प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

विझगापट्टम्, जिल्हा. (वैशाखपट्टनम् म्हणजे विशाखेचें शहर):- ४५६८ चौरस मैल. याच्या पूर्वेस बंगालचा उपसागर; उत्तरेस गंजम जिल्हा, दक्षिणेस गोदावरी जिल्हा; व पश्चिमेस मध्यप्रांत आहे. विझगापट्टमचा बहुतेक भाग डोंगराळ आहे. डोंगराळ प्रांतांत वन्य पशू जास्त जरी म्हणतां यावयाचे नाहींत तरी क्षेत्रफळाच्या मानानें कमी नाहींत. जंगली रेडे पुष्कळच आहेत. विझगापट्टम् जिल्ह्याचें मुख्यच गांव विझगापट्टम् (वाल्टेर) होय. येथील हवा फक्त हिंवाळयांत उत्तम असते. पावसाचें मान जयपूरच्या घाटांतील पावसावर जास्त अवलंबून असून किनार्‍यावर कमी असतें. जास्त मान म्हणजे ६६ इंच असून कमी प्रमाण २८ इंच असतें.

इतिहास:- प्राचीन काळीं या ठिकाणीं कलिंगांचें राज्य होतें.परंतु तंजावरच्या चोल राजांनीं विझगापट्टम् येथें १०० वर्षेपर्यंत राज्य केलें १५१५ सालीं विजयानगरच्या राजांनीं विझगापट्टमवर स्वारी केली होती. मुसुलमानांनीं उत्तरसरकार स्थापून कांहीं दिवस विझगापट्टम् येथें राजसत्ता भोगिली. सतराव्या शतकांत ईस्ट इंडिया कंपनीनें विझगापट्टम् येथें वखार स्थापन केली. फ्रेंच सरदार बुसीहा या वेळेस विझगाटपट्टम् येथें असून विजायनगरच्या जमीनदारांचें त्याला चांगलें पाठबळ होतें. बोबिलीचे जमीनदार व विजयानगरचे जमीनदार या दोघांत पुष्कळ दिवसांपासून हाडवैर होतें. १७९४ सालीं विजयानगरचा राजा व इंग्रज यांच्यामध्यें खटका उडाला व इंग्रजांची सरशी होऊन सर्व प्रांत इंग्रजांकडे आला. इंग्रजांनीं कांहीं मुलूख विजयानगरकडे ठेवून बाकीच्या मुलुखाचे ३ जिल्हे केले. १८०२ सालीं जमीनीची कायमची पहाणी झाली. खालसा व जहागीर असे दोन मुख्य भेद या जिल्ह्यांत आहेत. जिल्ह्यांत जुने पौराणिक अवशेष अस्तित्वांत आहेत. जुनीं देवालयें व किल्ले पडक्या स्थितींत आढळतात. पद्मभाग, रामतीर्थ व उप्ताक येथील कामें श्रेष्ठ दर्जाचीं असून प्रेक्षणीय आहेत.

लोकवस्ती:- मद्रास इलाख्यांत दाट वस्ती विझगापट्टमची असून मोठीं शहरें १२ व खेडीं १२०३२ आहेत. १९२१ सालीं एकंदर लोकसंख्या २२३१८७४ होती. सरकारी तालुके फक्त दोनच आहेत (सर्वसिध्दि व गोवळकोंडा). बाकीचे जमीनदारी तालुके आहेत. विझगापट्टम्, विजयानगर, अंकापल्ली व विमलीपट्टम् हीं जिल्ह्यांत मुख्य शहरें आहेत. जिल्ह्यांच्या दक्षिण भागांत तेलगु भाषेचा प्रचार आहे. जमीनदारी भागांत भाषांची सर्व भेसळ झालेली आहे. मुख्यत्त्वेंकरुन उदरनिर्वाहाचा धंदा शेती होय.

शेतकी:- जिल्ह्याची जमीन बहुतेक लालसर रंगावर असून तींत चुनखडी व रेतीचा अंश बराच  असतो. डोंगराळ पट्टी यापैकी असते. एकंदर क्षेत्रफळापैकीं शे. ३२ तांदुळाकडे व शें. २४ रागीकडे असून कडधान्याची शेंकडा २१ प्रमाणात लागवड केली जाते.  तिळाचे पीक शेंकडा १३ प्रमाणांत असून ऊंस, कापूस व तंबाखू यांचें पीक उत्कृष्ट जमिनींत विपुल येतें. निळीचें पीक पूर्वी अतिशय होत असे. परंतु जर्मन रंगामुळें नीळीचा लोप होऊन गेला. शेतकीच्या शास्त्रीय ज्ञानाचा प्रसार शेतकरी लोकांत पद्धतशीर नाहीं. इकडील शेतकर्‍यांची रहाणी साधी असून फार काटकसरीची असते. गुरांचा सांठा कामापुरता असून गुरें निरोगी ठेवण्याची ते फार काळजी घेतात.

जयपूर जमिनदारींतील जंगल व इंद्रावती नदीच्या दक्षिण व पश्चिम भागावरील जंगल मोठें आहे. जयपूरच्या जंगलांत इमारती लांकडावर सारा फार आहे. राखीव जंगल ३०० चौरस मैल आहे. उद्भिज्जांसंबधानें विझगापट्टम् जिल्ह्यांत फारसें नमूद करण्यासारखें कांहीं नाहीं. गजपतिनगरम्, विजयानगरम् व चिपरुपल्ली तहशिलींत मँगेंनीज निघू लागलें आहे.

व्यापार व दळणवळण:- या जिल्ह्यांत महत्त्वाच्या कला आणि कारखाने फारसे नाहींत. विझगापट्टम् शहरांत हस्तिदंती जिन्नस, कांसवाचया पाठीच्या जिनसा वगैरे शोभेचा माल तयार होतो. हातमागावरील कापड बहुतेक सर्वत्र निघतें. आयात मालामध्यें कापूस, कापड, सूत, लोखंडी सामान आणि साग हीं असून निर्गत मालांत मँगेंनीज, कातडीं, धान्य व गूळ हीं येतात. जिल्ह्यांच्या दक्षिण भागांत दळणवळणाच्या सोई अनेक आहेत. जिल्ह्याचे ४ पोटविभाग केले आहेत. यांत १४ तालुके व जमीनदारी भाग वांटले गेले आहेत.

विझगापट्टम्, विजयानगरम्, विमलीपट्टम् व अंकापल्ली या ४ ठिकाणीं म्युनिसिपालिटीची स्थापना झालेली आहे. या जिल्ह्यांत दर दहा हजार लोकांत ४७४ लोक साक्षर आहेत व सुमारें १५० इंग्रजी जाणणारे आढळतात.

तहशील:- क्षेत्रफळ १७५ चौरस मैल. लोकसंख्या ११४६६५. तालुक्यांत मुख्य शहर विझगापट्टम् व खेडयांची संख्या ७६ आहे. हा प्रदेश डोंगराळ असून विझगापट्टमच्या उत्तरेस कैलास नांवाचें एक उंच स्थान आहे.

शहर:- विझगापट्टम् जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. हें रेल्वेनें मद्रासपासून ४८४ मैल कलकत्यापासून ५४७ मैल आहे. लोकसंख्या ४४७११. हें बंदर असून त्याचा एक भाग समुद्रांत पुढें गेलेला आहे त्याला 'डाँलफिन     बेनोज' असें म्हणतात. थोडेसें पुढें गेल्यावर वालटेर नांवाचें शहर लागतें. तें समुद्रकांठीं असून फारच हवाशीर असल्यामुळें जिल्ह्यांतील अधिकारी व यूरोपियन या ठिकाणीं राहतात. डाँलफिन नोजजवळ सांप्रत गलबतें नांगरतात. विझगापट्टम् शहराचा जुना इतिहास १७ व्या शतकापासून सुरु होतो. १६८९ सालीं अवरंगझेब बादशहानें आपल्या लष्कराचा तळ येथें दिला होता. व १७५७ सालांत येथें बुसीच्या हाताखालीं फ्रेंच लोकांची वसाहत झाली होती. येथें १८६६ सालीं म्यु. कमिटीची स्थापना झाली. येथील तुरुंगांत सतरंज्या, घोंगडया, नारळाचीं दोरखंडें व चटया तयार होतात. कारागिरीचीं व खोदींव कामें विझगापट्टम् येथें फारशीं होत नाहींत. शहराची प्रसिध्दि फक्त दर्या व्यापाराकरितां आहे. म्हणजे विझगापट्टम् हें पूर्वेकडील अति सुंदर व सोईचें असें बंदर आहे. येथून परदेशी जाणारे जिन्नस हिरडा, नीळ, कातडीं, गूळ, साखर व म्यांगेनीज हे पदार्थ असून परदेशांतून येणारे जिन्नस कापूस, सूत, तयार कपडा, लोखंड व इमारतीचें लांकूड हे होत.

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .