प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

विद्यापीठें:- विद्येच्या अभिवृद्ध्यर्थ स्थापन करण्यांत आलेल्या संस्थेला विद्यापीठ असें म्हणतात. विद्यापीठ म्हणजे विद्यादानाचें केंद्र अशी त्याची स्थूलमानानें व्याख्या करतां येईल. प्राचीन काळामध्यें सुध्दां अशा प्रकारचीं विद्यापीठें अस्तित्वांत होतीं असें दिसून येतें. अथेन्स येथील इसोक्रेटसचें अगर प्लेटोचें विद्यामंदिर, अलेक्झांडिया येथील म्यूझियम, नालंदा अगर तक्षशिला येथील विहार हीं सर्व एक प्रकारचीं विद्यापीठेंच होत. अलीकडच्या सुधारलेल्या जगांतील विश्वविद्यालयें उर्फ विद्यापीठें व प्राचीन काळचीं विद्यापीठें यांत बरेंच साम्य आहे. हल्लींच्या विद्यापीठांची घटना व ध्येय आणि पूर्वीच्या विद्यापीठांची घटना व ध्येय यांमध्यें फार अंतर आढळत नाहीं. एवढेंच नव्हें तर हल्लीं ज्याप्रमाणें विश्वविद्यालयांचे प्रमुख ध्येय पदव्या देण्याचें आहे तद्वतच पूर्वीच्या विद्यापीठांतून, ठराविक शिक्षण घेऊन बाहेर पडणार्‍यांनां पदव्या देण्यांत येत असत असें दिसतें. उदाहरणार्थ विक्रमशिला येथील विद्यापीठाकडून पंडित प्रभृति पदव्या देण्यांत येत. ग्रीस अगर रोम या राष्ट्रांत देखील अशीच वहिवाट असलेली आढळून येते.

भारतीय विद्यापीठें:- भारतीय विद्यापीठांची पीठिका बर्‍याच प्राचीन काळापर्यंत मागें नेतां येतें. ज्या अर्थानें विद्यपीठ हा शब्द हल्लीं वापरण्यांत येतो तशा प्रकारचीं विद्यापीठें ऋग्वेदकालीं होतीं किंवा नव्हतीं याविषयीं नक्की सांगतां येत नाहीं. तथापि प्रत्येक ऋषीचें घर म्हणजे विद्येचें मंदिर उर्फ कॉलेज असे व त्या मंदिरांत बरेच विद्यार्थी जमत असत एवढें खास म्हणतां येतें. ऋग्वेद व तदुत्तर काळीं पंजाब व सरस्वतीतीर हीं विद्येचीं केंद्रे होतीं. त्यावेळीं या विद्यामंदिरांत कोणते विषय शिकविले जात याची यादी छांदोग्योप निशदांत आढळते. चारी वेद, इतिहास, पुराणें, निरनिराळीं अध्यात्मिक व आधिभौतिक शास्त्रें व वेदांग यांचें शिक्षण प्राचीन विद्यामंदिरांत दिलें जाई. ख्रिस्तपूर्व १०००-८०० च्या दरम्यान भरतखंडांत तक्षशिला येथें प्रसिध्द विद्यापीठ स्थापन झालें व त्यांत पाणिनीसारखे जगमान्य आचार्य अध्यापनाचें काम करीत असत. अशाच प्रकारचीं विद्यापीठें उर्फ गुरूकुलें सरस्वतीतीर, नैमिषारण्य, काशी, मिथिला इत्यादि ठिकाणीं होतीं असें इतिहासावरून आपणांस आढळून येतें. भारतीय प्राचीन विद्यापीठांचा विशेष म्हणजे तीं विद्यापीठें 'रेसिडेन्शियल' असत. गुरूकुलामध्यें राहून तेथेंच विद्या संपादन करावयाची पध्दति प्रथमपासूनच भरतखंडांत होती, व मोठमोठ्या राजांचीं मुलेंहि या गुरूकुलामध्यें अभ्यासाकरतां येत असत. महाभारतकाळीं अशा प्रकारचीं बरींच विद्यापीठें उत्तरहिंदुस्थानांत होतीं. पुढें आर्यलोक दक्षिणेकडे ज्यावेळीं सरकूं लागले त्यावेळीं दक्षिणेसहि अशा प्रकारचीं गुरूकुलें निघूं लागलीं. अशा गुरूकुलांमध्यें उज्जनी येथील विद्यापीठ फार प्रसिध्द होतें; व त्यांत ज्योतिषाचा अभ्यास उत्तम रीतीनें केला जात असे. अगदीं उत्तरेस काश्मीरमध्येंहि विद्यापीठें स्थापन झालीं होतों व अद्वैतमताचे आचार्य शंकराचार्य यानां काश्मीर येथील शारदामंदिरांत आपल्या विद्वत्तेची परीक्षा द्यावी लागली, काशीचें नांव तर विद्येचें माहेरघर म्हणून प्राचीन काळापासून प्रसिध्द असून तेथें मी मी म्हणणार्‍या पंडितांनां आपल्या पांडित्याची परीक्षा द्यावी लागे. बौध्द काळांत बौध्दांचे विहार हींच विद्येचीं केद्रें असत, व ऑक्सफोर्ड व केंब्रिजसारख्या विद्यापिठांनां जशा अनेक राजांनीं व धनाढ्यांनीं देणग्या दिल्या तशाच या बौध्द विहारांनां त्यांतील भिक्षूंच्या चरितार्थासाठीं राजेलोकांकडून व श्रीमंतांकडून देणग्या मिळत असत. बौध्द काळांतील प्रसिध्द विद्यापीठें म्हणजे नालंदा ('नालंदा' पहा) आणि विक्रमशिला हीं होत. विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना आठव्या शतकाच्या उत्तरार्धांत वंगनृपति धर्मपाल यानें बहार प्रांतांत केली. हा विहार गंगानदीच्या तीरावरील एका टेंकडीवर स्थापन केलेला असून त्यांत आठ हजार लोक बसण्याइतकी प्रशस्त जागा होती. या विद्यापीठांत प्रत्येक षाखेचें शिक्षण दिलें जाई. तथापि विशेशकरून महायानपंथाच्या माध्यमिक व योगाचार्य शाखांचें तसेंच तंत्रविद्येंचें शिक्षण देण्यांत येत असे. या विद्यापिठांत प्रवेश करणार्‍या विद्यार्थ्यास प्रथम तेथील द्वाररक्षक पंडिताशी वाद करावा लागे व त्यांत यशस्वी झाल्यानंतर मग विहारांत प्रवेश करण्याची परवानगी मिळे. विद्यापीठांतून यशस्वी तर्‍हेनें बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यास पंडीत ही पदवी व कलाबतूची पटटी असलेली तांबडी टोपी अर्पण करण्यांत येत असे. मध्ययुगांत जरी नवीन विद्यापीठें थोडी निघालीं तरी जुनीं विद्यापीठें कायमच होतीं. नवद्वीप येथील विद्यापीठ ११ व्या शतकांत स्थापन झालें होतें. दक्षिणेस सातवाहन राजांच्या अंमलाखाली पैठण हें विद्येचें केंद्र बनलें व तें अनेक शतकेंपर्यंत तसेंच राहिलें. तथापि हिंदुस्थानांत मुसुलमानी अंमल प्रस्थापित होऊन हिंदुस्थान हें परतंत्र झाल्यामुळें विद्येचा ओघ बंद पडला व त्यांमुळें विद्यापीठांनां उतरती कळा लागली. पण भरतखंडांत विद्यापीठांचा र्‍हास होत चालला तर त्याच वेळीं म्हणजे १२ व्या शतकांत यूरोपमध्यें विद्यापीठें स्थापन होण्यास सुरवात झाली हा एक विचित्र योगायोगच होय.

पाश्चात्त्य:- यूरोपांत विद्यापीठांच्या स्थापनेला १२ व्या शतकामध्यें प्रारंभ झाला असें म्हणावयास हरकत नाहीं. या कल्पनेचा उगम तत्पूर्वी अस्तित्वांत असलेल्या मठशालांत दिसून येतो. या मठशाला शिक्षणाचें कार्य करीत असतां तद्द्वारां राष्ट्रातील पंडितांनां एकत्र आणण्याचें कार्यहि करीत असत. एखाद्या राष्ट्रातील विद्वान गृहस्थ दुसर्‍या राष्ट्रात गेला कीं त्याचें व्याख्यान ऐकण्याला बर्‍याचशा ज्ञानेच्छू लोकांचा हळू हळू संघ बनत असे. या संघलाच पुढें 'युनिव्हर्सिटी' असें नांव देण्यांत आलें; म्हणजे विद्यापीठांची प्राचीन कल्पना, विद्यार्थ्यांचा अगर शिक्षकांचा संघ यापलीकडे नव्हती असें म्हटलें तरी चालेल. अशा प्रकारची विद्यापीठें प्राचीन काळीं आपोआपच निर्माण झालीं. उदाहरणार्थ पॅरिस अगर बोलोनासारख्या विद्येकरतां प्रसिध्द असणार्‍या ठिकाणीं सार्‍या यूरोपमधून विद्यार्थी जमत व अशा विद्यार्थ्यांना कांहीं विशेष सवलती देण्यांत येत व निरनिराळ्या विषयांचा आभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांच्या संस्थांनां, सरकार व चर्च यांच्याकडून मान्यता मिळे. अशा प्रकारच्या संस्था पॅरिस व बोलोना येथें होत्या. पण पॅरिस व बोलोना येथील विद्यामंदिरांमध्यें जो महत्त्वाचा फरक होता तो हा कीं, पॅरिसमध्यें अशा संस्था अगर संघ हे शिक्षकांच्या नियंत्राणाखालीं असत तर बोलोनमध्यें ते विद्यार्थ्यांच्या नियंत्राणाखालीं असत व विद्यार्थी आपल्यावरील नियामक मंडळ निवडीत असे. बोलोना येथील विद्यापीठांच्या धर्तीवर पुढें इटली व फ्रान्समधील प्रांतीक विद्यापीठांची घटना करण्यांत आली. ब्रिटन, जर्मनी, हॉलंड इत्यादि देशांतील विद्यापीठें पॅरिसच्या विद्यापीठांच्या वळणावर स्थापन झालीं. स्पेनमधील प्राचीन विद्यापीठें या दोहोंच्या मधल्या स्थितींत होतीं. रेफर्मेशन (धर्मसुधारणाकाला)च्या पूर्वी असलेल्या यूरोपीय विद्यापीठांत जरी वस्तुत: ध्येयाच्या दृष्टीनें साम्य होतें तरी त्यांची टना, अगर व्याप्ति हीं देशकाल व परिस्थितीच्या मानानें भिन्न होतीं असें दिसून येतें.

विद्यापीठाच्या कल्पनेंत् सर्व प्रकारच्या ज्ञानदानाचा समावेश होत असल्याकरणानें, निरनिराळ्या संस्था अगर शाखा बनणें अपरिहार्य होतें. अशा प्रकारच्या विद्याशाखा कमी अधिक संख्येनें प्रत्येक विद्यापीठाला जोडल्या जात असत. उदाहरणार्थ पॅरिस विद्यापीठाची प्रथम फक्त वाड्:मयाचीच शाखा होती. पण पुढें तेराव्या शतकांत ईश्वरज्ञानशास्त्र, वैद्यक व कायदा यांच्या शाखा जोडण्यांत आल्या, बोलोना येथील विद्यापीठाची प्रथमत: फक्त कायद्याचीच शाखा होती तर ऑक्सफोर्ड अगर केंब्रिज येथील विद्यापीठांत वाड्.मयशाखेशिवाय दुसरी शाखा नव्हती. ऑर्लीन्स अगर माँटपेलियरसारख्या कांहीं फ्रेंच विद्यापीठांनां, पॅरिस विद्यापीठांशी त्या स्पर्धा करतील या भीतीनें ईश्वरज्ञानशास्त्राची शाखा काढण्याला प्रतिबंध करण्यांत आला होता.

विद्यपीठाचें एक प्रमुख कार्य म्हणजे विद्यापीठांतून शिकुन तयार झालेल्या विद्यार्थ्याला पदवी देऊन आपल्या मान्यतेचा शिक्कामोर्तब देणें हें होय. ही कल्पना मूळापासूनच होती. तथापि विद्यापीठाच्या सुरवातीच्या अमदानींत अशा प्रकारच्या पदवीधरांनां विद्यापीठाच्या आवाराबाहेर शिकविण्याचा हक्क नसे. पण तेराव्या शतकाच्या अखेरीस पहिल्या निकोलस पोपनें पॅरिस विद्यापीठांतून बाहेर पडलेल्या पदवीधरांनां कोणत्याहि देशांत व कोणत्याहि विद्यापीठांत शिकविण्याची परवानगी दिली. त्यामुळें विद्यापीठांतील पदवीधर इतर ठिकाणच्या विद्यापीठांत शिकविण्याकरतां जाऊ लागले व त्यामुळें यूरोपमधील विद्यापीठांचें परस्परांशी दळणवळण होऊ लागलें. हळू हळू ही परवानगी विस्तृत करण्यांत येऊन पदवीधरांनां वाटेल त्या ठिकाणीं व्याख्यान देण्याची व तत्द्वारां शिक्षण देण्याची मोकळीक मिळाली.

विद्यापीठांत शिकण्याकरितां जे विद्यार्थी येत त्यांमधील बरेच विद्यार्थी गरीब असत. तेव्हां अशा गरीब विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय करणें विद्यापीठाच्या अधिकार्‍यांना आवश्यक वाटूं लागलें. शिवाय विद्यार्थ्यांवर देखरेख ठेवण्याचीहि जरूरी अधिकार्‍यांनां भासूं लागली. त्यामुळें विद्यापीठाच्या आवारांत विद्यार्थ्यांच्या सोईसाठीं इमारती बांधण्यांत येऊ लागल्या व त्यांच्या जेवणाची सोय करण्यांत आली. हळू हळू गरीबांप्रमाणेंच सुखवस्तु विद्यार्थ्यांनाहि राहण्याची व जेवणाची परवानगी देण्यांत आली. याहि पुढें जाऊन विद्यापीठांतील विषयाचें शिक्षण घेण्यासाठीं जी पूर्व तयारी असणें जरूर आहे ती तयारीहि या विद्यार्थ्यांची व्हावी एतदर्थ शिक्षण देण्यासाठीं कॉलेजें अस्तित्वांत आलीं; व पुढें या कॉलेजमध्यें विद्यापीठांतील शिक्षकांचीच शिक्षणासाठीं योजना करण्यांत येऊ लागली, व कालांतरानें विद्यापीठांत शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यानें कोठल्या तरी एका कॉलेजमध्यें दाखल झालेंच पाहिजे असा निर्बंध घालण्यांत आला.

यूरोपमध्यें साधारणपणें शंभर-सवाशे विद्यापीठें आज अस्तित्वांत आहेत. त्यांपैकी कांहीं विद्यापीठें १२। १३ व्या शतकांत निघालेलीं आहेत तर कांहीं अगदीं अलीकडचीं आहेत. जर्मनी व ऑस्ट्रियांतील मिळून सुमारें तीसवर विद्यापीठें आहेत. इंग्लंडचीं पांच, इटलीची वीस व आयर्लंड-स्काटलंडचीं मिळून सहा सात आहेत. याशिवाय इतर प्रत्येक देशाचीं विद्यापीठें आहेतच.

जर्मनींतील विद्यापीठांमध्यें सर्वांत जुनें विद्यापीठ प्राग येथीन होय. हें सन १३४८ त स्थापन झालें. त्याच्या खालोखाल व्हिएन्नाचें विद्यपीठ होय. ते सन १३६५ त अस्तित्वांत आलें. याशिवाय हीडेलबर्ग, लाइप्झिग, टुबिंनेज, जेना, हाल, गाटिंजेन, बर्लिन, बॉन, विटनबर्ग हीं विद्यापीठें प्रसिध्द आहेत. जर्मन विद्यापीठांची घटना साधारणत: अशी असते. सीनेट्स, अॅकॅडेमिकस् या सभेकडे या विद्यापीठाचा कारभार पाहण्याचें काम असतें. या सभेंत रेक्टर अगर कांहीं ठिकाणीं चॅन्सेलर व प्रोफेसर्स असतात. विद्यार्थ्यांमध्यें एकंदर विद्यापीठाच्या कारभारामध्यें शिस्त राखण्याकरितां एक मंडळ नेमलेलें असतें. व या मंडळाचा मुख्य सिंडिक नांवाचा अधिकारी असतो. प्रोफेसरांचें ऑर्डिनरी व एक्स्ट्रा आर्डिनरी असे दोन वर्ग असतात. बुर्से कॉलेज व कानव्हिक्टा या संस्था गरीब विद्यार्थ्यांसाठी असतात. जर्मन विद्यापीठांची घटना जरी उत्तम व बुध्दीला उत्तेजक अशी असते तरी व्यक्तिश: विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर प्रोफेसरांचें जितकें लक्ष असावयास पाहिजे तितकें या पध्दतीमुळें असूं शकत नाहीं.

इंग्लंडमधील विद्यापीठांत ऑक्सफोर्ड व केंब्रिज येथील विद्यापीठें ही फार प्राचीन होत. हीं विद्यापीठें साधारणत: पॅरिसच्या विद्यापीठांच्या धर्तीवर निर्माण झालीं होतीं, तथापि त्यांची वाढ ही इंग्लंडच्या लोकांच्या स्वभावाला अनुसरूनच स्वतंत्र अशी झाली. पूर्वीपासूनच विद्यापीठांत शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी क्लब करून रहात असत व प्रत्येक क्लबचा एक एक स्वतंत्र शिक्षक असे. पुढें या क्लबचें कॉलेजमध्यें रूपांतर झालें. १५ व्या शतकामध्यें एम्. ए. झालेल्या विद्यार्थ्यांनां शिष्यवृत्त्या देण्यांत येऊ लागल्यामुळें या कॉलेजांचें विद्यापीठांत रूपांतर झालें. व विद्यापीठांतील विद्यार्थ्यांसाठीं व्याख्यानें देण्याचें काम प्रोफेसरांच्याकडे सोंपविण्यांत आलें पण हे प्रोफेसर ठराविक अभ्यास करून घेत नसत. तें काम कॉलेजमधील शिक्षकांकडे असे. याला ट्युटोरियल पध्दति म्हणतात. प्रोफेसर लोक आपल्या विषयावर व्याख्यानें तेवढीं देत असत. हल्लीं या दोहों  (ट्युटोरियल व प्रोफेसोरियल) चा योग्य मिलाफ करण्याचा प्रयत्न चालू आहे. इंग्लंडच्या विद्यापीठांचें मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांनां मिळालेल्या मोठमोठ्या देणग्या हें होय. ऑक्सफोर्ड व केंब्रिज याशिवाय लंडन, डरहॅम, व्हिक्टोरिया हीं विद्यापीठेंहि नांवाजलेलीं आहेत. स्कॉटलंडमधील विद्यापीठें साधारणत: जर्मन विद्यापीठांच्या धर्तीवर आहेत. तर आयर्लंडमधील विद्यापीठें इंग्लंडमधील विद्यापीठांच्या नमुन्यांचीं आहेत. इंग्लिश वसाहतीमध्येंहि बरींच विद्यापीठें आहेत.

अमेरिकेंतील विद्यापीठांचें भिन्न भिन्न प्रकार आढळतात. कॉलेज व विद्यापीठ या नांवांमधील भेद १८८० पर्यंत फारसा पाळला जात नसे. पण १८८० नंतर या गोष्टीकडे लक्ष देण्यांत येऊ लागलें आहे. हार्वर्ड, वुइल्यम-मेरी, व येल हीं जुन्यांतलीं जुनीं कॉलेजें आक्सफोर्ड व केंब्रिज या कॉलेजांच्या नमुन्याचीं होतीं व तीं कोणत्या ना कोणत्या तरी एखाद्या धर्मसंस्थेनें काढलेलीं होतीं. १९ व्या शतकांत या कॉलेजांच्या आसपास शाळा काढण्यांत आल्या व या दोहोंनांहि मिळून विद्यापीठ हें नांव दिलें गेलें. थॉमस जेफर्सनच्या प्रयत्नानें व्हर्जीनिया विद्यापीठ संस्थानंच्या देखरेखीखालीं स्थापन झालें व याच धर्तीवर पश्चिम भागांतील संस्थानांनीं आपलीं विद्यापिठें स्थापन केलीं. या विद्यापीठांचा धर्मसभेशी कांहींच संबंध दिसून येत नाहीं. याशिवाय वैयक्तिक प्रचंड देणग्यांच्या साहाय्यानें अगदीं स्वतंत्र रीतीनें बरींच विद्यापीठें निघालेलीं ढळतात. अशापैकीं कॉर्नेल, शिकागो हीं प्रमुख होत. सारांश, अमेरिकेंत चर्च, संस्थान व व्यक्ति या तिघांच्या उत्तेजनानें निघालेलीं तीन प्रकारचीं विद्यापीठें आज दृष्टीस पडतात. एकाच शहरीं एकाहून अधिक विद्यापीठें असल्याचींहि उदाहरणें आहेत. वॉशिंग्टन मधील कॅथॉलिक विद्यापीठ हें पोपच्या उत्तेजनानें स्थापन झालेलें आहे. न्यूयार्क संस्थानचें विद्यपीठ हें परीक्षाप्रधान विद्यापीठ आहे. अमेरिकेंतील विद्यापीठांपैकीं कांहीं विद्यापीठांची एकेक शाखा आहे तर कांहींच्या दोन व दोहोहून अधिक शाखा आहेत. उदाहरणार्थ, क्लार्क विद्यापीठाची तत्त्वज्ञानाचीच शाखा आहे तर हार्वर्डच्या पुष्कळ विषयांच्या शाखा आहेत, हॉपकिन्सच्या वैद्यक व तत्त्वज्ञान अशा दोन शाखा आहेत. प्रिन्स्टनच्या चार आहेत. अमेरिकेंत कॉलेज शिक्षण व विद्यापीठांचें शिक्षण यांत हल्लीं फरक करण्यांत येऊ लागला आहे. पहिल्याचें ध्येय विद्यार्थ्यांवर देखरेख ठेवून त्यांचा अभ्यास करून घेणें तर दुसर्‍याचें ध्येय वरील शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याला पूर्ण अध्ययनासाठीं सर्व प्रकारचें साहाय्य करणें (युनिटरी) हें होय. यासाठीं विद्यापीठांनीं ग्रंथसंग्रहालयें, प्रयोगशाळा इत्यादिकांची उत्कृष्ट सोय केलेली आहे.

हिंदुस्थानांत ब्रिटिश अंमल सुरू झाल्यापासून तों आतांपर्यंत सुमारें १५ विद्यापीठें स्थापन झालीं आहेत, तीं म्हणजे कलकत्ता, मद्रास, मुंबई, पंजाब, अलाहाबाद, बनारस (हिंदु), म्हैसूर, पाटणा, उस्मानिया, डाक्का, अलीगड (मुस्लीम), रंगून, लखनौ, दिल्ली व नागपूर विद्यापीठ हीं होत. यांपैकीं शेवटचीं आठ नऊ १९१५ सालानंतर स्थापन झालीं आहेत. सर्वांत पहिलें विद्यापीठ कलकत्ता येथें १८५७ सालीं स्थापन झालें. १८५७-८७ च्या दरम्यान मुंबई, मद्रास, लाहोर व अलाहाबाद या ठिकाणीं विद्यापीठें स्थापन झाली. कोलकत्ता, मुंबई व पंजाब हीं विद्यापीठें १९०४ पूर्वी केवळ परीक्षाप्रधानच होतीं. पण १९०४ नंतर यांनीं शिक्षण व संशोधन कार्याकडें लक्ष्य देण्यास सुरवात केली आहे. विशेषत: कलकत्ता विद्यापीठानें या कामांत बरीच आघाडी मारली आहे. या विद्यापीठांचा चॅन्सेलर प्रांताधिकारी असून व्हाइस चॅन्सेलर हा सरकारनियुक्त असतो. सिंडिकेट ही कार्यकारी संस्था असून हिचा व्हाइस चॅन्सेलर हा मुख्य असतो. दप्तरी काम रजिस्टार उर्फ कार्यवाह याजकडे असतें. सीनेट ही कायदेकारी संस्था असते. या सीनेटची निरनिराळीं विद्याशाखामंडळें असतात. विद्यापीठाच्या शास्त्रें, कायदा, वैद्यक, स्थापत्य व वाड्.मय यांच्या शाखा आहेत. प्राच्यविद्याशाखा फक्त पंजाबविद्यापीठांत आहे. याशिवाय अभ्यासमंडळेंहि प्रत्येक विद्यापीठांत असून त्यांचें काम क्रमिक पुस्तकें निवडणें, परीक्षेची इयत्ता ठरविणें वगैरें असतें. मद्रास विद्यापीठ हें शिक्षणप्रधान व मद्रासपुरतें रेसिडेन्शियल विद्यापीठ आहे. याला मद्रास बाहेरील बरीच कॉलेजें जोडलेलीं आहेत व या कॉलेजवर देखरेख ठेवण्याचें वगैरे काम 'कौन्सिल ऑफ अफिलीएटेड कॉलेजस' या नवीन मंडळाकडे असतें या विद्यापीठांत, लोकनियुक्तांचें प्रमाण अधिक असून व्हाइस चॅन्सेलर हा लोकनियुक्त व पगारी नोकर असतो. अलाहाबाद विद्यापीठ हें यूनिटरी शिक्षण देणारें व रेसिडेन्शियल विद्यापीठ १९०० च्या कायद्यानें झालें आहे. याला प्रांतांतील बरींच कॉलेजें जोडण्यांत आलीं आहेत. म्हैसूर विद्यापीठ १९१६ सालीं स्थापन झालें. म्हैसूरचे महाराज हे या विद्यापीठाचे चॅन्सेलर आहेत. या विद्यापीठाच्या सीनेटमध्यें विद्यापीठाचें सर्व प्रोफेरस असतात. पाटणविद्यापीठ १९१७ सालीं स्थापन झालें. उस्मानिया विद्यापीठ हें निजामसरकारनें १९१८ सालीं काढलें. यांत उर्दू भाषा ही माध्यम आहे. बनारस हिंदु युनिव्हर्सिटी हें रेसिडेन्शियल विद्यापीठ असून, त्याची घटना इतर विद्यापीठांहून निराळ्या प्रकारची आहे. कोर्ट व कौन्सिल यांच्याकडे विद्यापीठाचा कारभार हाकण्याचें व सीनेटकडे शिक्षणविषयक काम असतें.

वरील विद्यापीठांशिवाय पुणें येथील इंडियन वुइमेन्स युनिव्हर्सिटी, टिळकमहाविद्यापीठ, व गुजराथ विद्यापीठ हीं सरकारी निमंत्रणाखालीं नसणारीं विद्यापीठें होत.

[संदर्भ ग्रंथ:- महमूद-हिस्टरी ऑफ इंग्लिश एज्युकेशन इन इंडिया; इंडियन इयर बुक १९२६; रॅव्हाडाल-युनिव्हर्सिटीज ऑफ यूरोप इन दि मिडल एजेस; कॉन्रॅड-दि जर्मन युनिव्हर्सिटिज इन दि लास्ट फिफिट इयर्स, गुच-हिस्टरी ऍंड अॅन्टिक्विटीज ऑफ दि युनिव्हर्सिटी ऑफ आक्सफोर्ड फ्राम दि अर्लिएस्ट टाइम टु १५३०; मिनर्व्हा; के-इंडियन एज्युकेशन; कर्वे-भारतीय विद्यापीठांची पूर्वपीठिका; चिं. वि. वैद्य-टिळक महाविद्यालयाच्या पदवीदानसमारंभाच्या वेळचें व्याख्यान, शके १८४५.]

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .