विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
बूलर सरोवर (उल्लोल=उलर=वूलर):- काश्मीर संस्थानांतलें एक सरोवर. हें समुद्रसपाटीपासून ५१८० फूट उंच असून याचें क्षेत्रफळ १२॥ चौरस मैल आहे. उत्तरेकडून या सरोवरांत तीन नद्या, व दक्षिण बाजूनें झेलमनदी शिरते. याच्या ईशान्येस एक लहानसें बेट आहे.