प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

वनस्पतिशास्त्र भाग १६

बीजांड:- अंडाशयांतील सर्वात जास्त महत्तवाचा भाग बीजांडांचा असतो. कारण त्यांचेंच रूपांन्तर गर्भधारणा झाल्यावर बीजामध्यें होतें. बीजांडें अपूपापासून उत्पन्न होतात व त्यांची संख्या निरनिराळ्या झाडांच्या अंडाशयांत निरनिराळी असते. कारळे, करडई, चाकवत, राजगिरा, सूर्यकमळ इत्यादींच्या अंडाशयांत एकच बीजांड असतें. धनें, जिरें, बडीशेप इत्यादिकांत दोन; घेवडा, वाटाणा, तूर इत्यादिकांत सहज मोजतां येतील इतकी थोडीं व धोत्रा, अफू, भोपळा, भेंडी इत्यादिकांत असंख्य बीजांडें असतात. सागरगोटयाच्या बीजांडाप्रमाणें कांहीं झाडांचीं बीजांडें अपूपावर एका बारीक दोऱ्यासारख्या देंठांनीं चिकटलेलीं असतात. बीजांडाच्या या देंठास “नालीक” असें म्हणतात. दुसऱ्या कांहीं झाडांच्या बीजांडास अशा प्रकारचें “नालीक” नसतें (उदा. धोत्रा, कापूस). तीं नालीकाशिवायच अपूपावर चिकटलेलीं असतात. बीजांडाचा अपूपाशीं अथवा नालीकशीं ज्या ठिकाणीं जोड झालेला असतो त्या बिंदूस “अंक” असें म्हणतात. अंडाशयांत विशेषत: एक बीजांड असलेल्या अंडाशयांत-बीजांडाची उभारणी भिन्न भिन्न प्रकारची असलेली आढळते. कांहीं अंडाशयांत बीजांड तळापासून उगवून सरळ उभें (उन्नत) असतें, कांहींत तें तळाच्या जरा वर एका बाजूस उत्पन्न होऊन वरच्या बाजूस झुकलेलें असतें. अशा बीजांडास “आरोही” असें म्हणतात. उलट कांहीं बीजांडें अंडाशयाच्या आढयापासून उत्पन्न होऊन अंडाशयाच्या पोकळींत लटकलेलीं असतात. अशा बीजांडांस दोलित अथवा लोंबतीं बीजांडें म्हणतात. तसेंच कांहीं आढयाजवळ एका बाजूस उत्पन्न होऊन खालच्या बाजूकडे झुकलेलीं असतात. अशा बीजांडांस “अवरोही” असें म्हणतात.

बीजांडाचीं रचना:- बीजांडांत मध्यभागीं गर्भाशयाचा भाग असतो. गर्भाशयांतच गर्भधारणा व गर्भोत्पत्ति होत असल्यामुळें हा बीजांडाचा सर्वात महत्तवाचा भाग असतो. गर्भाशयांत आरंभी एकच मोठी पेशी असते व तींत एकच “जीव-गर्भ” असतो. परंतु लवकरच त्या एका जीव-गर्भाचे सारखे आठ भाग होतात आणि अशा रीतीनें गर्भाधान होण्यापूर्वी गर्भाशयांत आठ जीवगर्भ आढळतात. पुढें यांपैकीं दोघांचा संयोग होऊन पुन्हां आठाचे सात होऊन हा संयुक्तजीवगर्भ गर्भाशयाच्या मध्यभागीं येऊन राहतो. बाकीच्या सहापैकीं तीन एका टोंकास व दुसरे तीन दुसऱ्या टोंकास जाऊन बसतात. गर्भधारणा झाल्यावर मध्यभागीं असलेल्या संयुक्त जीवगर्भाचे अनेक तुकडे होऊन त्याभोंवतीं स्वतंत्र पेशिवेष्टणें उत्पन्न होऊन गर्भाशयांत अनेक लहान लहान पेशी उत्पन्न होतात.

गर्भाशयाच्या बाहेर त्याच आकाराचें एक जाड वेष्टण असतें. बीजांडाचा बहुतेक भाग या वेष्टणाचाच झालेला असतो. हें वेष्टण अनेक पेशीमय असतें. यास ‘गर्भाशयं कोश’ म्हणतात. सामान्यत: गर्भाशयकोशाबाहेर दोन पटलांचें आच्छादन असतें. आंतील कवचास अन्त:कवच व बाहेरील कवचास बाह्यकवच असें म्हणतात. अन्त:कवच व बाह्यकवचांची आच्छादनें गर्भाशयकोशाच्या भोंवतीं पूर्णपणें सर्व बाजूंस पसरलेलीं नसतात, तर एकाच ठिकाणी दोन्ही कवचांमध्यें खिंड अथवा चीर राहिलेली असते. बीजांडकवचामधील या मोकळ्या जागेस ती सूक्ष्म छिद्राप्रमाणें असल्यामुळें “सूक्ष्मछिद्र अथवा सूक्ष्मव्दार” असें म्हणतात हीं दोन्हीं कवचें जरी बऱ्याच भागावर एकावर एक अशीं स्वतंत्र रीतीनें आच्छादिलेलीं असलीं तरी एक जागीं त्यांचा संयोग होऊन एकजीव झालेला असतो. बीजांडाच्या या भागास “कवच-संगम” अथवा पटलसंगम असें म्हणतात. याच कवचसंगमाच्या जागीं अपूपापासून अन्नवाहक नळ्या येऊन त्यांच्या व्दारां बीजांडाचें पोषण होतें. सामान्यत: बीजांडावर दोन कवचांचें आच्छादन असलें तरी कांहींत एकच कवच असतें (उदा. करडई) व कांहींत तिसरेंहि अर्धवट वाढलेलें कवच असतें (उदा. एरंड). बांडगुळाच्या कांहीं जातींत तर बीजांड नग्न अथवा कवच-हीन असतें.

याप्रमाणें सूक्ष्मव्दार, कवचसंगम, अंक आणि नालीक इत्यादि बीजांडरचनेंतील जीं विशिष्ट स्थळें त्यांचा अन्योन्यसंबंध सर्व वनस्पतींत एकसारखा नसल्यामुळें या स्थळांच्या संबंधानुसार बीजाडांचे चार प्रकार केले जातात ते: (१) ऊर्ध्वमुख- या प्रकारच्या बीजांडांत “अंक व कवचसंगम” खालच्या बाजूस सरळ रेषेंत असून वरच्या बाजूस त्याच रेषेंत सूक्ष्मव्दार असतें (कुटू). (२) वक्र:- या प्रकारांत अंक व कवचसंगम एका बाजूस सरळ रेषेंत असतात परंतु सूक्ष्मव्दाराकडचा भाग याच सरळ रेषेंत दुसऱ्या बाजूस नसून कमजास्त प्रमाणानें त्यांच्याकडे झुकलेला असतो (उदा. भेंडी, कापूस) (३) अधोमुख:- बीजांडाच्या या प्रकारांत बीजांडाचा मोकळा भाग इतका झुकलेला असतो कीं त्यायोगें सूक्ष्मव्दार अंकाच्या बाजूस येऊन कवचसंगम उलट दिशेस त्याच सरळ रेषेंत गेलेला आढळतो. अशा रीतीनें अधोमुख बीजांडांची रचना ऊर्ध्वमुख बीजांडाच्या उलट असते. (४) तिर्यक:- ह्या प्रकारांत बीजांडाचा मोकळा भाग इतका झुकलेला असतो कीं, तो अंकावर अथवा नालीकावर आडवा पसरलेला असतो. त्यामुळें सूक्ष्मव्दार व कवचसंगम यांस जोडणारी सरळ रेषा अंकामधून जाणाऱ्या रेषेवर लंबकोण करते.

ध्वज:- अंडाशय व चूडा यांस जोडणाऱ्या दोऱ्यासारखा भागास “ध्वज” म्हणतात. सर्व फुलांच्या किंजल्कामध्यें ध्वजाचा भाग असतोच असें नाहीं. परंतु ज्या स्त्रीकोशांत तो असतो त्यांत तो अंडाशयावर एकाच तऱ्हेनें उत्पन्न झालेला असतो असें नाहीं. कांहींत तो अंडाशयाच्या अग्रापासून (धोत्रा) कांहींत पृष्ठभागावर एका बाजूकडून (उदा. उंबर, वड) तर कांहींत तळापासून (उदा. तुळस, सबजा) उत्पन्न झालेला असतो. आकारानेंहि ध्वज सारख्या प्रकारचा नसतो. तो बारीक दोऱ्यासारखा असतो, पंरतु कर्दळीच्या फुलांत तो बराच रूंद व दलाप्रमाणें रंगीत असतो. अशा रूंद ध्वजास दलाकार असें म्हणतात. कांहीं ध्वजाच्या पृष्ठभागावर बारीक बारीक केंसाची लव असते व कांहींत अशी नसते.

चूडा:- किंजल्काच्या शेंडयावर असलेल्या चिकट व गांठीसारख्या भागास “चूडा” असें म्हणतात. चूडा खोलगट, पसरट, केंसाळ, पाळीदार, चापट, पातीदार, भरीव गांठीसारखी, टोंकदार किंवा चेंडूप्रमाणें गोल इत्यादि अनेक प्रकारची असते.

अयोनिजवर्गातील पुष्परचना:- अयोनिज वर्गातील झाडांचीं फुलें फार साध्या रचनेचीं असतात. हीं फुलें एकलिंगी असून कांहीं जातीत (उदा. चीर) नरनारी पुष्पें एकाच झाडावर उत्पन्न होतात; व कांहीं दुसऱ्या जातींत (उदा. साबुदाण व यू) तीं त्याच जातीच्या दोन स्वंतंत्र झाडांवर उत्पन्न होतात. दोन्ही प्रकारच्या पुष्पांत आवरणदलांचा अभाव असून सामान्यत: पुष्पाधाराच्या अक्षाप्रमाणें वाढलेल्या भागावर कित्येक पिंड व वल्कें उत्पन्न झालेलीं असतात. उदाहरणार्थ चीरच्या एकाच झाडावर नर व नारीपुष्पें उत्पन्न होतात. व त्यांत कित्येक केसर अथवा किंजल्क असतात. हे केसर व किंजल्क सूक्ष्म वल्कांच्या कक्षेंत उत्पन्न होऊन अक्षावर त्यांची मांडणी अशा रीतीची असते कीं, दोन्ही प्रकारच्या मंजरींचा आकार शंकूसारखा झालेला असतो. प्रत्येक शंकूसारख्या मंजरींत केवळ केसर किंवा किंजल्क उत्पन्न होत असल्यामुळे चीर झाडावर फुलांचे नर व नारीशंकु लागतात असें म्हटल्यानें वस्तुस्थितीचें वर्णन यथार्थ रीतींनें केल्यासारखें होतें. नरशंकूचा प्रत्येक केसर वल्कासारखा असून त्याच्या खालच्या पृष्ठभागावर फक्त दोनच परागगुल्मांचा एक परागपिटक असतो. नारीशंकूच्या अक्षावर सूक्ष्म वल्काच्या कक्षभागीं एक एक लांकडी, जाड, कठिण व पसरट किंजल्क उत्पन्न होऊन त्याच्या आंतील पृष्ठभागाच्या तळाशी उघडया रीतींने दोन बीजांडे लागलेलीं असतात.

साबुदाण्याच्या झाडाचे किंजल्क वरील प्रकारचे नसून पक्षाकार पर्णासारखा त्यांचा आकार असतो व त्यांची मांडणी स्वतंत्र अक्षावर शंकूसारखी झालेली नसून झाडाच्या स्कंधभागावर शेंडयाकडे त्यांचे गुच्छ व खऱ्या पानांचे गुच्छ एकांतरित रीतीनें उत्पन्न झालेले असतात. ह्या पक्षाकार किंजल्कांचा रंग भुरा असतो व त्यांच्या खालच्या पत्रकांच्या जागीं दोन किंवा दोहोंपेक्षां जास्त बीजाडें उघडी लागलेली असतात. यू नांवाच्या झाडावर नर व नारी पुष्पांचे शंक उत्पन्न होत नाहींत. नरपुष्पांच्या अक्षावर खालीं कित्येक वल्के व वरच्या बाजूस ढालीसारखे केसर लागलेले असतात. प्रत्येक केसराच्या परागपिटकांत दोहोंपेक्षां जास्त परागगुल्म असतात. नारीपुष्पांचे शंकू नसून त्यांचा आकार कळीसारखा असतो व ह्या नारीपुष्पाच्या कळींत मधील अक्षाच्या खालच्या बाजूस कित्येक वल्कें असतात, शेंडयाकडे एका वल्काच्या कक्षेंत एक बारीक शाखा उत्पन्न होऊन तीवर कांहीं वल्कें व अग्रभागीं केवळ एक खुलें बीजांड उत्पन्न झालेलें असतें.


अपुष्पवनस्पतींच्या पुनर्जननाचे प्रकार:- अपुष्पवनस्पतींत पुनर्जननाचे तीन प्रकार आढळतात: (१) प्रारोहक, (२) असंभोगजन्य व (३) संभोगजन्य. पहिल्या प्रकारांत वनस्पतीच्या शरीराचा सामान्य भाग वेगळा होऊन त्याच्या वाढीनें पहिल्याप्रमाणें नवीन वनस्पति तयार होते. हा प्रकार पाण व किंण्व वनस्पतींत सामान्यत: जास्त प्रमाणांत आढळतो. शैवाल व हंसराज वर्गात पुनर्जननाची ही पध्दति क्कचित् क्कचित् आढळते. असंभोगजन्य व संभोगजन्य पुनर्जननक्रियेंत सामान्यत: एकपेशीमय विशेष भाग उत्पन्न होऊन त्यांच्या स्वतंत्र भाग उत्पन्न होऊन त्यांच्या स्वतंत्र अथवा संयोग झाल्यावर होणाऱ्या वाढीनें नवीन वनस्पति उत्पन्न होते. स्वतंत्र रीतीनें एकएकटेच वाढणारे हे जे स्वतंत्र भाग उत्पन्न होतात त्यांस ‘स्वयंभूपिंड’ असें म्हणतात व जे अशा प्रकारच्या दोन विशिष्ट भागांचा संयोग झाल्यावर नवीन वनस्पतीस जन्म देऊं शकतात त्यांस ‘संभोगपिड’ असं म्हणतात. हे ‘स्वयंभू’ व ‘संभोगपिंड’ कधीं एकाच वनस्पतींच्या आयुष्यांतील दोन स्वतंत्र अवस्थांमध्यें उत्पन्न होतात. व या स्वतंत्र अवस्थांमध्यें त्या वनस्पतींची दोन शरीरेंहि एकमेकापासून स्वतंत्र असतात, किंवा ह्या दोन्ही अवस्था एकाच शरीराच्या साहाय्यानें कांहीं वर्गात पुऱ्या होतात.

स्वयंभवें उत्पन्न करणाऱ्या शरीरास व अवस्थेस ‘स्वयंभवधारी’ व ‘संयोगभवे’ उत्पन्न करणाऱ्या अवस्थेस व शरीरास संयोगभवधारी असें म्हणतात. अपुष्पवनस्पतींच्या निरनिराळया वर्गात ह्या दोन अवस्था कमजास्त प्रमाणानें स्पष्ट व स्वतंत्र अशा असतात. उत्क्रान्तीसंबंधीच्या उच्च-नीच दर्जाप्रमाणें ह्या दोन अवस्थांतील शरीरे विकास पावतात. पाण व किण्व वनस्पतींप्रमाणें नीचवर्गातील वनस्पतींमध्यें संयोगभवधारी शरीराचा विकास जास्त झाला असून स्वयंभवधारी शरीराचा विकास अत्यंत कमी प्रमाणातं झालेला असतो. ह्या दोन्ही वर्गात व तसेंच शैवालवर्गोत ज्या अवस्थेंत आपणास त्या त्या वर्गातील भिन्न भिन्न व्यक्ती सहज दिसतात ती खरें पाहिलें असतां ‘संयोगभवधारी’ अवस्था असते. परंतु पाण व किण्प वर्गात या ‘संयोगभवधारी’ शरीरांपासूनच ‘स्वयंभवे’ उत्पन्न होतात. शैवालवर्गातहि वनस्पतीचें सामान्य शरीर ‘संयोगभवधारी’ असतें व यांच्या संयोगभवधारी शरीराचा विकास विशेष मोठया प्रमाणावर झालेला नसतो. त्यांत मूल, स्कंध, पर्ण इत्यादि अवयवांचा विकास झालेला नसतो. तें एखाध्या अति सूक्ष्म चेंडूच्या किंवा अंडयाच्या आकाराचें असतें व त्यास स्वतंत्र असें अस्तित्व नसून ‘संयोगभवधारी’ शरीरावर त्याची वाढ होते व त्यापासून स्वयंभवें उत्पन्न झाल्यावर तें सुकून जातें. हीं ‘स्वयंभवे’ जमिनीवर पडून रूजतात व त्यांपासून एकदम संयोगभवधारी शरीर उत्पन्न न होतां एक पातळ, चपटें, चकतीसारखें किंवा तंतुमय शरीर प्रथम उत्पन्न होऊन त्यावर उत्पन्न होणाऱ्या एका कळीचीवाढ होऊन मग ‘संयोगभवधारी’ शरीर उत्पन्न होतें. ‘संयोगभवधारी’ व ‘संयोगभवधारी’ अवस्थेमधील ह्या शरीरास प्रोटोनीमा असें म्हणतात.

हंसराजवर्गात ‘संयोगभवधारी’ शरीराचा विकास बराच जास्त झालेला असतो व ‘संयोगभवधारी’ शरीराचा उलट ऱ्हास झालेला असतो. ज्या अवस्थेंत ह्या वर्गोतील झाडें आपण पाहतों ती स्वयंभवधारी शरीराची अवस्था असते. ह्या अवस्थेंत खोड, उपरी मुळें व पानें स्पष्ट रीतीनें चांगलीं वाढलेलीं दिसतात व ‘स्वयंभवें’ सामान्य पानापासून किंवा झाडाच्या शेंडयाकडे कणिशमंजरीप्रमाणें दिसणाऱ्या भागापासून उत्पन्न होतात. हीं ‘संयोगभवें’ कांहीं उपवर्गोत (हंसराज, अश्र्वपुच्छ, मुग्दल इ.) एकाच तऱ्हेचीं व कांहीं उपवर्गोत (पाणहंसराज) दोन तऱ्हेचीं असतात. स्वयंभवें रूजून त्यांपासून उत्पन्न होणारीं ‘संयोगभवधारी’ शरीरें कांहीं उपवर्गोत ‘पुंसंयोगभवें’ व ‘स्त्रीसंयोगभवें’ हीं दोन्हीं एकाच शरीरापासून उत्पन्न करूं शकतात, किंवा पुसंयोगभवें व स्त्रीसंयोगभवें निरनिराळ्या स्वतंत्र शरीरापासून उत्पन्न होतात. कोणत्याहि रीतीनें तीं उत्पन्न झालीं तरी नवीन ‘संयोगभवधारी’ शरीर या दोहोंचा संयोग झाल्याखेरीज उत्पन्न होऊं शकत नाहीं. स्वयंभवें एकपेशीमय असतात हें वर सांगितलेंच आहे. ज्याप्रमाणें बिया फळामध्यें उत्पन्न होतात त्याप्रमाणें हीं स्वयंभवेंहि सामान्यत: एका वाटोळया भागांत उत्पन्न होतात. याप्रमाणें स्वयंभवें उत्पन्न करणाऱ्या भागास स्वयंभवकोश असें म्हणतात.

पाणवनस्पतींत दोन प्रकारचीं स्वयंभवें उत्पन्न होतात. कांहींत तीं कवचयुक्त सामान्य तऱ्हेचीं असतात तर कांहींत तीं कवचहीन असून त्यास शेपटाप्रमाणें एक अथवा अनेक कशाय असतात. या कशायांच्या साहाय्यानें तीं नम्र अथवा कवचहीन स्वयंभवें जलांशांत इकडे तिकडे फिरूं शकतात. म्हणून अशा स्वयंभवांनां चलस्वयंभवें असें म्हणतात व ज्या कोशांत तीं उत्पन्न होतात त्यास चलस्वयंभवकोश असें म्हणतात. किण्व, शैवाल व हंसराज या वर्गोत स्वयंभवे कवचयुक्त असतात. पाण व किण्व वनस्पतींत स्वयंभवें संयोगभवधारी शरीरापासून सामान्यत: उत्पन्न होतात.

संयोगभवें ज्या कोशांत उत्पन्न होतात त्यास संयोगभवकोश असें म्हणतात. ह्या संयोगभवामध्यें उत्क्रांतीच्या दर्जानुरूप लिंगभेद झालेला असतो. उदाहरणार्थ पाण व किण्ववनस्पतींत संयोग पावणाऱ्या संयोगभवामध्यें लिगभेददर्शक स्पष्ट चिन्हें कांहींत प्रगट झालेलीं असतात. शैवाल व हंसराज वर्गोत मात्र तीं बरींच जास्त स्पष्ट अशीं असतात.

सामान्यत: पुंसंयोगभवें हीं स्त्रीसंयोगभवांपेक्षां आकारानें लहान असून कशाययुक्त असल्यामुळें तीं जलांश भागांत इकडे तिकडे हिंडू फिंरू शकतात. अशा पुंसंयोगभवास चल अथवा रेतसंयोगभव असें म्हणतात व ज्या भागांत अशीं पुंसयोगभवें उत्पन्न होतात त्यास पुंसंयोगभव अथवा रेतसंयोगभवकोश असें म्हणतात. तसेंच स्त्रीसंयोगभवें अथवा रज:संयोगभवे उत्पन्न करणाऱ्या भागास स्त्री अथवा रजसंयोगभवकोश असें म्हणतात.

पाण व किण्व वनस्पतींत पुं व स्त्रीसंयोगभवकोश साध्या रचनेचा म्हणजे बहुधां एकपेशीमय असतो. परंतु शैवाल व हंसराजवर्गोत ही रचना बरीच संकीर्ण झालेली असते. विशेषत: फरक स्त्रीसंयोगभवकोशांत फार स्पष्ट असा झालेला असतो. म्हणून साध्या रचनेच्या स्त्रीसंयोगभवकोशास सरल “स्त्रीसंयोगभवकोश” आणि दुसऱ्या प्रकारच्या संकीर्ण रचनेच्या स्त्रीसंयोगभवकोशास “संकुल स्त्रीसंयोगभवकोश” असें म्हणतात. पाण्वर्गोतील कांहीं वनस्पतींत पुं व स्त्रीसंयोगभवें हीं दोन्ही आपापल्या कोशांतून बाहेर पडून त्यांचा संयोग अशा रीतीनें बाहेर होतो. परंतु बाकी इतर सर्व वर्गोत हा संयोग स्त्रीसंयोगभवकोशांत सामान्यत: होतो. ह्या वर्गोतील स्त्रीसंयोगभवें आपली कोशांतील जागा सोडीत नाहींत. केवळ पुंसंयोगभवांची हालचाल होऊन तीं स्वावलंबनानें (किंवा वारा, किडे, फुलपाखरें इत्यादिकांच्या साहाय्यानें) स्त्रीसंयोगभवापर्येत पोहोंचतात व तेथें त्यांचा संयोग होऊन एक नवीन संभोगभव तयार होतें.

पाण व किण्व वनस्पतींत कांहींमध्यें संयोग पावणाऱ्या या संयोगभवात लिंगभेद दाखविणारी चिन्हें नसतात. म्हणून अशा रचनेनें सारख्या असलेल्या संयोग भवाच्या संयोगामुळें झालेल्या संभोगभवास समयुतिसंभोगभव असें म्हणतात आणि पुं व स्त्री अशा प्रकारचा लिंगभेद ज्यांत स्पष्ट रीतीनें झालेला आहे अशा संयोगभवाच्या संयोगानें झालेल्या संभोगभवास “विषमयुतिसंभोगभव” असें म्हणतात. समयुति व विषमयुति संभोगभवें वाढून त्यांच्या आध्यजीवनरसाची विभागणी होऊन त्यापासून स्वयंभवें एकदम बनतात किंवा त्यांच्या वाढीनें स्वयंभवधारी शरीरें उत्पन्न होऊन त्यांच्या विशिष्ट भागापासून स्वयंभवें उत्पन्न होतात. व याप्रमाणें पुनर्जननाची तरतूद व्यवस्थित रीतींनें अपुष्पकोटींतील वनस्पतींत केली जाते.

फल.- सपुष्पवनस्पतींत फुलें उत्पन्न होण्याचा मुख्य हेतु फळें व बीं उत्पन्न करण्याचा असतो. बीं फळामध्यें उत्पन्न होतें व फळ फुलाच्या स्त्रीकोशाची वाढ होऊन तयार होतें. किंबहुना स्त्रीकोशाच्या अंडाशयांत एक प्रकारची चेतना उत्पन्न होऊन त्याची वाढ होऊं लागते व त्यांत बीं उत्पन्न झालें म्हणजे त्या वाढलेल्या अंडाशयासच “फल” असें म्हणतात. कांहीं वनस्पतींत (गुलाब, सफरचंद, अंजीर, फणस इ.) केवळ अंडाशयाच्याच वाढीनें फळ तयार होत नसून ज्या चेतनेनें अंडाशयाचा भाग वांढू लागतो तिचा परिणाम “मंजरीपीठ” व “पुष्पाधार” “पुटकोश इत्यादि” भागांवर होऊन त्यांच्याहि वाढ अंडाशयाबरोबर होऊन उभयतांच्या संयोगानें फळ बनतें. अशा प्रकारें कांहीं फळें केवळ अंडाशयामध्यें स्थित्यंतर होऊन तयार होतात व कांहीं अंडाशय व त्याजवळीक भाग या उभयतांमध्ये स्थित्यंतर होऊन दोंहोंच्या संयोगानें बनतात. पहिल्या प्रकारच्या फळास असंकीर्ण फळें व दुसऱ्यास संकीर्ण फळें असें म्हणतात.

फळें “संकीर्ण” अथवा “असंकीर्ण” कोणत्याहि प्रकारचीं असलीं तरी तीं तयार होण्यास स्त्रीकोशाच्या अंडाशयभागास विशिष्ट प्रकारची चेतना बाहेरून मिळावी लागते हें वर सांगितलेंच आहे. ही चेतना परागकणांत सांपडणाऱ्या रेतपिंडाचा संयोग अंडाशयांतील गर्भाशयामध्यें असणाऱ्या रज:पिंडांशी झाल्यानें उत्पन्न होते. रेतरज:पिंडाच्या संयोगास गर्भधारणक्रिया असें म्हणतात. ही गर्भधारणक्रिया झाल्यानेंच अंडाशय इत्यादि भागांत वाढ सुरू होऊन त्यायोगें फळ तयार होतें.

रेतरज:पिंडाचा संयोग संपुष्पवनस्पतींत सहज होऊं शकत नाहीं. कारण ज्या परागकणांत रेतपिंड उत्पन्न होतो तो परागकण केसराच्या परागपिटकांत असतो; व रज:पिंड त्यापासून दूर अशा किंजल्कांच्या अंडाशयांतील गर्भाशयांत असतो. अशा स्थितींत ते रेतरज:पिंड जवळजवळ येण्याकरितां प्रथम परागकणांचे स्थानांतर होऊन ते किंजल्कांच्या चूडेवर येऊन पडावे लागतात. परागकण चूडेवर येऊन पोहोंचणें या क्रियेस परागग्रहण अथवा परागीकरण असें म्हणतात. हें परागग्रहण किंवा परागीकरण कधीं कधीं एकाच फुलाचे परागकण त्याच्या किंजल्कांच्या चूडांचा संयोग झाल्यानें होतें किंवा एकाच जातीच्या दोन भिन्न फुलांचे परागकण व चूडा यांचा संयोग होऊन बनतें. पहिल्या प्रकारास स्ववशपरागग्रहण अथवा परागीकरण व दुसऱ्यास परवशपरागग्रहण अथवा परागीकरण असें म्हणतात. हें परागग्रहण होण्यास वारा, फुलपांखरें, किडे इत्यादिकांची मदत होते कारण परागकणांमध्यें चलनवलनाची स्वयंभू शक्ति नसल्यामुळे त्यांस चूडेपर्येत नेऊन पोहोंचविण्याचें परागवाहकाचें काम वारा, किडे, फुलपाखरें इत्यादिकांच्याच व्दारें होतें. याप्रमाणें परागीकरण झाल्यावर चूडेपासून अंडाशयांतील गर्भाशयापर्येत परागकणांतील रेतपिंड पोंहोचण्यास परागकणाची वाढ व्हावी लागते. यावेळीं चूडेमध्यें उत्पन्न होणाऱ्या एक प्रकारच्या रसाचें शोषण करून रेतपिंड वांढूं लागतो व त्या कणाची एक लांबट परागनलिका बनते. ही परागनलिका किंजल्कामध्यें ध्वज असल्यास त्याच्यामधून वाढत जाऊन अंडाशयांत आपला मार्ग काढीत गर्भाशयापर्येत जाऊन पोहोंचते व तेथे गर्भाशयाच्या पडध्याचा भाग व परागनलिकेचा पडदा एका जागीं विरघळून किंवा फाटून जाऊन त्यामध्यें तयार झालेला रेतपिंड गर्भाशयामध्यें उतरतो व तेथें यावेळेस तयार झालेल्या रज:पिंडाशीं त्याचा संयोग होऊन गर्भधारणा होते. अशा रीतीनें संयोग होऊन गर्भधारणा झाल्यावर बीजांडें व अंडाशय या दोहोंमध्यें अन्नसंग्रहाची तरतूद व वाढ होऊन फळ तयार होतें. अशा प्रकारें जीं फळें उत्पन्न होतात त्यांमध्यें कुलवैशिष्टय दाखविणारे गुणधर्म किंवा अंतर्बाह्य रचना आढळत नसल्यामुळें फळांचें वर्गीकरण नैसर्गिक पध्दतीनें करतां येत नाहीं तर कांहीं विशिष्ट गुणधर्म व रचनेचा विचार करून तदनुसार केवळ कृत्रिम पध्दतीनेंच हें वर्गीकरण पुढील प्रमाणें करावें लागतें:-

फळांचे प्रकार:- फळांचे असंकीर्ण व संकीर्ण असे दोन मुख्य वर्ग केले जातात हें वर सांगितलेंच आहे. यापैकीं असंकीर्ण फळांचे त्यांच्या विशिष्ट गुणधर्मानुसार अनेक भेद व पोटभेद केले जातात. असंकीर्ण फळांपैकीं कांहीं केवळ एकाच अंडाशयापासून झालेलीं असतात. पहिल्या प्रकारच्या केवळ एका किंजल्कापासून झालेल्या फळास सरल व अनेक किंजल्कांच्या संयुक्त अंडाशयापासून झालेल्या फळास संयुक्त फळें असें म्हणतात. फळें सरल असोत अथवा संयुक्त असोत त्यांपैकीं कांहीं पक्क दशेमध्यें वाळून कोरडीं होतात व कांहीं त्यांपैकीं कांहीं पक्क दशेमध्यें वाळून कोरडी होतात व कांहीं बिलबिलीत मऊ, रसाळ होऊन शेवटी कुजतात. कांहीं कोरडीं फळें टणक होऊन वाळल्यावरहि आपोआप उकलत नाहींत व कांही वाळल्यावर आपोआप उकलत नाहींत व कांहीं वाळल्यावर आपोआप उकलून त्यांतील बिया बाहेर गळूं लागतात. रसाळ फळें सामान्यत: आपोआप उकलत नाहींत. कोरडी फळें निरनिराळया रीतीनीं उकलतात. कांहीं फळांना त्यांच्या लांबीच्या दिशेनें भेगा पडून तीं उकल्तात (उदा. कापूस, घेवडा, तून, मोहरी). कांहीची साल आडवी फाटते (राजगिरा) व कांहींच्या सालीमध्यें विशिष्ट जागीं छिद्रें पडून त्यांतून बीं बाहेर गळून पडतें (अफू, अन्टिरायन) फळांच्या उकलण्यास स्फोट असें म्हणतात. व लांबीमध्यें होणाऱ्या स्फोटास कपाटस्फोट, रूंदींतील स्फोटास व्यत्यस्त व छिद्रांच्याव्दारें होणाऱ्या स्फोटास छिद्रस्फोट असें म्हणतात. यापैकीं कोणत्याहि पध्दतीनें उकलणाऱ्या फळास स्फोटशील व न उकलणाऱ्या फळास बध्द असें म्हणतात.

कांहीं फळांत एकच बी असते व कांहीत अनेक बिया असतात. तसेंच फळांचें कवच अथवा साल कांहींत अगदीं झिरझिरत, पातळ, कांहींत कातडयाप्रमाणें चिंवट, कांहींत लांकडाप्रमाणें टणक व कांहींत एकाहून जास्त पदराची असते. हे सर्व गुणधर्म विचारांत घेऊन असंकीर्ण फळाचें पुढें दिल्याप्रमणे वर्गीकरण केलें जातें: असंकीर्ण फळाचे मुख्य दोन भेद केले जातात: (१) कोरडी, वाळकी अथवा नीसर किंवा शुष्क फळें आणि (२) रसाळ, गीरदार अथवा मांसल फळें; यांपैकीं कोरडया अथवा शुष्क फळांचे पुन्हां तीन पोटभेद केले जातात. (१) एकबीजमय बध्द ;२) अनेकबीजमय बध्द पालिस्फोटी (भेदी) व (३) अनेकबीजमय स्फोटशील, नीरस (शुष्क) एकबीजमय बध्द फलामध्यें सालीची जाडी, कठिणपणा व ज्या किंजल्कांच्या अंडाशयापासून तीं झालेलीं असतात त्यांची संख्या इत्यादि गुणभेदनुरूप कांही प्रकार केले जातात:- नीरस एकबीजमय बध्दफळें, अजृंभक:- हें एक बारीक फळ असतें. हें एककिंजल्कयुक्त असून फळाच्या सालीपासून बीं निराळें होत नाहीं. हें ऊर्ध्व अंडाशयापासून झालेलें असतें (रानजाई, मोरवेल). त्वक्कवचधारी- हें फळ सुध्दां बारीक असतें व तें अनेककिजल्कयुक्त किंवा एककिंजल्कयुक्त असून त्याची साल झिरझिरीत पातळ असून त्यापासून बीं मोकळें होतें. हें फळ अजृंभकाप्रमाणें ऊर्ध्व असतें (माठ, चाकवत). प्रिंयगू:- हें दोन किजल्कांच्या संयोगानें झालेलें असतें. हें अजृंभकापेक्षां थोडें आकारानें मोठें असतें व बाकी इतर बाबींत प्रियंगू फळाचें व अजृंभकाचें साम्य असतें (गहूं, भात, बाजरी, जव, जोंधळा). संपुट:- हें दोन किंजल्कांचे झालेलें असून अधर असतें व प्रियंगूप्रमाणें बीज व फल यांचा या फळांत एकजीव झालेला नसून फळाच्या सालीपासून बीज मोकळें होऊं शकंतें. कपाली:- अजृंभकाप्रमाणें याची साल कठिण व त्यापेक्षा जाड कवटीसारखी असते. हें ऊर्ध्व फळ अनेककिजल्कयुक्त असलें तरी त्यांपैकी एकाची वाढ होऊन त्यांत एकच कोटर व एक बी उत्पन्न होतें (ओक, नारळ). पक्षधारी:- हें फळ एक अथवा अनेक किंजल्कयुक्त, ऊर्ध्व अथवा अधर व सामान्यत: एकबीजमय असतें. त्याचा विशेष म्हणजे त्याच्या कवचावर एक अथवा अनेक पंखासारखे भाग असतात (उदा. जंगली बदाम, मधुमालती). अनेकबीजमय बध्दपालीस्फोटी (भेदी):- फळांचा आणखी एक प्रकार असा आहे कीं, त्यांत फळें वाळल्यावर आपोआप उकलतात परंतु असें झालें तरी बिया बाहेर गळून पडत नाहींत, कारण हीं फळें उकलण्यानें फळाचे जे भाग होतात ते बंद राहून प्रत्येकांत एक बी झांकलेली असते. या फळास “बध्दपालीभेदी” असें म्हणतात. “बध्दपालीभेदी” फळांचे चार प्रकार आढळतात:- (१) आंदोली पाली:- ह्या जातीचें फळ उकल्यावर त्याचे दोनच भाग होतात व प्रत्येक भागांत एक बी बंद असलेली आढळते व ह्या दोन पाली या फळामध्यें असणाऱ्या ‘फलाधार’ यूपकावर कांहीं वेळ लटकलेल्या असतात (उदा. धने, जिरे व बडिशेप). (२) त्रिखंडी:- या फळाचे फक्त तीनच भाग होतात व प्रत्येक फळ पालीबध्द असतें (एरंडी, दुधी). (३) मुद्रा:- या फळाचे तिहीपेक्षां जास्त भाग होतात व प्रत्येक भाग एका बध्दपालीचा असतो व त्यांत एक बी असतें. या फळाचा आकार मुद्रेप्रमाणें दिसतो (उदा. बरीआरा, मुद्रा, गुलाखैरा). वरील तिन्ही प्रकारच्या फळांचे तीं उकलून जे भाग होतात त्यांपैकी प्रत्येक एका किंजल्काच्या अंडाशयाचा असतो. (४) मालाशिंबा- हें एक लांबट शेंगेसारखें फळ असून मण्यांच्या मालेप्रमाणें त्याचा आकार असतो. मण्याप्रमाणें याचे जे भाग फुगीर असतात ते तुटून वेगळे होतात व प्रत्येकांत एक एक बीं असते. हें फळ इतर बध्दपालीभेदी फळाप्रमाणें अनेककिंजल्कयुक्त नसून फक्त एककिंजल्कयुक्तच असतें (सालपर्णी).

स्फोटशील अनेकबीजमय शुष्क अथवा नीरस फळें:- नीरस, स्फोटशील फळांचे आकारभेदनुरूप दोन मुख्य भेद केले जातात: (१) शेंगेप्रमाणें लांबट व सामान्यत: चपटीं असणारीं अथवा “शिंबारूपी” अथवा शिंबारूप व (२) बोंडाप्रमाणें कांहीशी वाटोळीं असणारी अथवा “गंडरूपी” किंवा गंडरूप. सर्व शिंबारूपी फळांमध्यें स्फोट एकाच तऱ्हेनें होत नसून निरनिराळ्या तऱ्हांनी होत असल्यामुळें त्यांचे तीन पोट भेद केले जातात: (१) शिंबा- हें शेंगेसारखे ऊर्ध्व फळ सामान्यत: चपटें, एककिंजल्कयुक्त व अनेकबीजमय असतें. या फळामध्यें उदरसीवनावर बिया अंतराअंतरानें चिकटलेल्या असतात व फळ वाळलें म्हणजे दोन्ही कडांवर उकललें जाऊन त्याचे दोन भाग होतात व बिया गळून पडतात. कांहीं शिंबाचे विचित्र आकार असतात व कांहीं वाळल्यावर उकलत नाहींत (घेवडा, तूर, हरभरा, बाहवा, चिंच, विलायती गवत). (२) भस्त्रका (भस्त्रा)- ही शेग फुगीर असून शिंबाफलाप्रमाणें दोन्ही कडांवर न उकलतां एकाच कडेवर उकलते. म्हणून फळ फुटल्यावर त्याचे दोन स्वतंत्र भाग होत असून ते एका कडेवर जोडलेलेच राहतात (रूई, हरणखुरी). (३) (सार्षपी) सार्षप: ही शेंग शिंबेप्रमाणें दोन्ही कडांवर उकलते परंतु ती शिंबेप्रमाणें शेंडयाकडून खालीं उकलत नसून खालून शेंडयाकडे उकलत जाते व हिचे जे दोन भाग सुटे होतात त्याबरोबर बियाहि प्रत्येक भागाबरोबर वेगळया होत नसून त्या फळाच्या मध्यभागीं असणाऱ्या झिरझिरीत पडध्याच्या कडांवर चिकटलेल्या राहतात किंवा ताबडतोब गळून पडतात. हें ऊर्ध्व फळ दोन किंजल्कांच्या संयोगानें झालेलें असतें, (मोहरी, सरसी, गोभी). गंडरूपी फळांचे पोटभेद जरी केले जात नाहींत तरी तीं बोंडासारखीं, ऊर्ध्व, अनेककिंजल्कयुक्त फळें एकाच तऱ्हेनें उकलत नसून कांहीं उभ्या चिरा पडून, तर कांहीं आडवी वर्तुळाकाकर एक चीर पडून व कांही छिद्रें पडून उकलतात.अशा सर्व प्रकाराच्या फळांस “गंड” असें म्हणतात (उदा. कपाशी, धोत्रा, तून, जवस).

रसाळ (असंकीर्ण) अथवा मांसल फळें:- मांसल फळांचे दोन मुख्य भेद होऊं शकतात: (१) मज्जा-गर्भी अथवा पूर्ण गीराचीं फळें, (२) अश्मगर्भी अथवा मध्यभागी कठिण कोय अथवा गाभा असलेलीं फळें. मज्जागर्भी फळांत पुढें दिलेले प्रकार आढळतात: (अ) गुली-हें फळ ऊर्ध्व अथवा अधर असूं शकतें व तसेंच अनेककिंजल्कयुक्त असून पूर्ण रीतीनें गीरदार असतें. साल मऊ असून गीराचा भाग जास्त पोसत असल्यामुळें आक्षीक अपूररचनेवर लागलेल्या बिया गिरामध्यें सुटया होतात (उदा. पेरू, वांगें, टोमॅटो, द्राक्ष) (आ) कौष्मांडी (कौष्मांड)- हें फळ नेहमीं अधर असतें व तीन किंजल्कांच्या संयोगानें झालेलें असून पूर्ण गीराचें असलें तरी गुलीप्रमाणें त्याच्या बिया अपूपापासून सुटून गिरामध्यें अव्यवस्थित रीतीनें विखुरलेल्या सांपडतात नाहींत. तर भित्तिक अपूपावर त्या जोडलेल्या राहतात, त्यामुळें ह्या मांसल फळांत त्यांच्या पक्क दशेमध्यें मध्यभागी एक पोकळी उत्पन्न होते (उदा. दोडका, भोपळा, काकडी). (इ) नागरंगी (नागरंग)- हें फळ ऊर्ध्व व अनेक किंजल्कयुक्त असतें व त्यांतील अपूपाची व्यवस्था “आक्षीक” असते. परंतु ह्या फळाच्या कवचाचे अथवा सालींचे दोन पदर एकमेकंपासून सुटे होतात. बाहेरील जाड सालीचा पदर. या आंतील झिरझिरीत पदराचे किेंजल्कांच्या संख्येइतके स्वतंत्र भाग होऊन ते एकमेंकांपासून सुटे होतात व फळांतील मध्यवर्ती अक्षापासूनहि ते सुटे होत असल्यामुळें ह्या फळामध्यें किंजल्कांच्या संख्येइतक्या फांकी सामान्यत: विशेष प्रयास न करतां सुटया होतात. प्रत्येक फांक हा एकएक किंजल्काच्या अंडाशयाचा वाढलेला भाग असतो व त्यामध्यें अपूपापासून उत्पन्न झालेला गीर व आंतील कडेवर लागलेल्या (नारिंग) बिया असतात. फळांच्या कवच्याचे याप्रमाणें एकमेकांपासून सुटे होणारे पदर झाले असल्यास स्थानानुरूप त्यांस बाह्यफलकवच, मध्यफलकवच व अन्त:फलकवच अशीं नावें देतात. (ई) कापित्थ - गुली फळाप्रमाणें ह्या फळाचा आंतील भाग पूर्ण गीराचा असून त्यामध्यें गुलीप्रमाणें बिया सुटया विखुरलेल्या असतात. हें फळ अनेक किंल्जकयुक्त असून, ऊर्ध्व असते. परंतु गुलीप्रमाणें त्याचें कवच कातडयाप्रमाणें चिवट नसून कवटी लांकडासारखी कठिण असते (उदा. कवठ, बेल). (उ) करक अथवा दाडिम-हें फळ अनेककिंजल्कयुक्त असून अधर असतें व त्यांत अनेक कोटर असतात. फळाचें कवच जाड असून त्यांत किंजल्कांच्या दोन पंक्ती एकावर एक रचलेल्या असतात. बिया अव्यवस्थित रीतीनें कांहीं कवचाच्या अन्त:पृष्ठावर तर कांहीं मध्यवर्ती अक्षावर लागलेल्या असतात (उदा. डाळिंब)

अश्मगर्भी मांसल फळें, अष्ठीलाहें:- एककिंजल्कयुक्त ऊर्ध्व फळ असून त्याच्या कवचाचे तीन पदर सहज एकमेकांपासून सुटे होऊं शकतात. बाह्यकवच चामडयासारखें चिवट असतें, मध्यकवच मऊ, गीरदार असतें व अन्त:कवच कठिण कवटीसारखें असून त्यांत एक अथवा अधिक बिया असतात (उदा. अंबा, बदाम, आडू). खरी अष्ठीला याप्रमाणें एककिंजल्कयुक्त असली तरी फळ अनेककिंजल्कयुक्त व मांसल असून त्याच्या मध्यभागी जर कवटीदार अन्त:कवच असेल तर त्या फळासहि “अष्टीला” फळाच्या सदरांत अन्तर्भूत केलें असतां चूक होणार नाही.

संकीर्ण फळें:- असंकीर्ण फळांप्रमाणें संकीर्ण फळांचेहि कांहीं भेद व पोटभेद केले जातात. प्रथम अशा फळांचे दोन मुख्यभेद करतात:- (१) समुदित फळें व (२) बहुल फळें. समुदित फळ एकाच फुलाच्या अनेक किंजल्कांचा संयोग पुष्पाधाराशीं होऊन बनलेलें असतें. पुष्पाधारांचा भाग वाढीस लागून पोसला जातो व त्यामध्यें गर्भधारणा झाल्या वर विभक्त अथवा संयुक्त अंडाशयांत भाग गढून जाऊन पुष्पाधार व अंडाशय यांच्या संयोगानें एक मांसल, अधरफळ बनतें, किंवा अशा रीतीनें पोंसून मांसल झालेल्या पुष्पाधाराच्या पृष्ठभागागावर सुटीं बारीक बारीक फळें लहान लहान खडयाप्रमाणें रोविलेली दिसतात. उदाहणार्थ सफरचंद, लोकाट, गुलाब ह्या फळांचा वरील मांसल मिष्ट भाग पुष्पाधाराचा असून मध्यभागीं असलेला कठिण भाग तेवढा खऱ्या अंडाशयापासून झालेला असतो. सफरचंद व लोकाट या फळांतील अंडाशयांचा भाग संयुक्त असून, गुलाबाच्या फळांत ते सामान्य फळांतील बियाप्रमाणें आढळतात. हे बियासारखे भाग अंडाशयापासून झालेले असल्यामुळें अजृंभकासारखी तीं खरीं फळें होत, परंतु पुष्पाधारांत वरीलप्रमाणें तीं गढून राहिल्यामुळें त्यासकट त्यांचें एक समुदित फळ बनलें असतें.

स्ट्राबेरी नांवाच्या झाडाचीं फळें याच जातीचीं असून त्यांची “अजृंभक” छोटी फळें पोसून मांसल झालेल्या पुष्पाधाराच्या आंत गुलाबाप्रमाणं चिकटलेलीं असतात. अशोक, व हिरवा चाफा या दोन झाडांची फळेंहि समुदित असतात. एकाच पुष्पाच्या विभक्त अंडाशयापासून तीं झालेलीं असतात परंतु स्ट्रॉबेरीप्रमाणें तीं मांसल पुष्पाधाराच्या पृष्ठभागावर खडयाप्रमाणें चिकटलेली रहात नसून विशेष न वाढलेल्या व न पोसलेल्या पुष्पाधारावर मोठमोठया लोलकाप्रमाणें लोंबत असलेलीं दिसतात. त्यांपैकीं प्रत्येक फळ स्वतंत्र व सुटें नसून लहान अष्टीला फळासारखें कांहींसें मांसल व एकबीजमय असतें. वर दिलेल्या वर्णनाप्रमाणें समुदित फळांचें वर्गीकरण पुढें दिलेल्या दोन प्रकारांनीं करतां येतें: एक, पुष्पाधार व संयुक्तअंडाशय यांच्या संयोगानें झालेलीं व दुसरी पुष्पाधार व विभक्त अंडाशय यांच्या संयोगानें झालेली. पहिल्या प्रकारास ‘आताली’ फळें म्हणतात. उदाहरणार्थ सफरचंद, नासपत्ती, लोकाट. दुसऱ्या प्रकारांत दोन पोटप्रकार आढळतात:- (१) अजृंभकराशी अथवा राश्यजृंभक (उदा. गुलाब, स्ट्राबेरी) आणि (२) राश्याष्टीला अथवा अष्टीला राशी (उदा. हिरवा चाफा, अशोक).

संकीर्ण फळांचा दुसरा प्रकार ‘बहुल’ फळांचा असतो हें वर सांगितलेंच आहे. हीं बहुल फळें एकाच पुष्पाच्या किंजल्क व इतर भागांच्या संयोगानें झालेलीं नसतात तर संबंध पुष्पमंजरीचें सर्व फुलासकट एक फळ बनलेलें असतें. उदाहरणार्थ उंबर, अंजीर, तुतीचें फळ, फणस इत्यादि. ज्या मंजरीपासून हीं बहुल फळें झालेलीं असतात त्यांपैकीं कांहींत मंजरीचीं पुष्पें मंजरी-दंडावर बाहेरच्या बाजूस लागलेली असतात व ह्या पुष्पाची आवरणदलें जास्त पोसलीं जाऊन सर्व फलें एकमेकांस चिकटतात व अशा रीतीनें सबंध मंजरीपासून एक फळ तयार होतें. ह्या फळाचा रसाळ मांसल भाग विशेषत: आवरणदलापासून झालेला असतो; अंडाशयांचे भाग विशेष पोसलेले नसतात तुतीचें फळ ह्या जातीचें आहे. तुतीच्या फळांत जे दाणेदार भाग दिसतातते तुतीच्या मंजरीचीं फुलें असतात; त्यांपैकी एक दाणा वेगळा करून पाहिला तर त्यांत मांसल झालेली आवरणदलें व बारीकसा अंडाशयाचा भाग स्पष्ट दिसूं शकतो.

फणसाच्या फळाचीहि जवळ जवळ अशीच स्थिति असते. फणसाच्या झाडावर नर व नारी पुष्पें वेगवेगळया मंजरीवर असतात. नारीपुष्पांच्या मंजरीपासून फणस बनतात; नरपुष्पांच्या मुजरीपासनू ते बनत नाहींत. फणसाच्या पृष्ठभागावर जे कांटे दिसतात त्यांपैकीं प्रत्येक कांटा एका नारीपुष्पाची जागा दर्शवितो. फणसांत मध्यभागी जो दांडा (पाव) असतो तो मंजरीच्या दंडाचा भाग असतो व त्यावरील ‘चातडा’ चा जो दोरेदार भाग असतो तो मंजरीच्या ‘फलक, फलकिल’ इत्यादि भागांपासून झालेला असतो. फणसांत जो गरा असतो तो अंडाशयाचा वाढलेला भाग असल्यामुळें वस्तुत: तो एका स्वतंत्र फळाचा भाग असतो; व अशा रीतीनें अनेक फळें म्हणजे गरे एका फणसांत असतात म्हणून ते एक बहुलफळ आहे ह्यांत संशय नाहीं.

अंजीर, उंबर, वड, पिंपळ इत्यादिकांची फळें सुध्दां बहुल फळें असतात. तूत व फणस ह्यांच्या रचनेहून त्यांची रचना जरा वेगळी असते. अंजीर, उंबर इत्यादि फळांचा बाहेरील जाड भाग मंजरीपीठाचा असून त्याच्या आंतील पृष्ठभागावर जे दाणे दिसतात त्यांपैकी प्रत्येक दाणा हा फुलाचा एक भाग असतो. अशा रीतीनें सर्व फुलें मंजरीपीठावर आंतील बाजूस असल्यामुळें हें बहुलफळ एखाध्या अधरफळाप्रमाणें दिसतें. देव्दार व चीर ह्यांची फळें सुध्दां ‘बहुल’ जातीची असतात. शंकूसारख्या त्यांच्या विशेष आकारावरून त्यांस ‘शंकु’ फळें असें म्हणतात. हा प्रत्येक शंकु एका संबंध नारीपुष्पमंजरीपासून झालेला असतो.

(७) बीज.- गर्भधारणा झाल्यावर अंडाशयाची वाढ होऊन ज्याप्रमाणें त्याचें फळ बनतें त्याप्रमाणें त्याच चेतनेचा परिणाम प्रत्यक्ष बीजांडावर (गर्भाडावर) होऊन त्याच्याहि विकास होऊं लागतो व त्यामध्यें गर्भोत्पत्ति होऊन गर्भधारणा होण्यापूर्वी गर्भाशयांतील एका मूळ जीवगर्भाचे आठ लहान भाग होतात: ह्या आठापैकीं जे तीन सूक्ष्मछिद्राजवळ एकत्र होतात त्यांपेकीं एक ‘रज:पिंड’ असतो म्हणून या तीन जीवगर्भाच्या संघास ‘रज:पिडत्रिकूट’ अथवा रज:पिंडपरिवार असें म्हणतात. या त्रिकूटापैकीं ‘रज:पिंड’ सोडून जे दुसरे दोन जीवगर्भ असतात त्या जोडीस ‘साहाय्यकारीयुग्म’ असें म्हणतात. कारण रेतपिंडास रज:पिंडाकडे पोहोंचविण्याच्या कामीं त्यांचे साहाय्य होतें. सूक्ष्मछिद्राच्या उलट बाजूस दुसरे तीन ‘जीवगर्भ’ एकत्र होतात. ह्या दुसऱ्या त्रिकूटास ‘मूलीनपेशी त्रिकूट’ असें म्हणतात. बाकी राहिलेले दोन जीवगर्भ गर्भाशयाच्या मध्यभागीं येऊन त्यांचा संयोग होतो. या संयुक्त जीवगर्भास दुय्यम जीवगर्भ असें म्हणतात. रज:पिंडत्रिकूटापैकीं रज:पिंडाशी परागनलिकेतील रेतपिंडाचा संयोग होऊन गर्भधारणा होते व त्या संयुक्तपिंडास ‘गर्भपिंड’ असें म्हणतात. याप्रमाणें गर्भधारणा झाल्यावर परागनलिकेंतील प्रारोहणपिंडाशिवायकरून जो आणखी एक तिसरा ‘जीवगर्भ’ असतो तो गर्भाशयांत उतरतो व तेथें त्याचा संयोग दुय्यमजीवगर्भाशीं झाल्यावर अंडयशय व गर्भाशयाच्या वाढीस खरी सुरवात होते. गर्भाशयाच्या पेशीमध्यें त्यामुळें गर्भपिंडाच्या वाढीस लागणाऱ्या अन्नाचा सांठा केला जातो व अशा रीतींनें उत्पन्न झालेल्या अन्नाचा उपयोग करून गर्भपिंड वाढूं लागतो व त्यायोगें “गर्भमूल”, “गर्भपल्लव” व एक अथवा अधिक “गर्भदलें” हे पूर्ण गर्भाचे जे मख्य अवयव तयार झाल्यावर ही वाढ थांबते. गर्भाचे हे सर्व अवयव तयार होईपर्येत गर्भाशय व गर्भाशयकोश ह्या भागांत सांठविलेल्या अन्नाचा पुरवठा होतो. इतकेंच नव्हे तर कांहीं झाडांच्या अंडाशयांतील बीजांडांत अन्नाचा सांठा इतका जास्त असतो कीं, गर्भाच सर्व अवयव तयार झाल्यावर सुध्दां त्याचा बराचसा भाग गर्भाभोंवती पसरलेला राहातो व तो त्या स्थितींत बीजांडांतहि सांपडतो (उदा. एरंडी). परंतु कांहीं वनस्पतींच्या अंडाशयांतील बीजांडांत उत्पन्न झालेलें सर्व अन्न गर्भाचे वर दिलेले अवयव तयार होईपर्येत खर्च झाल्यानें त्या बीजांडाचें रूपान्तर बीजस्थितींत झाल्यावर गर्भाबाहेर त्यासभोंवती पसरलेला अन्नाचा सांठा सांपडत नाहीं (उदा. वाटाण, हरभरा). गर्भपिंडास अवयवसंपन्न अवयवयाचें स्वरूप येण्यास प्रथम एकपेशीमय गर्भपिंडापासून अनेकपेशीयुक्त जाल तयार व्हावें लागतें व त्यास विशिष्ट स्वरूप प्राप्त होऊन एका विशिष्ट आकाराचा गर्भ तयार होतो. प्रथम गर्भपिंडाच्या मूलपेशींचे दोन भाग होतात व ह्या दोन नवीन पेशी एकमेकीपासून सुटया न होतां एकमेकीस चिकटलेल्या असतात. याप्रमाणें गर्भपिंडाच्या ज्या दोन पेशी होतात त्यांपैकीं वरच्या म्हणजे सूक्ष्म छिद्राकडील पेशींचे एकाच सरळ रेषेंत अनेक भाग होऊन पेशीची एक लहान रांग तयार होते. ह्या पेशीपंक्तीस उब्दधन असें म्हणतात. उब्दंधनाचें एक टोंक बीजांडाच्या कवचास सूक्ष्म छिद्राकडील बाजूस चिकटलेलें असतें. या उब्दंधनाच्या दुसऱ्या मोकळया व गर्भाशयाच्या मध्यभागाकडे असलेल्या पेशींचे आठ भाग होतात. या नवीन आठ पेशींपैकीं खालच्या चार पेशींचे पुन्हां नवीन नवीन भाग होऊन त्यांची जुळणी विशिष्ट प्रकारें होऊन गर्भपल्लव व गर्भदलांचा भाग तयार होतो. ‘उब्दंधन’ व ह्या दुसऱ्या टोंकाकडील खालच्या चार पेशी ह्यांच्यामध्यें असणाऱ्या चार पेशींचें विभाजन होऊन ज्या पेशी बनतात त्यांची विशिष्ठ प्रकारची जुळणी होऊन गर्भमूलाचा भाग अधिकांशानें तयार होतो व अग्रभाग व त्यावरील टोपीचा भाग, उब्दंधनाच्या या भागाकडील शेवटच्या पेशीचें विभाजन होऊन ज्या नव्या पेशी तयार होतात त्यापासून तयार होतो. याप्रमाणें नवीन पेशी तयार होऊन पूर्णगर्भ तयार होतो. एकदल, व्दिदल व बहुदल या वर्गापैकीं ज्या वर्गोतील वनस्पति असेल त्याप्रामाणें गर्भास एक, दोन अथवा अधिक दलें फुटतात.

एकदलवनस्पतींच्या गर्भाची घटना व्दिदलवनस्पतीप्रमाणें एकाच विशिष्ट शिस्तीनें न होतां भिन्न तऱ्हांनीं होते. उदाहणार्थ कांहींत उब्दंधनाचा भाग उत्पन्न होतो व कांहींत होत नाहीं आणि ज्या गर्भांडापासून तो उत्पन्न होतो त्यांतहि व्दिदलगर्भाच्या पूर्वस्थितीप्रमाणें उब्दंधनाचा भाग विशेष पोसलेला नसतो, परंतु कांध्याच्या फुलांतील कांही वनस्पतींच्या गर्भाशयांत तो चागंला पोसलेला असतो. अशा रीतीनें गर्भाची घटना एकदलवनस्पतीप्रमाणें निरनिराळया पध्दतीनें होत असली तरी व्दिदलगर्भाप्रमाणें दलाचा भाग गर्भपल्लवाच्या खालीं डाव्या उजव्या बाजूस उत्पन्न न होतां बहुतकरून एकदलावनस्पतीमध्यें गर्भदल अग्रभागीं असतें व गर्भपल्लवाचा भाग त्याच्या खाली एका बाजूस सामान्यत: असतो.

याप्रमाणें गर्भाचे अवयव तयार होत असतांनां गर्भाशय गर्भाशकोश, बाह्यकवच, अन्त:कवच इत्यादि भागांच्या पेशींतहि बरीच घडामोड होऊन निरनिराळया रंगांची, आकाराचीं व कमजास्त कठिण असलेली बीजें तयार होतात. बीजाची उत्पत्ति याप्रमाणें बीजांडापासून होत असल्यामुळें दोहोंच्या रचनेंत थोडेसें साम्य आढळतें.

बीजाची सामान्य रचना:- सामान्येंकरून बीजामध्यें अंत:- कवच व बाह्यकवच अशीं कवचें एकावर एक मढलेली असतात. बाह्यकवच व बहूतकरून जाड, लांकडासारखें कठिण, चामडयाप्रमाणें चिवट असतें व अन्त:कवच पातळ पापुद्रयाप्रमाणें नाजुक असतें. कांहीं बीजांतहि दोन्ही कवचें एकमेकांपासून सहज सुटीं होऊं शकतात तर कांहींत तीं जवळजवळ एकजीव झाल्यानें सहज सुटीं होऊं शकत नाहींत. कांहींत तर ती पक्कीं जोडलेलीं असल्यामुळें जणूं काय एकच कवच आहे असें वाटतें. बाह्यकवचावर केंस किंवा खडबडीत उंचसखल भागहि कांहीं बीजांत आढळतात. एरंडीसारख्या कांहीं बीजांत बाह्य व अन्त:कवच याशिवाय आणखी एक अर्धवट वाढलेलें अपूर्ण कवच असतें. ह्या तिसऱ्या कवचास अपूर्णकवच असें म्हणतात. बाह्यकवचावर सूक्ष्मछिद्राचें स्थान मटार, घेवडा, खजूर इत्यादि बीजांप्रमाणें स्पष्ट असतें. किंवा एरंडी भोपळा इत्यादिकाप्रमाणें ते स्थान स्पष्ट नसतें अशा स्थितींत गर्भमूलाची जागा शोधून काढून सूक्ष्मछिद्राचें स्थान निश्र्चित करतां येतें. कारण सूक्ष्मछिद्राची व गर्भमूलाची जागा एकाच ठिकाणीं असते. बीजकवचांत एकाच गर्भ किंवा गर्भाबरोबर संचय केलेल्या अन्नाचा भागहि स्वतंत्ररीतीनें गर्भाभोंवतीं पसरलेला असतो. कांहीं बीजांत संचय केलेल्या अन्नाचे दोन स्वतंत्र लेप असतात आणि कांहींत एकच लेप असतो. लेप दोन असले म्हणजे बाहेरील लेपास अन्नमयबाह्यकोश व आंतील लेपास अन्नमय अन्त:कोश असें म्हणतात. अन्नमयबाह्यकोश गर्भाशयकोशाचा बीजामध्यें सांपडणारा अवशेष भाग असतो व अन्नमय अन्त:कोश प्रत्यक्ष गर्भाशयाचा अवशेष भाग असतो. अशा रीतीची सामान्य रचना बीजामध्यें आढळत असल्यामुळें बीजांचें वर्गीकरण पुढें दिल्याप्रमाणें केलें जातें:- बीज:- एकदल बीज, व्दिदलबीज व बहुदलबीज व ह्या प्रत्येक प्रकारांत कांहीं बीजें अन्नमयकोशयुक्त असतात. व कांहीं अन्नमयकोशरहित असतात. अन्नमययकोशयुक्त जें बीज असतें त्यांत गर्भ बहुतकरून बारीक, लहानसा असतो (एरंडी, कर्दळ, खारीक, कांदा इं) व अन्नमयकोश ज्या ज्या बीजांत नसतो त्यांतील गर्भ पोसून मोठा झालेला असतो. विशेषत: त्यांचीं दलें बरींच जाड असतात (उदा. वाटाणा, हरभरा, भुईमूग, अंबा, डबलबी). ह्या बीजांत स्वतंत्र अन्नमय कोश नसला तरी अन्नाचाच पुरवठा नसतो असें मात्र नाहीं. गर्भदलामध्यें तो अन्नसंग्रह सांठविला जातो. व त्यामुळेंच तीं गर्भदलें जाड झालेली असतात. बीजांतील हा अन्नसंग्रह बीज रूजूं लागलें म्हणजे त्यांतील गर्भाच्या वाढीस फार उपयोगी पडतो कारण रोपडें जमिनीवर दिसूं लागून त्यास हिरवी पानें फुटेपर्येत जमिनीतून दिसूं लागून त्यास हिरवीं पानें फुटेपर्येत जमिनींतून शोषण केलेल्या क्षारमिश्रित जलात गर्भाच्या वाढीस पाण्याच्या पुरवठयाखेरीज दुसरा कांहीं एक उपयोग होत नाही. गर्भाची इतकी वाढ होण्याकरितां बीजांतील संग्रह केलेल्या अन्नाचाच तेवढी उपयोग होतो मग तें अन्न गर्भदलांत सांठविलेले असो किंवा अन्नमयकोशांत गर्भाच्या बाहेर स्वतंत्र असें असो.

गर्भाचे सर्वच अवयव प्रत्येक बीजगर्भोत स्पष्ट असे असतात असें नाहीं. लहान बीजगर्भोत मूळ, पल्लव व दल हे सर्व भाग स्पष्ट असतातच असें नाहीं. उदाहरणार्थ एरंडीच्या गर्भोत गर्भपल्लवाचा भाग स्पष्ट नसतो. तसेंच खारीक, कर्दळ, कांदा व इतर कोणतेंहि एकदलबीज घेतलें तर त्यांत गर्भदलाचा भाग स्पष्टपणें दिसत नाहीं व नुसत्या डोळयास तर हे अवयव निरनिराळे असे दिसणें शक्य नसतें. बीजांत गर्भाची जागा निश्र्चित नसते. एकाच जातीच्या निरनिराळ्या बीजांत मात्र ती जागा निरनिराळी नसते. एरंडीप्रमाणें कांहीं बीजांत गर्भ बरोबर मध्यभागीं सांपडतो. खजूर, कर्दळ, मिरें, गहूं, मका, बाजरी इत्यादिकांत तो एका बाजूस असतो. एरंडीप्रमाणें किंवा तांबडा व दुध्याभोपळा इत्यादिकांच्या गर्भाप्रमाणें बीजगर्भ कांहीं बीजांत सरळ असतो तर कांहींत सर्पाच्या वेटोळ्याप्रमाणें पूर्णपणें वाकडा असतो (उदा. कांदा). तसेंच मटार, घेवडा इत्यादि बियांच्या गर्भाप्रमाणें तो कांहीं बीजांत अर्धवट वाकडा व अर्धवट सरळ अशा आकाराचा आढळतो. अन्नमयकोशांत एकाच प्रकारचें अन्न सांठविलेलें असतें असें नाहीं तर निरनिराळ्या जातींच्या बीजांत निरनिराळया प्रकारचें अन्न सांठविलेले आढळतें. घेवडा, वाटाण, मका, गहूं इत्यादिकांत ‘मंड’ व नायट्रोजनयुक्त मांसवर्धक पदार्थांचें प्रमाण जास्त असतें तर बदाम, एरंडी इत्यादिकांत तेल व नायट्रोजनयुक्त मांसवर्धक पदार्थ यांचें प्रमाण जास्त असतें; तसेंच खजूर, कॉफी इत्यादि बियांत “सूल्युलोज” नांवाच्या पदार्थाचा संग्रह केलेला आढळतो. याप्रमाणें बीजाची अंतर्बाह्य रचना विविध प्रकारची असते.

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .