प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

वलयांकितसंघ:- या संघाचें प्रतिरुप जे भूकृमी अथवा काडू हे पावसाळयातं सकाळीं परसांत सरपटतांना आढळतात. हे तांबुस, तीन चार इंच लांब, वाटोळे व दाभणाएवढे जाड प्राणी पाणथळ जमिनींत भोकें पाडून त्यांत राहतात व रात्रीं किंवा सकाळीं ऊन पडण्याच्या पूर्वी बिळाबाहेर येतात व अन्नाकरितां किंवा संभोगसुखाकरितां इतस्ततः हिंडतात. हे उन्हाळयातं व उन्हांत बिळांतच राहून आपलें शोषणापासून रक्षण करतात. हे बुळबुळीत असल्यामुळें त्यांनां स्पर्श करण्यास कोणाचेंहि मन घेत नाहीं.

ज्या टोंकानें हे नेहमीं पुढें सरकतात तें त्यांचें पूर्वटोंक व तेथेंच त्यांचें तोंड असतें. दुस-या टोंकाला किंवा पश्चिमभागाच्या शेवटीं यांचें गुरुद्वार असतें. या प्राण्याच्या सर्व पृष्ठभागावर आडव्या अथवा परिविस्तर खांचा असतात व  या खांचामुळें यांच्या शरीराचे शंभरसवाशें भाग पडतात. या प्रत्येक भागाला वलय असें म्हणतात. चवदावें, पंधरावें, व सोळावें वलय हीं एकत्र होऊन व तेथील कातडी जाड होऊन या प्राण्याचा कमरपट्टा तयार होतो. या प्राण्याच्या पृष्ठभागाचे दोन भाग पडतात. ऊर्ध्वतलावर मधोमध दोनहि शेवटांपर्यंत जाणारी एक काळसर तांबडी रक्तवाहिनी या प्राण्याच्या पारदर्शक शरीरपुटांतून दिसते. अधरतल किंचित पांढुरकें असून त्याच्यावर १७व्या, १८व्या व १९व्या वलयांत बाजूला दोन दोन उंचवटे असतात. अठराव्या वलयाच्या उंचवटयावर पुंजननेंद्रियाचीं तोंडें असतात. हे प्राणी उभयलिंगी असल्यामुळें या प्राण्याचें स्त्रीजननेंद्रियाचें तोंड चवदाव्या वलयाच्या अधरतलावर मधोमध असतें. प्रत्येक वलयाच्या मधोमध शरीरासभोंवार एक शूकांची रांग असते. कांहीं जातींतील शुकांच्या रांगेंत शूक सारख्या अंतरावर असतात. कांहीं जातींत फक्त अधरतलावरच आठच असतात व कांहीं जातींत सारख्या अंतरावर नसतात. या शुकांचीं बाहेरील टोकें मागील बाजूला वळलेलीं असल्यामुळें हा प्राणी चिमटींत धरुन पुढील टोकानें ओढला तर मऊ लागतो. शेंपटीकडून ओढला तर खरखरीत लागतो. हे शूक जमिनींत रोवले असतां हा प्राणी मागें घसरला जात नाहीं. या प्राण्याच्या पृष्ठभागावरील पूर्वोक्त छिद्राशिवाय बारीक छिद्रें व अति बारीक रंध्रें पुष्कळ असतात. ऊर्ध्वतलावर मधोमध कांहीं खाचींत बारीक छिद्रें असतात. त्यांचा संबंध शरीरगुहेकडे असतो व त्याला उर्ध्वछिंद्रें म्हणतात. हा प्राणी हातांत धरुन चोळला तर या छिद्रांतून पाण्याचे बिंदू बाहेर आलेले दिसतात. सहाव्या ते नवव्या वलयाच्या अधरतलावर बाजूला प्रत्येकीं दोन दोन प्रमाणें आठ छिद्रें असतात व तीं या प्राण्याच्या शुक्रभांडाचीं तोंडें आहेत. याप्रमाणेंच उत्सर्जनी अथवा वृक्कनलिकांचीं तोंडें अथवा रंध्रें प्रत्येक वलयावर पुष्कळ असतात, व तीं अति सूक्ष्म असल्यामुळें दिसत नाहींत. याशिवाय बाह्यत्वचेंतील एकपेशीय पिंडांनीं किंवा निस्यंदी पेशींचीं रंध्रें तर प्रत्येक वलयावर अगणित असतात. या निस्यंदी पेशींकडून एक द्रव तयार होतो व त्याच्यायोगानें याच्या पृष्ठभागावर कोणताहि परोपजीवी प्राणी रहात नाहीं व या प्राण्याला घाणींत राहून घाण चिकटत नाहीं.

शरीरगुहा:- एक मोठी रबरी नळी घेऊन तींत दुसरी एक लहान रबरी नळी घातली व मधली नळी  इकडे तिकडे हालूं नये म्हणून या दोन नळयांमध्यें थोडथोडया अंतरावर, मध्यें भोंक असलेल्या वाटोळया चकत्या बसविल्या तर या नळयावरुन या प्राण्याच्या आंतररचनेची ठोकळ कल्पना येईल. बाहेरची मोठी नळी म्हणजे या प्राण्याचें शरीरपुट, व आंतील लहान नळी म्हणजे याची पचनेंद्रियनलिका व मधल्या चकत्या म्हणजे या प्राण्याची शरीरगुहा होय. शरीरपुट व अन्ननलिका यांचा सांधा दोन्हींहि टोंकांस झालेला असल्यामुळें शरीरगुहेच्या बाहेरच्या हवेशीं संबंध स्वतंत्ररीत्या फक्त उर्ध्वच्छिद्रांतून येतो व खांचीखालील पडदे अधरभागाच्या शरीरपुटाला पोंचत नसल्यामुळें प्रत्येक वलयांतील शरीरगुहेचा भाग स्वतंत्र न होतां सर्व शरीरांतील पोकळी अथवा शरीरगुहा अखंड राहाते. या गुहेंत एक प्रकारचा द्रव असून त्यांत कित्येक विवर्णपेशी असतात. एका टोंकापासून दुस-या टोंकापर्यंत जाणा-या ज्ञानरज्जूंनां व रक्तवाहिन्यांनां वरील पडद्यांतून आरपार जावें लागतें.

शरीरपुटांत बाहेरच्या बाजूनें शार्गींय द्रव्याचा एक चकाकणारा पापुद्रा असतो व शरीरपुटांतील निरनिराळया नळयांच्या तोंडांशीं त्याला भोंकें असतात. या शार्गींय पापुद्र्याच्या आंत एकेरी पेशींची झालेली बाह्यत्वचा असते; व तिच्याकडूनच हा पापुद्रा तयार झालेला असतो. कमरपटयांतील बाह्यत्वचेंत पेशींचें पुष्कळ थर असतात. बाह्यत्वचेंतील पेशींत कांहीं निस्यंदी पेशी असतात व कांहीं ज्ञानग्राहक असतात. बारीक बारीक ज्ञानतंतूंनीं वरील ज्ञानग्राहक पेशी ज्ञानसूत्राला जोडलेल्या असतात. बाह्यत्वचेच्या आंत संभोजक धातूचा थर असतो आणि त्यालाच आंतरत्वचा म्हणतात. याच्या आंतल्या बाजूला परिविस्तर स्नायुपेशींचा थर असतो व शरीरपुटाचा आंतला शेवटाच जाड थर अन्वायाम स्नायुपेशींचा झालेला असतो. वरील शेवटचा थर शरीरासभोंवतीं सारखा नसल्यामुळें व तो सात ठिकाणीं तुटलेला असल्यामुळें वरील थरांत सात अन्वायाम स्नायू आहेत असें वाटतें. शूक तयार करणारे, पिशवीसारखे, अनेकपेशीय पिंड शरीरपुटांतच असतात.

पचनेंद्रियव्यूह:- पचनेंद्रियनलिकेला तोंडापासून सुरवात होते व गुदद्वारांत तिचा शेवट होतो. तोंडाच्या वर वरच्या ओठाप्रमणें एक भाग पुढें आलेला असतो, त्याला पूर्वमुखवलय म्हणतात. व ज्या वलयांत तोंड असतें त्याला परिमुख वलय म्हणतात. तोंडाच्या आंत मुखक्रोड असतें. मुखक्रोडाचें पुट पातळ असतें व हा पचनेंद्रियनलिकेचा भाग तोंडांतून उलटा बाहेर काढतां येतो. मुखक्रोडाच्या विवराच्या मागील भागाला गलविवर म्हणतात. गलविवराचें पुट स्नायुमय व जाड असतें व तें स्नायूंनीं शरीरपुटाला जोडलेलें असतें. या स्नायूच्या आकुंचनानें या भागांतील पोकळी कमीजास्त करतां येते व सर्व गलविवराचा भाग मागेंपुढें खेंचतां येतो. गलविवराच्या मागें याची अन्ननलिका येते. अन्ननलिकेचा भाग ताणला जाण्यासारखा असतो. या अन्ननलिकेच्या भागांत वेळीं अवेळीं सांपडेल असें खाल्लेलें अन्न सांठवून ठेवण्यांत येतें. गलविवर व अन्ननलिका यांचीं पुटें पातळ असतात व प्रत्येक वलयांत हे भाग फुगलेले दिसतात, कारण वलयाच्या सांध्यावर पडदे असतात व त्या ठिकाणीं अन्ननलिकेला फुगतां येत नाहीं. अन्ननलिकेच्या शेवटीं या प्राण्याची अन्नपेषणी अथवा मंथिनी येते. या भागांत अन्ननलिकापुट फार जाड व टणक असून बाहेरुन हा भाग वाटाण्यासारखा दिसतो. या भागाच्या मागें आंत्राला सुरवात होते व त्याच्या शेवट परिगुदवलयांत होतो. या आंत्राला कांहीं जातींत बाजूला दोन अंध पिशव्या असतात. प्रत्येक वलयांतील आंत्राचा भाग अन्नामुळें फुगलेला आढळतो. हा प्राणी तोंडानें माती व तींत असलेले जीवजन्यच कुजके पदार्थ पोटांत घेतो. नंतर गलविवरांच्या पुटांत वगैरे जे कांहीं निस्पंदी पिंड असतात त्यांनीं तयार केलेले द्रव या अन्नांत मिळतात. आधाशासारख्या खाल्लेल्या मातींतील अन्नकण अन्नपेषणी अथवा मंथिनीपर्यंतच्या अन्ननलिकेच्या भागांत विरघळून वगैरे पचनालां तयार होतात. नंतर आंत्राच्या पुटातील पेशीकडून हा पक्वान्नरस शोषिला जातो. आंत्राचा किंवा आंतडयाचा शोषण करण्याचा अंतःपृष्ठभाग, पचनेंद्रियनलिकेचा व्यास न वाढतां वाढावा म्हणून आंत्राच्या आंतील कलेचा भाग चंद्राच्या कोरेप्रमाणें अनुविस्तर पातळींत वाढलेला दिसतो. शेवटीं अन्नकणाचें आंत्रात पचन होऊन शिल्लक राहिलेली माती गुदद्वारांतून बाहेर पडते. अशा त-हेनें भूकृमीच्या पचनेंद्रियनलिकेंतून बाहेर पडलेल्या पिठूळ मातीच्या राशी या प्राण्याच्या बिळाच्या तोंडांशी नेहमीं दिसतात.

