प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

विवाह:- मानवी समाजाच्या धारणेला ज्या आवश्यक संस्था आहेत त्यांमध्यें विवाह ही सर्वांत प्रमुख संस्था होय. स्त्रीपुरूषांमध्यें कायदेशीर प्रकारानें पतिपत्नीचें नातें निर्माण करून त्यांच्यामधील शारीरिक, धार्मिक व नैतिक संबंध निश्चित करणारी पध्दति म्हणजे विवाह होय अशी विवाहाची स्थूलपणें व्याख्या करतां येईल. विवाहाचे प्रधान उद्देश म्हणजे स्त्रीपुरूषांमधील शारीरिक संबंध नियमित करणें व प्रजोत्पादन हे होत. पहिल्या उद्देशानें समाजामध्यें घोटाळा माजत नाहीं तर दुसर्‍यामुळें समाजाचा प्रवाह अखंड रीतीनें वाहतो. हे दोन्ही उद्देश सारखेच महत्त्वाचे आहेत. विवाहाचा कुटुंबपध्दतीशी अत्यंत निकट संबंध आहे. किंबहुना विवाह हा कुटुंबसंस्थेचा पाया होय असें म्हणावयास हरकत नाहीं. याहि पुढें जाऊन व्यापक दृष्टीनें विचार केल्यास संघ, जात अगर अशाच प्रकारचे लोक-समूह यांच्याहि बुडाशी विवाह-संस्थाच असल्याचें आढळून येतें.

विवाहसंस्थेच्या इतिहासाच्या स्थूलमानानें तीन अवस्था दृष्टीस पडतात. पहिल्या अवस्थेंत स्त्रीपुरूषसंबंध हा केवळ शारीरिक असून तो नियमबध्द नव्हता. यासंबंधीं समाज शास्त्रज्ञांमध्यें बराच मतभेद दृष्टीस पडतो. दुसर्‍या अवस्थेमध्यें विवाह नियमबध्द होऊन पुरूषाचा बायकोवर पूर्ण ताबा प्रस्थापित झाला. तिसर्‍या शेवटच्या अवस्थेंमध्यें पतिपत्नीचा सामाजिक दर्जा समान मानण्यांत येऊ लागला.

प्राचीनतम काळीं म्हणजे विवाहसंस्थेच्या पहिल्या अवस्थेंत स्त्रीपुरूषांमधील शरीरसंबंध हा अनिर्बंध होता असे. मॅकलेनन, मॉर्गन, बाचोफेन, लबॉक इत्यादिकांचें म्हणणें आहे. या अनिर्बंध शरीरसंबंधापासून, समाजाच्या सुधारणेबरोबर, हल्लींच्या एकपत्नी अगर निश्चित शरीरसंबंधाची कल्पना विकास पावली आहे असें यांचें म्हणणें आहे. यांच्या मतें कुटुंबसंस्था बरीच मागाहूनची आहे. या मॉर्गनप्रभृति समाजशास्त्रज्ञांचे हें मत अलीकडील शास्त्रज्ञांनीं सप्रमाण रीतीनें खोडून टाकलें आहे. शास्त्रज्ञांमध्यें मेन, स्पेन्सर, डार्विन, पिशेल, स्टार्के, लेनोर्नो व वेस्टमार्क हे प्रमुख होत. मेनच्या मतें प्राचीन काळीं प्रत्येक पुरूषाला जरी अनेक बायका असत तरी वाटेल तो पुरूष वाटेल त्या बाईशी शरीरसंबंध ठेवीत असें हें म्हणणें निर्मूलक आहे. या उलट पुरूष हा आपल्या बायकांचा परपुरूषांशी संबंध होऊ नये यासाठीं फार काळजी घेत असे. वेस्टर्मार्कनें यासंबंधीं खोल विचार करून आपलें मत प्रतिपादन केलें आहे. त्याचें म्हणणें असें कीं, अगदीं प्राचीन काळीं देखील कुटुंबपध्दति अस्तित्वांत होती. वरिष्ठ प्राण्यामध्येंहि अशाच प्रकारची कुटुंबपध्दति आढळते.  ('यूथावस्था' पहा.)

हिंदु:- हिंदुधर्मशास्त्राप्रमाणें विवाह हा संस्कार आहे. तो यथाविधि झाला पाहिजे. कन्यादान, लाजाहोम व सप्तपदी हे विधी मुख्य आहेत. हे झाले कीं, वधुवरांचें पतिपत्नीचें नातें सुरू होतें. व तें आमरण कायम रहातें. केवळ विषयोपभोग हा लग्नाचा प्रधान हेतु मानिला नाहीं. 'धर्मेच, अर्थेच, कामेच, नातिचरामि'-अशी पति पत्नीबरोबर शपथक्रिया करतो.

भारतीयांच्या विवाहाचे अनेक प्रकार असत त्यांपैकीं दैव, आर्ष, प्राजापत्य, गांधर्व, राक्षस व पैशाच हे बंद होऊन फक्त ब्राह्म व असुर हे दोनच प्रकार प्रचारांत राहिले आहेत. कन्यादान करण्याचा अधिकार:-

'पिता पितामहो भ्राता सकुल्यो जननी तथा
कन्याप्रद: पूर्व नाशे प्रकृतिस्थ: पर: पर:'

मुलीचें योग्य वराशी लग्न करून देणें हें पिता, पितामह भ्राता, पित्याच्या कुळांतील सकुल्य व माता यांचें कर्तव्य आहे. मुलीचें कन्यादान करण्याचा यांनां अधिकार आहे. परंतु यांच्या संमतिशिवाय लग्न योग्य प्रकारें होऊन तें योग्य असलें तर त्यास वर लिहिलेल्या माणसांची संमति नाही किंवा पालकाची नाहीं या कारणानें तें रद्द होत नाहीं. अशा प्रकारच्या आज्ञा व अधिकार हे शिफारशीच्या स्वरूपाचे असतात असें ठरविलें आहे व त्यास 'फॅक्टम व्हॅलेटचें' तत्त्व लावतात. म्हणजें जें झालें तें बरेच झालें असें मानून तें सशास्त्र मानतात.

वधुवरें हीं एका जातीची- जातीच्या आंत व कुटुंबाच्या बाहेर-असलीं पाहिजेत. पोटजाती-म्हणजे देशस्थ व कोंकणस्थ यांचीं लग्नें सशास्त्र आहेत. दोन्ही ब्राह्मणच आहेत. एकाच गोत्रांतील व प्रवरांतील वधुवरांचीं लग्नें सशास्त्र मानलीं जात नाहींत. हा नियम शूद्रांस लागू नाहीं. हिंदुधर्मशास्त्राप्रमाणें नवराबायकोस सोडचिठ्ठी देतां येत नाहीं. परंतु कांहीं जातींत योग्य कारणाकरितां नवर्‍यानें बायकोस फारकत देण्याची चाल आहे. फारकत दिल्यावर त्या स्त्रीस पहिल्या नवर्‍याच्या हयातींत पुनर्विवाह करतां येतो. व तो सशास्त्र मानतात. विवाह झाल्यापासून स्त्रीनें नवर्‍याजवळ राहिलें पाहिजे. परंतु वयांत येईपर्यंत तिनें माहेरींच आईबापाजवळ राहावें अशी जातीची चाल असल्यास तोपर्यंत मुलगी माहेरी राहाते. मुंबई इलाख्यांत निदान खालच्या जातींत विधवा स्त्रीनें दुसरें लग्न करण्याची चाल असल्याचें दिसून येतें.

नवरा नपुंसक असला, पतिपत्नींचा निरंतर कलह होत असला, लग्न सशास्त्र रीतीनें झालेलें नसलें, नवर्‍यानें बायकोच्या संमतीनें तिचें मंगलसूत्र तोडून टाकलें व तिला लेखी सोडचिटठी दिली, किंवा नवरा देशांतरास गेला व तो बारा वर्षांत परत आला नाहीं किंवा त्यानें बायकोस खबर दिली नाहीं, तर त्या स्त्रीनें तिचा नवरा जिवंत असतां तिला वाटेल तर दुसरा नवरा करावा अशाबद्दल पुढील स्मृतिवचनें आहेत.

उन्मत: पतित: कुष्टी षंढश्चसगोत्रज:
चक्षु:श्रोत्रविहीनस्य तथापस्मारदूषित:
स तु यदन्य जातीय: पतित: क्लीब एव वा
विकर्मस्य सगोत्रो वा दासो दीर्घमयोपिवा ।
ऊढापि देयान्यस्मै सा सप्रावरणभूषणा'

विवाहाचे अनेक निंद्य मानलेले प्रकार बंद झाले आहेत. एकपति व एकपत्नी व्रत हेंच वंद्य मानिलें जात आहे. एका पुरूषानें अनेक बायका करणें हें निंद्य समजलें जातें. बालविवाह कमी कमी होत आहेत. तरूणीजरठविवाहाची थट्टा होत आहे. हुंडा घेण्याची चाल, व लग्न जमवून देण्याकरितां दलाली घेणें या सर्व गोष्टी आतां गर्हणीय मानिल्या जात असून विधवा पुनर्विवाह जास्त जास्त लोकमान्य होत आहे. व वुइडोरीम्यारेज अॅक्ट करून सरकारनें विधवांचा पुनर्विवाह कायद्यानें सशास्त्र ठरविला आहे. भिन्न वर्णाच्या वधुवरांचीं लग्नें सशास्त्र करण्याची खटपट चालू आहे. याप्रमाणें ऋषींचीं वचनें व पाश्चात्त्य विवाहसंबंधीं कल्पनांचा मेळ घालण्याचा प्रयत्न चालू आहे. स्त्रियांचें पातिव्रत्य व पुरूषांचें एकपत्नीव्रत हाच पवित्र विवाहधर्म हिंदु समाजास संमत आहे. याविरूध्द वर्तन करणें हें धर्माविरूध्द आहे असा हल्लींच्या काळीं समज आहे. परस्त्रीगमन व परपुरूषसंग यांची महापापांत गणना केली आहे. एक वर्णाच्या किंवा समानवर्णाच्या स्त्रीपुरूषांचा विवाह हा श्रेष्ठ प्रकार समजला जात असे. परंतु उच्च वर्णाच्या पुरूषास क्रमानें खालच्या वर्णाच्या स्त्रीशी विवाह करण्यास शास्त्राची परवानगी असे. हल्लीं वधुवरें एका जातीचीं असली पाहिजेत असा निर्बंध झाला आहे. व तोच कायदा समजला जातो. (एक वर्ण म्हणजे एक जात नव्हे.)

ख्रिस्ती:- इंग्लंडादि सर्व ख्रिस्ती राष्ट्रांत विवाहासंबंधीं सारखेच कायदे आहेत प्रौढविवाह, एकभार्यापध्दति, घटस्फोट व विधवाविवाह हे या कायद्यांतले विशेष असून प्रीतिविवाह रूढ आहे. विवाहाला कायद्याच्या हरकती आहेत त्या:-

(१) अपत्योत्पादनाची अशक्यता (२) सापिंडय (प्रोहिबिटेड डिग्रीज ऑफ रिलेशन शिप,) (३) वेडेपण (अनसाउंड माईन्ड) व अल्पवय, (४) घटस्फोट झाला नाहीं अशा स्थितींत पहिला नवरा व बायको जिवंत असणें. घटस्फोट कोर्टामार्फतच घडवून आणावा लागतो.

पारशी:- हिंदुस्थानांतील पारशी समाजाकरितां ख्रिस्ती विवाहकायद्यासारखाच पारशी मॅरेज ऍंड डायव्होर्स अॅक्ट आहे.

मुसुलमानी:- इस्लामी कायद्यांत विवाह करार मानतात. तथापि त्याला धार्मिक संस्काराचें स्वरूपहि आहे. बहुभार्यापध्दति या कायद्यांत मान्य आहे. तथापि पुरूषाला जास्तीत जास्त चार बायकांशी विवाह करतां येतो. मेहर उर्फ देणगी बायकोला देण्याचा करार असतो. देणगीची रक्कम प्रत्यक्ष दिल्याशिवाय घटस्फोट होऊ शकत नाहीं. घटस्फोट कायद्यानें मान्य आहे पण तो खासगी रीतीनें घडवून आणतां येतो.

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .