विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वेलिंग्टन:- मद्रास, निलगिरी जिल्हा, कन्नूर तालुक्यांतील लष्करी छावणीचें डोंगरी स्थळ. हें उटकामंडपासून ९ मैल व कुन्नुरपासून १॥ मैल लांब आहे. समुद्रसपाटीपासून वेलिंग्टन ६१०० फूट उंच आहे. लष्कराच्या सोयीचें हवा खाण्याचें हें एकच ठिकाण आहे येथील हवा फार निकोप असते. येथील सृष्टीसौदर्य फारच मनोहर असून फळफळावळ व भाजीपाला विपुल मिळतो.