विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वासोटा:- मुंबई, सातारा जिल्हा, जावळी तालुक्यांतील एक डोंगरी किल्ला. शिवाजीनें वासोटा १६५५ त घेतला. त्याच्या पूर्वी हा शिर्के व मोरे यांच्या वहिवाटीस असे. प्रतिनिधीला सोडविण्याकरितां ताई तेलिणीनें हा किल्ला घेऊन बापू गोखल्याविरुद्ध बरेच दिवस लढविला ('ताई तेलीण' पहा) १८१७ त खडकीची लढाई झाल्यावर हा इंग्रजांच्या हातीं लागला.