विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वाघेल राजे- गुजराथवर स. १२१५-९६ पर्यंत राज्य करणारे राजे (अनहिलपट्टण व गुजराथ पहा). मूळ पुरुष अरुणराज; त्याला कुमारपाल सोळंखी यानें जहागीर वगैरे दिली. त्याचा लवणप्रसाद व त्याचा वीरधवल; हे दोघे फार शूर असून त्यांनीं आपल्या राज्याचा विस्तार केला. वीरधवलानें महंमद घोरीचाहि पराभव केला. तो दयाळु, न्यायी, व सत्यप्रतिज्ञ होता. त्याच्या शवाबरोबर त्याच्या १८० सेवकांनीं अग्निकाष्ठें भक्षण केलीं. त्याचा पुत्र वीसलदेव; त्याच्या वीरमदेव या भावानें वीरमगांव वसविलें. वीसलच्या नंतर अर्जुनदेव, लवणदेव, सारंगदेव करणदेव (करणवाघेला पहा) हे राजे झाले. करणदेवाचें राज्य १२९६ सालीं अल्लाउद्दीन खिलजीनें बुडविलें (रासमाला)