प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

वनस्पतिशास्त्र भाग १४

मुकुट:- सामान्यत: चटकदार व चित्रविचित्र रंगांच्या पाकळयांनीं फुलांचा जो कोश बनलेला असतो त्यास ‘मुकुट’ असें म्हणतात. मुकुटदलें रंगीबेरंगी असतात इतकेंच नव्हे तर तीं नाजूक असून भिन्न भिन्न फुलांमध्यें जो सुवास असतो तोहि बहुतकरून मुकुटदलांतच आढळतो. अशा रीतीनें चटकदार रंग व सुवास यांचा मिलाफ मुकुटदलांत झालेला असल्यामुळें साहजिकपणेंच ‘मुकुट’ पुष्पभागापैकी सर्वोत भपकेदार भाग असतो. मुकुटदलें देंठाचीं व बिनदेंठाचीं अशीं दोन्ही प्रकारचीं आढळतात. दलाच्या देंठासारख्या भागास ‘जंघ’ व पसरट भागास ‘अंग’ असें म्हणतात. ‘पुट’ कोशाप्रमाणें मुकुटदलेंहि चक्ररचित अशीं उगवून बाहेरील दलाशीं व आंतील केसराशीं ‘एकांतरित’ रीतीनें लागलेलीं असतात. ‘मुकुट’ व्यवस्थित व अव्यवस्थित अशा दोन्ही प्रकारचा निरनिराळया फुलांस आढळतो. व्यवस्थित मुकुटाचीं दलें एक साच्याचीं व एकसारखी वाढलेलीं असतात (उदा. एकेरी जास्वंद) व अव्यवस्थित मुकुटाचीं दलें कमजास्त वाढलेलीं असल्यामुळें एक सांच्याचीं नसतात (उदाहरणार्थ वाटाणा, चिंच, बाहवा). पुटकोशाप्रमाणें मुकुटाची दलें कांहीं फुलांत वेगळीं व स्वतंत्र असतात तर कांहीं फुलांत तीं जोंडलेलीं आढळतात. म्हणून मुकुटाचेहि विभक्त व संयुक्त (दली) मुकुट असे दोन प्रकार केले जातात व या दोन्ही प्रकारामध्यें कांही विशिष्ट प्रकारचे आकार सांपडतात.

व्यवस्थित विभक्त (दली) मुकुटाचे (१) स्वस्तिकरूप, (२) जपारूप व (३) लवंगपुष्परूप असे तीन विशिष्ट प्रकार आढळतात. स्वस्तिकरूप मुकुटास चार पाकळ्या असून त्या स्वस्तिक चिन्हाच्या दोन सरळ लंबरेषेप्रमाणें लंब रेषेंत उगवलेल्या असतात. दोन पाकळया एका सरळ रेषेंत व दुसऱ्या दोन पाकळ्या त्या रेषेशीं लंब असलेल्या दुसऱ्या सरळ रेषेंत असल्यामुळें मुकुटदलांची मांडणी स्वस्तिकचिन्हाप्रमाणें कांहींशी दिसते (उदा. मुळा, करमकल्ला, मोहरी). जपारूपमुकुटांत पांच विभक्त पाकळया एकेरी गुलाब, सफरचंद, भेंडी इत्यादि फुलांच्या पाकळयांप्रमाणें बिनदेंठाच्या असून प्रत्येक पाकळींचा वरचा भाग गोलाकार किंवा मध्यभागीं थोडासा खोलगट असा असतो. लवंगपुष्परूपमुकुट:- ह्या प्रकारांतहि पाचं पाकळया असतात परंतु त्या देंठावर असून त्यांचया जंघा नलिकाकार पुटांत दडलेल्या असल्यामुळें बाहेरून दिसत नाहींत. मुकुटदलांचीं ‘अंगें’ ह्या जंघांच्या वरच्या बाजूस त्यावर लंबरेषेंत आडवी पसरलेलीं असतात. पुटांची नळी फाडून पाहिलें असतां प्रत्येक पाकळीची वरील प्रकारची स्थिति स्पष्ट दिसते. अव्यवस्थित विभक्तदली मुकुटाचा फक्त एकच विशिष्ट प्रकार असा आढळतो कीं, ज्याचा आकार एका निश्र्चित तऱ्हेचा असतो. ह्या प्रकारास ‘चित्रपतंगरूप’ असें म्हणतात. कारण त्याच्या आकारांत व फुलपाखराच्या आकारांत कांहीसें साम्य असलेलें दिसतें. अशा प्रकारचा मुकुट मटार, हरभरा, तूर, चवळी, घेवडा इत्यादि झाडांच्या फुलांत आढळतो. चित्रपतंगरूप मुकुटांत पांच पाकळया एकांत एक अशा लागलेल्या असतात. या पांच पांकळ्यापैकीं सर्वोत बाहेरील पाकळी सर्वोत मोठी असून एखाध्या पताकेच्या फडक्याप्रमाणें सर्वोच्या बाहेर फडकत असते. ह्या पाकळीस ‘पताका’ अथवा ‘ध्वजा’ असें म्हणतात. ह्या पताकेच्या आंतल्या बाजूस फुलपाखराच्या पंखाप्रमाणें दोन थोडया लहान आकाराच्या पाकळ्या असतात. ह्या पाकळयांस ‘पक्ष’ अथवा ‘पंख’ असें म्हणतात. ‘पंक्ष’ अथवा पंखाच्या आंत आणखी दोन सर्वोत लहान पाकळ्या खालच्या कडेनें एकमेकीस जोडलेल्या असल्यामुळें त्या दोन पाकळ्यांची नावेसारखी आकृति झालेली असते. म्हणून ह्या दोन पाकळ्यांच्या जोडीस ‘नौका’ असें म्हणतात. ह्याप्रमाणें ‘चित्रपतंगरूप’ मुकुटांत (१) एक पताका, (२) पक्ष व (३) दोन पाकळयांची झालेली नौका असे भाग असतात. व्यवस्थित संयुक्तदली मुकुटास विशिष्ट वस्तूंच्या रूपसादृश्यानुसार निरनिराळीं नांवें दिलीं जातात. उदाहरणार्थ (१) ‘नलिकाकार’ (२) ‘धूम्रपात्राकार’ अथवा ‘भेर्याकार’, (३) चक्राकार (४) घंटाकार (५) दीपकाकार, (६) कलशाकार इत्यादि विशिष्ट प्रकार सामान्यत: केले जातात. कांहीं फुलांत संयुक्तदली व्यवस्थित मुकुटाचा आकार यापैकीं कोणत्याच विशिष्ट तऱ्हेचा नसून त्याचें साम्य दोन विशिष्ट प्रकारांच्या जवळ जवळ असतें. नलिकाकार मुकुट नळीसारखा चिंचोळा असतो (सूर्यकमळाचीं बिंबावरील फुलें, रसेलियाची फुलें). धूम्रपात्राकार किंवा भेर्याकार मुकुट चिलमीच्या किंवा कर्ण्याच्या आकाराचा असतो (धोत्रा, तंबाखू). ‘चक्राकार’ मुकुट चाकाच्या आकाराचा असतो (मिरची, वांगी, बटाटे). घंटाकार मुकुट घंटेप्रमाणें दिसतो (आकाशवेल, तांबडा भोपळा). ‘दीपकाकार’ मुकुटाचा खालचा भाग समईच्या दांडयाप्रमाणें चिंचोळा असतो व वरचा भाग समईच्या टवळ्याप्रमाणें पसरट वाटोळा असतो (जसें सदाफुली, परिजातक रंगूनचा वेल). कलशाकार मुकुट तांब्या किंवा लोटींच्या आकाराचा असतो (मोहाचे फूल). ‘अव्यवस्थित’ संयुक्तदली मुकुटाचेहि कांही प्रकार विशेष आकाराचे असतात. म्हणून त्यांसहि आकारसाम्यानुसार अनुरूप अशी नांवें दिलीं जातात जसें:- मुखाकार अथवा ओष्टकार:- ह्या प्रकारच्या मुकुटाचा आकार जनावराच्या तोंडाप्रमाणें कांहीसा असून त्याच्या वरच्या भागाच्या दोन पाळी ओठाप्रमाणें एकावर एक अशा वळलेल्या असतात. ह्या दोन पाळी लहानमोठया असल्यामुळें मुकुटाचा हा प्रकार अव्यवस्थित मुकुटाच्या सदरांत अंतर्भूत करणें अवश्य आहे (उदा. तुळस, सब्जा, अडुळसा). जृंभमुखी:- हा एक ओष्ठाकार मुकुटाचा प्रकार असून बहुतेक रचना तशीच असते. फरक एवढाच असतो कीं ह्यांत वरचें ओष्ठरूप पाळें खालच्या पाळयावर झुकलेलं असतें. बध्दमुख, पिहितमुख:- हा मुकुट मुखाकार असून त्याच्या ओंठासारख्या दोन पाळी एकमेकीस चिकटलेल्या असल्यामुळें मुकुटाचा कंठ बंद झालेला असतो. म्हणून या संयुक्त मुकुटाच्या आंतील केसर, किंजल्क इत्यादि भाग बाहेरून दिसूं शकत नाहींत (उदा. एन्टिरायनम्). अंगुलीरूप:- हा मुकुटहि अन्यव्यवस्थित असून त्याचा आकार बोटाच्या आकाराप्रमाणें असतो. पट्टाकार:- या संयुक्त मुकुटाचा खालचा भाग नलिकाकार असूनहि नळी वरच्या बाजूस उभी चिरली गेल्यानें मुकुटाचा हा वरचा भाग एका पातळीप्रमाणें वरच्या बाजूस पसरल्यासारखा दिसतो व त्यामुळें मुकुटांत एकच पातळी आहे अशी प्रथमदर्शनी समजूत होते (सूर्यकमळ, शेवती, कारळे इत्यादिकांच्या मंजरीज किरणपुष्पांत या प्रकारचा मुकुट असतो).

मुकुटाचे उपभोग:- कांहीं फुलांत मुकुटाच्या पाकळयांपासून व्यवस्थित अथवा अव्यवस्थित असे उपभाग उगवलेले आढळतात. उदाहरणार्थ कण्हेराच्या फुलाच्या प्रत्येक पाकळीच्या अंगाच्या तळापासून आंतल्या बाजूस दशा असलेला असा एक लहान पसरट भाग उगवलेला असतो. कण्हेराच्या फुलाचा मुकुट संयुक्त असल्यामुळें हे भाग वर्तुळाकार रीतींनें एकमेकांस जोडल्यासारखे दिसतात. पाकळीपासून उगवणाऱ्या अशा प्रत्येक भागास “पट्ट” असें म्हणतात. कित्येक फुलांच्या मुकुटांत एखाध्या पाकळीचा खालचा भाग जास्त वाढून खिश्यासारखा खालच्या बाजूस लोंबलेला असतो. अशा पाकळीस “न्युब्ज” असें म्हणतात (वनकारलें). व मुकुट संयुक्त असल्यास त्या अव्यवस्थित मुकुटासच ‘न्युब्ज’ असें म्हणतात (उदा. व्हॅलेरियन). नखीपुटाप्रमाणें कित्येक पुष्पांच्या मुकुटाचा एक भाग खालच्या बाजूस काटयासारखा वाढलेला असतो. अशा मुकुटासहि नखी मुकुट असें म्हणतात. कित्येक पुष्पांत मुकुट व केसरकोश ह्यांच्यामध्यें विशिष्ट आकाराचे उपभाग उत्पन्न होऊन त्यांचें एक व्यवस्थित वर्तुळ, मुकुट व पुंकोशांच्या मध्यभागी झालेलें आढळतें हे उपभाग ‘मुकुटदलांच्या’ किंवा केसरांच्या सदरांत अन्तर्भूत होऊं शकत नाहींत. कांहीं फुलांत ते सुटे असतात तर कांहींत ते संयुक्त स्थितींत असलेले आढळतात. कांहींत ते पाकळयांसारखे पसरट असून एकमेकांस जोडलेले असतात तर कांहींत ते केसरासारखे तंतुमय असून सुटे असतात व कांहीं पुष्पांत त्यांचा संबंध मुकुटाशीं असतो तर तो कांहींत केसरांशीं असतो. ह्या मुकुट व केसरांमध्यें वाढलेल्या कोशास तोरण म्हणतात. तोरणांचा संबंध मुकुटाशीं असला तर त्यास ‘मुकुटतोरण’ व तो संबंध केसराशीं असला तर त्यास केसर तोरण’ असें म्हणतात. सुदर्शन, रूई, पॅसीफ्लोरा इत्यादिकांच्या पुष्पांत अशा प्रकारें तोरणांचा भाग उगवलेला आढळतो. सुदर्शनांत तो पाकळ्यांसारखा असतो, रूईत आकडयाच्या आकाराचा असतो व पॅसीफ्लोराच्या फुलांत तो केंसासारखा तंतुमय असतो.

संसक्ति:- पाकळ्यांच्या उत्पत्तीच्या दृष्टीनें त्या (१) स्त्रीकोशाधर, (२) स्त्रीकोशोत्तार अथवा (३) स्त्रीकोश परिवेष्टी यांपैकी कोणत्या तरी प्रकारच्या असतात. पहिल्यांत त्या अंडाशयाच्या खालीं उगवतात, दुसऱ्यांत अंडाशयाच्या डोक्यावर त्यांची उत्पत्ति झालेली दिसते व तिसऱ्या प्रकारांत त्या अंडाशयाभोवतीं उगम पावलेल्या दिसतात.

पुंकोश:- पुष्परचनेंत पिंडदलांचा भाग अत्यावश्यक समजला जातो कारण त्याच्याच व्दारां पुष्पोत्पत्तीचा मुख्य हेतु साधला जातो, कुलपरंपरा सतत चालू राहाण्याकरितां बियांची उत्पत्ति पुष्पांतील पिंडदलांच्या साहाय्यानेंच होते. आणि म्हणूनच पुष्परचनेंत पिंडदलांचें फार महत्त्व गणलें जातें. पिंडदलें दोन प्रकारचीं असतात: (१) केसर व (२) किंजल्क; पैकीं बीजोत्पत्तींच्या कामीं नरसंभोगपिंडाचा पुरवठा करणारे भाग केसरांचे असल्यामुळें केसरांनीं बनलेल्या कोशास ‘पुंकोश’ असें म्हणतात व नारीसंभोगपिंड उत्पन्न करणाऱ्या पिंडदलांस किंजल्क असें म्हणतात व किंजल्कांनीं बनलेल्या पुष्पकोशास स्त्रीकोश म्हणतात. पुंकोश मुकुटाच्या किंवा आवरणकोशाच्या आंतल्या बाजूस उत्पन्न होतो व फुलांत स्त्रीकोश असेल तर मुकुट व स्त्रीकोश ह्यांच्यामध्ये तो उत्पन्न झालेला असतो. पुंकोशाच्या हरएक घटकभागास ‘केसर’ असें म्हणतात. केसर बहुधां तंतुमय असतात. पंरतु ते कांहीं फुलां (उदाहरणार्थ हिरवा व सोनचाफा, सीताफळ यांमध्यें) ततुमय नसतात. याचें कारण असें कीं, जे केसर तंतुमय असतात त्यांत बारीक दोऱ्यासारखा जो भाग असतो तो महत्त्वाचा नसून त्या दोऱ्याच्या शेंडयावर जो फुगीर गांठीसारखा भाग असतो तो महत्तवाचा असतो. कारण पिंडोत्पत्ति दोरेदार भागापासून होत नसून त्यावर असलेल्या फुगीर भागापासून होत. केसराच्या तंतूचा देंठासारखा उपयोग होतो व त्यायोगें पिंडमय भाग योग्य स्थानाप्रत चढविले जातात.

केसराच्या देंठासारख्या भागास ‘केसरतंतु’ अथवा नाल असें म्हणतात. व त्यावरील फुगीर भागास ‘परागपिटक’ असें म्हणतात. परिणत पुष्पांत केसर व किंजल्क हीं दोन्हीं प्रकारचीं पिंडदलें असल्यामुळे त्यांस उभयलिंगी पुष्प असें म्हणतात. परंतु ज्या एकलिंगी अपरिणत पुष्पांत आवरणकोश व केसर एवढेच भाग सांपडतात त्यांस केसरितपुष्प असें म्हणतात. पुंकोशाचें वर्णन त्यांतील केसरांच्या तंतूची स्थिति, परागपिटकाची रचना, नाल व पिटकांचा संबंध, केसरसंख्या, त्यांची संयोग व संसक्तीसंबंधी स्थिति, वगैरे अनेक दृष्टींनीं करणें जरूर असतें. तर आतां ह्यां वर्णनांतील मुख्य मुख्य भागांचा त्रोटक विचार करूं

नाल अथवा केसरतंतु:- नाल, केसरतंतु सामान्यत: बारीक असून तळास थोडा जाड व शेंडयाकडे थोडा बारीक झालेला असतो. अशा सामान्य तंतूस रेखाकार असें म्हण्तात. परंतु गहूं, बाजरी व कोणत्याहि गवताच्या जातीच्या फुलांत केसरतंतु केंसासारखा खालपासून वरपर्यंत सारखाच बारीक असतो. अशा नालास (केसरतंतूस) केशाकार असें म्हणतात. कित्येक जातींच्या फुलांत हे नाल पाकळ्यासारखे चपटे झालेले आढळतात. उदाहरणार्थ कर्दळ, कमळ, दुहेरी गुलाब. अशा पाकळ्यासारख्या नालांस व केसरांस दलाकार नाल व केसर असें म्हणतात. कांध्याच्या फुलाच्या नालांच्या तळापाशीं डाव्या व उजव्या बाजूस एका हातासारखा टोकंदार भाग उगवलेला असतो. अशा नालास दांतेदार असें म्हणतात. याप्रमाणें केशाकार नालापासून कर्दळीच्या फुलांतील दलाकार नालापर्यत नालाचे लांबी, रूंदी व आकारांच्या दृष्टीनें अनेक प्रकार आढळतात. नालाचा रंग सामान्यत: पांढरा असतो परंतु गुलाबाच्या फुलांत किंचित गुलाबी छटेचे व अफूच्या कांहीं जातीत काळसर रंगाचे तसेंच कांहीं फुलांत पिवळया व निळया रंगाचे नाल आढळतात.

परागपिटक:- केसरांत परागपिटकाचाच भाग महत्त्वाचा असतो. कारण त्यामध्यें संभोगजन्य पुनर्जननक्रियेस उपयोगी पडणारे पिंड उत्पन्न होतात. परागपिटकांत कमजास्त प्रमाणानें जो कणीदार चुरा उत्पन्न होतो त्यासच ‘परग’ ही संज्ञा दिली जाते. कित्येक फुलांस जो सुवास असतो तो परागकणांत सांठवलेला असतो. परंतु फुलांचा वास केवळ परागकणांच्या वासाचाच परिणाम नसतो. कांहीं फुलांच्या पाकळयाहि सुवासिक असतात (उदाहरणार्थ हिरवा चाफा, सोनचाफा) परागपिटकांतील परागकण पुनर्जननक्रियेस उपयोगी पडत असल्यामुळें ज्या केसरांच्या पिटकांत परागकण उत्पन्न होत नाहींत त्या केसरास वंध्यकेसर असें म्हणतात. परागपिटकांचा आकार अनेक भिन्न प्रकारचा असा निरनिराळया फुलांत आढळतो. लांबट, चपटा, वाटोळा, नागमोडीसारखा इत्यादि अनेक प्रकारचे आकार त्यांत आढळतात. धोतऱ्यांत चपटा, दुधीत वाटोळा, मळयांत भरीव व हृदयाकार आकार आढळतो. त्याचप्रमाणें पिटक रंगानेंहि सर्व फुलात एकसारखे नसून विविध प्रकारच्या रंगाचे आढळतात. रंग व आकार ह्यांमध्यें जरी निरनिराळया फुलांच्या पिटकांत साम्य नसेलं तरी प्रत्येक पिटक सामान्यत: दोन पाळींचा झालेला असतो. जास्वंद, कापूस व आणखी कांहीं झांडाच्या फुलांत पिटक एक एक पाळींचेच असतात.

पिटकांच्या दोन पाळींचा कांहीं पुष्पांत (उदा. धोतरा) अगदीं खालपासून वरपर्येत पूर्ण संयोग झाल्यानें त्या एकमेकीपासून सुटया असलेल्या दिसत नाहींत. परंतु पिटकाच्या दोन पाळींचा संयोग कांहीं फुलांत अर्धवट रीतींनें (मोहरी, मुळा यांत) तर कांहींत अगदींच थोडासा झालेला असतो (दुधी, टिकोमा इ.) अशा स्थितींत त्या पाळी स्पष्ट रीतीनें दृष्टीस पडतात. पिटकाच्या दोन पाळींचा संयोग पूर्ण रीतीनें झाला असला तरी ज्या सांध्यानें त्या एकमेकीस जोडलेल्या असतात तो सांधा बहुतकरून स्पष्ट रीतीनें त्यांमध्यें दृष्टीस पडत असल्यामुळें पिटक दोन पाळ्यांचा झालेला आहे हे ओळखता येते. पिटकाच्या दोन पाळींस जोडणाऱ्या केसरतंतूच्या ह्या वरच्या भागास “संयोगिका अथवा संयोजिनी” असें म्हणतात. संयोगिकेची वाढ सामान्यत: अशी झालेली असते कीं, परागपिटकांच्या दोन्ही पाळी जवळजवळ एकमेकीस चिकटलेल्या असतात. व त्यामुळें दोन पाळींनीं बनलेला पिटक दुरून एकाच लहानसा गांठीसारखा दिसतो. परंतु जवळून जरा लक्षपूर्वक पाहिलें तर संयोगिकेनें जोडलेले हे दोन भग स्पष्ट दिसतात. सालविया नांवाच्या वनस्पतीच्या फुलांतील केसरांमध्यें संयोगिकेची वाढ इतकी जास्त झालेली असते कीं, त्यामुळें पिटकाच्या दोन पाळी एकमेकीपासून बऱ्याच अंतरावर असलेल्या दिसतात. पिटकाच्या सामान्य स्वरूपाच्या अगदीं उलट ही स्थिति असल्यामुळें एका पिटकाचेच ते दोन भाग आहेत हें प्रथमदर्शनीं ओळखणें कठिण जातें. शिवाय यांत आणखी एक विशेष फरक असा झालेला आढळतो कीं, सामान्यत: पिटकाच्या दोन पाळी बहुतेक फुलांच्या केसरांत जशा सारख्या आकाराच्या असतात तशा त्या सालवियाच्या केसरांत नसून एक पाळें दुसऱ्यापेक्षां मोठें असतें. इतकेंच नव्हे तर त्यांपैकीं मोठया पाळ्यांतच परागकण आढळतात व दुसरें पाळें फोलकटच राहतें.

पिटकांच्या दोन पाळ्यांमधील संयोगिकेशिवाय प्रत्येक पाळ्याच्या पृष्ठभागी फक्त एकाच अंगास संयोगिकेस समान्तर व रेखाकार अशी एक खूण पडलेली असते. पाळीच्या दुसऱ्या अंगास ही खूण झालेली नसते. पाळीवर ही जी रेखाकार खूण झालेली असते तीस “स्फोटरेखा” असें म्हणतात. कारण याच ठिकाणीं पाळी फुटून आंतील पराग बाहेर निघूं लागतो. सामान्यत: स्फोटरेखा पिटकाच्या लांबीमध्यें झालेली असते परंतु कांहीं फुलांच्या केसरांत ती पिटकाच्या लांबीत न पडतां रूंदींत झालेली आढळते. याप्रमाणें “स्फोटरेखा” पिटकाच्या लांबीत पडलेली असो किंवा रूंदीत पडलेली असो ज्या अंगाकडील पृष्ठभागीं त्या रेखा दृष्टीस पडतात त्या बाजूस पिटकाचें “मुखपृष्ठ” असें म्हणतात व त्याच्या उलट बाजूस “पार्श्र्वपृष्ठ” असें म्हणतात. सामान्यत: पिटकाचें मुखपृष्ठ पुष्पाच्या मध्यभागी असलेल्या किंजल्काकडे वळलेलें असतें परंतु कांहीं पुष्पांत पिटकांचीं मुखपृष्ठें उलट दिशेस आवरणदलांकडे झुकलेलीं आढळतात (उदा. तलवारीचें फूल).

परागपिटकामध्यें सामान्यत: ज्याप्रमाणें दोन पाळी असतात त्याप्रमाणें सामान्येंकरून प्रत्येक पाळयांत दोन कप्पे असतात. पाळीच्या ह्या प्रत्येक कप्यांत “परागकण” उत्पन्न होत असल्यामुळें ह्या प्रत्येक कप्यांत “परागकण” उत्पन्न होत असल्यामुळें ह्या कप्यांस “परागगुल्म” असें म्हणतात. ह्याप्रमाणें प्रत्येक पाळींत दोन “परागगुल्म” असल्यामुळें पिटकाचा आडवा छेद घेऊन पाहिलें तर प्रत्येक पिटक चतुर्गुल्यमय असलेला आढळतो. परंतु कांही वनस्पतींच्या पुष्पांतील परागपिटकांत दोनच गुल्म असलेले आढळतात (उदा. देवव्दार). बिनफुटलेल्या किंवा कच्च्या पिटकांत प्रत्येक पाळींतील दोन परागगुल्मामध्यें असलेला व त्यांस जोडणारा पडदेवजा भाग स्पष्ट दिसतो परंतु परिपक्क झालेल्या पिटकांत किंवा पिटक फुटल्यावर त्याचा आडवा छेद घेऊन पाहिलें तर गुल्मामधील हा पडदा फाटत असलेला किंवा फाटून गेलेला आढळतो व त्यामुळें छेदांत प्रत्येक पाळींत जणूंकाय एकच गुल्म आहे काय असा भास होतो. परंतु अगदीं कच्च्या स्थितीपासून स्फोट झालेल्या अवस्थेपर्यत निरनिराळया वेळीं छेद घेऊन पाहिलें तर गुल्मांमधील हा पडदा कसा हलकें हलकें मोडत जातो हें स्पष्ट रीतीनें दृष्टीस पडतें. नालावर पराग-पिटक एकाच तऱ्हेनें सर्व तऱ्हांच्या पुष्पांत लागलेले आढळत नाहींत. कांहींत नाल पिटकाच्या तळाशीं चिकटलेला असून त्यावर पिटक उभा असतो. ज्या पिटकांचा अशा प्रकारचा संयोग नालाशीं झालेला असतो त्यांस मूललग्नपिटक म्हणतात. पिटक व नाल यांच्या संयोगाचा हा प्रकार सामान्य आहे. गहूं, मका, बाजरी, घायपात व कोण त्याहि प्रकारचें गवत इत्यादिकांच्या फुलांतील परागपिटक व नाल यांच्या जोड पिटकाच्या मध्यभागीं एका बिंदूमध्यें असल्यामुळें तंतूवर पिटक आडवा चिकटलेला दिसतो. परंतु संयोगाची जागा बिंदूएवढी लहान असल्यामुळें अशा रीतीचा पिटक नालावर उभ्या, आडव्या, तिरप्या वगैरे वाटेल त्या तऱ्हेनें हेलकावे खात लटकलेला आढळतो. अशा पिटकास मध्यलग्न किंवा चंचल पिटक असें म्हणतात.

सोनचाफ्याच्या फुलांतील केसरांचे नाल व पिटक यांचा संयोग मूल व मध्य-लग्न पिटकाप्रमाणें केवळ एका बिंदूएवढया जागीं झालेला असून पिटकांच्या पार्श्र्वपृष्ठभागीं खालपासून वरपर्येत पिटकाच्या सर्व लांबीवर तो संयोग पसरलेला असतो. अशा स्थितींत या अंगाच्या बाजूस पिटकाच्या दोन पाळींचे भाग दृष्टीस पडत नाहींत. पाठीचा एकसंधी सपाट भाग तेवढा दृष्टीस पडतो. अशा पिटकास पृष्ठलग्न पिटक असें म्हणतात. केसरांच्या संख्येनुसार पुंकोशास एककेशरयुक्त अथवा एककेसरी, व्दिकेसरयुक्त, त्रिकेसरयुक्त, बहुकेसरयुक्त इत्यादि नांवें देतात. तसेंच ज्या फुलांत केसरांची व पाकळ्यांची संख्या समसमान असते म्हणजे मुकुटदलांचें व केसरांचें एकएकच वर्तुळ असून त्यांची संख्या सारखी असते तेव्हां त्या पुष्पास समकेसरित पुष्प असें म्हणतात. पाकळ्यांचे एकच वर्तुळ बरोबर असून केसरांचीं दोन वर्तुळें व त्यांची संख्याहि पाकळ्यांच्या बरोबर दुप्पट असल्यास त्या पुष्पास व्दिगुणकेसरित पुष्प असे म्हणतात या पुष्परचनेंत जवळजवळच्या एकाशीं एक लगत असलेल्या पुष्पदलांच्या वर्तुळांतील घटकदलें एकमेकांस एकांतरि किंवा आलटून पालटून उत्पन्न झालेलीं असण्याचा जो आदर्शभूत पुष्परचनेचा नियम तो पाळलेला असतो. म्हणजे केसरांचीं दोन वर्तुळें असलीं तरी बाहेरच्या वर्तुळांतील केसर व मुकुटदलें एकांतरित रीतीनेंच एकमेकांजवळ असतात व केसरांच्या दुसऱ्या वर्तुळांतील केसर पहिल्या म्हणजे बाहेरील वर्तुळांतील केसराशीं एकांतरित असतात. परंतु कांहीं पुष्पांत ह्या नियमाविरूध्द रचना आढळते. म्हणजे व्दिगुणकेसरित पुष्पाप्रमाणें मुकुटदलें व केसर यांची संख्या असून बाहेरच्या वर्तुळांतील केसर व मुकुटदलें एकमेकांस एकांतरित नसून सन्मुख असतात. व दुसऱ्या आंतील वर्तुळाचे केसर मुकुटदलास एकांतरित असे असतात. केसरांची व मुकुटदलांवी स्थिति वर दिल्याप्रमाणे ज्या पुष्पांत आढळते त्यास प्रतिव्दिगुणकेसरित असे म्हणतात. सामान्येकरून केसर व मुकुटदले यांची संख्या ज्या पुष्पांत सारखी नसते त्यास विषमकेसरित पुष्प असे म्हणतात.

आवरणदलाप्रमाणे केसरहि विभक्त व संयुक्त स्थितींत असलेले निरनिराळया फुलांत आढळतात. संयुक्त स्थितींत सर्व केसरांचा एकच गठ्ठा झालेला आढळतो किंवा त्यांचे एकापेक्षां जास्त गठ्ठे झालेले आढळतात. उदाहरणार्थ कापूस, जास्वंद, भेंडी इत्यादि झाडांच्या कुलांतील पुष्पांत सर्व केसरांचा एकच गठ्ठा झालेला असतो, म्हणजे सर्व केसरांचे नाल एकमेकांस जोडल्यानें त्यांचे एक नळीसारखे म्यान किंजल्काभोंवतीं वेष्टिलेलें असतें. नाल जोडलेलें असलें तरी परागपिटक सुटेच असतात. अशा केसरांस “एककूर्ची” असे म्हणतात. एका ऐवजीं दोन गठ्ठे असल्यास व्दिकूर्ची, तीन गठ्ठे झालेले असल्यास त्रिकूची व नारिंग, संत्रें या पुष्पांतील केसराप्रमाणे अनेक गठ्ठे झालेले असल्यास त्रिकूर्ची व नारिंग, संत्रें या पुष्पांतील केसराप्रमाणें अनेक गठ्ठे झाले असल्यास “बहुकूर्ची” इत्यादि नावें देतात.

करडई, सूर्यकमळ व रूई नांवाच्या वनस्पतींच्या फुलांतील केसरांचे नाल सुटे किंवा जोडलेले असून शिवाय परागपिटकांचाहि संयोग झालेला आढळतो. याप्रमाणें ज्या केसरांचे “परागपिटक” संयोग पावलेले असतात त्या केसरांत संयुक्त पिटकित असें म्हणतात. केसरांची संख्या व लांबी ह्या दोन गुणांच्या अनुरोधानें केसरांस दोन विशिष्ट नांवें दिलीं जातात. जेव्हां पुंकोशांत चारच सुटे केसर असून त्यांपैकीं दोन एका लांबीचे व दुसरी जोडी दुसऱ्या लांबीची असते तेव्हां त्या केसरसघास “चतुरोध्दतकेसरी” ही संबा दिली जाते.

संसक्तीच्या दृष्टीनें केसरांचा संबंध व्यक्त करण्याकरितां मुकुटदलाप्रमाणें त्यांनांहि उत्पत्तीच्या स्थानानुसार स्त्रीकोशोत्तार व स्त्रीकोशपरिवेष्टी हीं नांवें दिलीं जातात. सामान्यत: मुकुटदलें व केसर यांचा किंजल्काशीं असलेला संसक्तीचा संबंध एकाच प्रकारचा असतो. धोतरा, तंबाखू, सुदर्शन, गुलछबू इत्यादिकांच्या फुलांतील केसर जणूं काय.

व-७६

त्या फुलांच्या संयुक्त असलेल्या मुकुटदलापासून उगवलेले दिसतात. वस्तुत: त्यांची उत्पत्ति पाकळ्यापासून झालेली नसून नालांचा संयोग खालच्या बाजूस मुकुटदलाशी झालेला असल्यामुळें ते त्या दलांपासूनच उत्पन्न झाल्यासारखे दिसतात. अशा केसरांस “मुकुटलग्न” असे म्हणतात. तसेंच केसर व किंजल्क यांचा अंशत: किंवा पूर्ण रीतीनें जेव्हां संयोग झाला असतो तेव्हां त्या केसरांस “किंजल्कलग्न” केसर असें म्हण्तात. केसरांची वाढ पूर्ण झाली म्हणजे त्यांच्या परागपिटकांचा स्फोट होऊन ते फाटतात व त्यामुळें आंतील पराग बाहेर पडूं लागतो. हा स्फोट सर्व फुलांत एकाच प्रकारें होत नाहीं. कांहीं फुलांत हा स्फोट उभ्या रेषेंत तर कांहीत तो आडव्या रेषेंत होतो; तसेंच कांहीं फुलांचे परागपिटक उभ्या किंवा आडव्या रीतीनें न फुटतां त्यांवर छिद्रे पडून त्यांच्या व्दारें परागकण बाहेर येतात. त्या तिन्ही प्रकारच्या स्फोटास अनुक्रमें (१) अनुदैर्ध्य, (२) व्यत्यस्त व (३) छिद्रभेदी अशीं नांवें दिलीं जातात; त्यांपैकीं “अनुदैर्ध्य” प्रकारच्या स्फोटांत जेव्हां स्फोटरेषा पिटकाच्या पूर्ण लांबीवर न पसरतां पिटकाचा थोडासाच भाग उकलून कपाटाप्रमाणें त्यांची उघडझांप होऊं शकतें, तेव्हां अशा स्फोटास “कपाटभेदी” असें म्हणतात. परागण्टिकांच्या या चार प्रकारच्या स्फोटांपैकीं अनुदैर्ध्य स्फोट हा सामान्येंकरून आढळतो (जसें कण्हेर, सोनचाफा, मुळा). बटाटे, वांगी, मिरची इत्यादिकांच्या फुलांतील पिटकांचा स्फोट छिद्रभेदी असतो. व्यत्यस्त व कपाटभेदी पिटकस्फोट क्कचित् फुलांत आढळतात.

पिटकस्फोट झाल्यावर परागकण बाहेर पडूं लागतात. हे अति सूक्ष्म असल्याकारणानें एक कण स्वंतत्र रीतींनें नुसत्या डोळ्यांस दिसणें शक्य नसतें. भुकटीसारखा पदार्थ पिटकामधून बाहेर पडतांना दिसतो. अशा भुकटीच्या सुईच्या टोंकावर येणाऱ्या भागांतहि अनेक कण असतात. तेव्हां परागकणांचा आकार, रंग व त्यांची बाह्यांगरचना इत्यादिकांविषयीं परीक्षण करण्याकरितां सूक्ष्मदर्शकाच्या व्दारें हें परीक्षण करणें आवश्यक असतें. निरनिराळया फुलांतील पराग घेऊन अशा रीतीनें परीक्षण केलें तर असें अढळतें कीं, (१) आकारानें परागकण वाटोळे, अंडाकार, तिकोनी, षट्कोनी, कढईच्या आकाराचे (उदा. देवदार), पिळ्यासारखे इत्यादि अनेक प्रकारचे असतात. (२) रंगानें ते सामान्यत: पिंवळे असतात. परंतु तांबडे, निळे, काळे व पांढुरके कणहि कांहीं फुलांत सांपडतात. (३) पृष्ठभागाच्या दृष्टीनें परागकण बाहेरून गुळगुळीत (जांस्वद), खरखरीत (कासनी), काटेदार, (भोपळा, काकडी) इत्यादि प्रकारचे असतात. प्रत्येक कण सामान्यत: एकपेशीमय असून त्यास बाह्यकवच व अन्त:कवच अशीं दोन कवचें असतात; अन्त:कवच बाह्यकवचापेक्षां पातळ असतें. बाह्यकवचावर भेगा किंवा छिद्रे असता. बहुतकरून एकदलवनस्पतींच्या परागकणांत एक एक भेग किंवा छिद्र असतें व व्दिदलवनस्पतींच्या परागकणांत त्यांची संख्या तीन असते. कित्येक कणांत तिहीपेक्षां जास्त छिद्रे सुध्दां असतात. हीं छिद्रें उघडीं असतात किंवा भोपळयाच्या फुलांतील कणाप्रमाणें त्यावर झांकणें असतात. परागकणापासून परागनलिका जेव्हां वाढूं लागतात तेव्हां त्या या छिद्रांच्या व्दारें, झांकणें असलीं तर तीं दूर करून बाहेर येतात.

सामान्यत: परागकण सुटे व एकपेशीमय असले तरी कांहीं फुलांचे परागकण एकमेकांच्या संयोगानें बहुपेशीमय होतात. रूई व ऑरकिड नांवाच्या वनस्पतींत तर अनेक कण एकत्र होऊन त्यांचे लहान गुच्छ बनतात. परागकणांच्या या गुच्छास परागगुच्छ असें म्हणतात. रूईच्या फुलांतील प्रत्येक परागपिटकांत दोन दोन “परागगुच्छ” अतिसुक्ष्म अशा तंतूवर लटकलेले आढळतात. त्याचप्रमाणें ऑरकिडाचे परागगुच्छ सुध्दां दांडीदार असतात. परागकण बहुतकरून कोरडे असतात परंतु कांहीं फुलांच्या कणांच्या बाह्यकवचापासून एक प्रकारच्या चिकट पदार्थ बाहेर निघतो त्यामुळें ते कण चिकट होतात.

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .