विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वासवा:- राजपुताना. जयपूर संस्थानच्या दावस निजामतीमध्यें वासवा तहशिलीचें मुख्य ठिकाण. हें रजपूताना माळवा रेल्वेवर आहे. लोकसंख्या सुमारें ६०००. या शहराभोंवतीं मातीच्या भिंती असून त्या बर्याच जागीं पडलेल्या आहेत. व लहान किल्ला पडलेला आहे. रेल्वे स्टेशनजवळ एप्रिलमध्यें यात्रा भरत असून यात्रेस ७००० ते ८००० मुसुलमान येतात. शहराजवळ कांहीं जुने राजवाडे, हौद व हरचंद राजाची छत्री आहे.