विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
विद्याधर:- एक उपदेवतागण विद्याधर पृथ्वी व आकाश यांच्या मध्यावकाशांत वास करीत असून ते स्वभावत: उपकारी असतात असा समज आहे. हे इंद्राचे अनुचर असले तरी यांच्यापैकींच कोणी राजे-राज्यकर्ते असतात. यांचा मानवांशी संबंध असून पुष्कळदां मानव-विद्याधरांत लग्नें घडतात. यांची कामरूपी, खेचर, नभश्चर, प्रियवंद, वगैरे गुणदर्शक नांवें आहेत.