प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

विणकाम अथवा विणणें (वीव्हिंग)- मनुष्य अज्ञानावस्थेंत होता त्यावेळीं तो शरीराचें रक्षण अंगास रंग लावून करीत होता. पुढें झाडांच्या साली अंगाभोंवतीं वेष्टून मनुष्य राहूं लागला. त्यानंतर निरनिराळ्या वनस्पतींचे दोर काढून त्यांचें कापड तयार करून त्यानें आपलें अंग झाकू लागला. कांही देशांत जनावरांचीं कातडीं पांघरूनहि लोक आपल्या शरीराचें रक्षण करीत होते. व अद्यापहि अशा रीतीनें कातड्याचा पुष्कळ ठिकाणीं उपयोग करण्यांत येतो. निरनिराळ्या वनस्पतींचे दोरे काढून त्यांची वस्त्रें करूं लागले, त्याचीच पुढें जास्त सुधारणा होऊन हल्लींचीं सुताचीं, लोंकरीचीं, रेशमाचीं व तागाचीं वस्त्रें बनूं लागलीं. कोणतेंहि कापड विणावयाचें झालें तरी त्याला पहिल्यानें त्या जातीचें सूत तयार करावें लागतें. कापड विणण्याच्या कामांत ज्या देशांनीं आघाडी मारली त्यांत हिंदुस्थानचा नंबर पहिला होता. हिंदुस्थानांत फार प्राचीन काळापासून उत्तम तर्‍हेचें कापड तयार होत असे व त्याचा व्यापार सर्व देशांशीं होत असे. हिंदुस्थानांत जें कापड विणलें जाई तें हातानें सर्व कृति करून विणलें जाई. त्या यंत्रास हातमाग म्हणत. इकडल्या हातमागाचा नमुना विलायतेस नेऊन तिकडील लोक त्यावर कापड विणूं लागले. या देशांत हजार वर्षांपूर्वी जो हातमाग होता तसाच जवळ जवळ अद्यापहि आहे. त्यांत कोणत्याहि तर्‍हेची सुधारणा झाली नाहीं; अलीकडे धांवत्या घोट्याचे हातमाग बरेच चालू झाले आहेत. जुना हातमाग विलायतेस गेल्यावर त्याचा धांवता घोटा (''फ्लाय शटललूम'') झाला व नंतर त्याचाच सध्यांचा ''पावरलूम'' झाला. पावरलूम तयार झाल्यापासून मात्र त्यांत पुष्कळ सुधारणा झाली आहे.

स्पिनिंग- कापड विणण्याच्या कामीं सूत लागतें तेव्हां त्याविषयीं थोडीशी माहिती सांगून मग कापडाच्या माहितीकडे वळूं. शेतांतून कापूस आल्यानंतर त्यांतील सरकी ''हातरेचा'' नांवाच्या यंत्रानें काढून रुई वेगळी करतात. हें काम सुधारलेल्या रीतीनें करतात त्याला इंग्रजींत ''जीन'' म्हणतात. पिंजार्‍याकडून पिंजून घेऊन नंतर चरख्यावर त्याचें सूत काढतात. हें सूत काढण्याचें काम सुधारलेल्या पध्दतीनें हल्लीं काढलं जातें. त्याला''स्पिनिंग'' असें म्हणतात. ह्या स्पिनिंगमध्यें पुष्कळ तर्‍हेचीं यंत्रें उपयोगांत आणलीं जातात. त्यांचीं नांवें पुढीलप्रमाणें होंत.

ब्लो रूम- यांतील पहिलें यंत्र ओपनर होय, यामध्यें कापूस पिंजण्याची क्रिया स्कचर'' यंत्र (तीन यंत्रांचा एक सेट) यामध्यें कापूस पिंजून त्याचे लेप (वळकट्या) बनविण्याची क्रिया होते. हे लेप सर्व ठराविक लांबीचे निघतात व त्यामुळें त्याचा जाड पातळपणा आपणांस पाहिजे त्याप्रमाणे ठरवून घेऊन ते ठराविक वजनाचेच काढतां येतात. यानंतरचें ''कार्डिंग'' यंत्र, त्यामध्यें बारीक सारीक कचरा झडून जाऊन लेपाची स्वच्छ अशी एक वात या ठिकाणीं तयार होते. या वाती साधारण ९.१० इंच रुंद व ४ फूट उंच अशा गोल डब्यामध्यें जमा होतात.

ड्राईंग- स्कचरप्रमाणें ड्राइंग हा तीन यंत्रांचा एक सेट असतो. कार्डिंगमधून निघालेल्या कापसाच्या वातींचे सहा डबे याच्या मागें ठेवून त्या सहा वातींची पुढें एक वात करण्याचें काम या यंत्रांत होतें. मागील डब्यांतील वात साधारण जेवढी जाडी असते तेवढीच पुढें निघणारी वात होत असते; म्हणजे मागील सहा वातींची पुढें एक वात होत असतांनां ती वात सहापट ओढली जाते. पहिल्या यंत्रांतून तयार झालेले डबे दुसर्‍या यंत्राच्या पाठीमागें लाविले जातात व दुसर्‍या यंत्रांतून निघालेले डबे तिसर्‍या यंत्राच्या मागें लाविले जातात, अशा रीतीनें पहिल्या यंत्रांतून निघालेली वात सहा वातींची एक झालेली असते, दुसर्‍या यंत्रांतून निघणारी वात छत्तीस वातींची बनलेली असते व तिसर्‍या यंत्रांतून निघालेली वात दोनशें सोळा वातींची एक वात बनलेली असते. या सर्व कृतीच्या योगानें कापसांतील तंतू सरळ होणें व वात एक सारख्या जाडीची होणें हीं दोन कार्यें होतात.

स्लबिंग- ड्राइंगच्या यंत्रांतून निघालेल्या कापसाच्या जाड्या वातीचे डबे स्लबिंगच्या पाठीमागें लाविले जातात. व त्या प्रत्येक जाडवातीची करंगळीएवढी जाडी वात या यंत्रांत होते, व ती पुढच्या बाजूला लांकडाच्या नळकंड्यावर गुंडाळली जाते. या नळकंड्याला इंग्रजींत ''बॉबिन'' अशी संज्ञा आहे. व ज्या पोलादी शिगेवर ती बसवून फिरली जाते तिला स्पिंडल असें म्हणतात. यापुढें स्पिंडल व बॉबिन हे शब्द वारंवार येणार आहेत. कारण या स्पिंडला अनेक आकाराच्या व बॉबिन्सहि अनेक आकाराच्या कलेल्या असून त्यांचा उपयोग निरनिराळ्या यंत्रांत निरनिराळ्या तर्‍हेनें केलेला आहे. या करंगळीएवढ्या होणार्‍या वातींनां या यंत्रांत थोडासा पीळ दिला जातो व यापुढील यंत्रांत हा पीळ जास्त जास्त वाढत जातो व वात हळू हळू बारीक होत जाते.

इंटर मीजिएट- स्लबिंगमधून आलेल्या बॉबिन्स या यंत्रांत लावण्याकरितां मागच्या बाजूला एक बैठक केलेली असते, त्या बैठकींत या बॉबिन्स लहान लहान लांकडाच्या दांडक्यांत बसवून तीं दांडकीं बैठकींत बसविण्याची सोय केलेली असते. या बैठकीस क्रील म्हणतात. या क्रीलमध्यें या बॉबिन्स बसवून प्रत्येक दोन बॉबिन्सची वात एकत्र करतात. पुढेंती बारीक होऊन तिला थोडा जास्त पीळ पडून ती पुढें दुसर्‍या बॉबिनवर गुंडाळली जाते. या सांच्याच्या पुढचा सांचा म्हणजे रोव्हिंग. या रोव्हिंगच्या सांच्यावर दाभणासारखी जाडी वात जिच्यापासून पुढें सूत तयार होतें ती तयार होते. हा सांचा व पहिल्या प्रथम वात तयार होणारा सांचा (ज्याचें नांव स्लबिंग आहे) त्या दोहोंच्यामधील हा सांचा म्हणून याचें नांव इंटरमीजिएट ठेवलेलें आहे. गिरणीमध्यें यंत्रानें सूत निघावयास लागल्यापासून या सुताच्या जाड बारीकपणामध्यें वाटेल तसा फरक करतां येऊं लागला व त्यायोगेंकरून त्या सुताला त्याच्या जाडबारीकपणावरून निरनिराळे नंबर दिले गेले; व ज्या नंबरचें सूत काढावयाचें असेल त्यामानानें पहिल्या एकंदर यंत्रामधील निघणार्‍या मालाची जाडी ठरविली गेली व त्यामुळें या प्रत्येक यंत्रामधील निघणार्‍या मालाची जाडी ठरविली गेली. या प्रत्येक यंत्रामधील माल दिवसांतून दोन वेळ तोलून पाहिला जातो. या कृतीला रॅपिंग असें म्हणतात. ठराविक लांबीचें वजन ठराविकपणें न आल्यास त्यांत जागजागीं चक्रे बदलण्याची सोय केलेली असते व त्यायोगें ठराविक वजन आणतां येते.

रोव्हिंग– याच्या पूर्वीच्या म्हणजे इंटरमीजिएटच्या सांच्यावर तयार झालेली बॉबिन या सांच्याच्या मागें आणून लावतात व त्याच्या दोन वाती एक करून त्याची पुन्हां बारीक दाभणासारखी वात तयार होते व ती पुढें सूत निघणार्‍या यंत्रावर जाते. स्लबिंग, इंटरमीजिएट व रोव्हिंग या तिन्ही सांच्यांस घड्याळें लावलेलीं असतात. त्यावरून सांच्यावर दिवसभरांत किती काम झालें हें कळतें. व त्या कामाच्या प्रमाणावर त्या त्या सांच्यावरील काम करणारास मजुरी दिली जाते. यापुढें सूत निघण्याच्या सांचाला रिंगफ्रेंम म्हणतात. याशिवाय फ्लाय-थ्रासल व म्यूल (ज्याला इकडील लोक गाडी खातें म्हणतात) या नांवाचेहि सांचे असतात, त्यावर सूत निघतें.

प्लाय थ्रासल, म्यूल रिंगफ्रेम- या तीन जातींच्या सांच्यावर रोव्हिंगची बॉबिन लावून त्याचें सूत काढलें जातें; यापैंकीं फ्लाय थ्रासलचीं यंत्रें फार पूर्वीची होत. त्यांत सुधारणा होऊन रिंग फ्रेम्स तयार झाल्यापासून फ्लाय-थ्रासलचीं यंत्रें अजीबात बंद पडलीं. म्यूल मात्र बंद होणें शक्य नाहीं. तरी पूर्वीच्या मानानें आतां म्यूल कोणीहि वापरीत नाहींत. म्यूलच्या सांचावर निघणारें सूत कुकडीच्या रुपांत निघतें. म्हणजे यांच्या पोटांत बारीक भोंकें असून सुमारें एक इंच जाड व ६ ते १० इंच लांब असें नसुतें सूतच असतें. त्यामुळें तें इकडून तिकडे पाठविण्यास फार सोईचें पडतें. विलायतेहून इकडे येणारें पुष्कळसें सूत याच तर्‍हेनें येतें. विलायतेहून येणार्‍या कुकड्याच्या बुडाशीं लहानशी एक इंच लांबीची एक कागदाची भोंगळी आंत बसविलेली असते. तीमुळें या कुकडीच्या आंतील भोंक कायम रहाण्यास मदत होते. म्यूलमध्यें निघणारें सूत कमी पिळाचें काढतां येतें व तीमुळें त्याचा बनलेला कपडाहि जास्त भरलेला दिसतो.

रिंग फ्रेम- सूत निघणार्‍या यंत्रांत हल्लीं हिंदुस्थानांत जें यंत्र जास्त प्रचारांत आहे त्याला ''रिंग फ्रेम'' म्हणतात. रोव्हिंगच्या सांचावर तयार होणारी बॉबिन या रिंगफ्रेमवर आणून लावतात. ती बॉबिन लावण्यासाठीं या सांचावर मध्यभागीं एक बैठक केलेली असते, तिला क्रील म्हणतात. व या सांचाच्या दोन्ही बाजूंस गरगर फिरणार्‍या सुया बसविलेल्या असतात. त्यांनां इंग्रजींत ''स्पिंडल्स'' असें म्हणतात. या यंत्राच्या मध्यभागीं दोन टिनचे रुळ बसविलेले असतात व त्यांवरून दोर्‍या घेऊन त्या स्पिंडलला बांधलेल्या असतात व हे टिनचे रुळ गरगर फिरूं लागले म्हणजे या स्पिंडल्सहि फिरावयास लागतात. या स्पिंडल्सचे एका मिनिटांत सरासरी सात हजार पर्यंत फेरे होतात. वरील प्रत्येक बॉबिनवरील एका एका वातीच्या पुढें सूत निघून तें या स्पिंडल्सवर असणार्‍या लांकडी बॉबिनवर गुंडाळलें जातें. या स्पिंडल्सच्या अंगावरच मध्यें स्पिंडल्सच्या जागीं दोन तीन इंच भोंक असलेली एक बिडाची पट्टी सरासरी एक इंचापासून दीड इंचापर्यंत एकसारखी वरती खालती होऊन हळू हळू वरती चढत असते. हिला स्पिंडल्सरेल असे म्हणतात. या स्पिंडल्सरेलमध्यें स्पिंडल्सच्या जागीं जीं भोंकें असतात, त्यांमध्यें कंगोरेदार बांगड्या बसविलेल्या असतात. या बांगड्यांच्या कंगोर्‍यावर पोलादी बारीक रिंग्स बसविलेल्या असतात. वरून येणारी कापसाची तार या रिंगमध्यें अडवून नंतर स्पिंडलवरील बॉबिनला गुंडाळलेली असते, त्यायोगेंकरून स्पिंडलवरील बॉबिन फिरल्याबरोबर त्या सुताच्या योगानेंहि रिंग त्या कंगोर्‍याभोवतीं फिरूं लागते. व त्यायोगें सुताला पीळ पडून तें या बॉबिनवर गुंडाळलें जातें. अशा रीतीनें या बॉबिनवर खालपासून वरपर्यंत सूत गुंडाळलें जातें, अशा रीतीनें बॉबिन वरपर्यंत भरली म्हणजे ही स्पिंडल रेल खालीं काढली जाते व भरलेल्या बॉबिन्स काढून घेऊन त्यांच्याजागी पुन्हां रिकाम्या बॉबिन्स घालून मग पुन्हां सांचा सुरू केला जातो. या भरलेल्या बॉबिन्स काढून त्याजागीं रिकाम्या बॉबिन्स घालण्याच्या कृतीला डॉफिंग असें म्हणतात. हे सूत निघणारे रिंगफ्रेमचे सांचे दोन जातीचे असतात. या फ्रेमवर गिरणींत विणकामाला लागणारें ताण्याचें सूत व बाजारांत विकलें जाणारें सूत निघतें. दुसर्‍या जातीच्या रिंग फ्रेंमला वेफ्ट फ्रेमस म्हणतात. व त्यावर गिरणींत विणकामाला लागणारें वेफ्टचें म्हणजे बाण्याचें सूत निघतें. या वेफ्ट फ्रेम्स फक्त जेथें कापड विणण्याचे माग असतात त्याच गिरणींत असतात. कारण यावर बसणार्‍या बॉबिन्स लहान आकाराच्या म्हणजे घोट्यांत मावण्याजोग्या असतात. व त्यायोगें त्यावर सूतहि थोडें मावतें व वार्प अथवा टिस्ट फ्रेम्सवरील बॉबिन्स मोठ्या असतात व त्यामुळें त्यांत सूतहि बरेंच जास्त मावतें. या एका फ्रेमवर सरासरी ३०० स्पिंडल्स असतात व त्यांवर दररोज २० नंबरचें सूत सरासरी १०० असून १२५ पौंडांपर्यंत निघतें. वेफ्ट फ्रेम्सवर ७५-८० रत्तलापर्यंत निघतें. २० नंबरच्या सुताची सरासरी रोजीं दर स्पिंडलमागें ६ पासून ७ औंसपर्यंत निघाली म्हणजे काम चांगलें निघालें असें समजावें. तसेंच कापसाच्या किंमतीशिवाय दर रत्तल सुतामागें सूत काढण्याबाबत एकंदर खर्च १॥ आणा रत्तलापर्यंत वीस नंबरास येतो. अशा रीतीनें निघालेलें सूत जें पुढें बाजारांत विकावयास जावयाचें असतें तें - रीलिंग खात्यांत (ज्याला आमचे लोक रहाटखातें म्हणतात तेथें) जातें. त्या ठिकाणीं सुताच्या बाबिन्सवर पाणी टाकून नंतर कांहीं वेळानें तें सूत रहाटावर गुंडाळलें जातें. या खात्यामध्यें बहुतेक सर्व बायकाच काम करतात. रहाटांचा घेर दीड वाराचा असतो व त्या रहाटाचे ८० फेरे झाले म्हणजे एकशें वीस वार सूत त्यावर गुंडाळलें जातें व नंतर त्या रहाटावर गाईड फ्लेट म्हणून पट्टी असते ती जरा बाजूला सरकते व त्या ठिकाणीं पुन्हां ८० फेरे म्हणजे एकशें वीस वार सूत गुंडाळलें जातें व ती पट्टी पुन्हां जरा बाजूला सरकते. अशा रीतीनें रहाटावर सात ठिकाणीं असें सूत गुंडाळलें जातें. या १२० वार सुतास एक ''ली'' म्हणतात, व या सात लीज म्हणजे ८४० वारांस एक ह्यांक म्हणतात. एक ह्यांक सूत रहाटावर झालें म्हणजे तें काढून घेतलें जातें व पु्हां रहाट चालू करतात. या रहाटावर एकेवेळीं ४० बाबीन लावण्याची सोय असते. १० ह्यांक्सची एक नॉट (आटी) होते. अशा रीतीनें एका रहाटावर एकेकाळीं ४ नॉट तयार होतात. हे रहाट हातानें चालविले जातात. कांहीं ठिकाणींहे पट्टयानें चालविण्याची सोय केलेली असते. या ठिकाणीं सूत रहाटावर गुंडाळून तयार झालें म्हणजे पुढें तें बंडलखात्यांत गेल्यावर त्या सुताचीं बंडलें बांधिलीं जातात. बंडलें बांधण्यापूर्वी तें ज्या नंबरचें सूत असेल त्या नंबरच्या तितक्याच आट्या (नॉट्स) कांट्यामध्यें घालून तोलल्या जातात. कारण प्रत्येक बंडल १० पौंडांचें (रत्तलांचें) बांधावयाचें असतें. सुताची जी विक्री होते तीहि याच बंडलच्या भावावर होत असते. दहा दहा पौंडांचीं बंडलें बांधून झालीं म्हणजे मग त्याची कोणी ३० बंडलांची तर कोणी ४० बंडालांची गांठ बांधतात. येथपर्यंत सूत (स्पिनिंग) खात्याची साधारणपणें माहिती सांगितली. त्यामुळें वीव्हिंग (विणकाम) समजण्यास पुष्कळ सोपें जाईल. कोणतेंहि कापड विणण्यास दोन तर्‍हेचें सूत लागतें : उभें सूत असतें त्याला ताणा म्हणतात व आडवें सूत असतें त्याला बाणा म्हणतात. ताण्याला इंग्रजींत वॉर्प असें म्हणतात, व वाण्याला वेफ्ट असें म्हणतात. साधारणपणें वॉर्पला सूत जरा जास्त बळकट असावें लागतें. व वेफ्टला कमी बळकट चालू शकतें. कमी बळकट सूत पाहिजे असल्यास सुताला कमी पीळ द्यावा लागतो व कापूसहि थोडा हलक्या जातीचा चालू शकतो. यासाठीं कापड विणण्याच्या गिरण्यांत वॉर्पच्या (ताणा) सुतासाठीं निराळ्या कापसाचें मिश्रण करतात व वेफ्ट म्हणजे वाण्यासाठीं निराळें हलक्या जातीचें मिश्रण करतात सुताची बळकटी पहाण्याचें यंत्र असतें त्याला ''यार्न टेस्टिंग मशीन'' म्हणतात. यांत एक रहाट असतो, त्यावर सुताच्या चार बॉबिनी लावण्याची सोय केलेली असते व या रहाटाचा घेर दीड वाराचा असतो. या रहाटाचे ८० फेरे झाले म्हणजे त्यावर १२० वार (एक ली) सूत गुंडाळलें जातें. ८० फेरे झाल्याबरोबर एक घंटा वाजते व त्यावर एक घड्याळ लावलेलें असतें त्यांतहि १२० पर्यंत वाराचे आंकडे असतात. १२० वार सूत गुंडाळलें गेलें म्हणजे ती ली बाहेर काढून या टेस्टिंग मशीनवर लाविली जाते. यांत एक हूक वरती व एक हूक खालती असून खालचा हूक खालीं खालीं सरकत जातो व त्या सुताच्या लीवर ताण पडतो. ताण पडूं लागला म्हणजे वरतीं जें घड्याळ लावलेलें असतें त्याचा कांटा पुढें सरकू लागतो व ती सुताची आटी (ली) किती वजन सहन करूं शकेल हें दाखवितो. ती आटी जितकें वजन सहन करूं शकेल तितका तो कांटा पुढें जातो व नंतर ती आटी तुटूं लागतें. गिरणींत वापरावयास लागणा-या वॉर्पच्या सुताची शक्ति ४० नंबर सुताला ४० पौंड; ३० नंबरला ५५ ते ६० पौंड, व २० नंबरच्या सुताला ७० ते ८० पौंड व १० नंबरच्या सुताला १३० ते १४० पौंडपर्यंत असली म्हणजे तें सूत उत्तम समजावें. परंतु हिंदुस्थानांतल्या हवेंत मुंबईखेरीज बाहेर ज्या ठिकाणी उष्ण हवा असेल त्या ठिकाणीं पावसाळ्याखेरीज इतकी टेस्ट क्वचितच मिळते.

वीव्हिंग:- कापड विणण्याच्या बाबतींत ताण्याच्या सुतास निरनिराळ्या कृतींतून बाहेर पडावें लागतें. त्या कृति येणेंप्रमाणें:- वाइंडिंग, वॉपिंग, साइझिंग, डाइंग व नंतर वीव्हिंग. वीव्हिंग झाल्यानंतर फिनिशिंग कॅलेण्डर व फोल्डिंग अशी पुढचीं खातीं आहेत. यांची माहिती क्रमाक्रमानें देऊ.

वाइंडिंग:- वाइंड म्हणजे गुंडाळणें सूतखात्यांतून येणारें सूत लाकडी बॉबिनवर गुंडाळलें जातें. हीच क्रिया हातानें कापड विणणारासहि करावी लागते. त्याला कापड विणण्यास जें सूत विकत घ्यावें लागतें तें पूर्वी वर्णन केल्याप्रमाणें बंडल बांधलेल्या स्थितींत विकत मिळतें. तें पुढें कामट्याच्या फाळक्यावर चढवून लांकडी रहाट असतो त्याच्या पुढील स्पिंडल-जी रहाट फिरविल्याबरोबर फिरूं लागते तिच्यावर लांकडी कांडी बसवून तिच्यावर या फाळक्यावरील सूत गुंडाळलें जातें. हें काम बहुतेक कोश्टयांच्या घरीं त्यांच्या बायका करतात. एक बाई साधारणपणें ५ पौंड सूत उकलूं शकेल; तेंच काम गिरणींत ज्या यंत्रावर केलें जातें त्याला 'ग्रेवाइंडिंग' म्हणजे सफेत सूत उकलण्याचें यंत्र म्हणतात. त्या यंत्राला २०० पासून ३०० पर्यंत स्पिंडले असतात व त्यावर एकेक बाई २० पासून २५ पर्यंत स्पिंडलांवर काम करते व १०० पासून १२५ रत्तलांपर्यंत सूत ती बॉबिनवर भरूं शकते. रहाटावर सूत उकलणाराला सफेत सूत अगर रंगीत सूत यांमध्यें कांहीं भेद असत नाहीं. दोन्हींचें काम सरासरी तेवढेंच व्हावयाचें पण गिरणींत मात्र रंगीत सूत उकलण्याची वाइंडिंग वेगळी व सफेत सुताची वेगळी असते. सफेत सूत उकलण्याबद्दल वर सांगितलेंच आहे. सूतखात्यांत रिंगफ्रेमवर होणार्‍या सुताच्या बॉबिनीच कापडखात्यांत येतात व त्या सफेत वाइंडिंगवर लावण्याची सोय केलेली असते. त्यायोगें ती बाई १००-१२५ रत्तल सूत खोलूं शकते व त्याबद्दल तिला मजुरी सरासरी शेकडा ५ आण्यापासून ६ आण्यापर्यंत २० नंबरच्या सुतास मिळते. ३० नंबरचें सूत असल्यास आठ आणे शेकड्याप्रमाणें मिळतें. रंगीत सुताच्या वाइंडिंगचे दोन प्रकार आहेत: कांहींला ग्रेवाइंडिंगप्रमाणें स्पिंडलें असतात व खालीं मात्र सुताच्या आट्या लावण्यासाठीं रहाट असतात अथवा लहान लहान फिरक्या (वर्डकेजेस) असतात. बर्डकेज, रहाटापेक्षां सोईंचें पडतात. रंगीत वाइंडिंगच्या दुसर्‍या प्रकाराला डम वाइंडिंग म्हणतात. हे लोखंडी डम एका शाफ्टिंगवर बसविलेले असतात. व ते फिरावयास लागले म्हणजे, ज्या बाबिनवर सूत गुंडाळावयाचें असतें त्या बॉबिनी या डमवर पडून रहाण्याची सोय केलेली असते. प्रत्येक डमवर एके वेळी दोन बाबिनी पडून राहतात व डम फिरूं लागला म्हणजे त्या आपल्या वजनानें फिरूं लागतात व खालच्या रहाटावर सुताची आटी चढवून त्याची तार वरील बॉबिनला लावून दिली म्हणजे खालील रहाटावरील सूत तीवर गुंडाळलें जातें. हीं कलरवॉइंडिगचीं १० स्पिंडलें एकेका बाईला दिली जातात व त्यावर सरासरी स्पिंडलमागें २ पौंड सूत २० नंबरचें एका दिवसांत गुंडाळलें जातें. या कामासाठीं बायकांनां ५ आणे मजुरी मिळते. सफेत कापड काढावयासाठीं अथवा ज्या कापडाचा वॉर्प म्हणजे ताणा सफेत ग्रे सुताचा असेल त्यासाठी सर्व ग्रेवाइंडिंगवर भरणारा वॉर्पच उपयोगी पडतो. याशिवाय कांही कापड कापूस रंगवून त्याचें सूत काढून तयार करतात. तो वार्पहि सर्व ग्रेवाइंडिंगवर भरला जातो. वरील दोन तर्‍हेची वाइंडिंग यंत्रें सांगितलीं ती ताण्याचें वार्पचें सूत तयार करण्याच्या उपयोगाचीं झालीं. आतां वाण्याचें म्हणजे वेफ्टचें सूत सफेत ग्रे असून तें सूतखात्यांतून आयतें कांड्यावर भरून येतें. रंगीत वेफ्ट लागणारा मात्र कांड्यांवर भरावा लागतो. या कांड्या भरण्याचीं यंत्रें पूर्वी फार लहान आकाराच्या कांड्या भरण्याचीं येत असत, तीं अलीकडे सुधारून बर्‍याच मोठ्या कांड्या भरण्याचीं येतात. पूर्वी ३॥ इंचांची कांडी असे. ती अलीकडे ६ इंचपर्यंत लांबीची वापरतात. त्यायोगें कांडीवर सूत जास्त राहिल्यानें कांडी लवकर न सरल्यामुळें सांचावर मालहि पण जास्त निघूं लागला. दुसरें एक नवीन तर्‍हेचें युनिव्हर्सल वाइंडिंग यंत्र निघालें आहे. त्यावर तर कांडी फार घटट भरली जाऊन शिवाय ती आकारानें पण जरा जाड असून ६ इंच लांबीची असते. या कांडीसाठीं सांचावर चालणारे धोटेहि पण जरा जाड आकाराचे व लांब वापरावे लागतात. ते सर्व तर्‍हेच्या जुन्या भागावर चालूं शकत नाहींत. अलीकडे जाडी व लांब कांडी वापरावयास लागल्यापासून सांचाच्या धोट्यांच्या पेट्याहि मोठ्या करावयास लूम-मेकरनीं सुरूवात केली आहे. हे वाण्याच्या विणण्याच्या कांड्यांचें वर्णन झालें. याच कांड्या हातमागासाठीं ज्या भरल्या जातात त्या फारच लहान व आंखूड असून बोरूच्या साध्या नळकांड्याच्या केलेल्या असतात. त्यांवर सूत फार थोडें रहातें त्यायोगें हातमागावर विणतांना त्या फार वरच्यावर बदलाव्या लागतात. तथापि हीच रीत सर्व हिंदुस्थानभर अद्याप चालू आहे.

वॉर्पिंग:- हातमागावर विणणारांच्या ताणा बनविण्याच्या तर्‍हा हिंदुस्थानच्या वेगवेगळ्या प्रांतांत वेगवेगळ्या आहेत. सोलापूरकडे, एका फळीवर खुंट्या मारून एक लुगड्याच्या लांबीचा ताणा पहिल्यानें बनवितात. त्याच्या दोन्हीं तोंडास सांध घेतात. सांध घेणें म्हणजे एक तार वरती तर एक तार खालती अशी करणें व दुसर्‍या खुंटीवर जी तार वरती गेली असते ती खालून घेणें आणि खालीं असते ती वरून घेणें याची नीट कल्पना येण्यासाठीं आपल्या एका हाताचीं बोटें दुसर्‍या हाताच्या बोटांत प्रत्येक साचांत एक याप्रमाणें घालावी म्हणजे सांधीची कल्पना येईल. सांध घेण्याचा मतलब येवढाच कीं, त्यापासून प्रत्येक तार एकीपासून दुसरी निराळी करतां येते. त्यामुळें पुढें पांजण करतेंवेळीं म्हणजे त्या सुतास खळ देतेवेळीं सुतें एकमेकांस चिकटतात तीं या सांधीच्या योगानें वेगवेगळीं करतां येतात. अशा रीतीनें जितक्या तारी पाहिजेंत तितक्या घालून हा एक साडीइतक्या लांबीचा ताणा खळ लावून तयार झाला म्हणजे मग त्यांतले एक सूत घ्यावयाचें व एक सोडावयाचें; आणि ताणा दुप्पट लांब करावयाचा या रीतीला वैचा घेणें म्हणतात. अशा रीतीनें एका साडीचा ताणा चार साड्यांइतका लांब करतां येतो मात्र ताणा घालतांना चार लुगड्यांच्या रूंदीस पुरतील इतक्या तारा त्यांत वाढवाव्या लागतात. हा ताणा लांब करून मग विणावयाच्या उपयोगांत आणितात. अहमदाबादकडे ताणा तयार करावयाची रीत थोडी निराळी आहे. तेथें जमिनीमध्यें चार काठ्या पुरतात. त्या काठ्यांवर खुंट्या बसविलेल्या असतात. व ताणा घालणारा मनुष्य या चारी काठ्यांच्या मध्यभागीं उभा राहून हातामध्यें एक लांब वांकडी काठी घेतो, तिच्या तोंडाला एक मणी बसविलेला असतो. उजव्या हातांत काठी व डाव्या हातांत एका फाळक्यावर सुताची आटी चढविलेली असते व तिचें एक टोंक काढून हातांतील काठीच्या टोंकावरील मण्यामधून घेऊन तें या उभ्या काठीवरील खालच्या खुंटीला अडकवितात. व मग हा मनुष्य गोल फिरत जातो व सुताची तार एका खुंटीच्या खालून तर एकीच्या वरून अशा रीतीनें अडकवीत जातो अशा रीतीनें ताण्याची जितकी लांबी पाहिजे असेल त्या मानानें त्या काठ्यांभोंवतीं तीन अगर चार फेरे करीत त्या काठ्यांच्या वर सूत गुंडाळलें जातें नंतर तो मनुष्य फिरूं लागतो व सूत खालीं खालीं गुंडाळीत जातो. अशा तर्‍हेनें ताणा करून झाला म्हणजे त्याला खळ देतात. या कृतीमध्यें खळ देऊन झाल्यावर, ताणा आधींच लांब असल्यामुळें पुन्हां वैचा घेऊन त्याला लांब करावा लागत नाहीं. इंदूरच्या बाजूला जमिनीमध्यें थोड्या थोड्या अंतरावर दोन दोन काठ्या जोडीनें पुरतात व जितका लांब ताणा पाहिजे असेल, त्याच्या निम्या लांबीपर्यंत या काठ्या पुरून मग एक मनुष्य ताण्याचें सूत लहान लहान कांड्यांवर भरून मग त्या कांड्या दोन काठ्यांमध्यें दोन घालून त्यांचीं टोकें या काठ्यांच्या एका टोंकास अडकवून एकापासून दुसर्‍या टोकांपर्यंत चालत जातो व त्या ठिकाणी आपल्या उजव्या हातांतील कांठी डाव्या हातांत घेतो व डाव्या हातांतील कांठी उजव्या हातांत घेतो. अशा रीतीनें दुसर्‍या टोंकाभोवतीं नुसती प्रदक्षणा करतो. मधल्या काठ्यांच्या ठिकाणीं मात्र एकदां हात या बाजूस कर एकदा त्या बाजूस अशा रीतीनें सुतें अडकवून मध्यें सांधी पाडीत जातो. जितकीं सुतें पाहिजेत तितकीं झालीं म्हणजे हा ताणा काढून तो फैलावतात व त्याला पांजण करून तो विणावयासाठीं घेतात. अशा रीतीनें हातानें ताणा घालावयाच्या तीन रीती वर वर्णन केल्या आहेत. याच थोड्याफार फरकानें सर्व हिंदुस्थानांत हातमागवाल्यांत प्रचलित आहेत. गिरणीमध्ये ताणा तयार करावयाचें जें यंत्र असतें त्याला वॉर्पिंग मशीन असें म्हणतात. वॉर्प म्हणजे ताणा म्हणजे विणण्याच्या कामात लागणारें उभें सूत. सुताचें कापड विणण्याच्या गिरण्यांत जें वॉपिंग यंत्र उपयोगांत असतें त्याला बीम-वॉपिंग म्हणतात. याशिवाय सेक्शनल वॉर्पिंग वगैरे आणखीहि इतर तर्‍हेची वॉर्पिंग यंत्रें आहेत. त्यांचा निराळ्या तर्‍हेचा उपयोग होतो. बीम-वॉर्पिंग यंत्रामध्यें वर वर्णन केलेल्या ग्रे वाइंडिंग अगर कलर वाइंडिंगमध्यें भरलेल्या बॉबिनी उपयोगांत आणल्या जातात. या यंत्राच्या मागच्या बाजूस एक लांकडाची चौकट असते. तिला क्रील असें म्हणतात. हिचा आकार इंग्रजींतील v या अक्षरासारखा अडतो. या क्रीलमध्यें प्रत्येक ओळीमध्यें १६ अगर क्वचित १८ बॉबिनी एका रांगेंत लावितात व एकंदर क्रीलमध्यें ५०४ अगर ५१२ बॉबिनी बसविण्याची सोय केलेली असते. या क्रीलच्या पुढच्या बाजूस एक फणी असते. तिला खालीं एक स्क्रू असतो, तो फिरवला असतां या फणींची घरें दाट अथवा विरळ पाहिजे तशी होतात. मागील क्रीलमध्यें जितक्या बॉबिनी बसविण्याची सोय असेल तितकेच दांत या फणीला असतात. मागील क्रीलमध्यें लाविलेल्या बॉबिनींना मधल्या रांगेपासून सुरवात करून कडेपर्यंत सर्व सुतें या फणीमधून प्रत्येक घरांत एक या प्रमाणें भरून घेतात. या फणीच्या दांतांची उंची सरासरी पांच इंच असून वरच्या बाजूनें हे दांत सुटे असतात. त्यायोगें करून मध्यंतरी एखादें सूत तुटलें असतां या फणीच्या दांतांमध्यें सहजीं बोट घालून फट मोठी करतां येते. व तुटलेलें सूत ओंवून घेतां येतें. या फणीच्या पुढच्या बाजूस एक टिनचा रूळ असतो. याला टिन-रोलर म्हणतात. याचा घेर बहुतकरून १८ इंच असतो. याच्याच एका तोंडाला दात्यांचीं चक्रें बसवून त्यायोगें पुढें किती वार सूत गुंडाळलें गेलें हें दाखविणारें घड्याळ याठिकाणीं बसविलेलें असतें. या घडाळ्याला एक कांटा एकेक वार दाखवून सबंध फेर्‍यामध्यें १०० वार झाल्याचें दाखवितो; व दुसरा लहान कांटा असतो तो शंभर दोनशें, तीनशें असे वार याच्या सबंध फेर्‍यांत ५००० वार सूत गुंडाळलें जातें व ५००० वारापर्यंतचेच आंकडे या घड्याळांत असतात. शिवाय आणखीहि एक योजना या यंत्रांत असते. त्यायोगानें ५००० वार झाल्याबरोबर एक दांडीं लिव्हर  एका खांचाच्या खालीं पडतें. त्यायोगें ती लिव्हर खालीं असे तों सांचा चालू असलेला आपोआप बंद होतो. यायोगें पांच हजार वारांचा एक फेरा झाल्याबरोबर सांचा आपोआप बंद होऊन काम करणाराचें त्या गोष्टीकडे लक्ष वेधलें जातें व पुन्हां ती लिव्हर त्या खाच्यांत वर उचलून ठेविल्याशिवाय सांचा पुढें चांलूच शकत नाहीं. या टिनच्या रूळापुढें तीन रूळ टिनचे सुमारे २ इंच व्यासाचे बसविलेले असतात. व या तीन रूळांवर टिनच्या रूळाच्या जवळच्या रूळाच्या खालून, त्याच्या पुढच्या रूळाच्यावरून व पुन्हां त्याच्या पुढच्या रूळाच्या खालून असें सूत पुढें येतें. या तीन रूळांच्या मध्यें दुसरे दोन टिनचे रूळ आपल्या वजनानें सुतावर पडलेले असतात. मधल्या व मागच्या रूळांच्या मध्यें एक व पुढच्या व मागच्या रूळांच्यामध्यें एक असे हे रूळ असतात. सांचाच्या दिवाळी (फ्रेम) मध्यें दोन्हीं बाजूंस खांचे असून त्यामध्यें ह्या रूळांचे आंस येऊन ते त्या खांच्यामध्यें खालींवर जाऊं शकतात. यापुढील सांचाची रचना सांगून मग या रूळांचा उपयोग काय तो सांगूं. यापूढें एक लोखंडी कांड्यांची फणी बसविलेली असते. तिचे दांत सरासरी २॥ इंच उंचीचे असून ते वरून उघडे असतात. सांचाच्या क्रीलमध्यें जितक्या बॉबिनी बसूं शकतील तेवढे दांते या फणीला असतात. हे दांते खालीं स्प्रिंगमध्यें अडकविलेले असून त्याच्या खालीं अर्ध्या भागांत उलट व अर्ध्या भागांत सुलट स्कू असलेली एक शीग बसविलेली असते व तिच्या दोन्ही तोंडावर दोन गुटके वसविलेले असतात. ते या स्क्रूच्या उलटसुलट फिरविण्यानें एकदम मागें अगर पुढें होऊ शकतात. व स्प्रिंगला दाबतात. स्प्रिंगच्या लांब आखूड होण्यानें फणींतील दांत जवळ अगर दूर होतात. फणीचा मध्यभाग दाखविणारा एक उंच अगर पितळेचा बनविलेला दांत मध्यभागी असतो. मागून पुढें आणलेलीं सुतें या फणींतून प्रत्येक घरांतून एक अशीं भरून घेतात. फणींपुढें आणखी एक रूळ असतो, त्या रूळावरून हीं सुतें खालीं बिमावर गुंडाळिलीं जातात. खालीं एक लांकडाचा मोठा रूळ फिरत असतो, व त्याच्या दोन्ही बांजूस हातासारखे ब्रॅकेट लावून त्यांवर लांकडाचें वॉर्पिंगचें बीम बसविण्याची सोय केलेली असते. या खालच्या लांकडी रूळा (ड्रम) च्या दोन्ही बाजूंस बिडाच्या अगर पोलादी पत्र्याच्या थाळ्या (ब्रॅकेट) बसविलेल्या असतात. व मध्यभागीं वरील सूत गुंडाळलें जाऊन बीम तयार होतें. पुढच्या फणीच्या मागें जो टिनचा रूळ असतो त्याच्या व या फणीच्या मध्यें बारीक फटी असलेली एक केस बसविलेली असते तींत या फटीच्या तीन अगर चार रांगा असतात. ह्या भागाच्या खालच्या बाजूस दोन लोखंडी रूळ एकमेकांनां चिकटून बसविलेले असतात; त्यांपैकीं एक रूळ पक्का बसविलेला व दुसरा त्याच्या अंगावर टेंकलेला असतो. पहिला रूळ मागून पुढच्या बाजूस फिरत असतो व पुढचा रूळ त्याच्या अंगावर टेंकलेला असल्यामुळें त्याच्या उलट फिरतो वरच्या पटटीच्या फटींमध्यें वरील सुतामध्यें हळू टाकलेले असतात. कोणतेंहि सूत तुटलें असतां हा हूक रूळावर पडतो व रूळाच्या गतीनें दोन रूळांच्या मध्यभागीं येतो व दुसर्‍या रूळास दूर ढकलून, खालीं हूक पडण्यासाठीं एक लांकडी पेटी ठेवलेली असते, तीमध्यें जाऊन पडतो. या पुढच्या लोखंडी रूळास एका तोंडावर एक ब्रॅकेट टेंकलेला असतो. रूळास हुकाच्यायोगें धक्का बसला कीं रूळाच्यायोगें या ब्रॅकेटला धक्का बसतो व त्यायोंगें सांचा एकदम बंद होतो आणि तुटलेंलें सूत लगेच पुन्हां जोडतां येतें. सांचाच्या पुढच्या बाजूस जो लांकडी मोठा ड्रम असतो त्याला प्रथम गति गिळते व सांचा चालतो. गिरणीमध्यें बिमें काढतात ती ५००० वारांपेक्षा कमी फारच क्वचित काढतात. त्यायोगें एकदां पांच हजार वारांवर लिव्हर खालीं पडली म्हणजे मग त्यांवर आणखी किती हजार वार जास्त काढावयाचे असतील त्या मानानें काम करणार्‍यास घडाळ्याकडे लक्ष द्यावें लागतें. एकंदर कापडांत वाण्यांत जितकी तार पाहिजे असेल ती, जितकीं बिमें काढवयाची त्यांवर सारख्या प्रमाणांत वांटण्याची वहिवाट आहे. उदाहरणार्थ, २५०० तारी ताण्यांत पाहिजे असल्यास ५०० तारींचीं पांच बिमें काढतात, २४०० तारी पाहिजे असल्यास ४८० तारींची पांच बिमें काढावीं व २३०० तारी पाहिजे असल्यास ४६० तारींचीं पांच बिमें काढावीं. वॉर्पिंगच्या बिमाची रूंदी ठराविक त्या त्या सांचाप्र्रमाणें असतें. ५०० तारी लाविल्यास त्याहि तितक्याच रूंदीवर भरल्या जातात. पुढें असणारी फणीं व मागें असणारी फणी लांब आंखूड करतां येते हें वर सांगितलेंच. त्यायोगें बिमावरील सुतांची रूंदी एकच ठेवतां येते. ४०० तारीपेक्षां कमी तारींचें बीम क्वचित काढतात. तथापि क्वचित २५० तारींचें किंवा २०० तारींचे सुध्दा बीम काढतां येतें. मात्र त्या वेळीं क्रीलवरील एका आड एक तार घ्यावी लागते. बीम काढून झाल्यानंतर या सर्व तारी पुन्हां भरून घ्याव्या लागतात व त्यांत वेळ पुष्कळ मोडतो. म्हणून तारी न तोडतां जर बिमें काढितां येतील तर तसेंच करणे चांगलें. रंगीत सुशी वगैरे कापड काढावयाचें असल्यास जर ४०० पेक्षां जास्त रंगीत तारी असतील तर त्यांचें स्वतंत्र बीम काढावें. कमी असल्यास रंगीत सूत व सफेत सूत मिळून पटट्यापटटांचें बीम काढावें. गिरणीमधल्या पांजणीच्या यंत्रावर अडचण न येतां कापडाचा जसा नमुना असेल त्याला लायक अशी वार्पिंगच्या बिमाची रचना करणें हीहि एक कला आहे. व ज्या ठिकाणीं कापडांत बरेच रंग असतात त्या ठिकाणीं या कलेचा उपयोग करावा लागतो. दोन नंबरचें सूत कापडांत असेल व त्या दोन्हीं नंबरांमध्यें फार फरक असेल म्हणजे एक १० नंबरचें व एक २० नंबरचें तर अशा ठिकाणीं प्रत्येक जातीचें बीम वेगळें काढावें. एका बिमावर घेऊं नये; घेतलें असतां बीम बरोबर भरलें जाणार नाहीं. बीम भरण्याइतकी तार नसेल तर साइझिंगच्या मागें क्रील लावून तीवर ती बाबिन लावावी. डब्लिंग म्हणजे पिळदार सुताचें बीम काढावयाचें असल्यास वॉर्पिंगच्या क्रीलवर सिंगल बॉबिनला गांठी मारून पुढें घेतलें असतां सिंगल जाड सूत असल्यास वेळेवर डब्लिंगच्या तारी पुढें येतील; तरी सुध्दां पुढें येतां येतां बर्‍याच तारी तुटतील. बारीक सूत असल्यास सबंध तारी तोडूनच पुन्हां फणी घ्यावी लागते. सबंध तारी तोडणें या गोष्टीला 'आर्या करणें' असा शब्द गिरणीवाल्यांच्या भाषेंत प्रचलित आहे. साइझिंग (पाजण) ची माहिती स्वतंत्र लेखांत दिली आहे  (ज्ञा. को. वि. ११ 'खळ' पहा.)

ड्राइंग:- ताणा तयार झाल्यावर तो ओवी व फणी यांमध्यें भरून घ्यावा लागतो. साध्या कापडाला या ओव्या नेहमीं चार लावलेल्या असतात. व फणीच्या प्रत्येक घरांत दोन दोन तारा भरलेल्या असतात. हातमागवाल्या विणकरानें एकदां ओवी फणींतून सुतें भरून घेतलीं म्हणजे ओवीच्या मागच्या बाजूला एक सांध ठेवितो व त्या सांधीच्या मागच्या बाजूला चार बोटांवर ताणा कापून टाकितो. त्याला त्या जातीच्या कापडालाच फक्त ती ओवीफणी वापरावी लागते. व त्यामुळें या ओव्याफण्यांचा बराचसा संचय त्याला करावा लागतो. त्याच तर्‍हेच्या कापडाचा ताणा त्यानें बनविला म्हणजे त्या ताण्याच्या तोंडालाहि एक सांध असतेच. या दोन्ही सांधींच्यायोगें तो एकएक तार घेऊन त्याला वळी मारून जोडतो. वळी मारणें म्हणजे दोन सुतांचीं टोकें घेऊन त्याला थोडा पीळ देऊन तीं टोकें चिकटवून टाकणें. या वळ्या मारतेवेळीं विणकर जवळ थोडासा गोंद ठेवून मधून मधून आपल्या बोटाला गोंद लावून घेतो. म्हणजे वळी पक्की बसते. अशा रीतीनें वळ्या देऊन सर्व ताणा जोडून झाला म्हणजे तो पसरून बांधतो व हळूच हातानें ओव्या फण्यावळ्यांच्या मागें सारून घेऊन या नव्या जोडापासून कापड विणण्यास सुरूवात करतो. या ओव्या वळीव सुताच्या बनविलेल्या असतात. व गिरणींत वापरतांनां त्यानां आधीं खळ व मग व्हारनींश लावून मजबूत करतात. कोश्टयांची विणकरी फणी बोरूच्या पाठीची असते. गिरणीमध्यें वापरावयाची फणी पोलादी काड्यांची बनविलेली असते. पण मूळ फणीची कल्पना व नमुना हिंदुस्थानांतून विलायतेस गेला. त्या वेळीं तो बोरूचा होता म्हणून त्याला रीड हें नांव मिळालें. आतां पोलादी व क्वचित् पितळी फण्या बनवूं लागले आहेत तरी -नांव तेंच कायम आहे. या फण्यामध्यें घटट्-विरळ कापड विणण्यासाठीं, घट्ट-विरळ दांतांच्या फण्या बनविलेल्या असतात. जुन्या विणकर लोकांच्या फण्या अशाच असतात पण त्यांचा हिशोब विवक्षित पुंजांवर अवलंबून असतो. ६० काड्यांचा एक पुंजा मानतात. गिरणीमध्यें फणीला नंबर देऊन टाकले आहेत. २४ नंबरपासून वर २०० नंबरांपर्यंत सुध्दां फणी मिळते. सुती कापडांत सरासरी ८० अगर १०० नंबरावर कोणी फण्या वापरीत नाहींत. व हिंदुस्थानांत तर साधारणपणें ३६-४०-४४-४८-५२ हे नंबरच जास्त प्रचारात आहेत. पुढें ६० व ८० पर्यंतहि वापरतात पण फार थोडे. हा फणीचा नंबर इंचावर ठरवून त्याचा फार सोपा हिशोब वसविला आहे. एका इंचांत जितक्या तारी बसतील तो त्या फणीचा नंबर; म्हणजे एका इंचांत जर ४० तारी बसल्या तर ती ४० नंबरची फणी. आतां वर सांगितलेंच आहे कीं, फणीच्या दर घरांत दोन दोन सुतें ओवण्याची वहिवाट आहे. म्हणजे ४० नंबरच्या फणींत एका इंचांत २० घरें असतात, ३२ नंबरच्या फणीला १६ घरें व ६० नंबरच्या फणीला एका इंचांत ३० घरें. त्याप्रमाणें प्रत्येक साध्या कापडाला चार ओव्या असतात. म्हणजे, ३२ नंबरची ओवी म्हटली तर प्रत्येक ओवींत एका इंचांत आठ ओव्या असावयाच्या. म्हणजे चार ओव्यांच्या ३२ झाल्या. त्याचप्रमाणें ४८ नंबरची ओवी म्हटली म्हणजे प्रत्येक ओवीवर एक इंचांत बारा ओव्या लागतात. पण नक्षीचें कापड असल्यास त्याला जास्त ओव्या लागतात. जशा तर्‍हेची नक्शी असेल त्याप्रमाणें १६ ते २० पर्यंत ओव्या लाविल्या जातात. जीनचें कापड ज्याला म्हणतात त्याला सहा ओव्या लागतात. व फणीच्या घरांत तीन तीन तारा भरण्याची वहिवाट आहे. हातमागावर कापड विणतांना विणकर ओव्या पायानें दाबून दम बदलतो व हातानें धोटा फेंकतो व त्याच हातानें हत्या ठोकतो. उजव्या हातानें धोटा फेंकलाव त्याच हातानें हत्या ठोकतो. उजव्या हातानें धोटा फेंकला म्हणजे डाव्या हातानें तो झेलून घेतो व उजव्या हातानें हत्या ठोकतो. असा क्रम चालतो. आतां साधें कापड विणलें कसें जातें तें प्रथम पाहूं. प्रत्येक फणीच्या घरांत दोन दोन तारी असतात व त्या मागील ओव्यामधून घेतेलल्या असतात. त्यांचा क्रम असा:- पहिली तार पहिल्या ओवींमध्यें तर दुसरी तार तिसर्‍या ओवीमध्यें; मग त्याच्या शेजारच्या घरांतील एक तार दुसर्‍या ओवीमध्यें तर दुसरी तार चवथ्या ओवीमध्यें म्हणजे पहिल्या ओवीपासून भरणी सुरू होऊन चवथ्या ओवीवर संपली. व पुन्हां पहिल्या ओवीपासून सुरवात व्हावयाची. याला आपण एक फेरा असें नांव देऊं. हा एक फेरा संपून तीच भरणी पुन्हां सुरू होते तिला रिपीट म्हणण्याची चाल आहे. अशा तर्‍हेनें चार तारी ओव्यांत भरल्या म्हणजे पहिल्या दोन ओव्या एका जागीं बांधलेल्या असतात व त्या एकदम उठतात अगर बसतात. व दुसर्‍या दोन ओव्या म्हणजे तिसरी व चवथी  या एका जागीं बांधलेल्या असतात व त्या एकदम बसतात अगर एकदम उठतात. त्यायोगें एक सोडून एक तारी सर्व एकदम उठतात त्यावेळीं त्याच्या शेजारच्या खालीं बसतात. व त्यांतून एक आडवा दोरा टाकला जातो. त्याला इंग्रजींत पिक् असे म्हणतात. आडव्या दोर्‍यांनां वेफ्ट असें नांव आहे. पण हा जो प्रत्येक दोरा पडतो त्याला एकेकापिक् असें म्हणतात. एक फेरा असा झाला म्हणजे ज्या खालीं बसलेल्या असतात त्या वर उठतात व वर उठलेल्या खालीं बसतात. अशा तर्‍हेनें साधें कापड विणलें जातें. कापड कसें विणलेलें असतें व निरनिराळ्या तर्‍हेचें कापड कशा तर्‍हेनें विणलेलें आहे हें शोधून काढावयासाठीं अलीकडे एक कागद मिळतो. त्याला डिझाईन पेपर म्हणतात. या कागदावर उभ्या व आडव्या जवळ जवळ सारख्या सरळ रेघा आंखून चौकटी पाडलेल्या असतात. हे कागद लहान मोठ्या चौकटींचे मिळतात. एका इंचांत आठ चौकटी, १० चौकटी व १२ चौकटींपर्यंत कागद असतात. व प्रत्येक इंचाची म्हणजे तितक्या घरांची खूण दाखविणारी एक जाडी रेघ उभी व आडवीहि असते. या कागदाची कल्पना यावी म्हणून चित्रांत तशा चौकटी पाडून त्यांवर बरेचसे डिझाईन काढून दाखवित आहों. यांत ज्या ज्या ठिकाणीं ठिपके दिले आहेत त्या त्या ठिकाणीं ताण्याचीं सुतें वर उठलेलीं असून बाणा झांकून गेलेला आहे व ज्या ठिकाणीं रिकामें घर आहे त्या ठिकाणीं तो बाणा दिसतो आहे असें समजलें म्हणजे त्या ठिकाणीं ताणा त्याच्या खालीं झांकला गेला आहे असें समजावें.

नं.१ चा डिझाईन साध्या कापडाचा आहे. पहिली तार पहिल्या पिकला वर उठली आहे तर दुसरी खालीं बसली आहे. तिसरी वर उठली आहे तर चवथी बसली आहे असा क्रम आहे. नं. २ चा नमुना दोसुती कापडाचा आहे. यांत दोन दोन तारी जोडीनें वरखालीं उठल्या व बसल्या आहेत. नं. ३ चा नमुना इंग्रजींत ज्याला ड्रिल म्हणतात व मराठींत जीन म्हणतात त्याचा आहे. या कापडाचा रिपीट तीन तारींतच पुरा होतो. म्हणून हें कापड तीन ओव्यांतच काढतां येईल. पण या कापडांत फणीच्या घरांत तीन तीन तारी भरलेल्या असतात त्यामुळें तारीची संख्या एका इंचांत जास्त होते म्हणून हें कापड सहा ओव्यांत काढण्याची चाल आहे. नं. ४ चा नमुना साधें चार ओव्यांतील टिल आहे. यामध्यें प्रत्येक तार दोन पिकला वर उठली आहे तर त्याच्या पुढच्या दोन पिकला खालीं बसली आहे. यामध्यें कापडांत तिरपी रेघ दिसते. ज्या कापडांत तिरपी रेघ दिसते त्याला ट्विल म्हणतात. या टिल्स पुष्कळ प्रकारच्या असतात. चार ओव्यांपासून १२-१६ ओव्यांपर्यंत ओव्या असतात. नं. ५ चा नमुना एका प्रकारच्या नकशीच्या कापडाचा आहे. व त्यावरूनच पुढें कापडांतील नकशी कागदावर कशी काढतात, व कागदावरील नमुन्यावर (डिझाईन)  कापडाची विणकर कशी बसवायची हें पुढें सांगणार आहों. नं. ६ चा नमुना एका धोतरावरील नकशीच्या किनारीचा आहे. तसेंच ७ व ८ हेहि नकशीच्या किनारीचेच आहेत. लुगड्याच्या अगर धोतराच्या किनारीमध्यें नकशी काढावयाची झाली म्हणजे बहुतेक नेहमीं त्याच्या खालीं साधें कापड असून ज्या सुतांची नकशी काढावयाचीं तीं सुतें त्या ठिकाणीं जास्ती असतात व त्या प्रमाणें फणीच्या घरांतहि दोहोंच्या ऐवजीं चार अगर सहा तारी भरून घेतलेल्या असतात त्या नक्षीच्या तारी हातमाग वाला मुख्य ओव्यांच्या मागच्या बाजूला निराळ्या ओव्या निराळ्या लकड्यांवर लावून त्यांच्या खालच्या बाजूला कांहीं वजनें बांधतो व वरच्या बाजूंनां फिरक्या लावून त्यावरून दोर्‍या घेऊन एक टोंक या लकडीला बांधतो व दुसर्‍या टोंकाला कांहीं वजन बांधतो व हातानें आडवा दोरा टाकण्याच्या आधीं ज्या ओव्या ज्या वेळीं उचलावयाच्या असतील त्यावेळीं उचलतो व बाकीच्या खालीं बसवितो. या वरच्या व खालच्या वजनाच्या योगें ओवी वर अगर खालीं वाटेल तशी उचलली असतां तेथेंच कायम रहाते. परंतु हातमागवाल्यांला सोप्या तर्‍हेनें काढतां येण्याजोगी नकशीच सहज काढतां येते. जास्त कठिण नकशी असेल तर ती गिरणींत काढणें जितकें सोपें जातें तितकें हातमागावर सोपें जाते नाहीं. परंतु कोणत्याहि प्रकारचें कापड आमच्या हातमागवाल्यांनीं काढावयाचें बाकी ठेविलें नाहीं. गिरणींत यंत्रयोजनेमुळें काम सोपें जाऊन पुष्कळ होऊं शकतें व तेंच हातमागवाल्याची पध्दति फार क्लिष्ट झाल्यामुळें काम कमी होतें येवढेंच. गिरणींत किनारींत नकशी काढणें झाल्यास '' किम्बर बोर्ड'' म्हणून भोकें पाडलेल्या लांकडाच्या पटट्या तयार केलेल्या असतात व जास्त जीं सुतें लाविलीं जातात तीं ओवून घेण्यासाठीं निराळ्या सुटट्या ओव्या तयार केलेल्या असतात व त्याला खालीं रबराच्या दोर्‍या लाविलेल्या असल्यामुळें या ओव्यांनां ''रबरहील्डस्'' म्हणतात. नकशीच्या तारी जेवढ्या असतील तितक्या रबरी ओव्या लावितात. प्रत्येक ओवीमधून एकेक तार ओवून घेण्याच्या ठिकाणीं धातूचा एक डोळा बसविलेला असतो. ज्या तर्‍हेची नकशी काढणें असेल त्याला उपयोगी पडेल अशा तर्‍हेनें या ओव्या त्या कम्बर बोर्डमध्यें भराव्या लागतात. व मग त्याला दोर्‍या बांधून नकशी काढण्याकरितां डॉबी म्हणून जी योजना सांचांवर बसविलेली असते (हिला कामवाले लोक पिंजरा म्हणतात) तिला या रषा बांधतात. व त्या डाबी र ज्याप्रमाणें खुंट्या मारून रहाट बसविला जातो त्याप्रमाणें नकशी उठते. याच डॉबीवर सबंध कापडांतहि नकशी उठवावयाची झाली तर ओव्या या डॉबीशी रशीनें बांधतात, व खालीं ओव्या दबण्यासाठीं स्प्रिंग लावून मग कापडांत नकशी उठवितात.

आतां डिझाईन नंबर पांच घेऊन तो कापडावर कसा उठवितात तें पाहू. या कापडांत ज्याला एक्स्ट्रा वॉर्प म्हणतात, ज्याची नकशी कापडावर उठलेली आहे, त्याचाच डिझाईन येथें दिला आहे. पण ज्याचें साधें कापड बनलेलें आहे तें येथें दाखविलें नाहीं. नकशीच्या तारींचा क्रम पुढीलप्रमाणें आहे:-

सुतें व फणीचीं घरें.
सुतें निळीं = १ लें घर
'' सफेत = २-३ घरें
'' लाल = ४ थें घर
'' सफेत = ५ वें ''
'' लाल = ६ वें ''
'' सफेत = ७ वें ''
'' लाल = ८ वें ''
'' सफेत = ९-१० घरें
'' निळीं = ११ वें घर
१६ '' सफेत = १२-१९ घरें
१६ '' सफेत = नकशी
२०-२७
 घरें
१७ '' निळीं =
१६ '' सफेत = २८-३५  घरें

२ निळ्या तारी, ४ सफेत तारी याप्रमाणें १६ तारी सफेतपर्यंत साधें कापड आलें. मध्यें १७ तारींची नकशी आली. त्याच्यामध्येंहि प्रत्येक नकशीच्या तारीआड सफेत तार आहे व त्यांचें साधें कापड विणलें जातें. यानंतर पुन: १६ तारी सफेंत पुन: साध्या कापडाच्या आल्या. त्यानंतर पुन: २ तारी निळ्या पहिल्याप्रमाणें आल्या. म्हणजे या ठिकाणीं कापडाचा एक फेरा (रिपीट) पुरा झाला त्यांत एकंदर ८७ तारी आहेत. त्यांतून नकशीच्या एकंदर १७ तारी वजा करतां बाकी ६९ तारी राहिल्या. म्हणजे फणीच्या ३५ घरांमध्यें एक फेरा पुरा होतो. याप्रमाणें सबंध कापडामध्यें १७ फेरे आहेत. त्यांच्या एकंदर ११९० तारी साध्या कापडाच्या झाल्या. नंतर प्रथम ज्याप्रमाणें रंगीत पांच रेघा आहेत त्याप्रमाणेंच शेवटीहि आहेत. त्या २२ तारी मिळून १२१२ व किनारीला विणतांना बळकटी यावी म्हणून प्रत्येक बाजूला २४ तारी सफेत डबल भरणीच्या आहेत. त्यांची दोन्ही बाजूंस सहा सहा घरें होतात व मधल्या तारी १२१२, त्यांचीं घरें ६०६ व किनारींचीं बारा मिळून ६१८ घरें एकंदर झालीं. ३६ नं. च्या फणीचीं एका इंचांत १८ घरें असतात, ४० नं. च्या फणींचीं २० घरें असतात व ४४ नं. च्या फणींचीं २२ घरें असतात. कापडाचा पन्हा मोजून पहातां २७ इंच आहे. ६१८ घरांस १८ नीं भागिलें तर फणींतील पन्हा ३४ इंच सहा घरें येतो. २० नीं भागलें तर ३० इंच १८ घरें येतो व २२ नीं भागलें तर २८ इंच २ घरें येतो. त्यावरून २७ इंच तयार कापड आहे व तें कॅलेंडर केलेलें आहे. तेव्हां ४४ ची फणी या कापडास नाहीं हें सिध्द झालें. कारण सांचावरून येणारें कापड सुमारें २। २। इंच कमीं येतें, व कॅलेण्डरमध्यें सुमारें १। इंच कमी येतें. मिळून एकंदर ३॥ इंच पन्हा कमी येतो. तेव्हां २७ इंच कापड यावयास ३०॥ इंच पन्हा फणींत पाहिजे. म्हणजे तो ४० च्या फणीनें जमतो. तेव्हां ४० नं. च्या फणीचें हें कापड आहे हें सिध्द झालें. आतां याच्या वजनाचा हिशोब सांगून मग हें कापडं किती ओव्यांत विणलें जाईल तें सांगूं. मधल्या तारी १२१२ आहेत हें सांगितलें, शिवाय दोन्ही किनारींच्या मिळून ४८ तारी झाल्या. म्हणजे एकंदर तारी १२६० झाल्या व नक्षीच्या तारी प्रत्येक फेर्‍यांत १७ आहेत व कापडांत १७ फेरे आहेत. म्हणणे २८९ तारी नकशीच्या (निळ्या) झाल्या. वरील १२६० तारींमध्यें निळ्या व लाल रेघांचे एकंदर १८ पट आहेत. म्हणून सांगितलें व प्रत्येक पटांत ४ तारी निळ्या व ६ तारी लाल आहेत म्हणजे सबंध कापडांत ७२ निळ्या व १०८ तारी लाल झाल्या. या १२६० मधून वजा करतां १०८० तारी निव्वळ सफेत रहातात. म्हणजे एकंदर कापडांत १०८० तारी सफेत, ३६२ निळ्या व १०८ तारी लाल झाल्या. सफेत तारीचा नंबर १८ आहे असें धरून चालूं. व निळ्या व लालचा नं. १६ धरून चालूं. वेफ्ट म्हणजे आडवणाचा नंबर १४ धरून चालूं वपिक्स ४० धरून चालूं. म्हणजे एकंदर कापडांत सूत किती लागलें तें पाहूं या कापडांत २४ वार कापड येण्यासाठीं २६ वार लांबी साइझिंग वर ठेविली पाहिजे. वरील प्रमाणें हिषोब पाहतां २६ वार कापडांत १.८५ पौंड सफेत वार्प; २० पौंडलाल वार्प; ६९ पौंड निळा वार्प; ५१ पौंड वेफ्ट सफेत; एकूण ५.२५ पौंड सूत लागेल व १ पौंड कांजी लागेल. यांतील २५ म्हणजे चार औंस कांजी कापड विणतांना झडते ती वजा जातां कापडाचें वजन ६ पौंड झालें.

आतां हें कापड किती ओव्यांत विणलें जाईल तें पाहूं. साध्या कापडास चार ओव्या लागतात. आतां एक्स्ट्रा वार्पच्या १७ तारींची जी नकशी आहे ती किती ओव्यांत उठवितां येईल तें पाहूं. नकशीची तार ज्या ठिकाणीं वर उठलेली आहे त्या ठिकाणीं चित्रांत ठिपका दिला आहे म्हणून सांगितलेंच आहें. नकशीच्या उजव्या हातास, पिक्सचे आंकडे दिले आहेत. त्यांवरून कळेल कीं, २७ पिक्समध्यें नकशी संपली. नंतर तीन पिक्स रिकाम्या जाऊन पुन्हां पहिल्यासारखी नकशी उठण्यास सुरवात झाली. हें सहज लक्षांत येऊ शकेल कीं, एका ओवींत जेवढ्या तारी भरलेल्या असतील त्या सर्व ती ओवी उठल्यावेळीं उठल्याच पाहिजेत व ओवी खालीं बसल्यावेळीं बसल्याच पाहिजेत. आतां पहिल्या पिकच्या वेळीं फक्त नऊ नंबरची तार वर उठलेली आहे. अर्थात ९ नं. च्या तारीला एक स्वतंत्र ओवी पाहिजे ही गोष्ट निर्विवाद झाली. दुसर्‍या पिकच्या वेळीं आठ, व दहा या नंबरच्या तारी वर उठल्या आहेत तेव्हां ८ व १० नंबरच्या तारी ज्या एकदम वर उठल्या आहेत त्या एका ओवींत भरतां येतील काय हें पाहण्यासाठीं सबंध नकशीभर त्यांचा क्रम पाहूं. नं. २-३-४-५-६-९-१२-१३-१४-१५-१६-१९-२२-२३-२४-२५-२६ इतक्या पिक्सच्या वेळीं या तारी एकदम वर उठल्या आहेत व १-७-८-१७-१८-२०-२१-२७-२८-२९-३० या पिक्सच्या वेळीं या तारी खालीं बसल्या आहेत. तेव्हां ८ व १० या नंबरच्या तारी एका ओवींत भरण्यास हरकत नाहीं.

तार भरणी.
ओवी नं. - तारी - एकंदर ओव्या
= = १३
= ८-१० = १२
= ७-११ = ११
= ६-१२ = १०
= ५-१३ =
= ४-१४ =
= ३-१५ =
= २-१६ =
= १-१७ =
- - - -
- - - -
- - - -
- - - -

तेव्हां नववी तार आपण ९ नं. च्या ओवींत ठेवून ८ व १० नं. ची तार ८ नं. च्या ओवींत ठेवूं. तिसर्‍या पिकला नं. ७ व ११ या तारी जास्त उठलेल्या आहेत त्यांचा क्रम सर्व नक्षीभर पहातां त्या ३-४-५-८-९-१०-१३-१४-१५-१८-१९-२०-२३-२४-२५ या पिक्सला वर उठलेल्या आहेत. १-२-६-७-११-१२-१६-१७-२१-२२-२६-२७-२८-२९-३० या पिक्सला खालीं बसल्या आहेत. तेव्हां आपण या दोन्ही तारी ७ नंबरच्या ओवीवर ठेवूं. नंबर ६ व १२ या तारी नंबर ४-७-८-९-१०-११-१४-१७-१८-१९-२०-२१-२४ या पिक्सला वर उठल्या आहेत. व नं. १-२-३-५-६-१२-१३-२२-२३-२५-२६-२७-२८-२९-३० या पिक्सला खालीं बसल्या आहेत. तेव्हां त्यांना आपण नं. ६ च्या ओवीवर ठेवूं. नं. ५ व १३ या तारी नं. ६-७-८-९-१०-११-१२-१६-१७-१८-१९-२०-२१-२२ या पिक्सला वर उठलेल्या आहेत व नं. १-२-३-४-५-१३-१४-१५-२३-२४-२५-२६-२७-२८-२९-३० या पिक्सला खालीं बसल्या आहेत. या तारींनीं आपण नं. ५ च्या ओवीवर ठेवूं. नं. ४ व १४ या तारी नं. ७--८--९-१०-११-१४-१७-१८-१९-२०-२१- या पिक्सला वर उठलेल्या आहेत. व नंबर १--२-३-४-५-६-१२-१३-१५-१६-२२-२३-२४-२५-२६-२७-२८-२९-३० या पिक्सला खालीं बसल्या आहेत. तेव्हां त्यांनां नंबर ४ या ओवीवर ठेवूं. नं. ३ व १५ या तारी ८-९--१०-१३-१४-१५-१८-१९-२० या पिक्सला वर उठल्या आहेत व नं. १-२-३-४-५-६-७-११-१२-१६-१७-२१-२२-२३-२४-२५-२६ व २७ या पिक्सला खालीं बसल्या आहेत. त्यांनां आपण नं. ३ या ओवीवर ठेवूं नं. २ व १६ या तारी नं. ९-१२-१३-१४-१५-१६-१९ या पिक्सला वर उठल्या आहेत व नं. १--२--३--४--५--६--७-८-१०-११-१७-१८-२०-२१-२२-२३-२४-२५-२६-२७-२८-२९-३० या पिक्सला खालीं बसल्या आहेत. त्यांनां आपण नं. २ या ओवीवर ठेवूं. व नं. १ व १७ या या तारी नं. ११-१२-१३-१४-१५-१६-१७ या पिक्सला वर उठल्या आहेत व नं १-२-३-४-५-६-७-८-९-१०-१८-१९-२०-२१-२२-२२-२३-२४-२५-२६-२७-२८-२९-३० या पिक्सला खालीं बसल्या आहेत या तारींनां आपण पहिल्या ओवीवर ठेवू. याप्रमाणें नकशीसाठीं ९ ओव्या लागतात व साध्या कापडाला ४ ओव्या लागतात, मिळून एकंदर कापड १३ ओवीमध्यें निघेल. साध्या कापडाच्या ओव्या पहिल्यानें लाविल्या म्हणजे नकशीच्या ओव्यांनां पांच नंबरपासून सुरूवात होते. हे ओव्यांचे नंबर उजव्या बाजूस दाखविले आहेत. आतां नकशीच्या तारी कशा भरल्या आहेत हें दाखवूं. या नकशीच्या तारी ज्या क्रमानें भरल्या आहेत त्या इंग्रजी व्ही (V)  या अक्षरासारख्या पण उलट म्हणजे वरचें तोंड खाली व खालचें तोंड वर याप्रमाणें भरल्या जातात. याला व्हीड्राफ्ट म्हणतात. या नमुन्यामध्यें एकंदर तारी एका पॅटर्नमध्यें ८७ आहेत हें वर दिलेंच आहे. यांतून १७ तारी नक्षींच्या वजा करतां ७० तारी बाकी राहिल्या त्या प्रत्येक घरांत दोन तारी याप्रमाणें ३५ घरांत येतात. तीं घरें वर दाखविलींच आहेत. यांत नं. २० च्या घरापासून व ३९ साव्या तारीपासून नकशीचीं घरें सुरू होतात. व तीं २८ व्या घरापर्यंत खलास होतात. तेवढी नकशीची भरणी पुढें दाखविली आहे आजूबाजूची साध्या भरणीचीहिं दोन दोन घरें त्यांत दाखविलीं आहेत.

याप्रमाणें भरणी दाखविली. आतां त्याची उठावणी दाखवूं. केव्हां केव्हां साध्या कापडाच्या चार ओव्या खालच्या टॅपेटवर बांधतात व नकशीच्या ओव्या तेवढ्यां पिंजर्‍यावर (डॉबीवर) बांधतात. येथें सर्वच ओव्यांची उठावणी पिंजर्‍यावरील दाखविली आहे. जेवढ्या ओव्या वर उठावयाच्या तेवढ्याच दाखविल्या आहेत. सर्वच ओव्यांनां खालीं स्प्रिंग्स बांधलेल्या असतात. व त्यायोगें त्या नेहमीं खालीं बसलेल्या असतात. त्या खालीं बसण्यासाठीं निराळी व्यवस्था करावी लागत नाहीं.

ओव्यांचा उठाव .

पिक्स            उठणार्‍या ओव्या.
१    -        १-३-१३
२    -        २-४-१२-१३
३    -        १-३-११-१२-१३
४    -        २-४-१०-११-१२-१३
५    -        १-३-११-१२-१३
६    -        २-४-९-१२-१३
७    -        १-३-८-९-१०-१३
८    -        २-४-७-८-९-१०-११
९    -        १-३-६-७-८-९-१०-११-१२
१०    -        २-४-७-८-९-१०-११
११    -        १-३-५-८-९-१०-१३
१२    -        २-४-५-६-९-१२-१३
१३    -        १-३-५-६-७-११-१२-१३
१४    -        २-४-५-६-७-८-१०-११-१२-१३
१५    -        १-३-५-६-७-११-१२-१३
१६    -        २-४-५-६-९-१२-१३
१७    -        १-३-५-८-९-१०-१३
१८    -        २-४-७-८-९-१०-११
१९    -        १-३-६-७-८-९-१०-११-१२
२०    -        २-४-७-८-९-१०-११
२१    -        १-३-८-९-१०-१३
२२    -        २-४-९-१२-१३
२३    -        १-३-११-१२-१३
२४    -        २-४-१०-११-१२-१३
२५    -        १-३-११-१२-१३
२६    -        २-४-१२-१३
२७    -        १-३-१३
२८    -        २-४
२९    -        १-३
३०    -        २-४

वर सबंध पॅटर्नची भरणी व उठवणी दाखविली आहे. नंबर २ च्या उठवणीमध्यें जरी ही नकशी पुरी होते तरी आणखी ६ पिक्स वाढवून मध्यें एक नकशीची रेघ दाखविली आहे. त्यायोगेंकरून नं. ५-६-७-८ या ओव्यांतील तारांस फार लांबपर्यंत खालीं बसावें लागत असे त्यांनां मध्यें बांधून टाकिलें आहे. नकशीच्या तारीची भरणी व्हीड्राफ्ट् असल्यामुळें यांत उठावणी बदलून पुष्कळ तर्‍हेची नक्षी कढितां येईल. अशा तर्‍हेच्या नकशीसाठीं ज्या ओव्या वापरतात त्यांत वायरहीडल्स तारेच्या ओव्या येतात. कारण त्या ओव्या वाटेल तिकडे सरकूं शकतात. त्यांस मध्यें तारा ओंवावयासाठीं धातूचा डोळा असतो. व त्याला वर खालीं सुताची ओवी असते व या ओव्याहि सुट्या असतात, याहि कोणी कोणी वापरतात. कापडावर नक्षी कशी काढितात याचें मूळतत्त्व थोडक्यांत पूर्णपणें वर सांगितलें. याच तत्त्वावर जास्त तारीमध्यें नकशी काढून कापडामध्यें पानें, फुलें, वेलबुट्टी वगैरेहि काढली जाते. या कामामध्येंहि आमच्या हातमागवाल्यांनीं प्रगति केली आहे. मात्र त्यांची एकंदर कृति हातानें करावयाची असल्यामुळें फारच सावकाश होते. याच कामासाठीं यूरोपियन लोकांनीं जी यंत्रयोजना केली आहे तिला 'जकार्ड’ म्हणतात. या जकार्डच्या योगें त्यांनीं माणसाच्या फोटोचे फोटो व इमारतीचा नकाषाहि कापडावर विणून काढण्यास सुरूवात केली आहे. व हातमागवाल्यांच्यापेक्षां १५-२० पट जास्त काम त्यांवर होऊं शकतें. आतां ज्या यंत्रानें कापड विणण्याचें काम होतें त्याची माहिती सांगूं.

माग (लूम):- हातानें कापड विणण्याच्या हातमागाचें वर्णन मागें दिलेंच आहे. कापड विणतांनां आडवा दोरा (वेफ्ट) मध्यें पडण्यासाठीं ज्या धोट्याची योजना केलेली असते तो धोटा इकडून तिकडे फेंकण्याचें काम हातमागवाला विणकर हातानें फेंकून करतो. विणलें गेलेलें कापड सुमारें एक वीत दीड वीत विणलें गेलें म्हणजे तें रूळावर गुंडाळण्याचें कामहि तो हातानें करतो व ओव्या दाबण्याचें काम पायानीं करतो. मध्यंतरी नकशी उठविणें झाल्यास तेंहि काम तो हातानेंच करतो हीं सर्व कामें शक्तीनें चालणार्‍या मागांत आपोआप होतात. त्यावर विणणार्‍या माणसाला फक्त धोट्यांतील दोरा संपला म्हणजे तें धोटें काढून दुसरें कांडी भरलेलें धोटें सांचांत घालून सांचा चालू करण्याचें काम करावें लागतें. मध्येंच एखादी तार तुटली तर ती तार पुन्हां गांठ मारून जागच्या जागीं ओवून घ्यावी लागते. बाकी सर्व कामें आपोआप होतात. या साचांत मुख्य भाग म्हणजे दोन्ही बाजूंच्या दिवाली (साईडवाल्स) यांना एकमेकेंपा जोडणारे खालच्या बाजूला क्रॉसरेल्य असतात व वरच्या बाजूला लूम हेड असतें. त्यानंतर एक शाफ्टिंग वर असतें. वरच्याला क्रयांक शाफ्ट म्हणतात व खालच्याला टॅपेट षाफ्ट म्हणतात. या दोन्ही षाफट्स एकमेकांशी दांतांच्या चक्रानें जोडलेल्या असतात. खालच्या चक्राच्या निम्मे दांत वरच्या चक्राला असतात. मूळ सांचाला गति वरच्या शाफ्टिगपासून मिळते. त्यावर दोन पुल्या बसविलेल्या असतात. एक सैल (लूज) असते व एक घटट (फास्ट) असते. सांचा बंद असल्यावेळीं सैल पुलीवर पटटा फिरत असतो व फास्ट पुलीवर पट्टा आला म्हणजे सांचा चालू होतो. सांचा चालू करण्यासाठीं एक हँडल असते त्याला लूमहँडल म्हणतात. याला जोडून एक स्टॅंपफोर्क लिव्हर-ज्याला कामवाले चिमटा म्हणतात  ती बसविलेली असते व या चिमट्याच्या तोंडांत पटटा अडकलेला असतो. नेहमीं पटटा सैल पुलीवर फिरत असतो व हँडल पुढें लोटून त्याच्या खाच्यांत बसल्याबरोबर पट्टा घट्ट पुलीवर येउन सांचा चालू होतो. वरच्या शाफ्टिंगचे दोन फेरे होतात तेव्हां खालच्याचा एक फेरा होतो. वरच्या शाफ्टिंगला दिवालीच्या आंतल्या अंगाला दोन वांकणें (क्रॅंक्स) असतात, तीं वाकणें व स्ले  (हात्या) यांचा संबंध दोन हातानीं जोडलेला असतो; याला क्रॅक आर्म्स म्हणतात. वरली शाफ्टिंग फिरूं लागली म्हणजे क्रॅक्स मागें पुढें होतात व त्याबरोबर स्लेहि मागें पुढें होतो. स्ले मागें होतो त्यावेळीं धोटें षटल या बाजूकडून त्या बाजूला व त्या बाजूकडून या बाजूला फेंकलें जातें. व स्ले पुढें येतो त्यावेळीं धोट्याच्या इकडून तिकडे जाण्यानें वेफ्टचा दोरा (पिक) मध्यें पडलेला असतो तो कापडाच्या आंत ठासून बसला जातो. या स्लेची रूंदी सुमारें ३ इंच असून तीवर धोटा इकडून तिकडे जाण्यासाठीं एक लांकडाची पटटी लेव्हलमध्यें बसविलेली असते. या धोटा जाण्याच्या मार्गाला षटल रेस म्हणतात. धोटा दोन्ही बाजूंनां थांबण्यासाठीं पेट्या बनविलेल्या असतात त्यांनां षटल बॉक्सेस म्हणतात. धोटा पेटींत गेला म्हणजे पेटीच्या शेवटावर आपटूं नये म्हणून एक चामड्याची वादी दोन्ही बाजूच्या पेटयांनां लावलेली असते. त्यायोगें धोट्याची गति थांबली जाऊन धोटा झेलल्यासारखा जातो, त्यावेळीं तो शेवटीं आपटून परत माघारा येत नाहीं. तेंच हा चेक स्टॉप तुटल्याबरोबर धोटा पेटींत आपटून परत मागें फिरूं लागतो. धोट्याला इकडून तिकडे फेंकण्यासाठीं चामड्याचें पटटे बनविलेले असतात त्यांनां पिकर्स म्हणतात. पेटींत एक पोलादी शीग बसविलेली असून तीमध्यें हा पिकर पुढेंमागे होत असतो. त्या शिगेला लूमस्पिंडल्स म्हणतात. पिकरला जोरानें पुढें लोटून धोटा इकडून तिकडे फेंकण्याचें काम, पिकिंग स्टिक म्हणून लांकडीं दांडकी असतात तीं करीत असतात. ह्या पिकिंग स्टिक्स व पिकर्स यांचा संबंध जोडणारे चामड्याचे पटटे असतात. त्यांनां पिकिंग वॅण्डस म्हणतात. दोन्ही बाजूला दोन लोखंडी उभ्या पिकिंग शाफ्ट बसविलेल्या असतात. त्यांच्या डोक्यावर बिडाच्या दोन प्लेटी बसवून त्यांवर ही पिकिंग स्टिक बसवून तिच्यावर एक बिडाची टोपी (कॅप) बसवून तीवर नट बसवून ही पिकिंग स्टिक पक्की बसविलेली असते. मार जसा कमी जास्त पाहिजे असेल त्याप्रमाणें हें दांडकें पुढेंमागें घेतां येतें. कारण तें ज्या दोन प्लेटीवर बसविलेलें असतें त्यांच्यामध्यें वांकडें दांत असतात त्यांवर दोन्ही प्लेटचे दांत एकमेकांत जाऊन बसतात. त्यायोगें दांडकें एकाच जागीं बसूं शकतें व जरूर तेवढेंच एक दांत दोन दांत असें पुढें अगर मागें घेऊन पुन्हां नट घटट बसवितां येतो. याच पिकिंग शाफ्टच्या खालच्या बाजूस सांच्याच्या आंतल्या बाजूला एक पिकिंग बाऊल आंत लांब बोल्ट व स्टड घालून पक्का बसविलेला असतो. त्यावर खालची जी टॅपेट शाफ्ट असते तिच्या दोन्ही तोंडावर बिडाच्या पिकिंग प्लेटस् समोरासमोर तोंड करून बसविलेल्या असतात. व त्यांवर पिकिंग निब बसविलेली असते. ही पिकिंग निब लहान मोठा सांचा असेल त्याप्रमाणें लांब आखूड आकाराची असते. व खालची शाफ्ट फिरूं लागली म्हणजे ही पिकिंग निब पिकिंगच्या पिकिंगबॉउलवर जोरानें आपटून त्याला धक्का मारते, त्यायोगें वरील पिकिंग स्टिकलाहि धक्का मिळून ती पुढें येते व पिकरला पुढें लोटून धोट्याला इकडून तिकडे फेंकते. याप्रमाणें वरच्या शाफ्टच्या दोन फेर्‍यांमध्यें खालच्या शाफ्टचा एक फेरा होत असल्यामुळें तिच्या एक फेर्‍यांत ती धोट्याला एकदां इकडून तिकडे व एकदां तिकडून इकडे फेंकतें. पिकिंगशाफ्ट पुन्हां आपल्या जागेवर यावा म्हणून त्याच्या अंगावर एक स्टड देऊन त्याच्यावर एक चामडें बसवून त्याला आंत एक पक्की स्प्रिंग बसविलेली असते. ती पिकिंगशाफ्टला पुन्हां आपल्या जागेवर आणते. टॅपेटचा उपयोग ओव्या दाखण्यासाठीं होतो. वरच्या बाजूला एक होलरोलर लावून त्याच्या दोन्ही बाजूनां चामडीं लावून त्याला दोर्‍या अडकवून ओव्या बांधलेल्या असतात. व खालच्या बाजूला जे टॅपेट असतात त्यांचा आकार एक्सेट्रिकप्रमाणें असून ते दोन एक्सेंटिक एकाच बॉसवर बसविलेले असतात. व त्यांचीं तोंडें एकमेकांच्या उलट दिशेला असतात, त्यायोगें या टॅपेटच्या खालीं दोन टेडल्स बसविलेल्या असतात. त्यांनां हे टॅपेट आळीपाळीनें खाली दाबतात. लांकडीं पावड्याला हूक लावून ते हूक खालीं या टेडल्समध्यें अडकवितात व वरती या पावड्या दोरीनें ओव्यांनां बांधतात. साध्या कापडास चार ओव्या लागतात म्हणून सांगितलेंच; त्यांपैकीं पुढच्या दोन्ही ओव्या एका ठिकाणीं बांधतात. व मागच्या दोन एके ठिकाणीं बांधतात. खालीं ज्या दोन पावड्या असतात त्यांचा संबंधहि एकीचा पुढच्या दोन ओव्याशी असतो व एकीचा मागच्या ओव्याशी असतो त्यायोगें खालच्या शाफ्टची एक फेरी होईपर्यंत एकदां पुढची ओवी खालीं दबते व मागची वर उठते व धोटा इकडून तिकडे जातो. व मग मागची ओवी खालीं दबते व पुढची वर उठते व धोटा तिकडून इकडे येतो. यानंतर विणलें गेलेलें कापड खालीं गुंडाळलें जातें. हें गुंडाळण्याचें कामहि एकसारखें चालू असतें. सांचाच्या पुढच्या बाजूला ब्रेस्ट बीम म्हणून आडवी बिडाची प्लेट असते. तीवरून हें कापड पुढें येऊन त्याच्या खालीं एमरी रोलर असतो त्यावरून जाऊन त्याच्या खालीं लांकडी रूळ असतो- हा एकरी रोलरच्या आंगावर चिकटून बसलेला असतो. याला क्लाथ रोलर म्हणतात. या दोन्ही रूळांच्या मधून कापड जाऊन तें खालच्या रूळाच्या अंगावर गुंडाळलें जातें. मुख्य गति वरच्या एमरी रूळाला मिळते. स्लेच्या पायावर एक लोखंडी पिन वसविलेली असते ती टेकिंग अप लिव्हरला मागें पुढें ढकलते. या लिव्हरवर वरच्या बाजूला एक कॅच (कुत्रें) असतो, तो रॅचेटव्हील म्हणून वांकड्या दांत्याचें चक्र असतें त्याचा दर खेपेस एक दांत ढकलतो. याच रॅचेटव्हिलच्या पिनवर एक चक्र बसविलें असतें त्याला चेन्ज पिनियन म्हणतात. जितक्या पिक्स कापडांत एका इंचांत पाहिजे असतील त्याप्रमाणें हिशेबानें हें चक्र बदलावयाचें असतें. हें चेजपिनियन चक्र एका दुसर्‍या मोठ्या चक्रास फिरवितें व त्याच्याच अंगावर एक लहान चक्र असतें, तें एमरी रूळावरचें चक्र बसविलेलें असतें त्याला फिरवतें. त्यायोगें एमरी रूळाला गति मिळते. अशा रीतीनें ही टेकिंग अप मोशन पांच चक्रांची बनविलेली असते. दुसरी एक सात चक्रांची टेकिंग अप मोशन आहे, तिच्यामध्यें आपणाला जितक्या पिक्स कापडांत पाहिजे असतील तितक्या दात्यांचें चेंजपिनियम लावलें म्हणजें झालें. पांच चक्रांच्या मोशनमध्यें, त्या सांचाचा डिव्हिडेंड असेल त्याला पिक्सच्या संख्येनें भागलें म्हणजे संचाला लावण्याचें चेन्जपिनियन निघतें. निरनिराळ्या मेकर्समध्यें चक्रांचे दांत व टीन रोलरचा घेर निरनिराळा असतो व त्यामुळें त्यांच्या डिव्हिडेंडमध्येंहि फेर पडतो. पुष्कळशा मेकर्समध्यें ५०८ डिव्हिडेंड ठेवण्याची रीत आहे. हा पाव इंचाचा होय. पिक्सबद्दल बोलतानाहि ४८ पिक्सच्या कपड्याला १२ पिक्सचा कपडा म्हणण्याची पध्दत आहे. म्हणजे ५०८ ला १२ नीं भागलें तर ४२ भागाकार येतो म्हणजे ४२ दात्यांचें चक्र लाविलें म्हणजे कापडांत एका इंचांत ४८ पिक्स पडतात.

येथपर्यंत सांचाची थोडक्यांत माहिती सांगितली. आतां त्याच्या जोड कामाविषयीं थोडक्यांत विचार करूं. सांचा जोडतेवेळीं प्रत्येक भाग नीट जेथल्या तेथें लावावा. नीट बसत नसल्यास बसता करावा. त्याचे बोल्ट चांगल्या रीतीनें मजबूत घटट करतेवेळीं त्यांच्या आट्यांस खोबरेल तेल अगर स्पिंडल तेल घालून मग बसवावेत. नाहींतर विलायतेहून येतेवेळीं त्यावर गंज चढलेला असतो व त्यायोगें ते घटट झाल्यासारखे वाटतात पण घटट होत नाहींत व मग सांचा चालू झाला म्हणजे बोल्ट ढिला पडून सामान तुटतें. सांचाची दिवाल जोडतेवेळीं ती चौरसाईंत नीट बसली आहे किंवा नाहीं हें पहावें. म्हणजे फिरणारे भाग असतील तेवढे चांगले ढिले येतात. जेवढे फिरणारे भाग तेवढे चांगल्या रीतीनें ढिले फिरतील असे जोडावे. एकंदर सांचा जोडून झाला म्हणजे तो हातांनीं सहजीं फिरवितां यावा असा जोडावा. सांचा जोडण्याचें काम हुशार जॉबर वर सोंपवावें नाहींतर सांचा चालू करतेवेळीं पुष्कळ सामान तुटतें, सांचा लवकर नीट होत नाहीं, वरच्यावर बिघडतो. सांचे जोडून झाले म्हणजे नीट लाईनमध्यें घ्यावेत. लाईनशाफ्टिंगवर दोन माग एकेठिकाणीं जोडून त्यावर चार पटटे फिरण्याची सोय केलेली असते, त्याप्रमाणें खालीं सांचेहि अशा प्रमाणांत बसवावेत कीं, सांचे चालतेवेळीं मागल्या सांचाचा पट्टा पुढच्या पटट्यावर चढूं नये. यायोगें पटटें खराब होतात व सांचांतहि आंचके बसतात व केव्हां केव्हां त्यायोगें धोट्यासहि आंचके बसून कापड खराब होतें. वरल्या अधिकार्‍याच्या दुर्लक्षामुळें हे दोष पुष्कळ ठिकाणीं दिसून येतात. सांचा बसविण्याच्या जागेची फरशी चांगली जाड व मजबूत असावी. सांचाच्या पायाच्या जागीं भोकें असतात त्या ठिकाणीं फरशीमध्यें वरील भोंकाच्या आकाराचेंच भोंक सरासरी ५-६ इंच खोलीचें पाडावें. मग सांचाच्या पायाखालीं लांकडी प्याकिंग्स देऊन सांचा लेव्हलमध्यें ठेवावा व नंतर भोंकांमध्यें देवदारी लांकडाच्या खुंट्या मारून त्यांत सुमारें ५ ६ इंच लांबीचा खिळा मारावा. हा खिळा चौरस असून वरपासून खालपर्यंत निमुळता असावा व सांचाच्या पायाच्या भोंकापेक्षां जरा लहान (बारीक) असावा. पुष्कळ ठिकाणीं हे खिळे २॥--३ इंचांचे मारल्यामुळें सांचे चालू झाल्यावर हलूं लागून खिळे ठोकण्याचा प्रसंग येतो. या गोष्टी बारीक सारीक वाटतात पण गिरणीमध्यें प्रत्येक बारीक सारीक गोष्टीमध्यें सुधारणा करणें हें चांगल्या गिरणीचें लक्षण होय. सांचाची जोडी ही दोन दोन सांचांची उभी रांग असते व त्यानंतर मध्यें गल्ली सोडलेली असते. ही गल्ली १॥ फुटापेक्षां कमी असूं नये. विणकामाची इमारत बहुधां एकमजली असते, व वरच्या छपरांत कांचा बसवून वरून उजेड घेतलेला असतो. हें छप्पर चांगलें उंच असावें. म्हणजे उन्हाळ्यांत छप्पर तापल्यापासून आंत त्रास होणार नाहीं. विणण्याच्या कामासाठीं ज्यांत पाण्याचा अंश आहे अशी सर्द हवा पाहिजे असते. अशी पुरेशी सर्दी हवेंतून मिळत नाहीं म्हणून कृत्रिम रीतीनें ती उत्पन्न करतात. आंतल्या हवेंत ७५ पासून ८० पर्यंत ह्युमिडिटी (सर्दी) असावी. याकरितां सांचाच्या मधल्या गल्लीमध्यें गटारें ठेवून त्याच्या एका तोंडाला पंखा बसवून त्याची हवा गल्लीमध्यें घेतात व त्या गल्लींत पाण्याचे फवारे लाविलेले असतात व गटाराच्यावर जाड फळ्या घालून त्याला भोंकें पाडलेलीं असतात त्यायोगें सर्द हवा बाहेर येउन एकंदर हवा सर्द होते. कांहीं ठिकाणीं ड्राफ्टर्स वरच्या बाजूस बसविलेले असतात. या शिवायहि हवा व पाणी मिळून पाइपांतून जोरानें बाहेर निघून वाफेप्रमाणें त्याचे तुषार हवेंमध्यें मिसळतात. कोणीकडून तरी हवेंत वर लिहिल्याप्रमाणें सर्दी असावी. मुंबईखेरीज बाहेरगांवच्या पुष्कळशा गिरण्यांतून या बाबतींत दुर्लक्ष केलेलें असतें. त्याचा परिणाम असा होतो कीं, काम नेहेमीसारखें चालत नाहीं. थंडीच्या दिवसांत उघडी स्टीम या खात्यांत सोडण्याची व्यवस्था पाहिजे. अशा रीतीनें विणकामाच्या इमारतीबाबत थोडी माहिती सांगितली. आतां कापड तयार झाल्यावर त्याच्यापुढें आणखी दोन यंत्रांतून त्याला जावें लागतें. त्याबद्दल थोडी माहिती सांगून हा लेख पुरा करूं.

फिनिशिंग:- कापड तयार झाल्यानंतर त्याला पुन्हां खळ देणें असल्यास त्यासाठीं फिनिशिंग नांवाच्या यंत्राचा उपयोग करतात. कांहीं प्रांतांत सांच्यावरून कापड आलें म्हणजे तें घडी करून छाप मारून बाजारांत जातें. कांहीं ठिकाणीं त्याला कॅलेण्डर (इस्त्री) केल्यावर मग तें बाजारांत जातें. कांहीं जातीच्या कापडास पुन्हां खळ देऊन मग कॅलेण्डर करतात अगर केव्हां तसेंच तें घडी करून बाजारांत पाठवितात. फिनिशिंगच्या यंत्रांत खळ घालण्यासाठीं एक लांकडी टाकी असते. तींत एक रूळ असतो. कापड त्याच्या खालून गेलें म्हणजे खळींत बुडलें जातें. व मग त्यापुढें तीन रूळ एकावरएक असतात. त्यांतून तें दाबून पुढें जातें. ह्या रूळांपैकीं मधला रूळ पितळेचा असतो व खालचा व वरचा रांब्याचे असतात. या रूळांतून कापड निघालें म्हणजे त्यांतील जास्त खळ दाबून निघतें व मग कापड सुकण्यासाठीं तांब्यांच्या सिलेंडर्सवर जातें. त्यापूर्वी तें पितळी एक्सपांडर्समधून जातें, त्यायोगें त्याची रूंदी जी कमी झालेली असते ती पुन्हां थोडी वाढते. तांब्याच्या सिलेंडर्समध्यें वाफ असते. त्यायोगें ते गरम होतात व त्याच्या खालून व वरून कापड गेल्यानें तें सुकतें. व पुढें त्याची घडी होऊन तें बाहेर पडतें. या यंत्राचा उपयोग धुवट कापड सुकविण्याकडेहि करतात. कापडास एकाच बाजूनें खळ देण्यासाठीं बॅकस्टचिंग म्हणून यंत्र अलीकडे नवीन निघालें आहे. त्याचेंहि काम याच फिनिशिंगच्या यंत्रापासून करून घेतलें जातें. दक्षिणेंतील बायकांचे नेसावयाचे सुती बांड अलीकडे गिरण्यांतून निघतात त्यांनांहि ते विकण्यापूर्वी या यंत्रावर खळ देण्याची रीत आहे.

कॅलेण्डर:- कॅलेण्डर यंत्रांत ३-५-७-११ पर्यंत रूळ एकावर एक बसविलेले असतात व त्यांवर दाब देण्याची योजना केलेली असते. हे रूळ फिरूं लागून त्यांमधून कपडा निघाला म्हणजे तो दबून नरम पडतो. व गुळगुळीत होऊन त्यावर चमक येते व कपड्याचें स्वरूपच बदलून जातें. त्यामुळें अलीकडे त्याचा उपयोग फार होऊ लागला आहे कॅलेण्डरशिवाय कोर्‍या चादरी वगैरे व कांहीं सफेत मांजरपाट विकला जातो. बाकी तयार होणार्‍या मालापैकीं शेकडा ८० माल आजकाल कॅलेण्डर होऊन विकतो व ज्याच्या मालावर जास्त चकाकी असेल त्याच्या मालाला भाव जास्त येतो. बाकी कापड एकदां धुतलें कीं त्यावरील सर्व चकाकी निघून जाते. धुतल्यावर कापड कसें निघेल हें कोणी न पहातां पहिल्या प्रथम वरील पहिल्या भपक्यावर भुलतात. त्यामुळें गिरणींतून फिनिशिंग व कॅलेण्डरसारख्या यंत्रांची गरज वाढूं लागली आहे. वर्‍हाडांत कांहीं जातींत फिनिश केलेले  (कापडास मागाहून खळ दिलेले) धोतरजोडे वापरण्याची चाल आहे. त्यांनां तो धोतरजोडा हातांत धरल्याबरोबर ताठ रहावयास पाहिजे व खूप जड लागला पाहिजे म्हणजे पसंत होतो. त्यामुळें एकेका धोतरजोड्यांत एकेक पौंड खळ घालून त्यास कडक करण्याची रीत पडली आहे.

कॅलेण्डर झाल्यानंतर कापड घडीखातयांत जातें. तेथें घडीच्या सांचावर घडी करतात. ही घडी एक वाराची केली जाते. परंतु या यंत्रांतहि कमीजास्त घडी करण्याची योजना असते व त्यामुळें घडी लहान ठेवून कापड आहे त्यापेक्षां वाराला जास्त दाखविण्याची वहिवाट पडली आहे. तथापि अलीकडे सरकारनें कायदा केल्यापासून जितकें वार कापड असेल तितक्या वारांचाच छाप मारावा लागतो. तथापि, अडाणी लोक, ज्यांनां लिहितांवाचतां येत नाहीं त्यांनां व्यापारी लोक अशा तर्‍हेनें घडीच्या योगें फसवितात. कापड घडी झाल्यावर त्यावर गिरणीच्या नांवाचा व वारांचा वगैरे छाप मारून नंतर बंडलें बांधून त्यांच्या गांठी बांधून तें बाजारांत विक्रीकरितां जातें. या छापाचेंहि फार महत्त्व आहे. कारण अमुक एका कापडावर अमुक छाप येतो व त्या छापाच्या नांवावर त्याची प्रसिध्दि होऊन तें विकलें जातें. [लो. पां. स. केळकर].

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .