प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

वृत्तपत्रें:- याची व्याख्या कायद्यामध्यें (इंग्लिश न्यूज पेपर लायबेल ऍंड रॅजिस्टेषन अॅक्ट १८८१)  अशी आहे:- ''जाहीर बातमी, खबर किंवा वृत्त, किंवा तत्संबंधीं कांहीं मत- प्रदर्शन किंवा टीका विक्रीकरितां छापून नियतकालिक किंवा सव्वीस दिवसांहून अधिक नाहीं इतक्या अवधीनें भागश: किंवा अंकश: प्रसिध्द केलेला कोणताहि कागद याला वृत्तपत्र म्हणावें.'' पोस्ट खात्याची व्याख्या पुढीलप्रमाणें आहे: '' पूर्णपणें किंवा अंशत: राजकीय किंवा इतर बातमी किंवा तत्संबंधीं संपादकीय लेख किंवा इतर प्रचलित विषयावरील लेख ज्यांत आहेत असें जाहिराती असलेलें किंवा नसलेलें सात दिवसांहून अधिक नाहीं इतक्या दिवसांच्या अवधीनें छापून प्रसिध्द होणारें जाहीरपत्र.'' सामान्यत: नियतकालिक म्हणजे मासिकें वगैरे आणि वर्तमानपत्र यांत फरक असा आहे कीं, ''वृत्तपत्र म्हणजे मुख्यत: चालू गोष्टींची टीका करणारें दैनिक किंवा फार तर साप्ताहिक प्रसिध्दीपत्र.'' ('मुद्रणविषयक कायदा' व 'जाहीराती' हे लेख पहा.)

बातमी देणारें पत्रक या अर्थानें प्राचीन रोमन लोकांतील 'अॅक्टाडिडर्ना' (रोजच्या हकीकती) आणि चीनमधील 'पेकिंग गॅझेट' हीं फार प्राचीन वृत्तपत्रें होत. रोमन लोकांतील 'दैनिक वृत्तें' यांमध्यें लढाया, निवडणुकी, खेळ, आगी, धार्मिक विधी वगैरेसंबंधीं सरकारी बातमी प्रसिध्द होत असे. चीनमध्यें बादशाही हुकूम व सरकारी बातम्या प्रसिध्द करणारें पेकिंग गॅझेट तंग राजघराण्याच्या वेळेपासून (इ.स. ६१८ ते ९०५) नियमितपणें प्रसिध्द होत आहे. त्यापूर्वीहि पेकिंग न्यूज (त्सिंग-पाओ) हें मासिक ६ व्या शतकांत चालू होतें. त्याचा २४ पानी अष्टपत्री आकार असलेला व पिंवळ्या कव्हरचा नमुना उपलब्ध आहे. तथापि आधुनिक अर्थानें वृत्तपत्रांची सुरवात अर्वाचीन काळांत छापण्याची कला निघाल्यापासून झाली असें म्हटलें पाहिजे. पूर्वी अशा प्रकारच्या छापील पत्रकांनां 'न्यूज बुक्स', 'न्यूज शीट', 'न्यूज लेटर' वगैरें नांवें होतीं. प्रथम यांचें स्वरूप 'न्यूज-पॅफलेट्स' (वृत्तपत्रकें) असें होतें व त्यांची सुरवात १६ व्या शतकांत झाली. प्रथम नेदर्लंडमध्यें 'न्यू झेटुंग' (१५२६) निघूं लागलें. जर्मनीमधील अशा प्रकारचीं पत्रकें १६१० पूर्वींचीं सुमारे ८०० आज उपलब्ध आहेत, नंतर त्यांचें साप्ताहिक व दैनिक वृत्तपत्रांत रूपांतर झालें.

वृत्तपत्रांचा धंदा:- या धंद्यांतली मुख्य कला व कौशल्य, वाचकांच्या मनावर कांहीं विशिष्ट दिशेनें परिणाम घडवून आणतील अशा स्वरूपांत बातम्या प्रसिध्द करणें आणि तशाच स्वरूपांत त्या बातम्यांवर टीकापर लेख लिहिणे यांत आहे, सार्वजनिक मत बनविण्याचें महत्त्वाचें साधन या नात्यानें 'संपादकीय अग्रलेख' लिहिण्याची सुरवात इंग्लंडमध्यें स्विफ्ट, डीफो, बोलिंगब्रोक व पुल्टेनी यांच्या वेळेपासून (१७०४-१७४०) झाली व त्यांच्यापुढें तीव्र राजकीय स्पर्धा व्यक्त केली गेली. फ्रान्समध्यें अशा संपादकीय लेखांनां १७८९ च्या राज्यक्रांतीच्या वेळेपासून आरंभ झाला. त्या वेळेचा एक फ्रेंच लेखक लिहितो, ''दोषारोप, कैद, निषेध सहन करा, फांशी जाण्यास देखील तयार व्हा, पण स्वत:चीं मतें प्रसिध्द करा; हा केवळ हक्क नव्हे तर कर्तव्य आहे.'' इतर यूरोपीय राजकीय स्वरूपाच्या वृत्तपत्रांनां सुरवात १९ व्या शतकांत झाली. बातम्या पुरविणें हें या धंद्यांतलें प्रथमपासूनच मुख्य अंग असून त्याचें महत्त्व अद्यापहि सारखें वाढत आहे. या कामाकरितां असोसिएटेड प्रेस, न्यूज सिंडिकेट, वगैरे नांवांच्या मोठमोठ्या कंपन्या हल्लीं असून त्यावेळीं महत्त्वाची रूटर एजन्सी जूलियस रूटर या प्रशियन इसमानें पॅरिस येथें १८४९ मध्यें स्थापलीं, व तिचें १८६५ मध्यें कंपनींत रूपांतर केलें. थोडक्यांच वर्षांत रूटरचें वार्षिक उत्पन्न २५००० पौंडावर गेलें. संपादकीय लेख व बातम्या यांखेरीज सुप्रसिध्द किंवा कुप्रसिध्द असलेल्या स्त्रिपुरूषांची खाजगी चरित्रपर माहिती व त्यांच्या मुलाखती देऊन वृत्तपत्रें आकर्षक करण्याची पद्धति पडली आहे. वाड:मय व कलाकौशल्य यासंबंधीं परीक्षणपर लेख आणि बाजारभाव, जुगारी, शर्यती, हेहि वृत्तपत्रांतील महत्त्वाचे विषय बनले आहेत.

हल्लीं या धंद्यांत संपादकवर्ग, बातमीदार, जाहीरात मिळविणें व हिशोब ठेवणें वगैरे कामें करणारा व्यवस्थापक (मॅनेजर,) तसेंच कंपाझिटर, फौंडरीमॅन, प्रुफ रीडर्स या सर्वांचा समावेश होतो ('मुद्रण' पहा.) या सर्वाला भांडवल पुरविणारा बहुधा कोणी तरी निराळाच इसम असतो; पण कायद्याच्या दृष्टीनें वृत्तपत्राची जबाबदारी संपादक, मुद्रक व प्रकाशक यांजवर असते. तारेनें बातमी मिळण्याचे माफक दर, छापण्याचीं यंत्रें आणि जाहिरातींचें उत्पन्न यामुळें अलीकडे वृत्तेंपत्रें स्वस्त दरांत मिळूं लागलीं आहेत. तथापि १७ व्या शतकांतहि इंग्लंडांत अर्धा पेनी व फार्दिंग किंमतीचीं पत्रें (पोस्टस) मिळत असत. १७१२ मध्यें प्रत्येक छापील कागदावर एक अर्धी पेनी असा कर बसविला व तो वाढत वाढत १८१५ सालीं चार पेन्स इतका वाढला; त्या वेळीं वर्तमानपत्राच्या एका अंकाची किंमत साधारणत: सात पेन्स असे. पुढे तो कर कमी होतां होतां १८५५ मध्यें अजीबात बंद झाला, आणि दैनिक वर्तमानपत्रें पुन्हां अर्ध्या पेनीला मिळूं लागली.

ग्रेटब्रिटनमध्यें १९१० सालानंतर वृत्तपत्रांच्या धारेणामध्यें हळू हळू क्रांति घडत चालली आहे. सामान्य जनता व स्त्रिया यांच्यामध्यें वृत्तपत्रांच्या वाचनाची आवड वाढूं लागल्यामुळें त्यांनां रूचतील व पचतील अशा प्रकारच्या सुधारणा वृत्तपत्रांमध्यें करणें भाग पडलें. त्यामुळें वृत्तपत्रांतील लेख पूर्वीप्रमाणें विद्वत्ताप्रचुर येईनातसे झाले. चित्रें, विनोदी संवाद, बायकांच्या फॅशनचीं चित्रें यांचा वृत्तपत्रांत मोठ्या प्रमाणांत समावेश होऊ लागला. मतापेक्षां ताज्या बातम्या वाचण्याकडेच वाचकांचा कल दिसून येऊ लागल्यामुळें अगदीं ताज्या बातम्या पुरविण्याकडे वृत्तपत्रकारांचें लक्ष वेधूं लागलें. पार्लमेंटच्या कामकाजाचे सविस्तर रिपोर्ट देऊन त्यांचा सारांशहि छापण्याची पध्दत पडली. नवीन नवीन प्रसिध्द पुस्तकांतील महत्त्वाचा भाग वृत्तपत्रांत देण्याचीहि पध्दत पाडण्यांत आली. १९१०-२० सालांत वृत्तपत्रांच्या इतिहासांत महत्त्वाच्या तीन गोष्टी घडून आल्या; (१) फोटोग्राफीची फार प्रगति झाल्यानें स्वस्त व सचित्र वृत्तपत्रांची संख्या वाढली. (२) रविवारची वृत्तपत्रें (सन्डे न्यूज पेपर्स) अधिक अस्तित्वांत आलीं व (३) सांजवृत्तपत्रांचा भयंकर खप होऊ लागला. धंद्याच्या दृष्टीनेंहि गेल्या १०-१५ वर्षांत बर्‍याच सुधारणा झाल्या आहेत. वृत्तपत्रांच्या मालकांच्या संस्थाप्रमाणेंच वृत्तपत्रांच्या धंद्यांत काम करणार्‍या कामगारांच्याहि संस्था निघाल्या आहेत. 'दि न्यूजपेपर प्रोप्रायटर्स अॅसोशियन' नांवाची सांज व रविवारच्या वृत्तपत्रांच्या मालकांची संस्था असून तींत वृत्तपत्रांसंबंधीच्या सर्व प्रश्नांची चर्चा होते. या संस्थेतर्फे शांततापरिषदेंत प्रतिनिधी पाठविण्यांत आले होते. याशिवाय 'विक्ली न्यूजपेपर्स ऍंड पीरिऑडिकल्स प्रोप्रायटर्स' नांवाची साप्ताहिके व मासिकें यांच्या मालकांची संस्था आहे. लंडन बाहेरील परगण्यांमध्येंहि बर्‍याच संस्था निघाल्या आहेत. त्याशिवाय छापखानेवाल्यांचा संघ, कंपाझिटर्स यूनियन इत्यादि अनेक संघ आहेतच. वृत्तपत्रकारांची व त्या धंद्यांतील लोकांची स्थिति सुधारण्याच्या हेतूनें ग्रेटब्रिटनमध्यें एक नवीनच संस्था उत्पन्न झाली आहे. तिचें नांव 'नॅशनल यूनियन ऑफ जर्नालिस्टस्' असें आहे.

स्त्री वृत्तपत्रकारांचीहि ‘सोसायटी ऑफ वूमन जर्नालिस्ट्स' नांवाची संस्था आहे. 'दि ब्रिटिश इंटरनॅशनल अॅसोसिएशन ऑफ जर्नालिस्ट्स' नांवाची संस्था इतर यूरोपियन राष्ट्रांतील वृत्तपत्रांच्या धंद्यांतील लोकांशी संबंध ठेवणारी संस्था असून या संस्थनें वृत्तपत्रकारांच्या परिषदा भरविल्या आहेत. वृत्तपत्रांना बातमी पाठविणार्‍यांच्याहि बर्‍याच संस्था आहेत. यांपैकी 'दि फेडरेशन ऑफ होलसेल न्यूज एजंट्स' व 'दि नॅशनल फेडरेशन ऑफ रीटेल न्यूज एजंट्स' या संस्था प्रमुख होत.

महायुध्दामध्यें 'दि न्यूज पेपर्स प्रोप्रायटर्स असोसिएशन' संस्था सरकार व वृत्तपत्रें यांच्यामधील दुवा होती; व महायुध्दांत या संस्थेचा सरकारला फार फायदा झाला. प्रेस ब्यूरो नांवाची सरकारनें संस्था काढली होती व तिच्याकडे कोणता मजकूर मुद्रणार्ह आहे अगर नाहीं हें ठरविण्याचें काम असे. याशिवाय या बाबतींत सरकारनें तात्पुरते नियम केले होते व सेन्सार खातें उघडलें होतें. महायुध्दामध्यें सुरवातीला युध्द भूमीवर वृत्तपत्रांच्या बातमीदारांनां जाण्याची बंदी असे पण न्यूजपेपर्स प्रोप्रायटर्स अॅसोसिएशनच्या विनंतीला मान देण्यांत येऊन ६ बातमीदारांनां युध्दभूमीवर जाण्याची परवानगी देण्यांत आली; व या बातमीदारांनीं आपली कामगिरी चोख रीतीनें बजावल्याबद्दल त्यांनां 'नाईट' हा किताब देण्यांत आला.

संपादकीय शिक्षण देण्यासाठीं पाश्चात्त्य देशांतून विश्वविद्यालयांतर्फेच सोय करण्यांत आलेली असते. कांहीं खाजगी संस्थाहि हें शिक्षण देतात. असें कांहीं तरी शिक्षण इतर धंद्यांतल्याप्रमाणे याहि धंद्यांत आवश्यक आहे. ही गोष्ट सर्वांनां पटलेली आहे. हिंदुस्थानांतहि संपादकीय शिक्षणाचीं कॉलेजें असावींत अशा दिशेनें प्रयत्न चालू आहेत.

जगांतील प्रमुख वृत्त्तपत्रें:- इंग्लंडांत 'पेस्टनलेटर्स' 'सिडने पेपर्स' वगैरे नांवाच्या न्यूज-लेटर्सपासून सुरवात झाली. वुइक्ली न्यूज (१६२२) हें नियमित निघत नव्हतें. तथापि आठवड्याची बातमी देणारें पहिलें वृत्तपत्र हें होय. १६४१ मध्यें 'दि हेड ऑफ सेव्हरल प्रोसिडिंग्ज इन दि प्रेझेंट पार्लमेंट' या नांवानें पार्लमेंटांतील बातमी देणारें पत्र सुरू होऊन या प्रकारचीं बातमीपत्रें बरींच निघालीं. 'परफेक्ट ऑकरन्सेस' हें पार्लमेंटच्या व इतर बातम्या आणि जाहिराती देणारें आधुनिक स्वरूपाचें पहिलें वृत्तपत्र होय नंतर 'इंटेलिजन्सर' नांवाचीं कित्येक पत्रें निघून पहिलें सुप्रसिध्द वृत्तपत्र लंडन गॅझेट (पूर्वीच्या ऑक्सफोर्ड गॅझेटचें रूपांतर) १६६५ मध्यें निघालें. लंडनमधील पहिलें दैनिक पत्र 'डेली करंट' हें १७०२-१७०३ मध्यें निघालें. डीफोचें 'रिव्हू (१७०४), रिचर्ड स्टीलचें 'टॅटलर' (१७०९,) अॅडिसनचें 'स्पेक्टेटर (१७११), वगैरे विशेष प्रसिध्द टीकाकार पत्रें निघालीं. यामुळें सरकारचें लक्ष त्यांजकडे वळून संपादकांनां शिक्ष होऊ लागल्या, आणि कायमचा बंदोबस्त व्हावा म्हणून १७१२ मध्यें 'रँबलर' व 'आयडलर' हीं पत्रें विशेष प्रसिध्दि पावलीं. तिसर्‍या जॉर्जच्यावेळीं वृत्तपत्रकारांचा छळ विशेष झाला, त्यांत विल्कसचें 'नॉर्थ ब्रिटन' हें पत्र सरकारी छळामुळें फार प्रसिध्दि पावलें व मुद्रणस्वांतत्र्याबद्दल अत्यंत कडाक्याचा वाद पार्लमेंटांत १७७१ मध्यें होऊन हें स्वातंत्र्य कायद्यानें प्रस्थापित झालें. या विजयानंतर निघालेलीं मॉर्निंग पोस्ट (१७७३), दि टाईम्स (१७८८), मॉर्निंग अॅडव्हर्टायझर (१७९४), डेलीन्यूज (१८४६), डेलि टेलिग्राफ (१८५५), दि स्टॅंडर्ड (१८५७), डेली क्रॉनिकल (१८७७), डेलिमेल (१८९६): (खप १० लाख), ग्लोब (१८०३), पालमाल गॅझेट (१८६५),  हीं प्रसिध्द वृत्तपत्रें. लंडन न्यूज, ग्रॅफिक, स्केच, स्फिअर, कंट्री लाईफ हीं सचित्र साप्ताहिकें; पंच (१८४०), फन (१८६०), मूनशाईन (१८०९), पिक-मी-अप् (१८८८), हीं विनोदी पत्रें आहेत. क्वीन  (१८६१), लेडीज पिक्टोरियल (१८८०), लेडी, वूमन, जंटलवूमन, मॅडम, लेडिज फील्ड हीं साप्ताहिकें व इंग्लिशवूमन, लेडीज रेल्म, वुमन अॅट होम हीं मासिकें स्त्रियांनीं चालविलेलीं आहेत.

फ्रान्समध्यें गॅझेट डी फ्रान्स (१६३१), ले माटिन, ला रिपब्लिक, ले ब्लॉक, ला पॅट्री, ला क्रॉय, ला जिरोंड, वगैरे; जर्मनींत फ्रॅंकफुर्टर झीटुंग, क्रूझ झीटुंग, जर्नामिआ, डुश टॅगेझींटुंग, फ्रॅंकफुर्टर झीटुंग, श्लेमिच् झीटुंग, वेसेर झीटुंग, स्ट्रॅसबुर्गर पोस्ट वगैरे; बेल्जममध्यें गॅझेट वॅन गेंट (१६६७),  मॉनिटूर बेल्जे, ले नॅशनल वगैरे; इटलींत डायरीओ डी रोय (१७१६), फॅफुला, ट्रिब्यूना, मेसॅजीरो, एल् ऑसवेंटर रोमॅनो, वगैरे: स्पेनमध्यें एल् लिंबरल वगैरे; स्वित्झर्लंडमध्यें जर्नल डी जेनीवे, गॅझेट डी लॉसेन, कोरीयर डी जेनीवे, ला ट्रिब्यून डी जेनीवे वगैरे; ग्रीसमध्यें अॅस्टी, अॅक्रॉपोलीस वगैरे; तुर्कस्थानांत मॉनिटर ऑटोमन, जर्नल डी स्मर्ना, एकोडी एल ओरियंट, स्तंबूल वगैरे; जपानांत बटेव्हियान्यूज (१८६१), शिंबुन-शी न्यूज, कोकॉ शिंबुन (दि वर्ल्ड),  निचिनिचि शिंबुन (डेलिन्यूज), यूबिन होची (पोस्टल इंटिलिजन्स), चोय शिंबुन (गव्हर्नमेंट ऍंड पीपल न्यूज), मैनिचि शिंबुन (डेलि न्यूज), जिजि शिंपो (टाईम्स), इंग्लिश भाषेत निघणारीं जपान क्रॉनिकल, जपान अडव्हर्टायझर, दि ट्रॅन्स पासिफिक मासिक व जपान गॅझेट वगैरे; चीनमध्यें पेकिंग गॅझेट, शांघाय न्यूज, वगैरे; युनायटेडस्टेट्समध्यें पब्लिक ऑकरन्सेस (१६८९), बोस्टन न्यूज-लेटर  (१७०४), न्यूयॉर्क गॅझेट, वुइक्ली जर्नल, न्यूयॉर्क हेरल्ड, न्यूयॉर्क ट्रिडयून, न्यूयॉर्क टाईम्स, न्यूयॉर्कवर्ल्ड, न्यूयॉर्क प्रेस, नॅशनल इंटेलिजन्सर (वॉशिंग्टन), वॉशिंग्टन पोस्ट, नॅशनल ईश, वगैरे, वृत्तपत्रें प्रसिध्द आहेत.

वृत्तपत्रांचें संख्यादर्शक कोष्टक
देश (१८२८) (१८८६) (१९००) (१९२०)
ग्रेटब्रिटन ४८३ १२६० २९०२ ...
फ्रान्स ४९० १६४० २४०० ३७८०
जर्मनी ५९३ ... ३२४८ ...
इटली ... ५०० २५१ ८०७
रशिया ८४ २०० २८० ...
स्वित्झर्लंड ... ३०० ६०० ...
युनायटेस्टेट्स ... ४००० १५९०४ २०९४१
जपान ... २७६७ १७७५ २०००
हिंदुस्थान ... ५०३ ६५७ १०९४
मुंबईइलाखा ... ... १३९ २११

भारतीय वृत्तपत्रें:- भारतीय वृत्तविषयक इतिहासास १८ व्या शतकाच्या उत्तरार्धांत प्रारंभ झाला. इंग्रजांचा प्रवेश व अंमल प्रथमत: बंगालमध्यें झाल्यानें वृत्तपत्राचा जन्म प्रथम त्याच प्रांतांत हिकीचें 'बंगाल गॅझेट' निघून झाला (१७८०.) परंतु मोठ्या माणसाची बदनामी केल्यावरून सरकारनें त्याच्या संपादकास तुरूंगांत घातलें; तेव्हां तें पत्र बंद पडलें. त्यांनतर गॅझेटप्रमाणें दुसरी कांहीं पत्रें निघालीं. १७९१ त कॉर्नवॉलिसनें एका संपादकास हद्दपार केलें. गव्हर्नरच्या या अधिकाराविषयीं वाद निघाला असतां कोर्टानें गव्हर्नरला तो हक्क असल्याबद्दल निर्णय दिला. १७९९ त मुद्रणनियंत्रणाच्या कायद्यास अधिकार्‍यांकडून संमति मिळून तो अंमलांत आला. वृत्तपत्रांतील आगबोटींच्या हालचालीच्या प्रसिध्दीनें फ्रेंच चाच्यांनां फायदा होतो म्हणून वृत्तपत्रावर आणखी जास्त निर्बंध घातले गेले. हेस्टिंग्जनें ''प्रेस-सेन्सार'' बंद करून सरकारी कृत्यावरील व अधिकार्‍याच्या वर्तनावरील कडक टीकेस निर्बंध घालणारा कायदा केला. १८१८ त बंकिंगहॅमच्या संपादकत्वाखालीं ‘कलकत्ता जर्नल' निघालें, हेंस्टिंगच्या मागून कांहीं काळ अधिकारावर असलेल्या अॅडम्सननें बंकिंगहॅमनें सरकारवर केलेल्या टीकेनें चिडून जाऊन प्रत्येक पत्राला लायसेन्स घेण्याची अट घालून बंकिंगहॅमला हद्दपार केलें. १८३५ त मेटकॉफनें पूर्वीचें सर्व कायदे रद्द करून राजद्रोह व बदनामी या कायद्याखालींच संपादकांनां आणून ठेवलें. संपादकांनीं रशियाच्या बाजूनें लिहून लोकांचीं मनें कलुषित करूं नये म्हणून १८७८ सालीं एक कायदा केला गेला. १८८२ सालीं हा कायदा रिपननें रद्द करून पीनलकोडांतच १२४ हे कलम घातलें. पुढें १९१० त प्रेस अॅक्ट झाला. व युध्दकालांत सेन्सारशिप बसून युध्द संपल्यानंतर ही सेन्सारशिप उठली.

देशी वृत्तपत्रें:- १८१८ सालीं मार्शमननें बंगाली भाषेत निघणारें 'समाचार दर्पण' पत्र काढलें. पहिलें मराठी पत्र ज्ञानप्रकाश १८४६ त निघालें. मुंबई इलाख्यांत मुंबईव्यतिरिक्त सुधारलेलें दुसरें मोठें शहर नाहीं. तेव्हां तेथेंच वृत्तपत्रें जास्त निघालीं, वाढलीं, व पोसलीं गेलीं. १७९० त मुंबईस गॅझेट पत्र निघालें. दोन वर्षांनीं विल्यम अॅशबर्नरनें 'कूरीअर' पत्र काढलें. सरकारच्या नोटिसा प्रसिध्द करण्याबद्दल या पत्राला सरकारकडून सालीना दहा हजार रूपये मिळत. द्विसाप्ताहिक बाँम्बे टाइम्स १८३७ त सुरू झालें. हें पत्र मुंबईच्या व्यापार्‍यांनीं चालविलें. तें १८५० त दैनिक झालें. १८२८ त ओव्हरलँड समरी नांवाचें पत्र निघालें. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धांत दशकांनीं मोजण्याइतकीं पत्रें एकट्या मुंबईतच निघूं लागली. ५७ सालच्या बण्डानंतर हिंदुस्थानांत एकंदर ४४ पत्रें होतीं तीं १८८८ त २०३ झालीं व १९१८ त ८८३ झालीं.

वृत्तपत्रांतील चित्रें:- वर्तमानपत्रांतून प्रासंगिक चित्रें देणें हें वृत्तपत्रांचें एक महत्त्वाचें अंग आहे. आज चित्रें नसणारीं पत्रें मागासलेलीं समजलीं जातात. इंग्लंडांत 'इलस्ट्रेटेड लंडन न्यूज' (१८८२) हें पहिलें नियमानें चित्रें देणारें पत्र होय. पूर्वी लांकडाच्या ठोकळ्यावर चित्रें कोरून मग तीं छापीत. पण पुढें हाफटोनपध्दत निघाली व तिनें वृत्तपत्रांत एक प्रकारची क्रांति घडवून आणलीं. १९०३ त नार्थक्लिफनें 'डेलि मिरर' दैनिक काढून हाफटोन ब्लॉकचीं चित्रें देण्याची पध्दत सुरू केली. तत्पूर्वी लाइन ब्लॉकचीं चित्रें वृत्तपत्रांतून येत असत. पण सर्व चित्रांत माणसाचे चेहरे एकाच तर्‍हेचे दिसून येत. पूर्वी वृत्तपत्रांत घालावयाच्या चित्रांच्या खोदकामास ८ दिवस लागत व ते करण्यास १०।१२ माणसें लागत. आतां १९ मिनिटांत छापण्यालायक चित्र होऊ लागलें आहे. वृत्तपत्राच्या संपादकीय मंडळांत एक चित्रसंपादक असतो व तो चित्रांची सर्व व्यवस्था पहातो. याच्या हाताखालीं कांहीं फोटोग्राफर असतात. ताज्या घडलेल्या प्रसंगांचीं चित्रें पहाण्याची लोकांनां उत्सुकता असते. तेव्हां हा चित्रसंपादक त्या ठिकाणीं आपला फोटोग्राफर पाठवून आपल्या पत्रांत चित्रें प्रथम दिसावींत ह्यासाठीं अटोकाट प्रयत्न करतो. ब्रिटिश आईल्समधील प्रत्येक मोठ्या शहरीं डेलीमेलचा फोटोग्राफर असतो व चित्रसंपादकाशी त्याचें चित्रप्रसंगाविषयीं नेहमीं सलवत चालतें. कित्येक चित्रसंपादक आपल्या चित्र-बातमीदाराला तारेनें एखाद्या प्रसंगाचा फोटो घेण्यास आज्ञा करतो. पुढें घडणार्‍या प्रसंगाविषयीं डायरी ठेवून आपल्या चित्र बातमीदाराला परवानगी मिळवून तेथें पाठविण्यांत चित्र संपादकाला दक्ष असावें लागतें. अलीकडे न्यूज सर्व्हिसेसप्रमाणें फोटोन्यूजसर्व्हिसेसहि झाल्या आहेत. तेव्हां चित्र संपादकाला या सर्व्हिसेस किंवा स्वत:च्या आलेल्या चित्रांतून आकर्षक तेवढींच चित्रें निवडून काढून तीं एका पानांत बसतील अशा तर्‍हेनें त्यांची मांडणी करावी लागते. या सर्व चित्रांनां योग्य व थोडक्यांत नांवें देण्याला एक स्वतंत्र इसम असतोच.

सरकारी किंवा सरकार पक्षपातीवृत्तपत्रें:- जेव्हां सरकाराविरुध्द पक्ष देशांत प्रबल असून ते सरकारीदृष्ट्या लोकांचा गैरसमज करीत असतात, तेव्हां सरकारला आपली बाजू मांडण्याला मुख्यपत्र हवें असतें, नुसत्या गॅझेटनें काम भागत नाहीं. याकरितां कांहीं सरकारें आपली स्वत:ची वृत्तपत्रें प्रसिध्द करतात, तर काही खाजगी वृत्तपत्रांनां प्रत्यक्षाप्रत्यक्ष मदत करून त्यांच्या द्वारें सरकारीं बाजू लोकांपुढें ठेवितात. हिंदुस्थानांत यूरोपियन मालकीचीं पत्रें सरकारची बाजू उचलून धरणारीं असतात तेव्हां हिंदुस्थान किंवा प्रांतिक सरकारला आपलें स्वतंत्र वर्तमानपत्र ठेवण्याची आज तरी जरूरी नाहीं. शिवाय प्रत्येक प्रांतिक सरकारचें एक 'प्रसिध्दीखातें' असतेंच. तें सरकारी बातम्या लोकांनां मोफत पुरवीत असतें.

प्रसिध्द हिंदी वृत्तसंपादक:-हिंदुस्थानांत पाश्चात्त्य देशांप्रमाणें संपादकीय शिक्षण देणार्‍या शाळा नाहींत. तरी अनुभवानें व कर्तबगारीनें बरेच हिंदि गृहस्थ या धंद्यांत पुढें येऊन लोकमान्य झाले आहेत. बंगाल्यांत श्री. शंभुचरण मुकर्जी, केशवचंद्रसेन, बंकिमचंद्र चतर्जी, सुरेंद्रनाथ बानर्जी, बाबू मोतीलाल घोस, इत्यादि; मद्रासकडे कस्तुरीरंग अय्यंगर; मुंबई इलाख्यांत, बी. एम. मलबारी, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, नटराजन् इ.; संयुक्तप्रांतांत सी. वाय. चिंतामणीं व पंजाबांत लाला लजपतराय यांसारखे हिंदी गृहस्थ वृत्तपत्राच्या क्षेत्रांत यशस्वी म्हणून पुढें येऊन राजकीय पुढारी बनले आहेत.

[संदर्भग्रंथ:- जर्नालिझम् इन् अमेरिका-मॉ. रिव्हयू १९२१; फ्युचर जर्नालिझम् मॉ. रेव्ह्यू १९२१; एन्सायक्लोपीडिया-ब्रिटानिका. जर्नालिझम् अॅझ ए. प्रोफेशन १९२१; मेकिंग जर्नालिझम्, न्यूज पेपर  (होम युनिव्हर्सिटी लायब्ररी); हाईड-हँडबुक न्यूज पेपरवर्क्स्; पॉन बी. मॅकी-मॉडर्न जर्नालिझम्, प्रॅक्टिकल जर्नालिझम् (पिटमन सीरिज); विद्यासेवक वर्ष १ लें.]

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .