प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

वायुभारमापक:- या यंत्रानें वातावरणाचा भार मापतां येतो. या यंत्राच्या निरनिराळया जाती  आहेत; ग्यालिलिओनें शोषक पंपाचें कार्य कोणत्या तत्त्वावर होतें याविषयीं खुलासा करण्याचा प्रयत्न प्रथमतः केला. तत्पूर्वी अशी समजूत होती कीं, सृष्टींला शून्यावकाशाचा (व्हॅक्यूम) तिटकारा आहे. त्यामुळें पंपाच्या योगानें निर्वात झालेल्या स्थळीं पाणी चढतें. ग्यालिलिओच्या वेळीं एकदां पंपानें पाणी खेचण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु पंप आणि पाणी यांच्या पातळीमध्यें ३२  फुटांपेक्षा जास्त अंतर होतें; त्यामुळें पाणी वर चढेना; पाणी बत्तीस फुटांपर्यंत चढत असे याचें कारण जुन्या शास्त्रज्ञांस सांगता येईना. ग्यालिलिओचें असें मत पडलें कीं, सृष्टीला ३२ फुटांपेक्षां जास्त अंतरावर असलेल्या शून्यत्वाची भीति वाटत नाहीं. अशा प्रकारचें आपलें मत देऊन त्यानें या गोष्टीचा तपास करण्यास इव्हान्जेलिष्टा टारिसेली नामक आपल्या शिष्यास सुचविलें. टारिसेली याला स्वयंस्फूर्तीनें असें वाटूं लागलें कीं, हवेला वजन आहे. व ३२ फूट इंचीच्या पाण्याच्या स्तंभाच्या दाबाइतका दाब हवेचा असावा. त्यानें आपल्या मताच्या पुष्टीकरितां पुढीलप्रमाणें प्रयोग केला. पारा पाण्यापेक्षां साडेतेरा पट जड आहे; तेव्हां वातावरणाच्या दाबानें २॥ फूट उंचीचा एक कांचेची नळी घेऊन तिचें एक टोंक वितळवून बंद केलें व तिच्यांत पारा भरुन तिच्या तोंडास बोट लावून ती नळी एका पा-याच्या पात्रांत उभी केली; तेव्हां त्याच्या अंदाजाप्रमाणें ३० इंच उंचीपर्यंत पा-याचा स्तंभ उभा राहिला व त्यावर अगदीं निर्वात अशी जागा राहिली. या निर्वात स्थळास टॉरिसेलीची निर्वात पोकळी असें नांव शास्त्रज्ञांनीं दिलें, व या प्रयोगास टॉरिसेलीचा प्रयोग असें नांव पडलें. रेने डेकार्ट आणि ब्लेस पास्कल यांनीं असें अनुमान बांधलें कीं, जर उंचावर टॉरिसेलीची नळी नेली तर पा-याच्या स्तंभाची उंची कमी होईल; त्याप्रमाणें उंच पर्वतावर जाऊन टॉरिसेलीचा प्रयोग करुन पाहतां हें अनुमान खरें ठरें. कारण डोंगरावर जितक्या उंचीचा पारद-स्तंभ राहतो त्यापेक्षां जास्त उंचीचा पारद-स्तंभ खालच्या मैदानांत उभा राहतो असें प्रयोगानें सिद्ध झालें आहे. यानंतर थोडयाच कालांत असें निदर्शनास आलें कीं, ढग, पाऊस, वारा इत्यादिकांच्या योगानें फेरफार होणार असला तर पा-याच्या स्तंभाच्या उंचींत फेरफार होतो. हें समजल्यापासून वायुभारमापक यंत्राचा हवामान-दर्शक घडयाळाप्रमाणें उपयोग होऊं लागला; परंतु बॉइल नांवाच्या शास्त्रज्ञानें असें दाखवून दिलें कीं, याप्रमाणें हवेविषयीं काढललें अनुमान अगदीं बिनचूक असत नाहीं जों जों जास्त उंचीवर जावें तों तों पारद-स्तंभाची उंची कमी कमी होत जाते; यावरुन एखाद्या स्थळाची उंची काय आहे हें वायुभारमापपक यंत्राच्या योगानें काढतां येऊं लागलें आहे.

पारद:- स्तंभांत होणारा फेरफार मोठ्या प्रमाणावर दिसावा एतदर्थ अनेक योजना सुचविण्यातं आल्या आहे. त्यांपैकीं एका योजनेंत कांचेच्या नळीच्या वरील टोंकाची बाजू बरीचं विस्तृत केलेली असते. वरच्या टोंकाला पाण्यानें भरलेली एक अति सूक्ष्म बाटली ठेवलेली असते. या बाटलींतील पाण्याची वाफ होऊन तिचा दाब पा-याच्या स्तंभावर पडतो व त्यामुळें वातावरणांत होणारा फरक जरी अति सूक्ष्म प्रमाणांत असला तरी पारद-स्तंभांत तो तेव्हांच दृग्गोचर होतो. पाण्याच्या योगानें या यंत्रांत कांहीं दोष राहतात ते नाहींसे करण्याकरितां पाण्याऐवजीं मिथिल सालिसायलेट नांवाच्या प्रवाही पदार्थाचा उपयोग करतात. या प्रकारचें एक वायूभारमापक यंत्र सी.ओ. बाट्रम नांवाच्या संशोधकानें तयार केलें आहे; त्याच्या योगानें .००१ इंचाइतका फरक नुसत्या डोळयांनीं पाहतां येतो.

वक्रनलिकावायुभार मापक (सायफन बॅरोमिटर):- एका नलिकेंत पारा भरून ठेवितात. बाहेरच्या तोंडाशीं पा-याची जी उंची असते त्या उंचीपासून पारद-स्तंभाची उंची मोजतात. या प्रकारच्या वायुभारमापक यंत्राला केशाकर्षणामुंळें होणारा फरक दुरुस्त करुन घ्यावा लागत नाहीं; परंतु बाहेरच्या उघडया तोंडाशीं हवेंतून घाण येऊन हें यंत्र थोडयाच कालांत अनियमित होतें.

कुंडवायुभार मापक (सिस्टर्न बॅरोमिटर):- कुंडवायुभारमापक यंत्राचा बहुतेक ठिकाणीं उपयोग करतात. या प्रकारच्या यंत्राचे निरनिराळे प्रकार आहेत; पण यांतील मुख्य तत्त्व असें:- एक नळी पा-यानें भरुन व तिच्या तोंडास बोट लावून ती एका पार्‍याच्या पात्रांत उभी करतात. नळींतील पा-याची उंची व पात्रांतील पार्‍याची उंची यांतील अंतराइतका हवेचा दाब असतो. नळीच्या   केशाकर्षणाच्या योगानें पार्‍याच्या उंचींत थोडीशी तफावत पडतेच; व ती दुरुस्त करुन घ्यावी  लागते. उष्णतेच्या योगानें पार्‍याच्या घनत्वांत फरक पडतो व त्यायोगें पारदस्तंभाच्या उंचींत फरक पडतो; याकरितां उष्णमानाच्या अनुरोधानें दुरुस्ती करुन घ्यावी लागते.

अनार्द्रवायुभारमापक:- आकाशांतील विमानांत किंवा समुद्रावरील जहाजांत वरील प्रकारचें वायुभारमापक उपयोगांत आणतां येत नाहीं. विमान किंवा जहाज हें सारखें डुलत-हलत असतें; त्यामुळें वायुभारमापक यंत्राची नळी क्षितिजाशीं लंब करुन रहात नाहीं त्यामुळें पारद-स्तंभाची उंची सारखी रहात नाहीं. याकरितां एका विशिष्ट प्रकारच्या वायुभारमापक यंत्राचा उपयोग करतात. या वायुभारमापक यंत्रांत प्रवाही द्रव्याचा उपयोग करीत नाहींत. अतिशय पातळ अशा धातूच्या पत्र्याची एक पेटी (किंवा डबी) केलेली असते; ही डबी निर्वात केलेली असते; वातावरणांतील वायुभारांत जसजसा फरक पडतो तसतसा डबीच्या आकारमानांत फरक पडतो. या डबीस एक उच्चालकसरणी (सिस्टीम ऑफ लेव्हल) जोडतात. शेवटचा उच्चालक युक्तीनें एका चक्रास जोडलेला असतो; या चक्रास एक कांटा असतो. हवेच्या दाबांत फरक झाला म्हणजे डबीच्या आकारमानांत फरक होतो व त्यामुळें कांटा पुढें मागें हलतो व त्यावरुन हवामान समजूं शकतें.

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .