विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वूलिच:- लंडन राजधानीचा आग्नेयीकडील बरो. याची लोकसंख्या १९०१ सालीं ११७१७८ होती. या बरोची उत्तर मर्यादा साधारणत: थेम्सनदी आहे. नदीच्या पलीकडे असलेल्या लहान विभागास उत्तर वूलचिच म्हणतात. येथील रॉयल असेंनमध्यें तोफा तयार करतात. या कारखान्यांत बरेच लोक काम करतात. जवळच रॉयल आर्टिलरी इन्स्टिट्यूट (तोफासंबंधीं शिक्षण देणारी संस्था) आहे. व एक लष्करी वस्तूंचें संग्रहालय आहे. यांत किल्ले, गोद्या यांचे नमुने असून आजतागाईतपर्यंतची वेगवेगळीं शस्त्रें ठेविलीं आहेत.