रुधिरवाहिनाव्यूह:- या प्राण्याचें रुधिर तांबडें असतें व हा तांबुतपणा याच्या रुधिरद्रवांत रक्तरंजन  विरघळलेलें असल्यामुळें दिसतो. या प्राण्यांत पांच अन्वायाम रुधिरवाहिन्या असतात. व त्यांनां जोडणा-या अनुविस्तर केशवाहिन्या पुष्कळ असतात. अन्वायाम वाहिन्यातील एक पचनेंद्रियनलिकेच्यावर, दुसरी तिच्याखाली, तिसरी ज्ञानकंदांच्या सांखळीखालीं व दोन शेजारीं अशा असतात. प्रत्येक वलयांत दोन दोन प्रमाणें ऊर्ध्ववाहिनी अथवा पचनेंद्रियनलिकेवरील अधरवाहिनी म्हणजे पचनेंद्रियनलिकेखालची यांनीं तिच्या दोनहि बाजूंनीं जोडणा-या अनुविस्तर वाहिनीशाखा असतात. सातव्या ते बाराव्या वलयांतील मिळून ज्या दहा अनुविस्तर वाहिनीशाखा असतात त्या इतरांपेक्षां मोठया असतात व त्या नियमितरीतीनें संकोचविकास पावतात. त्यांच्या ह्या नियमित आकुंचन-प्रसरणांचा उपयोग रुधिराभिसरणाकडे होतो म्हणून त्यांनां भूकृमींचे रुधिराशय म्हणतात. शरीरांतील ऊर्ध्ववाहिनी ही आकुंचनशील आहे. याशिवाय वरील रुधिराशयांत आडवे पडदे असतात. या सर्वांमुळें ऊर्ध्ववाहिनींतून रक्त पूर्वटोंकाकडे वाहतें व तें रुधिराशयांतून अधरवाहिनींत शिरतें.

उत्सर्जनेंद्रियव्यूह:- भूकृमीचीं उत्सर्जनेंद्रियें प्रत्येक वलयांत पुष्कळ असतात. उत्सर्जनेंद्रिय ही एक  अति सूक्ष्मनलिका शरीरपुटाला आंतल्या बाजूनें चिकटलेली असते. या नळीच्या आंतल्या बाजूचें पेशी शरीरांतील नैट्रोजनयुक्त दुरुपयोगी पदार्थ अथवा निःसार या नळींत टाकतात. या नळीच्या आंतल्या बाजूचें तोंड फनेलसारखें असून तें शरीरगुहेंत उघडतें. बाहेरच्या बाजूनें ही नळी भूकृमीच्या पृष्ठभागावर उत्सर्जनीरंध्रानें उघडी असते. ब-याच वेळां ही नळी सरळ नसून तिला बरींच वांकणें असतात. या नळया शरीरपुटावर पुष्कळ असल्यामुळें आंतल्या बाजूला शरीरपुट गुळगुळीत नसून त्याच्यावर या नळयाचें जाळें पसरलेलें असतें.

ज्ञानेंद्रियव्यूह:- हा शीर्षज्ञानकंद अथवा मेंदु, त्यापासून निघालेल्या पार्श्वज्ञानरज्जूंची जोडी, आणि अधरतलावरील ज्ञानकंदांची सांखळी मिळून झालेला आहे. भूकृमीच्या तिस-या वलयांत पचनेंद्रियनलिकेच्यावर आडवा पांढुरका मेंदु किंवा शीर्षज्ञानकंद असतो. मध्यभागीं हा चिमलेला असल्यामुळें याचे दोन भाग पडतात. व याला द्विखंड म्हणतात. या आडव्या मेंदूच्या टोंकापासून दोन जाड शाखा फुटतात. त्या पार्श्वज्ञानरज्जू होत. ह्या पचनेंद्रियनलिकेच्या खालीं मध्यभागीं मिळून पुढें अन्वायाम ज्ञानकंदांची सांखळी तयार होते व ती शेवटच्या वलयापर्यंत जाते. खरोखर पाहूं गेलें तर वरील सांखळींत प्रत्येक भागांत दोन दोन प्रमाणें ज्ञानकंद व त्यांनां जोडणारीं दोन दोन यौगिकें आहेत; किंवा वरील गलयौगिकें अथवा पार्श्वरज्जू भूकृमीच्या शेवटपर्यंत जात असून त्या दोहोंनांहि प्रत्येक वलयांत एकेक ज्ञानकंदरुपी गांठ झालेली आहे. व ह्या दोन्हीहि सांखळया एके ठिकाणीं होऊन व जोडल्या जाऊन त्यांच्यापासून वरील ज्ञानकंदांची संयुक्त सांखळी झालेली आहे. साधारणतः यौगिकांत ज्ञानतंतू असतात व ज्ञानकंदांत ज्ञानपेशी असतात. मेंदू व ज्ञानकंदापासून पहिल्या तीन वलयांनां ज्ञानरज्जू पसरतात. या ज्ञानरज्जूंपैकीं कांहींचा संबंध शरीराच्या पृष्ठभागावरील ज्ञानग्राहकपेशींपर्यंत पोंचतो. गलयौगिकापासून गलभागावर पसरणा-या ज्ञानरज्जु फुटतात.

ज्ञानेंद्रियें:- या प्राण्याला जरी डोळे नाहींत तथापि प्रकाश व अंधकार यांच्यांतील फरक याला कळत असावा असें वाटतें. कारण काळोख्या रात्रीं हा प्राणी बिळाबाहेर फिरत असता याच्या पूर्वभागावर विजेचा झगझगीत प्रकाश पडला तर हा एकदम आपल्या बिळांत परत जातो असें दृष्टीस पडतें. याला कर्णेंद्रिय नसावें असें वाटतें. याला कांदा फार आवडतो असें आढळून आलें आहे. याला घ्राणेंद्रियें असावीं असें वाटतें.

जननेंद्रियव्यूह:- हा प्राणी उभयलिंगी असल्यामुळें पुंजननेंद्रियें व स्त्रीजननेंद्रियें हीं एकाच व्यक्तींत असतात. दोनहि प्रकारच्या जननेंद्रियांचीं अधरतलावर कमरपट्टयाच्या शेजारचीं तोंडें आपण आरंभींच पाहिलीं आहेत. नवव्या व दहाव्या, आणि दहाव्या व अकराव्या वलयांमधील पडद्यांनां मध्यभागीं पश्चिमपृष्ठावर दोन दोन अति सूक्ष्म पांढ-या गोळया अथवा मुष्क असतात; अर्थात शरीरगुहेच्या दहाव्या, अकराव्या खंडांत हे मुष्क चिकटलेले असतात; व या खंडांच्या पश्चिम पडद्यांनां दोन दोन सफेत पांढरीं फनेलें असतात. मुष्कांची वाढ भूकृमींच्या प्रौढावस्थेंत आरंभींच होते व शुक्रबीजजनक पेशी तयार होऊन ते लवकरच कमी कमी होत नाहींसे होतात. यामुळें    ब-याच प्राण्यांत ते लहान किंवा म्हातारे असल्यामुळें मुष्क सांपडत नाहींत. शुक्रबीजजनकपेशींपासून शुक्रबीज तयार होण्यासाठीं व या सर्वांचें रक्षण होण्यासाठीं दहाव्या व अकराव्या वलयांत यांच्यावर दोन शुक्रकोश बनलेले असतात. शुक्रकोश मोठे, विषमाकार व पालिविशिष्ट असून ते सर्व मिळून अन्ननलिकेसभोंवतीं त्या भागांत त्यांचें एक पांढरें आच्छादन होतें. वर जी आतां चार फनेलें सांगितलीं तीं तितक्याच शुक्रस्त्रोतसांचीं तोंडें आहेत. या फनेलांत पक्ष्म असतात. उजव्या व डाव्या बाजूंचे शुक्रस्त्रोतस बाराव्या वलयांत जोडून त्यांचें उजवें व डावें अशीं संयुक्त शुक्रस्त्रोतसें तयार होतात. नंतर दोनहि स्त्रोतसें मध्यभागीं ज्ञानरज्जूच्या शेजारीं सतराव्या वलयापर्यंत जातात व तेथें बाजूला सरुन अज्ञातकर्मपिंडाच्या स्त्रोतसाला मिळतात. अज्ञातकर्मपिंड हे सोळा ते वीस या वलयांत मोठया पांढ-या पालिविशिष्ट पिशव्या आहेत. वरील दोन स्त्रोतसांचा संगम झाला म्हणजे एक धनुष्याकार नळी तयार होते, ती अठराव्या वलयांतील त्या बाजूच्या पुंजननेंद्रियद्वाराला मिळते. अज्ञातकर्म पिंडाचा काय उपयोग होतो तें अजूनपर्यंत समजलेलें नाही.

स्त्रीविषयक इंद्रियांत दोन अंडाशय व त्यांचे स्त्रोतस यांचा समावेश होतो. अंडाशय तेराव्या वलयांत पूर्वपडद्याच्या मध्यभागीं अन्ननलिकेच्या खालीं द्राक्षाच्या घोंसासारखे लटकत असतात. अंडाशयांत निरनिराळया पक्वअपक्व स्थितीतील अंडीं पहाण्यास मिळतात. अंडस्त्रोतसाचीं कर्ण्यासारखीं तोंडें याच वलयांतील शरीरगुहेंत असतात. दोनहि स्त्रोतसें चवदाव्या वलयांत मिळून संयुक्तअंडस्त्रोतस होतो व त्याचें तोंड त्याच वलयाच्या अधरतलावर कमर पट्टयाजवळ असतें.

हे प्राणी जरी उभयलिंगी आहेत तथापि एका व्यक्तीच्या अंडयापासून गर्भ उत्पन्न होण्यास दुस-या व्यक्तीच्या शुक्रबीजाची जरुर लागते. यासाठीं दोन दोन प्रौढ प्राणी अधरतलानें एकमेकांनां चिकटतात; यावेळीं त्यांचीं तोंडें विरुध्द दिशेला असतात व प्राणी संभोगकालीं एकमेकांनां चिकटून राहावे म्हणून कमरपट्टयापासून एक चिकट पदार्थ उत्पन्न होतो. अशा रीतीनें दोन प्राणी एकमेकांनां चिकटले म्हणजे त्यांच्या अधरतलावर एक तात्पुरती खांच पडते व तींतून एका व्यक्तीचे शुक्रबीज दुस-या व्यक्तीच्या शुक्रपात्रांत साठविलें जातें, व नंतर दोनहि प्राणी अलग होतात, नंतर कमरपट्टयावर एख शांर्गीय सैल आवरण तयार होतें व तें पुढें पुढें ढकललें जातें. पहिल्यानें त्यांत अंडीं पडतात व पुढें शुक्रबीज शुक्रपात्रांतून पडतें. शेवटीं तें पूर्वटोंकावरुन बाहेर पडलें म्हणजे त्याचीं दोनहि तोंडें आवळून बंद होतात. या बीजकोशांत कांहीं शरीरपुटांतील स्त्रावक पेशींकडून पौष्टिक द्रव्येंहि पडतात. प्रत्येक बीजकोशांत एका गर्भाचीच वाढ होते व अंडें फुटून एक लहान भूकृमि बाहेर पडतो.

अनेक द्विधाकरणांनीं वाढ होऊन एक एकपुटी रिक्तमध्य गर्भ तयार होतो. नंतर लांब, दुपदरी गर्भ तयार होतो. या दुपदरी गर्भाच्या पेशींत फार मोठया दोन पेशी असतात व यांच्या द्विधाकरणांनीं वरील दोन पदरांच्यामध्यें दोन पेशींचे पट्टे तयार होतात, व याच्यापासून मध्यत्वचा किंवा शरीरपुटांतील मधला पदर तयार होतो. या स्थितींत गर्भ बीजकोशात स्वतंत्र होतो व तो मुद्दाम साठवून ठेविलेल्या अन्नावर ताव मारतो व त्याची वाढ झपाटयानें होते. वरील मध्यत्वचेचे पट्टे वाढतात व त्याचे आडवे भाग पडतात. या दोन पट्टयातील शेजारचे भाग वाढून आंत्रनळीवर एककडें होतें. हीं कडीं एकामागून एक आंत्र नळीवर वाढत जातात. हीं कडीं तयार होत असतांनां या मध्यत्वचेच्या भागात एक पोकळी उत्पन्न होते आणि आंत्रनळीच्या दोन बाजूंच्या पोकळया खालीं वर मिळून मध्यत्वचेच्या कडयाचे दोन भाग पडतात. त्यांपैकीं वरचा भाग शरीरपुटाला मिळतो व त्याच्यापासून शरीरपुटातील स्नायूंचे थर तयार होतात. आंतला भाग आंतरत्वचेला मिळून अन्ननलिकापुट तयार होतें. वरील मध्यत्वचेच्या भागापासून या पुटांतहि स्नायूंचे थर तयार होतात. अन्ननलिकापुटावर व शरीरपुटाच्या आंतल्या बाजूला एक पातळ चपटया पेशींचा थर किंवा कला असतात. मध्यत्वचेच्या कडयापासून प्रत्येकीं एकेक वलय तयार होतें व ह्या वलयात शरीरगुहेचा कप्पा असतो. नंतर हे कप्पे एकमेकांनां कांहीं भागांत जोडले जातात व शरीरांत एक अविभक्त शरीरगुहा तयार होते. पुढें अन्ननलिका व शरीरपुट यांची वाढ होऊन व त्यांत निरनिराळीं इंद्रियें व्यक्त होऊन गर्भाची वाढ पुरी होते.

हा प्राणी प्राणिसृष्टींत बराच उत्क्रांत असल्यामुळें याच्या शरीराचें कर्माच्या अनुरोधानें पचनेंद्रियें, रुधिरवाहिन्या, उत्सर्जनेंद्रियें इत्यादि भागांत वर्गीकरण करतां आलें. परंतु या प्राण्याचीं श्वसनेंद्रियें वरच्याइतकीं स्पष्ट नाहींत. रुधिरांतील वायूची अदलाबदल हवेशीं व्हावी यासाठीं स्वतंत्र इंद्रियें किंवा इंद्रियव्यूह नाहीं. बहुतकरुन शरीरपुटांत ही अदलाबदल होत असावी व ती सुलभ पढावी म्हणून शरीरावरील शांर्गींय पापुद्रयाच्या खालीं बाह्यत्वेच्या पेशीच्या एके-या थरांत मधून मधून केशवाहिन्यांचें जाळें असतें. या संघांतील प्राणी भूकृमीसारखे लांब असून त्यांच्या पृष्ठभागावर आडव्या खांचणी असतात. शरीरपुटांतील इंद्रियांत वरील खांचणीच्या अनुरोधानें भाग पडतात, व या संघांतील प्राणी म्हणजे वरील चक्रासारख्या शरीरखंडाची किंवा वलयांची माळ असें वाटतें. शारीरात्रगृहक प्राण्यांत एकच पोकळी असते परंतु या व अशा इतर उत्क्रांतसंघांत प्राण्यांच्या शरीरांत पचनेंद्रियनलिकाविवर व शरीरगुहा अशा दोन पोकळया असतात. गर्भविकास पावत असतां आंत्रगुहा बाहेरुन उत्पन्न झालेल्या मुखक्रोडाशीं व गुदक्रोडाशीं जोडली जाऊन पचनेंद्रियनलिकाविवर तयार होतें व शरीरगुहेची वाढ आंत्रगुहेनंतर मध्यत्वचेंत होते व तिला पृष्ठभागावर मोठीं तोडें नसतात परंतु प्रत्येक वलयांत बारीक बारीक रंध्रांतुन किंवा निरनिराळया नलिकांतून हिचा संबंध बाहेर पोंचतो. शारीरांत्रगुहक व वलयांकित किंवा इतर उत्क्रान्तसंघांत मुख्य फरक म्हणजे तीनपदरी किंवा त्रिपुटी गर्भ व निरनिराळया इन्द्रियांत दिसणारी संकीर्णता. उदाहरणार्थ पचनेंद्रियनलिकापुटांतील पेशींनां अन्न पचवून आपला व शरीरांतील इतर कामें करणा-या पेशींचा निर्वाह करावा लागतो. शरीरावरणांतील पेशींनां प्राणवायु मिळण्याला त्रास पडत नाहीं. तथापि अन्ननलिकापुटांतील वगैरे शरीरगुहेंतील निरनिराळया कामांत गुंतलेल्या पेशीसमुदायांनां किंवा धातूंनां प्राणवायूचा पुरवठा करणें भाग आहे. किंवा शरीरांतील निरनिराळे धातू आपापलें काम करीत असतां जे विषारी पदार्थ उत्पन्न होतात ते शरीराबाहेर टाकण्याची व्यवस्थाहि होणें अशक्य  असतें. शरीररुपी गिरणींतील पेशीरुपी मजुरांच्या उदरपोषणाची, त्यांनां कच्चा माल पुरविण्याची व त्यानीं तयार केलेला पक्का माल व आनुषंगिक द्रव्यांचा निकाल लावण्याची व झीज, तूट भरुन येण्याची बिनचूक व्यवस्था झाली नाहीं तर शरीररुपी गिरणीचा शेवट लागण्यास फार उशीर लागत नाहीं. वरील कामें करणारा एक प्रवाही पदार्थ अथवा रुधिर यांच्या शरीरांत असतें व त्याचें अभिसरण रुधिरवाहिन्या व केशवाहिन्या यांच्या मार्फत होऊन शरीरांतील प्रत्येक जिवंत मजुराला योग्य द्रव्यांचा पुरवठा होत असतो व त्यांनें उत्पन्न केलेल्या विषारी द्रव्यांचा निकालहि लाविला जातो. तसेंच शरीरांतली निरनिराळया भागांनां शरीरांतील किंवा शरीराबाहेरील पदार्थांच्यामुळें येणारे बरेवाईट अनुभव लक्षांत घेऊन स्वार्थासाठीं सर्व शरीराची किंवा शरीरांतील निरनिराळया भागांची, हालचालरुपी तोडगा किंवा प्रत्युत्तर ठरविणारीं मध्यवर्ती ज्ञानेंद्रियें किंवा ज्ञानकंद व मेंदु यांची रुद्राक्षाच्या माळेसारखी माळ पूर्वटोंकापासून पश्चिम टोकांपर्यंत या प्राण्यांच्या शरीरांत पसरलेली असते.

या संघांतील शूकपादवर्गांत भूकृमीशिवाय इतर पुष्कळ प्राणी आहेत. या वर्गांतील प्राण्यांनां वलयें अथवा शरीरखंडें पुष्कळ असतात व या प्राण्याचे शूक शरीरपुटांत पिशवीसारख्या अनेकपेशीय पिंडांत तयार होतात. शूकपादवर्गाचे बहुशूक व नियमितशूक असे दोन प्रवर्ग आहेत. बहुशूक प्राण्यांत स्त्रीपुरुष हा भेद आहे, व प्रत्येक वलयाच्या दोन्ही बाजूंनां एकेक कृमिपाद असतात. कृमिपाद हा शरीरपुटावरील उंचवटा असून त्याच्यावर शूककूर्च, स्पर्शप्रसर व फणीसारखे कल्ले असतात. पूर्वमुखवलय फार मोठें असतें व त्यावर कांहीं काळे डोळे व बाजूला स्पर्शप्रसर असतात. यांच्या डोळयांतील रचना कमी जास्त फरकानें मनुष्यांच्या डोळयासारखीच असते. या प्रवर्गांतले बहुतेक प्राणी समुद्रांत राहतात. या प्रवर्गांत गर्भाची थोडी वाढ झाल्यावर, एक वाटोळें स्वैर डिंभ तयार होतें. या डिंभाच्या मध्यभागीं शरीरासभोंवार शनीच्या वलयासारखें कडें असतें व त्यावर पक्ष्म असतात. या पक्ष्मल कडयाच्या एका बाजूला पृष्ठभागाच्या मध्यभागीं एक पक्ष्मांचा कूर्च असतो व दुसर्याथ बाजूला मुखक्रोडाचा खळगा असतो. या स्वैर बालकाचें रुपान्तर वरील बहुशूक प्राण्यांत होतें. नियमित शूकगणांत प्राणी उभयलिंगी असतात व या प्राण्यांची बहुतेक कल्पना भूकृमींच्या वर्णनावरुन येईल.

या वर्गांतील बहुतेक प्राणी समुद्रकिना-यावर किंवा पाणथळ जमिनींत भोंकें पाडून राहतात. कांहीं प्राण्यांनां भोंकें पाडून राहण्यासाठीं शिंपाहि चालतात. बरेच प्राणी अन्नासाठीं किंवा संरक्षणासाठीं दुस-या मोठया प्राण्यांच्या आश्रयास राहतात व त्यांचे भोजनभाऊ बनतात. जमिनींत राहणारे मुख्यतः भूकृमीसारखे प्राणी शेतकीच्या व लहान लहान वनस्पतींच्या दृष्टीनें फार महत्वाची कामगिरी करतात. असंख्य प्राण्यांच्या भोकांनीं जमीन पोकळ होते व वनस्पतींच्या मुळांनां विस्तार पावण्याला सुलभ जातें; खालची निभेंळ माती याच्या पचनेंद्रियनलिकेच्या द्वारें वर येते व मुळांनां नवीन नवीन खनिज द्रव्यांचा पुरवठा होतो. याशिवाय या असंख्य प्राण्यांचीं प्रेतें तेथेंच कुजून जीवजन्य खताचा पुरवठा होतो तो निराळाच. यामुळें गवतासारख्या लहान सहान वनस्पतींच्या मुळांनां निसर्गजमीन नांगरुन देतो व खताचा पुरवठाहि निसर्गतःच दरसाल होतो.

कोंकणांत गवताळ जमिनींत कांहीं वर्षांच्या अंतरानें भूकृमींचीं इतकी वाढ होते कीं, गवताच्या प्रत्येक काडीभोंवतीं या प्राण्याच्या विष्टेचे पुंजके चिकटतात व गवतहि कमी वाढूं लागतें. बहुतकरुन गवताचें बीं यांच्या भक्ष्यस्थानीं पडत असावें. अशा वेळीं जमीन नांगरुन भाजून गवताचा व भूकृमींच्या अंडयांचा नाश शेतकरी करतात व नागलीसारखीं पिकें काढतात. पुढें ही जमीन दोन तीन वर्षे पडीत टाकिली म्हणजे पूर्ववत् गवत व भूकृमि यांची वाढ होते.

याच संघांत जतुका अथवा जळवांचा समावेश होतो. रक्त शोषून घेणार्‍या या हिरवट काळसर जळवा तळयांत किंवा चिखलांत सांपडतात. जळूचा अधरतल पिंवळट असतो. शरीर वरुन खालीं चपटें असतें व तें लांब किंवा आंखूड फार होतें. शरीरावरील छिद्रें व आंतील इंद्रियांची रचना यांचा विचार करतां या प्राण्याच्या शरीराचीं तेवीस वलयें पडतात. पूर्व व पश्चिम टोंकानें या प्राण्याला चिकटतां येतें व त्या ठिकाणीं अधरतलावर पेल्यासारखीं प्रलंब गात्रें अथवा चोषणचकत्या असतात. पूर्वभागचें प्रलंबगात्र लांबट असतें व त्याच्या मध्यभागीं या प्राण्याचें मुख असतें. आपलें शरीर लांब करुन एखाद्या वस्तूला हा प्राणी आपलें पूर्वटोंक प्रलंबगात्रानें चिकटवितो. नंतर मागलें प्रलंबगात्र सैल करुन व शरीर आंखूड करुन व दुमडून मागला प्रलंब पूर्वटोंकाजवळ येतो व तेथें तो चिकटवून पूर्ववत् शरीर लांब करुन पूर्वटोंक पुढें पुढें करितो. या गतीला जतुकागति म्हणतात व ही ब-याच किडयांत आढळते. या प्राण्याला शूक किंवा कृमिपाद नसतात. गुरुद्वार पश्चिमप्रलंबाच्या अलीकडील वलयाच्या ऊर्ध्वतलावर मध्यभागीं असतें. या प्राण्याच्या शरीरांत अन्नविवराशिवाय रिकामी जागा नसते. कारण शरीरगुहेच्या जागेंत एक सरसपेशींचा धातु किंवा सरससंयोजक धातु भरलेला असतो. बहुतेक वलयांत दोन दोन प्रमाणें उत्सर्जनी नलिका असतात. व त्या आंतल्या बाजूनें बंद असतात. मुख्य रुधिरवाहिन्या दोन असून त्या पचनेंद्रियनलिकेच्या बाजूला असतात. शरीरात पुष्कळ ठिकाणीं रुधिरमार्ग असतात. परंतु रुधिरमार्गाला रुधिरवाहिनीसारखें स्नायुमय पुट नसतें. व त्यांचें आकुंचन किंवा प्रसरण होत नाहीं. भूकृमीसारखें या प्राण्याचें रुधिर तांबडें असतें.

या प्राण्यांच्या मुखक्रोडांत तीन दाढा असतात. प्रत्येक दाढ पचनेंद्रियनलिकापुटाला चिकटलेली असते व ती आकारानें गोलार्धासारखी असते. दाढेवर शांर्गीय पापुद्रा असतो व त्याला सर्व पृष्ठभागावर दांते असतात. या तीनहि दाढा मागेंपुढें करतां येतात. हा प्राणी एकाद्या जागीं चावला तर त्र्यग्र अथवा त्रिकोनी जखम पडते. मुखक्रोडामागें गलविवर येतें. या भागांत नलिकापुट जाड असतें व बाजूला लालापिंड असतात. यानंतर अन्नाशयरुपी अन्नलिकेचा आरंभ होतो. अन्नाशय फार मोठा असून त्याच्या प्रत्येक बाजूला पिशव्या असतात. शेवटची पिशवी फार लांब असून ती शेवटच्या वलयांपर्यंत पोंचते. अन्नाशय रक्तानें भरलेला असला म्हणजे शरीर लांब होतें व शरीरांतील बहुतेक सर्व जागा आमाशयानें व्यापलेली असते. एकदां याचें पोट रक्तानें भरलें म्हणजे बरेच दिवस या प्राण्याला रक्तरुपी अन्नाची जरुर नाहीं. या मुदतींत या प्राण्याच्या लाळेच्या रासायनिक कार्यामुळें अन्नाशयांत वरील रक्त हळूहळू उतरतें व त्या ठिकाणीं त्याचा रंग हिरवा होतो. आमाशयाचें पुट मऊ, आकुंचनशील असल्यामुळें रिकामें आमाशय चिंबून जातें. आमाशय लहानशा आकुंचन पावलेल्या आंत्रांत अंतर्भूत होतें व आंत्राचा शेवट गुदामध्यें होऊन तें वर सांगितल्याप्रमाणें गुदद्वाराच्या बाहेर उघडतें.

हा प्राणी उभयलिंगी आहे. मुष्काच्या नऊ दहा जोडया असून प्रत्येक मुष्काशय पांढरा, जोंधळयाएवढा असतो. प्रत्येक बाजूला सर्व मुष्कांनां जोडणारें एक अन्वायाम शुक्रस्त्रोतस असतें व त्या दोहोंची दहाव्या वलयांत बरीच गुंतागुंत होते व दोनहि स्त्रोतसें मिळून एक स्नायुमय नळी तयार होते व तिचें तोंड अकराव्या वलयाच्या अधरतलावर मध्यभागीं असतें. ही नळी उलट करुन शरीराबाहेर काढतां येते व संभोगकालीं तिचा उपयोग शिश्नासारखा होतो. या नळीच्या आरंभीं पुष्कळ स्त्रावकपिंड असतात व त्यांचा द्रव शुक्रबीजांशीं मिसळून त्यांचीं पुडकीं बनतात. अंडाशयाची एक जोडी अकराव्या वलयांत असते व तिचीं दोन स्त्रोतसें  एकत्र होऊन संयुक्त अंडस्त्रोतसाचें तोंड बाराव्या वलयाच्या अधरतलावर असतें.

पर्णकृमि, यष्ठिकृमि, चक्रधर कृमि, मृदुकायकृमि आणि वलयांकित कृमि या सर्वांचा समावेश एकाच कृमिसंघांत पूर्वी करीत असत. परंतु या निरनिराळया कृमींची माहिती जसजशी गोळा होत गेली तसतसे त्यांच्या मूळ रचनेंतील फरक लक्षांत येऊन या प्रत्येकाचा एकेक संघ बनविण्यांत आला आहे. वरील कृमींच्या नामाभिधानावरुन त्यांच्या आकारभेदांची किंचित कल्पना येईल, परंतु त्यांच्यासंबंधीं येथें जास्त लिहितां येत नाहीं. यापैकीं कांहीं परान्नपुष्ट असून इतके आळशी बनतात कीं, त्यांच्या शरीरांत पचनेंद्रियेंहि नसतात. हिंवतापाच्या जंतूंप्रमाणें निरनिराळया प्राण्यांच्या शरीरांत निरनिराळया वयांत काहीं प्राणी राहतात व हीं स्थित्यंतरें करण्यामध्यें पुष्कळ जीवांचा निरनिराळया कारणांनीं नाश होत असल्यामुळें कांहीं जातीचे कृमी प्रत्येकीं अगणित गर्भ तयार करतात व जननेंद्रियांची वाढ त्यांच्यांत फार होते. कालवे, मासे, बेडूक, निरनिराळे चतुष्पाद प्राणी यांच्या पोटांत आढळणारे कृमी याच संघांत येतात. कांहीं स्वैर असून नदीनाल्यांत किंवा पाणथळ जमिनींत आढळतात. चक्रधर संघांतील प्राणी घाणेरडया पाण्यांत असतात व सूक्ष्मदर्शनाखालीं त्यांनां पाहाण्यांत फारच मौज वाटते. (लेखक एस्. एच्. लेले.)

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .