विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
विदेह:- सूर्यवंशीय निमि राजा वसिष्ठ शापानें मरण पावल्यावर, त्याने पुन्हां देह स्वीकारला नाहीं म्हणून त्याच्या मिथिपुत्रापासून पुढील वंशास पडलेलें हें नांव आहे. विदेह राजांच्या राज्यासहि विदेह असेंच नांव असून त्याची राजधानी मिथिला होती. विदेहराज्य म्हणजे अर्वाचिन तिरहुत किंवा उत्तरबिहार प्रांत असावा.