विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
विंडबर्ड बेटें- हा बेटांचा समूह वेस्ट इंडीजमध्यें आहे. हा समूह सेंट लुसिआ, सेंट व्हिन्सेन्ट, ग्रानाडा व ग्रानाडाईन्स ह्या बेटांचा बनलेला आहे. तीन वेगळाल्या वसाहतींचा हा समूह असून त्यांवर एक गवर्नर इन चीफ असतो. हा ग्रानाडांत सेंट जॉर्जेस येथें राहतो. कायदे करणें, जमाबंदी व कर ह्या बाबतींत प्रत्येक बेट स्वंतत्र आहे. ईशान्येकडून येणार्या व्यापारी वार्याच्या तोंडाशींच हीं बेटें असल्यामुळें त्यास विंडवर्ड असें नांव मिळालें.