प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

वनस्पतिशास्त्र भाग १८

वनस्पती आणि उपाधिकार्यविचार

प्रास्ताविक.- ज्या ज्या बाह्य गोष्टींचा झाडांवर प्रत्यक्षपणें किंवा अप्रत्यक्षपणें कांही बरावाईट परिणाम घडून त्याच्या जीवनव्यापारांत न्यूनाधिक्य होतें, अशा गोष्टी म्हणजेच उपाधी. वनस्पतीवर घडणाऱ्या उपाधिकार्यासंबंधनें विचार करतांना वनस्पतींचे जीवनव्यापार आणि उपाधींचीं कार्ये या दोहोंतील परस्परसंबंधाचा विचार करावयास पाहिजे. म्हणून झाडांना लागणारें अन्न त्यांनां कसें व कोठून मिळतें, तें अन्न त्यांच्या अंगीं कसें लागतें, झाडांची वाढ आणि उत्पत्ति होण्यास कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते व त्यांचें नियमन कोणत्या उपाधीमुळें व कसें होतें इत्यादि गोष्टी समजणें अवश्य आहे.

वनस्पती आणि त्यांची जीवनकार्ये. - वनस्पति हा एक सजीव पदार्थ आहे. त्याला बाह्य परिस्थितीप्रमाणें जमिनींतून पाणी व निरनिराळे क्षार आणि हवेंतून किंवा पाण्यांतून वायूरूप पदार्थ शोषूण आपले पोषण करून घेतां येतें व त्यामुळें तो सुस्थितींत राहून त्याची वाढ योग्य प्रकारें होते. मूळस्तंभ, पानें, फुलें वगैरे हे झाडाचे निरनिराळे अवयव होत. बी रूजण्यापूर्वी त्यांत सूक्ष्मरूपानें असणारें झाड निद्रावस्थेत असतें म्हणून तेव्हां त्याला अन्नाचा उपयोग होत नाहीं, परंतु बी रूजूं लागतांच त्यांत सांठविलेलें अन्न द्रवस्थितींत येऊन तें लागलींच आंतील झाडाला मिळूं लागतें. अशा तऱ्हेनें त्याला लागणारें अन्न स्वतंत्रपणें बाहेरून मिळण्याचें सामर्थ्य त्याच्या अंगी येण्यापूर्वी त्याच्या पोषणाची सोय होते. परंतु बी रूजत कोंब बाहेर पडल्याबरोबर त्यांचे मूळ जमिनीच्या आंत वाढत जातें व स्तंभ आणि पानें जमिनीच्या वर येतात आणि मग तें झाड हळू हळू आपला चरितार्थ स्वतंत्रपणें चालवूं शकतें. त्या कामीं त्याला मूळ, व स्तंभ आणि पान या त्याच्या निरनिराळ्या अवयवांचा उपयोग होतो. मुळाचें काम जमिनींतील पाणी व त्यांत विरलेले क्षारादि पदार्थ यथाशक्ति शोषून घेऊन ते वरील भागांनां इत्यादिकांनां केवळ आधार देण्याचेंच नसून मुख्यत्वेंकरून मूळांनी शोषिलेलें पाणी पानांकडे नेण्याचें व पानांनीं बनविलेली पोषकद्रव्यें झाडाच्या सर्व भागांनां पोंचविण्याचें असतें; पानांचे काम त्यांतील हरित्कणांच्या व्दारां प्रकाश व त्याच्या अंगभूत असणारी उष्णता ग्रहण करून त्याच्या साहाय्यानें पोषणकारक असें सत्त्वान्न तयार करण्याचें असतें. व या सत्वान्नाचा उपयोग झाडाला आपल्या निरनिराळ्या जीवनक्रिया करण्यास अवश्य अशी शक्ति निर्माण करण्याकडे होतो. पानांच्या त्वचेवर सूक्ष्म रंध्रे असतात, त्यांच्या योगानें पानांच्या आंतील भागाचा बाहेरील वातावरणाशी संबंध येऊन त्यांतील जरूर व शक्य तीं द्रव्यें शोषून नको असतील तीं टाकतां येतात. त्याचप्रमाणें त्वग्रंध्राच्या योगानें बाष्पोत्सर्जनास मदत होऊन झाडाला जमिनीतून जास्त पाणी घेतां येतें. व अशा रीतींनें त्याचें पोषण व वाढ होऊन त्याला आपल्या फुलांच्या किंवा इतर अवयवांच्या व्दारां संतत्योत्पादन करतां येऊन अखेर आपली संतति कायम राखतां येते. बीं रूजण्यापासून तों पुन्हां बीजीत्पत्ति होईपर्येत झाडांच्या निरनिराळ्या अवयवांकडून होणारीं हीं निरनिराळीं कार्ये म्हणजेच झाडांचीं जीवनकार्ये होत.

उपाधी, त्याचीं कार्ये आणि त्या बाबत होणारें झाडाचें प्रतिवर्तन. - झाडाच्या परिस्थितीचा अगर त्यांच्यावर ज्यांचा परिणाम घडतो, अशा एकंदर उपाधींचा विचार केल्यास त्यांमध्यें पाणी, विद्राव्य क्षार, हवेंतील ओलावा, प्रकाश, उष्णमान, वारा, जमीन, गुरूत्वाकर्षण, भूस्वरूप, हवेचा दाब, वगैरे जड उपाधी आणि वनस्पती व जीवजंतू, प्राणी वगैरे सजीव उपाधी इत्यादि गोष्टींचा अंतर्भाव होतो. निरनिराळ्या उपाधींच्या कार्यामुळें झाडांवर जो परिणाम घडतो, तो पोषणात्मक अथवा प्रक्षोभनात्मक असतों. सर्वच उपाधीं पोषणात्मक नसून त्या कामीं फक्त कांहींचाच उपयोग होतो. कांहीं उपाधीं पोषणात्मक असून प्रक्षोभनात्मकहि असतात. उदाहरणार्थ, हरित्कणांवर प्रकाशाचें जें कार्य घडतें तें पोषणात्मक असतें, परंतु पानें प्रकाशाच्या बाजूला वळतात, तीं प्रकाशाच्या प्रक्षोभनात्मक परिणामामुळें वळतात. पोषणात्मक उपाधीमध्यें पाणी, विद्राव्य क्षार, प्रकाश, उष्णमान आणि वातावरण वगैरे उपाधींचा समावेश होतो. परंतु वारा, गुरूत्वाकर्षण व भूस्वरूप वगैरे उपाधींचें तसें नसून झाडांवर त्यांचा थोडाबहुत प्रक्षोभक अथवा उत्तोजक परिणाम घडतो इतकेंच कायतें. तसेंच परागवहन करून, बऱ्याच वनस्पतींच्या फुलांमध्यें परागसंगम घडविण्याच्या कामी आणि बऱ्याच वनस्पतींच्या संततीचा अथवा बीजांचा प्रसार करण्याच्या कामीं वारा आणि पाणी यांसारख्या भौतिक उपाधींचा व निरनिराळ्या जीवात्मक उपाधींचा उपयोग होतो. परंतु ते बहुंतेक उपाधी पोषणाच्या कामीं अवश्य नसतात. कांहीं उपाधींमुळें झाडांवर होणारा परिणाम अथवा झाडांचें प्रक्षोभन लागलीच होतें व त्यांच्याकडून तदनरूनप प्रतिवर्तनहि घडूं लागतें, परंतु कांहीं उपाधींपासून होणाऱ्या झाडांचें प्रतिवर्तन व्हावयास फार वेळ लागतो. हवेंतील ओलावा फारच कमी होऊन हवा रूक्ष झाल्यास झाडांच्या पानांवाटें बाष्परूपानें उडून जाणाऱ्या पाण्याची वाढ लागलीच होऊं लागते, व झाडांनां पुरेसें पाणी मिळत नसल्यास झाडें कोमेजूं लागून त्यांचीं पानें लिवलिवीत होतात. परंतु तितक्यांत झाडांनां पुरेसें पाणी मिळूं लागल्यास तीं पानें पुन्हां टवटवीत होतात. अशा दोन्ही रीतीनीं झाडांचें प्रतिवर्तन उघडपणें प्रत्ययास येतें. परंतु प्रकाश कमी झाल्यानें झाडांकडून होणारें कार्य अथवा झाडांचें प्रतिवर्तन झालेलें प्रत्ययास यावयास बराच वेळ लागतो. कारण एखादें झाड काळोखांत ठेविल्याबरोबर त्यांतील हरित्पर्णराग एकदम कमी झालेला दिसत नाहीं. त्यासाठीं मध्यें बराच वेळ जावा लागतो. तसेंच कांहीं उपाधी प्रत्यक्ष कार्यकारी असतात. पंरतु उपाधींचा परिणाम इतर उपाधींच्या मार्फत होतो. जमिनींतील पाण्यामुळें झाडांच्या मुळावर होणारा परिणाम प्रत्यक्ष होतो. परंतु वाऱ्याचा किंवा जमिनीच्या पोताचा परिणाम प्रत्यक्ष हवेंतील किंवा जमिनींतील ओलाव्यावर होऊन मग त्यांच्या व्दारां त्यांचें कार्य प्रत्ययास येतें. वारा ही उपाधि सामान्यत: अप्रत्यक्ष कार्यकारी असली तरी त्याचा परिणाम कधीं कधीं प्रत्यक्षहि घडतो. उदाहरणार्थ जेथें नेहमीं सोसाटयाचा वारा वहात असतो तेथील झाडांचा आकार केवळ तसल्या वाऱ्यामुळें कायमचा बदलून त्यांवर एक निराळाच ठसा उमटतो. व त्यांच्या नुसत्या खुरटेपणावरून किंवा एकांगीपणावरून तीं झाडें वाऱ्यानें खुरटलेलीं किंवा वाकलेलीं आहेत अशी पाहाणाराची खात्री होते.

