प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

विमान:- हवेंत उंच गमन करण्यांचीं विमानें दोन प्रकारची आहेत. एक हवेंतून हलकें विमान तयार करणें; आणि दुसरें, पक्षीं हवेहून जड असूनहि हवेंत पंखांच्या आधारें उडतात त्याप्रमाणें जड विमानांनां पंखे लावून त्यांच्या मदतीनें हवेंत उड्डाण करणें. आर्कीमीडीजनें पाण्यांत पदार्थ कां तरंगतात ह्याची जर उपपत्ति लावली तीच हवेंत तरंगणार्‍या पदार्थांनां लागू आहे. अलीकडे विमानाची कल्पना याच उपपत्तीनुसार सुचली. १७६६ मध्यें कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञानें हायड्रोजन नामक वायूचा शोध लावला, तो वायु हवेपेक्षां हलका असल्याचें आढळून आलें, तेव्हां विमानें करण्याकरितां त्या वायूचा उपयोग करण्याची कल्पना प्रथम एडिंबरोचा प्रो. ब्लॅक यानें काढली. पण तो प्रत्यक्ष विमान तयार करूं शकला नाहीं. कॅव्हेंडिशचें 'डिफरंट काईन्डस् ऑफ एअर' हें पुस्तक वाचून फ्रान्समधील कागदाचे कारखानदार स्टीफेन व जोसेफ माँटगोल्फीयर या दोघां बंधूंनीं हायड्रोजन वायु भरून कागदाचींच विमानें तयार करण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. तथापि १७८३ मध्यें रेशमी वेष्टणाचा फुगा १५०० फूट उडवून दाखविण्याचा प्रयोग सदरहू बंधूंनीं यशस्वी करून दाखविला. याच सालीं पॅरीस येथील प्रो. चार्लस यानें हायड्रोजन वायूनें भरलेला १२ फूट व्यासाचा रेशमाचा गोल उंच उडवून दाखविला; आणि स्टीफननें ७२ फूट उंच व ४१ फूट व्यासाचें फायरबलून तयार केलें. लवकरच आणखी कांहीं प्रयोग झाल्यावर असलें विमान आकाशांतून माणसांची नेआण करण्याच्या कामीं लावण्याकडे संशोधकांचे प्रयत्न सुरू झाले. १७८३ नोव्हेंबर ता.२१ रोजीं रोझीयर्स यानें आपल्या एका मित्रासह हवेंतून विमानांत बसून २५ मिनीटें प्रवास केला. याच सालीं प्रो. चार्लसनें सर्व साधनांनीं युक्त-माणसें बसण्याची जागा, बॅरोमीटर, सँड-बॅलस्ट वगैरे- असें विमान तयार केलें. मात्र फायर-बलून धोक्याचें असल्यामुळें हायड्रोजन किंवा कोलगॅस वापरण्यांत येऊ लागला. फेंच राज्यक्रांतीच्या युध्दांत शत्रूची टेहळणी करण्याकरितां विमानांचा उपयोग प्रथम करण्यांत आला. भूगोलीय चुंबकशक्ती, विद्युच्छक्ती, विरळ हवेंत कमजोर होतात वगैरे शास्त्रीय संशोधन करण्याकडे विमानांचा उपयोग १८०४ पासून करण्यांत येऊ लागला. हवामान शास्त्रविषयक संशोधनार्थ ग्लेशर नामक शास्त्रज्ञानें हवेंत बरींच विमान-उडडाणें केलीं, त्यांत एकदां तो ७॥ मैल उंच गेला होता. फ्रॅंको-जर्मन युध्दाच्या वेळीं १८७०-७१  उभयपक्षांनीं अनेक प्रकारें विमानांचा उपयोग केला. अशा प्रकारच्या विमानांचा उत्कृष्ट नमुना म्हणजे झेपेलिन विमानें होत (झेपेलिन पहा)

यांत्रिक पंख्यांच्या वगैरे साहायानें हवेंत उड्डाण करण्याचे प्रयत्न ऐतिहासिक दृष्ट्या प्रथम व फार प्राचीन काळापासून होत असल्याचें दिसतें. आपल्या रामयणग्रंथांत पुष्पकविमानांत बसून राम लंकेहून अयोध्येस गेल्याचें वर्णन आहे; त्याचप्रमाणें पाश्चात्त्य लोकांच्या पौराणिक कथांत व प्राचीन कालच्या चित्रांत पंखांच्या साहाय्यानें हवेंत उड्डाण केल्यांचीं वर्णनें आहेत. १६ व्या शतकापासून यांत्रिक साधनांनीं हवेंत उड्डाण करण्याचे प्रयत्न होत असल्याची निश्चित माहिती मिळते. स्कॉटलंडचा राजा चवथा जेम्स याच्या वेळीं एका इटालियन किमयागारानें (आल्केमिस्ट) स्टर्लिंग किल्ल्यापासून फ्रान्सपर्यंत पंखांच्या साहाय्यानें हवेंतून उडून जाण्याचा प्रयत्न केला, पण सुरवातीलाच जमीनीवर पडून त्याच्या मांडीचें हाड मोडलें. लिओनार्डो डाव्हिन्सी यानें दंडांनां व पायांनां कृत्रिम पंख जोडावे याचीं कित्येक चित्रें आपल्या नोटबुकांत काढलेलीं आहेत. रॉजर बेकननें 'नॅचरल हिस्टी' या ग्रंथांत हवेंतील उड्डाणांसंबंधीं मजकूर लिहिला आहे. जी. ए. बोरेली यानें कृत्रिम पंखांचें वर्णन १६७० त लिहून ठेवलेलें उपलब्ध असून तें यंत्रशास्त्र व गणितशास्त्र यांस धरून आहे. नंतरच्या डर्कहीम, मरे वगैरे लेखकांनीं त्याचाच अनुवाद केला आहे. १८६७ मध्यें पेटिग्रयू यानें सुचविलेली पंख्यांची रचना अधिक योग्य आहे. पुढें पेनॉड, हेनसन, स्टिंगफेलो, लँग्ले, डयूमॉट, पौल्हन, राइट, ब्लेरियट, ए..व्ही. रो वगैरे यंत्रशास्त्रज्ञांनीं पंख्यांच्या विमानांची रचना पूर्णत्वास नेली. गेल्या महायुध्दांत वैमानिक कलेची फार झपाट्यानें वाढ झाली. आरंभीं जर्मनीजवळ ४७० एरोप्लेन्स व २४ ए अरशिप्स होतीं; फ्रान्सचीं अनुक्रमें ५०० व १४; रशियाचीं ४०० व ७; ऑस्ट्रियाजवळ १२० व ४; आणि ग्रेटब्रिटनजवळ १३० व ५ होतीं. पण नंतर ग्रेटब्रिटननें विमानांची संख्या व वैमानिक कौशल्य यांत फार जलद भर घातली. महायुध्दानंतर टपाल, माल व माणसें यांची नेआण करण्याकडे विमानांचा जारीनें उपयोग सुरू झाला. लंडन-पॅरिसच्या दरम्यान वाहतुक करणारीं विमानें प्रथम दोनच पॅसेंजर नेत असता त्यां ऐंवजीं आतां १४ इसम नेण्याची सोय झाली असून नवें 'व्हॅनगॉर्ड' नांवाचें विमान २० इसम नेण्याइतकें मोठें आहे. इंग्लंड पासून ऑस्ट्रेलियापर्यंत १०००० मैलांचा प्रवास करण्याचा विमानमार्ग आंखण्याचें काम चालू आहे. लंडन-केतरा (पोर्ट सययद नजीक) कराची कलकत्ता-रंगून-सिंगापूर, पोर्ट डार्विन  ऑस्ट्रेलिया हीं या मार्गावरील स्टेशनें आहेत. युनायटेडस्टेट्स व इतर देशांतहि असेच प्रयत्न चालू आहेत.

यांत्रिक:- जमीनीवरील विमानांत मुख्य तीन प्रकार आहेत त्यांची नांवें एकपाखी, दुपाखी व तिपाखी अशी आहेत. समुद्रावरील उडणार्‍या विमानास जलविमान असें म्हणतात. इंजिनची शक्ति मागें लावून पंखा फिरविण्याची योजना असेल तर त्याला ढकल-विमान म्हणतात. पंखा पुढें असेल तर ओढ विमान म्हणतात. विमानाचीं इंजिनें ४।६।८ किंवा १२ पंचपात्रांचीं असतात. विमान जसें लहानमोठें असेल तशी त्यास एक, दोन किंवा तीन इंजिनें असतात. व प्रत्येक इंजिनाला बहुधा निराळाच पंखा असतो.

पंख्याचें कार्य विमानाला मुसंडी (थस्ट) देणें हें आहे. हा एक प्रकारचा स्क्रू आहे. हा हवेंत फिरल्यानें हवेंत पुढें सरकतो व हवा मागें ढकलतो व यामुळें विमानाला गति येते. पंख्याचे दर मिनीटास सुमारें १४०० फेरे होतात. व विमानाच्या इंजिनचे फेरे दर मिनिटास २००० असल्यानें गति कमी करण्याची योजना करावी लागते. आगगाडीच्या इंजनाची किंवा मोटारचीं चाकें जशी घसरतात तसा विमानाचा पंखा हवेंत घसरून गेल्यामुळें विमानाला गति कमी मिळते. पंख्याला दोन किंवा चार पानें असतात. दुपानी पंखा फार प्रचारांत आहे.

विमानाला वळविण्यास सुकाणूं असतें. वैमानिकाच्या पायाला सांपडेल असा एक रूळ असतो. या रूळानें विमान वळवितात. या रूळापासून मागें सुकाणूं असतें तेथें तारा जोडलेल्या असतात. गाडी किंवा आगबोट ठराविक पृष्ठभागावर चालते पण विमान निरनिराळ्या उंचीवर चालावयाचें असतें म्हणून याला चढउतार (एलीव्हेटर्स) लागतात. वैमानिकाच्या हाताला सांपडेल अशा दांड्यानें हे चढउतार खालीवर करतां येतात. हे एकमेकांस तारांच्या योगानें जोडलेले असतात. विमानाला कुशीस सरकण्याची आणखी एक गति असते. हिला बँकिंग म्हणतात. या जागीं लावलेल्या यंत्राला अॅलर्न्स म्हणतात. एका बाजूचे अॅलर्न्स खाली पाडल्यानें त्यावर हवा जोरानें आदळतें. यामुळें त्याबाजूचा पंखा दुसर्‍या बाजूपेक्षां वर चढतो. विमान शक्य तितकें अडवें राहिलें पाहिजे यासाठीं त्याचें शेपूट खालीं पडून विमान उभें होऊ नये म्हणून एक यंत्र लावतात याला स्टॅबलायझर' असें म्हणतात. याशिवाय सांगाडा म्हणजे एकंदर भाग ज्यास जोडलेले असतात तो, शासी म्हणजे जमिनीवर उतरण्यासाठीं लागणारीं चाकें फ्रेम वगैरे होत.

उडण्याचें तत्त्व:- विमान हवेपेक्षां जड असतें तें हवेंत तरंगण्यास दोन कारणें आहेत. एक मुसंडी  (थ्रस्ट) व दुसरें उचल. उडण्याच्या क्रियेंत दोन अडथळे आहेत. ते (१) गुरूत्वाकर्षण व (२)  लोट  (ड्रिफ्ट) मुसंडीची गति ज्याप्रमाणें आडते त्याप्रमाणें उचल वाढत जाते. यामुळें गुरूत्वाकर्षण निर्बल होऊन विमान वर उचलतें. विमान हवेंत तरंगण्यासाठीं तें एकसारखें हवेंत पुढें सरकत असलें पाहिजे. ही तरंगण्याची क्रिया हवेच्या जोरावर अवलंबून नसावी. इंजिनानें फिरणार्‍या पंख्यानें हवा एकसारखी मागें लोटली जात असते. ह्या प्रवाहाला विमान दुभागतें: पैकीं एक भाग पंखाच्या वर जातो व दुसरा खालीं जातो. विमानाचें पंखें वांकलेले असल्यामुळें वरून जाणार्‍या प्रवाहाच्या खालच्या बाजूस निर्वात पोकळी होते व खालून जाणारा प्रवाह वाकणांत अडकून त्याला वर उचलतो. पण वरतीं दाब नसल्यानें या खालच्या दाबाचा जोर जास्त उपयोगी पडतो व पंख्याना वर उचलण्याचा जोर लागतो. पंखे उचलले म्हणजे त्यांनां अडकलेले विमानाचे सर्व भाग उचलले जातात. विमानाची गति व ओझें उचलण्याची शक्ति या एकमेकींवर अवलंबून असतात. गति जास्त पाहिजे असेल तर पंख्याचा बाक कमी करावा लागतो व ओझें जास्त उचलावयाचें असल्यास पंख्यांनां वांक जास्त द्यावा लागतो. जलद चालणारें विमान जमिनीवर सावकाश उतरू शकत नाही. व जमिनीवरून सावकाश हवेंत उडणारें विमान फार जलद चालूं शकत नाहीं. म्हणून या सर्व गोष्टी शक्य तितक्या साधून विमान करतात.
विमानावरील दर्शक:- हे गतिदर्शक, अंतरदर्शक, उष्णता मापक, उंची दर्शक, चढ-उतार दर्शक व होकायंत्र इत्यादि प्रकारचे असतात.

जमिनीवरून हवेंत उडणार्‍या विमानास खालीं चाकें असतात. मोटारगाडीच्या चाकासारखींच हीं चाकें असून त्यांनां रबरी धांवा असतात. इंजिन चालू करून पंखा फिरावयास लागला म्हणजे पहिल्यानें मोटारगाडीप्रमाणें इंजिन जमिनीवर चालतें व गति आली म्हणजे पंखाचा कोन बदलून विमान वर हवेंत उडवतात. वर उडण्याची क्रिया दोन प्रकारांनीं होते; एक सरळ उडत जाऊन वर चढावयाचें किंवा घिरट्या घालून वर चढावयाचें. त्याचप्रमाणें उतरण्याच्या दोन रीती आहेत. सरळ व गिरकीची. जमिनीला चाकें टेंकल्याबरोबर विमान थांबत नाहीं. १००।२०० फूट पुढें जाऊन थांबतें. पाण्यावरून हवेंत उडणार्‍या विमानाला खालीं चाकांच्या जागीं तिरावे (भोंपळे-फ्लोट) असतात. हे तिरावे पाण्यावर टेकल्यानें तरंगतात व विमान वर राहतें.

झेपेलिन (पहा) या जातीचें विमान वरीलपेक्षां निराळें आहे. यांत एक मोठा फुगा असून तो हलक्या वायूनें भरतात. फुग्याचा आकार दोडक्यासारखा असतो. या फुग्यामुळें विमान हवेंत तरंगत राहतें. व अंतरावर जाण्यास इंजिनाची शक्ति लागते. झेपलीन जातीचीं विमानें वापरून जर्मन लोकांनीं महायुध्दांत इंग्लंडवर कांहीं वेळां हल्ले केल्याचें प्रसिध्दच आहे.

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .