प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

विषे व विषबाधा:- ज्या पदार्थाचा स्वाभाविक गुणधर्म तो पदार्थ कोणत्या तरी मार्गानें शरीरांत गेला असतां अथवा बाहेरून लाविला असतां जीवितास अगर आरोग्यास अपाय करण्यासारखा असतो त्या पदार्थास विष म्हणावें. विषें व त्यावरील उतारा अगर प्रतिवषे हा व्यावहारिक वैद्यकशास्त्रांतील एक महत्त्वाचा भाग आहे. विष कोणत्या प्रकारचें असून त्याचें विषारी कार्य कसें घडतें, त्यामुळें रोग्यास कोणतीं लक्षणें होतात, कोणत्या परिस्थितीमुळें त्यांचा शरीरावरील अंमल कमी अगर जास्त होऊ शकतो, निरनिराळ्या विषांमुळें कोणत्या इंद्रियावर काय दुष्पपरिणाम घडतात व त्यांवर कोणतीं प्रतिविषे अगर उतारे द्यावयाचे याची पूर्ण माहिती व्यावहारिक वैद्याला पाहिजे.

विषाचा शरीरावरील परिणाम:- कोणत्याहि विशाचा स्थानिक व दूरस्थ असा दोन प्रकारचा शरीरावर घडणारा परिणाम पहाण्यांत येतो; अगर कांहीं विषांचा फक्त स्थानिक व कांहींचा फक्त दूरस्थ या प्रकारचे परिणाम घडतात. स्थानिक परिणाम घडल्याचें उदाहरण त्वचेवर त्यामुळें घडणारी विलयन अगर दाहक्रिया किंवा त्याचा मज्जातंतूवरील परिणाम हें होय. विषाचे दूरस्थ परिणाम प्राय: निरनिराळ्या विषाचे निरनिराळे व ठराविक आणि निश्चित असे असतात. पण यास अपवादहि असतात. विषांच्या प्रकारांपैकी प्रखरनाशक प्रकारच्या विषांचे स्थानिक परिणाम इतके स्पष्ट व उघड असतात कीं याच प्रकारांपैकीं विषामुळें तो परिणाम घडला याविषयी संदेह पडत नाहीं. तसेंच प्रकोपक अशा विषाचा आणि त्यांपैकींहि खनिज विषांचा-विशेषे करून बहुतेक अशाच-प्रकारचा -स्थानिक परिणाम घडतो. परंतु यांचें साम्य कांहीं रोग्यांच्या परिणामांशी इतकें दिसून येतें कीं, ''विष किंवा रोग'' हें ओळखणें अशा ठिकाणीं बिकट असतें. रोग्याच्या लक्षणांवरून रोग्याला दुसर्‍या कोणी दिलेलें अगर त्यानें स्वत: घेतलेलें विष कोणत्या प्रकारचें असावें हें वैद्यानें ताडलें पाहिजे. दूरस्थ परिणाम होण्यासाठीं तें विष शोशलें अथवा पचलें गेलें पाहिजे हा सिध्दान्त आतां सर्वांनां मान्य झाला आहे. परंतु पूर्वी विष पोटांत गेल्याबरोबर त्याचा मज्जातंतूवर तात्कालिक परिणाम होऊन ताबडतोब मृत्यु येतो असा समज होता; पण तो आतां चुकीचा ठरला आहे. विषबाधेचें प्रकोपन अगर शमन करणारी निरनिराळी स्थिति पुढील गोष्टींवर अवलंबून असते:- (१) विषाचें मोठें अगर लहान प्रमाण, (२) मिश्रणांत त्याचे अधिक अगर थोडे परमाणू असणें, (३) त्यांत इतर रासायनिक पदार्थ घातल्यामुळें आलेलें प्रखरतर किंवा हीनवीर्यत्व, (४)  शरीराच्या कोणत्या भागावर त्याचा परिणाम घडत आहे व (५) रोग्याची शारीरिक स्थिति. जें प्रमाण मोठ्या माणसास औषध म्हणून हितकारक होईल त्यानें एखादें लहान मूल मरूनहि जाईल. दुसरें उदाहरण बेरियमचें. याच्या सल्फेट क्षाराशिवाय बाकीचे सर्व क्षार विषारी आहेत. सल्फेट क्षाराऐवजीं सल्फाइड हा क्षार चुकून दिला गेल्यामुळें (१९२३ त) एका हिंदी संस्थानिकास ताबडतोब मरण आलें. हायड्रोसायनिक अॅसिडचे सर्व प्रकारचे क्षार अत्यंत विषारी आहेत. तथापि पिवळ्या रंगाचा लोह व त्याचा पोट्याशियमयुक्त क्षार अगदीं निरूपद्रवी आहे. विष ज्या ठिकाणीं असतें अगर जातें तेथील त्वचा ज्याप्रमाणें साधी, श्लेष्मल अगर लस उत्पन्न करणार्‍या प्रकारची असेल त्याप्रमाणें तेथें विषशोशण कमी अगर अधिक प्रमाणांत होतें. बाणास लावण्याचें क्युरारे म्हणून एक अमेरिकन विष आहे; तें बरेंचसें प्यालें असतां शरीरास कांहीं होत नाहीं; पण तेंच विष जखमेमध्यें सूक्ष्म प्रमाणांतहि गेलें तर त्वरीत मृत्यू येतो. प्रत्येकाचें विशिष्ट प्रकृतिमान हेंहि जमेस धरलें पाहिजे. अफूसारखें गुंगी आणणारें विष संवयीनें पचनी पडतें; पण इतर विषाचें तसें नसतें. कांहीं प्रकारचे रोग झाले असतां एरवीं ज्या प्रकारचा विषाचा जसा परिणाम व्हावा तसा तो त्या रोगामुळें होत नाहीं. या कारणास्तव धनुर्वात किंवा मद्यपवात या रोगांमध्यें अफू देण्याचें कारण पडल्यास ती फार मोठ्या प्रमाणांत द्यावी लागते. त्याचप्रमाणें कांहीं ज्वरांमध्यें कांहीं पारदयुक्त औषधांचें कार्य नेहमींप्रमाणें घडत नाहीं. उलटपक्षीं, ज्या रोगामुळें विषाचं उत्सर्जन होण्यास प्रतिबंध होत असेल त्या रोगामुळें त्या विषाचे प्रकृतिवर दुष्परिणाम फार होतात.

विषबाधा झाली यास आधार काय?:- या प्रश्नाचें उत्तर रोगी जिवंत असेतोंपर्यंत झालेल्या लक्षणावरून व तो मेल्यास त्याच्या शरीराचा व्यवच्छेद करून निरनिराळ्या भागांवर विषाचे परिणाम काय घडले आहेत तें पाहून, त्याच्या जठरांतील पेय, अन्न व त्याची विष्ठा, मूत्र यांची रासायनिक परीक्षा करून, इतर इंद्रियें तपासून, व त्यांपासून निघालेलें द्रव्य इतर प्राण्यांनां टोंचून त्यांवर काय परिणाम होतो हें पाहून विषबाधा आहे अगर नाहीं हें ठरवितां येतें.

लक्षणें:- रोगी जिवंत असेपर्यंत जीं विषबाधेचीं लक्षणें होतात त्यांवरून कोणतें विष असावें याचा अजमास बहुधां करतां येतो. पण विषार झालेला मनुष्य मेला असल्यास हें साधन उपलब्ध नसल्यामुळें मृत शरीर परीक्षण, रासायनिक पृथक्करण परीक्षा, व पोटांत सांपडलेल्या विषाचे प्राण्यांस टोंचून केलेले प्रयोग या योगानें त्या विषारासंबंधीं महत्त्वाच्या बाबी कळतात. विषबाधा तीव्र, अगर दीर्घकालीन प्रकारची असते. एखाद्या निरोगी माणसास भयंकर व वाढत जाणारी लक्षणें एकाएकीं होऊ लागलीं तर तीव्र प्रकारचें विष पोटांत गेलें असावें अशी शंका येणें साहजिक आहे. त्यास बळकटी येण्यास पुढील चिन्हें उपयुक्त आहेत: पोटात आग, पूर्ण शक्तिपात व निश्चेष्ट पडणें, नाडी, श्वास, या क्रिया अति मंदपणें चालणें, मृत्यूची कळा येणें अगर लवकर मृत्यू येणें.

उपचार:- ज्या प्रकारचे विष असेल त्या धोरणावर उपचार करावे लागतात. उपचारांतील पहिलें काम रोग्याचें पोट वांतीचें औषध देऊन अगर पोट धुण्याच्या पिचकारीनें धुवून त्यांतील अन्नपाणी बाहेर काढून तें रिकामें करणें हे होय. प्रखरनाशक प्रकारचें विष असेल तेव्हां मात्र श्लेश्मलत्वचेस पुन्हां इजा होऊ नये म्हणून असें करीत नाहींत. अगर सायफनच्या तत्त्वावर एक नसराळें व रबरी नळीच्या साहायानें पोट पूर्णपणे पण हळू हळू धुऊन काढतात. यानंतर त्या प्रकारच्या विषावर जो उतारा किंवा प्रतिविष असेल त्याचा उपयोग करावयाचा असतो. उतारा देतात तो प्रकार: उदाहरणार्थ, अॅसिड पोटांत गेलें असल्यास त्यावर पोटांत खडू किंवा चोकची भुकटी पाण्यांत कालूवन देणें हा होय. प्रतिविष देऊन विष मारण्याचें उदाहरण अॅट्रोपीन हें औषध टोंचून किंवा अन्य रीतीनें दिल्यानें मार्फिया या अफूंतील विषारास तें निर्वार्य करतें. प्रकोपक विषामुळें जठरांत इजा होऊ नये म्हणून स्निग्ध व पातळ, चिवट पदार्थ पिण्यास दिल्यानें विषपरिणामाचें शमन होतें. ज्यामध्यें ट्यानिन हें अवष्टंभक द्रव्य आहे असे बराच वेळ उकळलेले कॉफी चहा इत्यादि पातळ पदार्थ दिल्यानें आल्कालाइड प्रकारचीं जहर विषें बरींचशी गोठलीं जाऊन हीनवार्य होतात. विषबाधेमुळें वेदना होत असतील व रोगामुळें अगर विषाच्या प्रकारामुळें हरकत नसेल तर अशा वेळीं अफू द्यावी. आंचके उत्पन्न करणार्‍या विक्षेपकवर्गापैकीं स्टिक्निया हें किंवा अशासारखें विष असल्यास क्लोरोफार्म हें औषध हुंगवून आंचक्याचें शमन करावें.

विषवर्गीकरण:- विषाचें वर्गीकरण करणें हें कामहि अमळ बिकट आहे, व शुध्द शास्त्रोक्त वर्गीकरण करण्याच्या ऐवजीं विषबाधालक्षणानुसार जें वर्गीकरण केलें आहे तेंच विशेष सोयीचें आहे. कारण शास्त्रोक्त रीतीनें वर्गीकरण करण्याइतकें विषबाधेचें इंद्रियावरील नानाविध परिणामांचें ज्ञान अद्याप उपलब्ध झालेलें नाहीं. यासाठीं, दुसर्‍या रीतीनें म्हणजे लक्षणांनुसार (१) प्रखरनाशक, (२) प्रकोपक, (३) निद्रावाहक व (४) विषवायुरूपी असें वर्गीकरण केलें आहे.

प्रखरनाशक विषे:- याचें एक उदाहरण पारदाचा पाण्यांत विरघळणारा रसकापूर नांवाचा अत्यंत विषारी क्षार हें होय. याशिवाय सल्फूरिक, नैट्रिक, हायड्रोक्लोरिक, ऑग्लिक हीं तीक्ष्ण अॅसिडें; पोट्याश सोडा, व अमोनिया हीं अल्कली द्रव्यें व त्यांचे कार्बोनेट नामक क्षार; पोट्याश, तुरटी, ऍंटिमनी (सौवीर) व सज्जीखार यांचे प्रखरनाशक क्षार आणि कॅर्बोलिक अॅसिड. लक्षणें:- अॅसिड विष असो अगर तें अल्कली प्रकारचें असो त्याची ओठ, तोंड, गाल व इतर ठिकाणीं त्या स्थानापुरती जी प्रखर नाशकारक क्रिया घडते त्यामुळें भाजल्यासारखें होऊन विषबाधेचीं लक्षणें होतात. या स्थानिक इजेशिवाय कॅर्बालिक अॅसिडानें दूरच्या इंद्रियावर परिणाम घडून तें विष पचन झाल्यामुळें प्रकृतिवर परिणाम होऊन वेगळीं लक्षणें होतात.

उपचार:- अतिशय मृदु अशी रबरी व सायफनच्या तत्त्वावर काम चालणार्‍या नळीच्या साहाय्यानें हलके हलके सर्व जठर प्रथम रिकामें करून नंतर धुवून काढावें परंतु जठराच्या बाजवा सोलून गेल्यामुळें नळी आंत घालणें व धुणें हें अवघड व जरा धोक्याचेंच काम असतें. तें धुणें झाल्यानंतर पातळ स्निग्ध पदार्थ व अफूयुक्त औषध पिण्यास द्यावें. रसकापूर, पारा, खनिज प्रकारचीं अम्लें हीं या वर्गांतील मुख्य विषें होत.

प्रकोपक विषे:- या विषांमध्येंहि रासायनिक म्हणजे धातूमुळें झालेली व वनस्पतिवर्गांतील व प्राणिज वर्गापैकीं अशी तीन प्रकारचीं विषे असतात, या सर्वांचें कार्य केवळ प्रकोपक प्रकारचेंच नसून त्यामुळें मज्जास्थानावर बरेच दुष्परिणाम होतात. जो पदार्थ अन्नमार्गामध्यें विशेषत: दाह उत्पन्न करतो त्यास प्रकोपक प्रकारचें विष असें म्हणतात व याचें सोमल हें ठळक उदाहरण आहे, व तें धातुवर्गांपैकीं आहे. पाणी घातलेलीं अॅसिडें, इतर धातूंचे क्षार (शिसें, तांबें, कथील वगैरेंचे) हीं अन्य उदाहरणें होत. वनस्पतिवर्गापैकीं कडुवृंदावन, ग्यांबोज, कोरफड, जयपाळाचें तेल वगैरे पदार्थ उदाहरणें आहेत. व फोड आणणारी माशी हें प्राणिज वर्गांतील विषारी पदार्थांचें उदाहरण आहे. प्रखरनाशक विशापेक्षां या वर्गातील विषांचीं लक्षणें अंमळ सावकाशपणें प्रगट होतात. यांत वांती झाली असली तर पिचकारीनें किंवा औषधानें पुन: ओकारी करवावी. नंतर सोडा अगर अमोनिया आणि लोहाचा अर्क हीं मिसळून तें मिश्रण फडक्यांतून गाळून त्यावरील जमणारा लोहाचा परॉक्साइड हा क्षार द्यावा; किंवा डायालाइज्ड लोह हें औषध दर वेळीं १ औंस पाणी घालून द्यावें. सरतेशेवटीं पोटांत स्निग्ध पेयपदार्थ द्यावेत व एरंडेल द्यावें म्हणजे आंतड्यांनां स्निग्धपणा येउन अधिक विषशोशण शरीरात होणें थांबते.

निद्रावाहक विषे:- (अ) प्रुसिक अगर हायड्रॉसायनिक अॅसिड:- हें अत्यंत जहर व पुष्कळांनां ठाऊक असलेलें विष प्राणघात करण्याच्या कामीं जणूं काय एकदम वीज पडून मृत्यू यावा इतक्या चपलतेनें मृत्यू आणतें. हें बाजारांत दोन प्रकारचें मिळतें. उपचार:- ताज्या उघडलेल्या बाटलींतील थोडा अमोनिया घेऊन तो थोडाथोडा वरचेवर हुंगवावा. पिण्यास एकदां थंड पाणी व एकदां कढत पाणी असें पालटून देणें; घर्षणानें उबारा रहाण्यासाठीं हातपाय सारखे चोळीत रहाणें व कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू ठेवणें व हृदयास उत्तेजन येण्यासाठीं एटोपीन हें औषध टोंचणें हे उपयुक्त इलाज आहेत. फोटोग्राफीच्या कामांतील पोट्याशियम सायानाइड व इतर सायानाइड क्षार असेच अति विषारी समजले असतात. (आ) अफू:- हें औषध व यांत मार्फिया नामक सत्त्व असतें तें या दोहोंचा वेदना शमनाच्या कामीं फार उपयोग करण्यांत येतो. त्यामुळें एखाद्या वेळीं विषार होण्याचा संभव बराच असतो. पुष्कळ लोक आत्महत्या करून घेण्यासाठीं याचा उपयोग करतात. मुलांवर अफूचा परिणाम जास्त घडत असल्यामुळें औषधासाठीं दिलेलें प्रमाण एखादेवेळीं चुकून अधिक होऊन विषबाधा होते. बाजारांत कडवट रंगाची अफू सर्वांनां सहज मिळण्यासारखी असतें. तीमध्यें मार्फिया हें सत्त्व शेकडा १० या प्र्रमाणांत असतें. हिंदुस्थानांत अफूचा तंबाखूप्रमाणें ओढण्याच्या कामींहि उपयोग केला जातो. (इ) स्ट्रिक्निया व तें सत्त्व असणारीं झाडें:- स्ट्रिक्निया व ब्रूसीन हे अल्कलॉइड या जातींपैकीं अत्यंत विषारी पदार्थ आहेत. ते कित्येक झाडांत असतात व म्हणून तीं झाडेंहि विषारीच असतात, व तें सत्त्व पोटांत गेल्यानें आंचकें येऊन मरण येतें. बिनवारशी भिकार कुत्री व इतर प्राणी मारण्यासाठीं याचा बराच उपयोग करतात. प्रथम क्लोरलहायड्रेट नांवाचें प्रतिविष औषधासाठीं पुरेशा प्रमाणांत दिल्यानंतर रोग्याकडून क्लोरोफार्म हुंगवून त्यास स्वाभाविकपणें विषोत्सर्जनास अवसर सांपडावा म्हणून त्या गुंगींत त्यास बराच वेळ ठेवावें. (ई) बचनाग:- यापैकीं जयपाळच्या वगैरे कित्येक जाती अधिक विषारी आहेत त्या इतक्या कीं तसें जलाल दुसरें विष सांपडणें कठिण. गुंजेचा एक अष्टमांश जयपाळ दिल्यानें माणसास मरण आलेलें पाहिलें आहे. डिजिटालीन हें हृदयोत्तेजक सत्त्व यावर बरोबर प्रतिविष असून तें टोंचून घातल्यानें उतार पडतो. बचनागाचें मूळ हा खाण्याचा कंद आहे अशा चुकीच्या समजामुळें तो कोणी खाल्यासहि विषबाधा होते. (उ) बेलाडोना:- हें एक विलायती झाड आहे. यांत एट्रोपीन नामक सत्त्व असून तें फार विषारी आहे व म्हणून हें झाडहि विषारी आहे. या सत्वाचा उपयोग नेत्ररोग बरे करण्यासाठीं व नेत्रपरीक्षेसाटीं नेत्रवैद्य वरचेवर करतात. याचीं फळें लहान वाटोळीं व गुंजेसारखीं लालभडक असल्यामुळें मुले ती चुकून खातात. लक्षणें:-डोळ्याची बाहुली मोठी होणें, नाडी जलद चालणें, त्वचा व अंग ऊन व रूक्ष होणे; व त्यावर गोंवराप्रमाणें त्वचेवर पुरळ दिसणें, गिळतांना अडचण वाटून घशास कोरड पडणें, फार तहान लागणें, व वातामुळें बडबड सुरू होऊन त्यांत मौज वाटणें, इत्यादि. उपचार:- वांतीचें औषध, पिचकारी यांच्या साहायानें बमन करवून नंतर मार्फिया हें प्रतिविष उतार पडण्यासाठीं टोंचून घालतात.

विषवायुस्वरूपी विषे:- यांचे परिणाम निरनिराळ्या प्रकारचे होतात. जसें, कांहींचें कार्य प्रकोपक विषाप्रमाणें घडतें तर दुसर्‍या प्रकारच्या वायूंचा रक्तांतील लाल पेशीशी रासायनिक संयोग होऊन तें रक्त प्राणवायु शरीरास पोंचविण्यास असमर्थ झाल्यामुळें कांही प्रकारचे विशिष्ट परिणाम त्या वायूपासून घडतात. (अ) क्लोरीन व ब्रोमीन वायु:- हे वायू फारच प्रकोपनशील आहेत. ते हुंगण्यांत आले म्हणजे श्वासनलिकेवरील पडदा आपोआप संकोचन पावून श्वासमार्गाचा दाह होतो. व त्यावर प्रतिबंध झाला नाहीं तर प्राणनाशहि होतो. अमोनिया हुंगणें हा या वायूंच्या विषारी दाहावर उत्तम उपाय आहे. (आ) हायड्रोक्लोरिक व हायड्रोफ्लुओरिक अॅसिडवायु:- हेहि प्राणघातक असून यांत प्रकोपकधर्म आहेत. पहिला वायु वनस्पतीचा नाश करतो. मिठापासून मोठ्या प्रमाणावर सोडियम कार्बोनेट करण्याचे करखाने आहेत तेथें किंवा मिठाच्या योगानें मातीच्या बरणा, चिनीमातीचे नळ यास रोगणासारखी झिलई देण्याच्या कारखान्यांत व कृत्रिम खते जेथें तयार करतात अशा कारखान्यांत हा वायु उत्पन्न होऊन हवेंत मिसळतो. (इ) सल्फ्यूरस अॅसिडवायु:- गंधक जाळला म्हणजे जो वायु निघतो त्यानें श्वासाचा कोंडमारा फार होतो हे घशांत दाहहि होतो. हा वायु श्वासाबारोबर गेल्यानें श्वासकार्य आकुंचन पावून लवकर मरण येण्याचा संभव असतो. (ई) जींत नैटिक अॅसिड भरलें आहे अशा ब्याटरींतून वायु व तो फुप्फुसदाह फार त्वरीत करीत असल्यामुळें याविषयीं सावधगिरी ठेविली पाहिजे. (उ) अमोनियाची दाहि फार प्रकोपक असते परंतु बहुधा प्राणघातक नसते. (ऊ) कार्बन डायोआक्साइड वायु:- हा हवेपेक्षां जड असून त्याबरोबर हुंगला गेल्यास तो प्राणघातक आहे. ज्वलनाच्या वेळीं, विहिरींतून जुन्या कोळशाच्या व इतर खाणींत दारू गाळण्याच्या भटटींतील मोठाल्या पिपांत हा असतो. या जागेंत कोणी उतरल्यास तो एकदम बेशुध्द होतो व त्यास कोणी लागलीच मदतीस गेलें नाहीं तर ताबडतोब मरण येतें. या वायूमध्यें स्वत:चा निद्रावाहक गुण आहे. यामुळें रात्रीं गर्दी करून निजणारीं माणसें अशक्त, आळशी व निस्तेज असतात. याचा एकाएकीं विषार झाल्यास रोग्यास स्वच्छ हवेंत नेऊन त्यावर पाणी ओतावें, हातपाय चोळावे, कृत्रिम श्वासोच्छवास करवावा व शुध्दीवर आल्यावर त्यावर नजर ठेवून त्यास विश्रांति घेऊ द्यावी. (ए) कार्बन मोनोक्साइड वायु:- कोळसे वगैरे जळाल्यामुळें वरील वायु व हा वायु हे दोन्ही विषारी वायू उत्पन्न होतात. ह्या वायूचा रक्ताशी संयोग होऊन रक्ताची प्राणवायूचा शरीरास पुरवठा करण्याची शक्ति नाहींशी होते. (ऐ) दगडी कोळशात वरील वायु असल्यानें दुष्परिणाम वरीलप्रमाणेंच होतात. (ओ) सल्फ्युरेटेड हायड्रोजन वायु:- यामुळें श्वास गुदमरून एकदम मरण येतें. तो पुष्कळ हवेशी मिश्र होऊनहि श्वासाबरोबर गेल्यानें वांती, गुंगी, बेशुध्दि, घाम सुटणें हीं लक्षणें होऊन त्यावर ताजी पुष्कळ हवा, घर्षणपूर्वक अंग चोळणें उबारा व उत्तेजक औषधें देणें हे उपाय आहेत. (औ) क्लोरोफार्म, हंसविणारा वायु, ज्यास नैट्रस ऑक्साइड म्हणतात तो वायु:- हे शस्त्रक्रियेसाठीं देण्यांत येतात. त्यामुळें श्वास बंद पडतोसा वाटल्याबरोबर कृत्रिम श्वासोच्छवास, विजेची पेटी वगैरे उपाय करण्यास शस्त्रवैद्याबरोबर आलेला त्याचा हस्तक हजर असतोच. (अं) बेंझोलिन, रॉकेल, पेट्रोल या खनिज व इतर जातींच्या पदार्थांची वाफ व भपका फार दिवस श्वासाबरोबर घेण्यांत आल्यास विषारांचीं लक्षणें होतात.

अति मद्यपानामुळें मनुष्यास गुंगी येऊन जेव्हां तो बेशुध्द पडतो तेव्हां विषबाधेप्रमाणें उपचार करावे लागतात. रबरी पिचकारीनें जठर धुवून काढून अंगावर थंड पाणी शिंपडून किंवा विजेचा उपयोग करून रोग्यास शुध्दि आणण्याचा प्रयत्न करावा. अगोदरपासून वांतीच फार असल्यास मोहरी वांटून ती फडक्यावर पसरून ती पटटी पोटावर ठेवावी. बर्फ चघळण्यास द्यावा. मार्फिया हें औषध टोंचल्यानेंहि वांती रहाते. पण त्याबरोबर अॅस्ट्रोमिन हें औषध सूक्ष्म प्रमाणांत मिश्रित असलें म्हणजे बरें असतें. यानंतर कांहीं वेळानें रोग्यास ताजें ताक देणें चांगलें व तहानेसाठीं सोडा किंवा पोट्याशवाटर द्यावें. पुष्कळांचा असा चुकीचा समज असतो कीं, अशा स्थितींत अटटल दारूबाजांस थोडी तरी दारू न दिल्यानें तो कदाचित दगावण्याचा संभव असतो; निदान त्यास ग्लानी फार येते. पण तुरूंगांतील डाक्तरांचा अनुभव आ आहे कीं ग्लानि आली तरी रोगी दगावत नाहीं. उलट मद्य बंद केल्यामुळेंच त्याच्या प्रकृतींत सुधारणा होण्यास आरंभ होतो. रोगी मोठ मोठ्यानें रडून आरडून असा कांगावा करतो कीं, थोडीशीहि दारू मिळालीं नाहीं तर मी मरेन; व यामुळें कोणी जबाबदारी टाळावी म्हणून दारू देतात पण तें वाईट आहे; व तें बंद करण्यासाठीं रोग्याच्या परिचारकानें दक्षता ठेवावी.

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .