विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वृद्धाचलम्:- मद्रास, दक्षिण अर्काट जिल्हयांतील एक तालुका. याचें क्षेत्रफळ ५७६ चौरस मैल असून लोकसंख्या १९२१ सालीं २६३५७७ होती. १९२१-२२ सालीं काळीचें उत्पन्न सुमारें ६ लाख रूपये होतें. वेलार नदी या तालुक्यांतून वाहते. या तालुक्याचें मुख्य ठिकाण जें वृध्दाचलम् तें मणिमुक्ता नदीच्या कांठीं असून क्षेत्राचें ठिकाण मानलें जातें. लोकसंख्या सुमारें १००००. येथें एक जुनें प्रसिध्द देवालय आहे. कर्नाटक युध्दामुळें वृध्दाचलम् येथें बरेच फरक होत गेले.