प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

विष्णुपुराण:- एक महापुराण. विष्णुपूजक वैष्णव यांचा हा मुख्य ग्रंथ असून वेदांतसूत्रावरील आपल्या भाष्यांत रामानुजानें या पुराणांतून प्रमाणभूत म्हणून वाक्यें घेतलीं आहेत. विष्णु हाच एक देव, जगदुत्पत्ति- स्थितीस कारण तोच आणि ब्रह्मदेव व शंकर हेहि याहून निराळे नाहींत, अशा आशयाचें वर्णन यांत सांपडेल. तथापि या पुराणांत विष्णवीं विशिष्ट व्रतें, विधी वगैरे, किंवा विष्णुक्षेत्रांची माहिती, इत्यादि कसलेंहि वर्णन नाहीं. यावरून हें पुराण फार प्राचीन असावें असें ठरतें याची रचना 'पुराणा'च्या व्याख्येला धरून आहे.

या पुराणाचे ६ सहा अंश आहेत, व आरंभींच वसिष्ठाचा नातू पराशर व त्याचा शिष्य मैत्रेय यांचा संवाद दिला आहे. व्यासांनीं सर्व पुराणें सांगितलीं. पण या पुराणाचा कर्ता पराशर असल्याचें दाखविलें आहे. यांत जगाच्या उत्पत्तीची माहिती व देव, दानव, मानवजातीचे मूळ पुरूष यांच्या उत्पत्तीच्या वर्णनाला जोडून प्राचीन ऋषींच्या व जुन्या राजांच्या कथा, व बर्‍याच रूपकात्मक गोष्टी दिल्या आहेत. त्यांपैकीं बर्‍याच महाभारतांत आढळतात.

विष्णुपुराणाच्या दुसर्‍या अंशांत जगाचें फारच चमत्कारिक वर्णन दिलेलें आहे. पृथ्वीवरील सप्तखंडे व सप्तसमुद्र दिलेले आहेत. सर्वांच्या मध्यभागीं जें जंबुद्वीप आहे त्याचें भौगोलिक वर्णन आहे. जंबुद्वीपांत 'भारतवर्ष' अथवा 'हिंदुस्थान' आहे. त्यांतील प्रदेश, पर्वत, नद्या यांचीं नांवें दिलीं आहेत. नंतर पाताळाचें व खगोलाचें वर्णन दिलें आहे. या अंशाच्या शेवटी सांगितलें आहे कीं, सर्व जग म्हणजे विष्णुच; विष्णु एक सत्य, बाकी सर्व मिथ्या. भारतवर्षाच्या वर्णनाबरोबर प्राचीन भरत राजाची गोष्ट दिली आहे. परंतु या गोष्टीची प्रस्तावना करून, मुख्यत: उपनिषदांतहि असलेला, सर्व ऐक्यभाव सांगणारा वैष्णवपंथाला धरून असा तत्त्वज्ञान विषयक एक संवाद दिलेला आहे. या भागांतील वर्णनपध्दति उपनिशदांतल्यासारखी आहे.

भारतानें पुढें सवैंक्याचें तत्त्व समजावून देण्याकरितां ऋभु वा दाघ यांची पुढील गोष्ट सांगितली: प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचा मुलगा जो पवित्र व ज्ञानी ऋभु तो निदाघाचा गुरू होता. एक हजार वर्षांनीं त्यानें आपल्या शिष्यास एकदां भेट दिली, त्यावेळीं मोठ्या आदरानें निदाघानें त्याचे स्वागत केलें, आणि कोठें असतां, कोटून आला, कोठें जाणार वगैरे प्रश्न त्याला विचारले. तेव्हां ऋभूनें उत्तर दिलें. ''मनुष्य आत्मासर्वत्र आहे, त्याचें जाणें आणि येणें, असें कांहीं नाहीं; तेव्हां तसले प्रश्न विचारणें अविचाराचें आहे.'' आणि त्यांनीं 'सवैंक्यभाव' हें तत्त्व निदाघाला इतकें उत्तम समजावून दिलें कीं त्याला अगदीं ब्रह्मानंद झाला. तो ऋभूच्या पायां पडला आणि त्यानें त्याला 'तुम्ही कोण आहा' असा प्रश्न केला. तेव्हां त्याला कळून आलें कीं ते आपलेच पूर्वीचे गुरू ऋभु ऋषि असून आपणाला खरें ज्ञान पुन्हां सांगण्याकरता आले आहेत. पुढें पुन्हा हजार वर्षांनीं निदाघ राहत होता त्या गांवात ऋभुऋुषि आले. तेथें लोकांचा मोठा जमाव झाला असून राजा आणि परिवार त्या नगरात प्रवेश करीत होते. या गर्दीपासून लांब बाजूला त्यांचा शिष्य निदाघ उभा होता. ऋभु ऋषींनीं जवळ जाऊन त्यास बाजूला उभें राहण्याचें कारण विचारलें. तेव्हां निदाघ म्हणाला, '' राजा नगरांत प्रवेश करीत आहे, तेथे फार गर्दी झाली आहे, म्हणून मी बाजूस उभा राहिलों आहें.'' त्यावर ऋभूनीं विचारलें, 'त्यांतला राजा कोणता' ? निदाघ म्हणला, ''मोठ्या हत्तीवर बसलेला आहे तो राजा.'' ऋभु म्हणाले ''पण हत्ती कोणता आणि राजा कोणता''? निदाघ म्हणाला ''खालीं आहे तो हत्ती, व वर बसला आहे तो राजा.'' ऋभु म्हणाले ''खाली म्हणजे काय, आणि वर म्हणजे काय''? तेव्हां निदाघानें ऋभूच्या पाठीवर उडी मारली, आणि उत्तर दिलें, ''राजाप्रमाणें मी वर आहे; आणि हत्तीप्रमाणें तुम्ही खालीं आहा.'' तेव्हा ऋभु म्हणाले, '' हे प्रिय शिष्या, आतां आल्यापैकीं तू आणि मी म्हणजे कोण, तें सांग.'' इतकें झालें तेव्हां निदाघानें आपल्या जुन्या गुरूंनां ओळखिलें, कारण त्याच्या इतकी ऐक्यबुध्दि दुसर्‍या कोणांतच बाणलेली नव्हती. ह्या वेळीं मात्र निदाघाच्या मनांत विश्व-ऐक्याचें तत्व इतकें ठसलें कीं, त्यावेळेपासून सर्वांठायीं तो आत्मबुध्दीनें पाहूं लागला, आणि शेवटीं त्याला कायम मुक्ति मिळाली.

विष्णुपुराणाच्या तिसर्‍या अंशाच्या आरंभीं मनुष्य-जातीचे आद्यपुरूष मनु, त्यांच्या कारकीर्दी अथवा मन्वंतरें, यांचें वर्णन आहे. नंतर चार वेद; व्यास व त्यांचे शिष्य यांनीं केलेले वेदाचे विभाग, आणि वैदिक पंथाचा उगम, यांवरील विवेचन आलें आहे. याला जोडून अठरा पुराणांची यादी व शास्त्रांची नांवें दिलीं आहेत. नंतर विष्णुच्या भक्ताला मोक्ष कसा मिळतो या प्रश्नाची चर्चा केली आहे. या ठिकाणीं मृत्यूची देवता यम व त्याचा एक किंकर यांचा एक सुंदर संवाद दिला आहे, त्यांत असें सांगितलें आहे कीं, जो शुध्द अन्त:करणाने पवित्र पुण्याचरण करतो, सतत विष्णुचें ध्यान करतो, तो खरा विष्णुभक्त, व तोच यमपाशांतून मुक्त होतो. याला धरूनच, चार वर्ण व चार आश्रम यांच्या धर्मांचें वर्णन, जन्म-मृत्यूसंस्कार, विधी, प्रायश्चित्तें, नित्ययज्ञ, आतिथ्यधर्म, भोजनसमयींचा आचार वगैरे विषयांवर विवेचन आलें आहे. पुढें श्राध्दकर्माविषयीं सविस्तर विवेचन करून व विष्णुभक्तीचा योग्य मार्ग म्हणजे वैदिक ब्राह्म धर्माचार पाळणें, असें सांगून हा अंश संपविला आहे.

वैदिक धर्माविरूध्द असणारे परधर्मी जे जैन व बौध्द ते अत्यंत घोर पातकी होत, असें वर्णन या अंशाच्या शेवटच्या दोन भागांत केलें आहे. अशा परधर्मी लोकांशी व्यवहार करणें हें केवढें पातक आहे हें दाखविण्याकरतां प्राचीन शतधनु-राजाची गोष्ट दिली आहे.

विष्णुपुराणाच्या चवथ्या अंशात मुख्यत: प्राचीन राजांची वंशावळी, सूर्यापासून निघालेला सूर्यवंश, सोमापासूनचा तो सोमवंश, यांची माहिती आहे. या बहुतेक काल्पनिक, व क्वचित् ऐतिहासिक राजांच्या नामावळीमध्यें मधून मधून एखाद्या राजाची कथा दिली आहे. या सर्व कथांमध्यें अद्भुत चमत्कारच फार भरलेले आहेत. ब्रह्म्याच्या उजव्या आंगठ्यापासून जन्मलेला दक्ष; मागाहून पुरूष बनलेली मनूची मुलगी इला, ब्रह्मदेवानें सुचविलेला नवरा मिळावा म्हणून आपल्या मुलीसह स्वर्गांत गेलेला राजा रैवत आणि स्वत:च गरोदर होऊन पुत्राला जन्म देणारा राजा युवनाश्व; इंद्राचे बोट तोंडांत घालून स्तनपानाप्रमाणें तें चोखणारें बालक, इत्यादि गोष्टी यांत आल्या आहेत.

या अंशात महाकाव्यांतून पूर्वीच आलेल्या अशा पुष्कळ दन्तकथा आहेत, उ. पुरूरवस् आणि उर्वशी, ययाति, इत्यादिकांच्या गोष्टी. श्रीरामकथाहि येथें थोडक्यांत दिली आहे. तसेंच पांडव, कृष्ण यांच्या जन्मकथा आणि थोडक्यांत महाभारतांतील कथाहि दिली आहे. याच्या शेवटीं पुढें होणार्‍या मगध, शैशुनाग, नंद, मौर्य, शुंग, काण्वायन आणि आंध्रभृत्य या राजांबद्दल, आणि त्यांच्यामुळे सुरू झालेल्या भयंकर युगाबद्दल, आणि धर्महीन, नीतिहीन अशा त्या युगाच्या शेवटीं होणार्‍या विष्णुच्या 'कल्की' अवताराबद्दलहि भविष्ये वर्तविलीं आहेत.

पांचव्या अंशांत स्वतंत्रच विषय आहे. यांत गोपाल कृष्णाची सविस्तर कथा दिली आहे. व त्यांत 'हरिवंशात' येणार्‍याच गोष्टीं त्याच क्रमानें सांगितल्या आहेत. सहावा अंश अगदींच लहान आहे. यांत पुन्हां एकदां कृत, त्रेता, द्वापार व कलि या युगांची आठवण देऊन कलियुगांत घडणार्‍या गोष्टीचें भविष्य कथन केले आहे; व त्याला जोडून जगाच्या निरनिराळ्या प्रलयावस्था वर्णन केल्या आहेत.

नंतर नैराश्य- वादित्य पत्करून या जीविताचीं दु:खें, जन्म, बालपण, तरूणपणं, वार्धक्य, मृत्यू यांचे क्लेश, नरकांतील यातना, स्वर्गसुखाची अपूर्णता यांचें वर्णन करून सर्वाचें ताप्तर्य असें काढलें आहे कीं, शाश्वत परमोच्च सुख म्हणजे पुनर्जन्मापासून मुक्ति. पण हें सुख प्राप्त होण्यास देवाविषयीं सम्यकज्ञान झालें पाहिजे, कारण परिपूर्ण ज्ञान असें तेंच; त्यानेंच ईश्वरदर्शन होतें. बाकी सर्व अज्ञान. विष्णुचें ध्यान व योग या मार्गानें तें ज्ञान प्राप्त होतें. शेवटच्या अध्यायापूर्वीच्या दोन अध्यायांत या साधनाचें-विष्णु-भक्तिचें वर्णन आहे. शेवटच्या अध्यायांत सर्व पुराणांचें थोडक्यांत सार दिलें आहे; आणि शेवटीं विष्णुची स्तुति व शेवटची प्रार्थना करून पुराण संपविलें आहे.

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .