प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

वाचनालयें- या लेखांत वाचनालयें (रीडिंग रुम) व ग्रंथालयें (लायब्ररी) या दोन्ही प्रकारच्या संस्थांचा समावेश केला आहे. सामान्यतः वाचनालय या शब्दानें वृत्तपत्रें व मासिकें हीं संस्थेच्या जागेंतच बसून वाचण्याची सोय दर्शविली जाते.तथापि मोठाल्या (ग्रंथालयांतून) संस्थेच्या जागेंतच बसून पुस्तकें वाचण्याची, टिपणें करुन घेण्याची वगैरे व्यवस्थाहि असते. ''ग्रंथालय'' म्हणजे छापील किंवा हस्तलिखित वाङ्मयाचा संग्रह असा आधुनिक अर्थ आहे, व या अर्थानें अशा प्रकारची संस्था बरीच सुधारलेली समाजस्थिति दर्शविते. पण हा शब्द व्यापक अर्थानें कोणत्याहि प्रकारच्या लिखाणांच्या मोठया संग्रहास लावल्यास असे संग्रह साधारणतः समाजसुधारणेला प्रारंभ झाला तेव्हांपासून अस्तित्वांत असले पाहिजेत. लिपि तयार होतांच तिचा लिहिण्याकडे किंवा खोदण्याकडे उपयोग, महत्वाच्या धार्मिक व राजकीय बाबी नमूद करुन ठेवण्याकरितां बहुधां केला गेला असावा. असलीं लिखाणें साहजिकच पवित्र ठिकाणीं सुरक्षित राहण्याचा संभव असल्यामुळें जगांतील अगदीं प्राचीन ग्रंथसंग्रह बहुधां देवालयांत असत, व त्यांचे व्यवस्थापक आचार्य (प्रीस्ट) असत. लेखन वाचनकलेचा प्रसार झाला नव्हता अशा काळांत हें काम म्हणजे ग्रंथ तयार करण्याचे कामहि आचार्यवर्गालाच करावें लागत असे. धार्मिक वाङ्मय लेखनिविष्ट होत असे, अशा काळांतहि कविता व पोवाडे यांच्या संग्रहाचें काम तोंडपाठ पध्दतीनेंच चालू असे.प्राचीन काळांतील लायब्र-या, सरकारी दफ्तरें याच स्वरुपांत असत. कला व शास्त्रें यांची बरीच वाढ झाल्यानंतर व स्वतंत्र लेखकवर्ग निर्माण झाल्यानंतर आधुनिक स्वरुपाचीं ग्रंथालयें अस्तित्वांत आलीं.

भारतीय, प्राचीन:- हिंदुस्थानांत पूर्वी वेद मुखोद्त करण्याची पध्दत होती. व लिखितपाठक अधम समजला जात असे तथापि शिष्य गुरुंच्या आश्रमांतून वेदाध्ययन करुन निघत असत तेच जणूंकाय चालतींबोलतीं वाचनालयें होत. भरतखंडांत लेखनकला बरीच प्राचीन असून वेद व इतर ज्ञानशाखा लेखनिविष्ट केल्या जात असत; तरी पण वेदलेखन कांहीं विस्तृत प्रमाणावर झालें नाहीं. वेदांची हस्तलिखित प्रत फार दुर्मिळ; वेद मुखोद्गत करण्याचीच पद्धत बरेच दिवस होती. या लिहिलेल्या वेदांचें व इतर शास्त्रीय ग्रंथांचें एक लहानमोठें पुस्तकालय प्रत्येक ब्राह्मणाच्या घरीं असे. ज्याच्या घरीं जितकें मोठें पुस्तकालय असे तितका तो जाडा पंडित समजला जात असे.

इ.स. ४०० मध्यें फाहिआन नांवाचा चिनी प्रवासी बौद्ध धर्मग्रंथ मिळविण्याकरितां भारतवर्षांत आला. त्यानें बरेंच बौद्ध ग्रंथांच्या नकला करुन नेल्या बुद्ध मेल्यानंतर लवकरच बौद्ध धर्मग्रंथ तयार झाले.

