विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वायनाड:- मद्रास, मलबार जिल्ह्यांतील एक तालुका. क्षेत्रळ ८२१ चौरस मैल. लोकसंख्या (१९२१) याचें ८४७७१. तालुक्याचें मुख्य ठिकाण भानताडी येथें आहे. वावित्तिरी येथें कॉफी (बुंद) चांगली पिकते. वायनाड समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंच आहे. या तालुक्यांतील जंगलांत साग चांगला होत असून शिकारीचीं जनावरें विपुल आढळतात. हवा सर्द असून ८ महिने थंड असते. दरसाल पावसाचें मान १३० इंचांपर्यंत असतें. पूर्वेपेक्षां पश्चिम भागावर याहिपेक्षां जास्त पाऊस पडतो. कॉफी, चहा व मिरें हीं उत्पन्नाचीं मुख्य पिकें होत. कॉफी पेरण्याला आरंभ प्रथमतः १८०५ सालीं जाला. १८४० पर्यंत यूरोपीय कंपन्यांनीं तिच्या लागवडीस आरंभ करुन कॉफीच्या पिकाला उर्जितावस्था आणून दिली.