विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
वररूचि - प्राचीन ग्रंथकार. सुप्रसिध्द वार्तिककार कात्यायन व हा एकच होत असें बऱ्याच विव्दानांचें मत आहे. ऐंद्र नामक एका प्राचीन व्याकरणशाखेचा हा अनुयायी होता अशी आख्यायिका आहे. उणादि सूत्रांचें कर्तृत्व विमलसरस्वतींनें याच्याकडे दिलेलें आढळतें. याशिवाय कातंत्रकृत्प्रकरण ग्रंथहि यानेंच लिहिला अशी आख्यायिका आहे. याच्या नांवावर यानेंच लिहिला अशी आख्यायिका आहे. याच्या नांवावर अनेक ग्रंथाचें कर्तृत्व लादण्यांत येतें. परंतु त्यांपैकीं बरेच अर्वाचीन व त्याच्यानंतर झालेले आहेत. त्रिभाष्यरत्नांत (१.१८, २.१४) त्याच्यासंबंधीचे उल्लेख आलेले आहेत, विक्रमादित्याच्या पदरीं असलेल्या नवरत्नांत वररूचीचें नांव आढळतें. पण हा वररूचि निराळा असावा असें वाटतें.