विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
विजयदुर्ग, बंदर:- मुंबई, रत्नागिरी जिल्हा, देवगड तालुक्यांतील एक बंदर, हें मुंबईपासून दक्षिणेस १७० मैल आहे. लो.सं. (१९०१) २३३९. पश्चिम किनार्यावरील बंदरांत विजयदुर्ग हें उत्तम प्रकारचें बंदर असून पावसाळयातं देखील बंदरांतील कामें कांहीं अडथला न होतां चालूं शकतात.
किल्ला:- येथील विजयदुर्ग किल्ला कोंकणपट्टींत अतिशय मजबूत समजला जातो. हा मूळचा ७ व्या शतकांत बांधलेला असून त्यांत शिवाजीनें पुष्कळ सुधारणा केल्या. म्हणून तो शिवाजीनेंच बांधला असें सांगण्यांत येतें. १६९८ त चांचे लोकांचे नाईक जे आंगरे त्यांचें हें मुख्य स्थान होतें. १७५६ त विजयदुर्ग इंग्रजांनीं घेऊन बाणकोटच्या मोबदल्यांत पेशव्यांच्या स्वाधीन केला. पुढें १८१८ त हा इंग्रजांकडे आला.