प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

विजापूर, जिल्हा:- मुंबई, दक्षिण विभाग. क्षेत्रफळ ५६६९. मर्यादा - उत्तरेस भीमा; पूर्वेस निजामचें राज्य; दक्षिणेस मलप्रभा नदी व पश्चिमेस मुधोळ, जमखिंडी व जत हीं संस्थानें. कृष्णेच्या प्रवाहानें या जिल्ह्याचे दोन भाग झाले आहेत. यांत लहान लहान गोल टेंकडया आहेत. जमीन जवळ जवळ नापीक आहे. डोण नदीच्या पाणवठयाचा भाग फार सुपीक आहे. यांत टेंकडयांच्या दोन रांगा आहेत. या रांगामधील भाग अगदीं खराब आहे. नद्या भीमा, डोण, कृष्णा, घटप्रभा व मलप्रभा या आहेत. डोणखेरीज इतर नद्यांस उन्हाळयांत पाणी असतें. एकंरींत येथील हवा निरोगी व कोरडी आहे. मार्च व एप्रिल महिन्यांत उष्णता फार असते व ती कधीं कधीं १०९ अशांवर जाते. पाऊस वेळच्यावेळीं पडत नाहीं. सरासरी दरसाल २०-२५ इंच पाऊस पडतो व जोराचे वारे नेहमीं वाहात असतात.

इतिहास:- या जिल्ह्यांतील ऐहोळ, बदामी, बागलकोट, धुलखेड (इंदीमध्यें), गलगली वगैरे शहराविषयीं दंतकथा आहेत. हीं गांवें दंडकारण्यांत होतीं असें पुराणांत वर्णिलें आहे. टॉलेमीनें बदामी, इंदी व कलकरी  नांवांचा नामनिर्देश आपल्या ग्रंथांत केला आहे. ऐतिहासिक दृष्टया बदामी हें प्राचीन शहर आहे. येथें पल्लव राजांचा किल्ला होता. सहाव्या शतकांत चालुक्यवंशीय पहिल्या पुलकेशीनें बदामी पल्लवापासून जिंकून घेतली. या वेळेपासून तों मुसुलमान लोकांच्या स्वार्‍या होईपर्यंतच्या काळाचे ४ भाग पडतात ते असे (१) पूर्व व उत्तर चालुक्यांचा काल (इ.स. ७६० पर्यंत); (२) राष्ट्रकूटांचा काल (७६०-९७३); (३) उत्तर चालुक्य, व होयसळ बल्लाळांचा काळ (९७३-११९०); मध्यंतरीं ११२०-११८० या काळांत सिंदाचें (मांडलिक) घराणें या प्रांतांत राज्य करीत होतें; (४) ११९० ते १३ व्या शतकाअखेर देवगिरीच्या राजांचा काल. १२९४ सालीं अल्लाउद्दींन खिलजीनें महाराष्ट्रांत स्वारी करुन देवगड घेतलें व तेथील यादववंशीय राजास आपलें स्वामीत्व कबूल करावयास भाग पाडलें. पंधराव्या शतकाच्या मध्यकालीं यूसुफ आदिलशहानें विजापूर येथें आदिलशाहीची स्थापना केली. 'आदिलशाही' पहा. १८१८ नंतर हा मुलूख सुमारें ३० वर्षें सातारच्या राजाकडे होता. पुढें १८४८ सालीं इंग्रज सरकारकडे आला.

सातव्या शतकांत चीन देशाचा प्रसिध्द प्रवासी ह्युएनत्संग हा बदामी येथें आला होता. त्यानें चालुक्यांच्या कारकीर्दीतील त्यांच्या प्रजेचें, व राज्याचें वर्णन करून त्याविषयींचें आपलें उत्कृष्ट मत आपल्या ग्रंथांत नमूद केलें आहे. येथील राज्याचा विस्तार १२०० मैल होता असें त्यानें लिहिलें आहे.

या जिल्ह्यांत पुष्कळ ठिकाणीं शिलालेख सांपडले आहेत त्यांपैकीं अरसीबिडी, ऐहोळ व बदामी येथील फार प्रसिध्द व महत्वाचे आहेत. पट्टदकल येथें द्राविड धर्तीवर बांधिलेलीं देवालयें आहेत. हुनगुंद तालुक्यांत संगम येथें संगमेश्वराचें देऊळ आहे तें फार प्राचीन आहे. विजापूर शहरांत उत्कृष्ट मशिदी व इमारती आहेत १९२१ सालीं लोकसंख्या ७९६८७६ होती. विजापूर बागलकोट, व तालीकोट हीं मुख्य शहरें आहेत. शेंकडा ८० लोक कानडी बोलतात. वरील लोकसंख्येंत सुमारें शेंकडा ८८ हिंदु व ११ मुसुलमान आहेत. हिंदु लोकांत ब्राह्मण, लिंगायत, मराठे, बेरड, कुरुव, कवलिगर, पांचाळ व वडर या जाती आहेत, बनजिंग व्यापार करितात. पंचम साळी उत्तम शेती करतात. बनजिग व पंचमसाळी हे लिंगायत लोकांतील पोटभेद आहेत. शेंकडा ६५ लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेंकडा १८ वीणकाम वगैरे धंदे करतात. या ठिकाणीं रयतवारी पद्धत अंमलांत आहे. इनाम व जाहगीर. जमिनीचें क्षेत्रफळ ६५० चौरस मैल आहे. ५६७० चौरस मैलांपैकीं ४९४८ चौरस मैल जमीन वहीत आहे. जोंधळा, बाजरी, गहूं, मका, तूर, कुळीथ, हरभरा, मूग, मीठ, कापूस, एरंडी, तीळ व करडई हीं पिकें होतात. हवा गुरांस मानवते व चारा मुबलक असल्यामुळें तीं चांगलीं आहेत. केंडूर येथें प्राचीन काळचा तलाव आहे. त्याचें पाणी शेतीच्या उपयोगी पडतें. अलीकडे बागलकोटच्या जवळ एक तलाव शेतीसाठीं बांधिला आहे. आदिलशाहीच्या काळचे तलाव ममदापूर येथें आहेत. सरकारी राखीव जंगल कृष्णा व धारवाड जिल्ह्यांत धरलें आहे. त्याचें क्षे.फ. २८९ चौरस मैल असून यांत बांभूळ, लिंब, बांबू, जांब व बोर हीं झाडें आहेत. जिल्ह्यांत मलप्रभेंत सोनें सांपडतें. कजाडोनी येथें तांबें व कृष्णेच्या दक्षिणभागीं लोखंड सांपडतें,वाळूचे दगड, जंबूर चुनखडी, स्लेटीचे दगड, ग्रॅनाइट हेहि सांपडतात. ग्रॅनाइट दगडाचा इमारतीच्या कामीं उपयोग होतो. जिल्ह्यांत हातमागावर सुती आणि रेशमी कापड चांगलें काढितात. चांगलीं कांबळींहि होतात. निर्गतमाल मागावरील कापड व धान्यें, आयातमाल कापड, तांदूळ, नारळ, मीठ, पानें (विडयाचीं), गूळ इत्यादि. मीनगड येथें गुरांचा व्यापार भरतो. सदर्न मराठा रेल्वेचा फांटा या जिल्ह्यांतून गेलेला आहे. याखेरीज सातारा-विजापूर, सोलापूर हुबळी, बेळगांव इलकल वगैरे मोठया रस्त्यांशीं या जिल्ह्याचे रस्ते जोडलेले आहेत. या जिल्ह्यांत नेहमीं दुष्काळ पडतात. या जिल्ह्याचे आठ तालुके केले आहेत. इतर जिल्ह्यांतल्याप्रमाणेंच येथें न्याय व पोलीस खात्याची व्यवस्था केलेली आहे. चोरी, दरवडे, आग लावणें व खोटीं नाणीं पाडणें हे गुन्हे फार घडतात. विजापूर, बागलकोट व गुलेडगड येथें म्युनिसिपालिटया आहेत. इतर ठिकाणीं म्युनिसिपालिटीचें काम डिस्ट्रिक्ट बोर्डाकडे आहे. साक्षरतेचें प्रमाण (पुरुषांत ९ व बायकांत १) एकंदर ४.६ आहे.

तालुका:- विजापूर जिल्ह्यांतील पश्चिमेकडील तालुका. क्षेत्रफळ ८६९ चौरस मैल. यांत विजापूर हें मुख्य गांव आहे व खेडीं ९४ आहेत. लोकसंख्या (१९२१) ११९१२०. डोण नदीचा भाग या तालुक्याच्या आग्नेयीस आहे.

शहर:- विजापूर अथवा विजयपूर हें ह्या जिल्ह्याचें मुख्य ठिकाण आहे. हें मद्रास सदर्न मराठा रेल्वेच्या फांटयावर आहे. लोकसंख्या २५०००  १८५४ सालीं येंथें  म्युनिसिपालिटी स्थापन झाली.  येथें धान्याचा व गुरांचा फार मोठा व्यापार चालतो. येथें शाळा, इस्पितळें वगैरे जिल्ह्याच्या ठिकाणीं असणार्‍या सर्व संस्था आहेत. येथील जुन्या इमारतींवरून या गांवच्या प्राचीन वैभवाची साक्ष पटते. इब्राहीम रोझा हें दुसर्‍या इब्राहीम आदिलशहाचें थडगें येथें आहे. गोल घुमट हें महंमद आदिलशहाचें थडगें होय. याखेरीज आनंद महाल, आसर महाल, जुम्मा मशीद, मेहतर महाल,  सात मजली वगैरे प्रेक्षणीय इमारती आहेत. बेगम तलाव, तोख नांवाचा पाण्याचा नळ व तासवानजी यांवरून या शहरास पाण्याचा पुरवठा करण्यासाठीं पूर्वी कोणत्या योजना अंमलांत आणिल्या होत्या हें लक्षांत येण्यासारखें आहे. अल्ली आदिलशहानें विजापूरचा तट, जुम्मा मशीद वगैरे इमारती बांधिल्या व नळ बांधून गांवांत पाणी आणिलें. इंग्रज सरकारनें येथील इमारतींची दुरुस्ती करुन त्या आपल्या देखरेखीखालीं ठेविल्या आहेत.

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .