विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
विक्रमपूर:- बंगाल, डाका जिल्ह्यांत मुनशीराज पोटविभाग या नांवाचा परगणा व शहर. येथें वंग देशांतील सेन राजांची राजधानी होती. विक्रमादित्याची राजधानी सध्यांच्या रामपाल खेडयाजवळ होती असें म्हणतात. येथें संस्कृत शिकण्याच्या शाळा आहेत.