विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वीरपूर:- मुंबई, काठेवाड पोलिटिकल एजल्सीमधील एक संस्थान. याचें क्षेत्रफळ ६७ चौरस मैल आहे. यांची लोकसंख्या १९०१ सालीं ६१५२ होती व खेड्यांची संख्या १३ होतीं. काळीचें उप्तन्न १९०३-४ सालीं ६५३६३ रू. होतें. काठेवाडांत हें संस्थान ४ थ्या नंबरचें आहे. वीरपूर संस्थान मूळ नवानगरची एक शाखा होय. संस्थानिकाचा मूळपुरूष भानजी नांवाचा होता.