प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

वल्लभाचार्य (१४७९-१५३१):- पुष्टिमार्गाचा संस्थापक. तेलगु प्रांतांतील कांकरव गांवीं राहणा-या लक्ष्मणभट्ट नांवाच्या कृष्णयजुर्वेद पढलेल्या एका तेलंगीं ब्राह्मणाचा हा मुलगा होय. लक्ष्मणभट्टाच्या बायकोचें नांव 'एलमागार'; तिला घेऊन तो काशीयात्रेस जात असतां वाटेंतच विक्रम सं. १५३५(सन १४७९) वैशाख वद्य एकादशीस ती प्रसूत होऊन तिला मुलगा झाला; या मुलाचें नांव वलभ्भ ठेवलें. वलभ्भानें कांहीं दिवस वृंदावनास व कांहीं दिवस मथुरेस वसती केली. या सुमारास गौवर्धनपर्वतावर देवदमन (श्रीनाथजी) या नांवानें गोपाळकृष्ण प्रगट झाले असें सांगतात. 'त्या ठिकाणीं येऊन माझें दर्शन घे' असें वल्लभास देवानें स्वप्नांत येऊन सांगितलें; व आणखीहि त्यास कळविलें कीं, कृष्णावतारीं गोकुळांतील माझे संवगडी असलेले गोप पुन्हां या युगांत अवतीर्ण झाले आहेत व त्यांच्याशीं मला पुन्हा पहिल्याप्रमाणे क्रीडा करतां यावी तदर्थ त्यांस माझे भक्त अगर उपासक बनवा.' त्याप्रमाणें तेथें जाऊन वल्लभानें श्रीनाथजीचें दर्शन घेतलें. तेव्हां श्रीनाथजीनें, 'माझें एक देवालय बांधून माझ्या उपासनेचा प्रसार कर' अशी आज्ञा केली. तेव्हां वल्लभानें पुष्टिमार्गाची स्थापना केली; व श्रीनाथजी या नांवानें प्रसिध्द असलेल्या  कृष्णाच्या एका विशिष्ट अवताराशीं आपल्या पंथाची सांगड घालून दिली. वल्लभाच्या पूर्वीच्या  काळीं होऊन गेलेला ग्रंथकार जो विष्णुस्वामिन् त्याचा व वल्लभाचा वेदान्तविषयक सिद्धान्त  एकच (अगर एकाचं तर्‍हेचा) आहे.

वल्लभाचार्यांचा (त्याप्रमाणें विष्णुस्वामीचाहि) वेदान्तविषयक सिद्धांत पुढीलप्रमाणें आहे:-  आदिपुरुष (अगर आत्मा) एकटा असल्यामुळें त्यास बरें वाटेना; व नानारुपें धारण करावीं अशी इच्छा झाल्यावरुन तो स्वतःच अचेतन सृष्टि, जीव (जीवात्मा) व अन्तर्यामिन् आत्मा झाला. “यथा सुदीप्तात्पावकाद्विष्फुलिङ्गा: सहस्त्रश: प्रभवन्ते सरुपा: तथा”  याप्रमाणें हें सर्व उत्पन्न झालें असून त्याचेच अंश होत. त्यानें आपल्या अतर्क्य शक्तीनें चित् व आनंद हे दोन गुण पहिल्यांत (म्हणजे अचेतनसृष्टींत) इंद्रियांनां अगोचर किंवा अदृश्य अशा स्वरुपांत ठेवले; दुसर्‍यांत आनंद अगोचर स्वरुपांत ठेवला; व तिसर्‍याच्या ठायीं सर्वच गुण इंद्रियगोचर किंवा दृश्य अशा  स्वरुपांत ठेवले आहेत. शुध्द ब्रह्माच्या ठायीं मुख्यत्वेंकरुन आनंदच व्यक्त स्वरुपांत ठेवला आहे. वल्लभानें आपल्या पंथाच्या प्रसारार्थ संस्कृत भाषेंत बरेच ग्रंथ रचिले आहेत; त्यांपैकीं तीन मुख्य म्हणजे वेदांतसूत्र-अनुभाष्य, सुबोधिनी व तत्त्वदीपनिबंध. त्याच्या १७ लहान पद्यांपैकीं  सिद्धांतरहस्य सुप्रसिध्द आहे. वल्लभाचे चार व त्याच्या मुलाचे चार असे आठ शिष्य ब्रजप्रदेशांत  (मथुरा-वृंदावनाचा आसमंत भाग) रहात असून त्यांनां अष्टछाप अशी संज्ञा आहे. त्यांनीं व्रज किंवा हिंदी भाषेंत अनेक धार्मिक स्फुट कविता रचिल्या आहेत. कृष्णकथेवरील अत्यंत श्रृंगारिक वाङ्मयहि या पंथांत आहे. त्यांपैकीं गोकुळनाथाचे 'चौरासी वार्ता' (१५५१) आणि ब्रजवासी दासाचे  'ब्रजविलास' (१७४३) हीं मुख्य आहेत.

पुष्टिमार्ग:- पुष्टि म्हणजे ईश्वरी अनुग्रह; साधारण किंवा ऐहिक व अनन्यसाधारण किंवा परालौकिक फलांवरुन पुष्टीचें स्वरुप ठरवितां येतें. महत्संकटाचें निवारण करुन ईश्वरप्राप्ति करुन देते ती महापुष्टि होय. धर्मार्थकामादि चारी पुरुषार्थ पुष्टीच्या योगानें साध्य करुन घेतां येतात. असाधारणपुष्टि भक्तीप्रत नेते व भक्ति ईश्वरप्राप्ति करुन देते; असाधारण किंवा विशिष्ट पुष्टीच्या योगानें उत्पन्न झालेल्या या भक्तीस “पुष्टिभक्ति”  म्हणतात. इतर सर्व टाकून देऊन फक्त ईश्वराची प्राप्ति करुन घ्यावी अशा प्रकारची मनाची प्रवृत्ति या पुष्टिभक्तीनें होते. ही पुष्टिभक्ति चतुर्विध म्हणजे ४ प्रकारची आहे : (१) प्रवाहपुष्टिभक्ति, (२) मर्यादापुष्टिभक्ति, (३) पुष्टि-पुष्टिभक्ति, (४) शुध्द-पुष्टिभक्ति. या सर्वांमधील पाय-या (अगर अवस्था) येणेप्रमाणें:- (१) प्रेम, (२) आसक्ति व (३)  व्यसन. शेवटची पायरी जी व्यसन ती पहिल्या दोहोंचीच परिणतावस्था असून मोक्षाप्रत नेते. ज्यांच्याठायीं भक्ति या कोटीपर्यंत पोहोंचलेली असते ते मुक्तीच्या चारी प्रकारांस धिक्कारुन अखंड हरिसेवेचाच मार्ग पत्करतात. एकदां श्रीहरीचेंच व्यसन लागलें म्हणजे तो सर्वत्र अगर प्रत्येक पदार्थाच्या ठायीं दिसूं लागतो व म्हणूनच प्रत्येक पदार्थाविषयीं आवड उत्पन्न होऊन तो पदार्थ व मी एकच अशी भक्ताची भावना होते. येणेंप्रमाणें अखिल अंतर्बाह्य विश्वांत पुरुषोत्तम भरला आहे असें भक्तास कळून येतें. अशा प्रकारच्या भक्तीचें अखेरचें फळ म्हणजे श्रीकृष्णाशीं नित्य क्रिडा करावयास मिळणें हें होय. गाई, पशु, पक्षी, वृक्ष, नद्या वगैरें रुपें धारण करुन भक्तजन ह्या लीलांत सामील होऊन पुरुषोत्तमाच्या सहवासाचें सुख अनुभवतात, यामुळें त्यास अमित अगर अमर्याद आनंद प्राप्त होतो. व्रज व वृंदावन येथें श्रीकृष्णावतारीं केलेल्या लीलांप्रमाणेंच ह्या लीला असतात. कांहीं भक्त स्वर्गीय वृंदावनांत गोपगोपी होऊन लीलांमध्यें भाग घेतात. जे मर्यादाभक्त आहेत त्यांस सायुज्यमुक्ति मिळते; म्हणजे ते श्रीहरिरुप होतात. पुष्टिभक्त सायुज्यमुक्तीचा धिक्कार करुन श्रीहरीच्या लीलांत सामील व्हावयास पाहतात.

या पंथांतील लोकांचा कृष्णभक्तीचा रोजचा कार्यक्रम असा (१) घंटानाद, (२)  शंखनाद, (३) ठाकूरजींचे उद्बोधन व ठाकुरजीस फराळ अर्पण करणें, (४) आरती, (५) स्नान, (६) पोषाख, (७) गोपीवल्लभअन्न (?), (८) गाई चारावयास नेणें, (९) दुपारचें भोजन, (१०) आरती, (११) अनोसर अगर अनवसर (वामकुक्षी; यावेळीं देवाचें दर्शन व्हावयाचें नाहीं.), (१२) समारोप (?), (१३) रात्रीचें जेवण, व (१४) झोंप. वर सांगितलेल्या गोष्टींखेरीज या पंथाचे लोक नानातर्‍हेच्या मेजवान्या व उत्सवहि करतात; यांपैकीं कांहीं वल्लभ्भाचार्य, त्याचा मुलगा, व त्याचे नातू यांच्या सन्मानार्थ असतात. वल्लभाचार्यांचें व त्याच्या वंशजांचें या पंथाच्या लोकांवर बरेंच वर्चस्व असलेलें दिसून येतें; या पंथाचे जे गुरु आहेत त्यांच्या बाबतींत पाहता सदर वर्चस्व पूर्वापार  चालत आलेलें दिसतें; याचें कारण असें आहे कीं, यांनां स्वतंत्र रीतीनें एखाद्या सार्वजनिक देवळांत देवाची पूजा करतां येत नाहीं तर गुरु अगर महाराज यांच्याच देवळांत अगर मठांत जाऊन देवाची पूजा करावी लागते. तेव्हां या पंथाच्या लोकांनां आपल्या गुरुच्या देवळांत नियमानें जावेंच लागतें. या पंथाचे अनुयायी म्हणजे मुख्यत्वेंकरुन गुजराथ, राजपुतान्यापासून तों उत्तरेस मथुरा या प्रदेशांतील व्यापारी वर्गच होत. आपणाजवळ जें काय असेल तें सर्व गुरुस अर्पण करावें या मुख्य तत्त्वाचा उपदेश या पंथाच्या लोकांस केला जातो; त्यामुळें हें तत्त्व नेहमीं अगदीं परमावधीस नेलें जातें. वर भक्तीचे जे प्रकार सांगितले त्यांत ऐहिक वस्तूविषयीं विरक्तता फक्त एकांतच सांगितली आहे. शुध्द पुष्टिभक्ति त्याचप्रमाणें इतर भक्तीसुद्धां ईश्वराच्या अनुग्रहानेंच मनुष्याच्या अंतःकरणांत उदित होतात. शुद्ध पुष्टिभक्तीस तर अखेर व्यसनाचेंच स्वरुप येतें. संसारांत राहुनहि या ईश्वरी अनुग्रहाचा अनुभव घेतां येतो. मर्यादापुष्टिभक्तींत इंद्रियांचा अगर कामक्रोधादि षडरिपुंचा निग्रह येतो; पण ही भक्ति, गोलोकामध्यें श्रीहरीच्या नित्य लीलांत सामील होतां येणें या अखेरच्या ध्येयाप्रत नेत नाहीं. नाना तर्‍हेच्या लीलांत रममाण होणें हें या पंथाच्या मताचें सार आहेसें दिसतें; व त्याचा या पंथांतील लोकांच्या नित्य व्यवहारांवर परिणाम व्हावा हें साहजिक आहे. कडक नैतिक आचरण पाळून अखेर संसारांतील उपयोगाविषयीं उदासीन होऊन प्रपन्न होणें अगर ईश्वरास शरण जाणें हें या पंथाचें लक्षण आहेसें दिसत नाहीं. कारण रासमंडळें व गोपीलीला करणें हें या पंथाचें मुख्य लक्षण होऊन बसलें आहे. स्वतः वल्लभ्भाचार्य व त्याचप्रमाणें त्यांच्या मागून गादीवर बसलेले व या पंथाचे गुरु हे सर्व विवाहितच असतात व आपल्या अनुयायांप्रमाणेंच हे सांसारिक (संसारांत गुरुफटलेले) असतात असें म्हणावयास हरकत नाहीं. यावरुन असें दिसून येईल, कीं, वैष्णवधर्माचें राधाकृष्णभक्तीचें जें उपांग, त्यावरच वल्लभपंथाचा सर्व भर आहे. या पंथाचें परम दैवत म्हणजे गोकुळांतील पोरचेष्टा करणारा कृष्ण होय; व केवळ उत्तरकालीन ग्रंथांतच जिचा उल्लेख केला आहे अशी राधा (हिलाच पुढील काळांत कृष्णाची कायमची सखी बनविण्यांत आलें) ही अत्यंत भक्तीचा विषय होय. या राधाकृष्णास नारायणाच्या अगर विष्णूच्या वैकुंठाच्याहि वरचा असा एख लोक रहावयास दिला असून त्यास गोलोक म्हणतात. या लोकाप्रत जाऊन श्रीकृष्णाच्या नित्य लीलांत सामील होणें हें मनुष्याचें अगदीं श्रेष्ठ ध्येय मानलें आहे.

या पंथांतील महाराजांमुळें पंथीयांत बराच अनाचार माजला. गुरु किंवा महाराज हा केवळ कृष्णरुप मानून त्याची निस्सीम भक्ति करावयाची व ती करतांना सामाजिक नीतीकडे किंवा शुद्ध आचरणाकडेहि पहावयाचें नाहीं या तत्त्वामुळें पंथाची अवनति होणें स्वाभाविक होतें. कुमारिकांनीं व विवाहित स्त्रियांनीं या महाराजांची वेळीं अवेळीं एकांतांत वाटेल ती सेवा करावयाची व ती करण्यास त्यांच्या पालकांनीं त्यांनां भाग पाडावयाचें म्हणजे उघड उघड त्यांनां कुमार्गांकडे जावयाला सांगणें होय. या गोष्टींमुळें पंथांतील सुधारलेल्या माणसांची महाराजंवरची भक्ति उडणें साहजिकच होतें. गेल्या शतकाच्या मध्यापासून वर्तमानपत्रांतून महाराजांवर हल्ले होऊं लागले व कोर्टांतहि त्यांनां खेंचून त्यांचे अनाचार समाजाच्या नजरेस आणण्यांत आले. तेव्हां सध्यां या गुरुभक्तीचें स्तोम कमी झालें आहे. तथापि अद्यापहि भाटिया लोकांत वल्लभाचार्य महाराजांस  स्त्रियांत वावरण्यास बरीच मोकळीक आहे. (भांडारकर-शौनिझम, वैष्णविझम इ; मोनियर-विल्यम्स-ब्रॅह्मॅनिझम अँड हिंदुइझम; ए हिस्टरी ऑफ दि सेक्ट ऑफ महाराज ऑर वल्लभाचार्याज(लंडन १८६५).

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .