विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
वरंगळ, प्रांत.- हैद्राबाद संस्थानांतील एक प्रांत. याच्या उत्तारेस वऱ्हाड आणि मध्यप्रांत; पूर्वेस प्राणहिता व गोदावरी नद्या; पश्रिमेस इंदूर व महबूबनगर जिल्हे आहेत. क्षेत्रफळ २०९७० चौरस मैल. लोकसंख्या २६५७४७७. या प्रांताचे वरंगळ, करीमनगर व अदिलाबाद असे तीन जिल्हे आहेत. सदर प्रांतांत १५ शहरें व ४००२ खेडीं आहेत.
जिल्हा.- हैद्राबाद संस्थान वरंगळ प्रातांतील एक जिल्हा. क्षेत्रफळ ७९४३ चौरस मैल. लोकसंख्या ९०५४१४. यांतील बराच भाग खालसा असून बाकी जहागीर आहे. या जिल्ह्यांत हसनपती नांवाची लोखंडाच्या खाणीची एक टेंकडी आहे. वरंगळ जिल्ह्यांतून गोदावरी व कष्णा या दोन मुख्य नध्या वाहातात. पाखाल हें मुख्य सरोवर आहे. वरंगह जिल्ह्याची हवा कोरडी असून निरोगी असते. में महिन्यांत उष्णता कडक असून पारा ११२० अशां पर्येत चढतो. दरसाल पावसाचें मान २९ इंच असतें.
इतिहास:- प्राचीन काळी वरंगळ जिल्ह्यांत आंध्र राजे राज्य करीत असून त्यांनीं बहुतेक दक्षिण भाग व्यापून टाकिला होता. नंतर बाराव्या शतकाच्या सुमारास काकतीय व गणपती नांवाच्या राजांनीं राज्य केलें. त्या वंशांतील रूद्रम्मादेवी नांवाच्या राणीनें १३०३ साली मुसुलमानांचा पराभव केला. १३१० साली मलिककाफरनें वरंगळला वेढा देंऊन तेथील रूद्रदेवाला कैद केलें. या घराण्यांतील शेवटचा राजा वीरभद्र यानें स. १३२५ पर्येत राज्य केलें. पुढें ब्राह्यणी राज्य उदयाला आलें. त्यांनीं वरंगळकरास मांडलिक बनविलें. ब्राह्यणीराज्य नष्ट झाल्यावर वरंगळप्रांत कुत्बशाहींस जोडण्यांत आला (“काकतीय” व “गणपती” शब्द पहा).
प्राचीन इमारतींत हन्नमकोंडा येथील हजारखांबी देवालय महत्त्वाचें असून तें चालुक्यांनीं ११६२ सालीं बांधलेलें होतें. वरंगळ येथील प्रसिध्द किल्ला गणपती राजानें आरंभून त्याच्या बायकोनें त्याच्या कामाची पूर्तता केली. पाखाल तालुक्यांत ४० फूट उंचीचें रामाप्पाचें देऊळ उत्ताम प्रकारचें खोदीव काम केलेलें आहे. खम्मामेट येथील पुरातन किल्ला ९०० वर्षोपूर्वी बांधला असून १५१६ सालीं गोंवळकोंडयाच्या सुलतानानें तो घेतला. सांप्रत वरंगळ जिल्ह्याचे वरंगळ, पाखाल, खम्मामेट, यलंदलपाद, महबूबबाद, मध्रा, मुलग, पाळोंचा इत्यादि ८ तालुके आहेत. जिल्ह्यामध्यें ५ शहरें व १२४४ खेडीं आहेत. मसब, खरब, चल्क व काळी अशी ४ प्रकारची जमीन असून जिल्ह्यांत रयतवारी पध्दत चालू आहे. मुख्य उत्पन्न ज्वारी, मका तांदूळ व बाजरी. खम्मामेट व मध्र येथील बैल जातिवंत असतात. खनिज पदार्थ अशोधित लोखंड, कोळसा व काळापाषाण वगैरे मुख्य असून सिंगारणी येथील कोळशाच्या खाणींत हैद्राबाद मायनिंग कंपनी काम करते.
जिल्ह्यांमध्यें कारखाने बरेच आहेत. हन्नमकोंडा येथे रेशमी व सुती कापड चांगलें निघतें. वरंगळ करिमाबाद व मथवाडा येथील गालिचे यूरोपांत खपण्यासारखे उत्तम होतात. पागोटीं, लुगडीं रेशमी सतरंज्याहि या जिल्ह्यांत चांगल्यापैकीं तयार होतात. निर्गतमाल तांदूळ, गहूं, ज्वारी, कडधान्य, कापूस, तंबाखू, तीळ, एरंडी, गालीचे, सतरंज्या, रेशीम कापड, सुती कापड, चामडी हा असून आयात माल मीठ, शुध्द केलेली साखर, सुपारी, मसाले, अफू, चांदी, सोनें, तांबें, पितळ, राकेल व आगपेटया वगैरे. निझाम रेल्वे जिल्ह्यांतून पश्र्चिमेस जंगावपासून काजीपेठ, वरंगळ ओलांडून पूर्वेस येरूपल्य्मपर्यंत १४८ मैल गेलेली आहे. वरंगळ जिल्ह्यांत शिक्षणप्रसार बराच आहे.
तालुका.- हैद्राबाद संस्थान वरंगळ जिल्ह्यांतील एक तालुका. क्षेत्रफळ ९१६ चौरस मैल व लोकसंख्या २४५१९०. तालुक्यांत ३ शहरें व १९० खेडीं आहेत.
शहर.- हैद्राबाद. वरंगळ जिल्ह्यातील प्राचीन शहर. हें हैद्राबाद शहरापासून ८६ मैलावर निझामस्टेट रेल्वेवर स्टेशन आहे. १९०१ सालीं लोकंसख्या ५५४२ होती. प्रोद राजानें हें शहर वसविलें असें म्हणतात. रघुनाथ भास्कर यांनी आपल्या अर्वाचीन कोशांत याला एसिलपट्टण किंवा एसिलनगर (अक्षलिंगर) असें म्हटलेलें आहे टॉलेमीच्या ग्रंथांत कोरून्कुल म्हणून ज्या शहराचा उल्लेख आहे तें हेंच होय. प्रोदराजाचा नातू गणपती यानें वरंगळ शहरला दगडी तट बांधण्याला आरंभ करून त्याच्या बायकोनें तें काम पूर्ण केलें. वरंगळ समुद्रसपाटीपासून १०५० फूट उंच आहे. पूर्वी वरंगळ शहराचा विस्तार फार मोठा होता. हन्नमकोंडा, मथवाडा, करिमाबाद व हल्लीचे वरंगळ मिळून बरंगळ शहर बनलेलें होतें [इंपे. ग्याझे; माबेल डफ.]