प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

वनस्पतिशास्त्र भाग २१

उन्नतपेशीपाटव.- या पाटवाची उत्पत्ति ही सूर्यप्रकाशाबाबत किंवा जलांशाबाबत होणाऱ्या प्रतिवर्तनाचें फल होय. पुष्कळ उदाहरणांमध्यें या दोन्ही गोष्टींचीं कार्ये एकदम होत असून त्यामुळें विलक्षण न्युनाधिक्य उत्पन्न होतें. वादिवातस्थ आणि जलतरणक झाडांमध्यें आणि बऱ्याचशा मध्यम भूस्थ झाडांमध्यें जलांशाचें मान पुरेसें असतें. अशा उदाहरणांत उन्नतपेशीपाटव प्रकाशकार्यामुळें उध्दवतो. उलटपक्षीं बहुतेक प्रकाशस्थ झाडांच्या पानांतील उन्नतपेशींच्या थरांची संख्या त्या झाडांनां जास्त शुष्क निवासांत ठेविल्यानें वाढवितां येते. म्हणून त्या पाटवाची उत्पत्ति करण्याच्या कामीं वरील दोहोंपैकीं कोणता घटक जास्त महत्तवाचा आहे हें निश्र्चयात्मक सांगतां येत नाहीं. परंतु हरित्कणांचें बाष्पीभवन व्हावयासाठीं बहुतेक सर्व प्रकाशशक्ति खर्ची पडावी लागते, म्हणजे उन्नतपेशीपाटव सर्वस्वीं नाहीं तरी मुख्यत्वेंकरून जलहानि होऊं नये म्हणून योजिलेला एक संरक्षक उपाय आहे हें लक्षांत येईल. जलहानि प्रकाशामुळें किंवा वातार्द्रतेच्या अभावामुळें होत असल्याकारणानें उन्नतपेशीपाटवाची उत्पत्ति परिस्थितीप्रमाणें पहिल्या किंवा दुसऱ्या कोणत्याहि कारणानें होऊं शकते. उन्हामुळें होणाऱ्या बाष्पीभवनापासून रक्षण व्हावयाचें तें हरित्कण उभ्या रांगांमध्यें मांडले जाऊन होंतें. या रीतीनें तें एकमेकांनां झांकून टाकतात. कमी वातार्द्रतेमुळें होणारें बाष्पाभवन, पानांतील दमट हवा बाहेर न जाईल अशा बेतानें उन्नतपेशी एकाला एक लागून राहून पुष्कळच कमी करतात. त्यांच्यामधील वातमार्गाचा बहुधां संकोच होऊन ते फारच सूक्ष्म व रेषारूप झालेले असतात. ज्यांमध्यें पुष्कळ उन्नतपेशीपाटव असतो असल्या पानांतून म्हणजे प्रकाशस्य पानांतून कधीं कधीं तेवढयाच आकाराच्या छायाश्रित पानांपेक्षां दुप्पट बाष्पोर्त्सजन होतें. परंतु या गोष्टीमुळें वरील विधानाला बाध येत नाहीं. कारण उन्हामध्ये हरित्कण जास्त कार्यकारी असतात, त्यामुळें प्रकाशश्रित पानांनां कर्बव्दिप्राणिदांचा जास्त अंश मिळावा लागतो आणि त्या मानानें त्यांच्यामध्यें त्वग्रंध्रांची संख्याहि वाढून ती बहुधां दुप्पट होते. म्हणून त्वग्रंध्रांमधून होणारी जलहानि वाढवयाची ही गोष्ट ओघानेंच येते. उन्नतपेशीपाटवांतील वातमार्गाच्या सूक्ष्मपणामुळें हरित्कणांकडे कर्बव्दिप्राणिद इतका त्वरित जाऊं शकणार नाहीं. परंतु त्या वायूचा जेथें जेथें अत्यंत खर्च व त्यामुळे जरूर असते अशा ठिकाणीं तेथील निकडीमुळें तो भराभर जाऊं लागल्यामुळें त्याची भरपाई होत असावीसें दिसतें.

त्वक्पेशींतील फेरफार.- या प्रकाशांत वाढणाऱ्या झाडांच्या त्वक्पेशीमध्यें हरित्कणांची उत्पत्त होते. अरण्यांतील पर्णक झाडांच्या व जलाच्छादित झाडांच्या त्वक्पेशींमध्यें हरित्कण नेमानें सांपडतात. ज्यामध्यें त्वक्पेशींचा बाहेरील कोश कर्बव्दिप्राणिदाचा प्रवेश होण्याजोगा पातळ असतो अशा प्रकाशस्य जातींच्या छायांतर्गत प्रकारामध्येंहि त्वक्पेशींत हरित्कण सांपडतात. छायाश्रित झाडांमध्यें केंसांचा अभाव किंवा अल्पोत्पत्ति होणें ही गोष्ट त्यांनां फायदेशीरच असते, कारण त्यामुळें आधींच मंद असलेल्या प्रकाशामध्यें आणखी जास्त क्षीणत्व यावयाचें तें येत नाहीं (छायाश्रित झाडांतील वक्र अशा बहिस्त्वक्पेशींचे आणि सूक्ष्म त्वग्जन्यग्रंथींचें प्रकाशनियमन करण्याच्या कामीं मोठेसें महत्त्व नसतेसें दिसतें. त्या घटना कशामुळें उत्पन्न होतात व त्यापासून मुख्यत्वेंकरून कोणता उपयोग होतो या गोष्टी अध्याप अनिश्र्चित आहेत). बऱ्याचशा छायाश्रित झाडांमधील त्वक्पेशींच्या स्थूल आकाराचा प्रकाशाशीं संबंध नसून तो अन्नप्रवहन आणि जलहानि हीं वाढविण्यासाठीं असतो असें दिसतें छायायुक्त जलप्रवाहाच्या कडेला होणाऱ्या कांहीं एकंदलवनस्पतीतील असल्या पेशींचा पराकाष्ठेचा स्थूल आकार बहुधां जलहानि वाढविण्यासाठींच योजिलेला असावा. सारख्या लांबीरूंदीच्या त्वक्क्षेत्रांवर छायाश्रित पानांपेक्षां प्रकाशाश्रित पानांमध्यें त्वग्रंधें जास्त विपुल असतात, हें संपूर्ण प्रकाशाश्रित आणि छायाश्रित झाडांमध्यें सामान्यत: दिसतेंच परंतु तें एकाच जातींतील भिन्न निवासवासी अथवा निरनिराळ्या नैवासिक प्रकारांमध्यें फार चांगलें दिसतें. प्रकाशाश्रित पानांतून छायाश्रित पानांपेक्षां जास्त जलहानि होत असून त्यांच्यामध्यें उत्तरोत्तर पानांपेक्षां त्वग्रंध्रांची संख्या जास्त असते.

पानांचा आकार.- पानांचा आकार मुख्यत्वेंकरून हरित्कणांवर होणाऱ्या प्रकाशकार्यावर आणि त्यामुळें ते हरित्कण ज्या पेशींत असतात त्यांच्या आकारांत फरक पडण्यावर अवलंबून असतो. विरळपेशी ज्या दिशेनें प्रसरण पावतात त्या दिशेनें म्हणजे प्रकाशकिरणांशीं काटकोन करून त्या पेशी पर्णपृष्ठाचें प्रसरण करूं लागतात. उलटपक्षीं उन्नतपेशीमुळें पानांचें प्रसरण त्यावर पडणाऱ्या प्रकाशकिरणांशी समांतर दिशेनें होतें. म्हणून ज्यांमध्यें अतिशय विरळपेशीपाटव असतो अशीं पानें जास्त रूंद असून ज्यांमध्यें उन्नतपेशीपाटवाचें प्राबल्य असतें असलीं पानें जास्त जाड असतात. झाडें होतां होईल तों साहित्य आणि शक्ति यांची काटकसर करीत असल्यामुळें रूंदावलेल्या पानांमध्यें पातळ होण्याची प्रवृत्ति असून जाड झालेल्या पानांमध्यें अरूंद होण्याची वृत्ति असते. या न्यायानें छायाश्रित पानें तसल्याच प्रकाशाश्रित पानांपेक्षां जास्त रूंद, पातळ व बहुधां जास्त मोठीं असतात. उलटपक्षीं प्रकाशाश्रित पानें छायाश्रित पानांपेक्षां जास्त जाड, चिंचोळीं आणि लहान असतात. एकाच जातीच्या प्रकाशाश्रित आणि छायाश्रित झाडांनां जो न्याय लागू असतो तोच सर्व प्रकाशाश्रित आणि छायाश्रित झाडांनां सामान्येंकरून लांगू पडतो.

पानांची बाह्यरूपरेषा, आकृति आणि जाडी यांतील फेरफार.- प्रकाशाश्रित पानांच्यापेक्षां छायाश्रित पानांची बाह्य रूपरेषा बहुधां जास्त अखंडिततुल्य असते ही गोष्ट पालिकायुक्त किंवा विभक्त पानें असलेल्या एखाध्या जातींतील प्रकाशजन्य आणि छायाजन्य प्रकारांची तुलना केल्यास सिध्द करतां येईल. तरी पण त्यांतहि कांहीं थोडे अपवाद असतातच.

स्तंभाचा आकार:- एखाध्या जातीच्या प्रकाशाश्रित प्रकारापेक्षां छायाश्रित प्रकार नेहमीं जास्त उंच आणि जास्त शाखामय असतात. साधारणपणें प्रकाशाश्रित झाडांच्या मानानें सर्वच छायाश्रित झाडें तशीं असतात. मंद प्रकाशामुळें स्तंभाची उंची वाढते व त्यांच्या फांध्याहि लांब होऊन जास्त पसरतात, त्यामुळें त्या झाडाला बऱ्याच वेळां जास्त प्रकाश मिळूं शकतो.

प्रकाशामुळें होणारे पानांचे आकार:- समप्रकाशित पानांच्या दोन्हीं बाजूंवर जवळजवळ सारखाच प्रकाश पडत असून त्यांच्यामधील सर्व हरित्पेशी साधारण सारख्याच आकाराच्या असतात. उदा. बांडगूळ, व्दिविधप्रकाशित पानांच्या दोन्हीं बाजूंवर विषमप्रकाश पडून त्यांच्यामध्यें उन्नत आणि विरलपेशीपाटव असे निरनिराळे भाग झालेले असतात. सामान्य क्षितिजसमांतर किंवा भिन्नमुखपृष्ठांकित पानें बहुधां विषमप्रकाशित अशींच असतात. त्यांच्यामध्यें उन्नत आणि विरलपेशीपाटव असतात, पंरतु निरनिराळ्या जातींत त्या पाटवांचें सापेक्ष प्रमाण बरेंच निरनिराळें असतें. विषमप्रकाशित पानें उघडया दलदलींत, गवताळ कुरणांत, विस्तीर्ण माळावर वगैरे ठिकाणीं सांपडत असून तीं शुष्क निवासांतहि नेहमीं सांपडतात. जलतरणक पानांच्या खालच्या बाजूला प्रकाश बहुतेक मुळींच जाऊं शकत नसून तींहि विषमप्रकाशित असतात. त्या प्रकारची घटना असणारीं पानें बऱ्याच वेळां छायामय अरण्यांत सांपडतात. परंतु तशी घटना तेथें सांपडते, ती त्या झाडाच्या प्रकाशाश्रित उपप्रकारांची होय. परंपरागत धर्म त्यांच्यामध्यें अवशिष्ट राहिलेला असतो म्हणून प्रकाशाच्या प्रखरतेप्रमाणें समप्रकाशित पानांचे तीन वर्ग होतात: (१) केवलोन्नत प्रकार अथवा प्रतिपृष्ठक प्रकार:- हा सूर्यप्रकाशाश्रित प्रकार असून त्यांतील हरित्पेशीसंघ सर्वस्वी उन्नतपेशींच्या रांगांचाच बनलेला असतो, तो पानांच्या उभ्या मांडणीमुळें किंवा पानांच्या खालच्या बाजूंचें शुभ्र जमिनीवरून प्रकाशांचे परावर्तन झाल्यामुळें दोन्ही पृष्ठांचें बहुतेक समप्रकाशन होऊन उत्पन्न होतो. या प्रकारचा एक विशिष्ट उपप्रकार आहे त्याला (२) व्दित्तोन्नतप्रकार म्हणतात. त्यामध्यें पानाच्या आंत मध्यभागापर्यंत उन्हाचा प्रकाश पोचूं शकत नाहीं, त्यामुळें खालच्या आणि वरच्या उन्नतपेशीक्षेत्रामध्यें विरळतुल्य पेशीपाटव उत्पन्न होतो व त्याचा उपयोग जलसंचयाच्या कामीं होतो. (३) केवलविरल प्रकारमध्यें उन्नतपेशीपाटवाचा पूर्वाविशेष असणाऱ्या प्रकाशाखेरीज बाकीच्या सर्व छायाश्रित पानांचा अंतर्भाव होत असून बहुतेक सर्व जलाच्छादित पानांचाहि अंतर्भाव होतो. त्यांतील हरित्पेशीपाटवामध्यें फक्त विरलपेशीच असतात. उन्हांत वाढत असूनहि ज्यांच्यामध्यें उन्नतपेशीपाटव नसतो अशा कांही एकदलवनस्पतीहि तूर्त या वर्गात घालण्यास हरकत नाहीं.

प्रकाशाश्रित आणि छायाश्रित झाडें.- उन्हांत होणारीं झाडें प्रकाशाश्रित आणि सावलींत होणारीं छायाश्रित होत. पहिल्यामध्यें बहुतेक सर्व शष्कदेशीय झाडें, सपाट माळावरील आणि गवताळ कुरणांतील मध्यमभूस्थ झाडें, आणि वादिवातस्य आणि जलतरणक अशीं आर्द्रदेशीय झाडें इतक्यांचा अंतर्भाव होतो. छायाश्रित झाडांमध्यें दाट झाडींतील आणि दाट अरण्यांतील मध्यमभूस्थ झाडें आणि जलाच्छादित आर्द्रदेशीय झाडें यांचा अंतर्भाव होतो. या दोन निरनिराळ्या प्रकारांतील पानाच्या आणि स्तंभांच्या आकारांत काय फरक असतो हें पूर्वी सांगितलेंच आहे. प्रकाशाश्रितांपैकी बरींचशी झाडें व्दिविधप्रकाशित असतात. समप्रकाशित पानें असणारीं झाडें बहुधां शुष्कजागीं सांपडतात. बाकी या प्रकारांतील उभीं पानें बहुतेक सर्वच प्रकाशमय निवासांत आढळतात.

उग्दिज्ज घटनांचें स्वरूप:- उग्दिज्ज घटना म्हणजे अनेक झाडांनीं मिळून व्यापिलेलें एखादें क्षेत्र, जसें कुरण, अरण्य, माळरान, दलदल, शिलावल्कांनीं आच्छादिलेला कडा किंवा कमळांनीं भरलेलें तळें. या क्षेत्राच मर्यादा अरण्याप्रमाणें, कडयाप्रमाणें किंवा तळ्याप्रमाणें अगदीं ठळक असतात किंवा एक उग्दिज्जघटना दुसऱ्या घटनेंत अगदीं मिसळूनहि जाऊं शकते. उदाहरणार्थ, एखादें कुरण एका बाजूला हळू हळू दलदलींत तर दुसरीकडे माळरानांत मिसळून जातें व अखेंर एक घटना अमुक ठिकाणीं संपली व दुसरी अमुक ठिकाणीं सुरू झाली हें कळेनासें होतें. तरी पण कुरण, माळरान आणि दलदल या तिन्ही निरनिराळ्या घटना आहेत ही गोष्ट त्या त्या घटनांच्या ठराविक जागांची तुलना करून पाहिल्यास लक्षांत येतें. म्हणून उग्दिज्जघटनांचा निर्णय त्यांच्या मर्यादा ठळक आहेत किंवा नाहींत हें पाहून न करतां त्यांच्या विशिष्ट स्वरूपावरून किंवा त्यांतील घटकांवरून करणें बरें. साधारण सारख्यासारख्या व एकालगत एक असणाऱ्या घटना बहुधां हळू व एकमेकींत मिसळून जातात. जसें कुरण व माळरान, अरण्य आणि खुरटी झाडी वगैरे. परंतु ज्या घटना एकमेकीपासून अगदी भिन्न असतात, त्या मात्र अलगअलगच राहातात. उदाहरणार्थ कुरण तळें, व अरण्य.

भिन्न भिन्न घटना ओळखणें:- उग्दिज्जघटना ही एकंदर उग्दिज्जांतील एक घटक असते. भूपृष्ठावरील उग्दिज्जरूप आच्छादनामध्यें विलक्षण भेसळ असून तें आच्छादन बहुतांशीं निरनिराळ्या घटनांचें बनलेलें असतें. हे घटक किंवा ह्या घटनांचे प्रकार ओळखतांना एक दोन गोष्टी लक्षांत ठेवाव्या लागतात. कारण त्या घटकांमध्येंहि निरनिराळे भाग असून ते भाग म्हणजेच उग्दिज्जघटना असें वाटण्याचा संभव असतो. एखादी घटना निसर्गत: किंवा बाह्य कारणांनी इतकी विस्कळित झालेली असते कीं, त्यांतील एक किंवा अनेक भाग मूळ घटनेपासनू अगदी अलग झालेले असतात. अशा वेळी वरील चूक होण्याचा संभव असतो. एखाध्या प्रदेशांतून मूळ उग्दिज्जघटना अजीबात नाहींशी होऊन त्याऐवजीं तिचे एक दोन अर्धवट भागच शिल्लक राहिलेले असल्यास जास्त घोटाळा होण्याचा संभव असतो. अशा वेळीं हीं एकमेकांपासून दूर असलेली अवशिष्ट क्षेत्रें कशापैकीं आहेत हें ठरवितांना फार काळजीपूर्वक अवलोकन करावें लागतें. अशा सावधगिरीची जरूर कशी असते याचा मासला, ज्या देशांत अरण्यें राखून ठेविलेलीं असून तीं बहुतेक तोडलीं जातात अशा ठिकाणीं व गवताळ प्रदेशांतील क्षेत्रें कधीं कधीं बहूतेक सर्व नांगरली जातात अशा ठिकाणीं पहाण्यास मिळतो. तेथें मूळच्या अरण्याचे किंवा माळरानाचे लहान लहान भाग मधून तसेच सोडलेले असून ते बहुधां एकमेकांपासून थोडयाफार अंतरावर असतात. यांतील कांहीची रचना इतकी निराळी असते कीं, त्यांची एकमेकांबरोबर तुलना करून पाहिल्यास त्या भिन्नभिन्न घटना आहेत असाच भास होतो. परंतु ते सर्व भाग एकत्र केले असतां आणि विशेषत: इता ठिकाणाच्या मोठया भागांबरोबर ताडून पहातां ते मूळच्या एकाच उग्दिज्जघटनेचे केवळ निरनिराळे अंश आहेत असें आढळून येतें. थोडे चौरस मैल किंवा त्याहूनहि लहान क्षेत्रांचें निरीक्षण करतांना नेहमीं हे लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, तीं क्षेत्रें बहुधां निरनिराळ्या उग्दिज्जघटना नसतात तर ते फक्त मूळच्या एकाच विस्तीर्ण घटनेचे भाग असून मागून विभक्त झालेले असतात. ही गोष्ट डोंगरासारख्या उंचसखल भागांत, जेथें एकाच घटनेचे भाग फार लहान असून एकमेकांपासून दूर असतात अशा प्रदेशांनां विशेष लागू पडते. ज्या उग्दिज्जक्षेत्रांत वाढीच्य अनेक अवस्था दिसतात तेथें अशीच सावधगिरी ठेवावी लागते. कारण एक अवस्था किंवा एक घटना हळू हळू बदलून तिच्या जागीं दुसरी उत्पन्न होत व असें होतांना तेथील उग्दिज्जाला वास्तविक पहातां मिश्रस्वरूप येतें. नव्या किंवा उघाड झालेल्या बऱ्याच क्षेत्रांत बऱ्याच वेळां मूळच्याच उग्दिज्जघटनेचा प्रादुर्भाव होतो. भिन्न भिन्न घटना असल्यासारख्या दिसतात. परंतु असल्या सर्व क्षेत्रांची बारकाईनें तुलना केल्यास किंवा उघाड झालल्या बऱ्याच क्षेत्रांच बऱ्याच वेळां मूळच्याच उग्दिज्जघटनेचा प्रादुर्भाव होतो. कधीं कधीं असल्या कांहीं ठिकाणची घटना अजिबात निराळयाच जातींनीं बनते व त्यावरून तेथें बऱ्याच भिन्न भिन्न घटना असल्यासारख्या दिसतात. परंतु असल्या सर्व क्षेत्रांची बारकाईनें तुलना केल्यास किंवा त्यांची परिर्णात पुढें कशी होते हें पाहिल्यास ती मूळच्या एकाच घटनेचे निरनिराळे भाग आहेत किंवा कसे याचा निर्णय करतां येतो. उग्दिज्जघटनेच्या एखाध्या भागाची वाढ इतर भागांइतकी न होतां ती रेंगाळत राहण्याचा संभव असतो. किंवा एखाध्या लहानशा भागाचें भौतिक स्वरूप मूळचेंच निराळें असल्यामुळें किंवा त्यांत मागून फरक पडल्यामुळें इतर ठिकाणीं समान दिसणाऱ्या घटनेमध्येंच एखाध्या भिन्न घटनेंतील उग्दिज्ज समूहाची उत्पत्ति होते. अरण्यांतील आणि कुरणांतील खडकांवर सांपडणारें शैवाल आणि शिलावल्कसमूह हीं वरील गोष्टींचीं उत्ताम उदाहरणें होत. अरण्यांतील तळ जमिनीवर किंवा तेथील खोडांवर वाढणारीं शिलावल्कें हीं अरण्यरूप घटनेपैकींच असतात यांत शंका नाहीं. कारण, त्यांचें अस्तित्व झाडांमुळें मिळणारी छाया आणि ओलावा यांच्यामुळेंच शक्य असतें. तोच न्याय त्याच कुरणांतील गवतांत आणि लव्हाळयांत सांपडणाऱ्या शिलावल्कांच्या बाबतींतहि लागू पडतो. त्यांची एकंदर परिस्थिति तेथील उग्दिज्जघटनेच्या परिस्थितीप्रमाणेंच असून जसा तेथील इतर झाडांनां तसाच शिलावल्कांनांहि त्या निवासांत परकेपणा वाटत नाहीं. परंतु अरण्यांत किंवा कुरणांत इतस्तत: दिसणाऱ्या खडकांची गोष्ट तशी नसून त्या उपाधीच्या भौतिक स्वरूपांत फरक असतो. त्यामुळें त्या खडकावर वाढणाऱ्या शिलावल्कांच्या जाती इतर ठिकाणीं सांपडणाऱ्या शैलस्य घटनेंतील ठराविक जातीप्रमाणें असतात. प्रत्येक शैलस्य उग्दिज्जसमूह निराळ्या निवासांत सांपडणाऱ्या उग्दिज्जघटनेचा अंश असतो. अरण्यांत किंवा कुरणांत एखादा शिलाखंड सहज येऊन पडलेला असण्याचा संभव असतो. किंवा त्यावरील माती निघून जाऊन त्यावर शिलावल्कें उगवण्याजोगा तो झालेला असण्याचा संभव असतो. किंवा इतर वृक्षांनी स्थानभ्रष्ट केलेल्या एखाध्या शैलस्य घटनेचाहि तो अंश असूं शकतो. कांहींहि असलें तरी या प्रकारचा शिलावल्कसमूह हा अरण्यरूप घटनेंत किंवा शाव्दलरूप घटनेंत अर्थात कुरणांत परकीयच असतो. वरील विवेचनावरून हें लक्षांत येईल कीं, उग्दिज्ज सृष्टीचें अवलोकन करतांना पहिली अवश्य गोष्ट म्हणजे शक्य तितक्या निरनिराळ्या उग्दिज्जघटना ओळखतां याव्या लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्या घटनांची वाढ आणि त्यांतील घटक यांची इतक्या काळजीपूर्वक तुलना करावी लागते कीं, तेथें खऱ्या उग्दिज्जघटना कोणकोणत्या आहेत हें ओळखतां येऊन त्यांतील निरनिराळे भाग वास्तविकपणें कोणत्या घटनेंत मोडतात हें सांगतां यावें. कारण कोणत्याहि प्रदेशांत खऱ्या उग्दिज्जघटनांची संख्या त्या त्या घटनांतील निरनिराळे भाग. खंड, किंवा वाढींतील निरनिराळ्या अवस्था यांच्या मानानें फारच लहान असते. एखाध्या भूभांतील अरण्य, कुरण, दलदल, तळें वगैरेंतील घटना ओळखणें सोपें असून बऱ्याच वेळां शेजारच्या प्रदेशांतील तसलींच अरण्यें, कुरणें वगैरे वरील घटनांचेच नमुने असतात.

निवास आणि उग्दिज्जघटना यांतील संबंध.- उग्दिज्जघटना म्हणजे निरनिराळ्या झाडांनीं बनलेला उग्दिज्जसमूह असल्यामुळें आणि तीं झाडें निवासाच्या स्वरूपावर अवलंबून असल्यामुळें उग्दिज्जघटनाहि निवासावर तशीच अवलंबून असली पाहिजे हें उघड आहे. वास्तविक पहातां निवासाचें आच्छादन करणाऱ्या झाडांचा एकंदर समूह म्हणजे उग्दिज्जघटना होय. म्हणून दोघांच्या मर्यादाहि एकच असावयाच्या. तळें, खडक, सावटीची जागा या सारख्या ठळक मर्यादा असणाऱ्या निवासांत ज्या उग्दिज्जघटना असतात त्यांच्या मर्यादा तितक्याच ठळक असतात व जो निवास दुसऱ्या निवासांत न कळेसा मिसळून जातो त्यांतील घटनाहि शेजारच्या घटनेंत तशीच मिसळून जाते. निवासांतील खरें वैशिष्टय हें जलांश, वातार्द्रता किंवा प्रकाश यांसारख्या प्रत्यक्ष कार्यकारी घटकांच्या बाबतींतील वैशिष्टयामुळें उत्पन्न होतें. अशा तऱ्हेनें एकमेकांपासून भिन्न असणाऱ्या पुष्कळ निवासांत तव्दिशिष्ट अशा निरनिराळ्या घटना असतात (उ. वालुकामय प्रदेशांत शुष्कदेशीय झाडें, निबिड अरण्यांत छायाप्रिय झाडें व ओलसर कुरणांत आनूप म्हणजे दलदलींतील झाडें). उग्दिज्जघटना निवासापासून उत्पन्न होते, या अर्थी त्या घटनेंत त्या निवासामुळें होणारें स्थूल आणि ठराविक प्रतिवर्तन दिसून येतें, इतकेंच नव्हे तर, त्या निवासांत होणाऱ्या बारीकसारीक भेदानुरूपहि त्यामध्यें न्यूनाधिक्य होतें. देवदारासारख्या झाडांचें अरण्य ज्या ठिकाणीं उत्पन्न होतें तेथील जलांश आणि प्रकाश यांच्या मानानें अगदीं भिन्न परिस्थितींत एखाध्या खडकाळ उतारावरील ही घटना उत्पन्न होते. त्या दोहोंच्या स्वरूपांत जो विलक्षण फरक दिसतो तो त्यांच्या परिस्थितीतींल विषमपणाचा परिणाम होय. बाकी प्रत्येक निवासांत जलांश आणि प्रकाश यांत ठिकठिकाणीं थोडाबहुत फरक पडतच असून त्याचा परिणाम या घटनेवर झालेलाहि दिसतो. त्यामुळें या घटनेंतील घटकावयवांमध्येंहि तदनुरूप फरक उत्पन्न होत असून त्यांचे पृथक्करण करून त्यावरून निरनिराळे पुष्कळ विभाग करतां येतात. या भिन्न भिन्न विभागांमध्यें बऱ्याच वेळां कांहीं ठाराविक जातीच सांपडत असून त्यामुळें त्या भागांवर कांहीं निराळाच ठसा उमटतो. बाकी सूक्ष्म पृथक्करण करून पाहिलयास त्या सर्व जाती बहुतेक एकाच स्थूल स्वरूपाच्या असतात व त्या घटनेची एकंदर व्यवस्था म्हणजे भौतिक गोष्टींतील बारीकसारीक फेरफारामुळें किंवा जीवनार्थ कलहांतील चढाओढीमुंळें घडलेलें प्रतिवर्तनच असतें असें आढळून येतें.

उग्दिज्जघटनेंतील ऐतिहासिक अथवा परंपरागत भाग:- बऱ्याच उदाहरणांत निरनिराळ्या उग्दिज्जजातींच्या व निरनिराळया व्यक्तिंच्या संघव्यवस्थेंत जो फेरफार होतो तो भौतिक कारणांमुळें न होतां ऐतिहासिक अथवा परंपरागत कारणांमुळें होतो. या घटनेचें अतिक्रमण करणाऱ्या एखाध्या परकीय जातीचा प्रवेश एखाध्या स्थळीं होऊन तेथून ती जात हळू हळू पसरत जाण्याचा संभव असतो. झपाटयानें एकसारखी सर्व बाजूंनां पसरली आहे असें क्कचितच होतें, किंवा होत नाहीं म्हटलें तरी चालेल. उग्दिज्जाची वाढ होतांना एक किंवा अधिक जाती किंवा व्यक्ती, त्यांच्याबरोबरचे बांधव किंवा सहचर नाहींसे होऊन नामशेंष झाल्यानंतर बरेच दिवसपर्येत शिल्लक राहूं शकतात ही गोष्ट त्यांचे स्थानांतर होतांना किंवा चढाओढींच्या वेळीं होणाऱ्या कांहीं आकस्मिक गोष्टीमुळें होते, किंवा प्रत्यक्ष झाडांमध्येंच कांहीं परंपरागत अथवा ऐतिहासिक भाग असतो, त्यामुळें त्या झाडाला चिकाटीनें राहातां येते.एखाध्या विस्तीर्ण उग्दिज्जघटनेंतील दूरदूरच्या भागांत निवासाशी संबंध नसणारे फेरफार कां घडूं शकतात या गोष्टीचा उलगडा या परंपरागत गोष्टींमुळें होतो. त्याचप्रमाणें त्यामुळें या घटनेंतील निरनिराळ्या एकांतिक भागांत आश्रचर्यकारक फरक कशामुळें होतात ही गोष्टहि चांगली समजते. कारण ते एकांतिक भाग असे असतात कीं, त्यांचे अतिक्रमण होण्याचा विशेष संभव असतो. एकमेकांपासून दूर असणाऱ्या प्रदेशातील सारख्या निवासांत एकसारख्याच उग्दिज्जघटनांचा उग्दव होतो. परंतु त्यांत होणाऱ्या जाती त्याचें स्थानांतर किंवा त्यांची वाढ होतांना घडलेल्या ऐतिहासिक कारणामुळें बहुतांशीं किंवा सर्वस्वी भिन्न असतात.

वाढ आणि अंतर्रचना :- उग्दिज्जघटनांच्या घटकावयवांतून कांहीं कांहीं फरक पडत जाऊन ते परस्पर भिन्न दिसूं लागतात. असल्या फरकांनां वास्तविक कार्यात्मक आणि घटनात्मक फरक असें म्हणावयास हरकत नाहीं. कारण या घटनाहि एक संकलित व सजीव वस्तू आहेत असेंच म्हटलें पाहिजे. या घटनेमध्यें वाढ किंवा परिणति आणि रचना हीं दोन्हीं दिसतात. बहुतेक सर्व घटनांमध्यें सतत फरक पडत जातात, परंतु घटनेल स्थिर अथवा कायमचें स्वरूप प्राप्त झालें म्हणजे ते मंदपणें होतात, किंवा बहुतेक दृष्टोत्पत्तीसहि येत नाहींत. नवीन घटनांतून किंवा घटनांची वाढ होतांना ते फरक हमेश झपाटयानें पडतांना दिसतात, परंतु घटना जुन्या झाल्या म्हणजे ते फार थोडया प्रमाणांत होतात. घटनांची परिणति होत असतांनां त्यांच्यामध्यें जे फरक होत असतात ते झाडांच्या स्थानांतरामुळें, चिरस्थायी क्रियेमुळें निवासावर होणाऱ्या त्यांच्या परिणामामुळें आणि त्यांच्या परस्पर चढाओढींमुळें होत असतात. म्हणून उग्दिज्जसंघाचीं कार्ये म्हटली म्हणजे संकलन, स्थानांतर, चिरस्थापना, प्रतिक्रिया आणि परस्परस्पर्धा हीं होत. स्थानांतर आणि चिरस्थापना या गोष्टी निवासतिक्रमण यशस्वी होण्याच्या मुळाशीं असतात. परंतु प्रतिक्रिया आणी परस्परस्पर्धा निवासातिक्रमण पुरें झाल्यानंतर घडतात. निवासातिक्रमणामुळें एक उग्दिज्जघटना नाहींशीं होऊन तिचा जागीं दुसरी उत्पन्न होते. या गोष्टीला अनुक्रमण असें म्हणतात. वर सांगितलेलीं कार्ये आणि निवास यांच्या मिश्र परिणामामुळें घटनेंतील निरनिराळ्या व्यक्ती आणि जाती यांचे निरनिराळ्या प्रकारचे संघबनून त्या घटनेमध्यें न्यूनाधिक्य होतें. झाडांच्या अंतर्रचनेप्रमाणेंच घटनेंतील रचना विशिष्ट प्रकारचीच कां होते याचा उलगडा त्या घटनेच्या कार्यामुळें होतो. हे रचनाविशेष निवासांतील फेरफारामुळें, घटनेच्या कार्यामुळें किंवा बहुतेक वेळीं दोहोंच्या कार्यामुळें जागोजागीं थोडींबहुत ठळक अशीं क्षेत्रें होऊन त्या रूपानें उत्पन्न होतात. शिवाय प्रत्यक्ष घटनांचेच असे निरनिराळे संघ बनलेले असतात कीं, एकंदर उग्दिज्जामध्येंहि थोडेफार ठळक रचनाविशेष झालेले असतात. या दोन्हीं उदाहरणांत दोन प्रकारच्या अगदी भिन्न व्यवस्था किंवा रचनाविशेष झालेले दिसतात. एकामध्ये घटनेचे भाग किंवा प्रत्यक्ष घटनांचीं निरनिराळीं क्षेत्रें किंवा मंडलें बनतात. असल्या प्रकाराला मंडलीभवन म्हणतात. दुसऱ्या प्रकारामध्येंहीं क्षेत्रें अव्यवस्थित असून कशीं तरी अव्यवस्थितच उग्दवतात. त्याला व्युत्क्रमण म्हणतात.

उग्दिज्जघटनेची अंतर्रचना:- कोणतीहि उग्दिज्जघटना सर्वत्र एकसारखी नसते. बहुतेक सर्वच घटनांतून थोडेबहुत ठळक फरक दिसतात. म्हणून या घटनांच्या रचनेंत सूक्ष्म फरक सर्वत्र दिसावे असा नियमच आहे, असें म्हणावायास हरकत नाहीं. असे ठरीव फरक होणें ही गोष्ट भौतिक उपाधींच्या कार्यामुळें आणि घटनाविषयक कार्यामुळें म्हणजे स्थानांतर, स्पर्धा वगैरे गोष्टींचा निरनिराळ्या उग्दिज्जव्यक्ती व जाती यांच्या संख्येवर संकलनावर जो परिणाम होतो, त्यामुळे घडते. हा परिणाम तीन प्रकारांनी व्यक्त होतो. निरनिराळ्या जातीची संख्या आणि उग्दिज्ज घटनेंतील त्यांचें प्राबल्य; यामुळें त्या वेगवेगळ्या ओळखतां येतात. ऋतुमानात्मक फेरफाराप्रमाणें त्या जाती आपली सोय लावून घेऊन ठराविक वेळींच उग्दवतात, किंवा एका ऋतुंत दुसऱ्या ऋतूपेक्षां जास्त ठळकपणें दिसतात. व अखेर निवासांतील फेरफारामुळें आणि संकलन स्थानांतर आणि परस्परस्पर्धा यामुळें निरनिराळ्या उग्दिज्ज व्यक्ती आणि जाती यांची मांडणी विशिष्ट जागीं त्याचे विशिष्ट संघ बनून होते.

मुख्य जाती.- उग्दिज्ज घटनेंत प्रत्येक जातीच्या झाडानें किती कार्यभाग घेतला आहे ही गोष्ट बहुतांशी या जातींतील व्यक्तींच्या संख्येवरून सांगतां येते व तें ठरवितांना इतर गोष्टींचेहि बरेंच महत्त्व असतें. प्रत्येक झाडाचें आकारमान म्हणजे त्याची उंची आणि पसारा या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्याशिवाय झाडांच्या इतर गुणधर्माचें व विशेषत: त्यांच्या आयुर्मानाचें बरेंच महत्त्व असतें. एखाध्या जातींचें प्राबल्य किती आहे हें ठरवितांना या सर्व गोष्टीचा विचार करावा लागतो. बऱ्याच वेळां केवळ संख्येवर मदार ठेवूनहि ती गोष्ट चांगल्या तऱ्हेनें करतां येते. घटनेंत ज्या जातींचें प्राबल्य असेल त्यांनां मुख्य जाती असें म्हणतात. मुख्य जातींतील संख्या इतर सर्वाच्या मानानें जास्त असते किंवा लहान असल्यास त्यांचें आकारमान किंवा आयुर्मान हीं मोठीं असलीं तर ती उणीव भरून निघते. घटनेंत मुख्य जाती जितक्या सर्वत्र पसरलेल्या असतात तितक्या इतर नसतात. या मुख्य जाती एखाध्या घटनेंत हटकून सर्व ठिकाणीं सांपडतातच असें नाहीं. अरण्यांतील मुख्य जाती म्हटल्या म्हणजे तेथें ज्या वृक्षविशेषांचें प्राबल्य असेल त्यांच्या होत. खुरटया झाडांतील मुख्य जाती म्हणजे झुडपांच्या व कुरणांतील मुख्य जाती. तेथें ज्यांचें प्राबल्य असेल अशा गवतांच्या किंवा लव्हाळयांच्या ओसाड वाळवंटांत, पडी जमिनींत, जंगलतोड झालेल्या ठिकणीं, दलदलींत, तळ्यामध्यें वगैरे ठिकाणी गवतांचें फारसें प्राबल्य नसतें किंवा त्यांचा अभाव असतो. अशा स्थितींत मुख्य जातीमध्यें इतर मृदुवनस्पतीचा समावेश होतो. परंतु कुरणांत, माळरानांत, व मैदानांत तेथील प्रबल अशा गवतांच्या जाती याच नेहमी मुख्य असतात. एखाध्या घटनेंत हटकून मुख्य जातीच कायत्या एकदम नजरेस येतात असें नाहीं. तशी स्थिति अरण्याच्या बाबतींत व खुरटया झाडांच्या बाबतींत असते खरी, परंतु कुरणांत आणि माळरानांत बऱ्याच वेळां इतर मृदुवनस्पती गवताच्या वर डोकें काढून त्याला झांकून टाकतात. या गोष्टीची सत्यता फक्त वर्धनकालींच दिसून येतें. परंतु एरव्हीं कोणत्याहि वेळीं तेथें मृदुवनस्पतींच्या जाती गौण असून गवतांच्या जातीच मुख्य असतात. कारण तेथें सर्व मदार गवतांच्या जातीच मुख्य असतात. कारण तेथें सर्व मदार गवतावरच असते.

प्रधान आणि गौण जाती:- इतर जातींतील व्यक्तींची संख्या ज्या मानानें ज्यास्त असेल किंवा त्यांचे आकारमान जसे असेल त्या मानानें त्यांचा दर्जा ठरवितां येतो. मुख्य जातीखेरीज बाकीच्या जातींतून ज्यांची संख्या सर्वात जास्त असेल किंवा त्यामुळें त्या घटनेला वैशिष्टय येत असेल त्यांनां प्रधानजाती म्हणतात, व त्याहून कमी महत्त्वाच्या जातीनां गौण जाती म्हणतात, या दोहोंतील स्पष्ट मर्यादा ठरविणें झाल्यास ती गोष्ट थोडीबहुत आपल्या कल्पनेप्रमाणें ठरवावी लागते. बहुव्यापी व ठळक अशा जाती पहिल्या वर्गात सहज घालतां येतात. तशाच अल्पव्यापी व क्षुल्ल्क जाती दुसऱ्या वर्गात घालतां येतात. त्या दोहोंच्या मध्यंतरी थोडया कमी महत्त्वाच्या जाती येतात. त्यांचा दर्जा त्यांच्या व्यापावरून ठरवितां येत असून अमुक जात प्रधान व अमुक गौण हें त्या जातीचें मान जसें असेल त्याप्रमाणें ठरवितां येतें.

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .