प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

वृत्ते:- (गोलिय)- या विविध वृत्तांची नांवें व त्यांच्या संबंधीं माहिती येथें दिली आहे. (१) विषुववृत्त (इक्वेटर); हे वृत्त दोन्ही ध्रुवांपासून ९० अंशांवर असतें. (२) क्रांतिवृत्त (इक्लिप्टिक);  हें विषुववृत्ताशी २३ १/२ अंशांचा कोन करून असतें. व तो कोन किंचित् किंचित् बदलणारा आहे.   (३) पूर्वापरवृत्त किंवा सममंडल (प्राइमव्हर्टिकल); हें वृत्त पूर्वबिंदु, खमध्य, आणि पश्चिमबिंदु यांतून जाणारें असतें. (४) उन्मंडळ किंवा लंकाक्षितिज (होरायझन ऑफ लंका) हें वृत्त दोन्ही ध्रुव व पूर्व बिंदु यांतून जातें. (५) क्षितिजवृत्त (होरायझन;) हें वृत्त आकाश व पृथ्वी यांच्या कल्पित संलग्नतेमुळें निघतें. (६) याम्योत्तर वृत्त (मिरीडियन); हें वृत्त दोन्ही ध्रुवांपासून जाणारें असें कल्पिलें आहे. (७) खस्थलीय याम्योत्तरवृत्त (मिरीडियन ऑफ दि प्लेस); हें खस्थलाच्या खमध्यांतून व दोन्ही ध्रुवांतून जातें. (८) दृड्मंडल (व्हर्टिकल सर्कल); हें खस्थपदार्थ, खमध्य आणि अध:स्वस्तिक (नेदीर) यांतून जाणारें असतें. (९) वेधवलय (व्हर्टिकल सर्कल); यास दृड्मंडल असेंहि म्हणतात. (१०) अहोरात्रवृत्त (पॅरलल सर्कल); हें विषुववृत्ताशी समांतर असतें. ३० घटी दिनमान व ३० घटी रात्रिमान असतां विषुववृत्तासहि अहोरात्रवृत्त म्हणतात. कारण त्या दिवशी सूर्य विषुववृत्तांत फिरतो. (११) क्रांतिमापक वेधवलय (डेक्लिनेशन सर्कल); हें दोन्ही ध्रुवांतून जातें व विषुववृत्तास लंबरूप असतें. यावर क्रांति मापतात. (१२) शरमापक वेधवलय (सेलेश्चियल लॅटिटयूड सर्कल); हें कंदबांतून (इक्प्लिटिकच्या पोलमधून) जातें व क्रांतिवृत्तावर लंबरूप असतें. या वृत्तावर शर मापतात. (१३) नतोन्नतांशमापक वेधवलय (व्हर्टिकल सर्कल); हें नंबर ९ मध्यें जें सांगितलें आहे तेंच होय. या वृत्तावर खस्थपदार्थाचे नतांश (झेनिथ् डिस्टन्स) आणि उन्नतांश (आल्टिटयूड) मापतात. (१४) दृकक्षेपवृत्त (व्हर्टिकल सर्कल पासिंग थ्रू दि नानजसिमल पाइंट); हें वृत्त त्रिभोनलग्न म्हणजे नानाज सिमल पाइंट यांतून व खमध्य (झेनिथ पाइंट) यांतून जातें व हें क्षितिजवृत्ताला लंबरूप असतें. यावर त्रिभोन लग्नाचे नतांश मापनात (१५) नाडिकामंडल, नाडीवृत्त (इक्वेटर); हें नंबर १ मध्यें सांगितलेलें जें वृत्त तेंच होय. यावर घटिकादि कालमापन होतें. (१६) विक्षेपवृत्त (ऑर्बिट ऑफ दि मून); हें वृत्त चंद्राचा परमशर सुमारें ५ असतो तितका कोन क्रांतिवृत्ताशी करून काढिलेलें असतें. या वृत्तांतून चंद्र फिरतो. (१७) कक्षावृत्त (ऑर्बिट ऑफ दि प्लॅनेट); ज्या मार्गांतून ग्रह फिरतो तो मार्ग दाखविण्याकरितां हें वृत्त कल्पितात. व ग्रहाचा शर जितका परम असेल तितका कोन क्रांतिवृत्ताशी करून हें काढतात. (१८)  जिनवृत्त; ध्रुवांपासून जितकी सूर्याची परमक्रांति असेल तितक्या अंशावर जें वृत्त गोलावर काढतात त्यास जिनवृत्त असें म्हणतात. यास हें नांव पडण्याचें कारण असें आहे कीं, जिन शब्दाचा अर्थ २४ असा आहे व प्राचीनांच्या मतें सूर्याची क्रांतीहि २४ अंश आहे. म्हणून ध्रुवापासून २४ अंश अंतराच्या वृत्तास जिनवृत्त अशी अन्वर्थक संज्ञा आहे. (१९) अक्षवृत्त; स्वस्थलाच्या उत्तरबिंदूस सम अशी संज्ञा आहे. त्या समापासून जागच्या अक्षांशाइतक्या अंतरावर जें वृत्त निघतें त्यास अक्षवृत्त म्हणतात. (२०) लघुवृत्त (पॅरलल सर्कल) ज्या वृत्ताचा मध्यबिंदु गोलाच्या मध्यांत नसतो त्यास लघुवृत्त असें म्हणतात. जसें-गोलमध्यांतून जाणारें एखादें महावृत्त घेऊन त्याशी समांतर अशी वृत्तें काढिली असतां तीं सर्व लघुवृत्तें होतात. (२१) महावृत्त (ग्रेट सर्कल); ज्या वृत्ताचा मध्य गोलाच्या मध्यांतून जातो त्यास महावृत्त असें म्हणतात. जसें-विषुववृत्त, क्रांतिवृत्त इत्यादीनां महावृत्तें म्हणतात. (२२) उपवृत्त; समवृत्तांशी म्हणजे पूर्वापार वृत्तांशी जीं समांतर लघुवृत्तें निघतात त्यांस उपवृत्तें असें म्हणतात. (२३) दक्षिणायनवृत्त (कर्कवृत्त); मेघसंपातापासून तीन राशींवर क्रांतिवृत्तावर जो ब्रिदु असतो त्यांतून विषुववृत्ताशी समांतर असें निघणारें जें लघुवृत्त त्यास दक्षिणायनवृत्त असें म्हणतात. यास इंग्रजींत ट्रापिक आफ् कॅन्सर असें म्हणतात. (२४) उत्तरायणवृत्त (मकरवृत्त); तुला संपातापासून तीन राशीवर जो बिंदु असतो त्यांतून विशुववृत्तांशी समांतर असें निघणारें जें लघुवृत्त त्यास उत्तरायणवृत्त किंवा मकरवृत्त असें म्हणतात. यासच इंग्रजीमध्यें टॉपिक ऑफ् कॅप्रिकार्न म्हणतात. (२५) अयनवृत्त; कर्कवृत्त व मकरवृत्त या दोन्हीही वृत्तांस अयनवृत्त असें सामान्य नांव आहे. (२६) भूयाम्योत्तरवृत्त; पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांतून जाणारीं जीं महावृत्तें त्यांस भूयाम्योत्तरवृत्तें असें म्हणतात. (२७) भूमध्यरेखावृत्त: ज्या भूयाम्योत्तर वृत्तापासून रेखांश मापण्याचें ठरविलेलें असतें त्यास भूमध्यरेखावृत्त असें म्हणतात. या भूमध्यरेखावृत्तास इंग्रजीमध्यें स्टॅंडर्ड मिरीडियन असें म्हणतात. (२८) लंबवृत्त; कोणत्याहि महावृत्ताच्या दोन्ही ध्रुवांतून जाणारीं किंवा महावृत्तास लंबरूप म्हणजे काटकोनांत कापणारीं जीं महावृत्तें त्यांस त्या महावृत्ताचीं लंबरूपवृत्तें असें म्हणतात. यांसच इंग्रजीमध्यें सेकंडरीज असें म्हणतात. (२९) दृश्यक्षितिजवृत्त; पृथ्वीवरील कोणत्याहि बिंदुला एक स्पर्शरेखात्मक पातळी काढून तीं आकाशांत ज्या ज्या ठिकाणीं सर्व बाजूंनीं लागून जें एक महावृत्त बनतें त्यास दृश्यक्षितिजवृत्त असें म्हणतात. यासच इंग्रजीमध्यें सेन्सिबल होरायझन म्हणतात. (३०) भूगर्भक्षितिजवृत्त; पृथ्वीच्या मध्यांतून व दृश्यक्षितिजवृत्ताच्या पातळीला समांतर अशी पातळी आकाशांत ज्या ज्या ठिकाणीं सर्व बाजूंनीं लागून जें एक महावृत्त बनतें त्यास भूगर्भक्षितिजवृत्त असें म्हणतात. यासच इंग्रजीमध्यें रॅशनल होरायझन असें म्हणतात. (३१) भूविषुववृत्त (टेरिस्टिअल इक्वेटर) पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांपासून ९०० अंश अंतरावर जें एक महावृत्त निघतें त्यास भूविषुववृत्त असें म्हणतात. यासच इंग्रजीमध्यें टेरेस्ट्रियल इक्वेटर म्हणतात. (३२) रेखांशवृत्त; भूविषुववृत्त व भूविशुववृत्ताशी समांतर अशी जीं लघुवृत्तें त्यांस रेखांशवृत्तें असें म्हणतात. त्यांवर रेखांश मापतात. यांसच टेरेस्ट्रिअल लॉजिट्यूड म्हणतात. (३३) अक्षांशवृत्त; पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांतून जाणारीं जीं महावृत्तें त्यांस अक्षांशवृत्तें म्हणतात. यांवर अक्षांश मापतात. यास टेरोस्ट्रियल लॅटिट्यूड असें म्हणतात. (३४) नतकालास्त्रवृत्त; आकाशांतील ध्रुव आणि खस्थपदार्थ यांतून जाणारें जें महावृत्त त्यास नतकालास्त्रवृत्त म्हणतात. यासच इंग्रजीमध्यें अवर सर्कल असें म्हणतात. या वृत्ताच्या योगानें कालकोन (अवर ऍंगल) मापतात. हें वृत्त व स्थळाचें याम्योत्तरवृत्त यांमध्यें जो कोन असतो त्यास कालकोन किंवा नतकास्त्र म्हणतात. (३५) विशिष्ट ध्रुवप्रोतवृत्तें; दोन्ही ध्रुवांतून जाणारीं व ध्रुवापाशी काटकोन करणारीं व त्यांपैकीं मेष व तुलासंपात यांतून जाणारें एक व दुसरें अयनबिंदूतून जाणारें अशी २ वृत्तें यांच्या योगानें विषुववृत्त व क्रांतिवृत्त या दोन्ही वृत्तांचे समान चार भाग होतात. अशा दोन वृत्तांस विशिष्ट ध्रुवप्रोतवृत्तें म्हणतात. यासच इंग्रजीमध्यें कोल्युअर असें म्हणतात. (३६) ध्रुवसंपात प्रोतवृत्त; विशिष्ट ध्रुवप्रोतवृत्तांपैकीं जें संपातांतून जातें त्यास ध्रुवसंपांत प्रोतवृत्त असें म्हणतात. (३७) ध्रुवायन प्रोतवृत्त; विशिष्ट ध्रुवप्रोतवृत्तांपैकीं जे अयनबिंदूंतून म्हणजे संपातापासून तीन राशींच्या बिंदूतून जातें त्यास ध्रुवायनप्रोतवृत्त असें म्हणतात. यासच इंग्रजीमध्यें साल्स्टिशियल् कोल्युअर असें म्हणतात. हें वृत्त विषुववृत्तास व क्रांतिवृत्तांस काटकोनांत कापतें.

वृत्तें:- वृत्तांचें शास्त्र म्हणजे छंद:शास्त्रच होय. या छंद:शास्त्राचा तौलनिक इतिहास 'विज्ञानेतिहास' या विभागांत सविस्तर दिला आहे. (ज्ञा. को. वि. ५ प्रकरण ५ वें.) वृत्तें दोन प्रकारचीं असतात. अक्षरवृत्तें व मात्रावृत्तें. अक्षरांच्या संख्येवरून मोजावयाच्या वृत्तांस अक्षरवृत्त व मात्रांच्या संख्येवरून मोजावयाच्या वृत्तांस मात्रावृत्त म्हणतात. अक्षरवृत्तांत तीन पोटभेद आहेत; सम, अर्धसम व विषम. ज्या वृत्ताचें चारहि पाद सारखे असतात तें समवृत्त, ज्याचे पहिला व तिसरा हे सारखे आणि दुसरा व चौथा हे पाद सारखे असतात तें अर्धसम आणि ज्याचे सर्व पाद एकमेकांपासून भिन्न असतात तें विषमवृत्त होय. तीन अक्षरें मिळून एक गण होतो. असे गण आठ आहेत ते पुढीलप्रमाणें:- म य र स त ज भ न. अक्षरांचे प्रकार दोन: लघु व गुरू. र्‍हस्व अक्षरास लघु व दीर्घ अक्षरास गुरू अशी संज्ञा आहे. जोडाक्षरापूर्वीच्या, र्‍हस्व अक्षरास आणि सविसर्ग व सानुस्वार अक्षरास गुरू म्हणतात. कांहीं जोडाक्षरापूर्वी मात्र क्वचित हा नियम लावीत नाहींत. पादांतीं असलेलें लघु अक्षर क्वचित गुरू मानितात. लघु अक्षरांबद्दल (।) ही व गुरू अक्षराबद्दल (S) अशी चिन्हें वापरतात. हीं चिन्हें वापरून वरील गणांची लक्षणें पुढें दिलीं आहेत. पहिल्या चार गणांच्या व्युत्क्रमानें दुसरे चार गण होतात.

म-   S S S        न -   । । ।
य -  S S            न -  S । ।
र -   S । S         ज -  । S ।
स-   ।  । S         त-  S S ।

मात्रा म्हणजे लघु स्वराच्या उच्चारास लागणारा काल. गुरू स्वराच्या दोन मात्रा होतात. मात्रावृत्तांत चार मात्रांचा एक गण मानितात. यति म्हणजे उच्चाराच्या सुलभतेसाठीं घेतली जाणारी विश्रांति. ही प्रत्येक पादाच्या शेवटीं व मध्येंहि असते. कितव्या अक्षरापुढें यति आहे हें दाखविण्यासाठीं कोष्टकांत आंकडे दिलेले दिसतात. समासामध्यें यति येईल तर तेथें समासाचा पदच्छेद व्हावा असा नियम आहे. तसें न होईल तर तेथें यतिभंग हा दोष झाला असें मानितात. वृत्तांचें कोष्टक वर्णानुक्रमानें 'विज्ञानेतिहास' पृ. १४८-१५२ वर दिलें आहे व मराठी वृत्तांचें कोष्टक १५४ पानावर सांपडेल.

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .