प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

वीरशैव उर्फ लिंगायत:- यांची एकूण लोकसंख्या (१९२१) २७३८२१४ असून यांचा मुख्य भरणा विजापूर, धारवाड, वेळगांव हे जिल्हे, मद्रास इलाखा, हैदाबाद व म्हैसूर संस्थानें व वर्‍हाड व मध्यप्रांत इकडे आहे. यांचीं लिंगायत, लिंगावंत, लिंगांगी, शिवभक्त व वीरशैव अशीहि नांवें आहेत; नांवांवरून जातीची ओळख पटते. सर्व लिंगायत स्त्रीपुरूषांच्या गळ्यांत चांदीच्या शाळुकेंत एक महादेवाचें लिंग असतें. हें त्यांचें मुख्य धार्मिक चिन्ह असून तें नाहींसें होणें म्हणजे एक प्रकारें धार्मिक हानि होय असें ते मानतात.

लिंगायत हे मूळचे द्रविडी असून, आर्य लोक हिंदुस्थानांत येणाच्या पूर्वीपासूनचे ते येथले स्थाईक होते, असें एन्थोवेन म्हणतो (एन्सा. रिलिजन. एथि. लिंगायत ६९.) दाक्षिणात्याप्रमाणें हे रंगानें काळे असून द्रवीडीभाषेची शाखा जी कानडी ती हे बोलतात.

या संप्रदायाबद्दल '' लिंगायत संप्रदायाचा उदय, बसवाचें चरित्र, लिंगायत संप्रदायाची थोडी माहिती, वीरशैव संप्रदायाचीं मुख्य तत्त्वें व आचार, लिंगायत ग्रंथकार, बसवपुराण इत्यादि विषयांची माहिती '' कानडी वाड्:मय'' (विभाग १२ पृ. २९९-३०२) या लेखांत दिली आहे. तसेंच चन्नबसव आणि बसव यांचीहि माहिती व पुराणें यांच्या नांवांपुढें दिली आहे. यांचे धार्मिक विधी व मतें याबद्दल या पुढें जी माहिती येथें देत आहों ही माहिती सोलापुरचे रा. मल्लिकार्जुनप्पा अप्पाराव पाटील यांनीं पुरविली आहे.

शैवशास्त्र संपूर्ण वेदसंमत आहे. चारहि वेद हे शिवाच्या निश्वासाच्या रूपानें अनायासें अवतरलेले असून अकृत्रिम आहेत. शैवांचे चार प्रकार आहेत: (१) सामान्यशैव-स्वयंभू, आर्ष, दैव किंवा मानुशस्थापित (शिव) लिंग दृष्टीस पडलें म्हणजे त्याची पूजा करणारा. (२) मिश्रशैव-शिवपंचायतन मध्य शंकर व चारी बाजूस अंबिका, विष्णु म्हणजे शालिग्राम, गणपती व सूर्य या  देवतांचें पूजन करणारा. (३) शुध्द शैव-मंत्र, तंत्र, मुद्रा, न्यास, आवाहन विसर्गनादि कर्म जाणणारा पीठस्थ बाणलिंगाची पूजा करणारा, गांवांतील प्रतिष्ठित देव, ऋषि व प्रतिष्ठित लिंग यांची परार्थ पूजा करणारा, सर्वांच्या सुखासाठीं शिवाच्या आस्थानदेवतांची पूजा करणारा आणि दीक्षासंपन्न. (४) वीरशैव-थोड्या क्रियेनें पुष्कळ फळ मिळविणारा, दीर्घव्रतें व उपवास न करतां केवळ स्वेष्ट लिंगपूजेनें मुक्ति मिळविणारा. या चारी भेदांत वीरभद्र हे श्रेष्ठ (वीरशैवन्वयचंद्रिका पृ. ५५.)

वीरशैवांतहि तीन भेद आहेत: सामान्यवीरशैव-षडब्ध-शोधनादिपूर्वक शिवदीक्षेशिवाय केवळ गुरूकृपेनें शक्तिपातपूर्वक कलशस्थापन, लिंगसंस्कार, भस्मधारण रूद्राक्षधारण, मंत्रोपदेश व शिवलिंगधारण करून त्याचें व गुरूजंगमाचें पूजन करणारा व शिवेतर देवतांची पूजा न करणारा. विशेषवीर-शैव-कुंपमंडप, गंगादि तीर्थांचे पंचकलश, त्यांत रेणुकादि पंचाचार्यांची पूजा, जलाधिवास, धान्यदिवास, रूद्रपंचब्रह्मादि वैदिक मंत्रांनीं शडब्धपूर्वक शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करून, शिष्याला  कलशाभिशेक, भस्मधारण, कलान्यास, विध्युक्त शिवलिंगग्रहण, शैवपंचाक्षरी मंत्रोपदेश घेतल्यावर शिवलिंगाची त्रिकाल पूजा करणारा, गुरूजंगमाची सेवा करणारा, अष्टावर्ण  गुरू-लिंग-जंगम-विभूति-रूद्राक्ष-पादोदक-प्रसाद-मंत्र संपन्न, शिवाचारादि पंचाचारयुक्त असा. निराभासी वीरशैव-आश्रमादिक धर्म सोडून शहरांत ५ व खेड्यांत १ रात्र रहाणारा व सर्वत्र करून भक्तांस उपदेश करणारा योगी.

आचार्य वगैरे:- रेवणसिध्द, मरूळसिध्द, एकोराम, पंडिताराध्य व विश्वाराध्य; यांनीं कलियुगांत वीरशैवमत स्थापन केलें. घंटाकर्ण, गजकर्ण, रेणुक, दारूक, विश्वकर्मा वगैरे परशिवाच्या गणांपैकीं पांच जणांनीं दरेक युगांत वीरशैवधर्माची स्थापना केली आहे. रेवणसिध्दाचार्य हा कोल्लिपाकी येथील सोमेशलिंगापासून उत्पन्न झाला व त्यानें मलयाचलास अगस्त्यऋृशीस या (वीरशैव)  धर्माचा सिध्दांत सांगितला व सर्व देशांत तीर्थयात्रा करून व आलेल्या वादींनां जिंकून मतप्रसार केला. यानें लंकेस एकाच मुहूर्तावर तीन कोटी लिंगाची स्थापना केली व अद्वैतसिध्दांत स्थापक शंकराचार्यांशी परकायाप्रवेशयोगावर चर्चा करून त्यांनां यानें चंद्रमौळीश्वर नांवाचें लिंग दिलें. हा १४०० वर्षे (७०० वर्षे गुप्त व ७०० वर्षे प्रगट) पृथ्वीवर होता. याच्या प्रमाणेंच बाकीचे चारी आचार्य निरनिराळ्या शिवलिंगांतून उत्पन्न होऊन त्यांनीं मतप्रसार केला. (वी. चं. प्र. ४)

स्त्रीसंस्कार:- दीक्षा, संस्कार, शिवलिंगार्चन: वगैरे नित्यनैमित्तिक वैदिक तांत्रिक कर्मे करण्यास स्त्रियांनांहि अधिकार आहे. तसेंच जन्मापासून ८ ते १६ वर्षांपर्येंत यांना शिवदीक्षा संस्कार होतो. गुरूलिंगजंगमादि अष्टावर्ण-उपासना यांनां विहित आहे, आणि अध्ययनहि करण्यास हरकत नाहीं.

लिंगधारणा:- ''क्रियासारे एकोनविंशोपदेशे'' इ. प्रमाणानें शिवलिंगधारणा करणें; विष्णु, ब्रहमादि सर्व देप मस्तकादि अवयवांमध्यें धारण करणें; गौतमादि ऋशिनीं धारणा करणें; यावरून यांस वैदिक, दैविक व आर्श म्हणतात आणि हा सृष्ट्यादि पासून आहे असें म्हणतात. विष्णु वगैरे देवांनीं लिंगधारण केल्याचें पुराणागमांत प्रमाण आहे. पंढरपूरच्या विठोबाच्या मस्तकावर, बार्शीच्या भगवानाच्या मस्तकावर, कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या वक्ष:स्थलावर, तुळजापूरच्या भवानीच्या मस्तकावर, व वळवणीच्या वीरभद्राच्या मस्तकावर शिवलिंगें आहेत असें म्हणतात.

लिंगनामें:- लिंग, काटकुट, जमिनऋत, ब्रह्म, पर, सत्य, ज्ञान, शरण वगैरें नांवें आहेत. ब्रह्मसूत्रांत व्यासानें लिंगाचेंच विवरण केलें आहे. त्यावर नीलकंठशिवाचार्य यानें नीलकंठ नांवाचें भाष्य केलें आहे. व असेंच दुसरें एकरेणुकभाष्य आहे.

वर्ण व आश्रम:- यांच्यांत ब्राह्मणादि चार वर्ण व ब्रह्मचर्यादि चार आश्रम आहेत. भक्त व माहेश्वर असे दोन ठळक भेद आहेत. भक्तभेदांत निरनिराळ्या आचारामुळें पंचम, दीक्षित, शीलवंत, धूळपावड इ. उपभेद होऊन या भेदांतील कर्मठ लोक पूर्वभेदांतील लोकांशी अन्नोदकादि व्यवहार करीत नाहींत; मात्र स्वत:प्रमाणें ते आचारसंपन्न असल्यास मग हा व्यवहार होतो. भक्त म्हणजे शिष्यवर्ग, व गुरूवर्गाचें नांव माहेश्वर होय. माहेश्वर हे भक्तांच्या येथील हव्यकव्यादि (वैदिक व नित्यनैमित्तिक) कर्मे करतात.

आयुष्यांतींल आचार आणि तत्त्वज्ञान यांची सांगड घालावयाची ती ते येणेंप्रमाणें घालतात: त्यांच्यांत पुरण्याची चाल आहे. ती संन्यासधर्माची द्योतक आहे. संन्यासी ज्याप्रमाणें वर्ण आणि आश्रम यांच्या बंधाच्या बाहेर असतो त्याप्रमाणें खर्‍या शैवानें असावें. व्यवहारांत रोजचा व्यवहार जरी व्यवहाराच्या नियमानें केला तरी अंतकरणांत अनासक्ति असावी; आणि आपण सर्व बंधापासून निराळे आहोंत अशी जाणीव असावी. लिंगधारण वगैरे अष्टावर्ण पाळावयाचे पण आपण अतिवर्णाश्रमी आहोंत, निदान असलें पाहिजे ही भावना जाऊ द्यावयाची नाहीं. ज्याप्रमाणें कर्मे, किंवा गृहस्थाश्रमाचे नियम खरा वेदांती पाळूं शकतो आणि ज्याचें ''भवंत्ययत्नतो हास्य न तु साधन रूपिण:'' असें व्यवहारांत असूनहि जो जीवन्मुक्त आहे अशाचें सुरेश्वराचार्य वर्णन करतात, त्याचप्रमाणेंच व्यवहाराच्या किंवा संप्रदायाच्या नियमांनीं बध्द दिसणार्‍यांची आणि वर्णाश्रमींची स्थिति आहे.

पंचयज्ञ:- शिवार्चना हाच कर्मयज्ञ, शिवाला उद्देशून शरीर झिजविणें हाच तपयज्ञ, शिवपंचाक्षर-प्रवण-रूद्रादि अभ्यास हाच जपयज्ञ, शिवरूप चिंतन हाच ध्यानयज्ञ, व शिवागम हाच ज्ञानयज्ञ होय. यांशिवाय बाकींची कर्मे व्रतें, स्वर्गादि अनित्यफलसाधक वेदाध्ययन, समाधि वगैरे प्रकार या पंचयज्ञांत येत नाहींत.

शिवच मोक्षदाता व उपास्य दैवत, त्याच्या खेरीज दुसर्‍या कोणत्याहि देवाची पूजा करण्याची इच्छा स्वप्नांतहि करूं नये, ज्या घरांत शिवाखेरींज इतर देव असतील तेथें राहूं नये, ऋशि-देव-मनुष्यस्थापित शिवालय व शिवलिंग कोणी भंग करील तर स्वत:चे प्राण देऊन त्याचें रक्षण करावे, स्थावर व परार्थ लिंगपूला करावी. शिवार्थ सांगणारें वेदाध्यायन व अध्यापनादि शट्कर्मे करावीं, अष्टवर्णाची उपासना करावी, गुरू-लिंग-जंगम यांनां परशिव समजून पूजा करावी. तसेंच जाबालोपनिशदांतर्गत विध्युक्त भस्म प्रधान मानून शिवार्चनाच्या वेळीं त्याचा उपयोग करणें; पूजाप्रसंगीं शास्त्रोक्त रीतीनें १, ३, ३०, ३२, १०८, या संख्येच्या रूद्राक्षमाळा शेंडी, डोकें, गळा, कान व लिंगाची सांखळी या ठिकाणी धारण करणें, शिवपूजेच्या वेळीं भवी दर्शन-संभाषण न करणें. त्रिकाल, निदान एकदां तरी लिंगपूजा केल्याशिवाय पाणी सुध्दां न पिणें, गुरूदत्त शिवलिंग हें उत्तमांग, गळा, हात, छाती अथवा पार्श्वस्थान यांपैकीं एखाद्या ठिकाणीं धारण करणें (मात्र नाभीच्या खालीं धारण न करणें,) प्रमादानें शिवलिंगाचा वस्त्रांत, बेलफळांत चांदीच्या लिंगावर पेटींत ठेवून जानव्याप्रमाणें तें सदोदित धारण करणें, वीरशैवेतरांनीं स्वत:चा स्वयंपाक पाहिल्यास तो त्याज्य मानणें, अहिंसेला प्राधान्य देणें इत्यादि गोष्टी या धर्मात प्रमुख मानल्या आहेत. वेद, आगम, उपनिशदें, वेदविरूध्द स्मृत्यादि ग्रंथ प्रमाणत्वानें मानतात, त्यांची निंदा करीत नाहींत. मात्र शिवभक्ति ज्यांत वर्णिलेली आहे त्या भागांस जास्त मानतात. वेदांनां व आगमांनां समप्रामाण्य समजतात.

विवाहादि विधी:- ब्राह्मविवाह मुख्य मानून तो आपल्या जातीच्या पुरोहिताकडून करवितात. लाजाहोम इत्यादि होम करीत नाहींत. पंचकलश स्थापून त्यांत पंचाचार्यांचें आवाहन करून त्यांच्या साक्षीनें लग्न लागतें. पुनर्विवाहाची रूढी कोठें कोठें आहे. यांच्यांतील र्और्ध्वदेहिक कर्म मात्र (सनातन हिंदूच्या पेक्षां?) फार निराळें आहे.

मठ व मठपती:- यांच्या पंचाचार्य जगद्गुरूच्या खालीं मठ, मठपति, स्थावर, गणाचार्य व देशिक असे पांच उपाचार्य असून त्यांचे मठ ठिकठिकाणीं आहेत. यांनां गांवांतील (लिंगाईत) श्रेष्ठी, महाजन यांची मदत असते.

तत्त्वज्ञान:- यांच्या धर्मग्रंथांत वायवीय संहितेंत व पुराणांत सृष्टी ही दोन प्रकारची मानली आहे. ब्रह्मनिर्मित ती प्राकृत व शिवनिर्मित ती अप्राकृत. नंदी, भृंगी, रेणुक, दारूक इ. प्रथम (गण?) हे शंकरानें निर्माण केले व ते मायेच्या स्वाधीन नसल्याने त्यांना अप्राकृत म्हणतात. ज्ञानक्रियाशक्तिभुक्त चैतन हें एकच चिदचिद्विशिष्ठ द्वैत शिवतत्त्व होय. सगुण ब्रह्मवाद अभिमत आहे. मुक्ति म्हणजे निरंजन साम्य. सायुज्य व कैवल एकच. पतिपदार्थ शिव व पषुपदार्थ ब्रह्मविष्णु आदि जीव यांत तरतम भाव आहे. पतीला स्वरूपवश झालेले पशु-पाश-पति हें पदार्थत्रय आहे. प्रपंच सर्व मिथ्या. विष्णु वगैरे पशू (जीव) मध्यें नित्यमुक्त, अधिकारिक, बध्द, केवलजड इत्यादि अवस्था विशिष्ट आहेत. पशुपति हेच उपास्य दैवत. प्रणव व ब्रह्मशब्द हे सदाशिवैकबोधक आहेत. इ.इ.

गोत्रें, दीक्षा वगैरे:- यांचीं गोत्रें पुरूषनद्यांदिप्रथम होत ऋशिगोत्रें नाहींत. दीक्षेचे एकंदर प्रकार २१ असून त्यांत ३ मुख्य आहेत. गुरूपदेश घेऊन व्रताची प्रतिज्ञा करणें ती वेददीक्षा आज्ञानांना देण्यांत येणारी क्रियादीक्षा होय.

ग्रंथकर्ते:- नीलकंठ शिवाचार्य, शिवयोगीश्वर, पंडिताराध्य, मंचणपंडित, षडक्षरदेव, मुप्पिन षडक्षरदेव, मग्गि मायदेव, नंजणार्य, निजगुणयोगी, बसवेश, चन्नबसवेश, प्राचीदेव, महादेवी अक्का, नागांबा, निलांबा वगैरे. नीलकंठ भाष्य, श्रुतिसारभाष्य, सोमनाथभाष्य, रेणुकभाष्य, शिवाद्वैतमंजरी, सिध्दांतशिखामणी, वीरशैवचिंतामणी, वीरमाहेश्वराचारसंग्रह, वीरशैवाचार कौस्तुभ, बसवराजीय वगैरे. तसेच कामिकादि वातुलपर्यंत १८ आगमें व स्कंदलिंगादि १८ पुराणांपैकीं १० पुराणें व अनुसृत असलेली उपनिशदें इत्यादि ग्रंथ प्रमाण मानतात.

हें मत बसवेश्वरापेक्षां अति प्राचीन आहे. हें आगमन वेद-पुराण यांवरून सिध्द होतें. कारण त्याच्या दर्शनास सर्व देशांतून वीरशैव येत आणि स्वत:च्या संकल्पाप्रमाणें माहेश्वराची संख्या  (१९६००० ही) कमी भरल्यानें त्यानें काश्मीरकडील हजारों माहेंश्वरांनां बोलावून आणलें.

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .