प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

वल्लभीचा मैत्रकवंश:- वल्लभीचें राज्य प्राचीन सौराष्ट्र देशांत (हल्लींचा काठेवाड) मोडत असे. हें  जुनें वल्लभीनगर अलीकडे सांपडलें असून तें भावनगरच्या वायव्येस कांहीं मैलांवर आहे. तेथील  राजा ध्रुवसेन नांवाचा क्षत्रिय होता व तो कनोजाधिपति सार्वभौम हर्षराजाचा जांवई होता. वल्लभी  राजे मैत्रक वंशीय भट्टार्काचे वंश होते असें दिसतें. मैत्रक शब्दांतील मित्र म्हणजे सूर्य, आणि मित्र हें मिहिराचें रुपान्तर असा कोटिक्रम लढवून पाश्चात्य पंडितांनीं या मैत्रकांनां परदेशीय महिर ठरविलें आहे. पण वस्तुतः मौखरी, चालुक्य, पल्लव इत्यादि नांवांप्रमाणें मैत्रक हेंहि कुलनामच आहे. हर्षाच्या काळीं वल्लभीचे राजे म्हणजे उत्तम क्षत्रिय होते असा समज होता. खुद्द हर्षानें आपली कन्या वल्लभी राजाला दिली होती. तत्कालीन क्षत्रिय राजे राज्यपदारुढ वैश्यांच्या कन्यांशीं विवाह करीत आणि जातिदृष्टया क्षत्रियांहून कमी मानलेले हे वैश्य आपल्या मुली क्षत्रिय घराण्यांत द्यावयास फार उत्सुक असत. म्हणून हर्षानें आपली कन्या जी वल्लभीच्या ध्रुवसेनाला  दिली ती त्याकाळीं तें घराणें उत्तम क्षत्रियांपैकीं मानिलेलें असल्यामुळेंच दिली. भट्टार्क यास ताम्रलेखांत सेनापति म्हटलेलें आहे. तो गुप्त सम्राटाच्या सैन्यांतील एक सरदार होता. पुढें जेव्हां गुप्त साम्राज्य नाममात्र राहिलें तेव्हां स्वाभाविकपणें तो वल्लभीच्या जहागिरीचा स्वतंत्र राजा  बनला, आणि पूर्वीपासून चालत आलेलें सेनापतीचें नांव त्यानें बहुमानास्पद म्हणून कायम ठेविलें. वल्लभी घराणें मूळ गुप्ताचें मांडलिक असल्यामुळें सौराष्ट्रांत चालू असलेला गुप्त शकच त्यांनीं  घेतला.त्यांच्या सर्व दानलेखांवरील मुद्रा एकसारखीच असून तींत बैलाच्या चित्राखालीं 'श्री भटाक्क’  असा शब्द आहे.

भट्टार्काला चार पुत्र असून ते सर्व क्रमाक्रमानें सिंहासनारुढ झाले. त्यांचीं नांवें धरसेन, द्रोणसिंह, ध्रुवसेन आणि धरपट्ट अशीं होतीं. यांपैकीं धरसेनाला सेनापति हीच पदवी असून द्रोणसिंहाला महाराज आणि 'चक्रवर्तीनें सिंहासनाधिष्ठित केलेला' अशीं विशेषणें लाविलेलीं आहेत. पहिले पहिले वल्लभी राजे गुप्त राजांनां आपले चक्रवर्ती समजत पण गुप्तसाम्राज्य लयास गेल्यावर मात्र ते  आपणांस महाराजधिराज म्हणवूं लागले.ध्रुवसेनानें बहुधां इसवी सन ५२६ ते ५३५ पर्यंत राज्य केलें. धरपट्ट हा त्याच्या मागून राज्यपदारुढ झाला. धरपट्टाचा पुत्र गुहसेन (५३९ ते ५६९) याचे तीन ताम्रपट व एक शिलालेख सांपडला आहे, त्यांवरुन  हाच प्रथम स्वतंत्र राजा झाला असें  दिसतें. गुहसेनाच्या मागून त्याचा पुत्र धरसेन दुसरा हा गादीवर आला. याचे पांच दानलेख सांपडले आहेत. त्यापैकीं दोहोंत त्याला महासामन्त अशी पदवी आहे. धरसेनानें साधारणपणें ५६९ ते ५८९ पर्यंत राज्य केल्यावर त्याचा मुलगा शिलादित्य सिंहासनारुढ झाला. त्याला परममाहेश्वर असें विशेषण लाविलेलें आहे. तथापि बुद्धभिक्षूंनां देखील त्यानें देणग्या दिल्या होत्या. त्यानें  जवळ जवळ ६०९ पर्यंत राज्य केलें. नंतर त्याचा भाऊ खरग्रह यानें ६१५ पर्यंत राज्य केलें. त्याच्या मागें त्याचा पुत्र धरसेन तिसरा (६२० पर्यंत) व त्याचा भाऊ द्वितीय ध्रुवसेन (६४० पर्यंत)  हे राजे झाले. हर्षाला दिग्विजयांत साहाय्य करणारा त्याचा सुप्रसिद्ध जांवई जो ध्रुवभट तोच हा होय. त्याच्या पश्चात त्याचा पुत्र धरसेन (चवथा) राज्यपदावर आला. हा सर्व वल्लभी राजांत बलिष्ठ होता असें दिसतें गुप्तशक ३३० (सन ६४९) मधील त्याच्या एका ताम्रपटांत महाराजाधिराज इत्यादि मोठमोठया पदव्याबरोबर चक्रवर्ती पदवी देखील त्यानें धारण केल्याचें आढळतें पण त्याचे वंशज पुढें आपल्याला केवळ महाराजाधिराज एवढेंच म्हणवती. या धरसेनाच्या वेळीं वल्लभी  नगरींत भट्टिकवीनें आपलें सुप्रसिध्द भट्टिकाव्य लिहिलें, या चवथ्या धरसेनाला पुत्रसंतति नव्हती म्हणून त्याच्या जवळच्या नातलगांपैकीं एकजण तृतीय ध्रुवसेन हें नामाभिधान धारण करुन त्याच्या मागून राज्यावर बसला. त्यानें ६५० ते ६५६ पर्यंत राज्य केलें. त्याच्यानंतर  खरग्रह नांवाचा त्याचा मुलगा सिंहासनावर बसला. खरग्रहाच्या मागून त्याचा पुत्र शिलादित्य (तिसरा). यानें ६६६ ते ६७५ पर्यंत राज्य केलें. परमभट्टारक, महाराजाधिराज, व परमेश या पदव्या त्यानें धारण केल्या होत्या आणि पुढील राजांनींहि त्या आपल्याला चालू केल्या.  त्याचप्रमाणे शिलादित्य हें नांवहि यापुढें वल्लभी राजांचें टोपण नांव बनून गेलें, व चालुक्य राजांनां जसें वल्लभ म्हणत तसें वल्लभी राजांनां शिलादित्य म्हणूं लागले. यापुढील राजे चवथा शिलादित्य, पांचवा शिलादित्य, सहावा व सातवा शिलादित्य याच नांवांनीं प्रसिध्द असून शेवटच्या सातव्या शिलादित्याला मात्र ध्रुवभट असें आणखी नांव होतें. यावेळीं वल्लभी घराणें व राज्य लयास गेलें. त्याची हकीगत अल्बेरुणीनें आपल्या ग्रंथांत दिली आहे. यानंतर वल्लभी शहर मोडकळीस आलेल्या स्थितींतच कांहीं शतकें जीव धरुन होतें आणि दहाव्या शतकांतील अरब लेखकांनीं त्याचा निर्देशहि केलेला आहे. शेवटीं कांहीं शतकांनीं वल्लभी शहराचाहि मागमूस नाहीसा होऊन त्याची जागा भावनगरनें घेतली. याप्रमाणें वल्लभी राजघराणें सन ५०९ पासून ७७५ पर्यंत अस्तित्वांत होतें. या पावणेतीनशें वर्षांत या राज्याखालीं उत्तरगुजराथ व पूर्व काठेवाड हे प्रांत सुखानें ऐश्वर्याचा उपभोग घेत होते. त्या वेळचे गुजराथचे लोक शांत स्वभावाचे, उद्योगप्रिय व काटकसरीनें वागणारे होते. व वल्ल्भी राजे देखील साधे, सरळमार्गी व निर्लोभी होते; प्रजेंत संतोष राखण्यासाठीं ते झटत असत. राज्याचा विस्तार मोठा नव्हता. तथापि त्यांत काठेवाडचा बराच भाग, गुजराथेंतील खेडा जिल्हा व पश्चिम माळव्यांतील कांहीं प्रदेश इतक्यांचा समावेश होत असे. वल्ल्भी घराण्याचा लय इतक्या लवकर होण्याचें कारण फितुरी, विश्वासघात व लोकांत बौद्ध धर्मांतील अहिंसेच्या तत्त्वाची अतिरिक्त आवड व त्यामुळें त्यांच्यातील बाणेदार क्षात्रवृत्तीचा अभाव हें होय. (स्मिथ-अर्ली हिस्टरी ऑफ इंडिया; वैद्य-म.भारत.भा.१)

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .