विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वेलबोंडी:- हिचे वेल असतात. ते बिंयापासून व वेलाच्या कांड्यांपासून होतात व अनेक वर्षे टिकतात. वेलाचे ताणे व पानांचे देंठ जांभळे असतात. फुलें बारीक असतात. फळें पिकल्यावर जांभळीं होतात व त्यांत जांभळा रस असतो. फळें खाण्यास गोड असतात. याच्या पाल्याची घटट अथवा पातळ भाजी करतात. भाजी अळूच्या अथवा चाकवताच्या भाजीसारखी होते व रूचकर लागते. उन्हाळ्यांत पडलेल्या बियांपासून अनेक वेळ पावसाळ्यांच्या आरंभीं उगवतात.