बौद्धांच्या प्रत्येक विहारांत पुस्तकालय असे. मुसुलमानांनीं जेव्हां आपला धुडगूस सुरु केला तेव्हां बौद्धांचीं मोठमोठीं ग्रंथालयें नष्ट झालीं. बंगाल्यावर स्वारी करणा-या बखत्यार खिलजीनें उदन्तपुरी विहारांतील वाचनालय नष्ट केलें. हें मुसुलमानांच्या इतिहासांत प्रसिध्द आहे. त्याचप्रमाणें मगध देशांतील नालंदा व विक्रमशील येथील पुस्तकालयांची स्थिति झाली. वंगदेशीय जगद्दल-विहार-वाचनालयहि असेंच नष्ट झालें. सुदैवानें बरेच बौद्ध भिक्षू ग्रंथ घेऊन त्या वेळीं नेपाळांत व तिबेटांत पळून गेले.त्यामुळें तेथें कांहीं बौद्धग्रंथ आज उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणें बंगाल्यांत राजा बलजळसेनाचीहि एक मोठी लायब्ररी होती. नेपाळांत मुसुलमानांचा उपद्रव झाला नाहीं. तेथील नेवार लोकांनीं पुष्कळ वर्षांपासून पुस्तकसंग्रह करण्याला सुरुवात केली होती. त्यांच्या पुस्तकालयांत १४००-१५०० वर्षांपूर्वीच्या पोथ्या सांपडतात. जेव्हां गुरखे लोकांनीं तो देश पादाक्रांत केला तेव्हां त्यांनीं नेवार राजांच्या ग्रंथालयांची लूट केली. त्यांतूनहि वांचलेले १५ हजार ग्रंथ आज उपलब्ध आहेत; त्यांपैकीं २००० पोथ्या ताडपत्रावर लिहिलेल्या आहेत. या बहुतकरुन मगध देशांतून पळालेल्या बौध्द भिक्षूंच्या असाव्यात. त्या चांगल्या राखण्याकरितां महाराज वीर  समशेरजंगराणा यांनीं एक इमारत बांधून दिली आहे. तींत कांहीं इंग्रजी ग्रंथ आहेत, १५००० संस्कृत ग्रंथ आहेत, भूतानी लोकांच्या भाषेंत लिहिलेल्या दहा हजार पोथ्या आहेत, तीन चार चिनी ग्रंथ आहेत, अनेक चित्रें व तंत्राच्या आकृती आहेत. या पुस्तकालयाखेरीज नेपाळांत  पुष्कळांच्या घरीं लहानमोठीं पुस्तकालयें आहेत. लाहोरच्या प्रख्यात रणजितसिंहाचा मधुसूदन नांवाचा पुरोहित होता. त्यानेंहि पुष्कळ पुस्तकांचा संग्रह केला होता. त्याच्या वंशजांनीं त्या संग्रहाची काय व्यवस्था केली हें समजत नाहीं.

राजपुतान्यांत प्रत्येक राजाच्या किल्ल्यांत एक ''पोथीखाना'' असे. त्यांत २००० पासून ५००० पर्यंत ग्रंथ असत. अल्लाउद्दीनानें जेव्हां गुजराथेवर स्वारी केली तेव्हां तेथील जैन आपले ग्रंथ घेऊन  जेसलमीर येथें पळून गेले. म्हैसूर व त्रावणकोर येथेंहि बर्‍याच पुस्तकांचा संग्रह आहे.महाराष्ट्र- गौरव-स्थल शिवाजीचे वडील शहाजी भोंसले यांनीं जेव्हां तंजावर प्रांत घेतला तेव्हां तेथें असलेल्या पुस्तकालयाला बरीच उर्जितावस्था आली. त्यांत अठरा हजारांवर पुस्तकसंग्रह होता. सुमारें तीनशें वर्षापूर्वी गोदावरीतीरस्थ एक थोर संन्यासी काशींत रहावयास आला व त्यानें तेथें एक पुस्तकालयच स्थापन केलें. त्यांत सुमारें तीन हजार पुस्तकें होतीं. त्यांची यादी अजूनहि उपलब्ध आहे. त्या संन्याशाचें नांव सर्वविद्यानिधान कवीन्द्राचार्य सरस्वती होतें. मुसुलमान बादशहा व अमीरउमरावहि आपणांजवळ पुस्तकांचा संग्रह ठेवीत असत. त्यांत फक्त अरबी व फारशी पुस्तकेंच नसत, तर हिंदुस्थानी ग्रंथहि असत.

अर्वाचीन:- अलीकडे ब्रिटिश अमदानींत सरकारी लायब्रर्‍यांखेरीज कॉलेजें, सोसायटया, वर्गणीच्या सार्वजनिक लायब्रर्‍या पुष्कळ स्थापन झाल्या आहेत, व त्यांत इंग्रजी व देशी भाषांतील ग्रंथसंग्रह असतो. कलकत्त्यास संस्कृत कॉलेजची लायब्ररी (छापील संस्कृत ग्रंथ १६५२ व हस्तलिखित  २७६९), अरेबिक लायब्ररी (छापील अरबी ग्रंथ ६८३१ व हस्तलि. १४३), इंग्लिश लायब्ररी (ग्रंथ ३२५४), रॉयल एशियाटिक सोसायटीची लायब्ररी (ग्रंथ १५००० आणि ९५०० अरबी व फारसी   हस्तलिखितें) वगैरे लायब्र-या आहेत. मुंबईस लॉयल एशियाटिक सो. शाखेची लायब्ररी (छापील व हस्तलिखित मिळून ग्रंथ ७५०००), मुलज फेरोझ लायब्ररी, नेटिव्ह जनरल लायब्ररी (ग्रंथ ११०००), मराठी ग्रंथसंग्रहालय, युनिव्हर्सिटी लायब्ररी आणि एल्फिन्स्टन कॉलेज लायब्ररी वगैरे आहेत. टिप्पू सुलतान याच्या जवळ २००० हस्तलिखित ग्रंथांचा संग्रह होता. हिंदुस्थानांत सर्वांत महत्वाचा जुना ग्रंथसंग्रह तंजावरच्या राजाजवळचा होय. तो १७ व्या शतकापासूनचा जुना आहे. त्यांत देवनागरी, तेलगू, कानडी, ग्रंथी, बंगाली, उरिया वगैरे लिप्यांत लिहिलेल्या मिळून १८००० हस्तलिखित ग्रंथांचा संग्रह आहे. बडोद्याची सेंट्रल लायब्ररी महत्वाची असून तींत ग्रंथसंग्रह सव्वा लाख आहे.

भारतीयेतर ग्रंथसंग्रह, प्राचीन:- सर्वांत प्राचीन ग्रंथसंग्रह असीरियांतील कीलाकृति शिलालेखांचा होय. हे शिलालेख प्रथम १८५० सालीं सर एच्. लायर्ड यास जिनेव्हा येथें प्राचीन राजवाडा खणीत  असतां उपलब्ध झाले. हा शिलालेखसंग्रह म्हणजे प्राचीन असीरियन राजांपैकीं वाङ्मयाचा सर्वांत मोठा आश्रयदाता जो असुरबनिपाल (पहा) याचा होय. या संग्रहांतील पुस्तकें म्हणजे इष्टीका होत. ओल्या विटांवर अक्षरें खोदून मग त्या भाजीत असत. या संग्रहांत सुमारें दहा हजार असे निरनिराळे ग्रंथ आहेत. या संग्रहापैकीं बराचसा भाग इंग्लंडांतील ब्रिटिश म्यूझियममध्यें ठेवलेला आहे. प्राचीन ईजिप्त (मिसर) मध्यें ६००० वर्षापूर्वी राज्यकर्त्यांचीं सरकारी व खाजगी स्वरूपाचीं कृत्यें लिहून ठेवणारा लेखकवर्ग असे. अशा लिखाणांशिवाय धार्मिक, ऐतिहासिक, नीतिशास्त्रविषयक, व इतर शास्त्रीय ग्रंथ, तसेंच सुभाषितसंग्रह, कादंबर्‍या वगैरे प्रकारचे ग्रंथ असत. प्रत्येक देवालयांत अंशतः धार्मिक व अंशतः शास्त्रीय स्वरुपाचे ग्रंथ लिहिणारे धंदेवाईक लेखक  असत. प्राचीन मिसरी ग्रंथसंग्रह हेलिओपोलिस, एडफू, मेंडेस, मेंफिस वगैरे ठिकाणीं होते. इराणी लोकांच्या स्वारीच्या वेळीं या ग्रंथसंग्रहांचा मोठा नाश झाला. त्यानंतर ईजिप्तवर ग्रीक व रोमन लोकांचा अम्मल झाला. त्या काळांत टॉलेमी राजांच्या आश्रयानें अलेक्झांड्रिया येथें मोठाले ग्रंथसंग्रह तयार झाले. टॉलेमी राजे आपल्या आश्रयाला निवडक पंडित व शास्त्रज्ञांचें मंडळ ठेवीत असत. या संग्रहांतील ग्रंथसंख्या सेनेका ४०००००, ऑलस, गेलियस ७,००,००० आणि केलिमेकस हा ४,२०,००० असावी असें म्हणतो. शोकपर्यवसायी व आनंदपर्यवसायी नाटकांच्या दोन याद्याहि  उपलब्ध झाल्या आहेत. सीझरनें अलेक्झांड्रिया बंदराला आग लावली, त्यावेळीं कांहीं ग्रंथसंग्रह जळाला. हा नाश भरून काढण्याकरितां पर्ग्यामम येथील ग्रंथसंग्रह ऍंटनीनें क्लिओपाट्रा राणीला नजर केला. या ग्रंथसंग्रहांत रोम, ग्रीस, हिंदुस्थान व ईजिप्त या देशांतील ग्रंथ एकत्र होते. इ.स. ३९१ त कांहीं धर्मवेडया ख्रिस्ती लोकांनीं हल्ला करुन या लायब्ररीचा बराचसा भाग नष्ट केला व उरलेला भाग अरबांचा खलीप उमर यानें नष्ट केला. प्राचीन ग्रीक लायब्रर्‍यासंबंधीं फारशी माहिती  नाहीं. ग्रंथसंग्रह करणा-या ग्रीक इसमांपैकीं पिसिस्ट्रेटस ''सॅमासचा अर्थेनियन युक्लिड, सायप्रसचा निकोक्रेटस, युरिपिडीस व आरिस्टाटल हे प्रमुख होत. टॉलेमी राजांनां ग्रंथसंग्रहाची आवड मूळ आरिस्टाटलनें लावली असें म्हणतात. प्राचीन रोमन लोक विशेष युध्दप्रिय व व्यवहारमग्न असल्यामुळें त्यांनीं ग्रंथसंग्रहाकडे लक्ष दिलें नव्हतें. रोमन रिपब्लिक सत्तेच्या शेवटच्या शतकांत रोममध्यें लायब्रर्‍यासंबंधीं माहिती मिळते. त्यांचा आरंभ रोमन लोकांनीं युद्धांत मिळविलेल्या  लुटीच्या रुपानें झाला. सेनापतींनीं खाजगी ग्रंथसंग्रह प्रथम सुरु केले. सीझरच्या सार्वजनिक हिताच्या अनेक योजनांपैकीं सार्वजनिक लायब्रर्‍या स्थापणें ही एक होती. तथापि अगदीं पहिली  सार्वजनिक लायब्ररी रोममध्यें स्थापण्याचा मान जी. आसिनिस पोलिओ यास आहे. त्यानंतर ऑगस्टसनें दोन सार्वजनिक लायब्रर्‍या स्थापल्या. नंतरच्या बादशहांकडून टायबेरियन लायब्ररी,  व्हेस्पासियन लायब्ररी, कॅपिटोलाईन लायब्ररी, उल्पियन लायब्ररी, वगैरे स्थापल्या जाऊन त्यांची एकंदर संख्या ख्रिस्तोत्तर ४ थ्या शतकांत अठ्ठावीस होती. त्याशिवाय रोमन साम्राज्यांतील ग्रीक प्रांत, आशियामायनर, सायप्रस व आफ्रिका या ठिकाणीं प्रांतिक लायब्रर्‍या स्थापल्या गेल्या व त्यांपैकीं बहुतेक देवालयांनां जोडलेल्या होत्या. पूर्वरोमन साम्राज्य स्थापन झाल्यावर कॉन्स्टाटिनोपल येथें लायब्ररीचा उपक्रम करण्यांत आला, त्यांत फक्त ख्रिस्ती वाङ्मय होतें. येथील ग्रंथांची संख्या थिओडोशियस बादशहाच्या वेळीं १००००० होती. ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराबरोबर  ख्रिस्तीप्रार्थनामंदिरांतून ख्रिस्ती ग्रंथसंग्रहांची वाढ होऊं लागली. बायझान् शियमला राजधानी गेल्यावर रोममधील लायब्र-यात ग्रीक वाङ्मयाकडे व ग्रीक लायब्रर्‍यात लॅटिन वाङ्मयाकडे दुर्लक्ष  होऊन वाङ्मयवृद्धीला मोठा धक्का बसला. शिवाय याच सुमारास रोमन साम्राज्यावर झालेल्या रानटी लोकांच्या स्वार्‍यांत लायब्रर्‍यांची फार नासधूस होऊन प्राचीन ग्रीक व लॅटिन वाङ्मय लुप्तप्राय झालें आणि यूरोपभर अज्ञानयुग (डार्क एजेस) पसरलें. पुढें अरबांच्या स्वार्‍या सुरु झाल्या. तथापि मुसुलमानी सत्ता प्रस्थापित झाल्यावर खलिफांनीं ग्रीक वाङ्मयाचें अरबी भाषेंत भाषांतर करुन लायब्रर्‍या स्थापण्यास उत्तेजन दिलें. बगदाद, कायरो, ट्रिपोली वगैरे ठिकाणीं मोठाल्या लायब्रर्‍या  निर्माण झाल्या.

अर्वाचीन:- प्राचीन विद्येची व लायब्र-यांची अनेक शतकें हेळसांड झाल्यानंतर पुन्हां १४११५ व्या शतकांत प्राचीन ग्रीक व लॅटिन विद्येचें पुनरुज्जीवन (रेनासन्स) यूरोपांत सुरु झालें. लवकरच छापण्याच्या कलेचा शोध लागून देशोदेशीं छापखानें निघाले व त्यांतून ग्रंथसंख्या मोठया प्रमाणावर बाहेर पडूं लागली. त्यामुळें लायब्रर्‍यांच्या इतिहासांत एका अगदीं नव्या युगाला आरंभ झाला. त्यामुळें प्रत्येक देशांत लायब्रर्‍यांची संख्या अलीकडे इतकी वाढली आहे कीं त्या सर्वांची माहिती देणें अशक्य आहे म्हणून प्रमुख देशांतील प्रमुख लायब्रर्‍यांची माहिती थोडक्यांत दिली आहे.

युनायटेड किंग्डम:- ब्रिटिश म्यूझियम (स्थापना काल १७५३) ही लंडन येथील लायब्ररी जगांतील पहिल्या प्रतीची आहे. हींत २० लाख छापील ग्रंथ, ५६००० हस्तलिखित ग्रंथ, आणि बारीकसारीक निबंध मिळून एकूण पुस्तकसंख्या ५० लाखापर्यंत आहे. यांत दुर्मिळ अशा ग्रंथांची संख्या फार मोठी आहे. हिब्रू, चिनी, संस्कृत व इतर पौरस्त्य भाषांतला ग्रंथसंग्रहहि मोठा व महत्वाचा आहे. ब्रिटिश म्युझियमला जोडून नॅचरल हिस्ट्री म्यूझियम असून तींत सृष्टिविज्ञानावरील सुमारें १००००० ग्रंथसंग्रह आहे. याशिवाय लायब्ररी ऑफ दि पेटंट ऑफिस (स्थापना १८५५), नॅशनल आर्ट लायब्ररी (स्था. १८४१), व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमची सायन्स लायब्ररी व बोर्ड ऑफ एज्युकेशनची लायब्ररी या सर्व सरकारी लायब्र-या असून सार्वजनिक उपयोगाकरितां आहेत. याशिवाय लंडनमध्यें सरकारी लायब्र-या आहेत त्या ऍडमिरॅल्टी (१७००), ग्रंथसंख्या; ४०००० कॉलेज ऑफ आर्म्स उर्फ हेरल्ड्स कॉलेज १५००० ग्रंथ; फॅरिन ऑफिस ग्रंथ ८००००; होम ऑफिस (१८००) १०००० ग्रंथ; हाऊस ऑफ कॉमन्स (१८१८) ५०००० ग्रंथ; हाऊस ऑफ लॉड्र्स (१८३४) ५०००० ग्रंथ; इंडिया ऑफिस (१८००) ८६००० ग्रंथ; वगैरे ऑक्सफोर्ड, केंब्रिज, वगैरे युनिव्हर्सिटयांनां जोडलेल्या मोठाल्या लायब्रर्‍या आहेत. तसेंच कॅथेड्रल व चर्च यांनां जोडलेल्या लायब्र-या, खाजगी ग्रंथसंग्रह, देणगीदाखल ग्रंथ मिळाल्यानें स्थापलेल्या लायब्रर्‍या, सोसायटया व विद्वत्संस्थांच्या लायब्रर्‍या, क्लब-लायब्रर्‍या, वगैरे अनेक प्रकारच्या अनेक लायब्रर्‍या आहेत.

इतर देशांतील प्रमुख लायब्र-या त्या त्या देशनामापुढें गांव, लायब्ररीचें नांव, स्थापनाकाल व ग्रंथसंख्या या अनुक्रमें दिल्या आहेत. युनायटेड स्टेट्स, वॉशिंग्टन:- काँग्रेस लायब्ररी (सन १८००) ग्रंथसंख्या २६ लाख; कोलंबिया-युनिव्हर्सिटी लायब्ररी (सन १७६३) ग्रंथसंख्या ४३००००; शिकॅगो- युनिव्हर्सिटी लायब्ररी (सन १८९२) ४८००००० ग्रंथ. फ्रान्स, पॅरिसःबिब्लिओथेक नॅशनल लायब्ररी (१४वें शतक) ग्रंथसंख्या ३० लाख, शिवाय ११०००० हस्तलिखितें व २८ हजार नकाशे वगैरे;  पॅरिस-आर्सेनल लायब्ररी (१४ वें शतक) ग्रंथसंख्या ३ लाख. जर्मनी, बर्लिन-रॉयल लायब्ररी (सन १६६१), ग्रंथसंख्या १२३००००, शिवाय ३०००० हस्तलिखितें, युनिव्हर्सिटी लायब्ररी (स. १८३१)  ग्रंथसंख्या २२००००. इटली, रोम-व्हेटिकन लायब्ररी-ग्रंथ संख्या २ लाख, शिवाय २५००० हस्तलिखितें. स्पेन, मॅड्रिड - नॅशनल लायब्ररी (स. १७९६) ग्रंथसंख्या ४ लाख. रशिया, पेट्रोग्राड-इंपीरियल पब्लिक लायब्ररी (सन १७१४) ग्रंथसंख्या १८ लाख, शिवाय ३४००० हस्तलिखितें,  जपान, टोकिओ-इंपी. कॅबिनेट लायब्ररी-ग्रंथसंख्या ५ लाख; युनिव्हर्सिटी लायब्ररी-ग्रंथसंखया ४  लाख.

वाचनालयें बरींच मोठीं असलीं तर तीं चालविणें व त्यांतील ग्रंथांची नीट काळजी घेणें व वाचकांनां पुस्तकें पहाण्यास सुलभ जावें म्हणून व्यवस्था ठेवणें या गोष्टी शिकल्याशिवाय येणार नाहींत; म्हणून त्याकरितां पाश्चात्य देशांतून ''लायब्रेरियनशिप'' चे अभ्यासक्रम ठेविलेले असतात. वाचनांलयांतील ग्रंथांची सूची करणें अत्यावश्य असून ती कशी करावी याविषयी देखील एक शास्त्र आहे. या ग्रंथसूचिशास्त्राची सामान्य माहिती विद्यासेवकाच्या पहिल्या वर्षाच्या ८ व्या अंकांत दिली आहे. बडोद्याच्या सेंट्रल लायब्ररीनेंहि सूचि कशी करावी याविषयीं लहान पुस्तकें प्रसिध्द केलीं आहेत. आपल्याकडील वाचनालयांच्या व्यवस्थापकांनीं अशा सूची करण्याचा प्रयत्न केल्यास वाचकांची मोठी तक्रार मिटणारा आहे.

खेडेगांवांतून वाचनाची गोडी लावण्याकरितां फिरतीं वाचनालयें तयार झालीं पाहिजेत. तसेंच शहरांतील मोठया वाचनालयांच्या शाखा खेडोपाडीं स्थापन झाल्या पाहिजेत. बडोद्याच्या सेंट्रल लायब्ररींत अशी व्यवस्था आहे. गरीबांकरितां मोफत वाचनालयें पाहिजेत. आपल्याकडेहि त्यांचा उपक्रम झाला आहे. १९२६ च्या मे महिन्यांत अशा महाराष्ट्रांतील वाचनालयांच्या परिषदेचें दुसरें अधिवेशन पुण्यास भरलें होतें. तथापि या दिशेनें प्रगति फार अल्प होत आहे. स्त्रियांकरितां व लहान मुलांकरितां स्वतंत्र व उपयुक्त वाचनालयें आपल्या देशांत नाहींतच म्हटल्यास चालेल. विद्यमान वाचनालयांचा फायदा घेणा-या स्त्रिया व मुलें यांची संख्या फारच अल्प आहे. सुशिक्षित लोकांच्या घरींहि मुलांच्या क्रमिक पुस्तकांच्या संग्रहाशिवाय दुसरा चांगला ग्रंथसंग्रह बहुधां सांपडत नाहीं. याचें कारण बव्हंशीं आपणांत वाचनाच्या गोडीचा असलेला अभाव व पुस्तकांकरितां पैसे खर्च करणें अनवश्यक आहे अशी चुकीची रुढ असलेली समजूत होय. या कारणांमुळें पुस्तक प्रकाशनहि व्हावें तसें होत नाहीं व एकंदर वाङ्मयाचें त्यांत चांगली भर न पडल्यानें फार नुकसान होतें. (ब्राऊन-गाईड टु लायब्रेरियनशिप(१९०९); जे. विलिस क्लार्क-दि केअर ऑफ बुक्स; टेड्डर-एव्होल्यूशन ऑफ दि पब्लिक लायब्ररी (ट्रन्झक्शन्स ऑफ सेकंड इंटर लायब्ररी कॉन्फरन्स, १८९७-९८); सॅव्हेज-दि स्टोरी ऑफ लायब्ररीज अँड  बुक -कलेक्टर्स, इत्यादि)

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .