विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
वरड जमीनदारी - मध्यप्रांत, भंडार जिल्हा, टिरोरा तहशील. क्षेत्रफळ ७० चौरस मैल. हींत ३२ खेडीं आहेत. या जमीनदारीतील जमीन उत्कृष्ट असून वस्तीहि पुष्कळ आहे. हिची लोकसंख्या १९०१ सालीं १९१९१ होती, प्रथमत: ही जमीनदारी एका पोंवारास देवगडच्या राजानें दिली होती परंतु १८१५ सालीं त्या घराण्यास बंडखोर लोकांस मदत केल्याच्या आरोपावरून काढून टाकलें व बिजलीचा नर्मदलोधी याचकडे ही जमिनदारी मिळाली. उत्पन्न ३६००० रूपये; व टाकोळी १७००० रूपये. हल्लीं ही जमीनदारी कामठाच्या जमीनदाराकडेच आहे.