प्रतिवर्तनांचे प्रकार:- उपाधींच्या सामान्य कार्यामुळें झाडांचें ठरीव प्रक्षोभन होऊन त्यांचीं सामान्य जीवनकार्ये चाललेलीं असतात. हीं गोष्ट प्रत्यही झाडांचें पोषण आणि वर्धन चाललेलें असतें, त्यावरून चांगली दिसते. झाडाच्या असल्या प्रतिर्वनास कार्यात्मक प्रतिवर्तन किंवा कार्ययोजना असें म्हणतात. कांहीं उदाहरणांत उपाधींच्या प्र्रक्षोभनामुळें झाडांच्या कार्ययोजनेंत थोडासा फरक पडण्यापलीकडे त्याचा कांहीं परिणाम घडत नाहीं. परंतु बऱ्याच वेळां उपाधिकार्यामुळें झाडांच्या अंतर्रचनेंतहि फरक पडूं लागतो. हा फरक प्रक्षोभनाच्या तीव्रतेवर अवलंबून असतो. कारण झाडांचे प्रक्षोभन अगदींच असामान्यपणें होत रहाण्यास त्याची जीवनकार्ये नेहमींप्रमाणें न होतां त्यांत बरीच चलबिचल होते व अगदींच पराकाष्ठाप्रसंगीं झाडांच्या जीवितासहि धोका येतो. परंतु झाडाच्या जीवितास धोका न येईल इतक्याच बेतानें त्याच्या जीवनकार्यात चलबिचल होत असल्यास झाड मरत नाहीं, तरी त्यामुळें त्याच्या अंतर्रचनेंत बहुधां फरक पडल्याशिवाय राहात नाहीं. असल्या प्रतिवर्तनास घटनात्मक प्रतिवर्तन अथवा अनुघटना म्हणतात. अनुघटना कांहीं अंशीं विकारात्मक असतात. उदाहरणार्थ, सतत ओलसर जागेंत वाढणारें एखादें झाड अगदी रूक्ष जागीं नेऊन लाविल्यास तेथें त्याला पुरेसें पाणी न मिळाल्यामुळें त्याची वाढ नेहमीप्रमाणें न होतां तें खुरटून जातें, त्याचीं पानें लहान होतात, किंवा गळून पडतात, व त्याच्यामध्यें जास्त काष्ठमय भागाची उत्पत्ति होऊन त्याची अंतर्रचना बदलते. हा फरक थोडा बहुत अस्वाभाविक अथवा विकारात्मकच म्हटला पाहिजे. अगदींच अपरिचित अगर भिन्न निवासांत जम जमवितांना झाडाच्या घटनेंत असले फरक होणें अपरिहार्य असतें. कारण त्याची अंतर्रचना अगदीं निराळ्या परिस्थितीला अनुरूप अशी असल्यामुळें बऱ्याच वेळा अगदीं भिन्न परिस्थितींत त्यामध्यें तदनुरूप फरक अथवा विकार झाल्याखेरीज तें झाड तेथें टिकून राहणें शक्यच नसतें.

परिस्थिति आणि उभ्दिज्जस्वरूप यांतील संबंध.- संपूर्ण उभ्दिज्ज सृष्टीचे अवलोकन केल्यास असें दिसून येईल कीं, त्यामध्यें अनंत प्रकारच्या अनंत उभ्दिज्ज व्यक्ती व त्यांनीं बनलेले अनेक उभ्दिज्जसंघ किंवा उभ्दिज्जघटना असतात. त्यांची भूपृष्ठावरील वांटणी कांहीं एक ठराविक पध्दतीनें झालेली असते. याचें कारण परिस्थिति अथवा भूस्वरूप, पर्जन्यमान, हवा, पाणी, उष्णता, प्रकाश वगैरे गोष्टी निरनिराळ्या असतात, निरनिराळया झाडांचे स्वभावधर्म, आवडी-नावडी आणि आवश्यकता निरनिराळया असतात, त्यामुळें ज्या झाडांनां जी परिस्थिति सोईची त्या प्रकारची झाडें तसल्याच परिस्थितींत उत्पन्न होतात किंवा राहूं शकतात. या गोष्टीचें प्रत्यंतर केवळ हिंदुस्थानांतील उग्दिज्जाचा अगदीं स्थूलमानानें विचार केल्यासहि आपणास दिसून येईल.

हवा, पाणी, पर्जन्यमान व भूस्वरूप या दृष्टीचे सामान्यत: हिंदुस्थानाचे तीन निराळे भाग करतां येतात. या तीन भागांतील उग्दिज्जाच्या सामान्य स्वरूपांत (स्थूल मानानें पाहिल्यास) बराच फरक असतो. यांतील पहिला ऊष्णार्द्रभाग. या भागांत उन्हाळा कडक असून पाऊस जास्त पडतो, हवा दमट असून थंडी बेताची असते. हा भाग हिंदुस्थानच्या इतर बहुतेक भागाप्रमाणेंच साधारण उष्ण कटिबंधांत मोडतो. परंतु येथें पावसाचें मान जास्त असतें. यांतील कांहीं ठिकाणीं समुद्रकिनारा अगदीं जवळ असतो. कांहीं ठिकाणे समुद्रसपाटीपासून बऱ्याच उंचीवर असतात. किंवा कांहीं ठिकाणीं ग्रीष्मवृष्टि हेमंतवृष्टि असे दोन्ही पाऊस पडत असल्यामुळे एकंदर पावसाळा बहुधां जास्त होतो. या भागांत साधारणपणें पूर्वबंगाल, बहार, आसाम, ब्रम्हदेशाचा खालचा भाग, मलबार किनाऱ्यालगतची पट्टी अथवा बहुतेक पश्र्चिमघाट व सिलोनच्या दक्षिणेकडील भाग यांचा समावेश होतो; यांत सामान्यत: मोठमोठे गगनचुंबित वृक्ष आणि प्रचंड वेली यांची समृध्दि असून त्यांनीं बनलेलीं अरण्यें, विस्तीर्ण, दाट आणि बहुतांशीं चिरपर्णयुक्त असतात. येथें उष्णमान व पाऊस यांची रेलचेल असून हवा दमट असल्यामुळें झाडांची वाढ चांगल्या प्रकारें होते. या अरण्यांतील वृक्षस्तंभावरून निरनिराळ्या प्रकारच्या शैवालजातींचीं आणि आम्री वगैरेंसारख्या वातावलंबी वनस्पतींची गर्दी असून जागजागीं अमरकंदासारख्या भुईआम्री आणि कोष्ठभुईचाफा वगैरेंसारख्या प्रतिवार्षिक झाडांची आणि जंगली सुरणांचीहि बरीच रेलचेल असते. त्याचप्रमाणें तेथील झाडांच्या गर्द छायेंत राजहंसदि पर्णित वनस्पती आणि निरनिराळीं शेवाळें, आलिंबें व भूछत्रेंहि आढळतात. जास्त पावसामुळें या भागांत ठिकठिकाणीं दलदलीच्या जागा व दमटसर कुंपणें हीं जास्त असून त्यांतील झाडांचें स्वरूप निराळेंच असतें. त्यांत निरनिराळ्या पाणझाडांचा, शेवाळांचा, कमळांचा व लव्हाळे वगैरेंचा समावेश होतो. पाण्यांतील किंवा दलदलींतील झाडें बहुधां लहान आणि मृदु किंवा अल्पकाष्ठमय असतात. त्यांतील कांहीं झाडांनां पूर्णपणें किंवा अर्धवट जलाच्छादित स्थितींत राहतां येतें. शिवाय मधूनमधून उघडया खडकांवर किंवा अशाच रूक्ष जागीं होणारीं झाडें निराळ्याच प्रकारचीं असतात. दुसरा रूक्षोष्ण भाग. या भागांतहि उन्हाळा फारच असतो, आणि पाऊस अगदींच थोडा व थंडी बरीच असते. हा भाग समुद्रकिनाऱ्यापासून बराच आंत असतो. यांत डोंगर वगैरे नसून, जमीन बहुतेक सपाट असते यांत सिंधप्रांत, पंजाबचा कांहीं भाग, राजपुताना व मध्यहिंदुस्थानांतील सपाट मुलूख आणि कच्छ, काठेवाड आणि गुजराथचा उत्तर भाग हे प्रदेश येतात. यांत सामान्यत: मोठाले वृक्ष व वेली उगवतच नाहींत म्हटलें तरी चालेल. यांतील बरींच झाडेंझुडुपें, बाभळी, बोरी, खडशेरणी यांसारखीं बहुधां कठिण, काष्ठमय, खुरटीं किंवा कांटेरी झाडें असून, त्यांचीं पानें विभागलेली असून फार लहान, मांसल किंवा केंसाळ अशीं असतात. म्हणूनच सिंध वगैरे प्रांतांतील बहुतेक झाडें, झुडपें बहुधां हिरवीगार न दिसतां भुरकट रंगाचीं दिसतात. या भागांतील बऱ्याच झाडांचीं पानें लवकर गळून पडतात, कारण येथें उन्हाळा फारच कडक असून जमिनींत व हवेंत ओलावा फारच थोडा असतो. त्यामुळें झाडांची आणि पानांची वाढ चांगली होत नाहीं. किंवा पानें गळून पडतात. या भागांत बऱ्याच ठिकाणीं मोठाल्या राठ गवतांचें व उतरण कावळी, रूई वगैरेंसारख्या चिकाळ झाडांचें बरेंच प्राबल्य असतें. तिसरा शीतरूक्ष भाग. यांत हिमालयांतील अत्युच्च व हिममय डोंगराळ प्रदेशाचा समावेश होतो. येथें उन्हाळा व पाऊस अगदीच कमी असतो व थंडीचा कडाका भयंगर असून हवा फार कोरडी असते. कारण येथील वातावरण बरेंच विरळ असून वारा फार सोसाटयाचा वाहातो. व थंडीमुळें पाणीहि गोठून जातें आणि झाडांनां पुरेसा ओलावा मिळत नाहीं. यांत होणारीं बरींच झाडें खुरटीं असून ती बहुधां सोसाटयाच्या वाऱ्यामुळें जमिनीवर फारसें डोकें काढींत नाहींत. येथील देवदारासारख्या बऱ्याच झाडांचीं पानें अगदीं सूक्ष्म व सूचिकारूप असतात. कारण येथील हिममय आणि रूक्ष परिस्थितींत झाडांची किंवा पानांच्या पृष्ठभागाची वाढ चांगली होणें शक्य नसतें. तेथें थंडीचा भयंकर कडाका सुरू झाला म्हणजे बऱ्याच झाडांचीं पानें वगैरे गळून पडतात. आणि पुन्हां हवेंत जरूर ती उष्णता येईपर्येत झाडांची वाढ होणें अजिबात थांबतें. बाकीच्या भागांपैकीं कारोमांडल किनाऱ्यालगतची पट्टी अथवा पूर्वघाट, दक्षिण, मध्य व उत्तार हिंदुस्थानांतील साधारण डोंगराळ व सपाट देशांतील परिस्थिति ही कांहीं अंशीं पहिल्या आणि दुसऱ्या प्रकाराच्या टापूंच्या मध्यंतरीं येते. त्याचप्रमाणें इतर कांहीं भाग एकीकडे एका टापूंत तर दुसरीकंडे दुसऱ्या एखाध्या टापूंत मिसळून जातात. त्यांतील झाडें बऱ्याच मिश्र स्वरूपाचीं असतात. शिवाय निरनिराळया टापूंत कोठें कोठें मोठमोठया नध्या किंवा सरोवर असल्यास त्यामानानें तेथील झाडांच्या स्वरूपांत फरक पडतो. समुद्रकिनाऱ्यालगतच्या किंवा इतर ठिकाणच्या खाऱ्या जमिनींत किंवा खाऱ्या दलदलींत होणारीं झाडें साधारण रूक्ष जमिनींत होणाऱ्या झाडांसारखींच असतात. कारण येथील जमिनीत अगर पाण्यांत असणाऱ्या क्षारामुळें झाडांनां पाणी मिळावें तसें मिळत नाहीं. म्हणून तीं बरींच पसरट किंवा खुरटीं होतात. त्यांचीं पानें लहानसर, केंसाळ किंवा मांसल असतात. खारटणांतील चिपी, मारंडी, तिवर वगैरे झाडें बहुधां लहानसर असून त्यांचीं पानें जाड व दडस असतात. अशा रीतीनें कोणत्या परिस्थितींत साधारण कोणत्या प्रकारचीं झाडें व्हावयाचीं हें ठरलेलें असतें. जो न्याय एका देशांतील उग्दिज्जोत्पत्तीस लागू पडतो तोच न्याय संपूर्ण भूपृष्ठावरील उग्दिज्जोत्पत्तीस तसाच लागू पडला पाहिजे हें सांगावयास नको. म्हणून परिस्थितीप्रमाणें झाडांमध्यें किंवा निरनिराळ्या उग्दिज्जसंघामध्यें किंवा उग्दिज्ज घटनांमध्ये कमी जास्त फरक होऊन त्यांचें बाह्य स्वरूप किंवा अंतर्रचना यांत बदल होतो हें उघड आहे. अर्थातच ज्या झाडांवर आपलें ठराविक निवासस्थान सोडून अगदीं भिन्न निवासांत अर्थात परिस्थितींत जाऊन राहण्याचा प्रसंग येतो किंवा ज्यांच्या निवासांत कांहीं कारणामुळें विलक्षण फरक पडतो, त्यांच्यावर त्या बदललेल्या परिस्थितींत जाऊन राहण्याचा प्रसंग येतो किंवा ज्यांच्या निवासांत कांहीं कारणामुळें विलक्षण फरक पडतो, त्यांच्यावर त्या बदललेल्या परिस्थितीचा थोडाबहुत ठसा उमटतो. आतां ही गोष्ट नेहमींच घडते असें नाहीं, परंतु बऱ्याच उदाहरणांत असें होतें यांत संशय नाहीं, ज्या थोडया उदाहरणांत भिन्न परिस्थितीमुळें फारसा किंवा मुळींच फरक पडत नाहीं, त्यामध्यें झाडांवर घडलेल्या दीर्घ आनुवंशिक संस्कारांमुळें त्या झाडांमध्यें एक प्रकारचा स्थाइकपणा किंवा स्वभावस्थैर्य आलेलें असतें. परंतु ज्यांच्यामध्यें तितका स्थाइकपणा आलेला नसतो म्हणजे जीं थोडीफार अस्थिर असतात, अशांमध्यें परिस्थितींतील फेरफारांमुळें भिन्न भिन्न घटना विशेष उत्पन्न झाल्याखेरीज रहात नाहींत.

झाडांचीं जीवनकार्ये, त्यांत ज्यामुळें थोडाफार फरक पडतो अशा उपाधी व त्यामुळें झाडांच्या स्वरूपावर होणारा स्थूल परिणाम यांसंबंधानें सामान्य विवेचन झालें. आतां झाडांच्या अनेक उपाधींपैकीं पाणी, प्रकाश व उष्णमान या उपाधी फारच महत्तवाच्या असल्यामुळें त्यांच्याविषयीं थोडासा जास्त विचार करावयास पाहिजे.

पाणी. - निवासांतील पाण्याच्या बाबतींत झाडाकडून होणारें प्रतिवर्तन इतक्या प्रकारें होतें व त्याचें महत्तव इतकें असतें कीं, असतें कीं, एकंदर उपाधीमध्यें पाण्याला अग्रस्थान देणें भाग आहे. जमीन, वारा वगैरे अप्रत्यक्ष उपाधीनां आपलें कार्य पाण्याच मार्फतच करतां येतें. पाणी, प्रकाश व उष्णमान या तिन्ही गोष्टी सामान्य झाडाला सारख्या व अवश्य असतात. व हरिव्दर्णी झाडाला, त्यांतील एखादी मिळाली नाहीं तर आपल्या सामान्य जीवनक्रियाहि करतां येत नाहींत. परंतु पाणी हे इतरांपेक्षां जास्त महत्तवाचें आहे. कारण झाडाच्या पुष्कळश: महत्तवाच्या जीवनक्रिया चालविण्याचें पाणी हेंच एक प्रत्यक्ष साधन असते. प्रथमत: झाडाला त्याचा अन्नासारखा उपयोग होतो. शिवाय जमिनींतून विद्राव्य क्षार व हवेंतून कर्बव्दिप्राणिद आणि प्राणवायु हे पाण्याच्या मार्फतच घेतां येतात. त्याचप्रमाणें पानांनीं बनविलेले अन्नमय पदार्थहि पाण्याच्या मार्फतच झाडाच्या सर्व भागांनां पुरविले जातात. पेशिकोशांचे प्रसरण होण्याचें मुख्य कारण पाणीच होय. त्यांच्या प्रसरणामुळें झाडांची वाढ होऊं शकते. पाण्यामुळें वृक्षस्तेभांनां आणि मृदुवनस्पतीनां ताठपणा येतो. शैवाल आणि राजहंसासारख्या पर्णक वनस्पती यांच्या संतत्योत्पादनास व जलस्थ वनस्पतींच्या अंगाशांचा किंवा बीजांचा प्रसार करण्यास पाणी फार साधनीभूत होतें. हवेंत थोडाबहुत ओलावा असतो त्यामुळें पानांवाटें बाष्परूपानें निघून जाणाऱ्या पाण्याचा कमजास्त अडथळा होतों सारांश झाडाच्या स्वरूपावर किंवा घटनेवर पाण्याचा इतर उपाधींपेक्षा पुष्कळच जास्त परिणाम घडतो.

पाण्याच्या बाबतींत निवासानिवासांत अनेक कारणांमुळे फरक पडतो. तो बहुतांशीं जमीन, पाऊस, भूस्वरूप व वातार्द्रता यांच्यामुळें पडतो. उ. खडकाळ किंवा वालुकामय जमिनींत, ओसाड वाळवंटांत व उंच माळावरील जमिनींत जलांशाचें मान कमी असतें. तळीं किंवा जलप्रवाह यांची गोष्ट सोडून दिली, तरी पाणथळ जागीं नदीखोऱ्यांतील जमिनींत व चिकणवट जमिनींत जलांश बहुधां जास्त असतो. रेताड किंवा जाड कणांच्या जमिनींतून पाणी सहज निचरून जातें. त्यामुळें तेथें जलांश कमी असतो. परंतु मातीचे कण बारीक असल्यास उलट स्थिति होते. जमिनीतील सर्वच जलांश झाडांनां मिळूं शकतो असेंहि नाहीं, कारण जमिनीच्या कणांच्या अंगी कांहीं जलांश चिकाटीनें धरून ठेवण्याचें सामर्थ्य असतें. त्यामुळें जमिनींतील एकंदर जलांश आणि प्राय जलांश यांत फरक असतो. जमिनींत क्षारांचें प्रमाण जास्त असल्यास जमिनींतींल पाणी झाडांनां मिळावें तसें मिळत नाहीं, म्हणूनच चुनखडीच्या जमिनींत आणि खाऱ्या जमिनींत पाणी जास्त असलें तरीहि झाडांनां त्याचा चांगला उपयोग होत नाही. पण जमिनीत अम्लें साधारण जास्त असल्यास तेथील जलांश झाडांनां सहज मिळूं शकतो. पर्णन्यूवृष्टि वगैरे झाल्यानें जमिनींती पाणी भरूण तेथील जलांशांत भर पडते, परंतु पाऊस सर्व ठिकाणीं सारखा पडतो असें नाहीं. तसेंच ज्या ठिकाणीं कडक ऊन पडतें व हवा रूक्ष होऊन जाते, अशा ठिकाणीं त्या गोष्टीचा परिणाम जमिनींतील जलांशावर होऊन त्याची वाफ होऊन ती उडून जाते. ही गोष्ट सूक्ष्मकणयुक्त जमिनींत केशाकर्षणामुळें जास्त होते. परंतु स्थूलकणयुक्त जमिनींत कमी होते. कारण तेथें जमिनीची वातधारक शक्ति जास्त असते. मोठया उताराच्या जमिनीवरून पाणी वाहून जात असल्यामुळें तें जमिनींत फारसें मुरत नाहीं. परंतु त्या उतारावर झाडाझुडपांचें आच्छादन असल्यास बरेंच पाणी अडविलें जातें. इतकेंच नव्हें तर त्या आच्छादनामुळें जमिनींतील पाण्याची वाफ होंणेंहि कमी होतें, त्यामुळें तेथें थोडासा जलांश कायम रहातो. परंतु तीं झाडें आपल्या उपयोगासाठीं जमिनींतील कांहीं पाणी घेत असतात हें विसरतां कामा नये. निर्जीव आच्छादनाची गोष्ट तशी नसते.

प्रकाश.- झाडांच्या अन्नोत्पादक चळवळीनां जरूर असणाऱ्या शक्तीचें उगमस्थान, या दृष्टीनें प्रकाशाचें महत्तव पाण्याच्या बरोबरीनें आहे असें म्हणावयास हरकत नाहीं. निरनिराळ्या पदार्थावर येणारा बुरा, भुछत्रें इत्यादिकांनां लागणारें अन्न, ते स्वत: न बनवितां दुसऱ्या सजीव व्यक्तिंनीं बनविलेल्या अन्नाचाच उपयोग करीत असल्यामुळें त्यांनांच कायती प्रकाशाची जरूर नसते. हरिव्दर्णी झाडांच्या प्रकाशाच्या बाबतींतील पहिलें प्रतिवर्तन म्हणजे चित्कणांनीं हरित्पर्णराग तयार करणें हेंच होय. प्रकाशाच्या मदतीनें हरित्कणाला कर्बव्दिप्राणिद आणि पाणी यांचें विघटन करून शर्करा किंवा कृत्रिम अन्नद्रव्यें बनवितां येतात. चित्कणांनीं ग्रहण केलेल्या बऱ्याचशा प्रकाशाचें रूपांतर होऊन त्यापासून त्या कणामध्यें उष्णता उत्पन्न होते. व त्यामुळें त्याचें बाष्पीभवन होतें. हरित्कणांची संख्या व मांडणी या गोष्टी प्रकाशाच्या प्रखरतेवर अवलंबून असतात. त्याचप्रमाणें त्वग्रंध्राच्या रक्षकपेशींचे अंगविक्षेप होऊन त्यामुळें प्रखर उजेडांत त्वग्रंध्रे मिटणें आणि अंधारांत तीं उघडणें या गोष्टींचें नियमनहि प्रकाशामुळेंच होतें. ज्या बाजूनें प्रकाश येत असेल त्याच बाजला पानें बहुधां वळतात. पानांची सामान्यत: दिसणारी मांडणी बहुतांशी प्रकाशाच्या कार्यामुळेंच कायम होते. व बऱ्याचशा जातींमध्यें पानांची दिवसाची आणि रात्रीची मांडणी निराळी असण्याचें कारणहि प्रकाशच असतो. पानांचे निरनिराळे आकार बहुतांशी प्रकाशामुळेंच उत्पन्न होतात.

प्रकाशग्रहण.- पानें जशीं लहानमोठीं असतील त्यामानानें झाडांनां कमी अगर जास्त प्रकाश मिळतो. प्रकाशग्रहण करणाऱ्या त्वक्पेशींतून तो पुढें जाऊन त्याचें कार्य प्रथम हरित्पेशींवर घडतें, पंरतु सर्वच प्रकाश हरित्पेशींनां मिळत नाहीं, कारण त्वचेमुळें एकंदरींत पानांत प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचें मान कमी होतें. त्वचेवर तुळतुळीत त्वक्कवच असल्यास कांही प्रकारचें परावर्तन होतें. त्वक्कवच जाड असल्यास किंवा त्वचेवर केंसांचें दाट आच्छादनं असल्यास त्यामुळें बराच प्रकाश अडविला जातो. परंतु सामान्यत: पुष्कळ प्रकाश त्वक्पेशींतून पलीकडे जाऊन हरित्पेशीनां मिळतो. संपूर्ण पानांतूनहि कांहीं प्रकाश पलीकडे जातो पण तो फार थोडा असतो. झाड किंवा मांसल पानें, त्यांवर पडणाऱ्या बहुतेक सर्व प्रकाशाचें ग्रहण करतात. परंतु पातळसर पानांतून बराच प्रकाश पलीकडे जातो. छायामय निवासांत प्रकाश फार मंद असतो व तो बहुतेक सर्व ग्रासिला जातो. साधारण झाडांनां उन्हामध्येंच हरित्पर्णराग योग्य प्रकारें येतो. परंतु कांहीं झाडांनां तो मंदप्रकाशांतहि बनवितां येतो. उदाहरणार्थ दाट अरण्यासारख्या छायामय निवासांत नेहमीं मोठाल्या वृक्षांच्या खालीं उगवणाऱ्या राजहंसासारख्या झाडांनां त्या कार्यासाठीं साधारण मंद प्रकाश पुरतो. परंतु प्रकाश अतिशयच कमी झाल्यास फार थोडया सपुष्प झाडांनां हरित्पर्णराग बनवितां येतो. ऊन्ह फारच कडक असल्यास क्कचित प्रसंगीं हरित्पर्णरागाचें थोडथोडें विघटन होण्याची भीति असते. परंतु सामान्यत: तो सारखा उत्पन्न होत असल्यामुळें ती गोष्ट लक्षांत येत नाहीं.

उष्णमान.- उष्णमानाचा संबंध बहुतेक सर्व जीवनकार्याशीं येतो. चिद्रसामध्यें हरएक ठिकाणीं जे रासायनिक फेरफार चाललेले असतात ते चालू रहावयास त्याची फारच आवश्यकता असते. इतकेंच नव्हे तर त्यांपैकीं कांहींची सुरवात उष्णमानानेंच होते. उष्णमानामुळे होणारीं कार्ये झाडाच्या कोणत्याहि एकाच विशिष्ट अवयवामध्यें न होतां त्याच्या संपूर्ण सजीव भागांत होत असतात. केवळ उष्णमानामुळें झाडाची वाढ होण्यापलीकडे झाडाचा आकार किंवा घटना बदलत नाहींत. परंतु कोणत्याहि झाडाला पूर्वीच्या अनंत पिढयांपासून उष्णमान किंवा थंडी यांच्या कांहीं ठराविक, कमाल आणि किमान मर्यादा व त्यांचें एक ऋतूंत होणारें एकंदर मान हीं अंगवळणी पडलेली असतात. त्यांत फेरबद्दल झाल्यास झाडाच्या जीवनक्रियेलाच विरोध होतो, ही गोष्ट पुष्कळ जातींच्या बियांच्या बाबतींत चांगली दिसते. कारण त्यांनां दीर्घ अशा हेमंतऋतूंत अन्नाशिवाय रहाण्याची संवय झालेली असते. त्यामुळें त्यांच्यावर निसर्गत: किंवा कृत्रिम उपायांनी थंडीचा तसा परिणाम झाल्याशिवाय त्या रूजत नाहींत. त्यामुळें झाडाचें बीं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीं जाऊन त्यायोगें होणारें निवासांतर यशस्वी व्हावयाचें किंवा नाहीं हवेंतील उष्णमानावर अवलंबून असते. सारांश, झाडांमध्यें तयार झालेल्या अन्नद्रव्याचें सात्मीकरण करण्याच्या कामीं ज्या ज्या घडामोडी होत असतात त्या होण्यासाठीं, झाडाची योग्य प्रकारें वाढ होण्यासाठीं, त्यांच्या हालचाली व फुलांची उघडझांप होण्यासाठीं उष्णमानाची बरीच जरूर असते. तसेंच शोषण, प्रकाशकृत संघटना वगैरे सर्व जीवनकार्यानां त्याची मदत होतेच, परंतु श्र्वासोच्छृवसन, वर्धन आणि संतत्योत्पादन या गोष्टींचें त्यावांचून मूळींच चालावयाचें नाहीं तीच गोष्ट बीं रूजण्यासंबंधानें असून, त्यामध्यें पचन, श्र्वासोच्छृवास आणि वर्धन याच गोष्टी एकत्र झालेल्या असतात. म्हणूनच एखादी जात आपल्या निवासस्थानांतून उष्णतेच्या दृष्टीनें फारच भिन्न अशा परनिवासांत गेल्यास तिचें बीं तेथें रूजून तिचा टिकाव तेथें लागावायाचा किंवा नाहीं ही गोष्ट मुख्यत्वेंकरून उष्णमानावर अवलंबून असते.

उपाधिकार्यामुळें झाडांत होणाऱ्या अनुघटना.- या बाबतींत मुख्यत्वेंकरून पाणी व प्रकाश या दोहोंबद्दल विचार करावयास पाहिजे. कारण प्रत्यक्ष उष्णमानामुळें झाडाच्या घटनेंत असा फरक मुळींच पडत नाहीं हें पूर्वी सांगितलेंच आहे. उष्णमानाच्या विलक्षण न्यूनाधिक्यामुळें झाडाच्या जीवनास धोका येत नाहीं किंवा झाडाचें निवासांतर यशस्वी होत नाहीं व झाडांच्या घटनेंतहि फरक पडत नाहीं. झाडांत होणारे घटनाविशेष कधीं कधीं पाणी व प्रकाश यां दोहोंच्या मिश्र कार्यामुळें घडत असतात.

एखाध्या निवासांत पाणी किंवा प्रकाश यांचा कधीं कधीं बराच अभाव असतो, तसाच त्यांचा अतिरेकहि असूं शकतो. किंवा त्या दोन्ही उपाधींचे मान साधारण सारखें असतें. अर्थातच उपाधींच्या किमान, कमाल अगर मध्यम स्वरूपाप्रमाणें तेथील झाडांच्या निरनिराळ्या अवयवांमध्यें निरनिराळे घटनाविशेष उत्पन्न होतात. ते कोणत्या उपधीमुळें झालेले असावे हें झाडाचें साधारण अवलोकन करून सांगतां येतें.

जमिनींत किंवा वातावरणांत जलांश अतिशयच कमी प्रमाणांत असल्यास तेथें होणाऱ्या झाडांनां पुरेसा जलांश प्रमाणांत असल्यास तेथें होणाऱ्या झाडांनां पुरेसा जलांश मिळविण्यासाठीं किंवा त्यांचा संचय करण्यासाठी किंवा पानांवाटें होणाऱ्या जलहानीची बचत करण्यासाठी निरनिराळे उपाय योजावे लागतात. उदाहरणार्थ जमिनींत जलांश कमी असल्यास तो मिळविण्यासाठीं मुळाची वाढ फार होते किंवा मुळें खोल जातात. हवा फार रूक्ष असल्यास जलहानि कमी करण्यासाठी पानांच्या त्वचेवर जाड त्वक्कवचाची अथवा केंसाच्या दाट आच्छादनाची किंवा त्वचेखाली पुष्कळशा उन्नत किंवा कठिण देशी पाटवाची उत्पत्ति होते. तसेंच झाडामध्यें जलसंचयकारक घटना उत्पन्न झाल्यानें झाडाला पाण्याची फारशी वाण पडत नाहीं. अशा प्रकारच्या योजना ज्या झाडामध्यें झालेल्या असतात अशीं झाडें निव्वळ खडकावर, उघडया माळावर, रखरखीत मैदानांत, रूक्ष वाळवंटांत, चुनखडीच्या किंवा खाऱ्या जमिनींत किंवा अत्युच्च आणि हिममय पर्वतशिखरावरहि होतात. त्यांनां शुष्कदेशीय झाडें असें म्हणतात. तळीं, जलप्रवाह, दलदलीच्या जागा, ओलसर कुरणें वगैरे ठिकाणीं जलांश पराकाष्ठेचा असून त्यांमध्यें होणाऱ्या झाडांनां जलातिरेकापासून अपाय न होईल अशी तजवीज करावी लागते. अशा झाडांनां आर्द्रदेशीय झाडें म्हणतात. जलातिरेकापासून त्यांचा बचाव दोन प्रकारांनीं होऊं शकतो: एक प्रकार म्हणजे जलशोषक अवयवाचा: म्हणजे मुळाचा संकोच होऊन त्यायोगे झाडांमध्यें जमिनींतून जलांश कमी प्रमाणांत घेणें. व दुसरा प्रकार म्हणजे जलहानिकारक अथवा बाष्पोत्सर्जक भागाची वाढ करणें. झाडाच्या एकंदर परिस्थितीप्रमाणें पहिल्या किंवा दुसऱ्या प्रकाराचा अवलंब केला जातो; कारण यांतील कांहीं झाडें पूर्ण जलाच्छादित असतात तर कांहीं अर्धवट जलाच्छादित असून कांहीं फक्त ओलसर जागीं वाढतात. पूर्ण जलाच्छादित झाडांवर प्रकाशाचें व वातरूक्षतेचें कार्य होण्यासारखें नसतें म्हणून त्यांच्या मुळांचा संकोच होतो. ओलसर जागीं वाढणाऱ्या झाडांवर प्रकाशाचें व वातारूक्षतेचें कार्य होण्यासारखें असल्यामुळें त्यांच्यामध्यें बाष्पोत्सर्जक भागाची वाढ होते.

ज्या जमिनींत जलांशांचा अभावहि नसतो किंवा त्याचा अतिरेकहि नसतो, अशा निवासांत होणाऱ्या झाडांनां पाणी बेताचें मिळत असल्यामुळें त्यांच्यामध्यें जलप्राप्ति किंवा जलहानि यांच्या बाबतींत ठळक असे कोणतेच घटनाविशेंष होत नाहींत. या झाडांनां मध्यमदेशीय झाडें असें म्हणतात. अरण्यांत, कुरणांत, साधारण सपाटीवर, किंवा लागवडीखालील जमिनींत होणारीं हीं झाडें मध्यमदेशीय झाडें होत. हीं झाडें कांहीं अंशीं सुक्या जमिनीवरील झाडांत व कांहीं ओलसर जमिनीवरील झाडांत मिसळून जाण्यासारखीं असतात. या झाडांत पाण्यामुळें कांहीं ठळक असे घटना विशेष होत नाहींत, परंतु प्रकाशामुळें मात्र होतात, म्हणून या झाडांचे प्रकाशाश्रित झाडें आणि छायाश्रित झाडें असे दोन वर्ग करतात. छाया बऱ्याच अंशीं शुष्कदेशीय झाडांनां पोषक व आर्द्रदेशीय झाडांनां अपायकारक असते. उलटपक्षीं कडक ऊन आर्द्रदेशीय झाडांनां पोषक असून शुष्कदेशीय झाडांनां तें नको असतें, म्हणूनच प्रकाश आणि छाया यांच्या स्थितीप्रमाणें मध्यमदेशीय झाडांमध्यें शुष्कदेशीय झाडांप्रमाणें किंवा आर्द्रदेशीय झाडांप्रमाणें थोडेबहुत घटनाविशेष उत्पन्न होतात.

शुष्कदेशीय वनस्पतीचें सामान्य स्वरूप.- अशा बहुतेक झाडांचीं मुळें जमिनींत खोलवर गेलेलीं असून त्यांनां वरील सुक्या थरांतून नाहीसें झालेलें पाणी शोषून त्याचा उपयोग करतां येतो. बरेच वेळां स्तंभाची वाढ कमी होत जाऊन कधीं कधीं तो लुप्तप्राय होतो. पानें फार लहान झालेलीं असलीं किंवा त्यांचा लोप झालेला असला म्हणजे स्तंभामध्यें अगदीं अवश्य असा पुष्कळच घटनाविशेष झालेला असतो.

शुष्कदेशीय झाडामध्यें अत्यंत घटनाविशेष उत्पन्न होणारा भाग म्हणजे पानें होत. त्यांच्या आकारमानांत बाह्यस्वरूपांत, पोटांत आणि रचनेंत पुष्कळच फेरफार झालेला दिसतात. पुष्कळदां यांतील बरेच प्रकार एकाच पानांत एकत्र पाहण्यास सांपडतात. बाकी बहुधां त्यांतला एकच प्रकार विशेष ठळक असतो. शुष्कपणाचा प्रत्यक्ष परिणाम, पानांवरच पानांच्या स्वरूपावरून केल्यास फार चांगलें होईल. म्हणून ज्या झाडांमध्यें पानें कायम असून त्यांचें यथायोग्य रूपांतर झालेलें असतें, त्यांनां पर्णविशिष्ट आणि ज्यांमध्यें पानें नसून स्तंभाचें रूपांतर झालेलें असतें त्यांनां स्तंभविशिष्ट शुष्कदेशीय झाडें म्हणल्यास चालेल. याशिवायहि शुष्कदेशीय झाडांचे निरनिराळे प्रकार सांगण्यासारखे आहेत. कांहीं उपाधीमुळें जलांश कमी होतो. अशा उपाधींवरून जे वर्ग केलेले आहेत म्हणून खाऱ्या आणि लोणाच्या जमिनीमध्यें होणाऱ्या जातीनां सैंधवीय झाडें म्हणतात. उत्तरध्रुवाजवळील बर्फमय निवासांत होणाऱ्या झाडांनां उत्तरध्रुवदेशीय झाडें आणि अरण्यांतील खतावलेल्या दलदलींत, होणाऱ्या बऱ्याच झाडांनां पंकाश्रित शुष्कदेशीय झाडें असें म्हणतात. अखेर सांगितलेलीं झाडें कदाचित शुष्कदेशीय नसतील परंतु प्रथम सांगितलेल्या दोन प्रकारांच्या झाडांमध्यें आणि साध्या शुष्कदेशीय झाडांमध्यें महत्त्वाचा फरक नसतो. तो प्रकार केवळ प्राप्य जलांशाच्या अभावामुळेंच उत्पन्न होत असून त्यांच्यामध्यें सामान्य शुष्कदेशीय झाडांत सांपडणारे बहुतेक विशेष दृष्टीस पडतात.

पर्ण विशिष्ट शुष्कदेशीय झाडांचे प्रकार.- यांत मुख्यत्वेंकरून पानामध्येंच अनुरूपता किंवा अनुघटना दिसत असून स्तंभाचें स्वरूप नेहमीप्रमाणेंच असतें, किंवा बहुतेक उदाहरणांत त्यामध्यें फारच थोडा फरक दिसतो. कांहीं उदाहरणांत पानांचें सूक्ष्मीभवन होऊन तीं शुष्कवत् झालेलीं असतात तरीहि ती वर्धनकालीं झाडावर कायम राहून प्रकाशवृत घटनाकार्यात महत्त्वाचे भाग घेत असतात. असल्या झाडांचें वर्गीकरण पानांच्या आकारावरून किंवा रचनेवरून केल्यास चालेल. परंतु एकाच पानांत कधीं कधीं दोन अथवा अधिक रचनाविशेष दिसत असल्यामुळें आकारांवरून केलेले वर्गीकरण जास्त समाधानकारक होईल व त्या दृष्टीने पुढीलप्रकार सांगण्यासारखे आहेत: (१) सामान्यप्रकार, (२) मांसल प्रकार, (३) खंडित किंवा शकलित प्रकार, (४) तृणतुल्यप्रकार, (५) सूचिकारूप प्रकार, (६) परिवेष्टकप्रकार, आणि (७) शुष्कप्रकार.

(१) सामान्यप्रकार:- यामध्यें पानांचें आकारमान आणि बाह्य आकृति हीं नेहमींप्रमाणेंच असून त्यांच्या मागच्यापुढच्या बाजूंमध्यें नेहमींप्रमाणेच फरक असतो. बाष्पोत्सर्जनानें होणाऱ्या जलहानीची जरूर ती बचत, पानांचें क्षेत्र संकुचित करून न होतां त्यांत घटनाविशेष उग्दवल्यामुळें होते. या घटनाविशेषांचे तीन स्वतंत्र भाग करतां येतात: (१) त्वक्कवचयुक्त, (२) घनकेशयुक्त, व (३) जलसंचयकारी. त्वक्कवचयुक्त पानाला त्वचेचा बाह्यकोश स्थूल करून आणि त्यामध्यें कवचद्रव्याची भर घालून त्याला जलविरोधक बनवून अल्पजलांशाची भरपाई करतां येते. त्यासाठीं तयार झालेलें कवच कधीं कधीं फारच स्थूल होऊन पेशीची अर्धी अधिक जागा व्यापून टाकतें. क्षितिजसमांतर पानामध्यें हें कवच बहुधां पानाच्या खालच्या बाजूंपेक्षा वरच्या बाजूला जास्त जाड असतें. परंतु उभ्या किंवा तिरप्या पानामध्यें तें बहुधां दोन्हीं बाजूंनां सारखेंच असते. बऱ्याच वेळां उन्नतपेशीपाटवाची भरपूर वाढ होऊन त्वक्कवचाला त्याच्या कामीं मदत होते. त्वक्कवचयुक्त पानें बहुधां चामडयासारखीं जाड व चिवट असून, शिवाय तीं बऱ्याच वेळां चिरकालिका असतात. सामान्य आकाराचीं आणि गुळगुळीत पानें असलेलीं बहुतेक सर्व शुष्कदेशीय झाडें या वर्गात येतात. परंतु त्यांपैकीं कांहीं झाडांमध्यें जलसंचयकारक पेशीहि असतात.

जलसंचयकारक पानें:- या पानांची खूण म्हटली म्हणजे यांच्यामधील हरित्पेशीसंघांनां जलसंचयकारक पेशीची किंवा पाटवाची वाढ झालेली असते हीच होय. त्यांच्यामध्यें बऱ्याच वेळां त्वक्कवचाची चांगली वाढ झालेली असून उन्नतपेशीपाटवाचे बरेच थर असतात. यासाठीं हीं पानें म्हणजे त्वक्कवचयुक्त पानांचाच एक प्रकार आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. जलसंचयकारक पेशींमध्यें नेंहमीं पाण्याचा सांठा भरून ठेवलेला असून पराकाष्ठेच्या जलाभावप्रंसगीं त्यांतील पाणी हळू हळू इतर पेशीनां मिळूं शकतें. त्या पेशींचें आकारमान आणि बाह्य स्वरूपहि उन्नत अथवा विरळ पेशींहून निराळें असतें. परंतु त्यांचा उगम त्या दोहोंपासून झालेला असतो ही गोष्ट, कांहीं जातींत जलपेशीमध्यें हरित्कण फार थोडे असले तरी अजून शिल्लक असतात, यावरून उघड होते. बहुधां जलपेशींचे पट्टे किंवा थर झालेले असून ते पर्णपृष्ठच्छेदक किंवा पर्णपृष्ठसमांतर असतात. उदाहणार्थ, बावचींच्या व सूर्यफुलांच्या जाती.

घनकोशयुक्त पानें:- या पानांच्या एका किंवा दोन्ही बाजूंवर केंसांचें दाट आच्छादन असते. उदाहरणार्थ समुद्रशोक, कोत्रक, मुद्रांच्या जाती वगैरें, वसनवेल, कपुरी, मधुरी, विष्णुभात, गोधडी, सराटा. बाबचीच्या एका जातीला कच्छमध्यें कपूरी म्हणतात. निरनिराळ्या जातींत या केंसांचे आकार फारच निरनिराळे असतात. ज्या त्वचामय भागांवर केंसांचा जाड थर असतो त्यांवर कवचाची वाढ कधीं होत नाहीं, शिवाय असल्या त्वचेचें जलहानीपासून इतकें पूर्ण रक्षण होतें कीं, आंतील हरित्पेशीसंघ बऱ्याच वेळां सावलींत वाढणाऱ्या झाडांच्या पानांत जसें असतें तसें विरलरूप धारण करतो. केंसांच्या साहाय्यानें जलहानीपासून व्वचेचें रक्षण करणाऱ्या झाडांची संख्या बरीच मोठी असते. हे केंस पानाच वरच्या बाजूला आढळतात, परंतु बऱ्याच वेळां ते खालच्या बाजूलाहि सांपडतात.

इतर पर्णविशिष्ट शुष्कदेशीय झाडें:- शुष्कतेमुळें ज्या जातीच्या पानांचा नेहमीचा आकार नाहींसा झालेला असतो त्यांनां आकाराशिवाय इतर रक्षक साधनांचाहि उपयोग करण्याची जरूर भासते. म्हणून त्यांच्यामध्यें जाड त्वक्कवच, केंसांचें आच्छादन किंवा जलसंचयकारक पाटवहि असूं शकतात पुढें दिलेल्या सर्व प्रकारांचें वैशिष्टय म्हणजे त्यामध्यें पर्णक्षेत्राचा संकोच झालेला असावयाचा हें होय. हा परिणाम पानांमध्यें स्थूलता येऊन, पानांनां खंड पडून, किंवा पानें गुंडाळून वगैरे निरनिराळ्या रीतींनीं होऊं शकतां.

(१) मांसलप्रकार:- पुष्कळशा मांसल पानांचें आकारमान आणि बाह्य आकृति हीं नेहमींप्रमाणेंच असतात. तरी तीं साध्या पानापेक्षां नेहमीं जास्त जाड असतात. उदाहरणार्थ पानफुटी, मचूळ, परंतु बहुधां त्यांचा आकार संकुचित झालेला व थोडाबहुत मुसलतुल्य असतो. उदा. उशकलॉनी, मोरसत, घोळूच्या जाती वगैरे. जलहानीची जरूर ती बचत, पानांचें क्षेत्र संकुचित होऊन आणि सर्व पानभर एक सारखा पाण्याचा संचय होऊन केली जाते. बहुधां पानावर सिक्थमय आवरण बनतें व बऱ्याच वेळां त्याच्यावर जाड त्वक्कवच तयार होतें. पानाचा विशिष्ट मांसलपणा त्याच्या असामान्य जलसंचयकारी सामर्थ्यामुळें उत्पन्न होतो व हाच त्या झाडाचा मुख्य तरणोपाय होय. बाष्पीभवनामुळें उत्पन्न होणाऱ्या आकर्षणाला न जुमानतां संचित पाणी मोठया चिकाटीनें धरून ठेवलें जातें. हा धर्म कांहीं अंशी चिद्रनामुळेंच उत्पन्न होतो. पण तो मुख्यत्वेंकरून धन किंवा चिकट पेशीरसाचाच परिणाम होय. मांसल पानांचीं उदाहरणें म्हणजे कोरफड, पानफुटी घोळू वगैरे होत.

(२) खंडितप्रकार:- यामध्यें पानाच्या पात्याचे अरूंद रेषारूप किंवा सूत्ररूप असे फार विरळ खंड होऊन पर्णक्षोभाचा संकोच होतो. उदाहरणार्थ घोडेपुई, गणेशवेल, शेवंती, कडू वृंदावन इत्यादि यामुळें अरक्षित क्षेत्र बरेंच कमी होतें. पानांच्या या खंडाचेंहि केशरयुक्त आच्छादनामुळें किंवा जाड त्वक्कवचामुळें रक्षण होत असून त्यास बऱ्याच वेळां उन्नत पेशीपाटवांच्या बऱ्याच थरांची मदत होते.

(३) तृणतुल्यप्रकार:- शुष्कदेशीय गवतांमध्यें आणि लव्हाळयासारख्या जातींमध्यें पानें अरूंद आणि तंत्वाकार असून त्यांनां कधीं कधीं लांबट चुण्या पडलेल्या असतात. त्यांचा उपयोग त्वग्रंध्रांचें रक्षण करण्याच्या कामीं होतो. या चुण्या कधीं कधीं केसांनीं भरलेल्या असून त्वग्रंध्रांचें रक्षण करण्याच्या कामीं त्या केसांचीहि जास्त मदत होते. शिवाय त्यांचीं पानें बहुधां अगदीं बारीक सुरळीसारखीं गुंडाळून जाऊन आपला पृष्ठभाग आणखी संकुचित करतात. या पानांमध्ये कठिणपेशीपाटवांचा बराच मोठा भागहि असतोच. त्यामुळें ही जलहानि होणें दुरापास्त होतें.

(४) सूचिकाप्रकार:- हा प्रकार देवदार आणि त्या वर्गातील जातींच्या पानांचा अगदीं सामान्य प्रकार आहे. अतिशय कडक हिंवाळयामध्यें त्या झाडांवर पानें कायम रहात असल्यानें त्यांच्या पृष्ठभागाला अजीबात फांटा देणें भाग पडल्याचाच तो परिणाम होय. हिवाळयांतील सार्वत्रिक हिमप्रवृत्तीमुळें प्राप्य जलांश अत्यंत निकृष्टावस्थेला पोंचलेला असतांनाहि या झाडांचीं पानें बाप्पोत्सर्जन करीत रहात असून जलाभावापासून होणारा घातुक परिणाम फक्त अरक्षित पृष्ठभागाचा अत्यंत संकोच केल्यानेंच टळतो. इतर पानांच्या मानानें या सुचिकारूप पानांतून आधींच जलहानि कमी होते ती जड त्वक्कवचाची आणि बरेच वेळां त्वचेलागत खाली कठिण पेशीमय थरांची वाढ होऊन आणखी कमी होते.

(५) परिवेष्टकप्रकार:- परिवेष्टक पानें बहुधां लहान आणि रेषारूप असतात. त्यांचा विशिष्ट आकार, त्यांच्या कडा खालीं वळून गुंडाळल्यानें होतो. त्यामुळें त्या पानांत नेहमीं खालच्या बाजूला असणाऱ्या त्वग्रंध्रांचें रक्षण होण्यालायक अशी बंद केलेली पोकळी तयार होते. वरील त्वचेवर जाड कवच आणून खालील त्वचा बहुधां केसांनीं झांकलेली असते (उदा. कण्हेर, बिट्टी)

(६) शल्कप्रकार:- पानांचा संकोच होऊन त्यांच्या जागीं सूक्ष्म शल्के तयार होणें हा शुष्क स्थितींतील अगदीं पराकाष्ठेचा विषय होय. याच्या पुढची पायरी म्हणजे पानांचा लोप होऊन त्यांचीं कार्ये स्तंभानें करूं लागणें. शल्करूपे पानें आंखूड, रूंद आणि चिवट असून तीं स्तंभाला अगदीं चिकटलेलीं असतात.असलीं पानें असणें हा सुरू, लई, खडशेरणी, मचुळ इत्यादि झाडांचा स्वाभाविक धर्मच आहे.

(७) स्तंभविशिष्ट शुष्कदेशीय झाडें:- पानें मुळींच नसणें हाच या झाडांचा धर्म होय. कांहीं झाडांत पानें असतात पण तीं पुढें लवकरच गळून पडतात. बहुतकरून पानांचा पूर्ण संकोच होऊन त्यांच्या जागीं फक्त निष्किय शल्केंच रहातात किंवा पानांचा अजिबात लोप होतो. पानांचीं कार्ये स्तंभाकडे येऊन स्तंभ त्यांच्या पुष्कळशा घटनाविशेषांचा अवलंब करतो. बऱ्याच वेळां सर्व स्तंभ किंवा त्याचा एखादा भाग इतका बदललेला दिसतो कीं, साहजिकपणेंच तें पान असावें असें वाटतें. या झाडांचे पुढील प्रकार सांगण्यासारखे आहेत, परंतु त्यांतील सर्वच झाडें तूर्त शुष्कदेशीय नाहींत:- (१) वृंतविस्तारक प्रकार, (२) बहुशाखायुक्त प्रकार, (३) लयप्रकार, (४) पर्णकारक शाखाप्रकार, (५) निम्नशाखाप्रकार, (६) कंटक प्रकार, आणि (७) मांसलप्रकार.

(१) वृंतविस्तारक प्रकार:- यामध्यें पानांच्या देंठांचा विस्तार होऊन त्याचें स्वरूप पानासारखें पसरट होतें. मूळ पानाचें पातें अजीबात लुप्त झालेलें असून हें विस्तृत वृंतच त्याची जागा भरून काढतें. दुसऱ्या कांहीं उदाहरणांत वृंताऐवजी स्तंभच चपटा अथवा पक्षयुक्त झालेला असून तो संपूर्ण पानांची जागा भरून काढतो (उ. त्रिधारी निवडुंग). (२) बहुशाखायुक्त प्रकार- यामध्यें पानें लवकर गळून पडतात, किंवा त्यांचा संकोच होऊन त्याऐवजीं फक्त निष्क्रिय शल्केंच उत्पन्न होतात. त्यांच्यावर बहुधां जाड त्वक्कवच आणि त्यांच्याखालीं उन्नतपेशीपाटव असून त्वग्रंध्रें बहुधां लांबट चुण्यांमध्यें गढलेली असतात; उ. सोमवल्ली. कांडयाशेर हें साधारण असलेंच उदाहरण आहे. परंतु त्यांतील त्वंग्रंध्रें चुण्यामध्यें गढलेलीं नसतात. (३) लयप्रकार- लव्हाळयाच्या कांहीं जातींमध्यें स्तंभावर पानांचा बहुतेक किंवा पूर्ण अभाव असतो, व स्तंभ वेत्ररूप असून त्याला फांद्या फुटत नाहींत. त्यावर बहुधां जाड त्वक्कवच असून उन्नतपेशीपाटवाचेहि बरेच थर असतात. (४) पर्णकार्यक शाखाप्रकार- शतावरीच्या झाडांत पानांच्या ऐवजीं फक्त निष्क्रिय शल्केंच असून पानांचें कार्य सूक्ष्म सूचिकारूप फांध्यांनीं आपल्यावर घेतलेलं असतें. (५) निम्र शाखाप्रकार:- हा प्रकार मागच्या प्रकारांचाचा एक पर्याय आहे. यांत शल्कतुल्य पानांची जागा फांध्यांनीं घेतलेली असून त्या थोडयाबहुत चपटया व पर्णतुल्य दिसतात (उदा. त्रिधारी निवडुंग, फडया निवडुंग वगैरे) (६) कंटक प्रकार:- ज्यांचीं पानें लवकर गळून पडतात किंवा त्यांऐवजी फक्त सूक्ष्म निष्क्रिय शल्केंच उग्दवतात, अशा रूक्ष वाळवंटांतील कांटेरी झुडुपांमध्यें हा प्रकार सांपडतो. त्याच्या स्तंभावर फारच जाड त्वक्कवच असून त्यांचीं त्वंग्रंध्रें पानांमध्यें खोल गढलेलीं असतात. व त्यांच्यावर पडद्याचें झांकण असतें. (७) मांसल प्रकार:- काकडशिंगीं, त्रिधारी निवडुंग आणि फडया निवडुंगाच्या जाती वगैरे. यांमध्यें पानांना अत्यंत संकोच किंवा लोप होऊन आणि स्तंभाचाहि संकोच होऊन जलहानिं कमी होते. शिवाय चिकट पेशीरस असणाऱ्या जलसंचयकारक पाटवाच्या साहाय्यानेंहि तीं झाडें फार जलहानि न होऊं देण्याची तजवीज करतात. यांच्या त्वक्कवचाची बरीच वाढ झालेली असून त्वग्रंध्रें खोल गढलेलीं असतात.

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .