प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

विश्वोत्पत्ति:- सर्व राष्ट्रांच्या बुध्दिवाल्यकालामध्यें विचारी वर्ग असतो आणि तो लहान लहान प्रश्न सोडविण्याच्या भानगडींत न पडतां एकदम मोठमोठ्या प्रश्नास हात घालतो. हा वर्ग पुष्कळदां परमार्थोद्यमांतील मंडळींतला असतो. ज्यास देवाची माहिती सांगणें प्राप्त होतें त्यास विश्वोप्तत्ति सांगणेंहि प्राप्त होतें. वेदकालीन व पुराणकालीन सर्गविषयक विचार तिसर्‍या खंडांत दिलेलाच आहे. आतां इतर राष्ट्रांच्या विचाराकडे वळूं.

निरनिराळ्या देशांत विश्वोत्पत्तीविषयीं प्रथम निरनिराळ्या आख्यायिका प्रचलित होतात आणि नंतर ज्या मानानें पारमार्थिक कल्पनांचा अधिकाअधिक विकास होत जातो त्या मानानें त्या आख्यायिकांचा एकमेकांशी मेळ बसून त्यांच्यांत एकवाक्यता उत्पन्न होते. विश्वाची उत्पत्ति अत्यंत अल्प अशा मूलतत्वांपासून झाली आहे असें दाखविण्याकडे बहुतेक आख्यायिकांचा कल असतो. बाबिलोनियन लोकांच्या विश्वोत्पत्तिशास्त्रांत जलरूपी मूलतत्त्वापासून विश्वाची उत्पत्ति झाली असल्याची कल्पना आहे. ग्रीक लोकांत तात्त्विक विचारांची मजल बरीच दूरवर गेली असून विश्वोत्पत्तीविषयीं निरनिराळ्या कल्पना प्रसृत झाल्या. विश्वोत्पत्तीच्या बाबतींत होमरच्या मतें सागर, हिसिऑडच्या मते पृथ्वी, एपीमिनाईड्सच्या मतें वायु, कांहीं असंबध्द कवींच्या मतें ईथर, हिरोनिमस व हेलॅनिकस यांच्या मतें पृथ्वी आणि आप, आथेनागोरासच्या मतें आप व श्लेश्मा (चिकटा) आणि थेलीसच्या मतें आप हे मुख्य घटकावयव होते. ग्रीक लोकांत प्रचलित असलेल्या विश्वोत्पत्तिशास्त्राचे तीन वर्ग करतां येतात: (१) झ्यूजसारख्या पारलौकिक तत्त्वापासून विश्वाची उत्पत्ति झाली असें प्रतिपादन करणारे, (२) आकाश, काल व रात्र असल्या तत्त्वापासून ती झाली असे म्हणणारे व (३) पृथ्वी, आप आणि ईथर असल्या जड तत्त्वांपासून ती झाली असें मानणारे. हिंदुस्थानांत या विश्वोत्पत्तिशास्त्राची मजल फार प्राचीन काळींहि फार दूरवर गेलेली होती.

विश्वोत्पत्तीच्या निरनिराळ्या आख्यायिकांत निरनिराळे उत्पत्तिक्रम दिलेले आढळून येतात. ईजिप्तचें विश्वोत्पत्तिशास्त्र अगदीं गनादिकालापासूनचीं मूळ चित आणि जड हीं तत्त्वें एकत्र व अविभाज्य स्थितींत असतात असें सांगतें. चित् तत्त्वास उत्पत्तींची इच्छा होते व त्या योगानें मूळ जड तत्त्वांत गति उत्पन्न होऊन त्याचे अंगभूत गुणधर्म दृग्गोचर होऊ लागतात. त्यांपैकीं एका गुणानें विश्वरूप अंड्याची उत्पत्ति होऊन त्यापासून एक तेजोरूप देवता निर्माण होते आणि ती देवता हें अखिल विश्व व सर्व तदन्तर्गत वस्तुजात यांची उत्पत्ति करण्यास कारणीभूत होते. इराणच्या विश्वोत्पत्तिशास्त्रांत प्रथम आकाश, नंतर तारे, सूर्य, चंद्र, भूमि, समुद्र, नद्या, पनस्पती, प्राणी आणि मनुष्यें याप्रमाणें उत्पत्तीचा क्रम दिलेला आहे. चीनच्या विश्वोत्पत्तिशास्त्रांत पुढील चमत्कारिक उत्पत्तिक्रम दिलेला आहे. प्रथम 'यंग' आणि 'यिन' नामक पुरूशजातीय व स्त्रीजातीय तत्त्वांच्या संयोगापासून चार ऋतू निर्माण झाले व तदनंतर त्या ऋतूंच्या योगानें आठ निरनिराळे सृष्टिचमत्कार उत्पन्न होऊन त्यांपासून पुढें क्रमाक्रमानें सर्व सृष्टीची उभारणी झाली. उत्तर अमेरिकेच्या विश्वोत्पत्तिशास्त्रांत विरोधाच्या पायावर विश्वाची उत्पत्ति झाल्याबद्दल प्रतिपादन केलें आहे. या शास्त्रकारांच्या मतें मानवजातीच्या निवासास योग्य अशी जी पृथ्वी तिच्या उत्पत्तीपूर्वी एका अन्य जगाची उत्पत्ति झाली होती. त्या जगांत प्रथम सर्व देवांची वस्ती होती. परंतु त्यांच्यांत पुढें परस्पर कलह होऊन ज्याच्या त्याच्या स्वभावधर्मास अनुसरून त्या देवांचें निरनिराळ्या सजीव व निर्जिव वस्तुंत रूपांतर झालें येणेंप्रमाणें पशू, पक्षी, निरनिराळे सरपटणारे प्राणी, वृक्ष, पाषाण इत्यादिकांची उत्पत्ति झाली.

मुसुलमानी:- कुराणांतील विश्वोत्पत्तीची हकीकत बहुतेक 'ओल्डटेस्टामेंट' वरून घेतली आहे. कुराणावरचे सुप्रसिध्द टीकाकार झमाशारी व वैदावी यांच्या मतानें प्रथम ईश्वराचें सिंहासन निर्माण झालें, त्याच्याखालीं जल होतें त्यांतून जो धूर निघत होता त्याचा पुढें स्वर्ग झाला व जल आटून त्याची पृथ्वी झाली, स्वार्गाची उत्पत्ति गुरूवारीं झाली, व शुक्रवारीं सूर्य, चंद्र व तारे निर्माण करण्यांत आले, व त्याच दिवशी अडामची उत्पत्ति झाली, वर सात स्वर्गलोक व खालीं सात भूगोल आहेत अशी त्यांची कल्पना आहे.

जपानी:- 'कोलिकी' नामक ग्रंथांत असें आहे कीं, प्रथम स्वर्ग व तीन देवता निर्माण झाल्यानंतर पृथ्वी व दोन देवता उत्पन्न झाल्या. यानंतरची हकीकत 'निहोंगी' भावांच्या ग्रंथांत आहे. प्रथम स्वर्ग व पृथ्वी मिळून एक अंडें होतें. त्यांतील शुध्द व पातळ भागाचा स्वर्ग आणि जड व स्थूल भागाची पृथ्वी झाली. नंतर अनेक देवता उत्पन्न झाल्या. त्यांपैकीं इझनगी व इझनमी या स्वर्गांतून भूगोलावर अवतरल्या व त्यांच्यापासून पुढील उत्पत्ति झाली.

ख्रिस्ती:- पॅलेस्टाईन येथील ज्यू लोकांच्या कल्पना होत्या त्याच येशू ख्रिस्तान व त्याच्या अनुयायांनीं उचलल्या. तत्संबंधीं वर्णन ओल्ड टेस्टामेंटमधील 'सृष्टीची उत्पत्ति' व मनुष्याचा अध:पात' या दोन प्रकरणांत आहे. पहिल्या दिवशी आकाश व पृथ्वी आणि दिवस व रात्र. दुसर्‍या दिवशी निरनिराळी जलें, तिसर्‍या दिवशी समुद्र, पृथ्वी व पृथ्वीवर गवत व फळझाडें; चवथ्या दिवशी दिवस, ऋतू व वर्षे यांच्या खुणांसाठीं नक्षत्र, तारे; पांचव्या दिवशी जलांत मासे व जीवजंतू आणि आकाशांत उडेणार पक्षी; सहाव्या दिवशी पृथ्वीवरील वन्य पशू व ग्राम्यपशू आणि त्या सर्वांवर धनीपण चालविणारे पुरूष व स्त्री असे दोन मानवप्राणी निर्माण केले. याप्रमाणें सर्व प्रकारची विश्वोत्पत्ति झाल्यावर सातव्या दिवशी देवानें विश्रांति घेतली. पण ही वायबलांतील विश्वोत्पत्तीची कल्पना आधुनिक सृष्टयुत्पत्तिशास्त्राला विसंगत आहे. त्यामुळें सुशिक्षित ख्रिस्ती समाज आधुनिक शास्त्रमतवादी बनत चालला आहे.

उपरिनिर्दिष्ट आणि तदितर विश्वोत्पत्तिशास्त्रांत कोठेंहि कोणी नैतिक विचाराचा भाग आणलेला दिसून येत नाहीं. त्याचप्रमाणें विश्वाची उत्पत्ति कोणत्या उद्देशानें करण्यांत आली असावी याविषयीहि बहुतेक कोणी विचार केलेला दिसत नाहीं. दुष्ट अहरिमन व त्याचीं सर्व कृष्णकृत्यें यांचा नायनाट होऊन अहुर्भज्द याचा विजय व्हावा याकरितां विश्वाची उत्पत्ति करण्यांत आली अशी प्राचीन इराणी लोकांची समजूत होती. सारांश 'असत्' पासून विश्वाची उत्पत्ति झाली ही कल्पना प्राचीनाकालीं कोणी व्यक्त केली होती असें दिसत नाहीं. निदान ती बाबिलोनिया, ईजिप्त व ग्रीस येथील लोकांत तरी उद्भवली नव्हती व इराणी लोकांत ती उद्भवली होती किंवा नाहीं याविषयीं शंकाच आहे. परंतु ऋग्वेदाच्या इतक्या प्राचीन काळींहि हिंदु मंत्र द्रष्ट्यांनीं ती कल्पना स्पष्ट मांडली हें 'असत:सदजरयत' इत्यादि वाक्यावरून स्पष्ट होतें.

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .