प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

विदुर:- व्यासापासून अंबिकेच्या दासीला झालेला पुत्र. हा न्यायी, नीतिमान व शहाणा म्हणून प्रसिध्द आहे. याची पांडवांवर प्रीति असून त्यांनां विदुरानें लक्षागृहादि संकटांतून वांचविलें. धृतराश्टास विदुरानें सांगितलेली नीति विदुरनीति म्हणून प्रसिध्द आहे.

विदुर:- एक ब्राह्मण जात. यांच्यांत कृष्णयजुर्वेदी व शुक्लयजुर्वेदी पाराशर ब्राह्मण असे दोन भेद आहेत. येथें शुक्लयजुर्वेदी पाराशर शाखेची माहिती प्रथम दिली आहे. ज्ञातीची एकंदर लोकसंख्या अजमासें १००० । १२०० आहे. वस्तीचें मुख्य ठिकाण पूर्वखानदेश व पश्चिम वर्‍हाडचा कांहीं भाग, यांत कोठें चार घरें, कोठें सहा, कोठें दोन अशी वस्ती आहे. याशिवाय माळवा व निजामशाहींतहि नोकरीच्या संबंधानें गेलेली कांहीं मंडळी तेथें सुमारें १०० वर्षांपासून स्थायिक झाली आहेत.

या ज्ञातीचें अन्नोदक पुष्कळांस चालतें. इतर ब्राह्मण ज्ञातींचा या ज्ञातींशी अन्नोदकव्यवहार ऐच्छिक आहे. पूर्वी स्वशाखेचे भिक्षुक कांहीं ठिकाणीं होते, परंतु अलीकडे (७५। १०० वर्षांत) यांपैकीं कांहीं घराणीं नष्ट झाल्यामुळें आणि कांहींचा कांहीं द्वेशमूलक कारणांनीं व विशेषत: यांच्यांत वैदिकी ज्ञानाचा संक्षेप होत असल्यानें या वृत्तीवर योगक्षेम चालेनासा झाला व त्यांनीं ती वृत्ति सोडली. आतां बहुतेक अन्य यजु:शाखीयांकडूनच हे संस्कार करविले जातात. चातुर्वर्ण्यव्यवस्थेंत ज्ञातीचें आद्य (ब्राह्मण) स्थान आहे असें या ज्ञातीचें मत आहे. या ज्ञातीस प्रस्तुत विदुर ही जी संज्ञा आहे, तिचा इतिहास असा देण्यांत येतो:-

''ही ज्ञाति मूळ शुक्लयजुर्वेदांतर्गत पाराशर शास्त्रीय ब्राह्मण. परंतु कांहीं शतकापूर्वी या शाखेची संख्या कालाच्या प्रवाहांत नष्ट होतां होतां इतकी अल्प झाली कीं, या शाखेस वैवाहिक संबंधांत अखेरीस देशस्थ ऋकशाखीयांप्रमाणेंच मातुल कन्या परिणयाचा अवलंब करावा लागला. हें स्वशाखोक्त रूढीचें उल्लंघन या शाखेकडून झाल्यामुळें, अन्य शाखीयांनीं या शाखेस अपांक्त ठरविलें. पुढें या अपांक्ततेचा फायदा घेऊन कांहीं स्वार्थी लोकांनीं या शाखेच्या भिक्षुकी वृत्तीचा अपहार करण्याच्या हेतूनें, 'हे लोक खरोखर पाराशर शाखीय नसून पाराशरिजातीय आहेत. म्हणजे पराशराचा पुत्र पाराशर (व्यास) व त्याचा पुत्र जो भारतप्रसिध्द विदुर तो पाराशरी, आणि त्याची ही परंपरा म्हणोन पाराशरी म्हणजे विदुरजातीय आहेत.' अशा प्रकारची अफवा लोकांत पसरून या ज्ञातीचें नांव जिकडे तिकडे विदुर म्हणून प्रसिध्द केलें.,व असें होतां होतां तेंच आगंतुक नांव चालूं झालें, तें आजतागाईत चालूं आहे.'' कांहीं थोडीं घराणीं आश्वालायनांप्रमाणेंच आपलीं नित्यनैमित्तिक कर्मे करतात. भिक्षुकी वृत्ति जरी अन्य शाखीयांनीं याप्रमाणे हरण करण्याचा यत्न केला तरी स्वशाखेंत व ब्राह्मणेतर वर्गांत या ज्ञातीनें ही वृत्ति कांहीं अव्वल इंग्रजीच्या अंमलापावेतों कायम ठेविली होती. वामन भट महिंदलेकर, बापुभट मोपारी, महीपतिभट सातारकर (सातारकर) नव्हे व बापुभट बेलवाळकर ही मंडळी या अवशिष्ट भिक्षुक मंडळापैकीं होती. यांपैकीं महिंदलेकर मात्र ही वृत्ति आजमितिसहि थोडीफार चालवीत आहेत. व मोपारी यांची वृत्ति फक्त कांहीं दक्षिणेच्या हक्कापुरती कायम आहे.

ज्ञातींतील अजमासे निम्या लोकांस कुलकर्णाचीं वतनें आहेत, तीं त्यांनीं बर्‍हाणपूर येथील पहिल्या व दुसर्‍या बादशाहीच्या अमदानींत (इसवी सन १४०० ते १६०० व १६०१ ते १७६० च्या दरम्यान) खरेदीच्या हक्कानें मिळविलेली आहेत असें त्यांच्या सनदांवरून दिसतें. क्वचित् पाटिलकीचीहि वतनें होतीं, त्यांपैकीं फक्त एक (गडखांबकराचें) अस्तित्वांत असून तें त्यांनीं दोनशे वर्षांपूर्वी मिळविलेलें आहे असें त्यांच्या सनदेवरून दिसतें. त्यापूर्वी ते निवासें वगैरे तीन गांवांचे कुलकर्णी होते, असा त्या सनदेंत उल्लेख आहे, जातीचा उल्लेख नाहीं.

ज्ञातीच्या अल्पसंख्येकडे लक्ष देऊन व प्रस्तुतच्या जातिभेदनिवारक चळवळीचें अनुकरण करून, शक्य असल्यास ज्ञातीची संख्या विस्तृत करावी, म्हणून कांही आधुनिक संस्कृतीच्या एक दोन गृहस्थांनीं खटपट चालविली होती, परंतु पुराण-मताभिमानी ज्ञातिबंधूंच्या दृष्टीनें हा प्रकार सुधारकी म्हणून हास्यास्पद ठरल्यामुळें ती त्यांनां सोडून द्यावी लागली.

गेल्या शतकांत, म्हणजे इ.स. १८०१ ते १८९५ च्या दरम्यान वतनदार लोकांखेरीज कांहीं मंडळी इंदोर, ग्वाल्हेर उदेपूर व भोपाळ या संस्थानांत नोकरीच्या उद्देशानें गेली होती, ती तिकडेच स्थायिक झाली. त्यांपैकीं कांहीं गृहस्थ सुभायत (कलेक्टरी,) (वकीली). (अंबॅसडर,) तहसीलदारी, दप्तरदारी वगैरे अधिकाराचीं व वैभवाचीं कामें करून ज्ञातींत लौकीक मिळवून गेले. या जातींत पुनर्विवाह होत नाहीं. विधवांची व निराश्रित मुलांची तरतूद मुळींच केलेली नाहीं. विधवावपनाची वहिवाट पूर्वीप्रमाणेंच चालू आहे. [रा. लक्ष्मण गोविंद नंद. हेडक्लार्क, क्यारेज ऍंड वॅगन डिपार्टमेंट, जी. आय्, पी. रेल्वे पुणें, यांजकडून आलेली माहिती]

या जातीस मध्यप्रांत व वर्‍हाड या भागांत विदुर किंवा कृष्णपक्षी असें म्हणतात व या भागांत या जातीची गणना शूद्रवर्णात केली जाते. या जातींतील लोकांचीं उत्पत्ति ब्राह्मण वर्णाच्या पुरूषापासून अन्य तीन वर्णांच्या स्त्रियांच्या ठायीं झालेली आहे. शास्त्रीय ग्रंथांचें, कायद्यांचें व हिंदुस्थानांतील ब्रिटिश हायकोर्टाच्या निवाड्यांचें अवलोकन केलें असतां सदरहु जाति शूद्रवर्णांत येत नाहीं असें या जातींतील कांहीं गृहस्थांच्या नजरेस आल्यामुळें सदरहु जातीस लागलेला शूद्रवर्णाचा शिक्का काढून टाकावा एतदर्थ कांहीं मंडळींनीं उद्योग आरंभिला आहे व त्याप्रमाणें १९२० सालापासून तेथें या जातीच्या दोन परिषदा भरून त्यांत शास्त्रीय व कायदेशीर निवाड्यांचा उहापोह होऊन सर्वानुमतें या जातींतील लोकांनीं आपली गणना ब्राह्मण वर्णात होते असें ठरवून घेतलें असून ते आपणांस ब्राह्मण म्हणवून घेत आहेत. आतां यांत कित्येकांनीं शाखापरत्वें आपणांस कृष्णयजुर्वेदी व पराशर ब्राह्मण असें म्हणवून घेतलें आहे. शाखा संबंधानें यांच्यांत जरी मतभेद असला तरी वर्णासंबंधानें यांच्यात कोणताच मतभेद नसून सर्वांनी एकमतानें आपण ब्राह्मण वर्णाचें आहोंत असेंच ठरवून घेतलें आहे व त्याप्रमाणें त्यांच्यांत संस्कारहि सुरू झाले आहेत अशी माहिती रा. गणपतराव राघोबा अमीन. सेक्रेटरी कृष्णयजुर्वेदी ब्राह्मण समाज नागपूर, यांनीं ज्ञानकोशाकडे पाठविली आहे.

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .