त छत्र:- या मंजरीचा ''अक्ष'' शाखामय असून सर्व शाखा एका जागेपासून फुटून किरणाप्रमाणें सर्व दिशांस फांकतात व प्रत्येकीच्या षेंड्यावर फुलांची मांडणी साध्या छत्राप्रमाणें असते. अशा प्रकारच्या मंजरीत शाखांच्या तळीं फलक प्राकारचीं व फुलांच्या तळी फलकिल प्राकाराचीं वर्तुळें सामान्यत: असतात (उदा. गाजर, धने).

पीठयुक्त मंजरीचे पोटभेद, मौली अथवा मौलीन:- या मंजरीचें पीठ पसरट, वाटोळे, शंकूसारखे उन्नतपृष्ठ इत्यादि आकारांचें असून त्या पीठाच्या बाहेरील पृष्ठभागावर यूपकहीन फुलें लागलेलीं असतात व फुलांचा विकास केंद्रगामी तर्‍हे नें होतो (उदा. सूर्यकमळ, झेंडू, मका, बाभळ). कुच:- या मंजरीचें ''पीठ'' मोदकाच्या आकाराचें असतें. वरचें कवच जाड पीठाचें असून तें मोदकाच्या पापुद्रयाप्रमाणें आंतील बाजूस पोकळ असून मोदकाच्या पुरणाप्रमाणें आंतल्या बाजूस बारीक बारीक यूपकहीन फुलें फार दाटीनें लागलेलीं असतात. मंजरीचा निमुळता भाग खालचा म्हणजे अक्षदंडाचा असतो व वरचा वाटोळा पसरट भाग व बाजूंचा भाग पीठाचा असतो. तबकडीवजा वरच्या वाटोळ्या भागाच्या मध्यभागीं एक सूक्ष्म छिद्र असून तें बारीक बारीक फलकांनीं आच्छादिलेलें असतें.

परिमित पुष्पव्यवस्था अथवा मंजरीचे पोटभेद:- प्रधान यूपाची वाढ खुंटल्यावर ज्या शाखा अग्रपुष्पाच्या खालीं फलकाच्या कक्षेंत उगवून मंजरीचा विस्तार होत राहातो त्यांच्या संख्येस अनुसरून परिमितपुष्पव्यवस्थेचे (१) ''एकभुजपरिमित'' (२) ''द्विभुज परिमित'' व (३) ''बहुभूज परिमित'' असे तीन पोटभेद केले जातात व त्यांपैकीं एकभुजपरिमित मंजरीचीं सर्व पुष्पे एकाच बाजूस किंवा आलटून पालटून दोन्ही बाजूंस उगवलेलीं असतील त्याप्रमाणें ''मंडलाकार'' व ''कुटिल अथवा व्राश्र्चीक'' असे आणखी दोन उपभेद केले जातात. याशिवाय ''एकाकी'' अग्रफुलांचा एक पोटभेदहि ''परिमित'' पुष्पव्यवस्थेत समाविष्ट करणें आवश्यक आहे, किंबहुना या व्यवस्थेपैकीं तो एक सर्वांत साधा प्रकार आहे. किंबहुना या व्यवस्थेपैकीं तो एक सर्वांत साधा प्रकार आहे. यामध्यें मुख्य स्कंध व त्याच्या शाखा यांच्या अग्रावर फक्त एकएकच फूल उगवतें किंवा सर्व फुलें एकाकी कक्षस्थ अशीं असतात. उदाहरणार्थ पिंवळा धोत्रा किंवा अफूच्या झाडाच्या फुलांची व्यवस्था पाहिली असतां असें दिसून येईल कीं, प्रथम सर्वांच्या आधीं उमलणारे फूल मुख्य स्कंधाच्या अग्रावर असतें व त्यानंतर खालच्या बाजूस असणार्‍या कक्षस्थ शाखांच्या अग्रावर तीं एक एक अशीं क्रमानें खालच्या खालच्या बाजूस उमलत जातात. वरीलप्रमाणें कृष्णनीळ व जास्वंद यांच्या फुलांची व्यवस्था पाहिली तर असें आढळतें कीं फुलें एकाकी कक्षस्थ असून सामान्य शाखांच्या अग्रांवर त्यांची उत्पत्ति झाली नसून कक्षस्थ असलेल्या स्वतंत्र यूपांच्या अग्रावर तीं उगवलेलीं असतात. वरील मुख्य पोटभेदाशिवाय ''परिमितगुच्छ'' ''परिमितछत्र'' व ''आवर्तपरिमित'' असे आणखीहि पोटभेद या प्रकारच्या पुष्पव्यवस्थेंत सांपडतात. वरील सर्व प्रकाराच्या पोटभेदांचें जास्त सविस्तर वर्णन पुढें दिलें आहे.
वेषधारी अक्षयुक्त परिमित मंजरीचे पोटभेद (१) एकाकी अग्रपुष्पधारी:- या पोटभेदास मंजरीचें स्वरूपच येत नाहीं. कारण सर्व फुलें एकएकटीं अशीं सामान्य शाखांच्या किंवा अग्रस्थ व कक्षस्थ यूपांच्या अग्रांवर उगवलेलीं असतात, एकाच यूपावर किंवा त्यापासून फुटलेल्या शाखांवर संघानें उगवलेलीं नसतात. (उदा. अफू, पिवळा धोत्रा, जास्वंद, भेंडी).

(२) एकभुज परिमित:- प्रधानयूपाच्या अग्रावर फक्त एकच फूल उगवून त्याची वाढ खुंटते व त्याच्या खालच्या बाजूस कांहीं अंतरावर फक्त एकच “फलक” असून त्याच्या कक्षेंत एक दुसऱ्या प्रतीच्या यूपाची उत्पत्तिा होऊन तो अग्रफुलाच्या उंचीपेक्षां जास्त उंचीपर्येत वाढून त्याच्या अग्रावर एक एकाकी फूल व त्याखालीं एक फलक उगवून त्याची वाढ प्रधान यूपाप्रमाणें खुंटते व त्यानंतर खालील फलकाच्या कक्षेंत एक तिसऱ्या प्रतीचा “यूप” उत्पन्न होऊन त्याखालील “यूपा” च्या उंचीपेक्षा जास्त उंचीपर्येत त्याची वाढ झाल्यावर खालच्या यूपाच्या स्थितीप्रमाणें याचीहि वाढ खुंटते व पुन्हां त्याच्या अग्रफुलाच्या खालीं असलेल्या “फलका” च्या कक्षेंत नवीन यूप उत्पन्न होऊन मंजरीचा विस्तार पुढें चालू रहातो. अशा रीतीनें उगवललेल्या स्वतंत्र यूपांचे तुकडे प्रथम एकमेकावर एका रेषेंत येण्याचा संभव असतो. असें झालें म्हणजे या स्वतंत्र यूपांच्या योगानें एक लांबट वंशासारखा “खोटा यूप” अथवा “अक्ष” निर्माण होऊन त्यावरचीं सर्व अग्रफुलें बाजूस ढकललीं जाऊन फलाकांच्या समोर उलट बाजूस तिरपीं लागलेलीं दिसतात. अशा स्थितींत ते निरनिराळया फलाकांच्या कक्षेंत उगवलेले यूप एका रेषेंत वाढूं लागले म्हणजे जो खोटा अथवा वेषधारी अक्ष अथवा मंजरीवंश निर्माण होतो त्यावर एका बाजूस रिकामे फलक व त्यांचयाच समोरील उलट बाजूस फलकहीन फुलें लागलेलीं दिसतात. सर्व फलकांच्या रिकाम्या स्थितीवरून व सर्व फुलांच्या फलकहीनत्वावरून या मंजरीच्या “वेषधारी” वंशाचें खरें स्वरूप ओळखतां येतें. अशा प्रकारच्या “एकभुज” मंजरीमध्यें जे “उपयूप” फलकांच्या कक्षेंत उत्पन्न होतात ते सर्व, कांहीं अशा प्रकारच्या मंजरीत एकाच बाजूस उगवतात म्हणून त्यांचीं सर्व फुलें एका बाजूस व सर्व फलक दुसऱ्या बाजूस वेषधारी वंशावर लागलेले दिसतात. परंतु अशी स्थिति अशा प्रकारच्या दुसऱ्या कांहीं मंजरींत न सांपडतां उपयूप आलटून पालटून डाव्या उजव्या बाजूस उगवतात व त्यामुळें ते सरळ होण्यापूर्वी ते नागमोडीच्या आकारांत उगवलेले आढळतात. “एकभुज” परिमित मंजरीच्या या दाने प्रकारांस अनुक्रमें “मंडलाकार” आणि “कुटिल” अथवा व्राश्र्चीक अशीं नांवें देतात. अशा प्रकारची मंजरी भोकराच्या फुलांत व मायोसोटिस नांवाच्या वनस्पतींत सांपडते.

(३) व्दिभुजपरिमित:- मुख्य यूपाची वाढ “अगफूल” उत्पन्न होऊन खुंटल्यानंतर त्याच्या खालीं समोरासमोर असलेल्या दाने फलकाच्या कैचींत दोन उपयूप उत्पन्न होऊन मंजरीची वाढ पुढें चालू राहाते व कांहीं वाढीनंतर त्याची वाढ मुख्य यूपाप्रमाणे खुंटून पुन्हां दोन उपयूप फलकांच्या कक्षेंत उत्पन्न होऊन मंजरीचा विस्तार होत जातो अशा रीतीनें चिमटयाप्रमाणें प्रत्येक वेळीं दोन “उपयूप” उत्पन्न होऊन त्यांच्या व्दारें मंजरीचा विस्तार होत जातो. (उदा. मोगली एरंडाच्या जाती, बिंटालकडी, आयपोमिया इत्यादि).

(४) बहुभुजपरिमित:- जेव्हां मंजरीच्या मुख्य यूपाची वाढ अग्रफूल उत्पन्न होऊन खुंटल्यावर त्याखालीं दोहोंपेक्षां जास्त उपयूप उत्पन्न होतात आणि अशा पध्दतीनें मंजरीचा विस्तार होत जातो तेव्हां परिमित मंजरीच्या या प्रकारास “बहुभुजपरिमित” असें म्हणतात. हा प्रकार मोगली एरंडाच्या कांही विशिष्ट जातींत आढळतो.

(५) आवर्तपरिमित:- ह्या प्रकारांत प्रधान व “उपयुप” आंखूड असतात व पुष्पाचे “यूपक” हि आंखूड किंवा पुष्पें जवळजवळ “यूपकहीन” असल्यामुळें सर्व फुलें दाटीनें एकत्रित झालेली दिसतात. नीट तपासणी केली तर छोटया प्रधानयूपाची वाढ खुटूंन प्रथम दोन व त्यांची वाढ पुन्हां खुंटल्यावर एक एक उपयूप फलकांच्या कक्षेत उत्पन्न होऊन मंजरीच्या विस्तार होतो. अशा रीतीनें सर्व फुलें दाटीनें उगवलेलीं असल्यामुळे त्यांच एक पुंजका स्कंधाच्या एका बाजूस किंवा पेऱ्याभोंवती झालेली दिसतो. तुळशीच्या कुलांत मंजरीचा हा प्रकार सामान्य रीतीनें आढळतो.

(६) परिमितछत्र:- परिमित मंजरीच्या ह्या प्रकारांत बाहुभुजपरिमिताप्रमाणें कित्येक उपयूप प्रधानयूपावर उत्पन्न होतात परंतु ते उत्पन्न होण्यापूर्वी प्रधानयूपाची वाढ खुंटत नाहीं, तर प्रधानयूप व त्यापासून उत्पन्न झालेले उपयूप यांची वाढ सारख्या उंचीची होऊन सर्व फुलें छत्रमंजरीप्रमाणें एकाच पातळीवर आलेली असतात. फरक इतकाच कीं, त्यांत फुलांचा विकास अपरिमित छत्राप्रमाणें केंद्रगामी तऱ्हेने न होतां केद्रोत्सारिणी तऱ्हेनें मध्यापासून बाहेरच्या बाजूस होत जातो. पहिल्या प्रतीच्या उपयूपापासून पुन्हां नवे दुसऱ्या, तिसऱ्या इत्यादि प्रतीचे उपयूप उत्पन्न होत नाहींत (पेलारगोनियम).

(७) परिमितगुच्छ :- या प्रकारांत गुच्छमंजरीप्रमाणें रचना असते. परंतु पुष्पविकास “केंद्रात्सारिणी” तऱ्हेनें होतो (उदा. इक्जोरा अथवा लाल नेवाळी)

मिश्रमंजरी:- परिमित व अपरिमित मंजरीच्या शुध्द प्रकाराशिवाय या उभयव्यवस्थांचें ज्यांत मिश्रण झालेलें आहे अशी पुष्पव्यवस्थाहि कित्येक वनस्पतींत आढळते. उदाहरणार्थ सूर्यकमळ, कारळे, करडई इत्यादिकांच्या कुलांत प्रत्येक स्वतंत्र मंजरी मौली असते, म्हणजे अपरिमित वर्गातील असते. परंतु ह्या मौलींच्या विकासाचा अनुक्रम पाहिला तस असें आढळून येईल की, झाडाच्या शेंडयावर प्रथम फुलणारा “मौली” उत्पन्न होतो व नंतर खालीं खालीं नवे नवे मौली उत्पन्न होत जाऊन फुलूं लागतात. म्हणजे मौलींचा विकास उत्ताराधार तऱ्हेच्या परिमित पध्दतीनें होतो. वरील तऱ्हेच्या उलट तुलसी कुलांतील मंजरीचा विकास होतो. म्हणजे मंजरीच्या शाखोपशाखांचा विकास ‘अधरोत्तार’ अशा परिमित तऱ्हेनें होतो. परंतु प्रत्येक शाखेवर जीं फुलें उगवतात ती ‘उत्ताराधर’ तऱ्हेच्या परिमित पध्दतीनें उगवून विकास पावतात. म्हणजे या कुलांत सर्वसाधारण विकास अपरिमित तऱ्हेनें व व्यक्तिश: पुष्पविकास परिमित तऱ्हेनें होतो. वरील प्रकाराशिवाय मिश्रमंजरींचे
(१) व्यस्तवल्लरी, (२) मिश्रचमरी, आणि (३) स्तबक असे ती विशिष्ट प्रकार केले जातात. व्यस्तरीप्रकारांत अपरिमित वल्लरीप्रमाणेंच पुष्परचना असते. परंतु पुष्पविकास ‘अधरोत्तार’ होत नसून ‘उत्ताराधर’ रीतीनें होत असतो. मिश्रचमरींत व स्तबकांत मंजरी शाखामय असून प्रधानवंशाची वाढ जरी अग्रफूल उत्पन्न होऊन खुंटली तरी त्यापासून उत्पन्न झालेल्या शाखा मुख्य वंशापेक्षां लांब होत नाहींत म्हणून चमरीप्रमाणें ह्या दोन्हीं मंजरीची सर्वसाधारण वाढ ‘अधरोत्तार’ अशीच होते. परंतु शाखांवर उगवणाऱ्या पुष्पांचा विकास परिमित मंजरी प्रमाणें ‘उत्ताराधर’ रीतीनें होतो. मिश्रचमरी व स्तबक यामध्यें फरक असा कीं, मिश्रचमरी विरळ असून तळापासून शेंडयाकडे चवरीप्रमाणें निमुळती होत जाते. व स्तबकाच्या शाखा दाट उगवत असल्यामुळें तो घोसदार दिसतो व तसेंच तो तळाशीं व शेंडयाशीं कांहींसा निमुळता असून मध्यभागीं स्तबक जास्त रूंद व जाड असतो. मिश्रचमरी सागवान व निर्गुडीच्या मंजरीत व स्तबक द्राक्षाच्या मंजरीत सांपडतो. वर दिल्याप्रमाणें पुष्पव्यवस्था अथवा मंजरीचे वर दिलेले विशिष्ट प्रकार निरनिराळया वनस्पतींत सांपडत असले तरी ज्यांत वर दिलेल्या प्रकारांपैकीं, कोणत्याच विशिष्ट प्रकारांपैकीं पुष्पव्यवस्था नसून ती संकीर्ण तऱ्हेची आहे असेहि प्रकार क्कचित आढळतात. अशा प्रकारास विशिष्ट नांवें न देतां त्यांच्या रचनेची कल्पना वर्णनात्मकच देणें भाग पडतें.

(५) पुष्प.- वनस्पतींच्या आरोहक भागांचे संक्रमण मंदगतीनें होऊन मंजरीचा, संभोगजन्य पुनर्जननक्रियेचें काम करणारा पुष्पमय भाग बनलेला असतो हें सूक्ष्मावलोकनानें समजतें. कारण प्रारोहक भागांत ज्याप्रमाणें जमिनीवरचा भाग मुख्य अक्ष व त्यापासून फुटलेल्या शाखा , उपशाखा व त्यावर लागलेलीं पर्णे इत्यादि भागांनीं झालेला असतो त्याच प्रमाणें मंजरी व तिचे अंतिम भाग जीं पुष्पें यांचीहि स्थिति असते.

मंजरींतील “यूप, उपयूप व यूपक” हे भाग प्रारोहक भागाच्या स्कंध व त्याच्या शाखोपशाखांच्या सदृश असतात. व ‘फलक, फलकिल व पुष्पदलें’ इत्यादि भाग रूपान्तरित पर्णोसारखे असतात, तेव्हां मंजरींत पुष्पाचा जो अंतिम भाग असतो तोहि ‘अक्ष’ व रूपांतरित पर्णोनीं बनलेला असतो असें म्हटलें असतां त्यांत वस्तुस्थितीचा विपर्यास केल्याचा दोष उत्पन्न होत नाहीं.

पुष्पांतील ‘अक्ष’ भाग कांहीं फुलांमध्यें अंशत: यूपक किंवा पुष्पदंडरूपानें स्पष्टपणे दृष्टीस पडतो. व बाकीचा भाग पुष्पदंलांनीं आच्छादिलेला असल्यामुळें स्पष्टपणे दृष्टिगोचर होत नाहीं. तसेंच यूपकहीन फुलामध्यें तर तो सर्वोशानेंच दृष्टिआड झालेला असतो. ज्याप्रमाणें ‘प्रारोहक’ कलिकेमध्यें स्कंध (अक्ष) अत्यंत संकुचित लांबीचा असल्यामुळें सर्व पर्णे एकमेकांजवळ गर्दीनें उगवलेली दिसतात त्याचप्रमाणें पुष्पांतील अक्षभाग सामान्यत: लाबीनें न वाढतां अत्यंत संकुचित स्वरूपांतच रहात असल्यामुळें त्यावरील पर्णसदृश असे दलरूप भागहि एकमेकाजवळ गर्दीनें उगवलेले असतात. पुष्पाचा हा अक्षभाग स्कंधाप्रमाणें कांडी व पेऱ्यांनीं बनलेला असतो हें पांढऱ्या तिळवणीच्या फुलाची तपासणी केली असतां सहज दृष्टिगोचर होते. या पुष्पांच्या अक्षांतील कांहीं कांडयांची वाढ होत असल्यामुळें या पुष्पांतील ‘पराग’ उत्पन्न करणारे तंतू पाकळयापासून बऱ्याच अतरावर लागलेले दिसतात व तसेंच फल देणारा मध्यवर्ती भागहि ह्या तंतूपासून कांहीं अंतरावर चढलेला दिसतो. या उदाहरणावरून एवढें सिध्द होतें कीं, सामान्यत: अक्षभागाच्या कांडयांची वाढ होत नाहीं म्हणूनच त्यावरील रूपान्तरित अशीं पुष्पदलरूपी पर्णे जवळजवळ गर्दीने उगवलेलीं असतात.

पुष्पाच्या अक्षावरील पुष्पदलांची व्यवस्था सामान्यत: “चक्ररचित” तऱ्हेची असते म्हणून पुष्पदलांपैकीं प्रत्येक जातीचीं दलें चक्राकार अशीं लागलेलीं दिसतात. पुष्पदलांची व्यवस्था सामान्यत: “चक्ररचित” असली तरी अपवादेंकरून “योनिज” वनस्पतींपैकीं “कमल” पुष्पांत व “अयोनिज” वनस्पतींत सामान्य रीतीनें, पुष्पदलांची व्यवस्था “पर्यायाची” अथवा “एकातरित” तऱ्हेची असते. पुष्पांतील अक्षभागच्या ज्या अग्रभागावर पुष्पदलें उगवलेली असतात त्यास आधार असें म्हणतात.

कर्दळ, हिरवा चाफा, जवस, अंबुशी, गुलाब, वाटाणा, इत्यादि झाडांच्या फुलांची चांचणी करून पाहिलें असतां असें आढळून येईल कीं, पुष्पदलांत दोन मुख्य भेद व प्रत्येक मुख्य भेदांत दोन उपभेद सांपडतात. पुष्पदलांपैकीं पहिला मुख्य भेद “पाकळयांचा” व दुसरा पाकळयांच्या आंत असलेल्या “तंतूं” चा आहे. पाकळयांचें रूपान्तर फारसें झालेलें नसल्यामुळें त्या तत्त्वत: रूपान्तरित पर्णे आहेत हें समजणें कठिण नसतें. परन्तु पाकळयांच्या आंतील “तंतुमय” भागहि तत्वत: रूपान्तरित पर्णे आहेत हें समजणें कठिण जातें. कारण त्यांचे फारच रूपान्तर झालेलें असल्यामुळें बाह्यत: तरी त्यांमध्यें व सामान्य पर्णामध्यें कांहींच साम्य दिसत नाही. परंतु कर्दळीच्या फुलासारख्या अपवादात्मक फुलांच्या पाकळयांच्या आंतील “पराग” व “फल” उत्पन्न करणाऱ्या भागांचे पर्णाप्रमाणें कांहींसे चपटे भाग पाहून हे ततुंमय भागहि तत्वत: रूपान्तरित पर्णे आहेत ह्याविषयी मनाची खात्री होते.

पुष्पांतील पाकळया व तंतुमय भागापैकीं “संभागजन्य” पुनर्जननक्रियेस प्रत्यक्ष उपयोगी पडणारे “संभोग” व “स्वयंभू” पिंड तंतुमय भागांत उत्पन्न होतात म्हणून ह्या तंतुमय भागांतील प्रत्येक तंतूस “पिंडदल” असें म्हणतात व ह्या पिंडदलांचें ऊन, थंडी व पाऊस इत्यादिकांपासून पाकळ्यांच्या व्दारें निवारण होत असल्यामुळें त्यास “आवरणदलें” असें म्हणतात “आवरण” दलांचें कार्य “संभोगजन्य” पुनर्जननक्रियेंत गौणस्वरूपाचें असल्यामुळें पुष्पदलापैकीं “आवरण” दलांचा भाग तत्तवत: अनवश्यक व “पिंडदलां” च्या व्दारें “संभोगजन्य” पुनर्जननक्रिया होत असल्यामुळें तो भाग “आवश्यक” असा असतो. अर्थात पुष्पभागापैकीं आवारणदलांचा भाग एखादया पुष्पांत नसला तरी ‘संभोगजन्य’ पुनर्जननक्रिया होण्यास अडचण पडत नाहीं. ‘आवरण’ दलें व ‘पिंड’ दलें यांचा संबंध वर दिल्याप्रमाणें असल्यामुळें पिंडदलयुक्त व संभोगजन्य पुनर्जननक्रियेस प्रत्यक्ष साहाय्य करणारा जो पल्लव त्यास पुष्प असें म्हणतात, अशा रीतीची पुष्पाची व्याख्या करणें भाग पडतें, कारण सर्व प्रकारच्या पुष्पांमध्यें ‘आवरणदलें’ व ‘पिंडदलें’ हीं दोन्ही असतातच असें नाहीं. निरनिराळया वनस्पतींच्या पुष्पांची रचना, विभागसंख्या इत्यादि गुणविशेषांत साम्य नसतें. हिरवा चाफा, गुलाब, जास्वंद, मुचकुंद, कापशी, इत्यादि अनेक झाडांच्या पुष्पांत दोन प्रकारचीं आवरदलें, अथवा पाकळया व दोन प्रकारचीं ‘पिंडदलें’ अथवा तंतू असतात, तर मोगली एरंड, भोपळा, दोडका, खरबूज, भांग, खजूर इत्यादि वनस्पतींच्या पुष्पांमध्यें दोन प्रकारचीं ‘आवरणदलें’ व एकच प्रकारचीं पिंडदलें सांपडतात. तसेंच पालक, चाकवत, राजगिरा, माठ, गुलबाक्ष, इत्यादिकांच्या फुलांत एक प्रकारचीं ‘आवरणदलें; व एक अथवा दोन्हीं प्रकारचीं ‘पिडदलें’ असतात. एरंडाच्या पुष्पांत एकच प्रकारचीं पिंडदलें व एकच प्रकारची आवरणदलें असतात व दुधी, पॉइसटिया, तितली इत्यादि कांहीं थोडया वनस्पतींत तर पुष्पें केवळ एकच प्रकारच्या पिंडदलांचीं बनललीं असतात. अशा प्रकारें पुष्पविभागसंख्येंत बरीच भिन्नता आढळत असल्यामुळें अशा सर्व प्रकारच्या पुष्पांचा ज्या व्याख्येंत अन्तर्भाव होऊं शकतो अशाच प्रकारची व्याख्या करणें शास्त्रीय दृष्टीनें जरूर असतें.

पुष्पामध्यें जास्तीत जास्त चार प्रकारचीं दलें म्हणजे दोन प्रकारची ‘आवरणदलें’ व दोन प्रकारचीं ‘पिंडदलें’ असतात हें वर सांगितलेंच आहे पुष्पविभागवर्णन करण्यास सुलभ जावें म्हणून या चार प्रकारच्या दलांस निरनिराळीं नांवें दिलीं जातात. उदाहरणार्थ गुलाबाच्या फुलाची तपासणी केली तर असें आढळून येतें कीं, त्यामध्यें खालच्या गांठीसारख्या भागाच्या वरच्या कडेवर पांच हिरव्या पाकळयांचें वर्तुळ असतें, हिरव्या पाकळयांच्या आंतील बाजूस रंगीत पाकळयांचीं अनेक वर्तुळें असतात. आवरणदलामध्यें, अशा प्रकारें रंगासंबंधाने जेव्हां स्पष्ट भेद असतो तेव्हां बाहेरील हिरव्या किंवा हिरवट पाकळयांच्या वर्तुळास ‘पुट’ व रंगीत पाकळयांच्या वर्तुळास ‘मुकुट’ असें म्हणतात. पुटवर्तुळापैकीं प्रत्येक पाकळीस छंद असें म्हणतात. मुकुटवर्तुळापैकीं प्रत्येक पाकळीस ‘दल’ असें म्हणतात. गुलाबाच्या फुलांत पुटाचें एक वर्तुळ पांच छेदांचें झालेलें असतें व मुकुट भागांत पांच पांच दलांचीं अनेक वर्तुळें आढळतात. परंतु सामान्यत: पुष्पामध्यें छंदाचें एक वर्तुळ व दलांचें एक वर्तुळ असतें.

गुलाबाच्या फुलांत दलांच्या आंतल्या बाजूस दोन प्रकारचीं ‘पिंडदलें’ असतात: पैकीं दलांच्याच पातळींत उगवलेले कांहीं तंतू असतात व ह्या प्रत्येक तंतुच्या अग्रभागीं एक जरा पिंवळट गांठ असून तींत बारीक कणांचा भुगा असतो. या प्रकारच्या तंतुसमुहास ‘पुंकोश’ व त्यापैकीं प्रत्येक तंतूस ‘पुकेसर’ किंवा नुसतें ‘केसर’ हें नांव दिलें जातें. सामान्यत: प्रत्येक केसरांत डोक्यावरची गांठ व तीस वर उचलून धीरा देणारी तंतुरूप दांडी असते. ह्या गांठीच्या आंत एखाद्या डबीत भुगा भरल्याप्रमाणें अत्यंत बारीक कणांची भुकटी भरलेली आढळत असल्यामुळें ह्या गांठीस ‘परागपिटक’ अथवा नुसते ‘पिटक’ व कणास ‘पराग’ असें म्हणतात. पिटकाखालील दांडीस ‘नाल’ असें नांव दिलें जातें. ‘पिटक’ व ‘नाल’ ह्यांपैकीं पिटकाचाच भाग पुनर्जननक्रियेस उपयोगी पडतो. कारण त्यांत ‘परागकण’ रूपी स्वयंभू ‘पिंड’ सांठवलेले असतात. म्हणूनच हिरवा चाफा, सीताफळ अशा कांहीं झाडांच्या फुलांत ‘केसर’ केवळ पिटकयुक्त असतात. त्यांमध्यें नालाचा अभाव असतो. गुलाबाच्या फुलांत केसरांच्या आंतल्या बाजूस उंचीनें त्यांहून लहान असे फुलाच्या मध्यभागीं दुसऱ्या तऱ्हेचे तंतू सांपडतात. ह्या तंतूंच्या डोक्यावर पिटकापेक्षां बारीक व किंचित गुलाबी रंगाच्या गांठी असतात. फूल बरोबर मध्यें उभें चिरलें तर असें आढळतें कीं ह्यांपैकीं प्रत्येक तंतूचा खालचा कांहीं भाग पाकळ्यांच्या खालीं असलेल्या तुंब्यासारख्या फुगीर हिरव्या भागाच्या आंत शिरलेला आहे व एक तंतु निराळा काढून पाहिला तर त्यांत तीन भाग स्पष्ट असे दिसतात. तळास वरच्या गांठीपेक्षां मोठा व पांढरा रंगांचा फुगीर भाग व वरच्या व खालच्या फुगीर भागामध्यें त्यांस जोडणारा बारीक दोऱ्यासारखा भाग असतो. ह्या तंतुसमूहास स्त्रीकोश असें म्हणतात व प्रत्येक तंतूस “किंजल्क” असें म्हणतात. प्रत्येक किंजल्काच्या खालच्या फुगीर भागांत “बीजाडें” उत्पन्न होत असल्यामुळें त्यास “अंडाशय” व वरील गांठीस “चूडा” आणि दोहोंमधल्या दोऱ्यास “ध्वज” असें म्हणतात. गुलाबाच्या फुलांत स्त्रीकोशांतील सर्व “किजल्क” सुटे असे सांपडतात. परंतु सामान्यत: ते बहुतेक फुलांत एकमेकांत जोडलेले असे असतात.

ह्याप्रमाणें गुलाबाच्या फुलांत “पुट, मुकुट, पुंकोश, व स्त्रीकोश” असे चार प्रकारचे कोश अथवा वर्तुळें स्वतंत्र अशा घटकांनीं जरी बनलेले असले तरी अशीच हुबेहुब रचना प्रत्येक झाडाच्या फुलाची असत नाहीं. प्रत्यके झाडाच्या फुलांत वरील चारहि कोश असतातच असें नाहीं. व तसेच कोशांतील घंटकांची संख्या, त्यांचा सारखेपणा, त्यांची संयुक्त किंवा विभक्त स्थिति, संयुक्त “छेदां” नीं व “दलां” नीं बनलेल्या “पुट” व मुकुटाचा आकार इत्यादि गुणांसंबंधानें बरेंच वैचित्र्य आढळतें. अशा प्रकारें पुष्पसौष्टुवांत जें वैचित्र्य आढळतें व तदनुरूप पुष्पाचे जे अनेक प्रकार केले जातात त्यासंबंधानें आतां थोडी चर्चा करूं.

पुष्पाचे प्रकार:- पुष्पांच्या अनेक प्रकारांची कल्पना येण्याकरितां व ते कोणत्या गुणधर्मानुसार केले जातात हें नीटपणें समजण्यासाठीं प्रथम पुष्पाची आदर्शभूत रचनेच्या पुष्पांत (१) “पुट, मुकुट, पुंकोश व स्त्रीकोश” हीं चार दलांचीं वर्तुळें असतात. (२) “आवरण” आणि “पिंडव्यवस्था” “चक्ररचित” असते. (३) प्रत्येक वर्तुळाचे घटक विभक्त असतात. (४) प्रत्येक वर्तुळाचे घटक आपापल्या वर्तुळापुरते सारखे वाढलेले व एकाच सांचाचे असतात. (५) दोन जवळजवळच्या वर्तुळांतील घटकांची परस्पर व्यवस्था “सन्मुख” नसून “पर्यायी” अथवा “एकांतरित” अशी असते. (६) सर्व वर्तुळांतील घटकांचीं संख्या परस्परसमान अशी असते. (७) चार प्रकारच्या पुष्पदलांचें प्रत्येकीं एकएकच वर्तुळ असतें. (८) सर्व वर्तुळें परस्पर स्वंतत्र अशीं असतात.

अशा प्रकारच्या आदर्शभूत रचनेचीं फुले निसर्गत: जरी फार विरळा सांपडत असलीं तरी अशी रचना आदर्शभूत पुष्पाची असते अशी कल्पना केल्यानें पुष्पांचे रचनेनुसार भेद करणें सोपें जातें. आदर्शभूत पुष्पाच्या वरील गुणापैकीं एक अथवा अधिक गुणांमध्यें न्यूनाधिकता होऊन जीं निरनिराळया रचनेचीं पुष्पें बनतात त्यांतील ठळक ठळक प्रकार पुढें देतों: (१) पूर्ण अथवा परिणत पुष्प-ह्या पुष्पांत पुट, मुकुट, पुंकोश व स्त्रीकोश हीं चारहि प्रकारची वर्तुळें असतात (उदा. गुलाब) (२) अपूर्ण अथवा अपरिणित पुष्प:- ह्या पुष्पांत एक अथवा अधिक वर्तुळांचा अभाव असतो (उदा.भोपाळ). अपूर्ण अथवा अपरिणत पुष्पांचे, अभाव असलेल्या वर्तुळाच्या वैशिष्टनुसार तीन पोटभेद केले जातात: (अ) एककंचुकी अथवा एकावरणी-ह्या पुष्पांत आवरणदलांचें फक्त एकच वर्तुळ असतें. मुकुटदलांप्रमाणें भडक रंगाचें तें वर्तुल असलें तरी तें पुटवर्तुळच मानलें जातें. उदा. गुलबाक्ष, बिशखपरा, राजगिरा, कुटू. (आ) अकंचुकी अथवा अनावरणी अथवा नग्नपुष्प:- ह्या पुष्पांत ‘आवरण’ दलांचीं दोन्ही वर्तुळें नसतात. (उदा. दूधी, पाइन्सेटिया, देवदार.) (इ) एकलिंगी पुष्प अथवा असिध्दपुष्प- या पुष्पांत पिंडदलांच्या वर्तुळापैकीं कोणतें तरी एक वर्तुळ तेवढें असतें. एकलिंगीपुष्पाचे दोन पोटभेद आढळतात ते: (१) केसरित पुष्प अथवा नरपुष्प:- ह्या पुष्पांत पुंकोश हजर असून स्त्रीकोशाचा अभाव असतो. (२) किंजल्कित पुष्प अथवा नारीपुष्प:- ह्या पुष्पांत स्त्रीकोश असतो व पुंकोशाचा अभाव असतो. (३) सिध्दपुष्प:- ह्या पुष्पांत आवरणदलांचीं वर्तुळें असोत अथवा नसोत पण केशर व किंजल्क हे दोन्ही आवश्यक भाग हजर असतात. (४) वंध्यापुष्प पुनर्जननक्रियेस निरूपयोगी असे केशर किंवा किंजल्क असतात.
पुष्पसौष्ठव:- पुष्प सौष्ठवाचा तीन भिन्न दृष्टींनीं विचार करतां येतो. पुष्पांच्या निरनिराळया वर्तुळांतील घटक भागांचा आकार व रूप यांच्या दृष्टीनें (१) “व्यवस्थित” व (२) “अव्यवस्थित” असे पुष्पाचे दोन प्रकार केले जातात. “व्यवस्थित” पुष्पाचे घटकभाग प्रत्येक वर्तुळांत सारख्या आकाराचे व रूपाचे असतात; परंतु “अव्यवस्थित” पुष्पांत असा सारखेपणा आढळत नाहीं. कोणत्याहि फुलाचे दोन बरोबर सारखे भाग एकापेक्षां जास्त लंब छेदांनीं करतां येत असले तर त्या पुष्पास “किरणछेद्य” पुष्प असें म्हणतात व ज्या फुलाचे अशा प्रकारें दोन सारखे भाग केवळ एकाच लंबछेदानें करतां येतात त्यास “युतिछेद्य” असें म्हणतात. व ज्या फुलाचे अशाप्रकारें दोन सारखे भाग एकसुध्दां लंबछेदानें होऊं शकत नाहींत त्यास विसंगतावयव पुष्प असें म्हणतात. पुष्पाच्या सौष्ठवाकडे पुष्पवर्तुळांतील घटकाभागांच्या संख्येकडे दृष्टि देऊन पाहिलें तर ह्याहि दृष्टीनें पुष्पांचे दोन भेद होऊं शकतात: (१) सम अथवा समभागी पुष्प व (२) विषम अथवा विषमभागी पुष्पा. समभागी पुष्पांत प्रत्येक वर्तुळांतील दलांची संख्या सारखी किंवा परस्पर त्या संख्येच्या पटीइतकी असते. परंतु “विषम” पुष्पांत भिन्न वर्तुळांतील घटकसंख्या सारखी किंवा त्या संख्येच्या पटीइतकी नसून तिचें प्रमाण कमजास्त असतें. सम (भागी) पुष्पांतील घटकांच्या संख्येनुसार व्दिदल, त्रिदल, चतुर्दल, पंचदलपुष्प अशा प्रकारें नांवें दिलीं जातात. आदर्शभूत पुष्परचनेंत निरनिराळया कारणांनीं वैचित्र्य उत्पन्न होतें. उदाहरणार्थ (१) पुष्पदलांच्या वर्तुळांची संख्या चारापेक्षां कमी किंवा जास्त होणें. भोपळा, कांकडी, एरंड, चुका, चाकवत, राजगिरा, गुलबाक्ष इत्यादि फुलांत पुष्पवर्तुळें चारापेक्षां कमी तर गुलाब, अफू, मुचकंद, अंबूशी इत्यादि फुलांत तीं चारापेक्षां जास्त असतात. (२) पुष्पदलांची व्यवस्था पूर्णपणें “सर्पिल” (कमल) असल्यास त्या पुष्पास “अचक्ररचित” तसेंच “आवरणदलें” चक्ररचित व “पिंडदलें” सर्पिल असल्यास त्या पुष्पास “अर्धंचक्ररचित” असें म्हणतात (३) पुष्पवर्तुळांचे घटकभाग आदर्शभूत पुष्परचनेप्रमाणें परस्पर स्वतंत्र असे न राहतां त्यांचा आपसांत संयोग होणें. अशा रीतीनें पुटदलांचा संयोग झालेला असल्यास त्या पुटास संयुक्त (दली) पुट असें म्हणतात.

मुकुट दलांचा संयोग झाला असल्यास त्या मुकुटास संयुक्त (दली) मुकुट असें म्हणतात. परंतु पुटाचीं व मुकुटाचीं दलें आपआपल्या वर्तुळांस स्वंतंत्र असलीं तर त्या पुटमुकुटास अनुक्रमें विभक्त (दली) पुट व मुकुट असें म्हणतात. जेव्हां पुंकोशांतील केसरांचा एकमेकाशीं अंशत: किंवा पूर्णत: संयोग झालेला असतो तेव्हां त्या केंसरांस गठ्ठयांच्या संख्येनुसार एककूर्ची (जास्वंद, कापूस), व्दिकुर्ची (वाटाणा), त्रिकुर्ची (नारिगं, लिंबू) केसर असें म्हणतात.

स्त्रीकोशांतील किंजल्कांचा संयोग झालेला असल्यास त्या स्त्रीकोशास संयुक्त किंजल्कित व किंजल्क स्वतंत्र असल्यास विभक्त किंजल्कित व किंजल्क स्वतंत्र असल्यास विभक्त किंजल्कित स्त्रीकोश असें म्हणतात. प्रत्येक पुष्पवर्तुळांतील घटकदलांच्या व्यक्तिश: आपआपसांतील संयोगाशिवाय जवळजवळच्या दोन भिन्न वर्तुळांतील दलांचा एकमेकाशीं संयोग होतो. अशा प्रकारच्या संयोगास संसक्ति असें म्हणतात.

संसक्तीच्या दृष्टीनें पुट व स्त्रीकोश यांचा संबंध परस्परविरोधी असा असतो. पुटाचा स्त्रीकोश वर्तुळाशीं जेव्हां संयोग झालेला नसतो तेव्हां पुट कोशाचें वर्तुळ स्त्रीकोशाच्या तळाशी स्वतंत्र असें दिसतें व त्याच्या आंतील बाजूस मध्यभागीं स्त्रीकोशाची उत्पत्तिा झालेली स्पष्टपणें दिसते. अशा प्रकारच्या पुटास अधरपुट आणि स्त्रीकोशास उर्ध्व असें म्हणतात. त्याच्या उलट जेव्हां पुटवर्तुळ स्त्रीकोशाच्या अंडाशयाच्या वरच्या भागापासून उत्पन्न झाल्यासारखें दिसतें व अंडाशयाचा भाग पुट, मुकुट आणि पुंकोश इत्यादि सर्व वर्तुळांच्या खालीं उघडा असा यूपकावर लागलेला दिसतो तेव्हां पुटास उर्ध्वपुट व स्त्रीकोशास अधरस्त्रीकोश असें म्हणतात (उदा. दोडका).
स्त्रीकोश अधर असला म्हणजे पुटवर्तुळाप्रमाणें मुकुट व पुंकोशहि अंडाशयाच्या डोक्यावर उगवलेले दिसतात. अशा मुकुट व पूंकोशास स्त्रीकोशात्तार (स्त्रीकोशोर्ध्व) असें म्हणतात. परंतु ज्या पुष्पांतील “स्त्रीकोश” “उर्ध्व” असून “मुकुट” व “पुकोश” “पुटा” प्रमाणें स्त्रीकोशाच्या खालच्या बाजूस उत्पन्न झालेले दिसतात तेव्हां त्यास स्त्रीकोशाधरन असें म्हणतात. स्त्रीकोशाधर आणि स्त्रीकोशार्ध्व या दोन अवस्थांशिवाय मुकुट व पुंकोश या दोन अवस्थांच्या दरम्यानच्या अवस्थेंत असलेले कांहीं कांहीं पुष्पांत आढळतात. या स्थितींत स्त्रीकोश अर्धवट अधर असा दिसला तरी वस्तुत: तो उर्ध्वच असतो परंतु आधाराच्या मध्यभागापेक्षां त्याच्या कडा जास्त जोरानें वाढल्यामुळें पुष्पाधाराचा छोटेखानी प्यालाच झालेला आढळतो व त्या प्याल्याच्या आंत तळापासून स्त्रीकोश उगवलेला असून मुकुट व पुंकोश ह्या प्याल्याच्या वरच्या कडेपासून अंडाशयाभोंवती उगवलेले दिसतात. ह्या स्थितींत आधाराच्या प्याल्याचीं कवचें व अंडाशय एकमेकांस चिकटलेलीं जरी दिसलीं तरी त्यांचा संयोग झालेला नसतो. मुकुट व पुंकोश यांच्या या अवस्थेस स्त्रीकोशपरिवेष्टी अवस्था असें म्हणतात.

पुष्पांतील मुकुट संयुक्त (दली) असला म्हणजे बहुतकरून केसर मुकुटाच्या आंतल्या पृष्ठभागापासून उगवलेले दिसतात. अशा प्रकारच्या केसरांस मुकुटलग्न असें म्हणतात. केसर व किंजल्क यांचा आपसांत संयोग झालेला असल्यास अशा केसरांस किंजल्कलग्न केसर असें म्हणतात. आदर्शभूत पुष्परचनेंत पुट व मुकुट दलें एकमेकांसमोर नसतात तर प्रत्येक मुकुटदलाची उत्पत्ति आंतल्या बाजूस दोन पुटदलांच्या मध्यें झालेली असते. दोन्ही वर्तुळांतील दलांच्या मांडणीचा संबंध एकमेकांस आलटून पालटून असतो. या नियमाप्रमाणें आदर्शभूत पुष्परचनेंत कोणत्याहि जवळजवळच्या दोन वर्तुळांतील दलांची मांडणी परस्पर आलटून पालटून व पुटदलांस समोरासमोर असे उत्पन्न झालेले असतात. पंरतु बोराच्या झाडाच्या कुलांत केसर मुकुटदलास आलटून पालटून न उगवतां त्यांच्याबरोबर समोरासमोर लागलेले आढळतात. साधारण नियमविरूध्द केसरांच्या ह्या माडणीची उपपत्ति अशी लावतात कीं, त्या प्रकारच्या फुलांत केसरांचीं दोन स्वतंत्र वर्तुळें प्रथम असलीं पाहिजेत परंतु कालांतरानें त्यांपैकीं बाहेरच्या केसरांच्या वर्तुळांची अवनति होऊन तें नष्टच पावलें व दुसरें आंतलें वर्तुळ मात्र कायम राहिलें. तेव्हां स्वाभाविक रीतीनेंच त्या वर्तुळाचे केसर मुकुटदलांच्या सन्मुख असेच उत्पन्न झालेले असल्यामुळें त्यांच्याशीं आलटून पालटून असे उगवलेले दिसत नाहींत यांत नवल नाहीं.

एकदलवनस्पतींच्या फुलांत बहुतकरून नियमानें केसरांचीं दोन वर्तुळें आढळतात. अशा फुलांत पुष्पवर्तुळांची संख्या वाढणें एवढा एकच फरक आदर्शभूत पुष्परचनेच्या दृष्टीनें झालेला असतो. परंतु अंबुशीच्या कुलांतील वनस्पतींच्या पुष्पांत याप्रमाणें केसरांचें एक वर्तुळ जास्त झालेलें असतें इतकेंच नव्हे तर आदर्शभूत मांडणीप्रमाणें बाहेरील वर्तुळांतील केसर मुकुटदलांस आलटून पालटून आंती दुसऱ्या वर्तुळाचे केंसर असले पाहिजेत. परंतु त्या फुलांत “मुकुटदलें” व बाहेरील वर्तुळाचे “केसर” एकमेकासमोरासमोर उगवलेले असतात. अशा प्रकारें वर्तुळांची संख्या जास्त होणें व जवळजवळच्या दोन वर्तुळांतील घटकदलांच्या एकांतरित मांडणींत बिघाड उत्पन्न होणें असा दुहेरी दोष या फुलांच्या रचनेंत उत्पन्न झालेला असतो.

आवरणवर्तुळातील दलांची संख्या व केसरांची संख्या सारखी असली म्हणजे त्या फुलास समकेसरित पुष्प असें म्हणतात. केसरांची संख्या पुट किंवा मुकुटदलापेक्षां दुप्पट असली म्हणजे त्या फुलास व्दिगुणकेसरित पुष्प व ही संख्या दुप्पट असून बाहेरील वर्तुळाचे केसर मुकुटदलांच्या सन्मुख असले तर त्या फुलास “प्रतिव्दिगुणकेसरित” पुष्प असें म्हणतात.

आदर्शभूत पुष्परचनेंत वर दिल्याप्रमाणें ज्या अनेक कारणांनीं फरक उत्पन्न होतो त्यांत आवरणदलांत किंवा पिंडदलांतील एखाध्या किंवा कांहीं दलांचा आकारच विद्रुरप होणें (उदाहरणार्थ तेरडा, केळ, कर्दळ) व ह्या दलापासून उपांगें उत्पन्न होणें, तसेचं दलांची वाढच अपुरी होऊन दलें खुरटीं रहाणें. (उदाहरणार्थ सूर्यकमळ, करडई, कारळे, ओवा, बडीशोप इत्यादिकांच्या फुलांची पुटपलें) अशा आणखी कांहीं कारणांचाहि समावेश करणें जरूर आहे. अशा रीतीनें आदर्शभूत पुष्परचना व तीमध्यें बदल करणाऱ्या अनेक कारणांचा त्रोटक उहापोह झाल्यावा पुष्पदलवर्तुळांतील एक एक वर्तुळाचा स्वतंत्र रीतींने विचार करणें आतां योग्य होईल.

पुट:- आवरणदलांच्या कोशांपैकीं बाहेरील कोशांचीं दलें हिरवी किंवा हिरवट असलीं म्हणजे त्या कोशास पुट असें म्हणतात. व आंतील दुसऱ्या कोशाचीं दलें पांढरीं किंवा इतर भपकेदार रंगाचीं असलीं तर त्या कोशास मुकुट असें म्हणतात. रंगाव्यतिरिक्त पुट व मुकुटदलांत पोताचाहि फरक असतो. पुटदलें जरा जाड व पानासारखीं चिवट असतात व ‘मुकुटदलें’ पातळ व बरीं नाजुक असतात. सामान्यत: पुट व मुकुटदलांमध्यें अशा प्रकारचा स्पष्ट भेद असतो. म्हणून पुटकोश व मुकुटकोश यांच्या हद्दी स्पष्ट अशा असतात. परंतु कमळ व सोनचाफा यांसारख्या कांहीं फुलांत या हद्दी मुळींच स्पष्ट नसून पुटदलांची क्रांति मुकुटदलांत फारच सूक्ष्मभेद होत होत संथ अशा क्रमानें झालेली असते, म्हणून अशा पुष्पांत पुटकोशाच हद्द संपून मुकुटकोशाची हद्द कोठें सुरू होते हें निश्र्चित करणें कठिण असतें.

पुटदलांस बहुतकरून देंठ नसतात व त्यांच्या कडाहि सामान्यत: अखंड अशा असतात. गुलाबाचीं ‘पुटदलें’ या नियमास अपवादात्मक अशीं दांतेदार अथवा पाळीदार असतात. पुटदलांचा व अंडाशयाचा पूर्णत: किंवा अशंत: संयोग न होतां पुटकोशाचा उगम अंडाशयाच्या खालून झालेला असतो तेव्हां त्यास अधर व पुटकोशाचा संयोग अंडाशयाशीं खालच्या बाजूस झाल्यामुळें त्याचा उगम जेव्हां अंडाशयाच्या डोक्यावर झालेला दिसतो तेव्हां त्यास ऊर्ध्व असें म्हणतात.

कांहीं पुष्पांत पुटदलें एकमेकास जोडलेलीं तर कांहीं पुष्पांत तीं एकमेकांपासून विभक्त अशीं असतात. पहिल्या प्रकारच्या पुटास संयुक्त (दली) पुट आणि दुसऱ्या प्रकारास विभक्त (दली) पुट अशीं नांवें देतात. संयुक्त (दली) पुटांतील दलांचा संयोग तळापासून शेडयापर्येत पूर्णतेनें झालेला असतो किंवा दलांचा शेंडयाकडील थोडासा भा विभक्त स्थितींत असतो. पूर्ण संयोग झालेल्या स्थितींत किती दलांचा संयोग झाला आहे हें पटाच्या बाहेरील पृष्ठभागावरच्या मुख्य शिरांच्या संख्येवरून सांगतां येतें. अपूर्ण संयोगाच्या स्थितींत वरच्या स्वतंत्र टोकाच्या संख्येइतकी संख्या पुटदलांची असते असें मानण्यास हरकत नाहीं. संयुक्त (दली) पुटाचा आकार कांहीं फुलांतव्यवस्थित तर कांहींत अव्यवस्थित असा असतो. व्यवस्थित आकारामध्यें घंटाकार, कलशाकार, घटाकार, नलिकाकार, धूम्रपात्राकार (भेर्याकार) इत्यादि मुख्य प्रकार आढळतात. व अव्यवस्थित आकाराचा ओष्ठरूप हा एकच मुख्य प्रकार सांपडतो (उदाहरण तुलसी, वाटाणा वगैरे), तसेंच तेरडयाच्या फुलांत पुट “नखी” असतो. सूर्यकमळ, कारळे, करडई, मका, म्हातारा इत्यादिकांच्या फुलांप्रमाणें पुटाचा संयोग अंडाशयाशीं पूर्णत: झालेला असतो, तेव्हां पुष्पांत पुटकोशाचा अभाव असल्यासारखा दिसतो परंतु अशा पुटदलांची वरचीं टोंकें जोडलेलीं नसतात व त्यांचे अनेक उभे बारीक सुतीसारखे तुकडे होऊन पुटाचा हा भाग गोंडेदार असा झालेला असतो. स्थायित्वाच्या दृष्टीनें विचार केला तर पिंवळा धोत्रा, अफू इत्यादि फुलांत पुट केवळ पुष्पाच्या कलिकावस्थेंत तेवढा आधारावर चिकटलेला असतो व फूल उमलूं लागलें कीं, लगेंच गळून पडतें. अशा पुटांस “लोल” असें म्हणतात. सामन्यत: पुटकोश फुल उमल्यानंतर कांहीं दिवसांनी गळून पडतो. अशा पुटास “पातुक” असें म्हणतात. पेरू, सफरंचेद, डाळिंब इत्यादि फुलांत पुटकोश, पुष्पाचे मुकुट व पुंकोश गळून जाऊन अंडाशयापासून फळ तयार झाल्यावर सुध्दां गळून न जातां फळास चिकटून राहून वाळत जातो. अशा दीर्घकालपर्येत फळास चिकटून राहणाऱ्या पुटास “विशीर्यमाण” असें म्हणतात. वांगी, सागवान, कपाळफोडी ह्या झाडांच्या फुलांचा पुटकोश फळाबरोबर वाढीस लागून त्याच्या वाढलेल्या भागानें फळाचा कांहीं किंवा सबंध भाग आच्छादिला जातो. अशा पुटास “वर्धमान” असें म्हणतात. कापूस, जास्वंद, भेंडीं, स्ट्राबेरी इत्यादि पुष्पांत पुटकोशाच्या बाहेर फलाकां०चें एक व्यवस्थित वर्तुळ असतें. हें वर्तुळ पुटकोश वर्तुळासारखे दिसण्यांत असल्याकारणानें अशा प्रकारच्या पुटवर्तुळाबाहेरील फलकांच्या व्यवस्थित वर्तुळास उपपुट असें म्हणतात.

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .