विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
वरदाचार्य - एक वैष्णव ग्रंथकार. हा वेदांताचार्योचा शिष्य असून कांची येथें रहात असे. हा रामानुजमताचा होता असें दिसतें. यानें रहस्यत्रयसार, सत्यत्रयनिरूपण आणि वेदांतविजय असे तीन ग्रंथ लिहिले. नंतर वसंततिलकमाण हा ग्रंथ लिहिला. हा वयाच्या ५४ व्या वर्षी कांची येथें वारला.