प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

विश्वसंस्था:- सूर्य, चंद्र, ग्रह, तारे व इतर आकाशस्थ ज्योती हीं सर्व आकाशाच्या ज्या प्रदेशांत उत्पन्न होतात, इतस्तत: भ्रमण करतात व विनाश पावतात तो प्रदेश विश्वसंस्था या संज्ञेनें निर्दिष्ट होतो. सूर्य, चंद्र, ग्रह इत्यादिकांच्या गतिस्थितीविषयी माहिती 'ज्योति:शास्त्र' या लेखांत दिली आहे. या ठिकाणीं तारे, त्यांची स्थिति-गति, त्यांची उत्पत्ति व विनाश यांचा विचार करावयाचा आहे.

तार्‍यांस आपण जरी असंख्य हें विशेषण लावितों, तरी केवळ डोळ्यांनीं दिसूं शकणारे तारे असंख्य नाहींत. बॉन येथें खगोलाचा ८।१० भाग दिसतो. तेथें आर्जेलँडर यानें डोळ्यांनीं दिसणार्‍या तार्‍यांची यादी केली. तींत ३२५६ तारे भरले. आणि त्यांतील कोणत्याहि एका वेळीं २००० पेक्षां अधिक डोळ्यांत दिसत नाहींत. हीसला मन्स्टर येथें ४७०१, हूझोला जमेकांत ५७१९, व गूल्डला कॉर्डोव्हा येथें ७७५६ तारे डोळ्यांनीं दिसूं शकले. पाहणार्‍याच्या दृष्टीची तीव्रता, क्षितिजाजवळील व इतर ठिकाणची वातावरणाची स्थिति, इत्यादि कारणांमुळें ह्या संख्या निरनिराळ्या होतात. जर वातावरण अजीबात नसतें तर नुसत्या डोळ्यांनीं सुमारें २५००० तारे दिसूं शकतात. सामान्यत: ६ व्या प्रतीच्या पलीकडील तारे डोळ्यांस अदृश्य म्हणून समजण्यांत येतात. [तार्‍यांच्या प्रतीसंबंधानें 'नक्षत्रपध्दति व तारकापुंज' हा लेख पहा.] सहाव्या प्रतीपर्यंत एकंदर ४३०० तारे आहेत. साडे नऊ प्रतीपर्यंतचे ३२४१८९ तारे उत्तरगोलार्धांत आर्जेलँडरनें मोजिले व १० व्या प्रतीपर्यंत स्कॉनफेल्ड व गिल यांनीं दक्षिणगोलार्धांत ४५४८७५ तारे मोजिले. दुर्बिण व फोटोग्राफी यांच्या साहाय्यानें १० कोटी तारे मोजिले आहेत. व ही संख्या विश्वसंस्थेंतील तारकांच्या संख्येच्या मानानें फारच थोडी आहे.

तारकामय विश्वात तारांच्या बरोबरच तेजोमघांचीहि गणना होते ['नक्षत्रपध्दति व तारकापुंज' पान  न ४७ पहा.] तेजोमेघ म्हणजे आकाशांत दुर्बिणींतून अंधुकपणें प्रकाशणारा वायुरूप लहानसा ढगासारखा पदार्थ. मृग नक्षत्रांतील मृगाच्या पोटांतील शराच्या दक्षिणेस असलेल्या तीन तार्‍यांपैकीं मधला तारा तेजोमेघांत गुरफटलेला आहे. आर्जेलँडरच्या ज्या दुर्बिणीनें त्यानें ३२४००० तारे मोजले तिच्यांत त्याला ६४ तेजोमेघ दिसले. दुर्बीण व फोटोग्राफ यांच्या साहाय्यानें प्रो. कीलरनें १२०००० इतकी तेजोमेघांची गणना सध्यांपर्यंत केली आहे.

हे सर्व तारे व तेजोमेघ जे आकाशांत सर्वत्र इकडे तिकडे अव्यवस्थित रीतीनें पसरलेले दिसतात त्यांनीं व्यापिलेल्या प्रदेशाचा आकार एखाद्या खिशांतील घड्याळाप्रमाणें किंवा कणकेच्या आरोळींप्रमाणें गोल किंवा चपटा आहे, ही कल्पना प्रथमत: राईट यानें बसविली. तीच पुढें अनेक ज्योतिष्यांच्या वेधांनीं कायम झाली. तारकामय विश्वाचा आकार गोल व चपटा असा आहे असें मानण्यास कारण हें कीं, आकाशाच्या निरनिराळ्या भागांतील तार्‍यांची गणना केल्यास ते कांहीं भागांत विरळ व कांहीं भागांत अगदीं गच्च भरलेले दिसतात. अर्थात ज्या भागांत ते गच्च भरलेले दिसतात त्या भागाच्या दिशेनें विश्वाचा विस्तार अधिक दूरवर असला पाहिजे असा भाग म्हणजे ज्याला आपण आकाशगंगा म्हणून म्हणतों तो सर्व आकाशास वेष्टणारा, काळोख्या रात्रीं फिकट ढगाप्रमाणें दिसणारा पट्टा होय. विश्वरूपी घड्याळाचा आकाशगंगेचा पट्टा हा घेर होय. ही आकाशगंगा म्हणजे असंख्य तारे, तारकापुंज व तेजोमेघ यांची बनलेली आहे. म्हणजे हे सर्व अगदीं जवळ जवळ खरोखरीच असून त्यांची ही आकाशगंगा बनली आहे असें नसून आपणांस मात्र ते अगदीं जवळ जवळ ठेवून एकत्र खेचलेले दिसतात. तारकामय विश्वाचा व्यास जितका आहे त्याच्या सुमारें २० हिश्यांइतकी विश्वाची जाडी आहे.

हे सर्व तारे आकाशांत सारख्या अंतरावर नसून फार भिन्न भिन्न अंतरांवर आहेत पृथ्वीपासून सूर्याचें अंतर सुमारें ९ कोटि २० लक्ष मैल आहे. प्रकाशकिरणास इतकें अंतर चालण्यास सुमारें ८ मिनिटें लागतात. याच्या सुमारें ६४००० पट अंतराचा प्रवास करण्यास प्रकाशास १ वर्ष लागतें. म्हणजें सूर्याच्या अंतराच्या ६४००० पट अंतरास म्हणजे सुमारें ६०००००००००००० मैल अंतरास एक प्रकाशवर्ष म्हणतात. ग्रहमालेपासून अत्यंत जवळचा तेजस्वी तारा म्हणजे नरतुरंग (सेंटारस)  नक्षत्रांतील पहिला (अल्फा) तारा होय. याचें अंतर ४ १।३ प्रकाशवर्षे आहे. हीं अंतरें काढण्याची पध्दति अशी आहे कीं, पृथ्वी आपल्या वार्षिक भ्रमणांत आपल्या कक्षेच्या एखाद्या ठिकाणीं असतां तेथून दिसणारी तार्‍याची दिशा व त्या ठिकाणाच्या समोरच्या ठिकाणीं ६ महिन्यांनीं गेल्यावर तेथून दिसणारी त्याच तार्‍याची दिशा या दोन दिशांमधील अंतर मोजावयाचें. हें अंतर जास्तींत जास्त जेव्हां असेल तेव्हां त्यांच्या निम्याइतकें अंतर जें होईल त्यास त्या तार्‍याचें वार्षिक लंबन म्हणतात. सूर्य व पृथ्वी यांवरून तार्‍याकडे पाहिलें असतां तार्‍यांच्या दिशांमधील अंतर (जेव्हां सूर्य-पृथ्वीरेषा तार्‍यांच्या दिशेस काटकोनात असेल त्यावेळचें) हेंच लंबन होय. तार्‍याचें लंबन १ विकला असतें तेव्हां त्याचें अंतर ३ १।४ प्रकाशवर्षे असतें. १।२ विकला असतें तेव्हां ३ १।४  २ प्रकाशवर्षे १।३ विकला असतांनां ३ १।४ X ३ प्रकाशवर्षे, असा वार्षिक लंबन व प्रकाशवर्षे यांचा संबंध आहे.

सर्वांत तेजस्वी असे १५ तारे व त्यांचीं अंतरें पुढें दिलीं आहेत.

तार्‍याचें नांव प्रत अंतर (वर्षे)
व्याध (सीरियस) -१.६ ८.६
अगस्ति (कनोपस) -.९ ४६५
मित्र (आल्फासेंटारी) +.३ ४.३
अभिजित् (व्हीगा) +.१ ३५
बह्मह्दय (कॅपेला) +.२ ४८
स्वाती (आर्क्टरस) +.२ ४३
नील (रीगेल) +.३ ४६५
प्रश्वा (प्रोसियॉन) +.५ १०.५
अशिर (अशरनर) +.६ ३४
ब्रह्मा (बीटा सेंटारी) +.९ ८८
श्रवण (आल्टेअर) +.९ १६
लोहित (बेंटल झूज) +.९ १५५
रोहिणी (आल्डेबरान) १.१ ५९
चित्रा (स्पायका) १.२ ३२५
जेष्ठा (अंटारीस) १.२ ११२

आकाशगंगेंतील तार्‍यांचीं अंतरें ३००० पासून ३००००० वर्षांपर्यंत निरनिराळ्या ज्योतिष्यांच्या मतें आहेत. सामान्यत: तारकामय विश्वाच्या व्यासार्धाची लांबी ३०००० प्रकाशवर्षे मानावयास हरकत नाहीं.

तारका व तेजोमेघ असे विश्वसंस्थेंतील पदार्थांचे दोन प्रकार वर सांगितले. त्यांपैकीं तारकांचे अनेक प्रकार आहेत: रूपविकारी तारका, नव्या किंवा अल्पकारिक तारका, तारका युग्में किंवा सहस्थित तारका, आणि तारकापुंज. यांविषयीं सामान्य माहिती 'नक्षत्रपध्दति' (पान न ४५, ४६ व ४७) या लेखांत दिली आहे.

विश्वसंस्थेची घटना व तिच्यावर परिणाम करणार्‍या अनेक शक्ति यांच्या विचारास मूळ आरंभ आपल्या सूर्याची ग्रहमाला व तिची घटना यांच्या विचारांतच होतो. कारण ज्या तर्‍हेच्या घडामोडी व त्या घडवून आणणार्‍या शक्ति आपल्या ग्रहमालेसंबंधीं दिसून येतात तशाच प्रकारच्या घडामोडी, त्याच शक्तींच्या अनुरोधानें तारकामय विश्वांतहि होत असतील असें वाटणें साहजिकच आहे. तेव्हां या घडामोडी व शक्ती आपल्या ग्रहमालेच्या प्रदेशांत कशा दृष्टोत्पत्तीस येतात हें पहावयास पाहिजे.

प्रथमत: इमॅन्युअल कांट (इ.य. १७५४) यानें, ग्रहमालेच्या उत्पत्तीची जी सध्यांची मीमांसा आहे तिचा पाया घातला. अति विस्तृत प्रदेशावर विखुरलेल्या विरल अशा धुलिरूप किंवा वायुरूप पदार्थापासून सूर्य व त्याची ग्रहमाला ह्या उत्पन्न झाल्या व या उत्पत्तीस कारण गुरूत्वाकर्षणाची शक्ति व अणुकृत अपाकर्षणाची शक्ति या दोन शक्ती होत हें त्याचें मत होय. परंतु कांटनें कल्पनेनें निर्माण केलेला हा धूलिरूप विस्तार, किंवा दुसर्‍या शब्दांत बोलावयाचें म्हणजे विरल द्रव्यमय तेजोमेघ मूलत: भ्रमणरूप गतिहीन असा त्यानें मानिल्यामुळें ग्रहमालेच्या उत्पत्तीची गणितानुसार उपपत्ति अशक्य झाली. पुढें प्रख्यात फ्रेंच गणिती लाप्लास यानें कांटचीच तेजोमेघाची कल्पना घेऊन ती सुधारून आपली ग्रहमालेच्या उत्पत्तीची तेजोमेघमीमांसा गणिताच्या सहाय्यानें प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. (इ.स. १७९६.) त्याच्या कल्पनेंप्रमाणें, मूळच्या तेजोमेघरूपी सूर्यास अत्यंत प्रखर उष्णता व अति मंद भ्रमणगति होती. उत्तरोत्तर कालीं जसजशी उष्णता तेजोमेघांतून बाहेर पडत जाई तसतसा तो आकुंचन पावत जाई व त्यामुळें त्याचा भ्रमणाचा वेग अथवा परिवेग वृध्दिंगत होई. कारण भ्रमणयुक्त पदार्थांचें जसजसें आकुंचन होतें तसतसा त्यांचा परिवेग वाढतो. याप्रमाणें तेजोमेघाचें आकुंचन व त्याच्या परिवेगाचें वर्धन चालूं असतां पुढें अशी एक वेळ आली कीं, तेजोमेघाच्या भ्रमणाचा जो आस त्यापासून सर्वांत दूर असलेलें म्हणजे तेजोमेघाच्या कटिप्रदेशी असलेलें द्रव्यवलय वाढलेल्या परिवेगामुळें गुरूत्वाकर्षणाच्या कह्यांतून निसटून वेगळें पडलें हें वेगळें पडलेलें वलयही हळू हळू आकुंचन पावून कोठें तरी मध्यें तुटून गुरूत्वाकर्षणामुळें आपल्याच एक कमी विरळ अशा जागीं गोळा झालें व त्याचा नेपच्युन (वरूण) ग्रह बनला. वलयाचा परिवेग त्याच्या आकुंचनानें वाढून तो त्या ग्रहाच्या सूर्याभोंवतीं फिरण्याचा वेग व आपल्या अक्षाभोंवतीं फिरण्याचा वेग असें द्विधा रूप पावला. इकडे मूळच्या तेजोमेघांतून उष्णता बाहेर पडण्याचें, तो आकुंचित होण्याचें व त्याचा परिवेग वृध्दिंगत होण्याचें कार्य चालूंच होतें. नंतर पहिल्या ग्रहाच्या उत्पत्तीच्या वेळीं जी स्थिति झाली तीच स्थिति पुन: उत्पन्न होऊन दुसरा ग्रह युरेनस (प्रजापति) निर्माण झाला. याप्रमाणेंच सर्व ग्रह व ग्रहाभोंवतीं फिरणारे उपग्रह निर्माण झालें.

लाप्लासच्या वरील मीमांसेवर अनेक आक्षेप घेण्यांत आले आहेत. त्यामुळें मूळच्या तेजोमेघाच्या कल्पनेखेरीज पुढील उत्क्रांतीसंबंधानें या मीमांसेंत अनेक शास्त्रज्ञांनीं महत्त्वाचे फेरबदल केले आहेत. या मीमांसेचें खंडण करण्यांत विश्वसंस्थेच्या घटनेंत प्रामुख्यानें कार्य करणार्‍या शक्तिंचा अधिक विचार होऊन गुरूत्वाकर्षण व अणुकृत अपाकर्षण याखेरीज उच्छेदा- प्रतिरोध (टायडल फ्रिक्षन,) परिवेगजन्य आकृतिविकार, प्रकाशाचा दाब व विद्युच्छक्ति इत्यादि अनेक गोष्टींचें जगाच्या घटकांच्या निर्माण, रूपविकार व नाश यांसंबंधीं कार्य घडत असतें असें सिध्द झालें. या सर्व शक्तींचा विचार करून खस्थ पदार्थांच्या घडामोडीचें वर्णन पुढें दिल्याप्रमाणें सामान्यत: करतां येईल.

विश्वांतील मूळचें जें अति विरल धूलिरूप द्रव्य त्यांत जेथें जेथें किंचित अधिक घनता आपातत: असेल तेथें तेथें आकर्षणाचीं केंद्रें बनून त्या धूलिरूप द्रव्यांतील अधिक वजनदार कण त्या केंद्राभोवतीं जमतात व अत्यंत हलक्या कणांवर आकर्षणापेक्षां अपाकर्षक शक्तींचा परिणाम अधिक होत असल्यामुळें ते सर्वत्र प्रसार पावतात. एखाद्या केंद्रापाशी गोळा झालेला द्रव्यगोल हा प्रथम तेजोमेघरूपी बनून नंतर तारकारूप होतो व प्रसारित झालेल्या कणांच्या प्रदेशांत फिरत असतांना त्यांतीलहि अधिक घन असे जे भाग असतील त्यांस पुन्हां आपल्या आकर्षणशक्तींच्या कह्यांत आणतो व अशा भागांचें त्यांच्या भोवतीं फिरणारें ग्रह बनतात.

ज्यावेळेस हे ग्रह असे असतात कीं, त्यांपैकीं एखादा इतरांपेक्षां फार मोठा असतो, तेव्हां आकर्षण व उच्छेद्य प्रतिरोध ह्या दोहोंचें कार्य तो मोठा ग्रह व बाकीचे लहान ग्रह यांमध्यें होऊन मोठ्या ग्रहात लहान ग्रह मिळून जातात व तेजोमेघांतून प्रथमत: उत्पन्न झालेल्या तारकेच्या तोडीची दुसरी तारका त्यांपासून बनून एक तारकायुग्म तयार होतें.

तेजोमेघांतून मूळचा तारा तयार झाल्यानंतर त्याच्यापासून अति दूर प्रदेशी असलेले तेजोमेघाचे जे घन भाग ते कालांतरानें अधिक घन झाल्यानंतर मूळच्या तार्‍याकडे आकर्षिले जातात. त्यांच्या अतिदीर्घवर्तुलाकार कक्षा बसून ते मध्यवर्ती तार्‍यांच्या अति सन्निध येऊन दूर प्रदेशी जातात. एखाद्या वेळेस मधल्याच एखाद्या ग्रहाच्या आकर्षणप्रभावानें त्यांची कक्षा आकुंचित होते. कधीं कधीं मध्यवर्ती तारकेच्या समीप येऊन पुन्हां दूर प्रदेशी परत गेल्यावर दुसर्‍याच एखाद्या तारकेच्या आकर्षण कक्षेंत सांपडून ते पहिल्या तारकेच्या साम्राज्यांतून पार निसटून जातात. याप्रमाणें मध्यवर्ती तारकेच्या अतिसन्निध येऊन पुन्हं अतिदूर प्रदेशी जाणारे जे खस्थ विरल द्रव्यमय पदार्थविशेष त्यांनांच आपण धूमकेतु ही संज्ञा देतो.

धुलिरूप विस्तृत प्रदेशांतील एखाद्या अधिक घनभागीं केंद्रीभूत झालेल्या द्रव्यानें मध्यवर्ती तारका व तत्संबंधीं ग्रहादिक बनत असतां अपाकर्षक शक्तींच्या प्रभावानें दूर प्रदेशी विखुरले गेलेले त्या धूलिरूप द्रव्यांतील अतिविरल असे जे कांहीं भाग ते दूरच्या प्रदेशांत गेल्यावर त्यांच्यांतहि आकर्षण व अपाकर्षण क्रिया चालूच असतात. त्यांतील कणांच्या अन्योन्यकर्षणामुळें अशा प्रत्येक भागाचें आकुंचन होतें, आकुंचनानें त्यांमध्यें उष्णता व प्रकाश यांची उत्पत्ति होते व ते किंचित प्रकाशमान ढगाप्रमाणें आकाशांत ठिकठिकाणीं दृग्गोचर होतात. त्यांसच आपण तेजोमेघ अशी संज्ञा देतों. हे तेजोमेघ निरनिराळ्या अवस्थांत निरनिराळ्या आकाराचे दिसतात. प्रथमत: त्यांचा अगदीं अनियमित आकार असतो. पुढें त्यांस हळू हळू शंखरेखाकृति, मग वलयाकृति, मग दीर्घवर्तुळाकृति व मग मालाकृति प्राप्त होतें. शेवटचें स्वरूप म्हणजे ग्रहमालापरिवेष्टित केंद्रावर्ती तारकेचें स्वरूप होय.

एखाद्या तारकायुग्मांतील एक तारका दुसरीभोवतीं फिरतांना आपल्या दृष्टिआड येते. त्या योगानें दुसर्‍या तारकेला जणूं काय ग्रहण लागतें. म्हणजे तिचें तेज कमी झाल्यासारखें किंवा नाहीसें झाल्यासारखें वाटतें. तारकायुग्मांतील दोन्ही तारका अगदीं जवळ असल्यामुळें त्यांची एकच तारका दिसत असतें. तिचेंच तेज आपणांस कमी जास्त झालेलें दिसतें म्हणून तिला आपण रूपविकारी तारका म्हणतों.

कधीं कधीं अफाट प्रदेशांतून भ्रमण करीत असतां दोन तारका, किंवा एकाच तारकेभोंवतीं फिरणारे दोन मोठे ग्रह एकमेकांकडे ओढले जाऊन शेवटी एकमेकांवर आदळतात. त्यामुळें प्रचंड उष्णता उत्पन्न होऊन पूर्वी निस्तेज असलेली तारका एकाएकीं अत्यंत प्रकाशमान अशी दिसूं लागतें.
अशाच तारकेला नवी तारा किंवा अल्पकालिक तारका असें नांव देण्यांत येतें.

एखादा तेजोमेघ अति विस्तृत व प्रचंड असला तर त्यापासून सहस्रावधि तारकाकेंद्रें उत्पन्न होऊन तारकांचा मोठा गुच्छ आपणांस दिसतो. कृत्तिका नक्षत्र हा एक असाच मोठा गुच्छ आहे.

वरील सर्व वर्णनावरून सामान्यत: जगांतील घडामोडीचें स्वरूप असें सांगतां येईल कीं, विश्वाच्या अफाट विस्तारावर जें पसरलेलें अति विरल द्रवय त्यांत आकर्षक व अपाकर्षक अशा दोन्हीं शक्तीचें कार्य नेहमीं चालूं असतें. अधिक घन भागांवर आकर्षण शक्तींचा अधिक प्रभाव होतो. व अधिक विरल भागांवर अपाकर्षक शक्तींचा अधिक प्रभाव होतो. अधिक विरल भाग अधिक घन भागांपासून दूर गेल्यावर त्यांच्या स्वत:मधील अधिक घन भाग व अधिक विरल भाग यांमध्यें पूर्वीप्रमाणें क्रिया सुरू होते. सामान्यत: ज्या ठिकाणीं अधिक घन भाग असतील यांच्या सन्निध विरल भाग फारसे दिसून येत नाहींत. आकाशगंगा ही परस्पराकर्षणानें एकत्र ओढून आणलेल्या घन भागांच्या (तारका, तारकागुच्छ इत्यादिकांच्या) समुच्चयाचें दृष्य स्वरूप होय. या आकाशगंगेच्या समीपभागी विरल द्रव्यमय तेजोमेघ सहसा आढळून येत नाहींत याचें कारण हेंच होय. [लेखक प्रो. वि. व. नाईक.]

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .