प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

वनस्पतिशास्त्र भाग १५

स्त्रीकोश:- पुषावयवापैकीं बीज प्रत्यक्ष रीतीनें उत्पन्न करणारा भाग ज्या पुष्पांत असतो त्यांत तो पुष्पाच्या मध्यभागीं असतो. आवरणकोश व पुंकोश याप्रमाणें याच्याहि घटकांची उत्पत्तिा चक्ररचित रीतीनें होऊन त्यांचाहि एक मध्यवर्ती कोश बनलेला असतो. या कोशास स्त्रीकोश असें म्हणतात, कारण कीं, याच कोशाच्या विशिष्ट भागांत नवर्भोत्पत्ति होते.

स्त्रीकोशांतील घटक सुटे किंवा संयुक्त स्थितींत आढळतात. दोहोंपैकीं कोणत्याहि स्थितींत ते असले तरी प्रत्येक स्वतंत्र घटकास किंजल्क असें म्हणतात. स्त्रीकोशांतील किंजल्कांची संख्या सामान्यत: केसर व मुकुटदलांपेक्षां कमजास्त असते, तसेंच हे घटक बऱ्याच फुलांत एकमेकास जोडलेले असल्यामुळें फुलाच्या मध्यभागीं हा किंजल्कमय भाग एकटाच उभा असलेला दिसतो. स्त्रीकोशांत जेव्हां फक्त एकच किंजल्क असतो तेव्हां त्यास साधा अथवा सरल स्त्रीकोश असें म्हणतात व जेव्हां तो एकाहून जास्त सुटया किंवा संयुक्त किंजल्कांचा बनलेला असतो तेव्हां त्यास संकीर्ण स्त्रीकोश असें म्हणतात. स्त्रीकोश सरल असो अथवा संकीर्ण असो त्यांतील प्रत्येक किंजल्काचा खालचा भाग फुगीर आसा असतो व शेंडा पसरट, खोलगट गोळीसारखा, केंसाळ पिससारखा, किंवा लहान गांठीसारखा इत्यादि निरनिराळया आकारांचा असून थोडास चिकट असतो.

किंजल्कांच्या खालच्या फुगीर भागस अंडाशय असें म्हणतात व शेंडयावरच्या चिकट अशा विशिष्ट भागास चूडा असें म्हणतात. कित्येक फुलांच्या किंजल्कांत अंडाशय व चूडा यांच्या दरम्यान कमजास्त लांबीचा दोर्यारासारखा बारीक भाग असतो. या भागास ध्वज असें म्हणतात. किंजल्काच्या अंडाशय, चूडा व ध्वज या तीन भागांपैकीं अंडाशय व चूडा हे बीजोत्पत्तीस आवश्यक असल्यामुळें प्रत्येक किंजल्कांत असतात. परंतु ध्वजाची तितकी आवश्यकता नसल्यामुळें तो प्रत्येक किंजल्कांत असतोच असें नाहीं (उदा. अफू).

स्त्रीकोशांतील किंजल्कांचा अथवा पिंडदलांचा खालचा भाग फुगीर असण्यांचें कारण असें कीं हीं पिंडदलें आवरणदलाप्रमाणें अथवा साध्या पानाप्रमाणें खुलीं रहात नसून तीं आपल्या मध्यभागीं उभीं दुमडलेलीं असतात व त्यांच्या कडा एकमेकांस जोडल्या जाऊन खालचा भाग पिशवीसारखा बनतो. ज्या फुलांच्या स्त्रीकोशांत फक्त एकच किंजल्क असतो त्यांस पिंडदलांची ही स्थिति सहज रीतीनें दिसते. उदाहरणार्थ मटार, हरभरा, घेवडा, पावटा वगैरे झाडांच्या किंजल्कांची स्थिति पाहिली असतां हें स्पष्टपणें दृष्टीस पडेल. याप्रमाणें प्रत्येक किंजल्कांची दुमडलेली स्थिति असल्यामुळें अंडाशयांत एक अथवा अनेक अशीं जीं बीजांडें उत्पन्न होतात तीं बाहेरून दृष्टीस पडत नाहींत. बीजांडें अंडाशयांत कोठें उत्पन्न होतात, कशा रीतीनें चिकटलेलीं असतात इत्यादि स्थिति पाहण्याकरितां अंडाशय फाडल्याशिवाय गत्यंतर नसतें.

अंडाशयाचा जो भाग पिंडदलांच्या कडा एकमेकांस जोडल्यानें झालेला असतो त्यास उदरसीवन असें म्हणतात व ह्यावरच अंडाशयाच्या आंत बीजांडें अथवा बीजांत रूपांतर पावणाऱ्या लहान लहान गोळ्या उत्पन्न होतात. उदरसीवनाच्या समोर पिंडदलाच्या मध्यशिरेच्या भागास पृष्ठसीवन असें म्हणतात. उदरसीवनाप्रमाणें पृष्ठसीवनाचा भाग सामान्यत: स्पष्ट असा दिसत नाहीं. संकीर्णस्त्रीकोशांत किंजल्क सुटे किंवा एकमेकांस जोडलेले असतात हें वर सांगितलें आहे. सुटे किंजल्क असले म्हणजे (उदाहणार्थ हिरवा चाफा, अशोक इत्यादि) त्यांची वाढ सरल स्त्रीकोशांतील एकाकी किंजल्काप्रमाणेंच होत असते. ते एकमेकांजवळ असले तरी स्वंतत्र असल्यामुळें व प्रत्येकाचा स्वतंत्र अंडाशय असल्यामुळें अशा प्रत्येक अंडाशयापासून एक एक स्वतंत्र फळ उत्पन्न होऊं शकते. व त्यामुळें अशा प्रकाराच्या एका फुलापासून अनेक फळें उत्पन्न होऊं शकतात. परंतु संकीर्णस्त्रीकोशांतील किंजल्क एकमेकांस जोडलेले असले म्हणजे त्यांच्या संयोगानें एकच अंडाशय बनतो व त्याची वाढ होंऊन अशा फुलापासून एकच फळ उत्पन्न होतें. संकीर्णस्त्रीकोशाच्या या प्रकारांस (१) सरळ स्त्रीकोश, (२) विभक्त किंजल्क युक्त स्त्रीकोश व (३) संयुक्त किंजल्कयुक्त स्त्रीकोश असें म्हणतात. स्त्रीकोशाचे जे तीन प्रकार आढळतात त्यांचा आतां स्वतंत्र रीतीनें विचार करूं:- (१) सरल स्त्रीकोशांत:- सरल स्त्रीकोशांत एकच किंजल्क असल्यामुळें तो स्वतंत्रच असतो. अशा स्थितीत ‘किंजल्क व स्त्रीकोश’ हे समानार्थीच शब्द असतात. सरल स्त्रीकोशांतील किंजल्काच्या अंडाशयास ‘सरल अंडाशय’ असें म्हणतात. कारण तो एकाच किंजल्काच्या खालच्या फुगीर भागापासून झालेला असतो. हा सामान्यत: लांबट व कांहींसा चपटा असतो व त्यांमुळें त्याच्या उदरसीवनाचा भाग बराच स्पष्ट रीतीनें दृष्टीस पडतो. अशा अंडाशयाचा आडवा छेद घेंऊन सूक्ष्मदर्शक यंत्रानें त्याची परीक्षा केली तर असे आढळतें कीं, बीजांडें उदरसीवनाच्या जागीं किंचित जाड अशा टेंकडावर उत्पन्न झालेलीं दिसतात. बीजांडांनां धारण करणाऱ्या टेंकडास अपूप असें म्हणतात. व हे अपूप सामान्यत: उदरसीवनावर आंतील बाजूस उत्पन्न होतात. सरल स्त्रीकोशाच्या अंडाशयांत एक अथवा अधिक बीजांडें उत्पन्न होतात (उदा. वाटाणा, घेवडा, हरभरा, चाकवत).

(२) विभक्त किंजल्कयुक्त स्त्रीकोश:- हिरवा चाफा व अशोकाच्या फुलांत स्त्रीकोश अनेक किंजल्कांचा बनलेला असतो. व ते किंजल्क सुटे असतात. या फुलांत ते अनेक असल्यामुळं त्यांची एकांत एक अशीं अनेक वर्तुळें लागलेली असतात परंतु किंजल्कांची संख्या केसर व मुकुटलाइतकीच असल्यास त्यांची मांडणी मुकुटदलांसमोर व केसरांच्या दृष्टीनें एकान्तरित असतें. सीताफळाच्या फुलांचे किंजल्क प्रथम सुटे असतात परंतु अखेर त्यांचा संयोग होऊन त्यांपासून एकच फळ बनतें. गुलाब, स्ट्राबेरी व कमळ या फुलांचे किंजल्कहि सुटे असतात परंतु ते ज्या आधारांवर उगवलेले असतात त्यांची वाढ झपाटयानें होऊन गुलाबाच्या फुलाप्रमाणें सर्व किंजल्कांचे अंडाशय त्यानें झांकले जातात किंवा स्ट्राबेरीप्रमाणें ते अंडाशय बारीक बारीक दाण्यांप्रमाणें विशिष्ट आकाराच्या मऊ लिवलिवीत आधारावर वरील पृष्ठभागीं चिकटलेले असतात. आधाराचा आकार स्ट्राबेरींत चेंडूप्रमाणें तर कमळांत वाटोळया टेबलाप्रमाणें असतो. अशा रीतीनें आाधार व अंडाशय यांचा संयोग होऊन एका फुलापासून किंजल्क सुटे असतांहि एकच फळ धरतें व अंडाशयापासून तयार झालेले भाग बारीक बिंयांप्रमाणें आधाराच्या पोकळींत किंवा त्याच्या पृष्ठभागावर लागलेले असतात.

(३) संयुक्तकिंजल्कयुक्त स्त्रीकोश:- बऱ्याच फुलांत किेजल्क सुटे नसून एकमेकांस जोडलेले असतात. म्हणून सामान्य रीतीनें फुलांतील स्त्रीकोशाचा भाग जणूं काय एकाच किंजल्काचा झाला असल्यासारखा दिसतो. अशा एकमेकांस जोडून असणाऱ्या किंजल्कांनीं तयार झालेल्या स्त्रीकोशास संयुक्तकिंजल्कयुक्त असें नांव देतात. संयुक्तकिंजल्कयुक्त स्त्रीकोशांतील किंजल्कांचा संयोग पूर्ण रीतीनें झालेला असतो तर कांहींत हा संयोग अर्धवट रीतीनें झालेला असतो. पूर्ण रीतीनें संयोग झाला असल्यास एककिंजल्कित स्त्रीकोशाप्रमाणें अशा फुलांत केवळ एकच अंडाशय व एकच चूडा व असल्यास एकच ध्वज दृष्टीस पडतो (लिंबू, अफू). अशा स्थितींत स्त्रीकोशांत किती किंजल्क आहेत हें ठरविण्यास बाह्यत: कोणतेंच चिन्ह नसतें. अंडाशयाचा आडवा छेद घेऊन व अपूपांची संख्या पाहून अशा प्रकारच्या स्त्रीकोशांतील किंजल्कांची संख्या निश्र्चित करावी लागते. अपूपांची संख्या व किंजल्कांची संख्या सामान्यत: सारखीच असते. किंजल्कांचा संयोग अर्धवट रीतीनें झालेला असल्यास स्त्रीकोशांतील त्यांची संख्या निश्र्चित करण्यास कांहींच अडचण पडत नाहीं. कारण अंडाशय, ध्वज व चूडा या तीन भागांपैकीं जे भाग सुटे असतील त्यांच्या संख्ये इतकेी किंजल्कांची संख्या सामान्यत: असते. अर्धवट संयोग झाला म्हणजे कांही फुलांत (उदा.जवस) अंडाशयांचा पक्का संयोग होऊन ध्वज व चूडा सुटया असतात, तर दुसऱ्या काहीं फुलांत (रूई व मांदार) चूडांचा संयोग होऊन ध्वज व अंडाशय सुटे राहिलेले आढळतात. तसेंच सूर्यकमळ, कारळें, करडई इत्यादिकांच्या फुलांत अंडाशय आणि ध्वज यांचा पक्का संयोग झालेला असून फक्त चूडाच तेवढया सुटया असतात. अशा स्थितींत सुटया चूडांची संख्या जरी सामान्यत: किंजल्कांच्या संख्येइतकी असते तरी कांहीं फुलांमध्यें (उदा. एरंड) प्रत्येक किंजल्काच्या चूडेचे दोन दोन भाग होऊन त्या व्दिखंडित झाल्या असल्यामुळें चूडांची संख्या अशा फुलांतील किंजल्कांच्या दुप्पट असते. तेव्हां नेहमीच चूडांची संख्या किंल्जकांच्या संख्येइतकी नसल्यामुळें केवळ त्यावर विसंबून राहिलें असतां चूक होण्याचा संभव असतो.

दुधीसारख्या झाडांच्या नारीपुष्पांतील किंजल्कांचा संयोग अंडाशयापासून चूडेपर्येत झालेला असतो तरी पण या अंडाशयापासून भागांत स्पष्ट अशा पाळी असल्यामुळें या पाळींची संख्या मोजून किंजल्कांची संख्या ठरवितां येते. याप्रमाणें संयुक्तकिंजल्कयुक्त स्त्रीकोशाची बाह्य स्थिति असते. अशा रीतीने एकापेक्षां जास्त किंजल्कांच्या संयोगानें जो अंडाशय झालेला असतो त्यास संयुक्त अंडाशय असें म्हणतात. आंतां या तिन्ही प्रकारच्या स्त्रीकोशांतील अंडाशय, ध्वज व चूडा यांचा स्वंतत्र रीतीनें थोडा विचार करूं.

अंडाशय:- फक्त एकाच किंजल्काच्या खालच्या फुगीर भागानें जो अंडाशय बनलेला असतो त्यास सरल अंडाशय असें म्हणतात. व एकापेक्षां अधिक किंजल्कांच्या अंडाशयांच्या संयोगानें जो अंडाशय झालेला असतो त्यास ‘संयुक्त अंडाशय’ असें म्हणतात. सरल अंडाशयाचा आकार गोल, अंडयासारखा, लांबोडका, चपटा इत्यादि अनेक प्रकारचा असतो. परंतु संयुक्तअंडाशयाचा आकार बहुतकरून वाटोळा किंवा अंडयाच्या आकारसारखा असतो. त्याचा बाह्यपृष्ठप्रदेश सपाट असतो किंवा पृष्ठभागावर पाळी व खाचा स्पष्ट अशा दिसतात.

संयुक्त अंडाशय, किंजल्कांचा खालचा भाग प्रथम दुमडून नंतर त्यांचा आपसांत संयोग झाल्यानें बनतो किंवा किंजल्कांच्या कडा एकमेकीस चिकटून त्यांचा त्या ठिकाणी संयोग झाल्यांने बनला जातो. पहिल्या प्रकारांत प्रत्येक किंजल्कांच्या खालच्या भागाची एक स्वतंत्र पोकळी प्रथम होऊन नंतर अशा बंद असलेल्या पोकळयांचा संयोग झाल्यानें अंडाशयांत किंजल्कांच्या संख्येइतके कप्पे असलेले त्याच्या आडव्या छेदांत दृष्टीस पडतात. आंत प्रत्येक कप्पा एक एक किंजल्काच्या खालच्या फुगीर भागाचा असतो. याप्रमाणें अंडाशयांत सांपडणाऱ्या प्रत्येक कप्प्यास “कोटर” असें म्हणतात, व जवळजवळच्या दोन कोटरांच्यामध्यें जो एक पडदा असतो त्यास “व्दिगुणभित्ति” असें म्हणतात. व्दिगुणभित्ताचा पडदा जवळजवळच्या दोन किंजल्कांच्या बाजू एकमेकीस चिकटल्यानें झालेला असतो, म्हणून तो एकपदरी नसून दोनपदरी असतो. तो सामान्यत: उभा वाढतो परंतु डाळिंबाच्या फुलांत एकावर एक रचलेल्या अंडाशयांच्या ओळी असल्यामुळें हे व्दिगुणभित्तींचे पडदे आडवे वाढलेले दिसतात. कोटरांच्या संख्येनुसार अंडाशयास एककोटरयुक्त, व्दिकोटरयुक्त अशीं नांवें दिलीं जातात. धोतरा, जवस अशांसारख्या कांहीं फुलांच्या अंडाशयांत खऱ्या व्दिगुणभित्तींशिवाय अपूपापासून किंवा पृष्ठसीवनापासून नवीन पडदे वाढून अंडाशयांतील कोटरांची संख्या किंजल्कांच्या संख्येपेक्षां जास्त होते. पंरतु हे पडदे एकेरी असल्यामुळें व तसेंच मागून वाढत असल्यामुळें खऱ्या व्दिगुणभित्ती व ह्या खोटया व्दिगुणभित्ती ओळखतां येतात. खोटया व्दिगुणभित्तींचे पडदे कांहीं फुलाच्या अंडाशयांत उभे वाढतात व कांहींत आडवे वाढतात. उदाहरणार्थ जवसाच्या अंडाशयांत ते उभे वाढलेले आढळतात व बाहव्याच्या अंडाशयांत ते आडवे असलेले दृष्टीस पडतात. बाहव्याचा अंडाशय सरळ असून सुध्दां हे खोटे व्दिगुणभित्ती केवळ संयुक्तअंडाशयांतच सापडूं शकतात असें म्हणतां येत नाहीं.

संयुक्तअंडाशयाच्या दुसऱ्या प्रकारांत अंडाशय किंजल्कांच्या फक्त कडा एकमेकीस जोडून बनत असल्यामुळें तो सरळ अंडाशयाप्रमाणें केवळ एककोटरयुक्त असतो व त्यांत खऱ्या व्दिगुणभित्तीची वाढ झालेली नसते. परंतु अफूच्या अंडाशयाप्रमाणें या दुसऱ्या प्रकारच्या अंडाशयांत कांहीं अर्धवट वाढलेले पडदे आढळतात. हे पडदे अंडाशयाच्या मध्यभागापर्येत वाढून मध्यभागीं त्यांचा संयोग होत नसल्यामुळें अशा अंडाशयासहि एककोटरयुक्त असेंच म्हणतात. संयुक्त अंडाशयाच्या या प्रकारांत खऱ्या व्दिगुणभित्ती वाढत नसल्या तरी मोहरी, सरसो, मुळा, नवलकोल इत्यादि फुलांच्या अंडाशयाप्रमाणें खोटया व्दिगुणभित्ती त्यांत आढळतात. मोहरी, सरसो इत्यादिकांमध्यें हा पडदा अपूपापासून वाढून अंडाशयाच्या मध्यभागीं उभा पसरलेला असतो. यामुळें अंडाशयांत एक कोटराऐवजीं दोन कोटर दृष्टीस पडतात.

अपूपररचना:- अंडाशयांत अपूपांची मांडणी निरनिराळया प्रकारची आढळते. सामान्यत: अपूपरचनेचे तीन प्रकार आढळतात: (१) आक्षीक (अक्षवर्ती), (२) भित्तीक (पृष्ठवर्ती) व (३) स्वतंत्र मध्यवर्ती.

अक्षवर्ती (आक्षीक):- अपूपररचना एकापेक्षां जास्त कोटारांनीं युक्त अशा संयुक्त अंडाशयांत सांपडते. अशा अंडाशयांत अपूप खऱ्या व्दिगुणभित्तीच्या आंतील कडावर उगवत असल्यामुळें त्याच्या बरोबर अंडाशयाच्या मध्यभागीं ते खेंचले जाऊन या कडांच्या संयोगानें जो एक मध्यभागीं अक्ष बनलेला असतो त्याभोंवतीं ते लागलेले असतात. खरें म्हटलें असतां हे अपूप व खऱ्या व्दिगुणभित्तीच्या आंतील कडांच्या संयोगानें झालेला भाग हे दोन्ही मिळून हा मध्यभागीं असलेला अक्ष बनतो. अशा अक्षाभोंवतीं हे अपूप लागलेले असल्यामुळें त्यास अक्षवर्ती (आक्षीक) असें म्हणतात. अशी अपूपरचना असलेल्या अंडाशयाचा आडवा छेद घेऊन पाहिलें तर त्यांत गाडीच्या चाकासारखी रचना दिसते. चाकाच्या मध्यभागीं असलेल्या तुंब्याप्रमाणें अपूपांचा भाग या छेदाच्या मध्यभागी दिसतो व त्यापासून चाकाच्या आरीप्रमाणें खऱ्या व्दिगुणभित्तीचे पडदे अंडाशयाच्या कवचापर्येत पोहोचलेले दिसतात, व अशा प्रत्येक दोन जवळजवळच्या पडध्यांच्या कैचीत बीजांडें लागलेलीं असतात (कापूस, भेंडी, लिंबू).

पृष्ठवर्ती अथवा भित्तीक अपूपरचना:- ही रचना एक कोटरयुक्त संयुक्त अंडाशयांत आढळते. या रचनेंतील अपूप अंडाशयाच्या कवचाच्या आंतील पृष्ठभागावर ज्या ठिकाणीं दोन किंजल्कांचा जोड झालेला असतो त्या ठिकाणीं उगवलेले असतात. अशा प्रकारची अपूपरचना असलेल्या अंडाशयांत बीजांडें अंडाशयाच्या आंतील पृष्ठभागावर अपूपांच्या जागीं चिकटलेली असतात (उदा. तिळवण, कांकडी, भोपळा). घेवडा, वाटाणा इत्यादिकांच्या सरल अंडाशयांतहि वस्तुत: अपूप पृष्ठवर्तीच असतात परंतु हे अंडाशय फक्त एक एक किंजल्कयुक्त असल्यामुळें व तं पानाप्रमाणें लांबट चपटया आकाराचे असल्यानें अशा अंडाशयांस पानाप्रमाणें दोन स्पष्ट कडा असतात. या दोन कडांपैकीं उदरसीवनाच्या जागीं असलेल्या कडेवर हे अपूप एका रेषेंत वाढलेले असतात. म्हणून पृष्ठवर्ती अपूपरचनेच्या या विशिष्ट प्रकारास धारावर्ती अपूपरचना असें स्वंतत्र नांव दिलें जातें.

स्वतंत्र मध्यवर्ती अपूपरचना:- कृष्णनीळ, सीतासरसो, चंदन, प्रिमरोज इत्यादिकांच्या कुलांत अपूप अंडाशयांतील उदरसीवनांच्या जागीं किंवा पुष्पधारापासून उत्पन्न होऊन स्वंतत्र रीतीनें अंडाशयाच्या मध्यभागीं त्यांचा एक स्तंभ बनलेला असतो व या स्तंभावर सभोंवार बीजांडें लागलेलीं असतात. ही रचना साधारणपणें अक्षवर्ती रचनेप्रमाणें दिसते. परंतु त्या रचनेप्रमाणें ह्या अपूपांचा संयोग व्दिगुणभित्तींच्या योगानें अंडाशयाच्या कवचाशीं पर्यायानें झालेला नसतो. ते अंडाशयाच्या मध्यभागी स्वतंत्र असतात. कृष्णनीळ, सीतासरसो यांच्या कुलांत अगदीं प्रथम व्दिगुणभित्तीचे पडदे कोवळया अंडाशयांत असतात पंरतु ते लवकरच नाश पावत असल्यामुळें अपूपांचा अडाशयाच्या कवच्याशीं असलेला संबंध लवकरच तुटून अपूपांचा मध्यवर्ती भाग स्वतंत्र होतो. चंदनकुलांत अपूप पुष्पधारापासूनच वाढत असल्यामुळें ते मूळपासूनच स्वतंत्र असतात.

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .