प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

वायव्य सरहद्द प्रांत:- हिंदुस्थानचा वायव्य टोंकाचा नवीन बनविलेला प्रांत. याची जास्तींत जास्त लांबी ४०८ मैल व रुंदी २७९ मैल आहे. क्षेत्रफळ ३८६६५ चौरस मैल; पैकीं १३१९३ चौरस मैल  ब्रिटिश राज्यांत आहे. उत्तरेस हिंदुकूश; दक्षिणेस बलुचिस्तान व पंजाबचा डेरागाझीखान जिल्हा;  पूर्वेस पंजाब व काश्मीर संस्थान आणि पश्चिमेस अफगाणिस्तान. स्वाभाविकपणें ह्या प्रदेशाचे तीन विभाग पाडतां येतात. पहिला सिंधूचा हजारा जिल्हा, दुसरा सिंधूनद आणि टेंकडया यांमधील पेशावर, कोहट, बन्नू व डेराइस्माइलखान जिल्ह्यांचा प्रदेश; व तिसरा उत्तर व पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश. दुसर्‍या विभागाचें क्षेत्रफळ १३४१८ चौरस मैल व तिस-याचे सुमारें २५५०० चौरस  मैल आहे. तिस-यात मलकाड, खायबर, कुर्रम, टोची आणि बना एजन्सी आहेत. सिंधूच्या पश्चिमेस जंगी हिंदुकूश पर्वताच्या रांगा आहेत. हिंदुकूशमधील दोराहखिंडीपासून ह्या प्रांतांत व काफिरिस्तानमध्यें विभाग पाडणारी एक डोंगराची ओळ आहे. सुलेमान टेंकडया ह्या प्रांताच्या पश्चिम सरहद्दीवर आहेत. सर्व प्रदेशांतील पाणी सिंधु नदींत वाहून येतें.

प्राणी:- सिंधु खो-यांत पूर्वी पुष्कळ वाघ आढळत असत, पण सध्यां दिसत नाहींत. चित्ते, लांडगे, कोल्हे वगैरे श्वापदें ठिकठिकाणीं आढळतात. हजाराच्या प्रदेशांत अस्वलें बरींच आहेत. वेगवेगळया जातीचीं हरिणें सांपडतात. सिंधु खो-यांत रानडुकरें आहेत. बरींच चिकोर, सिसी, बगळा, हंस, बदकें व गरुड पक्ष्याची एक जात वगैरे पक्षी आढळतात. सिंधु नदींत पुष्कळ तर्‍हेचे मासे आढळतात.

हवामान:- डेराइस्माईलखान जिल्ह्यांत उष्णतेचें मान फार असतें. इतर भागांत उन्हाळयांत हवा समशीतोष्ण असून हिवाळयांत थंडी अतिशय असते. हवा कोरडी असते. पावसाचे मोसम दोन असतात. एक अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यांकडून बाष्पपूरित वारे येतात तो व दुसरा मेसापोटेमिया व इराणकडून जोराचे वारे येतात तो. पाऊस १० ते २५ इंच; चित्रळकडे १७ इंच. एक पावसाळा उन्हाळयांत व दुसरा हिवाळयांत. हिवाळयांत वारे पश्चिमेकडून वाहातात. वायव्येकडील वारे वाहातात त्यावेळीं भयंकर कडाक्याची थंडी पडते. एप्रिल मेमध्यें उष्ण व जोराचे वारे वाहातात. जूननंतर कधीं कधीं हजारा जिल्ह्यांत वळीवाचे पाऊस पडतात. आक्टोबर व नोव्हेंबर महिने फार उत्तम जातात. पावसाळयातं बर्फाचा पाऊस पडतो. उन्हाळयातं पारा पेशावर येथें ११४० व १२०० च्या मध्यें असतो. डेराइस्माईलखान येथें ह्याहिपेक्षा पारावर चढतो. हिवाळयांत कमींत पारा ५.४०० पर्यंत खाली जातो.

इतिहास:- प्राचीन काळीं पेशावरच्या प्रदेशाचा राजकीय संबंध पूर्व इराणाशीं येत असे व सिंधूचा प्रदेश एके कालीं त्याच्या ताब्यांतहि होता. इसवी सनापूर्वी ५१६ या वर्षी दरायस हिस्टास्पस ह्यानें सायलॅक्सला पाठविलें त्यावेळीं त्यानें सिंधूच्या पश्चिमेकडे व काबूलच्या उत्तरेस रहाणा-या सर्व लोकांस पादाक्रांत केलें होतें. पेशावर जिल्ह्यास पूर्वी गांधार देश म्हणत असत. असिक्नाई व हिंदु मिळून क्सक्सीसबरोबर ग्रीसच्या स्वारीवर गेले होते. इसवी सनापूर्वी ३२७ मध्यें शिकंदर बादशहा हिंदुकुश ओलांडून अटकपर्यंत आला. या अलेक्झांडरच्या स्वारीचा सविस्तर इतिहास सिकंदरानंतर खालच्या सिंधू खो-याचा प्रांत पोरसच्या ताब्यांत आला. पण त्याचा युडमासनें इसवी ख्रिस्तपूर्व ३१७ त खून केला व नंतर मौर्यवंशीय चंद्रगुप्ताच्या हाती हा सर्व प्रदेश आला. अशोकानें या ठिकाणीं बौद्ध धर्माचा प्रसार केला. हजारा जिल्ह्यास पूर्वी पाखली म्हणत असत. अशोकाच्या मरणानंतर मौर्यवंशाचा –हास होऊन डेमेट्रियसनें ख्रिस्तपूर्व १९० मध्यें उत्तरहिंदुस्थान जिंकला. युक्रेटाइडसनें बॅक्ट्रिआ घेऊन डेमेट्रिअसचा पराभव केला. पण ख्रिस्तपूर्व १५६ त युक्रेटाईडसचा खून करण्यांत आला व सर्व प्रदेश लहान लहान राजांच्या हातीं गेला. यांपैकीं कुशान लोकांनीं काबूलच्या दक्षिणेकडील द-याखो-यांचा प्रदेश व्यापला. दुस-या कडफिसेसनें वायव्य हिंदुस्थान जिंकिला. त्याच्या नंतर कनिष्क, हुविष्क व वासुदेव आले.

वासुदेवाच्या वेळचें कुशानांचें राज्य सिंधूच्या खो-याचा प्रदेश व अफगाणिस्तान होय. त्याच्यामागें या घराण्याचा -हास झाला. कुशान घराण्याकडून या प्रदेशाची सत्ता गोर्‍या हूणांकडे गेली. हूणांचें राज्य चीनपासून इराणपर्यंत पसरलें होतें. तोरमाण व मिहीरकुल यांच्या कारकीर्दीत त्यांनीं उत्तर हिंदुस्थान घेतला, त्यांची 'सागल' (सिआलकोट) ही राजधानी होती. मिहीरकुल जेव्हां हिंदुस्थानांत अधिकाधिकच घुसूं लागला तेव्हां ५२८ सालीं त्याचा यशोधर्मानें पराभव केला व त्यास पंजाबांत परत लावून दिलें.

हिंदुस्थानावर मुसुलमानांच्या दोन स्वार्‍या झाल्या. पहिल्या स्वारीचा मोर्चा मुलतान व सिंध  प्रदेशाकडे वळला. ८७० त गझनी पडलें व काश्मीरच्या सैन्यानें उद्भांडपूरच्या बंडखोर राजास पदच्युत केलें व त्याचें राज्य तोरमाणला दिलें. ९७४त काबूलचा अधिकारी पिरीन यानें हिंदुस्थानांतून काबूलचा किल्ला घेण्यास चढाई करुन आलेल्या सैन्यास परत हांकून लावलें. ९७७त सबक्तगीन हा स्वतंत्र झाला व त्यानें गझनवी वंशाची स्थापना केली. त्यानें ९८६त हिंदुस्थानच्या सरहद्दीवर हल्ला केला व लघमान येथें ९८८ त जयपाळाचा पराभव केला. सबक्तगीनचा पुत्र महंमद यानें १००१ त आपल्या पहिल्या स्वारींत जयपाळचा पुन्हां पराभव केला व पेशावरजवळ आनंदपालचा पराभव केला (१००६). ११७९ सालीं महंमद घोरीनें पेशावर घेतलें व दोन वर्षांनीं खुश्रु मलिकजवळून लाहोर घेतलें. १२०६त महंमद मारला गेला व त्याचा सरदार ताजुद्दीन यल्दुज यानें  गझनी येथें आपला जम बसविला. पण ख्वारिझमी यांनीं १२१५ त त्यास हिंदुस्थानांत हांकून दिलें. पण ख्वारिजमी लोकांनां मंगोल लोकांनीं १२२१ सालीं जिंकिलें. या वर्षी चेंगीझखानानें सिंधूच्या तीरावर जल्लाउद्दीन ख्वारिझमचा पराभव केला. तेव्हां तो पेशावर वगैरे सोडून सिंधसागर दुआबकडे गेला. १२२४ त जल्लाउद्दीननें सैफउद्दीन हसन याजकडे गझनीचा अधिकार सोंपविला. या प्रांतास हसननें कुर्रम व बन्नू भाग जोडिले व १२३४ सालीं तो स्वंतत्र झाला. अल्तमषच्या मरणानंतर सैफउद्दीननें मुलतानवर छापा घातला होता पण तेथील मांडलिक राजानेंच त्यास मागें हटविलें. पुढें १२३९ त मंगोल लोकांनीं सैफ उद्दीनास गझनी व कुर्रम प्रांताच्या बाहेर हांकून दिलें. १२४९त मुलतान घेण्याचा प्रयत्न करीत असतां सैफउद्दीन मारला गेला. व त्याचा पुत्र नासिरउद्दीन महंमद हा मंगोलांचा मांडलिक बनून बन्नू प्रांतावर राज्य करुं लागला.

इ.स. १३९८ त तैमूरलंग समरकंदहून हिंदुस्थानावर स्वारी करण्यास निघाला. त्यानें चित्रळ घेतलें व तो पंजाबांत उतरला पण पुढील वर्षी परत गेला. तैमूरच्या वंशानंतर अफगाण लोक पुढें सरसावले. हे मंगोलद्वेष्टे होते. १४५१ त बहलोल लोदी दिल्लीच्या तख्तावर आरूढ झाला. यानंतर कांहीं वर्षांनीं बाबरचा चुलता म्हणजे काबूलचा मिर्झा उलुघबेग यानें खासी अफगाणांनां आपल्या राज्यांतून पूर्वेकडे पेशावर, स्वातकडे हांकून लावलें. बाबरनें काबूल घेतल्यानंतर १५०५ त हिंदुस्थानावर स्वारी केली. पुन्हां १५१८ त त्यानें बाजोर व स्वातवर स्वारी केली पण तिकडे बदक्शानवर स्वार्‍या होऊं लागल्यामुळें त्यास परत जावें लागलें.

१५१९ त जिगियानी लोकांनीं उम्रलेख दिलझाक लोकांच्या विरुध्द बाबरची मदत मागितली. १५२६ सालीं पानिपत येथील जयामुळें बाबरकडे दिल्ली आग्रा प्रांतांचें स्वामित्व आलें. १५३० मध्यें त्याच्या मृत्यूनंतर मिर्झा कामेरान हा काबूलचा स्वामी बनला. त्याच्या मदतीनें ग्वारीआखेल अफगाणांनीं दिलझाक लोकांचा पाडाव केला. परंतु १५५० मध्यें खान कझूनें शेख टपूर येथें ग्वारीआखेल लोकांचा चांगलाच पराभव केला. हुमायूननें कामेरानचा पाडाव करुन १५५२ मध्यें पेशावर घेतलें. १५५६ मध्यें हुमायूनच्या मृत्यूनंतर काबुलप्रांत मिर्झा महंमद हकीमच्या ताब्यांत आला. मिर्झा हकीमच्या मरणानंतर (१५८५) अकबराचा सेनापति कुंवर मानसिगं ह्यानें काबूल व पेशावर घेतलें व मानसिंग हाच काबूलप्रांताचा सुभेदार बनला.

१५५८ सालीं महंमद व इतर लोकांनीं जलालच्या नेतृत्वाखालीं बंड केलें. ह्या लोकांनीं मानसिंगच्या लोकांस खैबरघाटांतून परत हटविलें. १५८७  मध्यें युसुफझई लोकांचा पराभव करण्याकरितां झेनखान यास स्वात व बाजौर येथें पाठविण्यांत आलें. पण त्यांत मोंगल सैन्याचा पराभव होऊन बिरबल धारातीर्थी पतन पावला. १५९२ मध्यें झेन खाननें पेशावरचा किल्ला घेऊन पुढील वर्षी  तिराहखान व बाजौर हे प्रांत काबीज केले. रोशानी लोकांचा मात्र अजून पुरा बींमोड झाला नव्हता. त्यांनीं १६२० सालीं मोंगलांचा संपघघटांत चांगलाच खरपूस समाचार घेतला. पुढें ५ वर्षांनीं रोशानी नायक इहदाद मारला गेला. १६२७ मध्यें जहांगीर बादशहाच्या मरणानंतर अफगाण लोकांनीं बंड पुकारिलें व १६३० सालीं रोशानी यांनीं पेशावरला वेढा दिला. पण पुढें ते सोडून गेल्यामुळें मोंगलांचा पु्न्हां जम बसला. शहाजहाननें अफगाण लोकांस जुलुमानें वागविल्यामुळें ते फार असंतुष्ट झाले. तथापि राजा जगत्सिंगाचा कोहट व कुर्रम प्रान्तांवर चांगलाच दरारा होता. १६६७ सालीं युसुफझई सिंधु ओलांडून अलीकडे आले पण अटकनजीक त्यांचा पराभव झाला. १६७३ व  ७४ मध्यें आफ्रिडी लोकांनीं गंडाब व खापहा येथें मोंगल सैन्याचा पराभव केला. तेव्हां औरंगझेब स्वतः हसन अबदाल येथें आला व त्यानें गोडीगुलाबीनें अफगाण लोकांची मनें मिळविलीं. व त्यांनां जहागिरी दिल्या १७३८ मध्यें काबूलचा मोंगल सुभेदार नाझीरशाह ह्याचा नादिरशहानें पराभव केला. पण पेशावर व गझनीचें राज्य आपला मांडलिक म्हणून त्याजकडेच दिलें. अहंमदशहा दुराणीनें पेशावर येथें राज्यस्थापना केली. पण तैमूरशहाच्या अमदानींत सर्वत्र बेबंदशाही माजली. पुढें ह्याच्या पुत्रांमध्यें गादीकरितां भांडणें लागलीं. अर्थातच ह्यामुळें लहान लहान सरदारांस स्वतंत्र होण्यास बरीच संधि मिळाली. पेशावर हें बारकझई वंशाच्या हातीं गेलें व डेराइस्माईलखान सदोझई लोकांच्या हातीं गेलें.

१८१८ मध्यें शीख लोकांनीं ह्या प्रांतावर स्वा-या करण्यास सुरुवात केली. व ब्रिटिशांनीं हा प्रांत घेईपावेतों रणजितसिंगानें ह्या प्रांतावर हळू हळू आपला ताबा बसविला. १८१८ मध्यें शीख सैन्यानें डेराइस्माईलखान घेतलें व पुढें ५ वर्षांतच बन्नूचा मरवत सपाटी प्रदेश घेतला. स. १८३६ मध्यें डेराइस्माईलखान येथें शीख सुभेदार नेमण्यांत आला. त्यास 'करदार' म्हणत. पहिल्या शीख युद्धानंतर हर्बर्ट एडवर्डस यानें बन्नु लोकांस लाहोर दरबारच्या अमलाखालीं आणलें. १८३४ मध्यें प्रसिद्ध शीख सेनापति हरिसिंग ह्यानें अफगाणांचा नौशहर येथें पराभव केला व पेशावरचा किल्ला सर केला. पण १८३७ मध्यें अफगाणींशीं लढतां लढतां जमरुड येथें हरिसिंग मारला गेला. पुढें हस्तनगर व मिरान्झई ह्या जहागिरी करुन देण्यांत आल्या. प्रसिध्द शीख सरदार अवितविल हा पेशावरचा अधिपति होता (१८३८-४२).

१८४९ सालच्या जाहीरनाम्यानें सरहद्दीवरील प्रदेश ब्रिटिश सत्तेखालीं आला. १८५० सालीं पेशावर, कोहट व हझारा ह्या तीन जिल्ह्यांचा एक विभाग करुन त्यावर एक कमिशनर, आणि डैराइस्माईलखान व बन्नू ह्यांवर एक डेप्युटी कमिशनर नेमण्यांत आला. १८६१ सालीं हे दोन्ही जिल्हे डेराजात विभागांत घेण्यांत आले. बंडाच्या सालीं येथें फारशी गडबड झाली नाहीं.

१८६३ सालच्या अंबेलाच्या स्वारींत ब्रिटिशांस बराच त्रास पडला. ते मालका येथें जात असतां, अकस्मात वुनेरवाल लोक त्यांस टक्कर देण्यास पुढें सरसावले. हळू हळू दीर स्वात, बाजौर मधील लोक शत्रूच्या पक्षास मिळाले. पण अखेर ब्रिटिशांची सरशी झाली. गंडमकच्या तहाप्रमाणें (१८७९) खैबर व महंमद खिंडींचा ताबा ब्रिटिशांकडे आला. १८८१ मध्यें महसुदलोकांवर स्वारी करुन, सरहद्दीवर हे लोक रहात होते त्या भागांत शांतता पसरविली.

१८९४ सालीं डेराजात विभागाचा कमिशनर अफगाणिस्तान व वजिरिस्तानमधील सरहद्द ठरविण्यास गेला असतां महसूद लोकांनीं त्याजवर हल्ला केला. पण पुढें महसूद लोकावर स्वारी करुन त्यांस शरण येण्यास लावलें. १८९४ मध्यें त्यांनीं वान हा प्रांत आपल्या ताब्यांत घेतला. १८९७ मध्यें टोची प्रदेशांत पुन्हां गडबड झाली. मैझर खेडयांत एका हिंदूचा खून झाला होता, म्हणून पोलिटिकल रेसिडेन्ट बरेचसें सैन्य घेऊन तेथें गेला. पण त्या लोकांनीं रातोरात सैन्यावर अचानक छापा घातल्यामुळें बरेच लोक मारले गेले तेव्हां पोलिटिकल रेसिडेन्ट उरलेलें सैन्य घेऊन दगखेल येथें परत आला. त्याच वर्षी मुलज मस्ताननें मलकंद वचकद-यावर स्वारी केली. पण बरिच प्राणहानि होऊन शेंवटीं त्यास हार खावी लागली. ह्यानंतर महमंद लोक उठले. पेशावरच्या खिंडींतून येऊन त्यांनीं शंकरगडावर स्वारी केली. पण त्यांस लवकरच परत हांकून देण्यांत आलें.

मिरान्झई लोकांनीं तिराह प्रदेशावर स्वारी केली तेव्हां दर्गई येथें मोठी लढाई होऊन त्या लोकांचा बिमोड करण्यांत आला. आफ्रिडी लोकांनीं बराच त्रास दिला पण त्यांच्याशीं १८९८ मध्यें तह करण्यांत आला. १९०१-०२ सालीं महसूद लोकांस चांगलीच तंबी देण्यांत आळी. त्यांच्याजवळून दंड घेण्यांत आले. तरी १९०४-०५ सालीं त्यांनीं तीन ब्रिटिश आफिसरांचा खून केलाच.

गंडमकच्या तहाच्या अटीप्रमाणें खैबर खिंडीच्या पश्चिमेकडील सर्व प्रदेशावर अफगाण लोकांचा ताबा स्थापित झाला. स. १९०१ मध्यें पठाण सरहद्द पंजाब सरकारच्या ताब्यांत होती. १८९७ मध्यें हजार, पेशावर व कोहट हे जिल्हे व बन्नू व डेराइस्माईलखानचा प्रदेश व खैबर, कुर्रम, टोची व वानखो-यांतील पोलिटिकल एजन्सी पंजाब सरकारच्या अधिकार खालून काढून घेण्यांत आल्या व ह्यांत दीर, स्वात व चित्रळ मिळवून त्यांचा १९०१ मध्यें एक वेगळा प्रांत बनविण्यांत आला व त्यावर एका चीफ कमिशनरची व एजंटची नेमणूक करण्यांत आली.

१९१९ सालीं अफगाणिस्तानच्या वरचढ धोरणामुळें युद्ध उपस्थित होऊन पुढें कांहीं काळ वझिरी वगैरे टोळयांवर मोहिमा चालू झाल्या. याचा शेंवट होऊन महसूद वझिरी प्रदेशावर नजर राहाण्यासाठीं रझमक येथें ब्रिटिश लष्करी ठाणें करण्यांत आलें. यामुळें संस्थानी मुलुखांत शांतता नांदूं लागली. हा प्रांत पंजाबला जोडावा कीं काय याविषयीं विचार करण्याकरितां १९२२ सालीं एक कमिटी नेमण्यांत आली. हिंदु लोक हा प्रांत इतर प्रांतांप्रमाणें स्वायत्त करण्याच्या विरुध्द होते. कारण त्यामुळें मुसुलमानांचें त्या प्रांतांत वर्चस्व वाढून हिंदूंनां त्रास होईल. पण मुसुलमान पठाणांनां या प्रदेशाला सुधारणाकायदा इतर इलाख्याप्रमाणें लावावयास पाहिजे होता. कमिटींत एक मत न होतां हा प्रश्न गेल्या मार्चच्या अधिवेशनांत असेंब्लीपुढें येऊन मुसुलमानांच्या बहुमतामुळें वायव्य सरहद्दप्रांताला सुधारणा कायदा लावण्याचें ठरलें.

सध्यांच्या वायव्य सरहद्दीवरील प्रांताच्या उत्तरभागांत पूर्वी उद्यान (स्वात) व गांधार (पेशावर) हीं प्राचीन राष्ट्रें होतीं. ह्युएनत्संग कुर्रमच्या खो-यात ककियांघ व बन्नूस 'फलन' हीं नांवें देतो.

येथें प्राचीन अवशेष पुष्कळ आहेत. १००० वर्षांपूर्वीच्या अवशेषांस 'बौद्धकालीन' म्हणतात व तदनंतरच्या अवशेषांस 'मुसुलमानी' म्हणतात. अजून बर्‍याच ठिकाणीं 'स्तूप' व जुने किल्ले दृष्टीस पडतात. गडुन राज्यांत मौन्टवंज टेंकडीवर बरेच भग्नावशेष आहेत. शिवाय चारसद्वा, नवग्राम  जमालागढी खारकी, तख्त-इ-बहाई, साहरी बहलोल, तिरलई (पेशावर जिल्ह्यांत), अध-इ-समुध (कोहट नजीक) आक्रामौन्ड (बन्नूमध्यं) व काफिरकोट (डेराइस्माईलखान) येथेंहि बरेच अवशेष आहेत. पेशावर जिल्ह्यांतील शहावाझगढी येथील खरोष्ठी शिलालेख व हजारामधील मानसेहर हे फार महत्त्वाचे आहेत. अशोक राजाच्या हुकुमावरुन ख्रि.पू. २५० या वर्षी लिहिलेले हे शिलालेख होत.

प्रांताची लोकसंख्या १९२१ सालीं सुमारें ५० लाख होती. पैकीं बहुतेक मुसुलमान आहेत. हिंदु लोक शेंकडा ५ ही नाहींत. यांत डेराइस्माईलखान, कोहट, बन्नू व चारसद्द हीं चार गावें व खेडीं ३३४८. शहरांतून दरहजारी पुरुषांत ५६१ बायका व खेडयांतून ८७२ बायका असें बायकापुरुषांचें प्रमाण पडतें. म्हणजे इतर प्रांतांतल्यापेक्षां या प्रांतांत ही विषमता फार दिसते.

प्रांताची प्रचलित भाषा पुश्तु आहे. युसुफझई ही मूळ व शुद्ध भाषा होय. पौराणिक ग्रंथहि ह्याच भाषेंत लिहिलेले आहेत. ओरमूर लोक एक निराळीच 'इराणी' भाषा बोलतात. अगदीं सरहद्दीवर हिंदकी व जतकी भाषा बोलतात. व गुजर लोक गुजरी भाषा बोलतात. स्वात-कोहिस्तानमध्यें गर्हवी व तोरवाली भाषा बोलतात. व पन्जकोर कोहिस्तानचे लष्करी लोक बष्करी भाषा बोलतात. हजारा जिल्ह्यांत गुजर लोकांची व डेराइस्माईलखान जिल्ह्यांत जाट लोकांची वस्ती पुष्कळ आहे. पठाण, जाट, सय्यद, तनवंली, मलियार, धुन्ड, बलुची, रजपूत, शेख, खरल, मोग्गल, कुरेशी, वाघबान, पराछ, कस्साब, सुरेर, गखर या मुसुलमान जाती व अरोर, खत्री, ब्राह्मण या हिंदु जाती आहेत. बहुतेक लोक शेतकीचा धंदा करतात. उद्योगधंद्याकडे अर्थातच लोकांचें लक्ष फार कमी आहे. सिंधूच्या पूर्वेकडील प्रदेश अत्यंत सुपीक असून पाऊसहि पुरेसा पडतो. सपाट प्रदेशांतून वसंतुतॠतुतील पीक चांगलें येतें. ५००० फुटांवरील उंच जागेंत वसंत ॠतूंत बहुतेक पीक येत नाहीं. सिंधूच्या पश्चिमेकडील भागाचे दोन विभाग पाडतात; एक खडकाळ उंच प्रदेश व दुसरा सपाट जमिनीचा प्रदेश. या दोन्ही भागांतील पाऊस २० इंचांहून कमी. अर्थात पाणी देण्याची कृत्रिम व्यवस्था केली आहे.

डेराइस्माईलखानमध्यें डोंगराच्या पायथ्याच्या जमिनींत चिक्कण माती आहे. पेशावर व बन्नूच्या खो-यांत बरीच लागवड करतात. कारण येथें पाणी पुरविण्याची चांगली व्यवस्था केलेली आहे. कोहटच्या खोर्‍यांत तर डोंगरांतून देखील जमीन लागवडीस आणली गेली आहे. इतरत्र पिकाचें  मान बहुधा पडणार्‍या पावसावर अवलंबून असतें. मे ते ऑगस्ट खरीपाचा हंगाम असतो व  आक्टोबर ते जानेवारी रब्बीचा हंगाम असतो. सपाट जमिनींतून बहुतेक रब्बीचें पीक करतात. पठाण लोक जात्याच आळशी आहेत. ते शेताची मुळींच निगा राखीत नाहींत. या प्रांतांत शेशंकडा ६४.५ लोक शेतकीवर उपजीविका करतात. वसंतॠतूंतील हंगामाचें मुख्य पीक गहूं होय.  गव्हाची पेरणी आक्टोबर नोव्हेंबरमध्यें करुन पिकाची कापणी मे-जून मध्यें करतात. १४०५ चौरस मैल जमिनीचा उपयोग गव्हाकडे करतात. गव्हाच्या खालेखाल होणारें पीक जवाचें होय ३१३ हून अधिक चौरस मैल जमिनींत ह्या पिकाची लागवड करतात. जवाच्या खालोखाल चण्याचें पीक आहे.  शरदॠतूंत मका पेरतात. ६२५ चौरस मैल जमीन ह्या पिकाकडे आहे. ह्याची पेरणी जुलै-ऑगस्टमध्यें व कापणी सप्टेंबरमध्यें होते. इतर पिकें बाजरी, ज्वारी, तांदूळ, कडधान्यें, कापूस व गळिताचीं धान्यें हीं आहेत. बागाइतीनें सुमारें ४००० एकर जमीन अडविली आहे. पेशावर जिल्ह्यांतून बरीच फळफळावळ बाहेरगांवी पाठविली जाते.  मुख़्यत्त्वेंकरूनडाळिंबांचें पीक होतें. पेशावरचीं डाळिंबें हिंदुस्थानांतील सर्व भागांत व रंगूनपर्यंत देखील जातात. मालाची इकडूनतिकडे नेआण करण्याकडे उंटांचा उपयोग करतात. सरहद्दीपलीकडून अस्सल जातीचे घोडे इकडे आणतात. गांवांतल्या गांवांत मालाची नेआण करणें असल्यास गाढवांचा उपयोग करतात. शेंकडा ७२ मैल जमिनीची सुपिकता पावसाच्या वक्तशीर पडण्यावर अवलंबून आहे. व उरल्यापैकीं शेंकडा २५ चौरस मैल जमिनीला कालव्याचें पाणी मिळतें. बन्नू प्रांतांत कालव्याचें पाणी बरेंच खेळविलेलें आहे. हजारा जिल्ह्यांत तर पाऊसच पुरेसा पडतो. पेशावर जिल्ह्यांत कालव्याच्या पाण्याचा बराच उपयोग करतात. एकंदर जमिनीपैकीं शेंकडा ३२ लागवडींत आहे. जंगलांतील मुख्य उत्पन्न देवदार लांकडाचें आहे. हजारा सोडून इतर जिल्ह्यांत शिसूचें लांकूड सांपडतें. ह्या प्रांतांत मिठाचे (सैंधव) डोंगर आहेत. जट्टा, मालगिन, बहादूरखेल व करक येथें अशा खाणी आहेत. तसेंच इकडे एक प्रकारच्या मातीपासून 'सोरा' तयार करतात. पेशावर जिल्ह्यांत नौशहरानजीक संगमरवरी दगड सांपडतो. शिवाय कोहटमध्यें पनोबा येथें राकेलाचे झरे आहेत. चुनखडी व वाळूचे खडक तर विपुल आहेत. काबूल व सिंधु नद्यांच्या वालुकामय पात्रांत अत्यंत अल्प प्रमाणांत सुवर्णरज सांपडतात. झिरिस्थान व युसुफझई टेंकडयांतून लोखंड सांपडतें. या प्रांतांत जाडेंभरडें सुती कापड व पागोटयाकरितां चांगल्या रेजाचें कापड व कांबळी तयार करतात. स्वातमध्यें कांबळीं फारच चांगलीं तयार होतात. हजारा व कोहटमध्यें उत्तमपैकीं नमदे तयार होतात. पेशावर व कोहटमध्यें रेशमी पागोटीं विणतात. तसेंच वेलबुट्टीचें काम हजारा जिल्ह्यांत उत्तम होतें. तांब्याचीं भांडीं व झिलई दिलेलीं मातीचीं भांडीं पेशावर येथें तयार करतात. पेशावर जिल्ह्यांत होडया तयार करतात. त्याचप्रमाणें हस्तिदंताच्या व उंटाच्या हाडाचें सामान तयार करतात. अफगाणिस्तान व मध्यआशियाचा हिंदुस्थानाशीं असलेला व्यापार व दळणवळणाच्या मार्गामध्यें हा प्रांत असल्याकारणानें यास बरेंच महत्व प्राप्त झालें आहे. अफगाणिस्तानाशीं व्यापार टोची व गोमल खिंडीच्या द्वारें चालतो. बहुतेक व्यापार खैबरखिंडींतून चालतो. येथें संरक्षणार्थ सशस्त्र सैनिक ठेविले आहेत. बन्नूमधून आयातमाल-मेंढया, बकरीं, धान्य, कडधान्यें, चामडें, व तूप; बाजौर व तिराहमधून चटया, तेलें, इमारती लांकूड वगैरे. काबूलहून आयात माल-मैंढया, बकरीं, गहूं, चामडें, इमारती लांकूड, रेशीम वगैरे व निर्गत माल सुती कापड, मीठ, साखर, चहा, तंबाखू, रंग व रुपें वगैरे. मुख्य आयात माल खनिज धातू, चहा व लोंकरीचें कापड होय व मुख्य निर्गत माल चामडें व तंबाखू होय. या प्रांतांतून नार्थ वेस्टर्न रेल्वे जाते. या प्रांताचा नैर्ॠत्यभाग इराणच्या आग्नेय भागाशीं जोडणारा रेल्वेचा फांटा गुदस्ता (१९२५) तयार करण्यांत आला असून तो या रेल्वेशीं जोडण्यांत आला आहे. खैबरखिंडीमधूनहि एक रेल्वे नेली आहे. शिवाय ब्रिटिश अमदानीस सुरुवात झाल्यापासून बरेच रस्ते तयार झाले आहेत. टपालाकरतिां टांगे ठेवण्यांत आले आहेत. सिंधू, स्वात व काबूल या नद्यांतून नावा चालतात. सिंधूतून बराच व्यापार चालतो. सिंधूच्या पात्रावर कांहीं ठिकाणीं होडयांचे पूलहि केलेले आहेत.

पाऊसपाणी पुरेसें पडत असल्यामुळें येथें दुष्काळाचें जाज्वल्य स्वरुप दृष्टीस पडत नाहीं. शिवाय येथील लोक निव्वळ शेतकीवर अवलंबून राहाणारे नाहींत. ते जात्याच मेहनती असल्यामुळें पोटापाण्याच्या नवीन नवीन उद्योगधंद्यांचें अवलंबन करण्याकडे त्यांची प्रवृत्ति विशेष असते. कोणी सैन्यांत दाखल होतात तर कोणी पोलिसांत नोकरीसह राहतात. १९१४ त पुरा झालेला उत्तर स्वात नदीचा कालवा व त्याहून बराच लहान असा पहारपूर कालवा यामुळें शेतकरी लोकांस बराच फायदा मिळणार आहे.

प्रांताचा कारभार एका चीफकमिशनरच्या हातीं असतो व हाच गव्हर्नर-जनरल इन् कौन्सिलचा एजंट असतो. याच्या हाताखालीं (१) राजकीय खात्यांतील अधिकारी; (२) प्राव्हिन्शिअल सिव्हिल सर्व्हिसमधील नोकर; (३) सबॉर्डिनेट सि.स. मधील नोकर; (४) लष्कर, स्थापत्य, शिक्षण, व जंगल या खात्यांत तज्ज्ञ म्हणून घेतलेले अधिकारी वगैरे असतात. प्रान्तांतील ब्रिटिश प्रदेशाचे ५ जिल्हे केले आहेत. पैकीं डेराइस्माईल खान सर्वांत मोठा असून (क्षेत्रफळ ३४०१ चौरस मैल) बन्नू सर्वांत लहान (क्षेत्रफळ १६७५ चौरस मैल) आहे.प्रत्येक जिल्ह्या्वर एका डेप्युटी कमिशनरची नेमणूक असते. प्रत्येक जिल्ह्याच्या २ ते ५ तहशिली पडल्या आहेत. तहसिलीचा मुख्याधिकारी तहशीलदार असतो. शिवाय तहशिलदाराच्या हाताखालीं बरेचसे कानगो व पटवारी असतात. प्रत्येक खेडयांत एक किंवा एकाहून अधिक पाटील सारा गोळा करण्यास असून शिवाय चौकीदार असतात. पोलिटिकल एजन्सी दीर, स्वात, चित्रळ, व कुर्रम, खैबर या पांच व उत्तर आणि दक्षिण वझिरिस्तान. प्रत्येकीवर एका पोलिटिकल एजंटची नेमणूक असते.

दीरच्या संस्थानिकास खान म्हणतात. दिवाणी फौजदारीचें सर्वांत मुख्य कोर्ट ज्युडिशिअल कमिशनरचें आहे. त्याच्या मदतीस पेशावरचे व देराजतचे दोन डिव्हिजनल सेशनजज्ज आहेत. दोन मुन्सफांनां स्मालकॉजकोर्टाचा अधिकार आहे.

इन्डियन पिनल व क्रिमिनल प्रोसिजर कोडांची अंमलबजावणी पोलिटिक एजन्सीमधून देखील करतात. उत्तर व दक्षिण वझिरिस्थानचे व कुर्रमचे पोलिटिकल एजंट यांनां डिस्ट्रिक्ट म्याजिस्ट्रेटचा व कोर्ट ऑफ सेशनचा  अधिकार आहे. रॅजिस्ट्रेशनच्या खात्यावर मुख्य नेमणूक रेव्हिन्यू कमिशनरची आहे.

ह्या प्रान्तांतील जिल्ह्याची जमाबंदीपध्दत पंजाबप्रमाणेंच आहे. एका राष्ट्रजातीकडे कांहीं जमीन असते; तिचे टप्पे किंवा भाग पाडलेले असतात. टप्प्याच्या लहान भागास 'कंडी'म्हणतात. व 'कंडी'च्या पाडलेल्या भागास 'बख्रा' म्हणतात. शिवाय कंडीच्या जमीनीच्या सुपिकतेप्रमाणें 'वंड' भाग केलेले असतात. तेव्हां एका वख्रयामध्यें एक किंवा एखाहून अधिक 'वंड' शेतें येऊं शकतात. कांहीं वर्षेंपर्यंत जमिनीची विभागणी करुन देणें ह्यास 'वेश' ही संज्ञा आहे. हा काल पांच वर्षांहून अधिक व वीसवर्षांहून कमी असतो. 'वेझ' प्रमाणें कुटुंबांतील प्रत्येक पुरुषास, स्त्रीस व मुलास जमिनीचा हिस्सा मिळतो. एजन्सीपैकीं फक्त कुर्रम व उत्तरवझिरिस्तान (म्हणजे टोचीचें खोरें) ह्या ब्रिटिश सरकारास सारा देतात.

१८६७ ते १८७३ सालच्या दरम्यान कोहट सोडून सर्व जिल्ह्यांच्या मुख्य ठिकाणीं म्युनिसिपालिटया स्थापन करण्यांत आल्या. प्रत्येक जिल्ह्यांत एक एक डिस्ट्रिक्ट बोर्ड आङे. ह्या प्रान्तांत एक कॉलेज असून तें पंजाबच्या विश्वविद्यालयास जोडलेलें आहे. जेथें राज्यकारभार ब्रिटिशांच्या हातीं आहे अशा जिल्ह्यांतून शें. १७ पुरुष व ७ बायका साक्षर आहेत.

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .